आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण त्या अभिला निदान एक सीन मिळाला. एरव्ही प्रतिक्रियांशिवाय काही हाती लागत नसेल. गरजेपेक्षा खूप पात्रे भरली आहेत स्क्रिप्ट मधे. >>>> त्यानेही मालिकेमधे बरेच भाग खाल्लेत…. त्याचे अंकीता बरोबर प्रेम, साखरपुडा, मग तिच्याशी लग्न न होणे. मग अनघाशी मैत्री, मग अनघाशी लग्न करायच्या दिवशी पळून जाऊन अंकिताशी लग्न. मग त्यांचा कचाकचा भांडत संसार, मग काडीमोड मग परत अनघाच्या प्रेमात.

शुभ प्रभातः

अरु विश्वमातेचा अवतार घेउन यश लाडोबाला उगी उगी करत आहे. गौरी व यश चे भांड ण डब्यातून वर आले. ते दूर दूर जात आहेत व गौरी आता वैतागली आहे तिला अमेरिकेची एक जॉब ऑफर आलेली आहे. तिला सारखे संजनाला नावे ठेवणे पटत नाही. शी इज फेड अप. आई घर सोडून गेल्या व सगळे बदलले आहे. यश लगेच आजी म्हणतच होती गौरीत संजनाचे काही गूण नाहीत ना. गौरी वाकड तोंडाने ओरडत एंगेज मेंट मोडा यच्या लेव्हल ला आलेली आहे. देअर रिलेशन शिप इज रिअली नॉट गोइन्ग एनीव्हेअर.

यश ने उन्हाळ्यात घरात हुडी घातलेला आहे. पण हे मुलांचे भांडण असल्याने बासरीवाला कामाला लावला आहे. उसासे क्वीन ती कायमची लांब जाईल असे मला वाटत नाही असे अशुअरन्स देत आहे. पण मुले प्रॅक्टिकल आहेत नशीबाने. जे आहे ते तसेच बघत आहेत. बासरी उच्चंकाला पोहोचली आहे.

उसासे क्वीन उशीरा उठलेली आहे व तिची आवरायची लगबग चालू आहे. गडब डीत शिरा करणार आहे. आशूतोस कधी पण येइल म्हणून ती गडबडली आहे. इकडे आशु तोष पण उशीरा उठतो व भयान क घाईने आवरून कार मध्ये बसून फार हाय स्पीडने अरु ला पिक अप करायला जात आहे मध्येच अपघात सदृशय काही तरी घडले आहे .

अभीला आजी पिडते व तो आधीच वैतागलेला आहे. आता खंग्री मॅन पण चहा पाव खाउन डबे वाजवायला बसला आहे. वेगळे राहायचे प्रपोजल सर्वांसमोर आले आहे. अन्या म्हणतो अरे कशाला एक दोन बेडरुमा जास्तीच्या बांधून घेउ. वेगळे व्हायचे नाट्य चालू आहे. सर्व प्रतिक्रिया देतात व नको नको म्हणतात संजना मनातून सुखावली आहे.

अगदी सकाळी चहा घ्यायच्या वेळेस मजबूत भांडण काढले आहे अनघाने. काउन्सेलर आहे ना इतके पण कळत नाही का. की टाइम ठरवून फॅमिली मीटिन्ग घ्यावी.

अगदी बालीश पणे भर रस्त्यात डोळे मिटून अरू वेळ मोजत आहे इथे कार क्रॅश होते कि काय!! ओ मा!!!!
जुनाच क्रायसि स संगीताचा पीस टाकलाय. दोन मिनिटे आशू व ड्रायव्हर प्रकाश ब्लँक झाले आहेत . पण पोहोच तात. आशू सॉरी म्हणतो. अरु नकळत प्रेशर टाकते तुम्ही कधी उशीर कर त नाही. जीवन क्ष ण भंगूर आहे असे आशू चे पुस्तकी संवाद आहेत. १९७० च्या दशाकातील दिवा ळी अंकात अश्या कथा असत. ह्याला जीवन ऐसे नाव. एक क्ष णाचा डाव. टाइप.

इकडे वेगळे व्हायचे मला अभी नाट्य पुढे चालू आहे. त्याला प्रयवसी हवी असेल हे कोणी समजत नाही. आजी त्याची काय गरज म्हण्ते. पण भावनिक ब्लॅक मेल करत आहे.

अप्पा मध्ये पडुन तुम्ही तुमचा निर्णय घ्या म्हणूण सांगतात. अनघा रडकुंडीला येउन मला नाही जायचे. म्हण्ते. अभी फर्म आहे पण
अप्पा तुम्ही काय ते ठरवा व आम्हाला भेटायला येत जा म्हणतात. इथे राहिले तर अनघाची दुसरी अरु होईल असे संजना म्हणते. अन्या वैतागतो. व तिला गप्प करतो.
प्रोमो मध्ये: आशू अरू एका बागेत आहेत. व आशू तिला आय लव्ह यू म्हणतो. ती आनंदात जगावे म्हण्ते.

काल वेळ होता म्हणून मी अनुपमा चा ले टेस्ट भाग बघितला. अजून साखरपुडाच चालू आहे. सार्खे गात नाचत आहेत. व भयंकर लाउड. पण अनुपमाची साडी व अनुज चा ड्रेस फार छान आहेत. अनुपमाचा ज्वेलरी सेट बिंदी पण फारच सुरेख आहे नक्की बघा.

पण स्री मॉइ ओरिजिनल सिरीअल फार फार वरच्या दर्जाची आहे. ते घर व इंद्रानी हलदार अ‍ॅक्टिन्ग एकदम फर्स्ट क्लास. आता ते वॉच चालू केले आहे.

काल स्टार प्रवाह वरच्या गाण्यांच्या कार्यक्रमात समीर धर्माधिकारी पाहुणा होता. तो आयुष्याचे टक्के टोणपे खाल्लेला कणखर माणूस वाटत होता. शिवाय उंचीही भरपूर. तरुणपणी होता तितका चार्मिंग अर्थातच नाही वाटला.
इथे आशुतोषचं कॅरॅक्टर मॅनचाइल्डचं आहे. आणि ओंकार गोवर्धन तसंच रंगवतोय. तो अरुंधतीचा तिसरा मुलगा होईल आणि नितीन आणि सुलेखाच्या बरोबरीने अरुंधती त्याची पालक होईल.

गौरीचे पालक अमेरिकेत असतात ना ? तिला तिथे संधी मिळाली की पुन्हा येणे कठीण आहे, यशाची भीती बरोबर आहे.
कोणताही नॉर्मल मुलगी देशमुख फॅमिली, संजना, अरू, आशू मॅटर बघून पळूनच गेली असती.

पण कळणार कसं ??? Subtitles आहेत का??>> गरज पडत नाही. मी तर श्रीमोईच्या प्रेमात आहे. एका भरल्या व उच्च क्लास मधील घरात एक व् व्यक्तिमत्व असे पूर्ण खलास होत जाताना बघणे फार भीतिदायक आहे. अखंड भारतीय सासूमोगलाई विरुद्ध सून राष्ट्र असा सामना असल्याने सर्व समजते व ती फार छान छान छान अ‍ॅक्टिन्ग करते. नॅशनल अ‍ॅवार्ड मिळालेली अभिनेत्री आहे. काय ते केस डोळे ह्यांची संजना म्हणजे जून आंटी. ही पण फार पॉश लेडी आहे. नवरा सी आर पी एफ कमांडंट वाटतो व फार बृटल आहे. सासू एकदम पैसा वसूल खडूस आहे. सासरा एकदम भद्र लोक शोभा डेच्या पती सारखा दिसतो. इथली विमल म्हणजे मिठूदी एकदम सय्यद बंडा आहे. त्यामनाने ही छोटीशी दिसते.

देव दास मधील ऐश्वर्या गृहिणी झाली असत्ती खरी तर तसा बाज आहे. पण हिचे डोळे अधिक सुरेख आहेत.

शुभ प्रभात इद मुबारक.

आज तेच वेळ काढू प्रकरण चालू आहे. आशू बागेत बसून शिरा खातो डब्यातून. किती गोड इनोसंट आहे मी टाइप व अरु ला तेच तेच परत सांगतो जीवनात सर्व ह्यच क्षणी सांगितले पाहिजे केले पाहिजे व गैरे व आय लव्ह यू म्हणायच्या बेतात असतो तर अनघा नेमकी फोन करते. व तो फोन अभि कट कर तओ. ते प्रेम व्यक्त कराय्चा सीन बघा. म प्रेमी काय भयानक तेलकट दिसतो. तो चेहरा अगदी बघवत नाही. व फाफट प्सार्‍यात काय ते बोलतच नाही. अरू लगेच चला चला करते. आता आश्रमात जातात का घरी परत ते बघितले पाहिजे.

व मग अभी अनघा बेस्ट भांडाण चालूच आहे चालूच आहे.

अप्पा संजनाशी गोड वागून तिला नांदवत आहेत. अवी पण नोटीस करतो आहे. आजी यश दुरून बघतात. पण प्रोमो मध्ये पोस्टाने डिवोर्स ची नोटीस येते. आत्ता ग ं बया.

आजकाल आप्पा संजनावर एवढे का फिदा दाखवले आहेत कळत नाही. त्यांनी इग्नोर केलं असतं तर जास्त effective वाटलं असतं
अभी एकदम वैतागला आहे, बरोबर आहे.लग्न झाल्यावर हनिमूनला पण नाही गेला आणि बायको रांधा, वाढा, उष्टी काढा मध्ये रमली आहे.त्याला बायको बरोबर थोडा वेळ नक्कीच पाहिजे. आई बापाची लफडी बघून त्याचा जीव कावला आहे. यशचा मोठा गेम होणार आहे.आशुला एक नवीन आई मिळणार वाटत.

आशुबाळ आणि अरुमावशी यांनी प्रेम व्यक्त करावं म्हणून नितीनच्या बायकोला व्हेंटिलेटरवर ठेवलं. मग गाडी समोर धूर सोडला. त्यानिमित्ताने आशुतोषचा ड्रायव्हर दिसला. नाहीतर तो कायम अदृश्य असे.

आजीच्या वाढदिवसानंतर मालिका भराभर पुढे सरकतेय. तेही वेगवेगळे ट्रॅक्स - अनिरुद्ध संजना डायव्होर्स, आशुतोष इजहार, अभिषेक घर सोडणार आणि गौरी देश सोडणार.

आशेने कधीकाळी कुणाचा accident करून ठेवलाय का? अनुपमा मधे तसंच काहीतरी होतं ना? तसा ट्रॅजिक पास्ट असल्याशिवाय हिरोईनला पुळका कसा येणार आणि पुळका नाही आला तर ती प्रेमात कशी पडणार ना?
अनुज तर तिकडे अनुपमाचा तिसरा मुलगा असल्यासारखाच वागतो. आणि वाटतो पण.

लग्न झाले का? काल रूपाली गांगुलीने एनी बडी अवेक असे ट्वीट केले होते तर तिला जग भरातील लोकांनी प्रेमाने उत्तरे दिलेली.

श्रिमोईत आशूच्या जागी रोहित आहे व एकदम बेस्ट आहे. वयाने बरोब्बर वाटतो व वागणे पण एकद्म पॉलिश्ड.

लग्न झाले का? काल रूपाली गांगुलीने एनी बडी अवेक असे ट्वीट केले होते तर तिला जग भरातील लोकांनी प्रेमाने उत्तरे दिलेली.

श्रिमोईत आशूच्या जागी रोहित आहे व एकदम बेस्ट आहे. वयाने बरोब्बर वाटतो व वागणे पण एकद्म पॉलिश्ड.

शुभ प्रभात.

मेजर डिस्कशन ऑन गौरी डिसिजन ती अमेरिकेला जाते आहे. कांचन ला सर्व समजावून सांगतात. तितक्यात एक कुरीअर येते त्यात डिवोर्स नोटीस आहे.

इकडे एक कंप्लीटली ओढून ताणून आणलेला आरूची पर्स चोरायचा प्रसंग आहे. फारच पीळ आहे. अरु लगेच चोर मुलांना पकडते व मेजर लेक्चर देते. पुल साने गुरुजी संस्कार व्यायाम ( घरबसल्या जेनांना जे वाटत असते ते सर्व सु अरू बोलून दाख्वते. चोरांना आशू च्या पाया पडायला लावते.
ओडून ताणून विनोद. टी पी काय ही आजकालची पिडी मोड ऑन .
आता हे परत समुरुद्धीत जातात का आश्रमात कामाला हे कळत नाही.

पण कार मध्ये प्यार का इजहार करतो आशू. हसत हसत यु आर टू क्युट आय लव्ह यू म्हण तो . आड ये णार नाही म्हणत म्हणत हा मॅन आत आत येत आहे. अरु चे भवि श्य सेक्युअरच आहे. इथे भाग संपला.

पुढील भागात संजना आत्महत्येचा प्रयत्न करते. हे अरु आशू तिच्या घरातून फोन वर ऐकतात.

मी अजून एक दोन भाग मागे आहे. ते "१ टिकटिक, २ टिकटिक.." काय बोअर प्रकरण होते. नशीब दहाच्या दहा आकडे म्हणताना दाखवले नाही. अमा - तुम्ही वर लिहीले ते "अपघात सदृश्य" नक्की काय होते? मधे मोठा धूर महापालिकेचा माणूस डासांकरता मारत असल्यासारखा व दोन्ही बाजूला दोन कार्स थांबलेल्या. त्यातून आशूला एकदम जीवनविषयक तत्त्वज्ञान समजते. फ्रेण्ड्स मधे कार बॅकफायर झाल्यावर रॉसला समजते तसे.

नंतर तो अभि सोडून जाणार म्हंटल्यावर एकदम बालनाट्य सीन आला. म्हणजे जंगलात सगळे प्राणी गुण्यागोविंदाने राहात असतात. मग हरीण म्हणजे मला इथे नाही राहायचे. तेव्हा सिंह म्हणतो माझ्या गुहेत राहा, मी दुसरीकडे राहीन. माकड म्हणजे माझ्या झाडावर राहा, मी काहीतरी करीन. हत्ती म्हणतो..... हे जितक्या बाळबोधपणे चालते ते अभि घर सोडून जातो म्हंटल्यावर आधीच उपस्थितांपैकी एकेक "तुम्ही माझ्या खोलीत राहा" च्या व्हर्जन्स ऐकवते.

काउन्सेलर आहे ना इतके पण कळत नाही का. की टाइम ठरवून फॅमिली मीटिन्ग घ्यावी. >>> टोटली. काउन्सेलर अफाट आहे! एकदम चिंगारी कोई भडके गाण्यांमधल्या विविध उपमांसारखा सीन. काउन्सेलरनेच भांडण काढले.

"अपघात सदृश्य" नक्की काय होते? मधे मोठा धूर महापालिकेचा माणूस डासांकरता मारत असल्यासारखा व दोन्ही बाजूला दोन कार्स थांबलेल्या>> हो फक्त जास्तीचा धूर झालेला आणि कदाचित जोरात ब्रेक दाबलेला. पण कायेना आशूला जीवनात इतक्या पण धक्क्याची सवय नाही. बाल बुद्धी
आहे तो. म्हणून तसं झालेल. आता बोललेची पाहिजे अशी घटिका कशी आणायची म्हणून तो सीन होता बहुतेक.

आज प्रकाश डायवराचे पोट बिघडलेले आहे तर तो रेस्ट रूम जी ब बागेत आत आहे तिथे जाउन तो येइपेर्न्त हे टपरी चहा घेतात. पन ही बाई मुळात तिची दीड रुपया असलेली पर्स ठेवलेली पिशवी गाडीत कशी काय ठेवते?! तिचे लेक्चर तर लैच विनोदी आहे.

श्रीमोईतले अपमान पण जरा उच्च दर्जाचे आहेत. एका भागात जून आंटी मी तर लग्न केले आहे तो तर रोहित ची एस्कॉर्ट सर्विस मधली बाई आहेस. म्हटल्यावर श्रीमोई तिला मस्त थोबाडीत देते दोनदा. व डोमेस्टिक व्हायलन्स अंतर्गत घरी पोलिस बोलावल्यावर त्यांच्या समोर इतके आत आतले अपमानाचे पदर दिसतात की पोलिस निघून जातात तुमचा प्रावेट प्रश्न तुमीच सोडवा म्हणून. नवरा कायम श्रीमोईला जून ला सॉरी म्हण असे आपण कुत्र्याला कमांड देतो त्या सुरात सांगत असतो. पण ती यावेळी नाही म्हणते.

ह्या नं तरचा भाग डिरेक्ट शांतिनिकेतनातील वसंतोत्सव श्रीमोई व इतर मुले विद्यार्थी व टीचर पिव ळे कपडे लाल काठाच्या साड्या कुर्ते नेसून रंग लावत आहेत. व चांगली चाल लावलेली व गायलेली गाणी घेतली आहेत. फार मेहनत घेतली आहे ते जाण वते. आपल्या खंग्री मॅन् ने तिथे जायला हवे शिक्षण घ्यायला. बंगाली लोकांना त्यांचे संगीत व शांतिनिकेतन सॉलिड कल्चरल स्थाने उपलब्ध असल्याने उगीच म्युझिक स्कूल आश्रम वगैरे कुबड्यांची गरजच नाही.

ह्यातला रोहित बरोबर मापाचा चश्मा घातलेला बारक्या चणीचा पण मध्यम वयीन हुषार अनुभवी वाटतो. संवाद पण जास्त सखोल आहेत. त्याचे केसांचे कल्ले घेतले आहेत आशू ला पण बाकी आनंदच आहे. ओ मा. की कोरबे.

एक कंप्लीटली ओढून ताणून आणलेला आरूची पर्स चोरायचा प्रसंग आहे. फारच पीळ आहे....
आत्ता तो भयाण प्रसंग पहिला....हसू आवारत
नाहिये....
अमा....:-)

प्रकाश समोरच आय लव यू म्हणाला...?

आड ये णार नाही म्हणत म्हणत हा मॅन आत आत येत आहे.>> अगदी.
आनेवाला पल जानेवाला है आणि जिंदगी की ना टूटे लड़ी या दोन गाण्यांचे अर्थ सांगत होता अशू. अंघाच्या फोनने मोडता घातला.

>>>>Ho tar prakash has stomach upset!!!
हसुन हसुन पोटात दुखले असेल Proud

Pages