आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रेक्षकांनी मालिका बघणे हळू हळू बंद करावे म्हणून पोटात दुखणे, शिरा खाणे , चोरी पकडणे असे पाचकळ गोष्टी चालू आहेत.आता तर संजना जास्त चांगला काम करत आहे.

खूप बोरींग सीन होता, नाही जमली मधूराणी ला ॲक्टींग. जबरदस्तीचा humor. काय ते गाणं आणि फालतू डबिंग. आकू भलताच तेलकट चम्या दिसतो.

आशुतोष - माझा अपघात होणार होता.

संवादलेखिकेची आई मराठी भाषेत घुसलेल्या अशा चुकीच्या शब्दरचनांबद्दल लिहीत असते. अर्थात आता हे वापरून वापरून सर्वमान्य होईल.
आणि मराठीतल्या बाकीच्या सगळ्या विभक्ती काढून फक्त षष्ठी सगळीकडे चालेल.
मला अपघात - हवं.

मला अनेक वेळा मधुराणीच डबिंग फसल्याचा फील येतो, घरातल्या कामाविषयी बोलताना तर तिने डायलॉग पाठ केल्याचा फील येतो. तिचा ओव्हर‌आँल वावर सहज अजिबात वाटत नाही, स्पेशली डायलॉग संपल्यावर एक्झिट घेताना साडीच्या निर्‍या धरून चालत जाण्याचा प्रकार.

नाही..पण तो चोरीचा सीन फारच फसला...... सिरीयल ची उरली सुरली अब्रू घालवली त्याने!
खरेच..... एडीट करुन पुन्हा पहात नाहीत का.....?
मधुराणी लाही काही जमले नाही... साने गुरुजी काय...अन काय काय...!!!
अगदीच भंगार संवाद....
अन्या आता संजना ला काय घटस्फोट देतोय! कैच्या कैच... तिला घेऊन वेगळं राहायची धमक नव्हती तर का केलं लग्तिलाआणि आशुतोष बदला बुआ...... फरच असह्य होतो...विशेषतः त्याने चश्मा काढला की हॉरिबल दिसतो....
आपले घरचे नेहमी चोवीस तास चश्मा असलेले लोक थोडा पुसायला म्हणून जरी चष्मा काढला तरी कसे विचित्र दिस्तात..? तसा!

आता यांना मेकप करायला काय हरकत ए? Uhoh

@अमा -- तुमचं विश्लेषण वाचत नाही तो पर्यंत भाग बघायला मजा येत नाही. अशाने अकुकाक चे TRP पण घसरणीला लागला आहे. Proud Proud Proud

Hi in Hyderabad taking care of bank work pending due to pandemic. Returning to Bombay tomorrow afternoon. Mag baghun lihite. Still in love with Sreemoee and her phaagun song. Pahile Tila baghen mag aaru.

अरू आता अशूच्या नादात कॅामेडी करायला लागली आहे. टोपन नावाचा जोक किती दिवस खेचणार देव जाणे.
अभि आणि गौरीची अवस्था एकसारखी झाली आहे. अनघा सतत ताई आणि घरकाम करत असते आणि यश सतत संजनाला दोष देत असतो.

गौरीला अचानक यश का आवडेनासा झाला..?
तिला तर फारच आवडत होते ना एकत्र कुटुंब?
आणि संजना चा विषय निघतो तेव्हा यश बोलतो तिला ...त्यात काय गैर वाटतं हिला? मावशीचा अचानक इतका पुळका का आला?

हाय पाहिले तीन दिवसाचे एपिसोड. एकात संजना आत्महत्येचा प्रयत्न व नंतर अन्या अरू शी लाडीगोडी करून ह्या घरातच राहाय्चे आहे हे खुंटा बळकट करून घेणे. अनघा मॅरेज काउन्सेलर कडे जा म्हण्ते तर अन्या उखडतो. गौरी यश लुक्स लाइक ब्रेक अप होईन्ग. बिनबुडाची प्रेम कहाणी आहे.

अरूचा चश्मा घरी डिलिव्हर होतो त्या मुला ला पन ती सरबत देते. चस्मा घालून आशूला फोन करते तर तो नुकता च पळून आल्याने व काही चारशे हजार कॅलरी बर्न केल्याने थकला आहे. व सुलेखाला घ्यायला सांगतो. व मग अरु ने आपल्याला घरी चड्डी शर्ट मध्ये चस्मा घालून बघितले म्हणोन चरफडतो. नित्याला अरु पिंट या हे नाव सांगते. आशूला बिझनेस वाढवायचा नाही आहे. लग्न करायचे आहे तिला कसे सांगायचे ह्या
विवंचनेत आहे.

एकीकडे संजना गौरीला तू अमेरिकेला जा व तिथेच राहा. हे काय खरे नाही प्लीज प्ली ज करून सल्ला देते. गौरी निखिल संजनाला पण घेउन जायच्या मागे आहे. य श ने तिला जायला नाही म्हटलेले नाही हे काही गौरी सांगत नाही. हिला स्क्रिप्ट मधून काप लेले दिसते.

मध्येच इशा यश आई कडे जाउन स्विगी डॉमिनो झोमा टो अ‍ॅप्स डाउन लोड करून ऑर्डर कशी द्यायची ते अरु ला शिकिवतात.
त्यावर पंधरा मिनिटे आहेत. पन प्रमोशन नाही.

मग कायकी एक प्रोडुसर येउन आशू व अरु ला गायची ऑफर देतो. अरुचे अजूनही तुम्ही आहात म्हणून मला जरा हे करता येतं य वगैरे.
तो प्रोडुसर अगदीच सर्व वाक्ये पाठ करून आलेला एकदाचा बोलुन टाकतो. त्याला फुकटच्या भाड्याच्या सूट वरच बोळ वलेले दिसते.
पर डे दिलेच नसेल.

फारच पीळ झालेली आहे सिरीअल. शिरीमोईची सर नाही.

इकडे अनुपमाचे पहिली डेट. कॉलेजला बाइक वरुन परत भेट मग संगीत ची तालीम व प्रत्य क्ष संगीत ह्यातच टीपी चालू आहे. तो अनुज बाइक जाकीट चश्मा वगैरे घालून च्यान दिसतो. पण जनरल वेळ घालवत आहेत. पब्लिकला पण काही एक लग्न बघत राहायचे असते.

अरूचा चश्मा घरी डिलिव्हर होतो त्या मुला ला पन ती सरबत देते. >>> माझी आई सेल्समन, सेल्सगर्ल आले तरी चहा विचारते, सेल्सगर्ल एक बसून आमच्याकडे चहा बिस्किटे खात असताना, बहीण गेली तिथे. आम्हाला काळजी वाटते, आई बाबा ज्ये ना, माणुसकी म्हणून आपण देऊ पण भीतीही वाटते (आता सोसायटीत येऊ देत नाहीत फार कोणाला, त्यामुळे काळजी कमी झाली) . मी पाणी विचारते मात्र दारावर कोणी कुरियर बॉय, सिलेंडर वगैरे द्यायला आला की. बाकी घरात काही काम असेल म्हणजे इन्व्हर्टर सर्विसिंग, अ‍ॅक्वागार्ड सर्विसिंग वगैरे तर पाणी, काही थोडं खायला देते म्हणजे फार नाही, पाण्याबरोबर पुर्वी कोकणात गुळ द्यायचे त्या टाईप, राजगिरा लाडू, कसल्या वड्या असतील तर . बहुतेक ओळखीची आहेत ही आणि दार उघडं ठेवते अशावेळी. सावध राहायलाच हवं पण हे अरु करते ते फार वेगळं वाटलं नाही.

हो मी पण विचारते. ह्यात काये एव्ढे असे च वाटले. बिग बास्केट वाल्या मुलांना विचारते पण ते बाह्रे र गेल्यावर. अशी मुले तुमची पाठ वळल्यावर मागुन अ‍ॅटेक करून घरात चोरी करून जाउ शकतात. पाणी मागायच्या मिषाने भुरटे चोर डल्ला मारतात अश्या केसेस वाचल्या आहेत.

पण घरात ती एकटी. सेफ्टी डोर हवा. ते बंद करून त्यापलीकडे त्याला उभं करून सरबत पाणी काय ते नेऊन द्यावं. दार सताड उघडं ठेवून ती किचनमध्ये आली. इथेही ओपन किचनच आहे.

संजना एका क्षणी अगतिक वाटते, दुसर्‍याच क्षणी पुन्हा जहर काढते. घराचे पेपर्स परत करताना पश्चात्तापदग्ध झाल्याचं दाखवलं. मग परत ये रे माझ्या मागल्या.
अरुंधती आशुतोष प्रेमाचा ट्रॅक केविलवाणा होत चाललाय.

हो अमा, भरत. काळजी घ्यायलाच हवी, माणुसकी दाखवताना. आमचं लेकरु लक्ष ठेऊन असतं, कोण आलं गेलं, कधी जातायेत त्यामुळे जास्त सेफ वाटतं मला. फार थांबायचं कोणी डेरींग करत नाही.

पाहिला तो चोरांचा सीन. नक्की सिरीयस करायचा आहे की कॉमेडी यामधे गंडला आहे तो. आशू पोलिस आहे म्हंटल्यावर मला वाटले मोबाईलवर गॉट पाहणार्‍या जनरेशनमधली ती मुले "Any man who must say I am the king is no true king" म्हणून त्याच्याकडे तु.क. टाकतील Happy

आजकालही सर्व घरात सर्रास झोपेच्या गोळ्या असतात का? ७०ज्/८०ज मधे पिक्चर्समधल्या घरांमधे झोपेच्या गोळ्या व पॉइझन असे लिहीलेल्या बाटल्या असत.

फा... Biggrin

आणि झोपेच्या गोळ्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळत नाहीत. तेही किती दिवस द्यायच्या, हे लिहिलेलं असतं, तेवढ्याच देतात.

तो प्रोड्युसर म्हणजे पुस्तकी बोलण्यात आशुला टफ कॉम्पिटिशन आहे... आशुबरोबर राहुन अरुची अ‍ॅक्टिन्गही दिवसेदिवस घसरत चाललिये.
अनुज बाईक वर तुफान हॅन्डसम दिसतोय, अनुपमाही बरी आहे, त्याचे सन्गित सोहळे आणी मॅचिन्ग ड्रेसेस वैगरे बघुन हिन्दी-मराठीमधला लेव्हलचा फरक दिसतो.तिकडे सन्गितसाठी मिका पाजी आणलाय.

गौरीला अचानक यश का आवडेनासा झाला..? >>>>>> यशच्या विचित्र, अति- पझेसिव वागण्यामुळे. कुठलीही नॉर्मल मुलगी अश्या मुलाला कण्टाळेलच शेवटी. त्यान्चा ब्रेकअप झाला तर बरच होईल.

त्यान्चा ब्रेकअप झाला तर बरच होईल>> अरू तसे होऊ देणार नाही. अप्पा आणि कांचनचे तिने परत जुळवले. अनघाला अभिसाठी पटवले. अन्या पळून गेला होता तर त्याला घरी आणून संजनाशी लग्न करायला लावले. अविची बायको वेळेत निघून गेली, समोर असती तर तिला पण अरूने जाऊ दिले नसते.
बाकी आयुष्यभर हे लोक आपल्या जोडीदाराशी कचाकचा भांडत राहीली तरी हरकत नाही. समोर दिसते कि यांचे पटणे अवघड आहे पण जोड्या जुळवत रहायचे काम ती करत राहील.

आता यश अतिपझेसिव्ह वागत नाहीए. त्याच्या मनाविरुद्ध का होईना , तिच्या अमेरिकेला जाण्याला रुकार देतो आहे. हे आणि पुढे जे काही होईल ते त्याने तिच्यावर सोडले आहे.
आता गौरीला मावशी संजनाबद्दल सहानुभूती वाटतेय. तिला पहिल्यापासून मावशी म्हणून सॉफ्ट कॉर्नर आहेच. सगळ्या प्रकरणात अनिरुद्धचाही तेवढाच दोष असताना तिला एकटीला सुळावर चढवलं जातंय हे तिला पटत नाही. यश तिच्याबद्दल वाटेल तसं बोलतो, तेही तिला आवडलेलं नाही.

अफलातून सीन होता तो त्या प्रोड्यूसरचा. २-३ पिक्चर्सना अ‍ॅवॉर्ड मिळाले, २-३ पिक्चर्स बॉक्स ऑफिसवर गाजले - इतके सर्व असून हा माणूस या दोघांना माहीतही नाही. आणि प्रोड्यूसर असे संगीत दिग्दर्शकाला पत्ता न लागू देता स्पेसिफिक गाण्यांकरता गायक गोळा करत फिरतो हे मस्त आहे.

आत्तापर्यंत टोटल एक गाणे गायले आहे ना अरूंधतीने? ती एकदम प्रख्यात गायिका असल्याच्या थाटात चालले आहे सगळे. बाय द वे केळकरांचे कन्स्ट्रक्शन व गाण्यांच्या अल्बम संबंधी कामकाज एकाच ऑफिसमधे चालते का?

तो पिंट्याचा सीन तर आता ऑल्मोस्ट हुबेहूब "सिंघम" मधल्या सचिन खेडकरच्या सीनसारखा केला आहे. त्याला ए पिंट्या म्हणून पुन्हापुन्हा चिडवणे वगैरे.

तो कुटुंबाची जबाबदारी असलेला मित्र याचे अरूंधतीशी लग्न झाल्याशिवाय शेवटचा श्वास घेणार नाही वगैरे म्हणतोय. आणि त्याला केळकर म्हणतो "तसे काही होणार नाही". म्हणजे केळकर त्याला आधीच शेवटचा श्वास घेशील असे म्हणतोय? Happy

तिकडे ती गौरी संजना तिला भेटायला सहज येते तेव्हा तिला म्हणते - "तूही चल माझ्याबरोबर. तुलाही तिकडे एखादा जॉब मिळेल"
हे ऐकल्यावरः
- भारतातून अमेरिकेत जॉब शोधणारे, त्याकरता परीक्षा वगैरे देणारे
- नवीन वर्षाचा एच-१ व्हिसा कोटा ओपन होण्याची वाट पाहात असलेले
- इथे एमएस वगैरे करून एखादी कंपनी आपला व्हिसा करेल का याची माहिती काढणारे
- सहज जॉब बदलता यावा म्हणून ग्रीन कार्ड होण्याची वाट बघत असलेले

हे सर्वजण: "म्हणजे आम्ही येडे"! Happy

म्हणजे केळकर त्याला आधीच शेवटचा श्वास घेशील असे म्हणतोय? >>> हाहाहा, गडबडा लोळले हसून हसून.

हे सर्वजण: "म्हणजे आम्ही येडे"! >>> हे ही भारी. मराठी हिंदी सिरीयलमधे इतकं नाही कोणी करत, इझी असतं त्यांना सर्व.

तूही चल माझ्याबरोबर. तुलाही तिकडे एखादा जॉब मिळेल">> संजना चा जॉब सोपा आहे. एखाद्या श्रीमं त ट्रं पर ला गाठ्णार ती. आपल्या नावावर बंदूक घेणार व नवर्‍याचे ऑस्टिन मधले घर स्वतःच्या नावावर करेल. येडा निखिल वडापावचा ट्रक टाकेल एडि सनात. उसमे क्या है.

सुभप्रभात आज सोमवार . कामावर जायच्या भीतीने जीव टरकला आहे. चार दिवस आराम झाला.

तर प्रदि प राव गावावरुन आंब्याची पेटी घेउन आला आहे व गावाचा प्लग मारतो. गप्पा चलू आहेत. दादा घराचे कागद पत्र व किल्ल्या अप्पाला देतो. घराचे कागद बघितल्यावर संजना एकदम उगवते- अवता र घेते.

कट टू अरु आशू यश नित्या कॅफे टेबल सस्पेन्स म्युझिक. खंग्र्या फॉर्मात आहे. टिन टिन लावले आहे. मग एक दम बासरी संटूर चा पीस.
आनंदाची बातमी देतात. दोन गाणी मिळाली ही. नित्याने आशू तू म्हटल्यावर आशूचा चेहरा एकदम चौथी ची स्कॉलरशिप मिळाल्यासारखा झालेला आहे. नित्या म्हण्तो किती वर्शांनी गाणार तू!! अरे अल्बम आत्ताच रिलीज झाला ना!! जे फोन वर करता आले असते त्या साठी त्या कॅफेत सीन घेतला. नित्या एक फ्रॅक्षन ने रिअ‍ॅक्षन देतो .

अरू थांबून आशूला उसासत धन्यवाद देते. तुमच्यामुळे इ. इ. रडत रडत. ह्याचा बाल उपदेश फारच विनोदी आहे. मागे बघू नकोस.
खाली बघितले की भीती वाट्ते. मी नसलो तरी तुला पुढे जायचे आहे( कॅन्सर झाला की हा सीन फ्लॅश बॅक दाखिवणार बघा) पुढे बघ वर बघ
अरे हा ट्राफिक पोलिस होता का गेल्या जन्मी. अरू टिपे गाळत परत थेंक्यो.

कट टू संजना. ती प्रदीप रावाला घरातले समजावून सांगते. तो भंजाळतो. पण अप्पा मिडीएटर बनतो. व त्यांचे बरे चालले आहे( अभी अनघाचे)
अवी कांचन पण अनघा चे कौतूक करतात. दादाच्या प्रश्नाला उत्तर नाही घरच्यांकडे. त्यांचा संतोष हेच आमचे ध्येय असे घरवाले म्हणतात.
अभीला फुकट फ्लॅट मिळाला आहे. जावई नखरे.

अप्पा म्हणे अरुने स्वतःचा फ्लॅट घेतला आहे!!!( विकत!!) असेल असेल. गाण्याचे काही करोड मिळाले असत्या. आम्ही मरतोय ९ ते ६. एफ डी करतोय. सर्व तोंड देखले जेवायला थांबा म्हणतात पण दादा सटकतो. इदर क्या खिलाते क्याकी. और कामा है कते.

संजना ला तू नीट रहा असे कांचन म्हणते. अवि चहा करताना संजनाला पण विचारतो. मग संजनाचे स्ट्रे टेजी स्वगत आहे. तिचा गुलाबी पांढरा कुर्ता मस्त आहे. सोनेरी रंगवलेले केस जरा जास्त दिसतात पण ओके.

आता एकदम ही बाई गौरीच्या घरी जाउन तिला समजुतीचे चार वळसे देते. ह्याचा शॉर्ट मध्ये तू जा करिअर काय ते नक्की कर हमे क्या पन
परत ये. मी यशला पण चार वळ से देते. गोड गोड बोलुन लोकांच्या जीवनात मध्ये मध्ये करायचे. रिलेशन शिप इशूज वर इन्फ्लुअन्स करायचे हे बरोबर नाही. गौरी तिला सांगते तुमचे इशूज बद्दल तो ऑबसेस्ड आहे. तरी ही स्वतःचेच घोडे पुढे दामटते.

प्रोमो मध्ये की: आशुतोष ला अ‍ॅक्सीडेंत. आता हॉस्पिटल मध्ये प्रेमाची कबुली ( गौरी देशपां डे स्टाइल! ) व धडाक्यात ब्यांडेज बांधून लग्न!!!

चला आज स्वतंट्र स्त्रीला कामाला जायचे आहे. कोण आशू घरी चेक आणून दे णार नाही की कुत्रे फिरीवनार नाही.

Pages