आपला अशांत शेजार !

Submitted by रमेशमामा1 on 4 April, 2022 - 20:30

सध्या भारताच्या शेजारील देशात प्रचंड उलथापालथ चालू आहे . त्याचप्रमाणे अशांत शेजार हे भारताच्या प्रगतीसाठी देखील मारक आहे .

पूर्णपणे आयातीवर विसंबून असलेल्या श्रीलंकेत परकीय चलन तुटवड्यामुळे महागाई सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे . फक्त पर्यटन द्वारे येणारा पैशावर अवलंबून राहिल्यामुळे श्रीलंकेवर ही परिस्थिती ओढवली आहे . जनतेच्या असंतोषाचा स्फोट झाला आणि त्याचा परिणाम राष्ट्रपती च्या घरावर हल्ला केला गेला . विस्थापित लोकं देश सोडून समुद्रमार्गे भारतात येत आहे , ज्यामुळे भविष्यात श्रीलंकन सिहंली / तामिळी आश्रित लोकांचा प्रश्न भारतात निर्माण होऊ शकतो .
भारतापुढे असंख्य प्रश्न पडलेले असताना श्रीलंकेला मदत करणे हे आपल्या कर्तव्याचा भाग आहेच तसेच भविष्यात श्रीलंका चीन च्या पंखाखाली जाऊ नये याचा विचार करून ध्येयधोरणे आखावी लागत आहेत .

दुसरा अशांत देश म्हणजे पाकिस्तान !

1947 पासून पाच वर्षांची टर्म पूर्ण करू न शकणाऱ्या पंतप्रधानांच्या यादीत इम्रान खानचे देखील नाव शामिल झाले .
इम्रान ने पाकिस्तान असेंम्बली विसर्जित करून मध्यवर्ती निवडणूक जाहीर केली .
अल्पमतातील सरकार चालवताना बालिश बडबड हानिकारक ठरू शकते , पण धर्माच्या पायावर स्थापन झालेल्या देशातील सर्वोच्च नेत्याला रोजच्या भाषणात आपला धर्म आणि त्यास इतर देशांकडून असलेला धोका याबद्दल सतत उल्लेख करून जनतेला झुलवत ठेवावेच लागते , अन्यथा सवय लागलेली जनता त्याला पायउतार होण्यास भाग पाडू शकते .
हा एक कंगोरा आहे .
इम्रान आणि बाजवा च्या वादामुळे बाजवा ने इम्रान च्या युती मधील काही पक्षांना बाहेर होण्यास सांगून सरकार कोसळण्याची तजवीज करून ठेवली .
बाजवा विरोधात मिडियासमोर बोलू शकत नसल्यामुळे इम्रान आपले सरकार डळमळीत करण्यासाठी अमेरिकेचे नाव घेत आहे .तर अमेरिका हे आरोप निराधार असल्याचे सांगत आहे .

मुस्लिम बहुल देश आणि अतेरेकी संघटनांचा मुक्त संचार असलेला पाकिस्तान देश अशांत असणे भारताला व्युव्हरचनात्मक दृष्ट्या परवडणार नाही .
आणि भारत श्रीलंकेला मदत करतोय त्या प्रमाणे पाकिस्तानला ( वैर बाजूला ठेवून ) मदत का करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे .

Group content visibility: 
Use group defaults

डावे विचारवंत आणि राजकीय पक्ष ह्या वर राग का?
ही लोक जनतेच्या हिता विषयी कोणत्याच विषयावर बोलत नाहीत.
देशाची आर्थिक स्थिती कधी सुधारेल ह्या वर कधीच काही बोलणार नाहीत.
ना त्यांच्या कडे काही कार्यक्रम आहे.
देशात सर्व धर्मात समानता,स्त्री पुरुष समानता ह्या वर हे काहीच करणार नाहीत .
ना ह्यांच्या कडे कोणता कार्यक्रम आहे.
हे करतात काय.
धर्म कसा वाईट हे सांगतील पण हिंदू धर्म सोडून बाकी कोणत्याच धर्मातील वाईट रीती विरुद्ध एक शब्द बोलणार नाहीत.
भारतातील प्राचीन ग्रंथ त्या मध्ये मांडलेले विचार हे सर्व बोगस कसे आहेत ह्याच विषयावर लिखाण करतील तावा ताव नी बोलतील पण त्या मधील चांगल्या गोष्टींचा उल्लेख पण करणार नाहीत.
भारतातील प्राचीन कला,इमारती ह्यांचे कधीच गुणगान गाणार नाहीत.
भारत कसा नालायक आहे इतकेच बोलत राहतील.
भारताच्या चांगल्या गोष्टी विषयी मन मोठे करणार नाहीत.
म्हणून ही लोक आवडात नाहीत.
ढोंगी वाटत असतात.

भारतातील कला , इमारती
Proud

राजामहाराजनी 1947 साली चांगल्या ऐतिहासिक इमारती आपल्या नावे केल्या आहेत , तिथे 7 स्टार हॉटेल आहेत , एक रात्रीचे भाडे लाखात असते

तिथे सामान्य मनुष्यास कुणी कुत्रे विचारत नाही.

बाकी जे मोडके झडके पडके फुटके आहे ते छाती फुगवून फुगवून इतिहास म्हणून सामान्य जनता बघायला जाते

कशाचे कौतुक आणि कशाला करायचे ?

Proud

नेहरू शहाणा होता , म्हणूनच हिंदुइतिहासाच्या नादाला न लागता जनतेच्या नवीन गरजेनुसार नवीन इमारती बांधत राहिला.

हेच खोटे रेटून बोलणारे डावे,आणि भारताचा तीव्र द्वेष मनात आलेल्या लोक विषयी बिलकुल आस्था वाटत नाहीं
डाव्या आणि कम्युनिस्ट लोकात भारता विषयी तीव्र द्वेष आहे हे विविध प्रसंगातून दिसून येते.
इतका तीव्र द्वेष तर पाकिस्तान पण भारताचा करत नसेल.

हेच खोटे रेटून बोलणारे डावे,आणि भारताचा तीव्र द्वेष मनात आलेल्या लोक विषयी बिलकुल आस्था वाटत नाहीं
डाव्या आणि कम्युनिस्ट लोकात भारता विषयी तीव्र द्वेष आहे हे विविध प्रसंगातून दिसून येते.
इतका तीव्र द्वेष तर पाकिस्तान पण भारताचा करत नसेल.

100 टक्के सत्य !
शेजारच्याला बाप म्हणण्याची म्हण यांच्यामुळेच आली असावी अशी दाट शंका आहे Happy

साधं आणि सोप आहे.
केंद्रीय एजन्सी .
कट्टर विरोधी असून आणि गुन्हेगार असून पण
बंगाल आणि केरळ मध्ये काहीच कारवाई करत नाहीत.
कारण तिथे हिंसक प्रतिक्रिया उमटू शकेल
केंद्र सरकार,देशाचे कायदे देश,राज्य घटना ह्यांना ती लोक किंमत द्देत नाहीत.
केंद्रीय एजन्सी ना हिंसक प्रतिक्रिया सहन कराव्या लागतील .
आणि राज्य बिलकुल मदत करणार नाही.

ना तेथील जनतेला त्याचे काही वाटणार नाही

कम्युनिस्ट आणि डाव्या विचाराचा तिथे प्रभाव आहे..
ते देश ,देशाचे कायदे ,राज्य घटना ह्यांना बिलकुल किंमत देत नाहीत.
पण महाराष्ट्रात सीबीआय किंवा ed बिन्धास्त कारवाई करत आहे.
खोट्या.
तरी येथील जनतेत त्यांचे हिंसक प्रतिसाद उमटत नाहीत.
राजकीय पक्ष आले की त्यांचे पाळलेले गुंड पण आले तरी हिंसक प्रतिक्रिया होत नाही.
कारण महाराष्ट्र ची जनता डाव्या आणि communist विचाराची नाही.
ती देश आणि राज्य घटना दोन्ही चा respect karte.
राजकीय गुंड नी हिंसक प्रतिसाद दिला तर तो देशविरोधी समजून लोक निवडणुकीत त्या पक्षाला मत देणार नाही.
पण बंगाल आणि केरळ हे डावे आहेत तिथे केंद्र विरुद्ध,राज्य घटना विरुद्ध भूमिका घेतली तरी ते त्याच डाव्या पक्षांना निवडून देईल .
हा फरक आहे

Proud

कायद्याला जिथे किंमत दिली जात नाही तिथेच तर सरकार पोलीस कोर्ट यांचे काम असते.

खून केल्यावर खुनी पोलिसांपुढे येऊन सांगत नाही की मी अपराधी आहे, मग पोलिसांनीच तिथेच गोळी घातली असती

विजय मल्ल्या मोदींना येऊन साष्टांग नमस्कार घालून सांगणार नाही की मला पकडा म्हणून

पण बंगाल आणि केरळ हे डावे आहेत तिथे केंद्र विरुद्ध,राज्य घटना विरुद्ध भूमिका घेतली तरी ते त्याच डाव्या पक्षांना निवडून देईल .
हा फरक आहे
>>>>>>>>
थोडक्यात तेथील मेंटयालिटी पाकिस्तान , बांग्लादेंशी सारखी हिंसक आणि चिनी सारखी कपटीच आहे म्हणायचं !

राज्य घटनेच्या विरोधात वागूनही शिक्षण आरोग्य जीडीपी यात अग्रेसर आहेत म्हणजे कमालच की

IMG_20220408_132949.jpg

पक्ष असो,देश असो, ऐतिहासिक वास्तु असोत, धार्मिक संस्था पैसा असेल तर टिकतात नाही तर काळाच्या ओघात गडप होतात.
आज डावे पक्ष केरळ वगळता औषधालाहि सापडत नाहीत कारण त्यांच्याकडे पैसाच नाही.
कुठल्याही गड किल्ले,महाल यांना जतन तेव्हाच करता येते जेव्हा लोकांकडे आणि सरकारकडे पुरेसा पैसा असेल. जिथे रोजच्या गरजा भागवतानाच सामान्य माणसाचे उत्पन्न संपत असेल तर तो पर्यटन का आणी कसे करेल्?मुठभर श्रीमंत कत्रिना कैफ आणि करिना कपूर सारखे माल्दिव्ला जातील्,युरोपला जातील.सिंहगडावर तर साधी माणसेच जाणारा ना? त्यामुळे अर्थव्यवस्था सांभाळणे ही कुठाल्याही राज्यकर्त्यांचे प्राथमिक काम असते. प्राधान्यक्रम चुकला की सगळेच गंडते

भिवंडीत दोन पोलिसांना आणि दिल्लीत अजय गोस्वामी ला डुक्कर रक्षकांनी मारले होते का ?
बोलायच्या आधी स्वतःचे पाय चिखलाने माखलेत ते बघत जा!

<< भिवंडीत दोन पोलिसांना आणि दिल्लीत अजय गोस्वामी ला डुक्कर रक्षकांनी मारले होते का ?
बोलायच्या आधी स्वतःचे पाय चिखलाने माखलेत ते बघत जा! >>

--------- फरक आहे.
उ प्र मधे पोलिस अधिकार्‍याची हत्या करणार्‍यांचा सत्कार होतो. मारेकरी बेल वर बाहेर सुटल्यावर... त्यांचे जंगी स्वागत होते, सोबत " भारत माता कि जय.. वंदे मातरम". पोलिस अधिकार्‍याची हत्या करण्यासाठी गोमांसाचे केवळ निमीत्त होते.... अन्यथा जमाव संतप्त कसा झाला असता.

कल्याण मधे पोलिसांची हत्या करण्याला मारेकर्‍यांचे पुढे काय झाले ? त्यांचे असेच जंगी स्वागत झाले होते का?

IMG-20220409-WA0002.jpg

इतक्या दिवस भारतावर आगपाखड करणाऱ्या इम्रान चीचा ने आयुष्य असुरक्षित झाल्यानंतर पलटी मारली !
आणि भारताचे ( म्हणजेच भाजप सरकारचे ) कौतुक केले .
पण आपल्या येतील वातकुक्कट रुग्णमात्र मोदींवर टीका करून पोटाची खळगी भरत असतात.
जे एन यु मधील भारतसे आझादी वाल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या चाहत्यांना इम्रान ने आता तोंडावर पाडले असणार !

अरे रे !
इम्रान ने हे काय केलं ?
भारतात असुरक्षित वाटणाऱ्या लोकांचे काळीज फाडले !

अर्धच ट्वीट वाचून एका पायावर नाचणार्‍याने पुढचं अर्ध वाचलं की तो पाय तोंडात गेल्याचं लक्षात येईल.footinmouth.png

आणि भारत म्हणजे भाजप सरकार नव्हे. आंतरराष्ट्रीय दबावाला भीक न घालण्याचा इतिहास जुना आहे. बांग्लादेश मुक्ति युद्धाच्या वेळी अमेरिकन आरमाराला भारत दबला नव्हता.

हेच ते गिरे तो भी टांग उप्पर !
शत्रूदेशाचा आंतरराष्ट्रीय भिकारी भारता बरोबर संबंध सुरळीत करता आलें नाही या बद्दल हतबलता दर्शवितोय !
त्याला कोणी भारतातून कोणी विचारले का गुड रिलेशन का नाही म्हणून ?
पण आपल्या येथे असुरक्षित वाटणाऱ्यांना सवयच आहे एकक्षाने बघण्याची .

@zaiduleaks
The reason behind we Pakistanis are more happier than Indians & we’re ahead in Happiness Index is because we enjoy small happy moments like today there is no blast in any mosque.

ZaiduLeaks
242 Tweets
ZaiduLeaks
@longliveindia
55 year old young ex mujhahidin blessed with roohani powers, self proclaimed defence analyst who hates making sense
mental hospital agraJoined July 2010
याचा अर्थ तुला कळणार आहे का? Wink

संघी कुजबुज?
अर्थातच.

वंदना शिवा या शेतकरी नाहीत, त्यांनी शेतात जाऊन कधी काम केलेले नाही. त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर नाही. She has no skin in the game. पण शेती आणी शेतकरी यांच्या विषयी असलेल्या रोमँटिक न नोस्टॅल्जिक कल्पनांवर त्या चालतात. त्यांच्याच एका ऑनलाईन पुस्तकात शेतकरी स्त्रिया कशा छान शेतात बसून तण उपटत आहेत व दुसरिकडे एक शेतकरी मशीन ने तणनाशक फवारत आहे असे चित्र आहे. पूर्वी कंपोझिटर नावाचे अमनुष करीयर असायचे. आज डीटी पी मुळे ते बंद झाले आहे. पण कुणी नोस्तॅल्जिक होत नाही.

एखाद्या पुरुषाला ( जो कधीही किचन मध्ये गेला नाही) पूर्वी बायका कशा जात्यावर गहू दळून , पाट्यावर पुरण वाटून, रेशमी पुरण पोळ्या करायच्या, पाट्यावर वाटलेल्या चटणीची स्वर्गिय चव वगैरे उसासे टाकायचा हक्क आहे, पण त्याने मिक्रसर , ग्राईंडर , चक्की वगैरे वर बंदीच आणली तर ते ढोंगी पणाचे अहे.

function at() { [native code] }इशयोक्ती एक वेळ क्षम्य आहे पण शिवा धडधडीत खोटे बोलतात. बीटी वांगी न येण्याला थोडा हातभार त्यांचाही आहे.

वंदना शिवा ऑरगॅनिक, नॉन जीएमओ फूड प्रमोट करतात ना? मग त्यात काय चूक आहे नेमकं? बिल गेट्ससारख्या धनदांडग्याना त्या EXPOSE करतात.
त्यांच्यावर का धरिला राग कुलकर्णीसर?

Pages