आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं..ह्या अभिषेक ला का उगीच वि बा सं मध्ये दाखवताहेत..? तो तर फार चांगला सज्जन आहे ना...?
काहीतरी ताणायची कथा..
गौरी एकीकडे म्हणतेय मला हे लग्न हवे आहे..आणि म्हणते की ही संधी ही सोडायची नाही....
कसे रानोमाळ लॉजिक गंडलेले संवाद!!

दोन तीन वर्षे परदेशात काम करून नंतर लग्न करायला काही हरकत नसावी.
अभिषेकचं आणि तिचं वय फार नसणार. अरुंधती ४६-४७ ची म्हणजे हा २३-२४. उलट आताच्या मानाने लग्नाला लहानच आहे.

कोणीतरी पाणी मागितल्यावर अनघा खुर्चीतून पटकन उठून चालायला लागली आणि तिला चक्कर आली. किती ओढून ताणून घुसवतात प्रसंग.

एकाचवेळी अप्पांचा डिमेन्शिया आणि आशुतोषचा वाढदिवस. अरुंधतीला एकावेळी दोन दोन बाळांचं बघायचंय.

कालचे संजनाचे अनिरुद्धला उद्देशून म्हटलेले संवाद छान होते. तिला अनेकदा चांगले संवाद असतात. प्रॅक्टिकल, आरसा दाखवणारे.

आप्पांसाठी फॅमिली ट्री बनवून लावणार होते, त्याचं काय झालं? काल त्यांनी संजनाला तू कोण म्हणून विचारलं. आणि कांचनने सांगितल्यावर त्यांना लगेच पटलं सुद्धा. असं होत नाही. डॉक्टरकडे नेलं ते दाखवलं का? डिमेन्शिया, अल्झायमर्स बरे करता येत नाहीत. त्यांची प्रोसेस संथ करता येते.

कांचनने अरुंधतीला "मला तुझा आधार वाटतो," असं सांगून बोलावलंय. आता अरुंधतीने मी आशुतोषशी जुळवलंय म्हटल्यावर तिला पुन्हा एकदा कितव्यांदातरी घराबहेर हाकलेल. अनिरुद्धतर प्रेशर कुकरचा सेफ्टी व्हॉल्व उडावा तसा फुटेल.

आशुतोषच्या बाबतीत अख्ख्या गावाने समजवल्यावर अरुंधती एकदाची तयार झाली. पण तिला आशुतोषबद्दल 'प्रेम' आहे, असं दिसत नाही. दोघांना एक मेकांची काळजी वाटते. पण प्रेम?

आशुतोष रोज सकाळी अरुंधतीच्या दारात हजर होतो. डेली पिक अप सर्व्हिस. लग्न करून एका घरात राहिल्यावर बिचार्‍याला प्रश्न पडेल, आता कुठे जायचं?

रुंधतीला एकावेळी दोन दोन बाळांचं बघायचंय.>> अनघाचे डोहा ळे जेवण पन आहे तीन तीन बाळे विसरू नका. खरे तर अनघाला माहेरी पाठवून द्यावे. दोन फुल टाइम मेड ठेवाव्या एक कुक व एक वर कामाला घरकामाला, अप्पाला एक नर्स तर होण्यासारखे आहे आजी ने थोडे स्वतःचे स्वतःकरावे . मुंब ईत हिच्याहुन बरीच म्हातारी, आजारी बायका माणसे डबा लावुन जगत असतात. मी एकदा पेट स्कॅनला गेले होते तर बरोबर एक बाई होती ती ही एकटीच आलेली होती. ६३ वय व जुन्याकाळातील बायकर फोटो ग्राफर होती. म्हातार्‍या आत्या बरोबर ८० वयाच्या राहात होती व तक्रार करत होती की नीट जेवले जात नाही. डबा काय येइल तो मला जात नाही. आणि इथे आजीला हपा सोबत लागते. ते ही एक बाळच आहे.

हो. सगळ्यात मोठं किरकिरं बाळ.
अरुंधती चार बाळं सांभाळून घरातली भांडणं सोडवत , सगळ्यांसाठी स्वैपाक करत तिचं कॉलेज करणार आणि म्युझिक स्कूलपण सांभाळणार आहे.

अरुंधती चार बाळं सांभाळून घरातली भांडणं सोडवत , सगळ्यांसाठी स्वैपाक करत तिचं कॉलेज करणार आणि म्युझिक स्कूलपण सांभाळणार आहे.>> नोकरी पण आणि बाहेरची कॉण्सर्ट पण. पर उससे भी आगेकी बात वो तो शादी करने वाली है व हे तेलकटाला आधी न सांगता सासरच्यांना सांगत आहे. तेलकटाला तेल कमी म्हणून आई डोक्यात अजून तेल जिरवत आहे.

तेलकट !! Lol
खरेच.. ते एकमेकांच्या प्रेमात काही केल्या वाटत नाहीत.. अरुंधती ला कदाचित गिल्ट वाटत असावा..पण तेलकट ही अजिबात प्रेमात वाटत नाही.....दरवेळी अगदी शहाण्या मित्रासारखी तिला सवलत देत असतो फक्त! आली तर ये, उशीरा ये... तू नुसतं बघून ठेव....!!

अरुंधती ला ३६ तासांचा दिवस मिळालाय बहुतेक! अदरवाईज इतके शक्य नाही.....
आणि तेही प्रत्येक ठिकाणी क्वालीटी मेंटेन करत...!

हाय सध्या चहा पिताना आई व वॉक करुन आल्यावर अनुपमा असे जमते आहे. तर अनुपमा मध्ये लेकीच्या पळून जाउन लग्नाची फारच कटकट झाली म्हणून अनु व तिचा नवरा कुठेतरी सोमनाथला जायचे ठरवतात. मध्येच त्यालेकीला कुठेतरी समर कँप मध्ये सोडून येतात. तिथे रडारड.
मग हे शॉर्ट कट म्हणून आ डरस्त्याने जाताना काही लोक्स त्याम्ना त्रास देतात. पुढे एक घरातून पळालेले तरुण कपल भेटते त्यांना लिफ्ट देतात. ती मुलगी गोड पंजाबी. व मग त्यांना बस स्टेशन परेन्त नेउन सोडायचे सोडून धाब्यावर खातात ती मुलगी १००% पंजू पणा दर वाक्यात. व तेच त्रासदायक लोग त्यांनाअ पाठलाग करून अनु पती ह्यांना मारतात व मुलीवर रेप. आज त्या मुलीला बघून अनु इतकी ओवर अ‍ॅक्टिन्ग करुन आरडा ओरडा करते. की वैताग.

मग हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट करून जावे ना तर आजही तिथे च आहेत. उगीच टीपी. ती नटी पैसे मिळ तात ते वसूल द्यायच्या नादात फारच अ‍ॅक्टिग करत असते. लाउड.

तेलकट, बालिश आहे आशु. उपकरांच्या ओझ्याखाली अरु हो म्हणत असावी. थोडे दिवस आली आहे तर कशाला पूजा वगैरे करून अपेक्षा वाढवायच्या ?

आज नुसताच टाइमपास. अरुंधतीच्या मनातलं द्वंद्व. दोन अरुंधती एकमेकींशी बोलताहेत. so cliched

संजनाचे कालचे संवादही चांगले होते. तिने आता तिच्या पहिल्या नवर्‍याकडे परत जावं. अनिरुद्धने ज्या कारणासाठी अरुंधतीला सोडलं किंवा हिला जवळ केलं तेच तिचंही कारण होतं. तिनेही अनिरुद्धला थोडंफा वापरलंच. आता अनिरुद्धसोबत राहून त्यातला फोलपणा कळला असेल.

सेलिब्रेशन म्हटलं की पोरकटपणा करायलाच पाहिजे का यांना?

आणि तेल मालिशसुद्धा clichéd आहे.

आता मालिकेत आशुतोषची मैत्रीण येते आहे. स्वरांगी मराठे ही अभिनेत्री. काल प्रोमोत दाखवलं.
अरुंधतीने देशमुखांकडे आधी अनाउन्स केलं आणि आशुतोषला सांगायचं राहिलं तर तिचा धोबी का कुत्ता, तेल गेलं तूप गेलं असं होणार

काय बावळट आहे अरु, अख्खा दिवस घरी बसून काढला , आता आशुची नवीन मैत्रीण आली, अनिरुद्धचं म्हणणं खरं करायला.

हिंदी मध्ये गौरी यश लग्न झालेले दाखवले आहे का ❓>>> नाही. ती गेली पण कधीच त्याला सोडून.>>>
ती सोडून गेली कारण ते काम करणार्‍या अभिनेत्रीने सीरियल सोडली आणि ती सत्संग करायला निघून गेली! आता हे मराठीत बघूया काय करताय ते?

संजना - रूपाली हॉस्पिटलमध्ये आहे अशी बात मी वाचली. कसलं तरी ऑपरेशन.
ती अगदी अरुंधतीच्या पावलावर पाऊल ठेवून चालली आहे

आशुतोषने शाळेतल्या मित्रांशी अजून संपर्क कायम ठेवला आहे असं सुलेखाताई फेकत होत्या. आशुतोषला त्याच्या शाळूमित्राला ओळखता आलं नाही. हा कॉलेज करून अम्रिकेला गेला तो काय आताच आला का?
मुलींवरून केलेले जोक्स लेम होते. तेलू आणि अरू लग्नाला तयार झाले तर विघ्न आलं. उगाच चारपाच एपिसोड ताणतील.

अरुंधती लग्न करतेय हे कळताच अप्पाचं डोकं व्यवस्थित झालं.

मला वाटतं विघ्नाच नाव वीणा आहे, मध्यंतरी फार वीणा वीणा चालल होत केळकर महालात. बाकी अप्पांना त्यांच्या विस्मरणाच विस्मरण झालंय हे निरीक्षण अचुक! संजनाचा मागचा केळकर ऑफिस मधला इतिहास बघता तिचे काल उत्साहाने वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जाणे अतर्क्य वाटले.

बाकी आजकाल कुणीच अपडेट टाकत नाही इथे. असं करु नका लोक्स इथले धमाल अपडेटस वाचुन मी ही सिरियल बघायला लागले. 'आई कुठे काय करते' ही सिरियल नाही कल्ट आहे एकदा त्यात शिरलं की बाहेर निघणे अशक्य! अरु ला अजून बरंच काही म्हणजे पीएचडी पर्यंत शिक्षण, गाण्यातील प्राविण्यासाठी पद्मश्री, स्त्रीयांच्या उद्धारासाठी भारतरत्न, इ मिळवायचे असल्याने तिचा प्रवास आणि आपलं तो बघणं हे अनंतापर्यंत सुरू रहाणार!

असं नाही ये अजीबात तुमचे अपडेट वाचणं हा आता माझ्या दिनक्रमाचा आवश्यक भाग झाला आहे. प्लीज प्लीज प्लीज अपडेटस टाकत जा

सगळ्या सिरियल्स अशाच कल्ट असतात. (प्रेझेंटेशन अगदीच वाईट - माझ्या नवर्‍याची बायको स्टँडर्डचं नसेल तर) म्हणूनच मागे मी सगळी मराठी चॅनेल्स टाटा स्कायवरून काढून टाकली होती.
एके रविवारी झी वरची दीपा परबची (मानबा- आकुकाक ची वेगळी आवृत्ती - विदाउट विबासं + खाष्ट नणंद) मालिका पाहिल्यावर तिचं पुढे काय
होतंय ही उत्सुकता लागून राहिली. तीही साडेसातलाच असते, त्यामुळे नाही पाहता येत.

अमा अस अजिबात नाहिये, तुमचे अपडेट भारी असतात , लिहित जा की.
अरुधती फेस्टीव्ह जरिची साडी अबाडा मधे बोजड दिसते आणि आशुपेक्षा अजुनच वयस्कर वाटते, सन्जनाची साडी मस्त आहे पण कानातले काहितरीच होते, मोठे मोठे बत्तासे घातल्यासारख.
कसहि करुन अरुला परत परत सम्रुद्धी बन्गल्यात आणायच्या क्लुप्त्या आता केविलवाण्या वाटायला लागल्यात. अभिला अनघाने लग्नात घास भरवताना बहुधा कारल्याची भाजी खाऊ घातली वाटत, सतत कडु चेहरा घेवुन फिरत असतो.
आशु-अरु मधे काहीही प्रेम्,जिव्हाळा वाटतच नाही, अरुच्या नजरेत जेवढ प्रेम आइ काचन बद्दल आहे त्याच्या एक टक्काही प्रेम आशु बद्दल दिसत नाही, अरु आइच्या भुमिकेत इतकी शिरलिये की आशुकडेही ती मुलाच्या मायेने बघतेय असच वाटत अर्थात आशु बाळ वागतोयही तसाच.
बर्थडे बॉयला द्यायलाही याना बरा सुट मिळु नये, आत लुज टिशर्ट वर टाइट ब्लेझर.

भरत Lol
आशुतोषने शाळेतल्या मित्रांशी अजून संपर्क कायम ठेवला आहे असं सुलेखाताई फेकत होत्या...
खरेच! किती पिळावे!
अति बोअर करायलेत

बाकी आजकाल कुणीच अपडेट टाकत नाही इथे>> वोक पब्लिकला आव्डत नाहीत अपडेट. म्हणून सोडुन दिले.

नवीन Submitted by अश्विनीमामी on 29 November, 2022 - 07:28>>>
अहो अमा, इथले अपडेटस वाचायला मी रोज माबोवर चक्कर मारतो...

अमा, वोक हा शब्द मला उद्देशून (उपरोधाने) लिहिलेला असेल तर मला हे आवडलेलं नाही.
मी बॉडी शेमिंगबद्दल लिहिलं होतं. त्यानंतर तुम्ही तुमची पोस्ट काढलीत. मग मीही माझी पोस्ट काढली. माझ्या दृष्टीने विषय संपला.
तुम्ही या मालिकेवर जे लिहायचात ते मलाही आवडत होतंच. मी वेळोवेळी तसे प्रतिसादही दिलेले आहेत.

(मला उद्देशून लिहिलेलं नसेल तर क्षमस्व)

अमा, मी पण रोज फिरायच्या विश्रांती मध्ये मायबोली खास तुमच्यासाठी वाचत होतो.
आता काय मजा नाही येत.
कृपया रोज साले काढत जा आकुकाक ची.

Pages