आयपीएल २०२२

Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल

आयपीएल २०२२ आली आहे हो!

२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हॉट अ गेम!! रिंकूने ऑल्मोस्ट खेचली होती. तो कॅच लुइस च्या हातात बसला आणि मॅच परत फिरली.

रिंकु सिंघ ला का घेतात असा प्रश्न असायचा माझ्या डोक्यात. अशी एखादी इनिंग खेळून जाणार असेल तर नक्कीच वर्थ आहे भाऊ. काहीच्या काही हिटींग होती. तो कॅच पण खतराच होता.

रिंकु, सुनिल, लेविस, स्टोनिस, होल्डर, आवेश खान किती जणांनी आज फिक्स करायचा प्रयत्न केला म्हणे आज ......

रसेल ११ बॉल ५ असे कुंथून गेल्यावर...
१९ बॉल ६१ ची मॅच २ बॉल ३ रन्सला आणली...
ती सुद्धा रिंकू सिंग आणि नारायणने..
आणि मग तिथून हरलेही...
मानले या आयपीएलला. फुल धम्माल चालते Happy

कॉमेंटेटर बोलतो या बॉलसाठी फिल्डींग लावली आणि तो बॉल टाकून ब्लफ करायला गेला Proud महान आहेत !
जिथे मॅच गेल्यात जमा होते तिथून बघणे सोडून द्यावे. मग उगाच मजा करतात प्रेक्षकांची असे वाटते. आवेशची ओवर सुरू होताच हे समजलेले Happy

What a match!!

स्टॉयनस चा इंटरव्हू गंमतीशीर होता आणि श्रेयसपण बऱ्यापैकी honest बोलला Happy

व्हॉटसपपोस्ट
__________

परवाच्या दिवशी दिल्लीने पंजाबचा गेम खोलला. पण मग कुलदीपची ओवर शिल्लक ठेवली आणि समोरच्यांना गेममध्ये येऊ दिले. ते ही ईतके मारत येऊ दिले. अक्षरशा राहुल चहर वगैरे मारत होता.
कालही हैदराबादने हेच केले. उमरान मलिक गेम संपवतच होता. त्याला शिल्लक ठेवले. आणि नटराजन जो यॉर्कर स्पेशालिस्ट आहे तो सलग एकसारखेच फुलटॉस टाकत सिक्स खात होता. जणू दवाने बॉल हातातून सटकतोय. आणि मग भुवी मात्र कडक ओवर टाकून बॉल काही सटकत नव्हता हे दाखवून देतो. दोन ओवर १९ हवे असताना चक्क मेडन ओवर जाते १९ वी..
आणि दोन्ही सामन्यात या टीमना रनरेटसाठी मॅच लवकर संपवायची गरज असूनही आपल्या स्ट्राईक बॉलरच्या ओवर शिल्लक ठेवल्या.
तिम्ही सामने असेच झाले. निकाल लागलाच आहे असे वाटले. तिथपर्यंत मॅच खरी होती. तिथून मात्र सामना रोचक करायचे प्रयत्न सुरू झाले असे वाटले आणि शेवटी जिंकायचे तेच जिंकले.

माझा एक प्रश्न आहे. ही अशी जर सगळी फिक्सिंगच चालते तर मग कशाला बघायच्या मॅच अन त्या विषयी इथे चर्चा करायची? Lol

बुवा हि म्हण आठवते का ? fool me once shame on you, फूल मे .... Lol

स्टॉयनस चा इंटरव्हू गंमतीशीर होता >> एकदम. परत स्टोनिस बॉलिगबद्दल जे बोलला ते एकण्यासारखे होते. .... काश सरांचे इंग्लिश चांगले असते.... Wink

“ काश सरांचे इंग्लिश चांगले असते.... Wink” - काश सरांची मेमरीपण चांगली असती Happy आयपीएलच्या सुरूवातीच्या काळात, ह्याच धाग्यावर सरांनी मला, ‘सोशल मिडीया वर आलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष’ करण्याचा सल्ला देत, ते स्वतःही तसंच करत असल्याची ग्वाही दिली होती. आजच्या व्हॉट्सअ‍ॅप ची पोस्ट (कदाचित सरांचीच असेल) बघून ती जुनी आठवण जागी झाली. Happy

>>इन ट्यून विथ द ट्यून
अरे तो वाचत नाही त्यामुळे बाऊन्सर गेला असेल!!

पण तुम्ही सगळे सारखेसारखे त्याच्या पीचवर जाउन का खेळता??

“फक्त इथे वाघिणीच्या ऐवजी गुरुदेवच पोस्टस चे दूध देत असतात” - Lol ‘यू इन द यू‘ ऐवजी सगळं ‘मी इन द मी‘ आहे. Happy

तुम्ही सगळे सारखेसारखे त्याच्या पीचवर जाउन का खेळता?? >> सुप्रा कॉन्शसच्या पातळीवर जाऊन ऑकल्ट एक्सपिरीअन्सेस घेतो.

माझा एक प्रश्न आहे. ही अशी जर सगळी फिक्सिंगच चालते तर मग कशाला बघायच्या मॅच अन त्या विषयी इथे चर्चा करायची? Lol

>>>>

सगळीच फिक्सिंग नसते हिच तर गंमत आहे Happy

तसेच फिक्सिंग असलेले सामने पाहूच नयेत वा त्यावर चर्चाच करू नये यात काही लॉजिक दिसत नाही. एखाद्या रिॲलिटी शो मध्ये काही कांड घडले आणि आपल्याला ते स्क्रिप्टेड वाटले तरी आपण ते बघतो आणि त्यावर चर्चा करतोच ना... कारण काही गोष्टी स्क्रिप्टेड असल्या तरी त्यात भाग घेणारे स्पर्धक जे त्यांची कलाकारी आपल्याला दाखवतात ती आपण एंजॉयही करतो. याचसाठी जे जेन्युईन वाटते त्याचे मी तसेच कौतुकही करतोच. पण स्क्रिप्टेड सामन्यातील हिरोंचे ऊगाच कौतुक करणे मला पटत नाही. हा मला जेन्युईन कामगिरी करत चमकलेल्यांवर अन्याय वाटतो Sad

“ सुप्रा कॉन्शसच्या पातळीवर जाऊन ऑकल्ट एक्सपिरीअन्सेस घेतो.” नि ‘मी इन द मी‘ हे १२० मीटर पलीकडचे सिक्सेस आहेत. Wink भा, 'एकदा या घरी, दाखवतो' असे आमंत्रण मिळेल रे;)

पण तुम्ही सगळे सारखेसारखे त्याच्या पीचवर जाउन का खेळता?? >> स्वरुप अशाने माबोवर येणेच बंद करावे लागले Lol

"'एकदा या घरी, दाखवतो' असे आमंत्रण मिळेल रे" - Lol

"अशाने माबोवर येणेच बंद करावे लागले" - हे खरंय. "सर्वमावृत्य तिष्ठति" अशी परिस्थिती आहे मायबोलीवर गुरूदेवांची. Happy

आफ्रिकेच्या दौर्‍यासाठी हार्दिक ऐवजी अनुभव म्हणून धवन ला प्रेफर केले जाईल अशा बातम्या वाचल्या. धवन सध्या फॉर्ममधे आहे. (तसा तो नेहमीच असतो - फार जबरदस्त न करता अबॉव्ह अ‍ॅव्हरेज असतो असे वाटते) पण प्रश्न असा आहे कि, आपण लाँग टर्म ओपनर म्हणून त्याला बघतो आहेत का ? रोहित, राहुल २-३-४ वर्षे तरी कुठे जात नाहीत, शॉ, सॅमसन पाठी तयार आहेत. नुकतेच अय्यर नि मयांकला वापरले आहे. त्यापुढे जाऊन कप्तान म्हणून धवन कडे कोण का बघते आहे ? रोहित नंतर राहुल, पंत हे सध्या ईयर मार्क झालेले आहेत. त्या पलिकडे बघायचेच असेल तर अय्यर किंवा हार्दिक हे जास्त चांगले पर्याय नाही का होणार ?

दोन वर्षे कप्तान रोहीत राहतो. त्यानंतर अय्यर पंत हार्दिक गेला बाजार राहुल वगैरे जे पर्याय आहेत त्यांच्यात आधीच ईर्ष्या मत्सर चढाओढीचे राजकारण सुरू होऊ नये म्हणून धवन हा सेफ गेम आहे. जसे बुमराहलाही उपकर्णधार केले गेले ते याचसाठी असे वाटते. दोन वर्षांनी तेव्हाच्या परीस्थितीचे आकलन करत कोणाला तरी पुढे घेतील. तसेही आयपीएलमुळे या सर्वांनाच कॅप्टनशिपची संधी सराव मिळतच आहे.

त्यानंतर अय्यर पंत हार्दिक गेला बाजार राहुल वगैरे जे पर्याय आहेत त्यांच्यात आधीच ईर्ष्या मत्सर चढाओढीचे राजकारण सुरू होऊ नये म्हणून धवन हा सेफ गेम आहे >> हे ईर्ष्या मत्सर वगैरे बाजूला ठेवूया. पण धवन मूळात संघात असेल ह्याची शाश्वती नसताना त्याला पर्यायी कर्णधार करणे गम्मतशीर वाटते.
बुमरा रोहित बरोबर रीटायर होईल असे नाही त्यामूळे त्याला उपकर्णधार केल्याने त्याच्याकडॅ भावी कर्णधार हा संदेश दिला गेला असेल तर बाकीच्यांमधे चढाओढ कशाला होईल ?
माझ्या आठवणीनुसार राहुल, पंत कुठल्या ना कुठल्या सिरीज मधे कप्तान होतेच. म्हणजे चाचपणी सुरू आहे हा ही संदेश आधीच दिला गेला आहे. त्या अनुषंगाने जे काही अँगल असणार आहेत ते आधीच प्ले मधे असणार.

बुमराहला उपकर्णधारपद दिले तरी तो कर्णधारपदाच्या शर्यतीत नाहीये. म्हणजे निवडसमिती तसा विचार करत नसेल. जरी तो तिन्ही फॉर्मेट प्लेअर असला तरीही. त्यामुळे तो सेफ गेमच आहे.
शर्माने कप्तानीची सूत्रे हातात घेण्याआधी आफ्रिकेला सिनिअरटीनुसार राहुलला कर्णधार केलेले खरे. निकाल ०-३ असा लागला. त्याचवेळी पंत आणि अय्यर स्वत:लाही भविष्यातील कर्णधार म्हणून बघत असतील हे जशी चर्चा चालते त्यावरून समजते.
आयपीएल दिल्ली कर्णधारपदावरून निर्माण झालेली अय्यर पंत मधील नाराजगी उघड्या डोळ्यांनी दिसते. अश्यात त्यापैकी कोणाला तू आमचा पहिला ऑप्शन आहेस असा सिग्नल द्यायचा नसेल. तेच हार्दिकबाबत. आधी जागा फिक्स करा संघातील. मग तुमचा विचार करतो. उगाच लाड नाही करणार.

येते २०-२० आणि वन डे वर्ल्डकप जर शर्माकडे कप्तानी राहणार असेल तर कोणाला कप्तान म्हणून ईतक्यात तयार करायचीही काही घाई नाही. किंबहुना ते टाळणेच ऊत्तम हे मला सेन्सिबल वाटते.

बुमराहला उपकर्णधारपद दिले तरी तो कर्णधारपदाच्या शर्यतीत नाहीये. म्हणजे निवडसमिती तसा विचार करत नसेल. जरी तो तिन्ही फॉर्मेट प्लेअर असला तरीही. त्यामुळे तो सेफ गेमच आहे. >> हा तुझा अंदाज आहे ना ? त्याला उपकर्णधार का करतील ? अय्यर टेस्ट टीम मधे असेल कि नाही हे माहित नाही तर तो कर्णधार म्हणून थेट पंत शी स्पर्धा का करेल ? (आयपील ची गोष्ट वेगळी आहे)

बुमराह होता ना मध्यंतरी व्हाईस कॅप्टन. त्याचे म्हणतोय मी.

बाकी तिन्ही फॉर्मेट कॉमन विचार न करता रेड बॉल व्हाईट बॉल वेगळा कर्णधार करू शकतात. आजवर केले नाही पण अतिक्रिकेट पाहता जर सोयीचे असेल तर ते करू शकतात. एकच प्लेअर तिन्ही फॉर्मेट कप्तान असेल तर त्याला सातत्याने खेळणे अवघड जाते. उदाहरणार्थ रहाणे टेस्ट कप्तान असता तर विश्रांतीची गरज न भासता सारे सामने खेळले असता. ॲक्चुअली जर रहाणेने संघात जागा टिकण्याईतपत फॉर्म दाखवला असता तर कदाचित तो निवृत्तीपर्यंत कर्णधार म्हणून खेळला असता. आणि शर्माने लिमिटेड क्रिकेट सांभाळले असते.

बाकी अय्यरप्रमाणेच पंतही कुठे ईतक्या खात्रीपूर्वक फिक्स आहे तिन्ही फॉर्मेटला. राहुलला सुद्धा कीपर म्हणून खेळवू शकतो ही तलवार आजही आहे त्याच्या डोक्यावर. त्यात संजू, ईशान, आणि आता तो डीके. मजबूत स्पर्धा आहे. तो पहिला किपर म्हणून कन्फर्म झाल्याशिवाय त्याला कर्णधार करून ती जागा अडवणारही नाहीत.

Pages