आयपीएल २०२२

Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल

आयपीएल २०२२ आली आहे हो!

२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"अश्विन कितीही फॉर्म मधे असला तरी शेवटच्या दोन बॉल मधे न धावायला तो नक्कीच रसेल किंवा पोलार्ड नाहीये." - सही पकडे हैं Happy ... तुला पोलार्ड - जुना अपेक्षित आहे असं गृहित धरतो. Wink मुद्दा बरोबर आहे तुझा. पटला.

अरे सध्या अश्विनच्या अंगात १०० हत्तींचं बळ संचारलय. त्यामुळे त्याला वाटलं बेट्या तू थांब, तू निसता बाता करतोस मी मारतो छक्के चौके म्हणून नसेल पळाला तो.
सुरवात चांगली होउनही स्कोअर फार नाही बंगलोर चा. बटलर सुटला तर काम तमाम!

मोमेंटम गमावलंय गेल्या काही ओव्हर्स मधे बंगलोर ने. पण बंगलोरची बॉलिंग (हेझलवूड, सिराज, पटेल, हसरंगा) आणि प्लेऑफ्स च्या प्रेशरचा विचार करता १५०+ स्कोअर competitive आहे. राजस्थान ला टिच्चून बॅटींग करावी लागेल.

अर्थातच बुवा फक्त अश्विन सारख्या चिकी विटी स्ट्रीट स्मार्ट खेळाडू कडून अपेक्षित नव्हते.

बाउन्स असलेल्या पिच वर जैस्वाल, पड्डीकल, संजू कसे खेळतात हे आज कळेल.

जैस्वालला सुर गवसतोय. त्याची आणि बटलरची चांगली बैठक जमली तर आरामात जिंकतील. पहिल्या ४-५ जणांनी नीट खेळलच पाहिजे नाहीतर आहेच मग डाऊन टु द वायर मॅच! पण आपल्याकरता बरच आहे तसं झालं तर! Happy
येउदेत शिमरॉन हेटमायर शेवटी १५ बॉल ४० रन वगैरे...

>>यही हाथ एक दिन हमका जीत दिलायेगा| Happy Happy

कुणाच्या का हाताने का होईना.... जीत मिळाल्याशी मतलब Wink

>>राजस्थान ला टिच्चून बॅटींग करावी लागेल.

नक्कीच..... हर्षल पटेलच्या ओव्हर मारायला अवघड असतात!! ते calculation डोक्यात ठेऊनच इनिंग योग्यवेळी पेस केली पाहिजेल Happy

>>येउदेत शिमरॉन हेटमायर शेवटी १५ बॉल ४० रन वगैरे...
नको रे इतके टेन्शन Wink

अश्विन का धावला नाही ह्याचे उत्तर त्याला विचारायला हवे
>>>>
कारण फ्री हिट त्याला हवा होता. आश्विन थोडा स्बार्थी आहे याबाबतीत. आपल्या बॉलिंगला रिव्यू घ्यावे म्हणून प्रेशरही टाकतो कॅप्टनवर बरेच.

स्वरुप Lol

आज पण कोहली गेला लवकर. आता काही खरं नाही वाटत त्याचं. पुढच्या वर्षी नाही घेणार कदाचित त्याला बंगलोअर. इतर पण कोणी घेइल न घेइल काय माहित. काय म्हणणं आहे इथे पब्लिकचे? आहे का दम अजून त्यात? कॅन ही पूल अ धोनी?

३ ओवर ३७-०
पॉवरप्ले सांभाळा रे बेंगलोर. नंतर गेम पलटू शकतो.

“ पुढच्या वर्षी नाही घेणार कदाचित त्याला बंगलोअर.” - कोहलीला ड्रॉप करतील अशा फेजमधे (करियरच्या) तो नाहीये असं मला वाटतं (जरी हे कुणाच्याही बाबतीत घडू शकत असलं तरिही).

शर्मा, कोहली, धोनी हे ब्रांड आहेत. आयपीएल आणि त्यांच्या संघाना यामुळे टीआरपी, फॅनबेस आणि स्पॉन्सर मिळतात. यांना काढणार नाही कोणी. दिल्लीनेही अय्यरला डावलून पंतला सोबत ठेवले कारण हेच. आजच्या तारखेला तो अय्यरपेक्षा मोठा ब्रांड आहे.

कोहलीला ड्रॉप करतील अशा फेजमधे (करियरच्या) तो नाहीये असं मला वाटतं >> +१. त्याला स्वतःला त्याच्या रोल बद्दल क्लॅरिटी करावी लागेल. तो इनिंङ बिल्ड करणार कि आल्या आल्या सुटणार हे ठरले कि सगळे स्थिरावेल. माझ्या भार्तीय टी २० संघामधे मी कोहली ला खेळवणार नाही. (र्होत किंवा कोहली एकच असू शकतो - दोघे आले तर राहुल धरून काच पद्धतीने खेळणारे तिघे होतील जे आजच्या स्टाईल ला झेपणार नाही)

जैअस्वाल गेल्या वर्षीपेक्षा जास्त मॅच्युअर वाटतोय यंदा. फायनल मधे संजू 'ती' इनिंग खेळेल का ?

ह्म्म्म मेक्स सेन्स. कन्सिस्टंटली फ्लॉप होत नाहीत तो पर्यंत नाही काढणार आय पि एल फ्रँचाईझ. ह्या तिकडीला अर्थातच जास्त लीवे मिळणार ह्याबाबतीत. सो आय गेस कोहलीला खेळवतील बंग्लोअर पुढच्या वर्षी.
भारताच्या टीम मध्ये कोणाला घ्यावं आणि न घ्यावं हे तर माझ्या डोक्याबाहेरचं आहे. खुपच चोईसेस आहेत टि २० करता तरी.

“ बटलर भौ!
टेक अ बौ” - सिरियसली!! काय खेळलाय! अजून एक इनिंग खेळला रविवारी तर मजा येईल.

बटलर टेक अ बो हेच लिहायला आलेलो Happy

गुजरात त्याच्यासाठी काय प्लान करते हे बघायला हवे
राशीद खान आहे. तो पॉवरप्लेनंतर येतो.

I’m rooting for GUjrat!!
आवा दे बिज्जल बेबी!
Lol

Starting 2016, only Mumbai have been able win the IPL without Karn Sharma in their squad even though Karn has played only four matches in the playoffs. That's four titles in four playoff matches, one with Sunrisers Hyderabad, one with Mumbai, two with Chennai Super Kings. In one of the title runs, he didn't play a single game.

ह्या वर्षी कर्ण शर्मा बंगलोरमध्ये होता. ते जिंकले असते तर .. हे स्टॅट अजूनच सॉलिड झालं असतं.

Pages