आयपीएल २०२२

Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल

आयपीएल २०२२ आली आहे हो!

२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बंगलोर आले प्लेऑफ्स मधे

अंपायरच्या कॅजूअल अप्रोच अन् पंत च्या रिव्ह्यू न घेण्यानी डेव्हिड ला पहिल्याच बॉल वर जीवदान मिळालं, अन् त्यांनी पुढच्या ९ बॉल्स मधे ३४ कुटून मॅच टर्न केली...

पंतने रिव्ह्यू घेण्यात चूक केलीच, एक कॅचही सोडला. दोन्ही गोष्टी नडल्या दिल्लीला. फॉर ओल्ड टाइम्स सेक, पाँटींग चा पडलेला चेहरा बघून जरा बरं वाटलं. Wink

प्लेऑफ्स ना नविन चेहरे यंदा. मजा येईल.

पंत प्रेशर सिच्युएशनला गडबडतो..
त्यात त्याचे आणखी दुर्दैव्य म्हणजे तो किपर असल्याने आणि त्याला फिनिशर , कप्तान या भुमिकेत बघितले जात असल्याने नकळत धोनीशी तुलना होते.. आणि त्याच्या चुका अपराध वाटू लागतात

गावस्कर पुन्हा वादात

“मोठा प्रश्न हा आहे की शिमरोन हेटमायरच्या पत्नीने नुकतीच डिलेव्हरी केलीय, आता हेटमायर राजस्थान रॉयल्ससाठी डिलेव्हर करु शकेल का?”, असं गावस्कर म्हणाले. गावस्कर यांनी हेटमायच्या पत्नीचं बाळंतपण झाल्याचा संदर्भ देत डिलेव्हरी हा शब्द काहीतरी करुन दाखवणे या अर्थाने डिलेव्हरी म्हणून वापरण्याच्या नादात शब्द खेळ करत हे वक्तव्य केलं. गावस्कर यांचं हे वक्तव्य ऐकून कॉमेन्ट्री बॉक्समध्ये लोक हसू लागल्याचं आवाजावरुन समजत होतं. गावस्कर यांच्या या वक्तव्यावरुन आता त्यांच्यावर टीका केली जातेय.

आज बॉल स्विंग होत असल्यामुळे रोहित शर्माची कसोटी लागणार असं वाटलं होतंच. >> इंग्लंड दौरा येतोय Sad

पंतने रिव्ह्यू घेण्यात चूक केलीच, एक कॅचही सोडला. दोन्ही गोष्टी नडल्या दिल्लीला >> शिवाय खलिद ला तिसरी ओव्हर न देणे पण अनाकलनीय होते. असे नाही कि खलिद बुमरा आहे कि शेवटी चांगली टाकेल ह्याचे पर्सेंटेज जबरदस्त असणार. एकंदर पंत विचित्र कॅप्टन्सी करतो पण राहुल पेक्षा जास्त प्रीफर्ड असेल.

गावस्कर यांच्या या वक्तव्यावरुन आता त्यांच्यावर टीका केली जातेय. >> निरुद्योगी लोक आहेत. अमक्याने डीलीव्हर केले असे किती वेळा बोलले जाते.

अमक्याने डीलीव्हर केले असे किती वेळा बोलले जाते. >>> बहुधा टिका अमक्याच्या पत्नीने डिलीव्हरी केली यावरून विनोद करण्यावर होत असावी असे मला वाटते.

आज बॉल स्विंग होत असल्यामुळे रोहित शर्माची कसोटी लागणार असं वाटलं होतंच. >> इंग्लंड दौरा येतोय
>>>

ह्ममम.. शर्माच नाही खेळला तर आणखी अवघड होईल
नुकत्याच झालेल्या ईंग्लंड दौऱ्यातील ४ कसोटीतील भारतीय फलंदाजांची कामगिरी
खेळाडू - धावा - सरासरी
रोहीत शर्मा - ३६८ - ५३
राहुल - ३१५ - ३९
पुजारा - २२७ - ३२
कोहली - २१८ - ३१
जडेजा - १६० - २३
पंत - १४६ - २१
अजिंक्य रहाणे - १०९ - १६

खलील आज आपल्या पहिल्या स्पेल मध्ये खतरनाक बॉलिंग टाकत होता. त्याला तिसरी ओव्हर ना देणं हा पन्त चा निर्णय अनाकलनीय होता.

भारता करता जमेची बाजू म्हणजे बुमरा परत फॉर्मात आलेला दिसतोय. आज त्याने शॉ ला टाकलेला बाऊन्सर तुफान होता

“ शिवाय खलिद ला तिसरी ओव्हर न देणे पण अनाकलनीय होते. असे नाही कि खलिद बुमरा आहे कि शेवटी चांगली टाकेल ह्याचे पर्सेंटेज जबरदस्त असणार. एकंदर पंत विचित्र कॅप्टन्सी करतो पण राहुल पेक्षा जास्त प्रीफर्ड असेल.” - खरंय. डेथ ओव्हर्समधे खलिल आणि उनाडकट म्हणजे एकाला झाका आणि एकाला काढा असला प्रकार आहे. बोल्टसुद्धा शेवटी गंडतो. पहिल्या एक-दोन मॅचेस नंतर राजस्थान बोल्टच्या ओव्हर्स, घरी पाहूणे जेवायला येणार असतील तर घरातल्या व्रात्य मुलाला आधी जेवायला घालून घ्यावं अशा पद्धतीनं १५-१६ ओव्हर्सपर्यंत उरकून घ्यायला लागले. त्यातून आज खलिल ने सुरूवातीला चांगली बॉलिंग केली होती. (त्याच्या ऐवजी सकारियाला का नाही खेळवलं?)

राहूल चा कॅप्टन म्हणून कधी प्रेझेन्स जाणवतच नाही. पंत शिकेल अनुभवातून ही आशा आहे.

“ आज त्याने शॉ ला टाकलेला बाऊन्सर तुफान होता” - काय जबरदस्त बॉल होता!! त्याच्या तिनही विकेट्स तुफानच होत्या. मार्शला तर टेस्ट मॅचमधे आऊट झाल्यासारखं वाटलं असेल.

राहुल अन् पंत बाबत बोलायचं झालं तर राहुल हा कधी रणजी लेव्हललाही कॅप्टन नव्हता, पण पंत गेले काही सीझन दिल्लीला रणजी मधे लीड करतोय (फायनल पर्यंत ही नेलं होतं एकदा).

त्यामुळे आधी पंजाब अन् आता लखनौ नी आयपीएल मधे कॅप्टन केलं या कारणास्तव त्याला नॅशनल टीम चा कॅप्टन म्हणून कनसिडर करणं हे उगाच होतं

पंत आणि आय्यरला लाँग टर्म ऑप्शन च्या दृष्टीनी ग्रूम करणं गरजेचं आहे... दोघांना केलं तर पुढे जाऊनही ऑप्शन्स उपलब्ध असतील...

“ आज त्याने शॉ ला टाकलेला बाऊन्सर तुफान होता” - काय जबरदस्त बॉल होता!! त्याच्या तिनही विकेट्स तुफानच होत्या. मार्शला तर टेस्ट मॅचमधे आऊट झाल्यासारखं वाटलं असेल. >>> टोटली. आणि सेट झालेल्या पॉवेलला यॉर्कर सुद्धा.

दक्षिण आफ्रिके विरुद्ध च्या मालिके चा संघ जाहीर.

रोहित, कोहली, बुमराह, सिराज आणि शमी ह्या सगळ्याना ब्रेक दिलेला आहे.

राहुल ला कप्तान तर पंत ला उपकप्तान बनवले आहे.

डिके चा पुनरागमन आणि नवोदितांपैकी आर्षदिप आणि उमरान ला डेबू कॉल अप.

इंग्लंड विरुद्ध च्या पाचव्या टेस्ट साठी चा संघ हि जाहीर.

अपेक्षे प्रमाणे पुजारा चा कमबॅक.

इशांत, साहा आणि राहणे च्या टेस्ट करिअर वर सिलेक्टर्स नि फूल्सटॉप मारलेला दिसत आहे.

श्रेयस, कोणा भरत आणि प्रसिद्ध कृष्णा ला पहिला वाहिला ओव्हरसीस टूर सिलेक्शन.

कोणा भरत>>>

के एस भरत हा आंध्रा चा कीपर आहे.
मागे एकदा टेस्ट मधे रीप्लेसमेंट म्हणून येऊन चांगली कीपिंग केली होती. वयामुळे (आणि पंत मुळे) त्याला डेडीकेटेड स्लॉट मिळणं मुश्किल आहे, पण साहानंतर काही वर्ष तरी तो नंबर 2 कीपर म्हणून खेळवला जाऊ शकतो

रहाणे ला कमबॅक करायची इच्छा असेल तर त्यानं हॅमस्ट्रिंग बरा झाला की काउंटी खेळायला जावं (रणजी प्ले ऑफ राऊंडपेक्षा तिथे बेटर अटॅक समोर प्रॅक्टीस होईल)

Pujara has earned his comeback. वेल-डन पुजारा!

भरत ला बॅक-अप विकेटकीपर म्हणून ह्या आधी सुद्धा निवडलेलं आहे. किंबहूना बदली कीपर म्हणून त्याने एका टेस्टमधे ३-४ स्टंपिन्ग्ज / कॅचेस पण घेतले आहेत.

दोन्ही टीम्स छान आहेत. राहूलच्या कॅप्टन्सीविषयी शंका आहे. hope he proves the doubters wrong.

कोणा भरत>>>

के एस भरत हा आंध्रा चा कीपर आहे.>>>>>

हो माहिती आहे. त्याचे पूर्ण नाव कोणा श्रीकर भरत आहे म्हणून तसे लिहिले होते.

त्रिपाठी च नॉन सिलेक्शन बघून थोडं वाईट वाटलं.

गेले 2-3 सीझन तो फार चांगल्या स्ट्राईक रेट ने कंसिस्टन्टली रन्स मारत आहे.

हो माहिती आहे. त्याचे पूर्ण नाव कोणा श्रीकर भरत आहे
>>>

हा हा..
मस्त जोक झाला हा. मलाही के एस म्हणजे कोणा भरत हे माहीत नसल्याने मी सुद्धा कोणत्यातरी भरतला असा अर्थ काढलेला Happy

काल दिल्ली बाहेर पडल्याने निराश होत पंतच्या चुकांवर टिका केली खरे. पण तरीही त्याची कप्तानी आयपीएलमध्ये जज नाही करावीशी वाटत.
आयपीएलमध्ये दिल्लीचे निर्णय फार अनाकलनीय आणि झोलवाले वाटतात. ते सगळे पंतचे नसावेत असेही वाटते. कारण स्ट्रॅटेजिक टाईम आउट नंतर गोंधळ घालतात. गेल्या आयपीएलमधूनही प्लेऑफ काळात सलग २-३ सामने लास्ट ओवर फिनिशला जात बाहेर पडलेले.
त्यामुळे पंतला भारताची कप्तानी मिळेल तेव्हाच मी तरी त्याला जज करू शकेन.

पंत आणि आय्यरला लाँग टर्म ऑप्शन च्या दृष्टीनी ग्रूम करणं गरजेचं आहे... दोघांना केलं तर पुढे जाऊनही ऑप्शन्स उपलब्ध असतील... >> +१ पांड्या बॉलर म्हणून कंसिस्टंट राहिला तर त्याचेही नाव टॉपली मधे टाकता येईल.

(त्याच्या ऐवजी सकारियाला का नाही खेळवलं? > सकारियाला एकदम ऑप्शन्स ला का टाकलय देव जाणे.

“ पांड्या बॉलर म्हणून कंसिस्टंट राहिला तर त्याचेही नाव टॉपली मधे टाकता येईल.” - त्याने गुजराथ टायटन्सच्या कॅप्टन्सीमधे दाखवलेली मॅच्युरिटी कौतुकास्पद आहे.

कुणी नोटीस केलंय की नाही माहीत नाही पण अर्शदीप ची फिल्डींग खुपच below par आहे. he is a slow mover. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळायचं असेल तर त्याला फिल्डींगवर मेहनत घ्यावी लागेल.

तशीही आपल्या इतर फास्ट बॉलर्स ची फिल्डिंग यथा तथाच आहे.

बुमरा, इशांत आणि शमी सुद्द्धाही एरवी फिल्डिंग मध्ये पाट्या टाकत असतात.

गेला
बॉल थोडा थांबू लागलाय आता
क्रुशिअल पिरीअड गेममधील.. विकेट टाकायला नकोत

पांड्याने घेतलेला बटलरला. पण शमीने कॅच न घेता बॉल पायाशी का पडू दिला. थकल्यासारखा हात पुढेही करायची ताकद नाही असा विचित्र प्रकार केला

Pages