आयपीएल २०२२

Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल

आयपीएल २०२२ आली आहे हो!

२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहुल ५००+ धावा'
लखनऊ स्पर्धेच्या बाहेर
सेम ओल्ड स्टोरी Happy

“ तेवातीया ला एक्स फॅक्टर साठी म्हणत होतो फॉर्म पेक्षा.” - हो. तो तुझा मुद्दा मला पटतो (यस, यस! यू इज द म्हणिंग ऑफ कर्ट्स!) पण असं काहीतरी आहे त्याच्या बॅटींगमधे (वाय फॅक्टर म्हणू आपण चर्चेच्या सोयीसाठी Happy ) ज्याच्याकडे पाहून माझं कन्व्हिक्शन परत डळमळीत होतं. Happy

लुइसला अक्षरशः वाया घालवलं लखनौ ने.

tale of two sides: गुजराथने मर्यादित रिसोर्सेस वापरून कसं यश मिळवायचं ते दाखवलं आणि भरपूर पर्याय असले की चुकीच्या निर्णयांनी त्याची माती कशी करायची ते लखनौ ने दाखवलं.

लुइसला अक्षरशः वाया घालवलं लखनौ ने. +७८६ ते त्याला पुढे न पाठवल्याने होणारच होते. किंबहुना कृणाल पांड्याही फुकट गेला म्हणू शकतो. २००+ स्कोअरला राहुलला जर बाजू लाऊन धरायची होती तर एखादा लुईस वा पांड्याला मारायचे लायसन दिल्यासारखे सुटायला हवे होते. हुडा राहुल दोघे एकाच छापाचे क्रिकेट खेळत राहिले.

हूडा खरं तर एरवी जास्त आक्रमक खेळतो. आज तो नि राहूल मधे विकेट्स वाचवून नंतर मारू अशा टाईप मधे (का) खेळले. मनन वोहरा च्या जागी लेविस ला का पाठवले नाही ? डावे उजवे पण झाले असते.

पाटीदार ने आज तुफान बॅटिंग केली. त्याचे एक दोन कॅचेस लखनौ ने सोडले पण इन जनरल क्लीन हीटटींग होती.

हर्षल ने परत डेथ ओव्हर्स मध्ये अप्रतिम बॉलिंग टाकली. ऑस्टेलिया च्या मोठया ग्राऊंड्स वर त्याला घेऊन जाणे माझ्या मते आवश्यक आहे.

मेरा भी पैसा गुजरात पे! आर रि बी आता पंप्ड असणार पण गुजरात सॉलिड स्ट्रीक वर आहे. नेहमी सारखी डाउन टु द वायर जाउन शेवटी तेवाटियाची सिक्स वगैरे बसली तर फुल्ल पैसे वसूल! Lol

बेंगलोर राजस्थान चोकर्स आहेत (अर्थात यंदा टीम बरेच बदलल्या आहेत ते वेगळे) त्यामुळे बहुतांश लोकांचे मत गुजरातच्याच पारड्यात आहे.

लोल स्वरुप. खरय आरार आहेतच आणि खरं तर ट्रु कन्टेन्डर्स आहेत. They deserve to be in the finals! फक्त एन वेळेस अशी अचानक मुसंडी मारुन जिंकलेले लोकं फुल पंप्ड आणि डेंजरस असतात म्हणून मला वाटतं काही सांगता येत नाही. कोहली, डु प्लेसी, मॅक्सवेल, आता पाटीदार अन पुढे कार्थिक अचानक ऑल इंजिन्सनी फायर झाले तर अवघड होऊ शकतं.

"अरे मधल्या मध्ये आमच्या RR ला का विसरताय??" - मी आहे रे. कित्येक वर्षांनी आर आर च्या फॅन्स ना चीअर करायला मिळातंय ह्याचाच मला आनंद झालाय. २०१४ ला वानखेडेवर द्रविड ने फेकलेली टोपी अजून विसरलो नाहीये. फक्त उत्साह जरा आटोक्यात ठेवतोय. जिथे प्रत्यक्ष ब्रॅडमनची बायको त्याच्या इनिंगच्या सुरूवातीला नर्व्हस असायची, तिथे तुमची-आमची काय कथा?

कालच्या सामन्यापासून राहुल धडा घेऊन भारतातर्फे खेळताना टेंपो कायम ठेवेल अशी आशा धरूया. खालचे खेळतील कि नाही ह्याचा विचार त्यांना करू दे. पंजाबपासून अँकर चे भूत डोक्यावर बसलय त्याच्या.

>>२०१४ ला वानखेडेवर द्रविड ने फेकलेली टोपी अजून विसरलो नाहीये. फक्त उत्साह जरा आटोक्यात ठेवतोय.

हो ना! मी ही उत्साह जरा आटोक्यात ठेवतोय Wink

बाय द वे, बटलरला खाली खेळवून बघावे का?
किंवा बॅटींग डेप्थचा लोड न घेता बटलरने पुढे मोकळेपणाने खेळले पाहिजेल..... Attack is the best Defence for बटलर!!
रियान परागने परवा अश्विनला रनआउट नंतर दाखवलेला ॲटीट्यूड बेक्कार होता.... बसवा त्याला एखादी मॅच.... खुप लाड झाले!!

बंगलोर जिंकल्यामुळे चहलच्या पर्पल कॅप ला धोका निर्माण झालाय Wink
पण लॉ ऑफ ॲव्हरेजनुसार चहल चांगलीच कामगिरी करेल असे वाटतेय या सामन्यात Happy

रियान परागने परवा अश्विनला रनआउट नंतर दाखवलेला ॲटीट्यूड बेक्कार होता...
>>>>
त्याने अजून काही कांड केलेत. सोमिवर फार ट्रोल होतोय तो.
ॲटीट्यूड कोहलीसारखा आणि परफॉर्मन्स विजय शंकरसारखा हे फेमस झालेय.
त्यात त्याने आपण ईंडियासाठी फिनिशर बनू शकतो वगैरे स्वत:च कौतुक करून झालेय हे पण ट्रोलर्स काढत आहेत.
मी मागच्या की त्याही मागच्या सीजनला म्हणालेलो की हा स्वत:ला सिद्ध करायच्या आधीच का ऊडतो समजत नाही..

स्वरूप, राजस्थानच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे बटलर ने इनिंग अँकर करत शेवटी हाणामारी करणं आणि बाकिच्यांनी त्याच्या अवती-भवती अ‍ॅटॅकिंग क्रिकेट खेळणं. त्यामुळे बटलरला खाली पाठवून सगळा सेट-अप नाही बिघडवणार असं मला वाटतं.

पराग लहान आहे रे अजून. हीट ऑफ द मोमेंटमधे होतं असं कधी कधी. इतर वेळी तो टीम-मॅन असल्याचं बरेच वेळा दिसलंय. त्यामुळे एखादा प्रसंग सोडून देता येईल असं मला वाटतं.

विराट फॉर्म मध्ये आलाय.. त्यामुळे मी बेंगलोर म्हणतोय..
स्टार प्लेयर्स फॉर्म Mattars..
>>>>>

दुपारीच ही पोस्ट वाचलेली. उगाच पनवती नको म्हणून काही बोललो नव्हतो. पण आता गेला तर बोलू शकतो.मला तरी त्याचा फॉर्म दिसला नाही अजून. अध्येमध्ये एखादा शॉट मारतो ते बघून विंटेज कोहली दिसला बोलण्यात अर्थ नाही. आजही एक सिक्स मारला वाहवा मिळवणारा आणि मग लावली बॅट..

कोहली च्या विकेटनंतरही ( Sad ) बंगलोरची चांगली सुरूवात आहे. राजस्थान ने सुद्धा चांगली बॉलिंग - फिल्डींग केलीय.

रियान परागने कॅच सोडली हातातली.
गेल्या सामन्यात पडीकलवर भडकलेला का तो? कॉमेंटरीवाले आठवण करून देत आहेत.

>>पराग लहान आहे रे अजून

लहान मोठ्ठ्याचा संबंध नाही..... आत्ता पण कॅच सोडल्यावरचे आविर्भाव बघितलेस का??

"लहान मोठ्ठ्याचा संबंध नाही.." - जिस हाथ को तू ने लूला कहाँ हैं ना लाखा, देख ले ना, यही हाथ एक दिन हमका जीत दिलायेगा| Happy Happy

बघू काय होतं. जर नसेल त्याच्याकडे टॅलेंट आणि टेंपरामेंट, तर नाही टिकणार. कदाचित मी इतकं बघितलं नसेल.

रियान परागने परवा अश्विनला रनआउट नंतर दाखवलेला ॲटीट्यूड बेक्कार होता.. >> पराग बाजूला ठेवा, खर तर तो अश्विन का धावला नाही ह्याचे उत्तर त्याला विचारायला हवे. कॉमन सेन्स होता तो. अश्विन कितीही फॉर्म मधे असला तरी शेवटच्या दोन बॉल मधे न धावायला तो नक्कीच रसेल किंवा पोलार्ड नाहीये.

Pages