मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काळी
अनुवाद भारती पांडे.
२०१२
Mehta publishing
पाने२८०
किंमत २८०
(मूळ इंग्रजी the good Earth - pearl buck
1931)
हे पुस्तक इंग्रजीत '७० सालात वाचलं होतं.
आता मराठी अनुवाद वाचला.चिनी शेतकऱ्यांचं जीवन कसं हे सुरूवातीला येतं आणि नंतर
भैरप्पाच्या 'गृहकलह'ची आठवण येऊ लागली. कंटाळवाणं झालं.
चीन गेल्या पंचवीस वर्षांत फारच बदलला आहे. २००० नंतरची पुस्तके वाचायला हवीत.
_________________________

हल्दिराम
पाने २१३
रु३५०
हल्दिराम ब्रांडची माहिती.
मूळ धंदा वाढवणाऱ्या हल्दिरामने (मारवाडी अगरवाल) अगोदरच शेवगाठ्याच्या स्थिर उद्योगातून उडी कशी घेतली, नवनवीन प्रयोग काय केले,धंदा कसा वाढवला, मुलांसाठी कोलकाता,नागपूर, दिल्लीत शाखा कशा काढल्या ही माहिती दिली आहे. मारवाडी समाजातले धंदा चालवण्याची पद्धत, मुलांचे अंकगणिताचे तोंडी शिक्षण, लवकर होणारी लग्ने आणि एकत्र कुटुंबातील गुणदोष याची लेखिकेने (पवित्रा कुमार) मुलाखती घेऊन माहिती मिळवली. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे धंदा सर्वांचाच होतो. पुढे अनेक वर्षे कोर्ट कचेऱ्या होऊन 'हल्दिराम' ब्रांडचे तीन अवतार अधिकृत सुरू झाले.
पहिले इंग्रजी पुस्तक penguin books कडून २०१६ मध्ये प्रकाशित. Bhujiya Barons त्याचा मराठी अनुवाद.
फार लांबवलेलं लेखन सोडल्यास ठीक.
______________________

चीन गेल्या पंचवीस वर्षांत फारच बदलला आहे. २००० नंतरची पुस्तके वाचायला हवीत. >>चीनबद्दल माहिती मिळवायची असेल तर हे बरोबर आहे. पण 'द गुड अर्थ/ काळी' वाचताना कादंबरीच्या भाषेचा, शैलीचा, कथेचा आनंद घेणे असा उद्देश असला पाहिजे ना? तसं बघायला गेलं तर 'तुंबाडचे खोत'मध्ये किती तरी जुन्या काळापासूनचं वर्णन बहुतांश भागात आहे. कोकणदेखील मधल्या काळात कितीतरी बदललं. पण ते पुस्तक वाचायला आजही मजा येते.

गुड अर्थच्याच trilogy मधलं तिसरं A House Divided चा मराठी अनुवाद मिळाला आहे लायब्ररीत. गुड अर्थ मला आवडलं होतं. मधलं पुस्तक Sons किंडलवर वाचावं की काय असा विचार आहे. मुळात ही trilogy आहे हेच मला माहिती नव्हतं.
पर्ल बक च आणखीन एक पुस्तक Pavilion of Women चा मराठी अनुवाद ' ग्रुहस्वामिनी ' अनेको वर्षांपूर्वी वा चला होता. आता ते पुस्तक आउट ओफ प्रिंट आहे. मुळ Pavilion of Women वाचतीये किंडलवर पण हातात पुस्तक धरुन वाचण्याची मजा किंडलला नाही आणि माझ्याकडे आदिम जमान्यातला किंडल आहे. त्यापेक्षा आय पॅडवर किंडल अ‍ॅपमध्ये वाचणं बरं पडतय. पण किमान ५ पुस्तके वाचल्याशिवाय नविन डिव्हाइस घ्यायचा नाही असं ठरवलय.

हे प्रकाशक लोक एखादा लेखक हिट झाला की त्यांच्याकडून आणखी पुस्तके लिहून घेतात. नंतरची तेवढीच चांगली असतात असं नव्हे.
-------
'आम्ही पोस्टातील माणसे' नावाचे पुस्तक पोस्टातून रिटायर झालेल्या (सिताराम मेणजोगे का काही नावं आहे.) लेखकाने लिहिलं होतं. खूप मजेदार किस्से होते. पण नंतर लेखकाने अरब जगातले काही किस्से असलेलं पुस्तक लिहिलं त्यात काही दम नव्हता.

<<<पर्ल बक च आणखीन एक पुस्तक Pavilion of Women चा मराठी अनुवाद ' ग्रुहस्वामिनी ' अनेको वर्षांपूर्वी वा चला होता. आता ते पुस्तक आउट ओफ प्रिंट आहे>>>
खूपच जबरदस्त पुस्तक आहे हे.

किंडलचं android app मोबाईलवर घेऊन ठेवलंय. काही लेखक ( शशी थरूर उदाहरणार्थ) aws1/2/3 file देतात पुस्तकांची. ती तिकडे उघडते. तीन चार वाचली आहेत थरूरची. अगदी खुशवंत सिंग एवढं नाही पण बरंच चांगलं लिहितो. आता नाव काढलंय आहे तर शुभेच्छा देऊन ठेवतो.( काँग्रेस पक्षाध्यक्ष निवडणुकीला उभा आहे ना).

मी मागे शरद ऋतू विषयी विचारलेलं तर काही वाचक मित्र मैत्रिणींनी ऋतुचक्र बरोबर मारुती चितमपल्ली यांचं चकवाचांदणं, व्यंकटेश माडगूळकर यांचं नागझिरा, मिलिंद वाटवे यांचं आरण्यक अशी पुस्तके सुचवली होती. वेळ होता त्यात ऋतुचक्र आणि चकवाचांदणं दोनच वाचून झाली. छोटंसं असं ऋतुचक्र पुस्तक आहे. फक्त निसर्ग आणि निसर्ग जो वेगवेगळ्या ऋतूत कसा दिसतो . मग त्यात निसर्गातले प्राणी , पशू, पक्षी, कीटक , डोंगर, पाणी सगळंच .
मला त्यातलं एक वाक्य फार फार आवडलं. जे आता कुठंही बाहेर गेल की आठवतं - न राहवून इथं देते. -- ' निर्मिती, वाढ,पूर्णता, विनाश आणि विनाशातूनच फिरून उत्पत्ती हे चराचराच्या अस्तित्वाचे रहस्य हरघडी प्रत्येक ऋतू आपापल्या रंगीत लिपीत लिहून दाखवतो. कुठे वाचायची ही लिपी. धुळीत, खडकावर, आकाशात, झाडापानांवर, पशुंच्या, पक्षांच्या अंगावर ,कीटकांच्या पाठीवर ऋतू निरनिराळ्या रंगात हजारो आकृत्यांनी ही रेषामय लिपी लिहितो. '

चकवाचांदणं ही सुंदर आहे. मोठं आहे जरा पुस्तक.

वावेच्या वरच्या दोन्ही पोस्ट्स ना मम. काळी मला ही त्या काळाचं पुस्तक, चिनी शेतकऱ्यांची गोष्ट असं म्हणून वाचायला आवडलं. त्यावर मुव्ही पण आहे कृष्णधवल. आणि जशा व्यक्तिरेखा डोळयांसमोर येतात तशाच मुव्हीत आहेत. तुनळीवर छोटे तुकडे आहेत. मी हे कुठंतरी आधी पण लिहिलंय अस वाटतंय मला.

मागे उल्लेख आलेलं 'नर्मदे हर हर' - जगन्नाथ कुंटे यांचं पुस्तक. मला खर तर srd नि अगोदर लिहिलेलं नर्मदा दर्शन हे रेवाशँकर यांचं वाचायचं होतं पण लायब्ररीत। गेल्यावर ते नाव नेमकं आठवेना मग हे जगन्नाथ कुंटे यांचं वाचलं. गम्मत म्हणजे कृष्णमेघ कुंटे यांचे ते वडील हे माहीत नव्हतं. एका रानवेड्याची.. पूर्वीच वाचलेलं. इथं माबोवर सविस्तर अभिप्राय लिहिलेला आहे ' बी' यांनी. ते सारख चहा, सिगरेट अती झालंय, हनुमान भेटणे असे काही प्रसंग मला नाही आवडले पण तेवढ सोडलं तर एकंदरीत अशी परिक्रमा करणाऱ्यांबद्दल नितांत आदर आहे त्यामुळं अवडलंच पुस्तक.

या महिन्यात आनंद यादव यांचं घरभिंती हे पुस्तक वाचलं. जवळजवळ साडे पाचशे पानी पुस्तक आहे. घरभिंती अगोदर झोंबी आणि नांगरणी हे दोन भाग आहेत. हे तिसरं आणि नन्तरच काचवेल असा चौथा भाग आहे. झोंबी खूप अगोदर वाचून झालंय. लहानपण ते शाळकरी वय हा भाग त्यात आहे. घरभिंती मध्ये सुरवात त्यांच्या पहिल्या नोकरितल्या पहिल्या दिवसापासून होते. नाव ही समर्पक अगदी. स्वतःच आयुष्य शिकून मार्गी लावत लावत गावाकडच्या घराच्या भिंतीही मजबूत करायचा प्रयत्न ,त्यातले अडथळे , पाठच्या भावंडांनी शिकावं ही तळमळ . त्यात भावंडांनी दिलेली , मध्येच सोडलेली साथ. आता बरे दिवस येतील असं वाटत असताना गावी हातातून गेलेला मळा आणि पुन्हा स्वतःचा मळा फुलवू हे पाहिलेलं स्वप्न असा सगळाच प्रवास आहे.

जगन्नाथ कुंटे यांनी त्यांच्या यात्रा आहे तशा दिल्या आहेत हे आवडलं. तिकडे परिक्रमांत काय काय होत असतं ते समजायला सोपं पडलं. "चल निघ परिक्रमेला" असा आदेश येणे, किंवा अश्वत्थामा, नर्मदा भेटणे तसेच कुंडलिनी जागृत होणे हे अतिंद्रीय अनुभव सर्वांनाच येणार नाहीत हे माहिती आहे. परंतू उजेड पडला.
गंमत म्हणजे मुलाने - कृष्णमेघाने पुस्तक लिहिले तेव्हा यांना वाटू लागले की आपणही यात्रा वर्णन पुस्तक लिहावे. म्हणजे लेकानंतर बापाने लिहायला सुरुवात केली.
डोंबिवलीतील रोटरीवाल्यांनी साहित्य संमेलन भरवले होते ( पिंपरी चिंचवडमध्ये झाले तेव्हा) त्यात यांना बोलावले होते. खूप गर्दी झाली होती. "तुम्हाला नाराज करायचं नाही म्हणून आलो,पण अंगात खूप ताप आहे." आवडलं.समोरून पाह्यला मिळालं.

संमेलनात पहिल्या दिवशी एवरेस्ट मोहिमा आखणारे उमेश झिरपे आले होते. खूप बहारदार दृकश्राव्य सादर केलेले. यानंतर कधी तरी त्यांना ह्रदयरोगाचा त्रास होऊ लागला. आता बहुतेक जात नाहीत. त्यांचंही पुस्तक आहे. पण दृकश्राव्यामुळे आणलं नाही.
-----
आनंद यादवांचं लेखन अजून वाचलं नाही. बघतो.
--------
( मायबोलीवर ' बी' हल्ली दिसत नाहीत.)
-----
'तेल नावाचा इतिहास ' सापडलं. चांगलं आहे.

'तेल नावाचा इतिहास ' सापडलं. चांगलं आहे. <<<>>>>>>> ह्याचाच पुढचा भाग, ' तेल नावाचं वर्तमान ' ही आलाय. तो ही छान आहे.

वर्णिता, तुमच्या इतर पोस्ट्स प्रमाणे हीही आवडली.

SRD , तुम्ही पुस्तक चव घेत वाचत नाही असं वाटलं.

मला झोंबी आणि तेल नावाचा इतिहास यांचा कंटाळा आला होता. सुरुवात क्लिक झाली नाही. मग सोडून दिली होती. आनंद यादवांची पुस्तकं वाचायची आहेत. तेल - वर्तमान शेजार्‍यांसाठी आणलंय. ( त्यांना मुंमग्रंस चं सदस्यत्व घ्यायला उद्युक्त केलं. त्यांची पुस्तकं मीच बदलून आणतो. ).

पु ल देशपांडे ह्यांनी अनुवादित केलेले कान्होजी आंग्रे हे पुस्तक वाचले , मला आवडले , कान्होजींची फार माहिती नव्हती ती ह्या पुस्तकाने झाली
ब्रिटिश पोर्तुगीज डच आणि सिद्धी इतक्या सत्ताना समुद्रावर वचक बसवणारा थोर दर्या सारंग !!
पुस्तकात त्या वेळेस ची परिस्थिती जणू बुद्धीबळाचा पट उलगडून दाखवावा अशी सांगितली आहे

SRD , तुम्ही पुस्तक चव घेत वाचत नाही असं वाटलं. . . .

प्रतिक्रिया आवडली भरत. माझी काही अपेक्षा असते. अमुक घटना अमुक ओळींत लेखकाने उरकायला हवी. त्यापलीकडे ओळी वाढवल्यास की मी पाने ढकलतो.
मारिओ पुझो बरा वाटतो. कथानक पुढे बरोबर सरकतो.

पु ल देशपांडे ह्यांनी अनुवादित केलेले कान्होजी आंग्रे हे पुस्तक वाचले , मला आवडले , कान्होजींची फार माहिती नव्हती ती ह्या पुस्तकाने झाली>> पुस्तकाचे नाव सांगाल का व कुठे मिळेल ते?

@अश्विनीमामी - ऍमेझॉन वर होते , मधेच नॉट available येते पण लक्ष ठेवून राहा मधेच येते ते पुस्तक
किंवा बुकगंगा वर येते अधून मधून

कान्होजी आंग्रे असेच नाव आहे पुस्तकाचे
आता ऍमेझॉन वर उपलब्ध आहे>> धन्यवाद परवा मुलीला रिसर्च साठी हवी होती माहिती. मला फक्त आंग्रिया क्रुझ माहीती. व विकि पेज. पुस्तक म्हण जे जास्त माहिती असेल. ह्या वरील पिक्चर कोणी बघेल काय? तर आम्ही बनवेल.

वा बरेच नवीन रिव्हयु आलेत की.
छान लिहिताय सगळे.

मध्यंतरी दुर्गा भागवतांचं "आठवेल तसे" वाचत होते. आत्मचरित्राऐवजी आठवणी असं लिहिलय. पण मी वाचाच किंवा वाचू नका दोन्ही नाही म्हणू शकत. त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वात जो ताठरपणा, जो फटकून वागणं किंवा अती स्पष्टवक्तेपणा म्हणूत. त्यातून या सगळ्या आठवणींतून 80-85% आठवणी नकारात्मक आहेत. म्हणजे आठवलेल्या बहुतांश व्यक्तींबद्दल त्यांनी वाईटच लिहिलय, म्हणजे तसा अनुभवही असेल. पण एकुणात बिटर निवड दिसली. जरा वाईटच वाटलं सतत वाचताना. की इतकी हुषार, कर्तृत्ववान बाई आतून खूप बिटर होती... एकही अनुभव हृद्य असा लिहिलेला जाणवला नाही. म्हणजे असू शकतं असं जीवन एखादीचं; त्यातून दुर्गाबाईंसारखं व्यक्तित्व विरळाच.

एकदा वाटलं की मग हे नसतं लिहिलं तरी चाललं असतं न? पण मग आहे मनोहर तरिही आठवलं. मग वाटलं, का नाही लिहू? एखादीला, त्यातून जिने आयुष्य तत्व आणि मुल्यांशी बांधून घेतलय तिचे अनुभव असे बिटर असायचेच, अन मग तिनं इतर साहित्य लिहिल्यानंतर हे अनुभवही लिहिले तर काय हरकत आहे? जग असही दिसू शकतच की अशा प्रगल्भ व्यक्तित्वाला. मला पुस्तक आवडलं, नावडलं असं ठरवू शकत नाही. पण हे लिहायची त्या बाईंची ताकद जरूर वाखाणावी वाटली. तसंही प्रत्येक साहित्य आनंद देणारच असलं पाहिजे असं कुठेय? वास्तवाची अशी ठळक अन थेट जाणीव करून देणारं साहित्यही हवचं की.

खूप विस्कळित लिहिलय, रादर लाऊड थिंकिंगच आहे. पण अशी पुस्तकंही वाचली पाहिजेत असं जरूर वाटलं.

दुर्गाबाई अन सुनिताबाई यांची तुलना अजिबातच नाही. एका अर्थाने पुरुषप्रधान क्षेत्रात दंड ठोकून उभी राहिलेली नावाला सिद्ध करणारी दुर्गा होती ती. सुनिताबाईंनी असे समाजाविरुद्ध बंड ठोकलं नाही. त्यांचं नातं समन्वयाशी जोडलेला.

खरं तर दोघींचा पिंडच वेगळा. तुलना करणंच बरोबर नाही. अर्थात सुरुवात माझ्याकडूनच झाली पण मला ती तुलना फक्त अन फक्त; लोकांना रुचेल तेच लिहायला, नकार देणं इतक्यापुरतीच अपेक्षित आहे.

तेव्हा लिहावंच की, लोकांना न रुचेल असंही Wink

दुर्गाबाईंसारखं व्यक्तित्व विरळाच. >>> + ११
....
त्यांचा एक किस्सा माझ्या https://www.maayboli.com/node/80951 या धाग्यातून पुन्हा :

१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.

जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले,

“हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.

सुनीताबाई आणि दुर्गाबाई असा विषय निघाला आहे तर-

'आहे मनोहर तरी' मध्ये सुनीताबाईंनी ' पुलंनी आणीबाणीला भरपूर सक्रिय विरोध करूनसुद्धा दुर्गाबाईंच्या वर्तुळात 'इतर कुणीही साहित्यिक आणीबाणीविरुद्ध उभे ठाकले नाहीत, एकट्या दुर्गाबाई उभ्या राहिल्या' असा सूर लावला जायचा' याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ('दुर्गाबाईंच्या वर्तुळात', खुद्द दुर्गाबाईंकडून नसावा. )

१) दुर्गाबाईंना पिएचडीवाल्या गाईडने फसवलं ते त्यांना मनाला लागलं. म्हणून त्यांच्याकडे कडवटपणा आला असणार.
२) पुलंच्या कमाईची गाडी सुनीताबाईंनी रूळावर ठेवली. ती सारखी घसरायची. त्याबद्दल 'आहे मनोहर तरी" हे शेलकं विशेषण घरचा आहेर होता. त्यातून दोघांच्याही सन्मानास / आदरास बाधा येत नाही. पण ते पुस्तक प्रसिद्ध होऊन चर्चेत आल्यावर मतं ऐकली तेव्हा कळलं की सुनिता बाईंना काय म्हणायचंय तो मुद्दाच विशेषतः: स्त्री वाचकांना समजला नाही. त्यांचं आपलं एकच "बघा, जग डोक्यावर घेतलं तो माणूस खरा कसा होता." स्त्रीवादी विचार सांगणाऱ्या बऱ्याच महिला या साहित्य वाचक नव्हत्याच. फक्त कुणी हा विचार अधोरेखित केला म्हणून तेवढंच पुस्तक आणून वाचलेलं.
बाकी आपली संपत्ती आयुकाला देऊन टाकली हे मात्र विसरलेच.

त्यातून दोघांच्याही सन्मानास / आदरास बाधा येत नाही. १००%
आहे मनोहर तरी हे पुस्तक 'पुलंवर' नाही, हे लक्षात ठेवलं तर सुनीताबाईंना जे म्हणायचंय ते आपल्यापर्यंत पोचतं. 'पुलंच्या बायकोने त्यांच्यावर लिहिलेलं पुस्तक' असं डोक्यात ठेवलं की नाही पोचणार.

Pages