Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अमितव, अगदी खरं. असा माईंड
अमितव, अगदी खरं. असा माईंड सेट झालाय खरा सर्वसामान्यपणे.
मला उलटा अनुभव खूपदा येतो, "राधे..." लिहिलय म्हणजे या बाईच्यात शून्य तार्किकता, शून्य शास्त्रीय दृष्टिकोन वगैरे
<<वर्णिता, देवकी तै, वावे,
<<वर्णिता, देवकी तै, वावे, अवलताई ,srd, हर्पेन
छान लिहिताय सगळे.>> +१
छान चर्चा झाली, सुरुये इथे.
हर्पेन, मीही सातव्या पायरीला जरावेळ लटकून परत सहाव्या पायरीवर अडकलोय. बघुया पुढे काय होते.
LOC - Hormimon Jackob चे मूळ
LOC - Happymon Jecob चे मूळ इंग्रजी वाचलंय. मराठी अनुवाद मिळालाय. जरा चाळतो.
लेखकाने स्वत: जाऊन आढावा घेतलाय म्हणजे बरंय.
पण जसं अन जितकं वाचत जाऊ
पण जसं अन जितकं वाचत जाऊ तितकं नुसतं रुचणारच नाही तर अनोळखी, प्रसंगी न रुचणारंही वाचावं. असं वाचन आपला अनुभवही विस्तारते अन आपल्या विचारप्रक्रियेला ढुशाही देतं बऱ्याचदा आपण आपल्या परिघातलं वाचन स्विकारतो, नवा लेखक, नवा जॉनर पटकन उचलत नाही. तर ती मर्यादा ओलांडता आली पाहिजे. >>> भारीच लिहिलंयस.
वावे, आहे मनोहर मध्ये ३० टक्के इतर लिखाण आहे आणि ७०% लिखाण हे पुलंच्या बायकोचे आहे. त्यामुळे ती भूमीका सोडता नाही येत त्या पुस्तकात. पुलं वगळले तर त्या पुस्तकात बाकी वाचण्यासारखं मला तरी काहीच खास नाही वाटलं - ना साहित्यीक मूल्य ना एखाद्या व्यक्तीमत्वाचा संपूर्ण परीचय. अनुभव म्हणून ते खरं असेलही पण त्या अनुभवांत जगावेगळे असेही काही नाही.
सुनिताबाईंकडून पुस्तक लिहवून
सुनिताबाईंकडून पुस्तक लिहवून घेतले प्रकाशकाने आणि पु.लं.च्या लाटेचा उपयोग करून घेतला असे म्हणू. आता पुढची पिढी पु.ल., अत्रे,व.पु.,वाचेल का शंकाच आहे.
_______
तेलाचं वर्तमान पुस्तक आज दिसलं आणि अवचित चांगले अनारसे सापडल्याचा आनंद झाला.
पुलं वगळले तर त्या पुस्तकात
पुलं वगळले तर त्या पुस्तकात बाकी वाचण्यासारखं मला तरी काहीच खास नाही वाटलं
साहित्यिक मूल्य कदाचित नसेलही जास्त, पण त्यांच्या लहानपणच्या आठवणी, त्यांचे विचार, त्यांनी जपलेली मूल्यं, परखडपणे विविध विषयांवर मांडलेली मतं, जी.एं.बरोबरची मैत्री हे सगळं वाचायला मला खूप आवडलेलं आहे.
तुमच्या मताचा आदर आहे. शिवाय प्रत्येक वाचकाच्या मनात एकच पुस्तक वाचताना वेगवेगळ्या भावना येऊ शकतात हेही मान्य आहे.
'आहे मनोहर तरी' मधल्या माझ्या लक्षात राहिलेल्या गोष्टींमधल्या बहुतांश गोष्टी सुनीता देशपांड्यांच्या आहेत, पुलंच्या बायकोच्या नाहीत.
पुलंबद्दल त्यांनी व्यक्त केलेली नाराजी म्हणा, दोष दाखवणं म्हणा, एक प्रकारे साहजिक वाटतं मला. कुठल्या नवरा-बायकोत हे नसतं? त्यांनी 'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' वगैरे बिरुदांची भीड न बाळगता ते लिहिलं हा त्यांचा स्वभाव. आणि तेही 'छान छान लिहिलं तर खोटं वाटेल म्हणून नावापुरता दोष दाखवणं' अशा स्वरूपाचं नाहीये. खरोखरच मनापासून लिहिलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांनी पुलंबद्दल जे चांगलं लिहिलेलं आहे, ते खूप गोड वाटतं.
इथे हेही नमूद केलं पाहिजे की माझ्यासहित ९९% वाचकांनी हे पुस्तक पुलंच्या बायकोचं आहे म्हणूनच वाचायला घेतलं असणार.
पुस्तक वाचल्यावर मला काय वाटतं ते वर लिहिलं आहे.
तेलाचं वर्तमान पुस्तक आज
तेलाचं वर्तमान पुस्तक आज दिसलं आणि अवचित चांगले अनारसे सापडल्याचा आनंद झाला.
अनारसे चांगले होण्यासाठी तुपाचं वर्तमान जास्त महत्त्वाचं.
वावे +१
वावे +१
आणि अनलंकृत , जे आहे तसं सांगणाऱ्या आत्मकथनाचं साहित्यिक मूल्य शून्य हे तर अजिबात पटलं नाही.
मला अजिबात ते फक्त पुलपत्नीचं पुस्तक वाटलं नाही.
ही चर्चा वाचून मास्तरांची सावली आठवलं.
सुनीताबाईंकडून कोणी लिहवून घेईल अशा त्या वाटल्या नाहीत.
त्यांची आणखीही किमान दोन पुस्तकं आहेत.
Srd, तुम्हांला माहितीपर पुस्तकं आवडतात असं दिसतं.मला human touch नसलेली माहितीपर पुस्तकं बोअर करतात. अर्थात ज्याची त्याची आवड.
Srd, तुम्हांला माहितीपर
Srd, तुम्हांला माहितीपर पुस्तकं आवडतात असं दिसतं.- -
भरत, आहे मनोहर तरी फारच आवडलं होतं. शिवाय तो पु्लंचा सिनेमाही आवडला होता. पुण्यातल्या प्रेक्षकांनी ओरड केली होती की सिगरेटी फुंकणारे पुलं का दाखवले. असं कसं? जसं ते वागत होते ते न दाखवून उणे झाले असते ना. पुलं आहे तसे मला आवडले. सिगरेटी नसल्या,संपल्या की ते कासाविस होतं ते ओळखून सुनीताबाई पर्समध्ये सिगरेटी ठेवू लागल्या होत्या. म्हणजे समरस होण्याचा कळसच होता.
पण प्रतिक्रिया आवडली आणि पोहोचली.
तुमचे सध्याचे अभिप्राय
वावे, छान उकल केली आहे
वावे, छान उकल केली आहे तुम्हाला पुस्तक का आवडले याची. प्रतिसाद बराचसा (सगळा नाही) पटला.
जे आहे तसं सांगणाऱ्या आत्मकथनाचं साहित्यिक मूल्य शून्य हे तर अजिबात पटलं नाही. >>> या न्यायाने मायबोलीवरचे कोतबो धागे साहित्यीक मुल्यांनी ठासून भरले आहेत म्हणायचे
जोडीदाराच्या एखाद्या कृत्याची तिडीक आल्याने, त्याच्याशी कुठलाही विचार विनीमय न करता, त्याचे मत न जाणता त्याला पितृत्व नाकारणे आणि त्यात काही चुकलंय याची जाणीवच नसणे यात कसला आलाय परखडपणा ? आली लहर अन केला कहर अशा अनुभवात साहित्यीक मूल्य दिसत असेल तर काहीच म्हणायचं नाहीये मला.
भरत, ओके.
भरत, ओके.
वावे, भरत सुनीताबाईंच्या
वावे, भरत सुनीताबाईंच्या पुस्तकाबद्दल +१.
जोडीदाराच्या एखाद्या कृत्याची
जोडीदाराच्या एखाद्या कृत्याची तिडीक आल्याने, त्याच्याशी कुठलाही विचार विनीमय न करता, त्याचे मत न जाणता त्याला पितृत्व नाकारणे आणि त्यात काही चुकलंय याची जाणीवच नसणे यात कसला आलाय परखडपणा ? आली लहर अन केला कहर अशा अनुभवात साहित्यीक मूल्य दिसत असेल तर काहीच म्हणायचं नाहीये मला. >>
माधव,
माफ करा पण मला असे वाटले, तुम्ही जजमेंटल झाल्याने एक वाचक म्हणून, लेखिका आणि पुस्तकाप्रती तुम्ही अनबायस्ड राहिला नाहीत.
अनबायस्ड राहून पुस्तके पचवणे खासकरून आत्मचरित्र, आत्म्नपरीक्षण्/आत्मसंशोधन अशा प्रकारची ही फारच बेसिक रिक्वायरमेंट आहे.
माधव, तुम्ही पुस्तकातला तेवढा
माधव, तुम्ही पुस्तकातला तेवढा भाग तरी परत वाचून बघावा असं मला वाटतं. तुम्ही म्हणताय तसं नाहीये ते.
एवढ्या बेपर्वाईने जोडीदारीण वागली तर नंतर ते नातं इतक्या चांगल्या प्रकारे टिकेल का?
वावे, भरत सुनीताबाईंच्या
वावे, भरत सुनीताबाईंच्या पुस्तकाबद्दल +१..... 1.
सुनीताबाईंच्या ते पुस्तक बाजारात आल्या आल्या वाचले होते.स्तिमित झाले होते ते पुस्तक वाचून.
नीटसे मांडता येत नाही.त्यावेळी त्यांचे लिखाण वाचून धारदार सुरीची उपमा मनात आली होती.
त्यावेळी अनेकांना हे पुस्तक आवडले नव्हते.जयवंत दळवींनी, पुलंच्या घेतलेल्या मुलाखतीत पुलंनी या पुस्तकाची तारीफ केल्याचे आठवते.
'आहे मनोहर तरी' समहाऊ अजून
'आहे मनोहर तरी' समहाऊ अजून वाचले नाही. वरची चर्चा वाचून आता पुन्हा उत्सुकता आहे. वावे यांनी लिहीलेला तो अँगल इंटरेस्टिंग आहे. ही चर्चा वाचली नसती तर बहुधा मीही पुलंच्या बायकोने त्यांच्याबद्दल लिहीलेले पुस्तक या दृष्टिकोनातूनच वाचले असते.
मलाही 'आहे मनोहर तरी' कडून
मलाही 'आहे मनोहर तरी' कडून ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झाल्या नाहीत. नात्यांचे व प्रसंगांचे बरेचसे लूज एन्ड्स सोडलेत. त्यांच्या परखड रादर कोपिष्ट स्वभावाने बरीचशी नाती कुठल्याच उंचीवर गेली नाहीत. मगं ते स्वातंत्र्ययुद्धातला सहभाग असो , नाटकातला सहभाग असो, मोरीत पडलेल्या चमचाभर लोण्यासाठीची धडपड वगैरे गोष्टींवर (एनर्जी वाया घालणे?) असो , पत्ते खेळताना कुणीतरी काहीतरी बोलल्याने खेळणे कायमचे सोडून देणे असो. सगळं अर्धवट राहिल्यासारखं वाटलं.
उलट अस्पृश्य मोलकरणीचा पाय हातात घेऊन आस्थेने त्यातले पू-दूषित रक्तं काढणारी त्यांची आई मला अधिक आवडली/पोचली. ठाकूरांकडची- पूर्ण आयुष्य एकटं काढणारी तरीही प्रेमळ व कर्मनिष्ठ बालविधवा आजीही भावली. यांच्या बाबतची बरीचशी समर्पणे मला एकांगी वाटली. कारण समोरचा किंचितही अपारदर्शक वागला की ह्या पूर्णपणे अंग काढून घ्यायच्या व इमोशनली कोल्ड व्हायच्या. त्यामुळे त्यांचे झोकून देणे विनाअट तर नसायचेच, शिवाय अटी व अपेक्षाही सामान्यांना झेपणाऱ्या नसायच्या. अर्थात त्यांचं त्यांना ! फक्त पुलंच्या बाबतीतच त्यांनी तडजोडी केल्या होत्या. कारण ते 'पिपल प्लीजींग' असावेत , ह्या अजिबात तशा नसाव्यात. पुन्हा, ठीक आहे ज्यांचे त्यांना !!
हे पुस्तक वाचून मला खरंतर सुनिताबाईंचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्वच जाणून घ्यायचे होते , पण ही भेट वरवरचीच झाली. त्यांच्याकडून लिहवून घेणं वगैरे शक्य नव्हतं तरीही कुठल्यातरी क्षणी त्यांनी 'हो' म्हटल्याने ते त्यांच्या प्रामाणिक स्वभावानुसार त्यांनी पूर्ण केले असणार अशी शक्यताही असू शकते. लेखन असो वा माणूस मला त्यातल्या पूर्णत्वाची ओढ वाटते, इथे मला वाचकांशी त्यांचे नाते अलिप्त आणि अपूर्ण वाटले, ट्रेलरलाच पिक्चर समजा टाईप !
वैयक्तिकदृष्ट्या माझ्या मते त्या काळाच्या मानाने जे शिक्षण, आईवडिलांचा सपोर्ट, प्रखर बुद्धिमत्ता, मुख्य म्हणजे समाजातील मानाचं स्थान व त्यांच्या मताला असणारी किंमत इतक्या असामान्य व मौल्यवान गोष्टी त्यांना मिळालेल्या होत्या, त्या वैयक्तिक तपशीलात न जाताही अगदी आग लावू शकल्या असत्या, तेवढा विश्वास त्यांनी वाचकांवर टाकलाच नाही, तसा प्रयत्न सुद्धा केला नाही. त्या कुणाच्या तरी मोहात पडतात तो , पारिजातका खालची पुलंसोबतची गोड आठवण व जिएंशी पत्रव्यवहार हे प्रसंग मात्र मनापासून आवडले.
त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पतीपत्नी म्हणून काय निर्णय घेतले याची/याबद्दल मला तिळमात्रही उत्सुकता/मत नाही, उलट मला नकोच असतं ते. हे पुस्तक मी आयुष्यातल्या चार वेगवेगळ्या स्टेजेसना वाचले आहे. हे मत मागच्या वर्षी दोनदा वाचून नंतर बनवलेले आहे.
वाचकांच्या मनाला स्पर्श करणे वेगळे व स्पर्श केल्यासारखे करणे वेगळे! मी अतिशय मुक्त व आधुनिक वाचक आहे, साहित्यिक मूल्य वगैरे विचारही मी फारसा करत नाही. फक्त लेखकानी माझ्यावर संपूर्ण विश्वास टाकलेला मला आवडतो. कदाचित त्या काळात समाजमनाला एवढ्याच मर्यादेत दिलेल्या धडका सोसत असाव्यात, त्यामुळे मला तितकं पोचलं नसावं व संमिश्र भावना आल्या असाव्यात. कोण सांगावं !!
हा प्रतिसाद इतर प्रतिसादांवर दिलेला नाही, तो मी आधी दिलाय ! हा प्रतिसाद बायस व जजमेंट मधूनही दिलेला नाही, ह्या धाग्याच्या उद्देशानुसार ह्या पुस्तकावर फक्त सामान्य वाचक म्हणून दिलेला आहे. मी असं लिहिलं आहे म्हणजे मी 'पुलंच्या बायकोनी' लिहिले आहे असं समजून वाचले असे होत नाही नं , मी आता कुणाच्या कुणाशी असलेल्या नात्यामुळे भारावून जाणाऱ्यांपैकी व त्यांच्या परस्परांतील आठवणींनी intimidate होणारी राहिले नाही. लेखक लिहिताना इतर प्रसंगांतून सुद्धा स्वतःचं स्वतःशी असलेले नाते उद्धृत करत असतो मला इथे तेही नीट दिसले नाही.
ठीक आहे नं, आवड आपली आपली
मोठ्या झाडाच्या सावलीतलं झाड
मोठ्या झाडाच्या सावलीतलं झाड असं सुनिताबाई नव्हत्या हे स्पष्ट आहे. त्यांचं एक वेगळंच व्यक्तिमत्त्व दिसतं.
पण जेव्हा पुस्तक प्रसिद्ध झालं तेव्हा मात्र काही महिला वाचकांनी ते वाचून गैरसमज दृढ करून घेतला की "वाटतात तुम्हाला मनोहर पण तसे ते अज्जीबात नव्हते" हे सांगण्यासाठीच पुलंच्या बायकोने हे लिहीलं आहे.
बरं असो.
वरदा प्रकाशनचे हे.अ.भावे यांनी त्यांच्या आत्मकथनात शेवटचे चार लेख बायकोला काय वाटते यासाठी सोडले आहेत. म्हणजे नंतर बायकोने आणखी काही वेगळे पुस्तक लिहायची खटपट करायला नको. ही आइडिया भारी आहे.
भावे फार भारी माणूस.जी पुस्तके तथाकथित प्रकाशक अंगावर ( पुस्तकं विकली जाणार नाहीत या धोरणाने) घेत नाहीत ती भाव्यांनी छापली. दुर्गाबाईंची पुस्तकं, समग्र साने गुरुजी चौदा हजार पानांचे.
तेल नावाचे वर्तमान हे संपवले.
तेल नावाचे वर्तमान हे संपवले. तेलाची गरज, त्यांचे राजकारण, अमेरिकेने लक्ष घातल्याने नवीन तयार झालेल्या इस्लामी दहशतवादी संघटना कशा वाढल्या आणि परत अमेरिकेलाच कशा भारी पडल्या,मग त्यांचा बंदोबस्त, तेलाला पर्याय म्हणून वीजेच्या मोटारी आणि त्यांच्या बॅटरी साठी लागणारा लिथिअम धातूचा अगणित साठा असणारा एक चिमुकला देश बोलिव्हिया, इत्यादींची एकत्रित माहिती गिरीश कुबेरांनी एकाच पुस्तकात दिली आहे. पुस्तकाची दुसरी आवृत्ती एप्रिल २०२२ ची वाचली. फेब्रुवारीत सुरू झालेले 'पुतिन के युक्रेन वाले कारनामे' हे प्रकरण येऊ शकलेलं नाही.
ओसामा लादेन हत्या याबद्दल डिटेल्स ओबामानेच त्यांच्या 'A promised land' पुस्तकात दिलेले आहेत. तीच माहिती विकीवरही आहे. त्याचे एक प्रकरण आहे.
शिवाय निरनिराळ्या महत्त्वाच्या व्यक्तिंची थोडक्यात माहिती आहे.
अमेरिकेच्या धोरणांवर सरळ स्पष्टपणे टीका केली आहे हे एक विशेष. राजहंस प्रकाशनाच्या दिलीप माजगावकरांनाही श्रेय जातं.
अस्मिताच्या प्रतिसादाशी बर्
अस्मिताच्या प्रतिसादाशी बर्याच प्रमाणात सहमत आहे. 3 वेळेस तरी मी "आहे मनोहर तरी" वाचलेय आणि असेच विचार डोक्यात आले. त्या पटकन दुखावले जाणारे व्यक्तिमत्व वाटले - "मला कोणी काही बोलायचे नाही" या मानसिकतेचे वाटले. ( आता बरेच बुद्धिजीवी लोक छड्या घेऊन येणार).
या पार्श्वभूमीवर दुर्गाबाईंचे परखड लिखाण आदरणीय वाटते कारण त्यामागे त्यांचे संशोधनपूर्वक अनेकविध लिखाण आणि वैचारिक बैठक यांचे अस्तित्व जाणवत राहते.
'आहे मनोहर तरी' फार पूर्वी
'आहे मनोहर तरी' फार पूर्वी वाचलेलं आहे. तेव्हा ते वाचुन भारावुन वगैरे गेलेलो आणि पुस्तक अर्थातच आवडलेलं. अस्मिताचा प्रतिसाद वाचुन आता परत वाचुन काय वाटतं बघितलं पाहिजे असं प्रकर्षाने वाटतय. हाताला लागलं की वाचेन.
आहे मनोहर तरी अतिशय आवडलेलं
आहे मनोहर तरी अतिशय आवडलेलं पुस्तक आहे, मीही भारावुन गेलेले. मलातरी प्रांजळ, परखड अशा छटा दिसल्या त्यात. ते वाचून कुठेही पु लं वरचे प्रेम कमी झाले नाही, आदरही कमी झाला नाही .
हे पुस्तक मी उलटसुलट चर्चा वाचून वाचायला घेतलेले आणि प्रचंड आवडलं खरंतर, त्यानंतर मी सुनीताबाईंना पत्रही लिहिलेलं, त्यांचं उत्तरही आलं. 1994 मध्ये ते मी वाचलं, सालही आठवतं.
इथे बरेच जण छान चर्चा करतात पुस्तकांवर, परिचय पण छान करून देतात, मी वाचत असते, प्रतिसाद आत्ता देतेय.
दुर्गाबाईपण माझ्या आवडत्या लेखिका आहेत.
@अस्मिता, त्यांच्या परखड रादर
@अस्मिता, त्यांच्या परखड रादर कोपिष्ट स्वभावाने बरीचशी नाती कुठल्याच उंचीवर गेली नाहीत.
मला नाही असं वाटलं. शेवटी प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा 'threshold' असतो एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती चालवून घेण्याचा. त्यांचे thresholds वरती होते असं म्हणायला हवं. प्रत्येकाचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. त्या त्या वेळचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असू शकतात. शिवाय, शेवटी सगळी माणसंच असतात. एखाद्या निर्णयाचा त्यांना पश्चात्तापही झालेला असेल कदाचित. कुणी सांगावं?
) कुठे असते? एखाद्या 'क्ष' व्यक्तीबद्दल आपल्याला बाकी सगळं पटतं, पण एखादा दोष, स्वभावातली एखादी खोच अशी असते की ते नातं आपण पुढे नेत नाही. कदाचित थोडं चालवून घेतलं तर ते नातं अजून उंचीवर जाईलही. तसं आपण करतोही काही बाबतीत. इथे प्रश्न प्रायॉरिटीचा आणि threshold चा येतो, जे सापेक्ष असतं.
शिवाय, 'नाती उंचीवर जाणं' याची व्याख्या तरी सर्वमान्य किंवा अगदी बहुमान्य (असा शब्द नसला तरी चालवून घ्यावा
सुनीताबाईंच्या बाबतीत उदाहरणार्थ मालेगावचं सगळं सोडून त्या परत आल्या, त्याऐवजी काही गोष्टी चालवून घेऊन, काणाडोळा करून त्या (आणि पुलं) कदाचित एक महान शिक्षणसंस्था उभी करू शकल्या असत्या. आज जी महान कार्यं उभी आहेत त्यांच्या निर्मात्यांनीही कदाचित अशा काही गोष्टी चालवून घेतलेल्या असतील. त्यांचं ते प्राधान्य होतं असं म्हणायचं. आणि महान कार्यंही उभी राहिली पाहिजेतच. पण सुनीताबाईंनी स्वतःच्या स्वभावाविरुद्ध जर असं केलं असतं आणि मोठं काम उभं राहूनही जर त्या आतून असमाधानी राहिल्या असत्या, तर काय उपयोग? मग ते काम आपल्या दृष्टीने उंचीवर गेलं तरी त्यांच्या दृष्टीने गेलं नाही ना.
वावे चांगला प्रतिसाद. अजून
वावे चांगला प्रतिसाद. अजून दोन आणे - १) सत्य आणि पुस्तक ह्यात काही लॉजिस्टीकल इश्यूज असू शकतात उदा: एखाद्या व्यक्तीने लेखनास परवानगी दिली नाही. मग त्यांना निनावी ठेऊन लिहीणे वगैरे प्रकार त्या काळात घडत नसतील तर त्या त्या नात्यांची उंची कळणार नाही. २) फूटपट्टी स्त्री-पुरूषांना सारखी असावी. जर एखाद्या पुरूषाने अटी-शर्तींसह नातेसंबंध ठेवले की त्याला चोखंदळ किंवा प्राधान्ये स्पष्ट असलेला किंवा पर्सनल बाऊंड्रीज क्लीयर असणारा इ सहज म्हणले जाते. मात्र स्त्रियांच्या बाबतीत अनॅलिसीस, जजमेंट इ सुरू होते.
किती छान चर्चा !
किती छान चर्चा !
म्हणजे पुस्तके आणि वाचक- वाचन...दोन्ही बद्दल अधिक उन्नत करणारी!
आहे मनोहर तरी ..मी ग्रॅज्युएशन नंतर वाचलेले... स्वतंत्र बाणा जपण्याचे, मतं अधिकाधिक घट्ट होत जाण्याचे ते दिवस! सुनीत बाईंच्या ह्या पुस्तकाने भारावून टाकले नसते तरच नवल!
पण आता वाटतं , की अस्मिता म्हणतेय तसं, लेखन असो वा माणूस मला त्यातल्या पूर्णत्वाची ओढ वाटते, इथे मला वाचकांशी त्यांचे नाते अलिप्त आणि अपूर्ण वाटले, हेही खरं आहे!
अस्मिता, वावे..तुमच्या सारखे हुशार, सजग, रसिक वाचक .. लेखकालाही अधिक समृद्ध करतात.
चर्चा सलग वाचली. अवल, वावे,
चर्चा सलग वाचली. अवल, वावे, अस्मिता छान मतं मांडताय पुस्तकावरची.
आहे मनोहर... पहिल्यांदा वाचले ते शाळकरी वयात शाळांच्या दीर्घ सुट्टीत. बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली अशा पुस्तकंबरोबर. तेव्हा काही निवडक प्रसंग फक्त लक्षात राहिले. त्या नन्तर परत 15 वर्षांनी वाचले तेव्हा मी संसारात पडल्याने त्या अनुषंगाने वाचले गेले. परखड , तटस्थ वृत्तीने लिहिलंय एवढंच वाटलं. आणि त्याच सुमारास गिरीजा कीर यांचं माझी गोष्ट , माधवी देसाई यांचं एक आत्मचरित्र ही वाचली होती. पण आहे मनोहर... पठडीतलं आत्मचरित्र नाही वाटलं एवढं नक्की. पुस्तक आवडलेलं होतं. आता दुसऱ्यांदा वाचल्याला ही 10- 12 वर्षे होत आलीत.
इथे मला वाचकांशी त्यांचे नाते अलिप्त आणि अपूर्ण वाटले, ट्रेलरलाच पिक्चर समजा टाईप ! >>> मम.
अस्मिता, वावे..तुमच्या सारखे हुशार, सजग, रसिक वाचक .. लेखकालाही अधिक समृद्ध करतात. >>> इथं मला लेखकाला म्हणण्याऐवजी माझ्यासारख्या वाचकाला समृद्ध करतात म्हणावसं वाटतंय. इतके कंगोरे माझ्या लक्षात येत नाहीत नुसतं पुस्तक वाचून.
खरंय वर्णिता. मलाही तेच
सुनीता बाईंना समृद्ध करणारे आपण कोण?
अस्मिताचा प्रतिसाद वाचुन आता
अस्मिताचा प्रतिसाद वाचुन आता परत वाचुन काय वाटतं बघितलं पाहिजे असं प्रकर्षाने वाटतय. हाताला लागलं की वाचेन. >>> +१
अमितवच्या ह्या वाक्याला मम
धन्यवाद वावे , अमित, धनवन्ती,
धन्यवाद वावे , अमित, धनवन्ती, हर्पेन, वर्णिता आणि आंबटगोड
आंबटगोड व वर्णिता, मी काही हुशार आणि सजग नाही, या पोस्टीपायी काल स्वयंपाकाला उशीर झाला, कपड्यांच्या घड्या राहून गेल्या, त्याचा फायदा घेऊन मुलांनी कॅन्ड्या खाल्ल्या
.
वावे प्रतिसाद वाचला.
माझा अभिप्राय पुस्तकावर व त्या अनुषंगाने आलेल्या
'नात्यांची उंची' वगैरे वर आहे. त्यांच्या आयुष्यातील सगळी माहिती घेऊन मगं पुस्तक वाचून ठरवावे म्हणजे मगं ते 'पुलंच्या बायकोचेचं' होईल नं. त्यांची नाती त्यांच्या दृष्टीने यशस्वी असतीलच व प्रत्येक प्रसंगात त्या प्रामाणिक,परखड व प्रांजळ असतीलच. फक्त ते पुस्तकात तितके पोचत नाही. माझा अभिप्राय पुस्तकापुरता व पुस्तकाइतकाच आहे. नो गेसिंग गेम्स/ नो बेनेफिट ऑफ डाऊट.. (कदाचित हे /कदाचित ते ) वाचकांकडून तशी अपेक्षा करणे मला तरी अवास्तव वाटते.
सी , मला माहिती तू जनरली लिहिलंय.
(उत्तर म्हणून नाही पण कुणाला काही शंका राहू नयेत म्हणून मीही जनरलीच लिहितेय. )
बाकी स्त्री/पुरुष फुटपट्टी दहा वर्षांपूर्वी जाळून टाकलेली आहे. हेच पुस्तक पुरुषानी लिहिलं असतं किंवा मी पुरूष असते तरी मी हेच्च लिहिले असते. हे असं(इतरांचं/माझं) वुमनकार्ड सेलेक्टिव्हली वापरणं माझ्या तत्त्वांत बसत नाही. जिथे गरज आहे तिथे मी जरूर नोट करेन. हे असं स्पष्टीकरण देणं पण मला अनावश्यक व ऑकवर्ड वाटतं. माझे प्रतिसाद अजिबात कॅलक्युलेटेड/तयारीने/काही तरी सिद्ध करायला दिलेले वगैरे नसतात पण मला एखाद्या गोष्टीविषयी माझ्या खऱ्याखुऱ्या भावना माहिती असल्याशिवाय मी लिहितंच नाही. ह्या आधीचा प्रतिसाद , माझा ह्या धाग्यावरचा परीक्षणाचा पहिलाच प्रतिसाद होता.
हा आता 'आहे मनोहर तरी' वरचा शेपो.
Pages