आयपीएल २०२२

Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल

आयपीएल २०२२ आली आहे हो!

२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुमराह होता ना मध्यंतरी व्हाईस कॅप्टन. त्याचे म्हणतोय मी. >> अजूनही आहे. तो आफ्रिके विरुद्ध खेळणार नाहीये म्हणून हा प्रश्न आलाय.

आजवर केले नाही पण अतिक्रिकेट पाहता जर सोयीचे असेल तर ते करू शकतात. >> इतक्या वर्षांमधे केले नाही तर उद्या करतील ह्याची खात्री नाहि - किमान मला तरी नाही.

पंत रेड बॉल मधे तरी फ्किस्ड आहे नि राहुल तिन्ही संघांमधे. संजू, ईशान, ने अजून असे काही ह्च केले नाहिये कि पंत ला व्हाईट बॉल मधे चॅलेंज करू शकतील. डीके ला आधी संघात येऊ दे नि आला तरी एक बॅट्स्मन म्हणून येईल - पंत च्या जागी येणार नाही..

खरे तर लिमिटेड फॉर्मेटमध्ये पंतनेही फार काही विशेष केले नाहीये. २०-२० रेकॉर्ड (ईंटरनॅशनल) तर आणखी सामान्य आहे.
व्हाईट बॉल संघात कमबॅक सुद्धा टेस्टमुळे केलेय. अन्यथा अवघड होते त्याचे.
पोटेंशिअल नक्कीच आहे. पण अजूनही त्याच्या फलंदाजीचा ना नंबर फायनल झालाय ना त्याची भुमिका त्याला स्वत:लाही कळलीय.

एकंदरीत रोहीत शर्माला इतक्यात तरी कुणाकाडूनच थ्रेट नाही..... राहुल आणि पंत ने एक कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये तरी निराशाच केलीय.... मुळात ते कर्णधार मटेरियल वाटतच नाहीत!!
अय्यर चांगला खेळत राहिला तर तो नक्कीच रोहीतनंतरचा पर्याय होऊ शकतो...... आणि हार्दिकची या आयपीएलमधली कप्तानी आणि त्याच्यात आलेली मॅच्युरिटी हा एक सुखद धक्का आहे..... असाच खेळत राहिला तर तोही भविष्यातला पर्याय होऊ शकतो Happy
धवनबद्दलची चर्चा अगदीच बिनबुडाची वाटतेय..... त्यालाही कप्तानीचा फारसा अनुभव नाहिये आणि त्याच्यातही नेतृत्वगुण वगैरे मलातरी दिसत नाहियेत!!

असो!!
काल बंगलोर जिंकल्यामुळे आता दिल्ली टेन्शनमध्ये आली असणार!!
कोहलीचा परत येणारा फॉर्म (आणि त्याबरोबर आत्मविश्वास) भारतीय संघासाठी चांगला संकेत आहे!!
मॅक्सवेल पण तुफान खेळला काल Happy

धवन मूळात संघात असेल ह्याची शाश्वती नसताना त्याला पर्यायी कर्णधार करणे गम्मतशीर वाटते.
>>
आपली निवड समिती हे पूर्वापार करत आली आहे.
आधीच्या सिरीजला डच्चू मिळालेला रहाणे झिम्बाब्वे का कुठल्याश्या दौर्‍यापुरता वनडे कॅप्टन म्हणून आला होता.
असाच रैना पण फॉर्म अन वय नसताना कुठल्याश्या छोट्या दौर्‍यात कॅप्टन होता.
गेल्या वर्षी श्रीलंका दौर्‍यात धवनला कॅप्टन केलं होतं त्याचंच हे एक्स्टेंशन असावं.

रहाणे टेस्ट कप्तान असता तर विश्रांतीची गरज न भासता सारे सामने खेळले असता. ॲक्चुअली जर रहाणेने संघात जागा टिकण्याईतपत फॉर्म दाखवला असता तर कदाचित तो निवृत्तीपर्यंत कर्णधार म्हणून खेळला असता
>>
रहाणेनी पुजारा प्रमाणे काऊंटी खेळून टेस्ट फॉर्म मिळवण्यावर फोकस करायला हवा होता, ग्लॅमर अन व्हाईट बॉल परफॉर्मन्सच्या नादात हाती काहीच लागलं नाही (हॅमस्ट्रिंग दुखावला ते आणि वर...)

काल गावसकर म्हणाला तसं इतक्यात बर्‍याच भारतीय खेळाडूंच्या हॅमस्ट्रिंगला प्रॉब्लेम यायला लागला आहे. कुणीतरी हे अ‍ॅनलाईज करायला हवं.

"रहाणेनी पुजारा प्रमाणे काऊंटी खेळून टेस्ट फॉर्म मिळवण्यावर फोकस करायला हवा होता, ग्लॅमर अन व्हाईट बॉल परफॉर्मन्सच्या नादात हाती काहीच लागलं नाही (हॅमस्ट्रिंग दुखावला ते आणि वर...)" = +१ टोटली सहमत आहे. पुजाराचा फोकस कौतुकास्पद आहे.

मोईन ने सुरूवातीला धुमाकूळ घातला. राजस्थाने ने चांगला कमबॅककेलाय. धोनीच्या दोनपैकी एखादा कॅच बसला असता सॅमसनच्या हातात तर चित्र वेगळं झालं असतं.

"रहाणेनी पुजारा प्रमाणे काऊंटी खेळून टेस्ट फॉर्म मिळवण्यावर फोकस करायला हवा होता, ग्लॅमर अन व्हाईट बॉल परफॉर्मन्सच्या नादात हाती काहीच लागलं नाही (हॅमस्ट्रिंग दुखावला ते आणि वर...)" = +१ टोटली सहमत आहे. पुजाराचा फोकस कौतुकास्पद आहे. >> +१. काऊंटी मधे पुजाराने घातलेला धुमाकूळ बघता, तो परत संघात नसेल , किमान इंग्लंड च्या एका सामन्याच्या दौर्‍यासाठी तरी, तर कपाळाला हात लावायची वेळ येईल.

धोनी आज काय विचार करून खेळत होता देव जाणे ! सगळी सुरूवात फुकट गेली.

ब्रावो अश्विन!! जब्बरदस्त!

काय राव फेकी लोकांना चांगले दिवस आलेत. काय बोअर आहे त्या पाठेरानाची स्टाईल! हे म्हणजे क्रेक्ट अ‍ॅक्शन्वाल्यांवर अन्याय आहे हा!
हे काय बेसबॉल आहे का?

इकडं त्या उमरानचे क्रेक्ट अ‍ॅक्शन मध्ये सटासट बुंगाट बॉल टाकून बुडाचे पाटे (शॉकप्स) ढिले झालेत! अन इकडे हे भौ रपारप फेकून मारतायत स्टंपवर. Sad

आश्विन मागे फिनिशरच्या भुमिकेत असा कामात आलेला बघून त्याला तिसऱ्या नंबरवर टाकायची धडपड व्यर्थ होती असे आज राजस्थानला वाटले असेल.
भले असे रोज नाही होणार. पण रोज असे करायची गरजही नाही भासणार..

कालच्या मॅच मधे टायटन्स नी बॅटिंग का घेतली? तेथील टॉसचे व विन चे रेकॉर्ड काहीही असो टायटन्स बहुधा बेस्ट चेसर्स आहेत यावेळचे.

कोहली १६ वर असताना रशिदने तो कॅच घेतला असता तर कोहलीच्या बाबतीत चित्र वेगळे दिसले असते. पण नंतर चांगला खेळला तो. तरीही अजून पूर्वीचा टच नाही.

बाकी आता आरसीबी राहते चौथ्या नं वर की दिल्ली त्यांना टॉपल करतात इतकेच बाकी आहे असे दिसते.

जबरदस्त खेळला अश्विन आज. तुफान जिगरी खेळाडू आहे तो. बटलर गेल्या ६-७ मॅचेसमधे आऊट ऑफ फॉर्म असूनही राजस्थान जिंकतंय.

पथिराणाची अ‍ॅक्शन अगदीच बकवास आहे. मलिंगाची बरीचशी अशीच होती पण त्याची हेड पोझिशन सरळ असायची. ह्याचं डोकं एका बाजूला कलल्यासारखं वाटलं. तसं असेल तर पॉल अ‍ॅडम्स व्हायला वेळ लागणार नाही.

जबरदस्त खेळला अश्विन आज. तुफान जिगरी खेळाडू आहे तो. बटलर गेल्या ६-७ मॅचेसमधे आऊट ऑफ फॉर्म असूनही राजस्थान जिंकतंय.

पथिराणाची अ‍ॅक्शन अगदीच बकवास आहे. मलिंगाची बरीचशी अशीच होती पण त्याची हेड पोझिशन सरळ असायची. ह्याचं डोकं एका बाजूला कलल्यासारखं वाटलं. तसं असेल तर पॉल अ‍ॅडम्स व्हायला वेळ लागणार नाही.

हायलाईट्स पाहिल्या फक्त, त्यामुळे कळाले नाही की मोईन अलीने पहिल्या २७ बॅालमध्ये ६७ कुटले, आणि मग पुढच्या ३० मध्ये केवळ २६? इतकी भन्नाट बॅालिंग कुणी केली त्याला??

हायलाईट्स पाहिल्या फक्त, त्यामुळे कळाले नाही की मोईन अलीने पहिल्या २७ बॅालमध्ये ६७ कुटले, आणि मग पुढच्या ३० मध्ये केवळ २६? इतकी भन्नाट बॅालिंग कुणी केली त्याला??

>>>>>
चहल आणि मॅककॉय ने तुफान bowling केली.
अश्विन ने ही पहिल्या over मध्ये मार खाल्ल्या नंतर खूप चान्गली ऍडजस्टमेन्ट केली.

पथिराणाची अ‍ॅक्शन कितीही बकवास असली तरी ती 100% लीगल आहे.

त्याचा बोवलिंग आर्म पर्फेक्टली स्ट्रेट आहे. आयसीसी चे नियम एल्बो फ्लेक्षन शी रिलेटेड आहेत त्यांचा आर्म ट्रॅजेक्टरी वर कसलाही धरबंध नाही

“ तरी ती 100% लीगल आहे.” - लीगॅलिटीविषयी बोलणं चाललंच नाहीये. अ‍ॅक्शन बकवास आहे कारण त्याची हेड पोझिशन सरळ नाहीये. कंट्रोल कमी व्हायची शक्यता आहे.

त्या पॉईंट बाबत 100% सहमत. इंज्युरी व्हायची हि फार मोठी शक्यता आहे.

तो फार तर एक T20 स्पेशालिस्ट म्हणूनच राहील.

राजस्थान रॉयल्स Happy

करीअरच्या या स्टेजलाही एका वेगळ्या फॉर्मेटमध्ये एका वेगळ्या रोलमध्ये स्वताला प्रूव्ह करायची एव्हढी जिद्द असणे आणि त्यासाठी एव्हढी मेहनत घेणे..... Hats off Ashwin!!
पोस्ट मॅचमध्ये दोघांनीही सांगितल्याप्रमाणे अश्विनचा बॅटींगवरचा फोकस हा एक प्लॅन्ड ॲप्रोच होता..... नेट्समध्ये अश्विनने बॅटींगचा बराच सराव केलेला म्हणे! संघाची गरज ओळखून अश्विनला फ्लोटर म्हणून वापरण्याचा प्लॅन होता असे दिसतेय!!
जयस्वाल परत आल्यापासून बॅटींगला मजबुती आल्यासारखी वाटतीय आणि प्रॉपर क्रिकेटींग शॉट्स खेळून तो रन्स जमवतोय हे महत्वाचे!

संजूची मोठी इनिंग अजूनही ड्यू आहे Happy

धोनी पीचवर आल्यापासून त्याने आणि मोईन अलीने जो अनाकलनीय खेळ केला त्यांचे त्यांना माहित..... विकेट्स पडल्या, शेवटपर्यंत टिकायचे वगैरे सगळे मान्य केले तरी इतके स्लो डाऊन व्हायची गरज नव्हती!!

ओबेड मॅकॉय मला रॉयल्सच्याच "कूपर"ची आठवण करुन देतो आणि रियान पराग "स्टुअर्ट बिन्नी"ची Wink

“ ओबेड मॅकॉय मला रॉयल्सच्याच "कूपर"ची आठवण करुन देतो आणि रियान पराग "स्टुअर्ट बिन्नी"ची” - ह्याला म्हणतात खरा चाहता. Happy तरी अजून फॉकनरची रिप्लेसमेंट सापडली नाहीये Wink

करीअरच्या या स्टेजलाही एका वेगळ्या फॉर्मेटमध्ये एका वेगळ्या रोलमध्ये स्वताला प्रूव्ह करायची एव्हढी जिद्द असणे आणि त्यासाठी एव्हढी मेहनत घेणे..... Hats off Ashwin!! >>> सही. वृद्धिमान साहा सुद्धा. सॉलिड खेळतोय तो या वेळेस. त्याची जिद्द त्या रहाणे कप्तान असलेल्या व भारताने जिंकलेल्या कसोटीतील बॅटिंग मुळे लक्षात आहे.

य दोघांनी पूर्ण कात टाकल्यासारखी बॅटिंग करत आहेत.

>>ह्याला म्हणतात खरा चाहता.
द्रवीड राजस्थानच्या टीममध्ये असताना खुप मनापासून फॉलो केले होते राजस्थानला..... त्यामुळे सगळे प्लेयर्स पक्के लक्षात आहेत Happy
फॉकनरने फार हवा केलेली आल्याआल्या..... एक-दोन सीझन चांगला खेळला पण नंतर फ्लॅट गेला!!

“ फॉकनरने फार हवा केलेली आल्याआल्या..... एक-दोन सीझन चांगला खेळला पण नंतर फ्लॅट गेला” - तसा तो ओवैस शाह पण एक सीझन गाजवून गेला. ब्रॅड हॉग आणि बिन्नी काही सीझन्स फिनीशर्स म्हणून खेळले. पण गेले काही सीझन्स अगदीच गंडले होते रॉयल्स. यंदा चांगले खेळले आहेत.

आज बॉल स्विंग होत असल्यामुळे रोहित शर्माची कसोटी लागणार असं वाटलं होतंच. पण १३ बॉल्स २ इतकी तारांबळ उडेल असं नव्हतं वाटलं.

Pages