आपला अशांत शेजार !

Submitted by रमेशमामा1 on 4 April, 2022 - 20:30

सध्या भारताच्या शेजारील देशात प्रचंड उलथापालथ चालू आहे . त्याचप्रमाणे अशांत शेजार हे भारताच्या प्रगतीसाठी देखील मारक आहे .

पूर्णपणे आयातीवर विसंबून असलेल्या श्रीलंकेत परकीय चलन तुटवड्यामुळे महागाई सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे . फक्त पर्यटन द्वारे येणारा पैशावर अवलंबून राहिल्यामुळे श्रीलंकेवर ही परिस्थिती ओढवली आहे . जनतेच्या असंतोषाचा स्फोट झाला आणि त्याचा परिणाम राष्ट्रपती च्या घरावर हल्ला केला गेला . विस्थापित लोकं देश सोडून समुद्रमार्गे भारतात येत आहे , ज्यामुळे भविष्यात श्रीलंकन सिहंली / तामिळी आश्रित लोकांचा प्रश्न भारतात निर्माण होऊ शकतो .
भारतापुढे असंख्य प्रश्न पडलेले असताना श्रीलंकेला मदत करणे हे आपल्या कर्तव्याचा भाग आहेच तसेच भविष्यात श्रीलंका चीन च्या पंखाखाली जाऊ नये याचा विचार करून ध्येयधोरणे आखावी लागत आहेत .

दुसरा अशांत देश म्हणजे पाकिस्तान !

1947 पासून पाच वर्षांची टर्म पूर्ण करू न शकणाऱ्या पंतप्रधानांच्या यादीत इम्रान खानचे देखील नाव शामिल झाले .
इम्रान ने पाकिस्तान असेंम्बली विसर्जित करून मध्यवर्ती निवडणूक जाहीर केली .
अल्पमतातील सरकार चालवताना बालिश बडबड हानिकारक ठरू शकते , पण धर्माच्या पायावर स्थापन झालेल्या देशातील सर्वोच्च नेत्याला रोजच्या भाषणात आपला धर्म आणि त्यास इतर देशांकडून असलेला धोका याबद्दल सतत उल्लेख करून जनतेला झुलवत ठेवावेच लागते , अन्यथा सवय लागलेली जनता त्याला पायउतार होण्यास भाग पाडू शकते .
हा एक कंगोरा आहे .
इम्रान आणि बाजवा च्या वादामुळे बाजवा ने इम्रान च्या युती मधील काही पक्षांना बाहेर होण्यास सांगून सरकार कोसळण्याची तजवीज करून ठेवली .
बाजवा विरोधात मिडियासमोर बोलू शकत नसल्यामुळे इम्रान आपले सरकार डळमळीत करण्यासाठी अमेरिकेचे नाव घेत आहे .तर अमेरिका हे आरोप निराधार असल्याचे सांगत आहे .

मुस्लिम बहुल देश आणि अतेरेकी संघटनांचा मुक्त संचार असलेला पाकिस्तान देश अशांत असणे भारताला व्युव्हरचनात्मक दृष्ट्या परवडणार नाही .
आणि भारत श्रीलंकेला मदत करतोय त्या प्रमाणे पाकिस्तानला ( वैर बाजूला ठेवून ) मदत का करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे .

Group content visibility: 
Use group defaults

रश्मी, मी एका ठरावीक जातीचे लोक म्हणतात, असं कुठे लिहिल़य ते दाखवा. की तुमच्याच मनात ते आहे म्हणून बोचलं?
मशिदींवरचे विनापरवाना भोंगे उतरवा असा उच्च न्यायालयाचा २०१४ चार आदेश आहे. फडण२० पाच वर्षं त्या आदेशाचा अभ्यास करत होते का?

मशिदीवरून मिरवणुका नेऊ नका असं म्हटलेलं नाही.
मिरवणुकांत तलवारी का लागतात? मुस्लिमांचा अपमान करणारी गाणी आणि घोषणा का वाजतात.
अंगात आल्यासारखे नाच का होतात? मशिदींवर भगवे झेंडे का लागतात?
रामनवमी साजरी करायची ही कुठली पद्धत?
हे एका ठिकाणी नाही डझनभर जागी तरी झाल़य. हा योगायोग असू शकत नाही.
रच्याकने, दलित व्यक्तीची अंत्ययात्रासुद्धा आमच्या वस्तीतून नको, असं म्हणणारी गावं आहेत अजून भारतात.
मुसलमानांना मारायचं असलं की तेवढ्यापुरते दलित हिंदू होतात.>>>>>>>. @ भरत, तुम्ही इथे ठरावीक जातीचे नाव जरी नाही घेतले तरी त्यातुन अर्थ काढणारे लोक आहेतच की इथे ( सध्या कुठे दिसत नाहीत ) मी मगाशी फार कडवट पणे बोलुन गेले त्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी. पण इथे मायबोलीवरच काय प्रत्यक्षात सुद्धा मी ब्राह्मण, ओबिसी हे कसे दुसर्‍यांच्या मार्गात आड येऊन आरक्षणाला विरोध करतात हे प्रत्यक्ष चर्चेत ऐकलेय. लोकांचा गैरसमज आहे की सारे ब्राह्मण वा ओबिसी बाकी आरक्षणाला विरोध करतात. हो, मान्य आहे आणी वाचले देखील आहे की दलितांना अगदी जीवन संपल्यावर देखील न्याय मिळत नाही. इथेच लोक चूक करतात. माणसाला माणुस म्हणून नाकारणे आणी कुत्र्याला लाड करुन घरात आपल्या ताटात जेऊ घालणारे पण लोक आहेत. त्यांची नीचता कधीच कमी होणार नाही.

परवाच सुजात आंबेडकर ने तारे तोडले की दंगलींना ब्राह्मण व उच्चवर्णीय जबाबदार असतात. असा मुर्ख निष्कर्ष का काढला? याने सप्रमाण सिद्ध करावे. मुळात दंगल घडवणारे हे त्या त्या नेत्यांचे कार्यकर्ते असतात, सामान्य माणसे नव्हे. आपण त्यांना भाड्याचे तट्टु म्हणू. घरात मुलीवर जरा आवाज चढला नी तो दाराच्या बाहेर गेला तरी माझा नवरा मला ओरडतो कारण तो प्रचंड शांतताप्रेमी आहे. मग असे ब्राह्मण जाणार आहेत का दंगली घडवायला? कामातुन जरा वेळ मिळाला की आपल्या मुला नातवंडा ना फिरवुन आणणारे दंगली घडवणार का?

राज ठाकरे बोलले की मशिदी समोर हनुमान चालिसा लावा, म्हणजे भोंगे बंद होतील. कारण सुप्रिम कोर्टाने ऑर्डर देऊनही राज्यकर्ते अ‍ॅक्शन घेत नाहीत का तर मुस्लिम मते जातील. का रे बाबांनो, एवढे का घाबरता मते जातील म्हणून? मुस्लिम समाजाला काही फायदा होणार नाही भोंगे असो वा नसो. पण मुस्लिमांनी मते नाही दिली तर यांच्या पिढ्या न पिढ्या बसुन खातायत ते बंद होईल ना? त्या मतांपेक्षा मुस्लिम समाजाचे आर्थिक रहाणीमान कसे सुधरता येईल, त्यांच्या शिक्षीत पोरांना नोकर्‍या कश्या मिळतील ते बघा. ते कुठे जमतेय? ह्यांच्या असल्या करणीने हिंदु व मुस्लिम समाजातली दरी वाढते.

मनोहर जोशींच्या जावयाने जमीन खरेदीत काहीतरी घोटाळे केले तर त्यांचे मुख्यमंत्री पद बाळासाहेब ठाकरेंनी काढुन घेतले ( चूक केले नाही ). मग आज नवाब मलिक चे सगळे घोटाळे बाहेर आले तरी त्याचा राजीनामा मामु घेतच नाहीत. पवार साहेब तर मलिकांच्या, मागे उभा शरद, पुढे उभा जितेंद्र टाईप चालू. अरे मंत्री हिम्दु असो वा मुस्लिम, तो घोटाळा करतो तर घ्या की त्याचा राजीनामा. कोर्टात निर्दोष सुटला की सन्मानाने घ्या त्याला परत.

https://www.loksatta.com/maharashtra/enforcement-directorate-today-provi...

मिरवणुकांत तलवारी का लागतात? मुस्लिमांचा अपमान करणारी गाणी आणि घोषणा का वाजतात.
अंगात आल्यासारखे नाच का होतात? मशिदींवर भगवे झेंडे का लागतात?>>>>>> हे चूकच आहे. खरे तर राज्यकर्त्यांपेक्षा पोलीसांनाच स्वतंत्र करुन त्यांना अधिकार दिले पाहीजेत अश्या प्रवूत्तींना अटक करुन शिक्षा करण्याचे. पण पोलीसांनी याचा गैरवापर करता कामा नये.

<<<<असं चुकूनसुद्धा म्हणू नका हाणा. मारा.. याला पाकिस्तानात पाठवा. याच्या बायकोचे कपडे फेडा असं म्हणतात लोक. तो तक्रारकर्ता हिंदू असला तर.
मुसलमान असेल तर डायरेक्ट अल्लाकडे आणि बायकांवर बलात्कार.>>>> मुळात असे बोलणारे हे साधु वा साध्व्या खरे साधु नव्हेतच. जो परमेश्वर मार्गातला असतो तो अश्या घाणेरड्या कल्पना पण करणार नाही. मला वाटते त्या लोकांना अटक झालीय. मागेच मी लिहीले होते की काही वर्षापूर्वी लोकप्रभा मासिकाने या भोंदु साधुंवर पूर्ण माहिती दिली होती. पळुन गेलेले गुन्हेगार / आरोपी साधु बनतात. आणी आखाडा वगैरे प्रकारात सहभाग घेतात.

फडणवीस ने 5 वर्षात भोंगे काढले नाहीत

ठाकरेंनी मात्र 2 वर्षात सगळे काढून द्यावे

ठाकरेंनी मात्र 2 वर्षात सगळे काढून द्यावे>>>>> अरे आवाज कमी करा. मला तर डिजेचा पण आवाज सहन होत नाही. हिंदु आणी मुस्लिम दोघे मुर्ख आहेत. गुरुद्वारा वा चर्च मधे कधी पाहीले का प्रार्थने मधून बल्ले बल्ले कर्तांना किंवा या या मयाया करत नाचतांना? गुरुवाणीचा आवाज बाहेर जास्त जातो का?

मग फडनविसने का केले नाही ?

की खाल्ल्या इफ्तारला जागला?>>>> हायला, फडणविसांनाच जाऊन विचारा की मग. भोंग्याबद्दल राज ठाकरेने विचारलेय ना?

}मला वाटते त्या लोकांना अटक झालीय.}
नाही हो. एका की दोघांनाच अटक झाली. एक कालीचरण. दुसरा त्यागी. जो आधी मुसलमान होता.
यति ंंंंंंंंंंंंंंंंंंह
नरसिंहानंद नावाचा यांचा प्रमुख आहे. तो एकामागून एक धर्मसंसद घेत मुसलमानांविरोधात हिंसा करण्यासाठी चिथावणी असतो.
त्याने तर भाजपच्या महिला नेत्या पुढे जाण्यासाठी काय काय करतात याचे वर्णनही केले. एकाही तेजतर्रार भाजप नेत्री ने त्याबद्दल ब्र काढला असेल तर शपथ.
हे प्रकरण तुमच्यासारख्यांच्या हातून कधीच पुढे गेले आहे.
भस्मासुर त्याला मोठा करणाऱ्यांवर ही उलटतोच.

{हायला, फडणविसांनाच जाऊन विचारा की मग. भोंग्याबद्दल राज ठाकरेने विचारलेय ना?}
५ वर्षं स्वतः: काहीच केलं नाही, त्यामुळे फडण२०ने भोंग्याला विरोध आउटसोर्स केलाय.
भाजपने चिराग पासवानला वापरल़ तस़ राजला वापरतील.
चिराग पासवाननेने नितीशची मतं फोडली तशी राजकडून उद्धवची मत़ं फोडणार. मग चिरागचा पक्ष पण फोडला आणि त्याला रस्त्यावर आणल़ं. राजकडे पक्ष आहे का तोच जाणे. एक आमदार आहे. कार्यकर्ते अर्धे भाजपचं अर्धे सेनेत जातील. ईडी केस शीतकपाटात जाईल

भोंग्याबद्दल राज ठाकरेने विचारलेय ना? > तोच सध्या भजपचा भोंगा आहे>>>>
हे पटलंं आणि आवडलं.
जगण्यासाठी काय पण.

भाजपने चिरागला वापरले तसे राज ला वापरतील >>>>>>>
उद्धव ला वापरणारे असे म्हणताहेत ? Happy
राज च्या पुढे सध्या अंधारच आहे , गेल्या निवडणुकीत त्यानेच मोदींविरोधात भाषणे देऊन भकास आघाडीला निवडून येण्यास मदत केली की नाही ?
मग आता तो भाजपला मदत करत आहे कोणाला मदत करायची हा त्याचा चॉईस आहे भाजप ने त्याला बोलावलेले नाही !
गेल्या निवडणुकीत तुमच्याकडे एक तरी वक्तृत्वकौशल्य असलेला नेता होता का ?
आजन्म पंतप्रधानपदाचे उमेदवार पावसात भिजून उमेदवारासाठी मदत मागत होते , तरीही चाळीस पन्नास च्या पुढे आमदार निवडून आणता आले नाही , तरीही 2024 च्या पंतप्रधान पदाची स्वप्न पडत आहेत .

भडकाऊ भाषणे दोन्ही धर्माचे लोक नको त्या पद्धतीने करतायत. इकडे हा महाराज तिकडे ओवेसी आणी झाकिर नाईक. मधल्या मध्ये ज्यांचा संबंध नाही असे हातावर पोट असलेले लोक भरडले जातात.

२०१९ साली राज ठाकरे भाजपा विरुद्ध पवारांसोबत होते. ( लाव रे तो व्हिडीओ वगैरे ) आणी नंतर आता ते म्हणतायत की मी एकटाच आहे नी माझी भूमिका क्लिअर आहे. पण राजकारण कधी पलटी खाईल माहीत नाही. आजकाल कोणीही कोणा बरोबर जातयं.

भाजप आपल्याला वापरून फेकणार हे उद्धव ठाकरेंना वेळेवर कळलं.
इथले भाजप समर्थक सरकार इतक्या दिवसांत पडणार अशी भविष्य वर्तवत होते. अडीच वर्ष झाली.
इतकं पछाडून एकही आमदार फोडता आलेला नाही.

@kamalkantmishra
70-yr-old newly elected Pak PM married 5 times, currently has 2 wives. He has married five times but now has two wives, Nusrat and Tehmina Durani, while he divorced the three others, namely- Alia Hani, Nilofar Khosa and Kulsoom Hai. He says he will solve Kashmir for sure.

As per expected !

तिघीचें आयुष्य उध्वस्त केले तो पराक्रम आहे का ?
आदर्श जीर्ण पुस्तकाप्रमाणे ?

देऊन टाका काश्मीरचा एक हिस्सा. मॅटर सॉर्ट करायला हवं. आर्मीच्या किती पिढ्या खर्ची घालणार?
फाळणी झाली नसती तर काश्मीर फाईल्सच्या जागी इंडिया फाईल्स बनली असती. हिंदू धर्मियांच्या आयुष्याची पत्राचाळ झाली असती.
हर एक भिंत जरुरी होती है. समविचारी लोकांमध्ये भिंती नकोत पण तालिबानी संस्कृती दूर ठेवण्यासाठी भिंत, फाळणी गरजेचीच आहे.

तलाक , घटस्फोट म्हणजे उध्वस्त ? >>>>>>>>>>>>>
एक घटस्फोट समजू शकतो पण तीन ?
आपल्याला काय करायचे ?
अजून दहा निकाह करून त्यांना घटस्फोट का देईना !
ट्रिपल तलाक , नवऱ्याची पाच लग्न ही जोखडे कमी पडत होती म्हणून हिजाब इज माय चॉईस ची मुव्हमेंट ला बळी पडल्या !
त्यातील खूप कमी महिलांना पुढील धोके कळले असतील ..

एकच लग्न करणारे सोडून फिरत नाहीत का ?

वर बायकोचा त्याग म्हणजे राष्ट्रसेवेची निशाणी म्हणून मिरवतात

किशोर कुमारची 4 लग्ने झाली होती
आसारामची किती ?

फाळणी नसती झाली तर.
पाकिस्तान २३ करोड.
बांगलादेश १७ करोड.
भारत (आताचा) ३०, करोड.
७० करोड मुस्लिम असते अखंड भारतात.

काय भयानक अवस्था झाली असती देशाची.
हिंदू च नाहीत तर बौद्ध,ख्रिस्त, जैन,पारशी सर्व धर्म धोक्यात आले असते.
हिंदू संख्याच्या जोरावर थोडे तरी टिकले असते.
पण बोध्द, जैन ख्रिस्त हे धर्म नष्ट च झाले असते भारतातून .
मुस्लिम बहुसंख्य असणाऱ्या देशात मुस्लिम सोडून बाकी कोणतेच धर्म.
वाढले नाहीत बघा प्रतेक मुस्लिम बहुल देशाचा विचार करून.
नास्तिक,पुरोगामी, ही जमात तर शोधून पण सापडली नसती.
पाकिस्तान मध्ये कुठे नास्तिक,पुरोगामी मंडळी आहेत.

1600 सालापासून सगळे असेच होते की

बौद्ध कशाला नष्ट होतील ? लंका, म्यानमार भूतान तिबेट हे बौद्ध बहुल होते व वेगळेही झाले

उलट जैन , बौद्ध, पारशी, ख्रिश्चनच टिकले असते, हिंदूच कमी झाले असते.

पण तेव्हा राज्य करते ना मुस्लिम होते ना हिंदू.ना भारतीय.
राज्यकर्ते दुसरेच होते.
आता राज्यकर्ते हिंदू किंवा मुस्लिम असते.

Pages