आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला फक्त दोन पात्र सेन्सिबल वाटतात एक शेखर आनि दुसरी संजना. बाकी सगळे अरुच्या गुणगाण्यात , भक्तिभावात, दवादारूत, श्रद्धेत ,अंधश्रद्देत, प्रेमात एवढा बावळटपणा करतात कि विचारताय सोय नाही. लेखक / लेखिका यांना या धाग्यावर आमंत्रित करावे म्हणजे पुढचे कथानक थोडे सेन्सिबल होईल.

फक्त शेखर आवडतो.

संजना स्वार्थी आहे, असुदे त्यालाही हरकत नाही पण स्वत: लग्नात असताना खरोखर अफेअर करत होती त्याबद्दल तिला काहीच वाटत नव्हतं. अरु div नंतर नुसती आशुतोषबरोबर आली तरी तिच्या नवऱ्याबरोबर ही सुद्धा नावं ठेवायला मोकळी. असे तिचे नियम स्वत: बाबत आणि अरु बाबत वेगळे आहेत.

शेखर जबरदस्त आणि त्याचे डायलॉगजही छान लिहिलेले असतात, तो डिलिव्हरही छान करतो आणि त्या क्लिपस त्यांच्या (स्टार प्रवाहच्या ) fb पेजवर आवर्जून टाकतात त्यामुळे बघता येतात, तो खूप जणांचा लाडका आहे, खूप कमेन्टस येतात त्याला.

लेखक / लेखिका यांना या धाग्यावर आमंत्रित करावे म्हणजे पुढचे कथानक थोडे सेन्सिबल होईल. >>> खरं आहे. नमिता mam चा नंबर होता पूर्वी माझ्याकडे, त्यांनी मला गोठ सिरियलवेळी आमंत्रण दिलेलं, मी गेले नव्हते. त्या पटकथा लिहितात याची पण आता नसेल नंबर माझ्याकडे.

कसले हे प्रतीक मेरा तो दिमागही उलटाही चलता है >>> अमा Lol

हल्ली संजनाचीच दया येते मला >>> +१ टोटली. एकूण सादरीकरण असे की जणू तिने एकटीनेच अफेअर केले आहे. एखाद्या वाट चुकलेल्या अश्राप जीवाकडे बघतात तसे अन्याला दाखवतात. दोघांनीही सेम चूक करून सुद्धा. भिकार स्क्रिप्ट आहे.

बाकी असा रॅण्डम घटस्फोट "देता" येतो का आपल्याकडे? मला वाटले की मुळात दोघांनाही हवा असेल तरच मिळतो (आणि तो ही सहज नाही). एकाचे अफेअर वगैरे असेल तर देता येतो माहीत आहे पण इथे तसेही नाही. उलट अफेअर मधूनच लग्न झालेले दिसते.

एकाचे अफेअर वगैरे असेल तर देता येतो माहीत आहे >> मनबा मधे त्या गुरूला राधिकाकडून घटकस्फोट हवा असतो पण ती लवकर नाहीच देत.
मी असे ऐकले आहे कि नवऱ्याला घटकस्फोट हवा असेल पण बायको तयार नसेल तर त्याला घेता येत नाही. खखोमाना.

अनिरुद्ध - अरुंधतीचा घटस्फोट व्यवस्थित दाखवला होता. कौन्सेलिंग, सहा महिने वेटिंग. त्यांचा परस्पर संमतीने होता.

अरुंधती आशुतोषच्या संबंधाबद्दल अनिरुद्ध , कांचन विसरले आणि त्यावरून हे दोघे काय काय बोलले होते, हे ती विसरली. ही सगळी जादू कांचनने अप्पाला वाटेल ते बोलल्याने आणि अप्पा घर सोडून गेल्याने झाली.

संजना हल्ली केवीलवाणी झाली आहे. पण तिचा फोकसच बदललाय. आधी तिला फक्त अनिरुद्ध हवा होता. मग अचानक अरुंधतीची जागा घेणं हेच तिचं उद्दिष्ट ठरलं.

शुभ प्रभातः आज पहिले कामे निपटली. डब्याला काकडी, कलिंगड, अलग डब्यात, ताक टेट्रापॅक व चीज घालून भात बनवून गार करत ठेवला आहे. कुत्रे पण निवांत झोपले आहे मी इथे लिहि ते हे कारण इथेच शेअर करू शकते.

आजच्या भागात शेखर मुलाला संजना पासून दूर करायच्या फुल प्लान मध्ये आहे. संजना रडकुंडीला आली आहे. हिची कायम पद्धत म्हणजे काही हवे असेल तर प्ली ज प्लीज व सॉरी सॉरी करायचे. मनासारखे झाले की थ्यांक्यू. संजना चे न ऐकता शेखर निघतो जाताना कांची ला पण दम देतो. अन्या उशीर होतो म्हणून त्याच्या मागे. संजना ऑस्ट्रक आहे. दोन्ही बापे न ऐकता गेले. सौंदर्य ओघळ त चालले काही परिणाम होत नाही से दिसते.

मग अप्पा वर डोरे. पण ते मी निखिलची तुझी ताटा तूट होउ देणार नाय असे आश्वासन देतात. अवि तिला वळसे देतो ज्ञानाचे. एक एक मेंबर निघून जातात.

कट टू भयानक चौकडीचा कोट घातलेला काळसर माणूस अरुला सूचना देत आहे. गान शाळेचे काम चालू आहे. अरु आशू हपिसात बोलत आहेत नित्या येतो. हा पूर्ण संस्कृत नाटकातील पात्रा सारखा हस्तअभिनय करत करत बोलत आहे. डब्या बद्दल अरु ला धन्यवाद देतो. उद्या पासून डबा नको म्हणतो पण अरू अजूनही आठ दिवस पाठवेन म्हणते. वर्शाचा केटरिन्ग बिझनेस आहे ना. मग कोणी हाताशी आचारी नाही वाटते. अरु त्यांना घरी जेवायला बोलवते. नित्या तिला एक फोन गिफ्ट देतो. अरू फारच दहा मिनिटे आढे वेढे नाही नको करत घेते. स्मार्ट फोन व्हर्जिनिटी तुटली तिची . पण वापरायचे कसे ते माहीत नाही.!! यश समजावणार म्हणे. मग दह मिनिटे आभार प्रदर्शन. किती ते कसचे कसचे. महाग फोन. नित्याला हेल्थ इन्सुअरन्स जबरी दिसतो. महाग फोन गिफ्ट द्यायला. का कंपनीवर बिल फाडणार !! परत फेड करू नका
असे अरू दटावते. दोघे तिला फोन घ्यायला मनवतात. टेक्नॉलोजीचा वापर कलेत करता येइल ते शिकवतात.

बायका समजुतदार. पुरुष शिकवणारे. !!! नित्या व्हिडीओ कॉल करायचा तर तो का म्हणून आशूला चिडवतो. सिम चेंज करायचे तर संजनाने फोन करून घरी बोलवले आहे.

कट टू होम : विशाखा अन्या सर्व वाट बघत आहेत अरुम्धती पण येते व संजना घराचे पेपर परत करते. आतातर डिवोर्स नाही ना देणार विचारते अन्याला. पारच बॅक फुट वर गेलेली आहे. संजना उपरती नाट्य. पण घरातले कोणी तिला सिरीअसली घेत नाहीत. ती बाहेर काढत तर नाही ना असे कांचीला वाट्ते.

अन्या डिवोर्स वर ठाम आहे. पण अरु त्याची समजूत घालते. तिचे तुमच्यावर प्रेम आहे. तिला ठेवुन घ्या म्हणते. अरु आल्यावर अनघा पाणी आणू का विचारते. प्रत्येक जण संजनाला बोलुन घेतो. हिने आज हेअर एक्स्तें न्शन ची वेणी लावली आहे. हीच वेळ आहे तिला हाकलून द्यायचे व अरुला परत ठेवुन घ्यायचे. किस्सा खलास.
पण तसे होत नाही आहे. दळ ण चालूच आहे.

धन्य वाद पब्लिक्स तो वरील डबा खाल्ला. आता एसीत झोप येत आहे. पुणेरी पणा म्हंजे आधीच जेवण करायचे की एक ते दोन टीपी करता येतो. अडीच ला कॉफी येइस्तो खेचायचे.

संजना घराचे पेपर परत करते >>> Happy हे भारी आहे. आधी घर अ ने ब च्या नावावर केले. मग फुलस्केप पेपरच्या मजकुरावर क ची सही घेउन ड ने ते आपल्या नावावर केले. आता फक्त ते पेपर परत केले की मालकी झाली ट्रान्स्फर.

"स्थावर मालमत्तेच्या नोंदणीसंदर्भात सर्व कार्यालये बंद करून त्यातील कर्मचार्‍यांनी हिमालयात निघून जावे अशा सूचना संबंधितांस देण्यात आलेल्या आहेत" - अशी एखाद्या मंत्र्याचे विधान असलेली बातमी येइल लौकरच पेपर मधे Happy

शुभ प्रभातः
आज घटस्फोट ना ट्य पुढे चालू आहे. अन्या संजना प्रयवेट बात पब्लिक मे कर रहे है. व प्रत्येक घरची व्यक्ती सेपरेट प्रतिक्रिया देत आहे. संझना देत नाही ज्ज्जा घ. म्हणते. यु कांट डू धिस म्हणून अगदी शेक्स्पीअर्च्या ट्रॅजेडी नाटकाची नायिका असल्याचे बेअरिन्ग आणून खांदे पाडून वर जायला निघते.

सिक्रेटली अप्पा वर डोरे डालणे चालूच आहे. जाताना मागे वळून भाव विभोर डोळे / अश्रुपात करुन अप्पा तुम्ही शेखरला सांगाल प्लीज प्ली. तिच्या स्टाइलने म्हणते व ते हो म्हटल्यावर थेंक्यु पण फेकते. अप्पा सिक्रेटली मेल्ट डाउन. व शे. ट्रॅ. ना. वर निघून जाते. आता घरचे सर्व अन्याला फोकस करतात. ह्ये काय नवीन !!! अश्या अर्थाने. अन्य मी तिच्याशी बोलतो म्हणतो. अवी म्हण्तो तुलाच टेन्शन . यश पेपर नितिन सरांना दाखव्णार आहे. व अवि पण चेक करवुन घेणार आहे.

अन्या म्हणतो तू काय तिला सांगितलेस!! आं अरु समजू त चार वळसे देते. तिचे तुमच्यावर प्रेम आहे. तुम्ही तिच्या बरोबर रहा. अनघा ताई तू बस म्हन्टॅ चहा कर म्हण्ते तर अभिराज सरबत कर म्हणतात. अन्या अरूला धन्यवाद देतो. अरु उसासत तिला जरा समजून घ्या तिच्याशी बोला हे ते ज्ञान पाजळ ते. घ. ची वेळ आली आहे का ते चेक करा म्हणते. कांची लगेच आगीत तेल घेउन्दे लगेच घटस्फोट.

विशाखा पण अरू चे धन्यवाद देते.

राया जरा घ्या दमानं अंग भिज्लं घामानं ( तुमची लफ डी बघून!!) असे अरू अन्याला संदेश देते.

विशाखा अन्या घराबद्दल शांत पणे निर्णय घेउ . ठरवतात अरू पण दुजोरा देते.

अभीचे काही नक्की नाही मी परत जातो म्हणतो हॉस्पिटलात.

अरु निलेश मोहरीची गुड न्युज देते. नवे गाणे. कांची लगेच फुकट तिकिटे मिळतील का विचारते. यश आइसक्रीम आणायला निघतो.
अप्पा तुझ्या माएरची पेटी आली नाही म्हणून कांची ला पिडतो. बहिणीला नांदवल्याबद्दल आंब्याची पेटी पाठवून द्या. म्हणतो. !!! आजी लगेच फोन ची डिमांड करते. अरू नवा फोन दाखव्ते व आजीला मग इशाल देउ बघते. ते बघून अभीचा पापड मोडतो. तो रागारागात आइसक्रीम आणायला जातो.

यश व इतर सर्व तिला स्मार्ट फोन वापरायला शिकिवतात. सेल्फी घेतात जन रल धमाल चालू आहे नव्या फोन मुळे. तर अभीला राग येतो.
मग कांचीला मध्ये बसवून लगेच फोटॉ.

कट टू अरु अ‍ॅट होम. लॅप टोप वरुन मेल पाठवणे, अ‍ॅटेचमेंट करणे फाइल हे शिकत आहे व जमत नाही म्हणून इंग्रजीत आशूतोष ला मेसेज करते. किती हे अवघड व मलातर बाई भीतीच वाटते. वगैरे चालू आहे स्केअर्ड ऑफ धिस थिंग!! असे ती आशूला मेसेज पाठवते. विप्र लब्ध शृगार प्रेमीइक मेसेज घ्यायला लगेच येइल. फिजिकली.

मग ही पिठले भात बनवायला सुरू करते. व मनात अन्या संजनाचे विचार आहेत. गप्प बसून काय होईल ते बघावे असा विचार करते.

आता खंग्री मॅन बिडी मारून आला आहे.

दोन भांडणे: ज्युनिअर : अभी व अनघा. ही बोलता बोलता कपड्या च्या घड्या करत आहे. हिचा एकही ड्रेस नाही पतीचेच कपडे फक्त. अन्या संजना नाट्या बद्दल डिस्कशन चालू आहे. अभी वैतागून बाहेर जायचे सेपरेट राहायचे म्हण तो. का तर रोज बाहेर खाउ पिक्चर ला जाउ वगैरे.
अनघा मला इथे आजी अप्पांचे बघावे लाग ते. ह्याला तो वैतागला आहे. तिला इथेच राहायचे आहे. ह्याने सेपरेट व्हायचे नक्की केले आहे.
हे नाहीतर ते अनघा विनोदी वाक्य टाकते: आपल्या बेडरूम मध्ये कोण येते बरं( कोण का येइल!!) हे मला वाटते प्रे क्षकातील बायका ज्यांच्या सुना वेगळे व्हयाचे मागत असतात त्यांच्या भावनांना हवा द्यायला असावे. म्हणजे किती ही समजूत दार ज्युनिएअर नंबर वन.
अभीचे ठरले आहे म्हणे. ( फॉर फाइ व मिनिट ही इज फर्म!!)

एक भांडान मार्गी लावले तर हे दुस रे.

सिनीअर व मोठे भांडणः संजना माफी चे नाटक करुन सुरु करते. अन्या तिला एकाच बेडरूम मध्ये इग्नोअर करत आहे. आय प्रोमिस मी वेळ येउ देणार् नाही . अन्या तिला म्हण्तो तुला सारखे अटेन्शन व ड्रामा लागतो . तुला राणी सारखे वागवा वे असे काही हो णार नाही. तू फार इन्सेक्युअर आहेस. हाव आहे तुला व तू त्यासाठी काहीही करतेस. आपण एकत्र राहू शकत नाही मला मनस्ताप होतो आहे. आपन वेगळे होउ या. मी तुला पैसे देइन तुझी सोय करीन. ( ये तो पहिलेइच करना था . अल ग से छोटा मकान बना के उसको रखते तो ये नौबत ना आती नवाब साब!!)

संजना आता पिसाळ ली आहे व बोट उचलून अ‍ॅग्रेसिव पणा चालू आहे. तुला अरु परत हवी आहे. ही त्याला उचकावत आहे. ह्यांच्या रिलेशन शिप चा प्याटर्न असाच आहे. वादा वादी. मीतुझे जगणे मुश्कील करेन मी अरु ंधती नाही. मी तुझे जगणे कठीन करेन. व मग ते बोट उचललेले
म्यान करते.

मी पोलिसात जाईन तुझ्याब द्दल तक्रार करीन म्हणते अनघा तक्रार घेउन अरुकडे जाते. दर वेळी हिला अरू का लागते. ताई ताई!! कुच्छ पती का सुनो. रहो शानसे अलगसे. पर तेरेको दिनमे पचास रोटी बेलने काइच है तो मै क्या बोलु. मर.

दोन्ही भांडणे आता अरुंधती सुप्रीम कोर्टात पैरवी साठी गेली आहेत. हे प्रोमो मध्ये. समजुत दार पणाला लैच गिर्‍हाइक आहे इथे.

भात सकाळ चा असेल तर बरे नाहीतर चार बर्नर चा स्टो आहे. आधी कुकर लावुन मग कांदे चिरायला घ्यावेत ना. मी आज सकाळीच भात लावला आहे. थोडे रसम उरलेले आहे व दही कार्ल्याच्या काचर्‍या आहेत. दोन अंब्याचा आमरस करून ठेवला. माझ्यासाठीच. मग फरसाण मार्ट मध्ये जाउन दोन समोसे, पाव मिरची, एक ठेपल्याचे पाकीट , एक ब्रेड. व्हेज सँडविच बनवायला. ( हलवायाकडून थोडा सा हिरवा चटनी दो ना असे मागून घ्याय्ची होती पण गप्पबसले. ) वेफर्स व मंगलोर फरसाण( लसूण वाले) घेतले. ही कधीच काही स्वतःच्या घरासाठी घेताना दिसत नाही. मग वर्शा नित्याला डबा कसा काय बनवून देते?! हिला बघु न मला मी किती लेझी बम आहे असा साक्षात्कार रोज होतो.

थोडा सा हिरवा चटनी दो ना असे मागून घ्याय्ची होती पण गप्पबसले. >>> का बरं? मागायची ना. देतात ते लोक.
अरूकडे दिवसाला ४८ तास असावेत. तिची तुलना आपल्याशी कशी करताय अमा.

निर्माते रोजचा TRP विचारतो. ( Production manager विचारतो तसं.) कमी झाला तर लेखकाला झापत असेल. वाढला तर "असाच मसाला टाका" सांगत असावा. वास्तव आहे का नाही हे कुणी पाहात नाही.

अरूकडे दिवसाला ४८ तास असावेत. तिची तुलना आपल्याशी कशी करताय अमा.>>>>>>>>> छे ग! त्यांच्याकडे रात्र बित्र होतच नाही.

अमा .. Lol
तुम्हाला त्या चार बर्नर च्या स्टो चा फार राग आहे !!
तुम्चे जेवण मस्त झाले असेल....समोसे, ब्रेड व रसम भात! Happy

पर तेरेको दिनमे पचास रोटी बेलने काइच है तो मै क्या बोलु. मर.
विप्र लब्ध शृगार प्रेमीइक मेसेज घ्यायला लगेच येइल. फिजिकली.
अरुंधती सुप्रीम कोर्टात..

हे मस्त! Happy

ही कधीच काही स्वतःच्या घरासाठी घेताना दिसत नाही. मग वर्शा नित्याला डबा कसा काय बनवून देते?!>>> हिला मोहरिरने गाण्याचि सन्धी दिल्यावर आनद व्हायच्या एवजी अवघडल्यासारख होत, बाई ग! मोठ्या तोर्‍यात मी स्वतत्र राहणार, करियर करणार म्हटलिस ना? मग काम मिळाल नाहितर दिडक्या कुठुन मिळणार? घर कस चालणार?

तुम्हाला त्या चार बर्नर च्या स्टो चा फार राग आहे !!>> व्हय तर. माझ्याकडे एक इंडक्षन कुक्टॉप आहे. इंडक्षन वर प्रेशर कुकर पण कधीकधी धड होत नाही.
एकट्या बाईची धडपड अनेक पातळ्यांवर अस्ते ती इथे काहीच दाखवत नाहीत. म्हणजे मला जेलसी नाही आहे. पन अगदीच सोपी वाटचाल दाखवली ना तर तेही चुकीचे आहे.

Actually, इतकं सोप्पं सोप्पं असतं का कधी सगळं? तरी त्या मानबाच्या मसालेवाल्या बाईपेक्षा जरा जास्त कष्ट दिलेत हिला. ती तर डायरेक्ट शेजारच्या घरात जाऊन राहीली होती बोरीया बिस्तरा घेऊन. मग एकदा केव्हातरी तिचा भाऊ घर सोडून आला होता तेव्हा तो ही तिच्याबरोबर शेजारच्या घरात राहीला होता. आयला यांची घर नक्की असतात तरी केवढी? जो येतो त्याला सामावून घेत जातात.

आज ठाणे घोडबंदर tmc हॉस्पिटल च्या बाजूला अरुंधती ताई शूट करत होत्या..... राणी बैंगणी साडी चा रंग होता...
मी 15 पावलं लांब होते पण मी एक फोटो काढला जो क्लीअर नाही आला.....
मधुराणी खुर्चीत बसून बोलत होती कुणाशी तरी.....

सिक्रेटली अप्पा वर डोरे डालणे चालूच आहे. >>अप्पा पण कालपासून संजना वर फिदा आहेत. औक्षण कर , सेल्फी मध्ये ये इ.चालू आहे त्यांचे.
सेपरेट झाल्यापासून आणि तेलकट चेहऱ्याचा, मळकट सुटातला मित्र भेटल्यापासून सु.अरु दोन रोल करतेय.समृद्धी मध्ये "चिंता करते विश्वाची" असे भाव असतात तर नवीन घरी बावळट ,मंद , अल्लड , मी नाही त्यातली असे भाव असतात.

अनघाच्या आईवडिलांनी तिला फ्लॅटर घेऊन दिलाय हे विसरले वाटतं लोक. नाहीतर अभिषेकने तिथेच जाऊ असं म्हटलं असतं.

Pages