Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
रेखा : द अनटोल्ड स्टोरी
रेखा : द अनटोल्ड स्टोरी वाचलं. छान किंवा आवडलं अस नाही पण एक उत्सुकता असते ना या स्टार्स विषयी म्हणून उचललं गेलं. फिल्म्स ,मुव्हीज पूर्वी कधी फार बघितले नाहीयेत. गेल्या दहा बारा वर्षात बघतेय. त्यामुळं गाजलेले मुव्हीज नावं माहीत आहेत , तुकड्या तुकड्यात मधूनच बघितलेत काही. आता त्या मागच्या घटना वाचल्याने पाहवेसे वाटतायत. (अवांतर : जुने मुव्हीज बघायची आवड स्वप्ना-राज च्या लिखाणामुळे लागली . खूप दिवसात तिचा मूव्ही लेख आलेला नाहीये बहुतेक)
थोडं वाईट ही वाटलं रेखाबद्दल. तिला सुरवातीला वडलांनी झिडकारले, नाव ही दिलं नाही. घाईघाईत पहिलं लग्न केलं . नाव -मधलं नाव-आडनाव मिळताच खुश झाली. पण तो आनन्द ही टिकला नाही. एक परिपूर्ण अस नाही पण छोटसं कुटुंब असावं ही तिची छोटी इच्छा पुढेही पूर्ण झाली नाही. एकटेपणा शेवट पर्यत तिच्याबरोबर राहिलाय. तिची असिस्टंट आणि ती हेच तीच कुटुंब. आई, भावंड यांच्या बाबतीतली सगळी कर्तव्य पार पाडूनही. आधीची पत्रकांसमोर बिनधास्त बोलणारी रेखा हळूहळू कोशात कशी गेली हे वाचताना वाईट वाटतं. आणि इतकं झेलून अभिनयात आणि करियर मध्ये तिच नाणं खणखणीत होतं/ आहे. तो फोकस तिच्या दुःखमुळे तिने ढळू दिला नाही.
स्पॉयलर आहे
स्पॉयलर आहे
पुस्तकाचे नाव: - वेदनेची फुले
लेखिका :- मारीआतु कामारा
सुझन मँक्लेलँड
अनुवाद:- सुनंदा अमरापूरकर
एक बारा वर्षांची गोड छोकरी मारीआतु , सिएरा लिओन मधल्या खेड्यात एकत्र गोतावळ्यात राहणारी. दिवसभर हुंदडणे, जमतील ती शेतातली काम करणे ,रात्री भावंडांबरोबर मस्ती करत झोपणे लग्न होईपर्यंतचा हा त्या खेड्यातल्या मुलींचा दिनक्रम. शाळा शिक्षण म्हणजे काय हे माहितही नाही. टीन एज मधल्या आकर्षणाने शेतात बरोबरीने काम करणाऱ्या 'मूसा' वर आकृष्ट झालेली. दोघेही भविष्यात लग्न करून संसार थाटायचा ठरवतात. पण प्रस्थापित सरकार विरुद्धच्या असंतोषातून बंडखोरांनी पुकारलेल्या युद्धात गावच्या गावं उध्वस्त होत असतात . संघर्षाच्या वणव्यात निष्पाप रहिवाशांच्या आयुष्याची होळी होत असते. युद्धाच्या उन्मादात निरागस खेडुतांचा अनन्वित छळ बंडखोर करत असतात.
यापासून लपण्यासाठी मारिआतू आणि तिथले गाववाले जंगलात पळून जातात. काही महिन्यांनी परत गावात येतात. एक दोनदा असं झाल्यावर एकदा मात्र बंडखोरांच्या तावडीत सापडतात. इथे गोळी घालून नाहीतर कोयत्याचा वापर करून एका घावात मरण बरं असे हाल या कोवळ्या वयातल्या मुलांना तिथे बघायला लागतात. रडलं तर असे हाल आपले होतील या धमकीने ओठ दाबून सगळं पहात रहावं लागतं. छोटसं गाव ते. सगळेच ओळखीचे असतात. आता आपल्या छळाचा नंबर कितवा याची वाट पाहत सुन्न झालेली असताना मारिआतू बंडखोरांना विनवते-" आपण एकाच वयाचे, एकच भाषा बोलणारे आहोत मग आपण मित्र होऊ शकत नाही का?" यावर कुत्सीत हसत बंडखोर म्हणतात " तुला इथून जायचे असेल तर जा पण जाण्यापूर्वी शिक्षा निवडून जा". शिक्षा कोणती तर आधी कोणता हात तोडायचा डावा की उजवा! आणि कोयत्याने दोन वार करून तिचे दोन्ही हात मनगटापासून तोडले जातात. जाताना तिला बजावतात "जा आता प्रेसिडेंट कडे (सरकारकडे) आणि सांग अशी अवस्था का झाली ते . मत देणार नाही सरकारला.( मत देणार कशी हातच नाही ते)"
अवघी बारा वर्षांची मारीआतू. प्रेसिडेंट म्हणजे काय असतं याचा विचार करत असताना तिची शुद्ध हरपते. हळूहळू शुद्धीवर आल्यावर भान येतं हात नाहीत आता . पण त्याचं दुःख करायला वेळ कुठे आहे. अजूनही कुडीत जीव आहे आणि त्या जीवाला भीती आहे मरणाची. तशीच पळत सुटते जंगलातून. वाटेत तळ्यातलं पाणी डायरेक्ट तोंड लावून पिते आणि ग्लानी आली की झोप. परत उठून ठेचकाळत ठेचकाळत पायवाटेने अनोळखी खेड्यात येऊन पोहोचते. एक भला माणूस थोडं खायला देऊन तिला शहराकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत सोबत करतो. धीर देतो. यापलीकडे तो तरी काय करणार. त्याला ही घरातल्या घायाळ व्यक्तीला घेऊन दवाखान्यात पोहोचायचं असतं.
मोठे फोड आलेल्या पायाने पुन्हा पायपीट. वाटेत गाव लागतं आणि काही बायकांच्या मदतीने एकदाची दवाखान्यात पोहोचते मारीआतु. आजूबाजूला सगळेच तिच्यासारखे. थोटक्या हातापायांच्या पेशंटची खचाखच भरलेला दवाखाना.
जखमा होऊन बराच काळ लोटल्यानं सगळीकडे इन्फेक्शन पसरलेलं. त्यामुळे तिची रवानगी मोठ्या शहरातल्या दवाखान्यात होते. यावेळी मात्र ट्रक मधून. समोर बसलेले असतात तिचेच दोन भाऊ. तिच्या सारखेच थोटक्या हातांचे. उपचार मिळतात, खायला मिळतं आणि ही चिमुकली मुलं मनाची उभारी मिळवतात एकमेकांना भेटून. आता आपण आपापसात मारामारी कोणीच करू शकणार नाही म्हणत त्याही परिस्थितीत खिदळतात. मुलं मनानं, शरीरानं बरी होत असतात की कळतं मारिआतू आई होणार आहे.मारीआतु तारुण्यात नुकतीच प्रवेश करत असते. निरागसपणे विचारते 'बाळं तर मोठ्या बायकांना होतात. मुलींना कशी होतील?' सगळ्यांना वाटत राहतं हा बंडखोर लोकांचा प्रताप आहे. बाळ होणे म्हणजे काय हे जेव्हा तिला सांगितलं जातं तेव्हा तिला आठवतं की जंगलात राहत असताना घरच्यांनी भविष्यात मारिआतु चं ज्याच्याशी लग्न ठरवलेलं असतं त्याने धाक दाखवून केलेल्या कृतीचे हे फळ आहे.
काही दिवसांनी हॉस्पिटलमधून सोडण्यात येतं. सुरक्षिततेसाठी युद्धात घायाळ झालेल्यांसाठी आश्रयछावणी उभारलेली असते. तिकडे यांची रवानगी होते. त्यामध्ये तंबूत राहण्यासाठी जागा आणि ठराविक अन्नसाठा मिळत होता. बाकी गोष्टींसाठी भीक मागण्याशिवाय पर्याय नव्हता.भीक मागत असताना अचानक समोर येतो 'मुसा' - तिचा टीन एज प्रियकर. बंडखोरांशी गाठ पडण्याअगोदर निसटल्याने ते सुखरूप इथपर्यंत पोहोचले होते. तो तिच्यासाठी हात पुढे करतो. पण ती नसलेला हात न पुढे करता निघून जाते. यथावकाश मुलगा होतो. कसलातरी संसर्ग होऊन पुढे काही महिन्याने तो दगावतो ही. दुःख हलकं करायला कॅम्प मध्ये शनिवार-रविवार चालू झालेल्या थिएटर ग्रुप कडे तिची पावले वळतात. ती इथे रमतेही.
कँपमधल्या मुलांचे पुनर्वसन चालू असते. एकदा भीक मागताना एक पत्रकार मारिआतुला तीची कहाणी विचारतो आणि एका पेपर मध्ये फोटो सहित छापतो . ती बातमी वाचून कॅनडा तला एक माणूस ' बील ' - तिची आर्थिक जबाबदारी घेतो. मारियातु ठरवते की आता शिकायचं. इतक्यात दुसरी सामाजिक कार्यकर्ती तिला लंडनमध्ये उपचार मिळवून द्यायची तयारी करते. यांत्रिक खोटे हात लावण्यासाठी आणि शिक्षणासाठी ती लंडनला जाते ही पण तिला कॅनडाला जायचं असतं मनातून. आणि सामाजिक कार्यकर्तीचा मन वळवून ती कॅनडाला पोहोचतेही .एव्हाना तिला बिन हाताने सगळी कामे करायची सवय झालेली असते . हळूहळू थोटक्या हातांनी लिहायला, कॉम्प्युटर हाताळायला शिकते .आत्तापर्यंत पत्रकारांशी बोलताना दुभाषी लागायचा आता ती स्वतः इंग्रजीतून पत्रकारांशी बोलू लागते. आत्मविश्वासानं उभी राहते. मारीआतु ला या सगळ्या आपल्या आयुष्यावर पुस्तक लिहावं वाटायला लागतं. यासाठी ती सुझान ला भेटते. कॅनडात आल्या आल्या तिची मुलाखत जी ने घेतलेली असते ती सुझान आणि मारिआतु 2008 मध्ये पुन्हा स्वदेशी 'सिएरा लिओन' मध्ये येतात. या वेळी तिची भेट सिएरा लिओनच्या राष्ट्राध्यक्षांशी ठरलेली असते. प्रेसिडेंटशी - जो शब्द तिने हात तोडल्या तोडल्या बंडखोरांकडून प्रथमच ऐकलेला असतो.
ज्यांचं पुनर्वसन झालं नाही अशी अनेक अपंग मुलं, तिचे भाऊ ही अजून हलाखीत जगत असतात . त्यांच्यासाठी त्यांचं सरकार घर देण्यापलीकडे काही करत नाही . संसर्गजन्य रोग ,अपुऱ्या सोयी यातच त्यांचे आयुष्य चाललेले असते. हा लोकांचा आवाज आक्रोश प्रेसिडेंट कडे पोचवायचे ठरवते आणि काय काय घडलं बंडखोरांच्या लढाईमुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात हे ती सुझानच्या मदतीने पुस्तक रुपाने लोकांपर्यंत पोचवायचा ठरवते.
महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर युनिसेफची विशेष प्रतिनिधी म्हणून तिची निवड करण्यात आली. सध्या ती युनो साठी काम करत असून युद्ध परिस्थिती चे लहान मुलांवर होणारे परिणाम या विषयी जनजागृती करण्याचा तिचा मानस आहे.
एकदा वाचावं असं आहे पुस्तक.
स्पॉयलर आहे
स्पॉयलर आहे
पुस्तकाचे नाव : द रुट्स
लेखक : अलेक्स हॅली
अनुवाद। : सिंधू अभ्यंकर
रूट्स म्हणजे मुळं. मुळं कशी खोलवर रुजलेली असतात. दिसत नसतात पटकन , पण खोडापासून नवीन फुटलेल्या पालवीपर्यंतचा सगळा डोलारा पेलत असतात. मातीतून पाणी आणि पोषकमूल्य शोषून उंचावर फुटलेल्या नवीन नवीन फांद्यापर्यंत पोचवायला देतात आणि मग ते दिलेलं खत पाणी म्हणजेच मातीतल्या गोष्टी वर पर्यंत झिरपत येतातही.
याच तत्वावर हे पुस्तक लिहिले आहे अलेक्स हॅली यांनी. प्रस्तावना किंवा आणि काहीही नाही. पुस्तकाची सुरुवात होते 'मुलगा झाला हो मुलगा झाला' या ओळींनी आणि पुस्तकाचे शेवटचे वाक्य आहे 'मुलगा आहे ; सहा आठवड्यांचा' हे वाक्य वाचल्यावर आपण आपसूकच पुस्तक न मिटता पुन्हा पहिलं वाक्य असलेला परिच्छेद परत वाचतो.
कहाणी सुरू होते आफ्रिकेतल्या एका अत्यंत मागासलेल्या खेड्यात 'जफर' नावाच्या . मागास म्हणायचं कारण तो समाज, ते खेडं शिक्षणापासून वंचित. अंधश्रद्धानी पुरेपूर भरलेलं म्हणून. खरं इतर शेतीकाम , भाजीपाला लागवड ,घर - उभारणी, लाकडापासून सुबक वस्तू बनवणे यात एकदम माहीर. काही जण नव्हे तर संपूर्ण खेडंच. स्वतःच घर इथे प्रत्येक जण स्वतःच बांधत असतो. लग्न झालेल्या स्त्रीला तिचे स्वतःचे असे स्वतंत्र घर असते . नवऱ्याचे घर शेजारी वेगळे, सासूचे आणि वेगळे. तसेच स्वतःची अशी भातखाचरं आणि भाजीपाला लागवडीचा मळा वेगळा. नवऱ्याबरोबर करायची कुटुंबाची / कुटुंब- प्रमुखाची शेती वेगळी स्वतंत्र असते . ज्यात कॉस्कस, भुईमूग वगैरे पिकं घेतली जातात . त्याचबरोबर जबाबदारी ही स्त्रीवर जास्त असते. कुटुंबाच्या शेतीत नवऱ्याला मदत करणे आणि आपली भाजीपाला, भाताची शेती वेगळी स्वतंत्रपणे करणे शिवाय जेवण बनवणे आणि अपत्य संगोपन. जसजशी अपत्यांची संख्या वाढेल तस तशी गाव- प्रमुख शेती ही कसायला वाढवून देई.
अशा खेड्यातल्या ओमोरो आणि बिंटा किंटे यांना पहिला मुलगा होतो. 'कुंटा किंटे' . त्याचं बालपण ,तरुणपण छान चाललेलं असतं . यांचं शिक्षण वेगळ्या प्रकारचं असतं. लिहिणे वाचणे म्हणजे फक्त कुराण लिहिणे आणि वाचणे. बाकी विषय सगळे प्रॅक्टिकल शिक्षणाचे . काटेरी बाण, भाले तयार करणे, पावलांचा आवाज न करता चंद्राच्या प्रकाशात दिशा समजून जंगल पिंजून काढणे ,लढाई करणे ,शिकार करणे ,युद्ध कौशल्य ,त्यातल्या खाचा खोचा, जंगलातील विषारी वनस्पती ओळखणे अशा प्रकारचं.
तारुण्यात प्रवेश केलेल्या कुंटाचं हे शिक्षण पूर्ण होतं. त्याला स्वतःचं स्वतंत्र शेत मिळतं. तो शेतात घाम गाळतो. सोन पिकवत असतो. सुबक वस्तू तयार करून स्वतःचं घर सजवत असतो. तेवढ्यात एक विचित्र घटना घडते. दुसऱ्या देशातील लोक (ज्यांना हे खेडूत 'टॅबूब' म्हणतात) गुलाम म्हणून आफ्रिकेतल्या खेड्यातील लोकांना पकडून नेत असतात. त्या जाळ्यात अवचितपणे कुंटा किंटे अडकतो.
प्रचंड मार, घाण आणि उपासमार अशा छळ छावणीत कुंटा किंटे सापडलेला असतो. बोटीतून पूर्ण प्रवास भर हे छळ सुरूच असतात. त्यातून सुटायचे अनेक प्लॅन होतात . पण त्याचं फलित म्हणजे मृत्यू असतो .
त्यातून जिवंत राहून अनेक महिन्यांनी कुंटा दुसऱ्या देशात पोहोचतो. आणि एका श्रीमंत माणसाकडून विकत घेतला जातो. या श्रीमंत मालकांना 'मासा' असं आदराने बोललं जातं . हे 'मासा' अनेक गुलाम पदरी बाळगून असतात. जितके गुलाम जास्त तितका तो श्रीमंत गणला जातो. या गुलामांकडून शेती प्राणी पाळणे, बागा मळे फुलवणे, स्त्री गुलामांना मुलं सांभाळणे, स्वयंपाक पाणी, स्वच्छता ,शिवणटिपण आणि काही वेळा शय्यासोबतही करावी लागायची. आपण जितके गुलामगिरीत राहू तितके पिचत जाऊ हे ओळखून स्वतंत्र होण्यासाठी अनेकदा कुंटा किंटे पलायन करतो पण प्रत्येक वेळी टॅबूब आणि त्यांचे कुत्रे कुंटाला शोधून काढत. पळाल्याची शिक्षा म्हणून प्रचंड मारहाण आणि शेवटी वैतागून कुंटाच्या पायाचं अर्ध पाऊल तोडतात. आता लंगडा कुंटा कसा पडेल? त्याची रवानगी दुसऱ्या 'मासा'कडे होते . हा 'मासा ' जरा तुलनेत प्रेमळ असतो. तो नीट शुश्रुषा करून कुंटाला दीड पायावर उभा करतो.
वर्षा मागून वर्षे जातात आणि कुंटा किंटे त्याची आफ्रिकन 'मंडीका' भाषा सोडून टॅबूब ची भाषा शिकायला लागतो. पण 'मंडीका' भाषेतले काही शब्द सतत उजळणी करून मनात जिवंत ठेवतो. स्वतःच्या देशातली मातृभाषा त्याला मनात जिवंत ठेवायची असते. सतराव्या वर्षी गुलाम झालेला कुंटा आता 37 वर्षांचा असतो. जिथे गुलामगिरी करत असतो तिथल्याच 'बेल' नावाच्या चाळीस वर्षाच्या स्त्री गुलामाशी तो लग्न करतो. यथावकाश त्याला मुलगी होते . 'किझी' नाव ठेवतो तिचं. किझीला घेऊन फिरताना कुंटा तिला अनेक 'मंडीका' शब्द शिकवतो. त्याच्या 'जफर' खेड्यातल्या घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगतो. कुंटाचं बालपण कसं गेलं, तो कसा शिकला, त्याचं कुटुंबीय वगैरे. किझी ते सगळं छान लक्षात ठेवते. जशी तारुण्यात पदार्पण करते तशी एका आफ्रिकन गुलामाला पळून जाण्यासाठी मदत करताना पकडली जाते. आता 'मासा' शिक्षा म्हणून तिला विकून टाकतो. तिची आणि कुंटा - बेल यांची ताटातुट होते. पुढे किझीला मुलगा होतो. त्याला ती 'जफर' मधल्या कुंटा विषयी सांगते जे जे तिला कुंटा किंटे ने सांगितलेले असते . त्या मुलाला पुढे मुलं होतात आणि प्रत्येक पिढी कुंटाच्या बालपणापासून ते वर्तमान काळापर्यंत सगळ्या गोष्टी नवीन पिढीला सांगत जाते. थोडक्यात कादंबरीचा नायक कुंटा किंटे याच्या अनेक पिढ्यांची कहाणी उलगडणारी ही कादंबरी आहे.
किझी चा मुलगा जेव्हा म्हातारा होतो तेव्हा त्यांना स्वातंत्र्य मिळतं. ते कसं मिळतं तेही रंजक आहे . आणि शेवटी अशाच कुंटाच्या पुढच्या - पुढच्या पिढीतल्या एका मुलीला मुलगा होतो तो कोण हे रहस्य पुस्तक वाचल्यावर कळेल.
कुंटाच्या वाट्याला जी गुलामगिरी आली तिच लक्षावधी आफ्रिकन वंशाच्या लोकांच्याही वाट्याला आली. अलेक्स हॅलीने त्यांचा आवाज या कादंबरीतून जगापुढे आणलाय.
वरील दोन्ही परिचय आवडले.
वरील दोन्ही परिचय आवडले.
छान परिचय लिहिले आहेस वर्णिता
छान परिचय लिहिले आहेस वर्णिता!
१)एका तेलियाने- ले. गिरीश
१)एका तेलियाने- ले. गिरीश कुबेर. निरनिराळ्या ठिकाणांहून माहिती जमा करून झाकी यामानी आणि फैजल या सौदी अरेबियांच्या दोघा तेल राजकारण्यांवर प्रकाश पाडणारं पुस्तक लिहिलं आहे. मराठीत एकत्रित माहिती आणि फोटो यामुळे वाचनीय झालं आहे. आता कुबेरचंच अगोदरचं पुस्तक 'हा तेल नावाचा इतिहास' वाचून काढणार. याविषयी इंग्रजी पुस्तकं बरीच आहेत पण हे नक्कीच आवडलं.
२) Principia Mathematica - sir issac Newton , commentary by Hawking.
हे openlibrary dot org वर सापडलं. ते वाचायला घेतलंय.(print disabled edition, सुदैवाने १४ दिवस मिळालं आहे. पण ४६० पानं pdf वाचायची आहेत मोबाइलवर.) केव्हापासून उत्सुकता होती की काय लिहिलंय आणि त्याचा स्वभाव सूडबुद्धी आणि मत्सराने भरलेला का होता. सायन्स व गणित येईलच.
तेल नावाचा इतिहास मी वाचलंय.
तेल नावाचा इतिहास मी वाचलंय. छानच आहे ते. एका तेलियाने वाचायचंय मला.
छान परिचय. मात्र तिन्ही
छान परिचय. मात्र तिन्ही पुस्तकातील माहिती वाचताना वाईट वाटते. "द रूट्स" वर बनवलेली सिरीज मी थोडी पाहिली आहे. बहुधा अॅमेझॉन प्राइम वर आहे. नक्की लक्षात नाही.
"तेल नावाचा इतिहास" वाचून सॉलिड इम्प्रेस झालो होतो. म्हणून "एका तेलियाने" व "अधर्मयुद्ध" आणली. पण तोचतोचपणा येउ लागला त्यात. ती दोन्ही पूर्ण वाचलेली नाहीत. मला वाटते या तिन्हीपैकी पहिले भारी वाटेल वाचताना, कोणत्याही क्रमाने.
'तेल नावाचा इतिहास'मध्ये
'तेल नावाचा इतिहास'मध्ये त्यांनी होमी भाभांच्या विमान अपघाताबद्दल लिहिलं आहे. ती कॉन्स्पिरसी थिअरी म्हणून माहिती होती आधी, पण या पुस्तकात वाचून ती खरी आहे की काय असं वाटायला लागलं. याबद्दल अजून कुठे काही माहिती आहे का?
वर्णिता,किती छान परिचय लिहिला
वर्णिता,किती छान परिचय लिहिला आहेस! दी रुटसचा परिचय वाचायचा आहे.
छान परिचय. मात्र तिन्ही
छान परिचय. मात्र तिन्ही पुस्तकातील माहिती वाचताना वाईट वाटते.>>>>>
+१
"तेल नावाचा इतिहास" वाचून
"तेल नावाचा इतिहास" वाचून सॉलिड इम्प्रेस झालो होतो. म्हणून "एका तेलियाने" व "अधर्मयुद्ध" आणली. पण तोचतोचपणा येउ लागला त्यात. ती दोन्ही पूर्ण वाचलेली नाहीत. मला वाटते या तिन्हीपैकी पहिले भारी वाटेल वाचताना, कोणत्याही क्रमाने. >> +१
तेल नावाचा इतिहास आता नाही
तेल नावाचा इतिहास आता नाही वाचणार. कुठले तरी इंग्रजी वाचेन.
धन्यवाद
धन्यवाद
रूट्स" वर बनवलेली सिरीज मी थोडी पाहिली आहे. बहुधा अॅमेझॉन प्राइम वर आहे. नक्की लक्षात नाही.>>> यु ट्यूबवर 'रुट्स 2016 पार्ट 1 ' असा एक दीड तासांचा भाग दिसलाय. सुरवात बघितलीय फक्त. वेळ झाला की बघणार आहे. पुस्तक वाचताना जशी डोळ्यासमोर पात्र उभी राहतात तसेच ऐक्टर्स आहेत अगदी.
वर्णिता, परिचय आवडला. (वेगळा
वर्णिता, परिचय आवडला. (वेगळा धागा का नाही काढत?
)
"तेल नावाचा इतिहास" वाचून सॉलिड इम्प्रेस झालो होतो. >>>
)
मी सुद्धा. नंतरची दोन्ही पुस्तकं घेण्याचा विचार होता. दुकानात शोधली, जरावेळ चाळली आणि विचार सोडून दिला.
(पुस्तकांच्या दुकानात जाण्याचा हा एक फायदा असतो
आहे तीच माहिती घेऊन त्यातून
आहे तीच माहिती घेऊन त्यातून दोन पुस्तके काढतात काय?
तेलिया ऊर्फ झाकी यामानी याची पूर्ण कारकीर्द दिली. विषयांतर अजिबात नाही.
Breaking Through (Isher Judge
Breaking Through (Isher Judge Ahluwalia)
इशर जज अहलुवालिया या अर्थशास्त्रज्ञ विदुषीचं हे memoir आहे. लहानसं पुस्तक आहे, आणि ते जबरदस्त आहे!
कोलकातात पारंपरिक पंजाबी कुटुंबात वाढलेली इशर, ११ भावंडांमधली एक. तिला शिक्षणाची आस होती. घरात मुलींच्या शिक्षणासाठी खूप काही पोषक वातावरण नव्हतं. घरातल्या मोठ्यांनी जरासं नाखुषीनेच तिच्या उच्चशिक्षणाला परवानगी दिली.
कलकत्ता प्रेसिडेन्सी कॉलेज, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि तिथून थेट अमेरिकेत एम.आय.टी. अशी तिची गाडी सुसाट निघाली. इकॉनॉमिक पॉलिसी रिसर्च - हे तिचं क्षेत्र होतं.
पुढे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत नोकरी, पीएचडी,
मॉन्टेक सिंग अहलुवालियांशी ओळख, मैत्री, लग्न, संसार,
कामानिमित्त अमेरिकेतल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या उच्च अर्थशास्त्री वर्तुळात त्यांचा समावेश होता.
अमेरिकेत १० वर्षं लखलखीत करिअर घडवून दोघं आणि त्यांची दोन मुलं भारतात परतले. इथल्या अर्थशास्त्र क्षेत्रातही दोघांच्या नावांचा एव्हाना दबदबा निर्माण झालेला होता.
इशरनी आपलं पॉलिसी रिसर्चचं काम पुढे सुरू केलं. त्या रिसर्चवर आधारित काही पुस्तकं लिहिली.
अमेरिकेत असतानाच मनमोहन सिंग यांच्याशी दोघांची ओळख झालेली होती. भारतात आल्यावर त्यांची घट्ट मैत्री झाली.
भारतातल्या इकॉनॉमिक्सचं चित्र तेव्हा कसं होतं, कोणते नवे प्रवाह येत होते, ९०च्या दशकातलं बदललेलं अर्थचित्र, त्या सगळ्यावरची स्वत:ची मतं, स्वत:च्या कामांचे एक-एक टप्पे, जागतिक स्तरावरच्या अर्थशास्त्रीय घडामोडी, त्यात स्वतःचं स्थान नेमकं ओळखून सतत काम करत राहणे- हा सगळा प्रवास त्यांनी मांडला आहे.
त्यात कुठेही जराही आढ्यता नाही, मी अमुक केलं-तमुक केलं हा सूर नाही. त्यांना पद्मभूषण मिळालं होतं हे सुद्धा पुस्तकाच्या शेवटाकडे एका फोटोमुळे समजलं. मजकुरात त्याचा बारीकसाही उल्लेख नाही.
मॉन्टेक सिंग यांच्या पदाचा, दिल्लीतल्या राजकीय वर्तुळातल्या परिचयांचा इशर यांनी कधीही स्वत:साठी फायदा करून घेतला नाही. आपण ‘मिसेस मॉन्टेक सिंग’ बनून रहायचं नाही हे त्यांच्या डोक्यात पक्कं होतं. त्या मॉन्टेक सिंग यांच्यापेक्षा जास्त शिकलेल्या होत्या. त्यांच्यापासून स्वतंत्र अशी करिअर, इमेज त्यांनी घडवली. त्याचवेळी त्या कुटुंबात रमणार्या, धार्मिक वृत्तीच्याही होत्या.
दोन वर्षांपूर्वी कॅन्सरने त्यांचं निधन झालं. कॅन्सर उपचार सुरू असताना हे पुस्तक त्यांनी लिहिलं.
कधी वर्तमानपत्रांत्/नेटवरच्या लिंक्सवर वगैरे सुद्धा इशर जज अहलुवालिया हे नाव वाचल्याचं मला आठवत नव्हतं. अर्थात इकॉनॉमिक्स हा मला न झेपणारा विषय आहे, त्यामुळे तिकडे दुर्लक्षही झालेलं असेल. मात्र पुस्तक कुठेही जड किंवा कंटाळवाणं वाटलं नाही. उलट enriching वाटलं.
(लोकसत्ता-बुकमार्कमध्ये पुस्तकाबद्दल वाचल्यावर ते विशलिस्टला टाकलं होतं. किंडल डील्समध्ये एकदा अगदी स्वस्तात मिळून गेलं.)
वेगळं काही वाचायचं असल्यास चुकवू नये असं पुस्तक.
चांगला परिचय. इंडियन
चांगला परिचय. इंडियन एक्स्प्रेसमध्ये शहरांसंबंधी प्रश्नांवर त्यांचा स्तंभ असे.
छान परिचय ललिता-प्रीति!
छान परिचय ललिता-प्रीति!
छान परिचय ललिता-प्रीति +1
छान परिचय ललिता-प्रीति
+1
Breaking Through (Isher Judge
Breaking Through (Isher Judge Ahluwalia)
वाचायला घेतलं आहे.
छान परिचय ललिता-प्रीति > +!
छान परिचय ललिता-प्रीति > +! शोधतोअच.
Breaking Through
Breaking Through
वाचलं. शिकलेले लोक,कुणाची मैत्री कुणाशी,कुठे जॉब केला हे पुढे आहे. सरकारशी आलेले संबंध इत्यादी.
दहा बहिणी आणि एक भावांपैकी इशर सातवी. दुकानदारी करणारं सरदार घराणं. मोठ्या बहिणींची लग्न लवकर झाली. हिने जरा शिक्षणात गती दाखवली म्हणून पुढे शिक्षण पूर्ण केले. इंदुरात दुकान चालेना म्हणून ते कलकत्त्याला गेले. तिथे हिंदीत शालेय शिक्षण. बंगाली आणि पंजाबी भाषा. इंग्रजी खटपट करून शिकली. परदेशात MIT मध्ये डिग्री.
मोन्टेकसिंगशी पुढे लग्न. दोघेही इकॉनॉमिक्स शिकलेले. कोणकोणत्या पदांवर राहिले.
मुलं,नातवंडांत समाधानी. शेवटी थोडा कर्करोग निघाला त्या आजारात पुस्तक पूर्ण केले.
साध्या सरळ भाषेतले आत्मकथन. विशेष काही नाही.
इशर जज अहलुवालीया यांचा परिचय
इशर जज अहलुवालीया यांचा परिचय इंडियन एक्स्प्रेसमधील शहर व्यवस्थापनाविषयक स्तंभांमुळेच झालेला. हे पुस्तक नक्कीच वाचणार.
शहर व्यवस्थापनाविषयक सल्ले
शहर व्यवस्थापनाविषयक सल्ले बरेच विचारवंतही देत असतात. ते पदवीधर अर्थतज्ज्ञच हवे असं नसतं.
शहरे का वाढतात? -सोयी वाढवल्याने आणि गैरसोयींची झळ तिथे पोहोचू न दिल्यामुळे. पाणी आणि वीज कपात करायची झाल्यास राज्ये शहरांना वगळतात आणि गावागावांत बंधनं लावतात. मग ते गाववाले शहराकडे येतात.
आता सर्व शहरांत टॉवरस आले. पाणी पुरवठा क्षेत्र वाढले का? वीजेसाठी कोळसा वापरायचा नाही. जलविद्युतला मर्यादा.
मग अर्थतज्ज्ञांनी दिल्या सुचवण्या की पाणी,वीज,मलनिस्सारण,घनकचरा विल्हेवाट ठरल्याशिवाय शहरे वाढवू नका तर सरकार आणि निवडलेले उमेदवार ऐकतात का?
दिल्ली वाढते तिथे गुरुग्राम वाढवले. ज्या युएसमध्ये लेखिका शिकली तिथेही एका राज्याने दहा वर्षे सांडपाणी ( प्रक्रिया न करता) समुद्रात सोडले हे दिलंय.
पेप्रातले लेख वगैरे ठीक आहेत. पण ज्या वेगाने व्यवस्थापन सुधारत आहे त्यापेक्षा दहापट वेगाने लोकसंख्येचा रेटा शहरं फुगवत आहे.
लेखिकेनेच लिहिले आहे की सल्ले तत्त्वत: मान्य केले तरी फंड कमी पडतो.
अर्थशास्त्राची बरीच पुस्तकं वाचली. त्यांचं कार्य वाचलं. "मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं." - हो बाबा हो.
मेट्रोमॅन श्रीधरन
मेट्रोमॅन श्रीधरन
मूळ लेखक एम.एस. अशोकन
अनुवाद अवधूत डोंगरे
कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रोचे शिल्पकार ई. श्रीधरन यांचा कर्तृत्वपट
प्रकाशन क्र. : ४४७ पहिली आवृत्ती : ११ ऑक्टोबर २०१६ विजयादशमी
Marathi Translation of English Book 'KARMAYOGI' ©M. S. Ashokan (Marathi Translation Copyright Rohan Prakashan) Published by arrangement with Penguin Books India Pvt.
पाने १४०.
मूल्य : दोनशे पन्नास रुपये (Rs.250)
---------------------
कोकण रेल्वच्या स्थापनेपासून सुरू होण्यापर्यंतची माहिती आहेच शिवाय श्रीधरनचे रेल्वेतील कामही वाचायला मिळाले. सचोटी ,प्राणिकपणा,कामाला वाहून घ्यायची आवड,सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती,वेळेचा काटेकोरपणा यामुळे वरिष्ठांची मर्जी राहिली. त्यांचं नाव झालं ते पहिल्या कामाच्या धडाक्याने ते म्हणजे कोसळलेला पाम्बन पूल( रामेश्वरला जोडणारा) पुन्हा बाधणे.
कोकण रेल्वेची योजना अगदी १९७५ पासून चर्चेत येऊन मार्गाचे सर्वेक्षण चारदा होऊनही कागदावरच राहिली. मग श्रीधरनची कार्पोरेशनची कल्पना आणि त्या वेळचे रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नाडिस यांचा योजना राबवण्याचा धडाका यातून पाच वर्षांत सुरू होणारी को.रे. सात वर्षांनी धावू लागली. एक जादा वर्ष गोव्यातील विरोधाने आणि एक जादा वर्ष पेडणेच्या लाल भूसभूशित डोंगरांनी खाल्ले.
एकूण पुस्तक आवडले.
मूळ इंग्रजी पुस्तक एम.एस. अशोकन यांनी चांगले संकलित केले आहे.
श्रीधरनच्या अगोदरच्या काही रेल्वे अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीचाही थोडक्यात आढावा घेतला आहे. मंत्र्यांचा विरोध झाल्याने काहींना मानहानीही पत्करावी लागली. श्रीधरन'ना त्यांच्याच केरळ राज्यातल्या कामगार संघटनांनी केलेला विरोधही झेलावा लागला. रंजक माहिती आहे.
ह्रषीकेश गुप्ते यांचं
ह्रषीकेश गुप्ते यांचं गोठण्यातल्या गोष्टी पुस्तक. अगदी पुलंच्या हसवणूक/व्यक्ती आणि वल्ली किंवा जयवंत दळवींच्या सारे प्रवासी घडीचे मधील व्यक्तीचित्रांच्या तोडीचं लिखाण गुप्तेंनी केलंय. अत्यंत सुरेख व मस्त पुस्तक.
होय.
होय.
ह्रषीकेश गुप्ते यांचं
ह्रषीकेश गुप्ते यांचं गोठण्यातल्या गोष्टी पुस्तक. >>> अरे वा! वाचण्याच्या यादीत टाकलं.
सुहास शिरवळकर यांचं मुक्ती
सुहास शिरवळकर यांचं मुक्ती (प्रेमकथा)हे पुस्तक FYला असताना मी पहिल्यांदा वाचलं होतं,इतकं आवडलं होतं की त्याची पारायणं केली होती,नंतर लग्न,नोकरी,मुलं यात पुस्तक वाचनापासून जरा लांब गेले ,पण त्यानंतर अनेकदा ते पुस्तक शोधण्यासाठी खूप प्रयत्न केला,मतकरी,धारप,सुशी यांची मला हवी असलेली इतर सगळी पुस्तक मिळवून वाचली पण मुक्ती काही कुठे मिळालं नाही,अधून मधून त्यातले शेर आठवायचे,ती कथा,तपशिल, संदर्भ काहीच नीट नव्हत आठवत, फक्त तरल प्रेमकथा होती इतकंच आठवायचे,मला ते online pdf वगैरे नको होतं,पुस्तकच हवं होतं,
आणि शेवटी खूप शोधून अमेझॉन वर ते पुस्तक मिळाले ऑर्डर केली काल हातात मिळाले, एका रात्रीत वाचून काढलं
असं वाटलं नव्हतं मिळत तेच बरं होत,मी काल पर्यंत त्या कथेच्या इतक्या प्रेमात का होते,मला ते पुस्तक अधून मधून प्रकर्षाने का आठवायच हे मला बिलकुल सांगता येणार नाही,पण आज मला ते बिलकुल आवडत नाहीये,कितीतरी प्रश्न अनुत्तरित आहेत
मुग्धा-कथेची so called नायिका, सुंदर,तरल विचारांची, साधी सरळ,कविता करणारी,
तिने केलेल्या एका कवितेवर भाळून एक मुलगा एस नावाने चिठ्ठी पाठवतो तिला आणि भेटायला बोलावतो
ही तिथे जाते आणि उगाच आलो वाटून घेऊन त्या एस ला न भेटता निघून येते ,
2 वर्षांनी कॉलेज च्या एका गॅदरिंग मध्ये पाहुणा म्हणून आलेल्या मध्य प्रदेशातील 40 वर्ष्याच्या बीजवर श्रीमंताला ही आवडते,तो मागणी घालतो,ही लगेचच होकार देते,2 दिवसांत लग्न उरकून ही भुर्रर्रर, आणि अजूनही मनात मात्र तोच एस,नंतर 6 7 वर्षांनी तो एस हिच्या नवऱ्याला भेटतो,नवऱ्याला कल्पना येते,ही थोडं सांगते आणि शेवटी अशोक मरतो आणि हिला आणि सुनील ला चिट्ठी ठेवून जातो की तुम्ही लग्न करा
(वडील नाहीत, घरी आई आणि एक धाकटी बहीण,हीच व्यवस्थित कमावती.असं असताना ही MP च्या माणसाला होकार का देते?बरं आपल्यामागे आईची बहिणींची जबाबदारी कोण घेईल याची तिला बिलकुल काळजी नाही,वरून त्या MP च्या अशोक ची श्रीमंती पाहून आपण लग्न केलं नाही हे मात्र ती वारंवार मनात बोलत असते,लग्नानंतर हिने स्वतः हुन घरची काही खबर ठेवणे काळजी करणे असं काही केलं नाही,बहिणींची एकदा चिट्ठी आली प्रेमात पडलेय,मुलगा लग्नासाठी मागे लागलाय आईची जबाबदारी आहे काय करू,तर ही खुशाल आपले निर्णय आपणच घ्यावेत सांगून मोकळी,नंतर आई वारल्यावर मग मोठं वाईट वाटत मुग्धा ला आई आजारी होती तर कळवलं का नाही कुणी,बहीण वेश्या व्यवसाय करायला लागेलेली असते म्हणून ही रागाने घर सोडून निघून येते,मोठी बहीण म्हणून ही कर्तव्य करण्यात मागे नि राग तत्व शिकवायला पुढे
,मनात अजून पण म्हणजे 6 वर्षांनी पण प्रेम त्या S वरच,आणि वरवर अशोक ला म्हणजे नवऱ्याला सांगणार मी मानसिक शारीरिक प्रतारणा कधीच केली नाही तुझी,,,,,,,नायिका महास्वार्थी आहे)
Pages