आपला अशांत शेजार !

Submitted by रमेशमामा1 on 4 April, 2022 - 20:30

सध्या भारताच्या शेजारील देशात प्रचंड उलथापालथ चालू आहे . त्याचप्रमाणे अशांत शेजार हे भारताच्या प्रगतीसाठी देखील मारक आहे .

पूर्णपणे आयातीवर विसंबून असलेल्या श्रीलंकेत परकीय चलन तुटवड्यामुळे महागाई सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे . फक्त पर्यटन द्वारे येणारा पैशावर अवलंबून राहिल्यामुळे श्रीलंकेवर ही परिस्थिती ओढवली आहे . जनतेच्या असंतोषाचा स्फोट झाला आणि त्याचा परिणाम राष्ट्रपती च्या घरावर हल्ला केला गेला . विस्थापित लोकं देश सोडून समुद्रमार्गे भारतात येत आहे , ज्यामुळे भविष्यात श्रीलंकन सिहंली / तामिळी आश्रित लोकांचा प्रश्न भारतात निर्माण होऊ शकतो .
भारतापुढे असंख्य प्रश्न पडलेले असताना श्रीलंकेला मदत करणे हे आपल्या कर्तव्याचा भाग आहेच तसेच भविष्यात श्रीलंका चीन च्या पंखाखाली जाऊ नये याचा विचार करून ध्येयधोरणे आखावी लागत आहेत .

दुसरा अशांत देश म्हणजे पाकिस्तान !

1947 पासून पाच वर्षांची टर्म पूर्ण करू न शकणाऱ्या पंतप्रधानांच्या यादीत इम्रान खानचे देखील नाव शामिल झाले .
इम्रान ने पाकिस्तान असेंम्बली विसर्जित करून मध्यवर्ती निवडणूक जाहीर केली .
अल्पमतातील सरकार चालवताना बालिश बडबड हानिकारक ठरू शकते , पण धर्माच्या पायावर स्थापन झालेल्या देशातील सर्वोच्च नेत्याला रोजच्या भाषणात आपला धर्म आणि त्यास इतर देशांकडून असलेला धोका याबद्दल सतत उल्लेख करून जनतेला झुलवत ठेवावेच लागते , अन्यथा सवय लागलेली जनता त्याला पायउतार होण्यास भाग पाडू शकते .
हा एक कंगोरा आहे .
इम्रान आणि बाजवा च्या वादामुळे बाजवा ने इम्रान च्या युती मधील काही पक्षांना बाहेर होण्यास सांगून सरकार कोसळण्याची तजवीज करून ठेवली .
बाजवा विरोधात मिडियासमोर बोलू शकत नसल्यामुळे इम्रान आपले सरकार डळमळीत करण्यासाठी अमेरिकेचे नाव घेत आहे .तर अमेरिका हे आरोप निराधार असल्याचे सांगत आहे .

मुस्लिम बहुल देश आणि अतेरेकी संघटनांचा मुक्त संचार असलेला पाकिस्तान देश अशांत असणे भारताला व्युव्हरचनात्मक दृष्ट्या परवडणार नाही .
आणि भारत श्रीलंकेला मदत करतोय त्या प्रमाणे पाकिस्तानला ( वैर बाजूला ठेवून ) मदत का करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे .

Group content visibility: 
Use group defaults

महागाई ह्या शब्दात "गाई" असल्या कारणाने आणि गाई मध्ये ३६ कोटी देव असल्याकारणाने त्यावर बोलायचे नई >> ३३ वरून ३६ कोटी. ED मागे लागेल असे घोटाळे केले तर Happy

. Her work in the field of seed sovereignty is legendary.

हया जगात सर्व ज्ञानी कोणी एक व्यक्ती असू शकत नाही.वंदना ह्यांना काही विषयात ज्ञान असेल ह्याचा अर्थ त्यांना सर्व च कळतं असं होत नाही.
स्वार्थ हा मानवाचा सर्वात मोठा दुर्गुण आहे पैसे देवून तज्ञ लोकांना स्वार्थ साधण्यास योग्य अशी मत व्यक्त करण्यास प्रवृत्त करणे आज खूप अवघड नाही

वंदना त्या स्वार्थ च्या बळी पडणार च नाहीत असे नाही.
जे त्या क्षेत्रात काम करतात त्यांची मत सत्य असतात.
सेंद्रिय शेती जो शेतकरी करतो तो अडाणी असला तरी शिक्षित वंदना पेक्षा त्या शेतकऱ्याची मतं जास्त प्रामाणिक असतात.

अन्न धान्य इतके साठवणे श्रीमंतानाच जमते.

खुद्द शेतकरीही इतके अन्न साठवू शकत नाहीत

ब्लॅक cat तुम्हाला नम्र विनंती आहे ज्या मध्ये स्वतःला बिलकुल ज्ञान नाही त्या वर आत्म विश्वासाने मत व्यक्त करू नका.
तुम्ही एक कृत्रिम शिक्षण घेवून डॉक्टर झालेले आहात.
म्हणजे सामान्य ज्ञान शून्य
इथे कोणी रक्ताचा शेतकरी च सांगेल.
१०, पोती ज्वारी शेतात निर्माण झाली आणि ४ व्यक्ती चे कुटुंब आहे.
तर तो शेतकरी ५ पोती घरात ठेवून फक्त पाच पोती च विकतो.
आणि पाच पोती म्हणजे ५०० किलो चार माणसांना वर्ष भर पुरते.
हे खरे आहे की खोटे

Proud

तुमचेच ज्ञान अतिसामान्य आहे,

पाच पोती गहू आणि मका ठेवून कायमस्वरूपी उदरनिवाह होत नाही , अन्नात कोणते कोणते घटक असतात याची यादी करा. डाळ ते खोबरे , चहापूड ते कोथिंबीर .

शेतकरी स्वावलंबी असतो हाही एक भयानक भ्रम आहे.
ऊस पिकवणारा ऊस विकून पैसे मिळतो व सर्व अन्न विकत घेतो.
चहा पिकवणाराही तेच करतो.
दोन चार पोती धान्य अन चार वांगी घरात ठेऊन प्रश्न सुटत नाहीत की कुणी स्वावलंबी होत नाहीत

राजीनामा देण्या अगोदर इम्रान ने आयोगाला तीन महिन्यात निवडणूक घ्यायला सांगितली होती .
अमेरिका विरोधात तयार केलेल्या जनमताचा फायदा होईल या हिशोबाने .
पण आयोगाने आता तीन महीन्यात शक्य नाही म्हणून सांगितले आहे.
भारताच्या दृष्टीने पाकिस्तान मध्ये खरी लोकशाही रुजविणारे सरकार यायला हवे , पण आत्ता पर्यंत चा इतिहास पाहता तेथील सरकार फक्त मुखवटा असते .
सगळी सूत्रे लष्कर हलवते !

वंदना शिवा बोगस आहेत! >> नमस्कार!!!!
Her work in the field of seed sovereignty is legendary. >> +++

Such an amazing lady! Such an amazing lady!!! One of the most powerful and string women i got to see and hear in person!

श्रीलंकन हिंदू अल्पसंख्य रेफ्युजीजना भारताने आसरा द्यायला हवा. कुठे जातील ते बिचारे?
त्याचवेळी पाकिस्तान, अफगाणिस्तान, रोहिंग्ये यांचे लोंढे येऊ नयेत यासाठी उत्तरेतील borders वर सुरक्षा वाढवावी. त्या देशांना उचलून आर्थिक मदत द्यावी.

नक्कीच !
पण बांग्लादेंशी , रोहिग्यांसाठी रुदन करणाऱ्यांना हे मान्य नसणार !

भारतात पण काही राज्य अशी आहेत ती ह्या देशाचा हिस्सा नसते तर श्री लंका पेक्षा गंभीर स्थिती मध्ये असते.
जगातील सर्वात गरीब देश पेक्षा गरीब भारतात काही राज्य आहेत.
फक्त ती भारतात आहेत म्हणून टिकून आहेत.

Black कॅट
तुम्हाला भारताची संस्कृती माहीत नाही.
स्वयं पूर्ण खेडी होती पहिली
साधे उदाहरण घर बांधण्यासाठी लागणारे साहित्य गावातून च निर्माण केले जायचे.
माती पासुन विटा,कौल घरीच बनवली जात.
लाकड घरचेचीच असतं

आणि कारागीर पण घरातील च .
घर उभ करण्यासाठी कोणाची गरज लागत नव्हती.
शेतात .
तेलबिया,कड धान्य,ज्वारी ,गहू पिकतो.
ह्या मधून माणूस आणि गुर ढोर ह्यांचे अन्न निर्माण होते.
ऊस पासून गुळ त्या मुळे साखर लागत नव्हती
चिकन ,मांस घरचेच.
फक्त प्रादेशिक विविधता असल्या मुळे वस्तू ची देवाण घेवाण करायला लागायची ती पैसे न वापरतात वस्तू वापरून केली जायची.
अशा ह्या स्वयंभू स्थिती मध्ये राहणाऱ्या लोकांवर देशातील बाकी प्रदेश सोडा जगातील कोणत्याच देशातील स्थिती चा परिणाम होणे हे केवळ अशक्य होतें.
बेसिक गरजा भागणे महत्वाचे.
ऐश आराम पण हवा असेल तर परावलंबी जीवन आलेच.

गायपट्टयातील राज्यं आपल्याकडे दक्षिणेकडच्या राज्यांसाठी डोकेदुखी आहे.
भारताने मदत केली असणारे. नाही तर हे कार्टून नसते आले.
IMG_20220405_225806.jpg

रेवा अतिशय योग्य चित्र
भारताच्या पार्श्व भागाला च आग लागली आहे ते श्री लंकेला काय मदत करणार.
जगातील सर्वात जास्त गरीब वस्ती करत असलेला देश म्हणजे भारत.
हे विसरून कसे चालेल.
काही राज्य तर फक्त बोजा आहेत देशावर.
ती नसती भारतात तर भारत प्रगत देश झाला असता

Blsck कॅट >>>>>>
Bsdk कॅट म्हणायचंय का तुम्हाला ?
Lol

स्वयं पूर्ण खेडी होती पहिली
साधे उदाहरण घर बांधण्यासाठी लागणारे साहित्य गावातून च निर्माण केले जायचे.
माती पासुन विटा,कौल घरीच बनवली जात.

सगळी भूतकाळी वाक्ये आहेत ही.

मग याच खेडूत लोकांनी 20 एकर असताना चार मुलांचे उत्पादन केले, त्यांनीही 4,5 मुलांचे उत्पादन केले.
मग 20 एकर शेतीचे एक एक एकराचे तुकडे होऊन अप्पेपात्र झाले। Proud

जास्तीची मुले शहरात आली , इतर खेड्यातील जास्तीच्या मुलीनीही यांनाच नवरे म्हणून निवडले आणि मग शहरे बकाल बनली आहेत.
हे वर्तमानकाळी वाक्य आहे

इथे सुध्दा क्रॉनी कॅपिटलिस्ट आहेत.

शेजाऱ्यांच्या तुलनेत भारतात बरी परिस्थिती आहे यामुळेच वामपंथीना त्रास होत आहे. उलटं असतं म्हणजे भारतात अराजक असतं आणि श्रीलंका, पाकिस्तान येथे सर्व आलबेल असतं तर या विघ्नसंतोषीना मोदींविरुद्ध कांगावा करायला संधी मिळाली असती.
शक्यता आहे की हे लोक मुद्दाम देशात अस्थिरता पैदा करायला आणि त्यासाठी बाहेरच्या शत्रूची मदत घ्यायलाही तयारीत असतील.

IMG-20220405-WA0008.jpg

गडकरी एक नंबर च फेकू आहे मोदी सारखाच.
त्याचे लोकसभेत केलेले भाषण बघितले.
फक्त फेकाफेक चालू होती

खरी मजा त्यांचा बुलडोझर कम्युनिस्टांकडे वळला की येते ! फुल्ल कापा कापी Happy
पण ते नक्की कोणाच्या विरोधात आणि कोणत्या पक्षाच्या समर्थनार्थ बोलतात तेच समजत नाही .
एकाच वेळी भाजप आणि कम्युनिस्ट दोघांनाही हंटर ने फोडतात !
@ हेमंत सर , राहुल दादा आणि काँग्रेस बद्दल तुमचे काय मत आहे ?

पण ते नक्की कोणाच्या विरोधात आणि कोणत्या पक्षाच्या समर्थनार्थ बोलतात तेच समजत नाही .>> Rofl
सरांच्या मुडवर आहे कोणाला झोडपायचे ते.
अजुनतरी केजरीवाल सुटले आहेत वाटतं तडाख्यातुन.

Pages