आपला अशांत शेजार !

Submitted by रमेशमामा1 on 4 April, 2022 - 20:30

सध्या भारताच्या शेजारील देशात प्रचंड उलथापालथ चालू आहे . त्याचप्रमाणे अशांत शेजार हे भारताच्या प्रगतीसाठी देखील मारक आहे .

पूर्णपणे आयातीवर विसंबून असलेल्या श्रीलंकेत परकीय चलन तुटवड्यामुळे महागाई सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे . फक्त पर्यटन द्वारे येणारा पैशावर अवलंबून राहिल्यामुळे श्रीलंकेवर ही परिस्थिती ओढवली आहे . जनतेच्या असंतोषाचा स्फोट झाला आणि त्याचा परिणाम राष्ट्रपती च्या घरावर हल्ला केला गेला . विस्थापित लोकं देश सोडून समुद्रमार्गे भारतात येत आहे , ज्यामुळे भविष्यात श्रीलंकन सिहंली / तामिळी आश्रित लोकांचा प्रश्न भारतात निर्माण होऊ शकतो .
भारतापुढे असंख्य प्रश्न पडलेले असताना श्रीलंकेला मदत करणे हे आपल्या कर्तव्याचा भाग आहेच तसेच भविष्यात श्रीलंका चीन च्या पंखाखाली जाऊ नये याचा विचार करून ध्येयधोरणे आखावी लागत आहेत .

दुसरा अशांत देश म्हणजे पाकिस्तान !

1947 पासून पाच वर्षांची टर्म पूर्ण करू न शकणाऱ्या पंतप्रधानांच्या यादीत इम्रान खानचे देखील नाव शामिल झाले .
इम्रान ने पाकिस्तान असेंम्बली विसर्जित करून मध्यवर्ती निवडणूक जाहीर केली .
अल्पमतातील सरकार चालवताना बालिश बडबड हानिकारक ठरू शकते , पण धर्माच्या पायावर स्थापन झालेल्या देशातील सर्वोच्च नेत्याला रोजच्या भाषणात आपला धर्म आणि त्यास इतर देशांकडून असलेला धोका याबद्दल सतत उल्लेख करून जनतेला झुलवत ठेवावेच लागते , अन्यथा सवय लागलेली जनता त्याला पायउतार होण्यास भाग पाडू शकते .
हा एक कंगोरा आहे .
इम्रान आणि बाजवा च्या वादामुळे बाजवा ने इम्रान च्या युती मधील काही पक्षांना बाहेर होण्यास सांगून सरकार कोसळण्याची तजवीज करून ठेवली .
बाजवा विरोधात मिडियासमोर बोलू शकत नसल्यामुळे इम्रान आपले सरकार डळमळीत करण्यासाठी अमेरिकेचे नाव घेत आहे .तर अमेरिका हे आरोप निराधार असल्याचे सांगत आहे .

मुस्लिम बहुल देश आणि अतेरेकी संघटनांचा मुक्त संचार असलेला पाकिस्तान देश अशांत असणे भारताला व्युव्हरचनात्मक दृष्ट्या परवडणार नाही .
आणि भारत श्रीलंकेला मदत करतोय त्या प्रमाणे पाकिस्तानला ( वैर बाजूला ठेवून ) मदत का करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे .

Group content visibility: 
Use group defaults

1947 पासून धर्मांधतेच्या जोखडामूळे पाकिस्तान मधील राजकीय स्थिती कधीच सुधारली नाही .
पब्लिक बरोबर नमाज चे नाटक करणारे सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी बाहेरदेशी करोडोंच्या माया जमवून ठेवल्या , आणि पाकिस्तान मधील जनतेला मात्र कुराण , शरिया , काफिर , भारतातील काश्मीर चा भाग जिंकणे आणि 72 हूरोच्या मायाजाल मध्ये गुंगवून ठेवले .

लष्करी अधिकाऱ्यांनी देखील अमेरिका कडून मिळणारी भीक ओरपुन स्थानिक जनतेला देशोधडीला लावले .
वास्तवाचे चटके बसून देखील अजूनही तेथील जनतेचा भारत द्वेष त्यामुळे युद्धज्वर भडकत असतो .

बहुसंख्य असून देखील पाकिस्तान मधील मुस्लिमांची आर्थिक दयनीय अवस्था होण्यास जबाबदार कोण ?
तेथील लष्कर ?
तेथील संधीसाधू पुढारी ?
स्वतः जनता ?
की टोकाची कट्टरपंथी धर्मांधता ?

सिरियसली फाळणी झाली ते बरं झालं. नाहीतर हे लोक भिंतीपल्याड नसते, तुमच्याआमच्या गल्लीत असते. कल्पनाही भीतीदायक आहे.
आता बॉर्डरवरून लोंढे आत येणार नाहीत इतकीच काळजी मोदी सरकारने घ्यायची आहे. सब दरवाजे कर लो बंद!

तुला कळतंय तर तू सांग ना !
पाकिस्तानमधील सामान्य जनतेचे दारिद्र्य 1947 पासून कमी होण्या ऐवजी वाढतच का चालले आहे ?
बघ ! कधी तरी नेहमीचा तिरका बघण्याचा चष्मा लावून अवांतर वाचन झाले असेलच तर दोनचार शब्द प्रामाणिकपणे तुलाही सांगता येईल .

सिरियसली फाळणी झाली ते बरं झालं.>>>>>>>>>>>>
त्यावेळी जिनाची बाजू लावून धरण्यामुळे गांधीजींना म्हणूनच मी साष्टांग दंडवत घालतो !
गांधीजींचे हे उपकार भारतातील हिंदूंनी कधीही विसरू नाही पाहिजे .
त्यांच्यामुळेच 47 पासून भारताने लोकशाहीची कास धरून प्रगती केली .
दोन वेगळे देश झाले नसते तर अफगाणिस्तान ,इराक ,पाकिस्तान आणि भारत यात यत्किंचितही फरक दिसला नसता .
सगळीकडे कट्टर धर्मांध एके 47 घेऊन फिरताना दिसले असते .
थँक्स टू महात्मा /\

पाकिस्तानचे दारिद्र्य वाढले हे कुणी सांगितले ?

पाकिस्तान ही अखंड भारतातील सर्वात सुपीक जमीन, हिमालयातून येणाऱ्या शुद्ध नद्या, कसले प्रदूषण नाही, आणि लोकसंख्या कमी, त्यामुळे 1980 पर्यंत पाकिस्तानचा जीडीपी भारतापेक्षा जास्त होता

1980 नंतर भारत खाणकाम , आयटी , ब्यांकिंग यात पुढे गेला व पाकच्या जीडीपीला मागे टाकले

https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/india-vs-pak...

पाकिस्तान ची निर्मिती आणि भारताची धर्मावर आधार वर फाळणी .
ही गोष्ट चांगली की वाईट हे सांगणे तसे अवघड आहे.
पण हिंदू मुस्लिम वर राजकारण करण्याची खोड राजकीय पक्षांना आहे त्या मुळे फाळणी नसती झाली तर हिंसाचार च्या घटना वाढल्या असत्या..
धर्मावर आधारित बिलकुल राजकारण केले नसते तर फाळणी झाली ही गोष्ट नुकसान दायक आहे.
ब्लॅक cat म्हणतात त्या प्रमाणे अतिशय सुपीक जमीन ,विपुल पाणी पाकिस्तान च्या भूमीत आहे.
धार्मिक असणे वाईट नाही धर्मांध असणे खूप वाईट आहे.
पाकिस्तान ची वाट लावली धर्मांध लोकांनी ह्याचा अर्थ सर्व पाकिस्तानी तसेच आहेत असा नाही
भारतात पण जातीय वादी ,धर्मांध लोकांची कमी नाही.

दादांचं गाणं आहे.
Banglori नको मंगलोरी मलमल आणा की ढाक्या ची.
अशी ओळ आहे .
इतके भारतीय मानाने पाकिस्तान शी जवळीक साधून होते.
धर्मांध लोकांनी वाट लावली.

1947 पासून धर्मांधतेच्या जोखडामूळे पाकिस्तान मधील राजकीय स्थिती कधीच सुधारली नाही .
१९४७ ला नेहरूंच्या विज्ञानवादी धोरणामुळे भारताने धर्मांधतेची जोखड मोडून विज्ञानाची कास धरली. पण २०१४ पासून भारताने रिवर्स गेर टाकून परत धर्मांधतेच्या विहीरीत उडी मारली.

इथं नक्की विषय काय सुरू आहे?
पाकिस्तान, इम्रान, वंदना शिवा, श्रीलंका, बीटी वांगे आणि हापूस आंबे आणि लेटेस्ट धर्मांधता हे वाचून काही थांगपत्ता लागत नाहीये

श्रीलंकेला सांगीतले कोणी चीनच्या ताब्यात जा म्हणून? हा पिचपिच्या ( मला विखारी म्हणले तरी चालेल बरं का Proud ) उद्या पाकीस्तानला सुद्धा गिळंकृत करेल, जर पाकीस्तानने ( तसे एक बंदर पाकीस्तानने चीन च्या मदतीनेच कामासाठी चालवले आहे. ) चीनला सुद्धा परवानगी दिली तर. कारण शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने पाकीस्तान चीनला जवळ करु पहात आहे, पण हे पिचपिचे मदत करतोय असे भासवुन सगळेच गिळुन बसतात.

कर्ज काढून सुख सोयी करू नका .फक्त हाच संदेश आहे चीन फक्त दोषी नाही स्वतःच्या ऐश आराम साठी चीन चा पैसा घेतला ना तेव्हा खूप मज्जा वाटत होती
सुख आराम,कष्ट नको दुसऱ्या नी दिलेल्या पैशावर झोपून आरामात जगायचे आहे
ही इच्छा असणारे देश च दोषी आहेत .चीन लं दोष देवून फायदा नाही
मारुती ८०० नी काम होत असेल तर कर्ज काढून lexus कशाला हवी

थँक्स टू महात्मा /\

श्रीलनका भूतान तिबेट नेपाळ म्यानमार वेगळे झाले , तेंव्हा महात्मा , नेहरू नव्हते

श्रीलंकेच्या विषयावर मते मांडताना ब्लॅक कॅट चे रूपांतर हनुमान मध्ये झाल्याचा भास होतोय !
काय पटापट उड्या मारतात !
मोदी काय , रावण काय Happy

श्रीलनका भूतान तिबेट नेपाळ म्यानमार वेगळे झाले , तेंव्हा महात्मा , नेहरू नव्हते
>>>>>>>>>>>>
तुम्ही इतर कितीही विषय ओता !
पण त्या वेळच्या बहुतांश मुस्लिमांना वेगळे राष्ट्र हवे होते म्हणूनच पाकिस्तान ची निर्मिती जीना आणि गांधीजींनी केली हेच अंतिम सत्य .

त्या वेळच्या बहुतांश मुस्लिमांना वेगळे राष्ट्र हवे > आणि सावरकरांना देखील!

ब्रिटिश होते तो पर्यंत कोणाला काहीच वेगळे नको होते
ब्रिटिश जाणार महायुद्ध मुळे.
ह्याचा जेव्हा अंदाज आला तेव्हा सर्वांच्या महत्व कांक्ष जाग्या झाल्या.
दलित लोकांना वेगळे राखीव मतदार संघ हवे होते,मुस्लिम लोकांना सत्तेत अर्धा हिस्सा हवा होता.
लोकसंख्येचा विचार केला तर हिंदू बहुसंख्य होते त्यांना वेगळे काही नको होत.
किती ही नाकारले तरी हे सत्य च आहे.
मुस्लिम लोकांना अर्धी सत्ता दिली तर राहिलेल्या अर्ध्या हिस्स्यात दलित लोकांना राखीव मतदार संघ दिले तर.
हिंदू कडे राहिले काय?
धतुरा.
त्या मुळे गांधी नीच जीना ह्यांना वेगळे राष्ट्र मागण्यास प्रवृत्त केले.जेणे करून राहिलेल्या देशात हिंदू चे वर्चस्व राहावे.
असे लॉजिक मी कुठे तरी वाचले आहे.
आणि गांधी जी ची इथे बिलकुल कोणती चूक नाही.

मागच्या शतकात दोन जागतिक महायुद्ध झाली.
किती देश दिवाळखोरीत गेले?
कोणी सांगेल का?
माझ्या माहिती प्रमाणे आता जी ब्राझील,श्री लंका बाकी काही देशांची अवस्था झाली आहे
चलनाला काहीच किंमत नाही
अशी अवस्था कोणत्याच देशाची झाली नाही.
का?
आता जर जागतिक महायुद्ध झाले तर किती तरी देश दिवाळखोरीत जातील.
कारण फुगलेल्या अर्थ व्यवस्था आणि मौज मजे ची लागलेली सवय.

New York मेट्रो मध्ये एका अतेरिक्याच्या गोळीबारात दोन ठार 10 जखमी झालेत !
नक्कीच पाकिस्तान्याने केला असेल .

राहिलेल्या अर्ध्या हिस्स्यात दलित लोकांना राखीव मतदार संघ दिले तर. हिंदू कडे राहिले काय?

दलित हिंदू नव्हेत काय ?

गांधी यांनी फाळणी केली हे संघाने पसरवलेल्या अनेक थापांमधली एक थाप आहे.

गांधी नेहेमीच फाळणीच्या विरोधात होते. हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही त्यांनी सारखेच जवळ केले होते आणि सर्व प्रकारच्या धर्मांधतेला कडाडून विरोध केला होता. म्हणून तर मास्टर सावरकर यांनी गोडसे यांच्याकडून त्यांची हत्या करवली होती. " सबळ पुराव्या" अभावी , ब्रिटिशांची अनेव वेळा माफी मागणारे, सावरकर या महात्म्याच्या खुनाच्या गुन्ह्यातून सुटले.

<< १९४७ ला नेहरूंच्या विज्ञानवादी धोरणामुळे भारताने धर्मांधतेची जोखड मोडून विज्ञानाची कास धरली. पण २०१४ पासून भारताने रिवर्स गेर टाकून परत धर्मांधतेच्या विहीरीत उडी मारली. >>

------- सहमत...

भारतात लोकशाही रुजवण्याचे, आणि तिला फुलवण्याचे नेहरु यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांच्या विज्ञान वादी दृष्टीची सर आजच्या नेतृत्वाला (एक शतांशही ) नाही. विरोधी विचारांनाही मंत्रिमंडळांत स्थान देणारा खर्‍या अर्थाने लोकशाही वादी नेता होता.

नेहरु यांच्या नेतृत्वात एक मोठी कमतरता होती. धर्मांध " हिंदुत्ववादी " ( शांतता प्रिय असा हिंदू धर्म नाही ! ) किड त्यांनी वेळीच ठेचली असती तर आज ते विष देशाच्या संपुर्ण शरिरात भिनले नसते.

२०१४ नंतर चे आत्मघातकी निर्णय, धोरणे बघितल्यावर... नेहरु यांच्या बद्दल माझ्या मनात असलेला आदर वाढला आहे.

नेहरु यांच्या नेतृत्वात एक मोठी कमतरता होती. धर्मांध " हिंदुत्ववादी " ( शांतता प्रिय असा हिंदू धर्म नाही ! ) किड त्यांनी वेळीच ठेचली असती तर आज ते विष देशाच्या संपुर्ण शरिरात भिनले नसते.
>>>>>>>>>
क्रिया ची प्रतिक्रिया फॉर्म्युला उदय विसरला वाटत !
गांधी आणि जिनाने केलेली धर्मावर आधारित राष्ट्राची विभागणी 100 % सक्सेक्स होऊन सगळे मुस्लिम पाकिस्तान मध्ये गेले असते तर इथे
हिंदुत्ववादी उदयास आले असते का ?
मुस्लिम बहुसंख्य साठ सत्तर राष्ट्रे असताना त्यापैकी एका तरी राष्ट्रात मुस्लिम धर्माचे शांतपणे पालन करताना मुस्लिम दिसले का ?
घरी बसून केस मोकळे करून त्यातील उवा लिखा मारत बसणाऱ्याच्या इतक्या सुपीक डोक्यातून उवाच निघणार ना?
तसे झाले आहे हिंदूधर्म विरोधकांचे !
येथील बहुसंख्य हिंदू शांतताप्रेमीच आहेत म्हणूनच नोकरी धंद्यावर गेलेले संध्याकाळी सुखरूप घरी येतात , शाळेत गेलेली मुलं घरी येतात .
नाहीतर पाक , अफगाण ,इराक, येमेन ,सीरिया आणि आफ्रिकन मुस्लिम देशातील परिस्थितीच सांगते मुस्लिम धर्म किती शांतातप्रेमी आहे ते !

कायच्या काय

कितीतरी इस्लाम देश शांततेत रहातात , मुसलमानांत हिंसक लोक तितकेच आहेत जितके तसेही कोणत्याही समाजात देशात आढळतात.

भारतात मुसलमान 1600 साली आले आणि जगात 700 साली आले, त्याआधी भारतात किंवा जगात हिंसा होत नव्हती का ?

काश्मीर फाइलित जेवढा हिंसाचार आहे, त्यापेक्षा अधिक टीव्ही सिनेमात पौराणिक कथेत दाखवले आहेत.
त्या सिनेमात रक्ताने माखलेले तांदूळ दिले म्हणे , तर ह्यांच्या कथेत तर डायरेकट छाती फोडून रक्त प्याले , केसांना लावले इ चमत्कार आहेत

<< क्रिया ची प्रतिक्रिया फॉर्म्युला उदय विसरला वाटत ! >>

------ दुसर्‍या धर्माच्या धार्मिक स्थळांजवळच जोष/ जल्लोष व्यक्त करणे यापेक्षा माणुसकीचे अध: पतन अजून किती करणार आहात?
राम नवमीच्या मिरवणूकीच्या " निमीत्ताने " मशिदीच्या समोर नाच दंगा करणे, मशिदीवर झेंडे फडकावणे याला क्रिया म्हणा अथवा प्रतिक्रिया...
महात्म्याने सांगितलेच आहे, "An eye for an eye will leave the whole world blind.”

<< गांधी आणि जिनाने केलेली धर्मावर आधारित राष्ट्राची विभागणी 100 % सक्सेक्स होऊन सगळे मुस्लिम पाकिस्तान मध्ये गेले असते तर इथे
हिंदुत्ववादी उदयास आले असते का ? >>

-------- फाळणी गांधीजींनी केली नाही. त्यांचा फाळणीला शेवटपर्यंत विरोध होता. फाळणी धर्माच्या आधारावर झाली नव्हती. तशी झाली आहे हे पाकीस्तान चे (आणि म्हणून समविचारी सावरकर वादी हिंदूत्ववाद्यांचेच) म्हणणे आहे.

<< येथील बहुसंख्य हिंदू शांतताप्रेमीच आहेत म्हणूनच नोकरी धंद्यावर गेलेले संध्याकाळी सुखरूप घरी येतात , शाळेत गेलेली मुलं घरी येतात . >>

----- बहुसंख्य हिंदू शांतता प्रिय आहे... ते अन्य धर्मांना स्विकारतात , आपल्यात सामावून घेतात आणि माझ्यासाठी हेच मानवतावादी धर्माचे लक्षण आहे.

मशिदीसमोर (किंवा अन्य धर्माच्या प्रार्थनास्थळाजवळ) दंगा करणार्‍यांना, मशिदीवर झेंडे फडकावणार्‍यांना मी हिंदू मानत नाही. कुठल्याही अर्थाने हे लोक धार्मिक नाही आहेत, ते तालिबानां एव्हढेच मुलतत्ववादी आहेत.

अशा कृत्यांविरुद्ध वेळीच कारवाई केली नाही तर भविष्यात काय होणार आहे याची कल्पनाही करवत नाही.

बहुसंख्य हिंदू शांतता प्रिय आहे... ते अन्य धर्मांना स्विकारतात , आपल्यात सामावून घेतात आणि माझ्यासाठी हेच मानवतावादी धर्माचे लक्षण आहे.

मशिदीसमोर (किंवा अन्य धर्माच्या प्रार्थनास्थळाजवळ) दंगा करणार्‍यांना, मशिदीवर झेंडे फडकावणार्‍यांना मी हिंदू मानत नाही. कुठल्याही अर्थाने हे लोक धार्मिक नाही आहेत, ते तालिबानां एव्हढेच मुलतत्ववादी आहेत. >>>>>>>>>>
+1111111
सहमत !
खरं म्हणजे रस्त्यावरील धार्मिक मिरवणुकांना बंदीच घातली पाहिजे .
शिवजयंती , गणपती विसर्जन मिरवणूक , राम यात्रा असुद्या नाही तर मोहरम मिरवणुका .
एकाही मिरवणुकीत पावित्र्याचा लवलेशही नसतो !
नुसता धांगडधिंगाना , आणि विरुद्ध धर्मियांना जिरवण्याची खुम खुमी .
पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ?
काँग्रेसने गठ्ठा मते जाऊ नये ( निवडणूक पूर्वी दिल्लीच्या जामा मस्जिद मध्ये काँग्रेसी नेत्यांच्या भेटी नंतर तेथील प्रमुख काँग्रेसला मते देण्याचा फतवे देशभरातील मुस्लिमांसाठी काढल्याचे समरणात आहे ) म्हणून असल्या उन्मदित मिरवणुका वर बंदी आणली नाही , मग भाजप तरी त्यांच्या मतपेढीला धक्का का पोहोचविल ?

Pages