आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या अरुधती इंग्लिशविंग्लिशच्या श्रीदेवीसारखं लागतेय. लहान लहान गोष्टी शिकतेय..
आशुतोष त्यांचे पुस्तकी संवाद फोनवरून न. ऐकत होता तेव्हा अरुंधती प्राथमिक शाळेतल्या मुलीने आवडत्या शिक्षिकेचं बोलणं ऐकाव़ं तशी ऐकत होती.

हो आशा काळे ते अलका कुबल सर्व रोल्सचा अर्क पिळून यांनी अरू बनवली आहे.

संजना घर हडप करते व ते डिक्लेअर करते तो एपिसोड पाहिला. खरे म्हणजे संजनाबद्दलच वाइट वाटते त्या एपिसोड मधे. तिची हिस्टरी मला माहीत नाही. पण लग्न झाल्यावर नवर्‍याची आधीची बायकोही तेथेच, घरातील सगळे जण तिचेच सतत कौतुक करत आहेत. हिचा नक्की हक्क कशावर आहे पत्ता नाही.

बाकी असे एका सहीवर घरे हडप होतात का? आणि "अर्धे घर अरूच्या नावावर" म्हणजे नक्की काय? काही रूम्स, की स्क्वे फुटेजप्रमाणे. नाहीतर त्या अनुपम खेरच्या संसार पिक्चर सारखी घरात मधेच एक लाइन ओढून इकडचे यांचे व तिकडचे त्यांचे? Happy घरे नावावर करताना सरकारी ऑफिस मधे रजिस्टर करणे वगैरे भानगडी नसतात का? उद्या जर यांनी तिला खरेच कोर्टात खेचले तर एका बाजूला सासू सासरे हयात असताना व घर तिच्या नावावर मधेच रॅण्डमली करायला काहीही कारण नसताना त्यांनी स्वखुशीने ते केले हे कोणाला पटणार आहे. त्यात अप्पांनी अर्धे घर अरूच्या नावावर केले, ते "परत घेताना" अप्पांच्या बायकोची सही. अन्याचा भाऊ तेथे असताना त्याची "ना हरकत" सही वगैरेचा पत्ता नाही. लिटरली आयजीच्या घरावर बायजी उदारचे उदाहरण आहे.

आजी पब्लिकच्या डोक्यात पुढच्या पिढीसंबंधी जी फिअर्स असतात ती तशीच्या तशी ढोबळ स्वरूपात इथे दाखवत आहेत.

फारेंड... Lol .. किती पेशन्स ने सिरीज पाहता आहात!!.
बाकी असे एका सहीवर घरे हडप होतात का?.. Happy सिरियल्स मध्ये होतात...

Happy Happy

सहसा या सिरीजमधे कौटुंबिक भाग सुरू असतो तोपर्यंत एक लेव्हल असते. भडक मेलोड्रामा, ढणढणाटी म्युझिक, रिग्रेसिव्ह प्लॉट्स ई. मग हे ऑफिसात जातात किंवा जेथे काही कौटुंबिक ड्रामाव्यतिरिक्त थोडीफार माहिती मिळवण्याचे कष्ट घेण्याची गरज आहे अशा सबप्लॉट्स मधे जातात. मग खरा विनोद सुरू होतो Happy

वास्तविक यातले त्या अप्पांचे एक दोन डॉयलॉग चांगले होते. तो शेखर आला की धमाल करतो. पण तेवढ्यापुरतेच.

आणि "अर्धे घर अरूच्या नावावर" म्हणजे नक्की काय? >> घर आप्पा आणी अन्याच्या नावावर असते, अन्याचे प्रताप कळल्यावर अरुला सिक्युरिटी म्हणून आप्पा त्याच्या नावाच घर (म्हणजे काय ते विचारु नको! ) अरुच्या नावावर करतात, ते आशुमुळे अरु घरातुन गेल्यावर काचन सन्जनाच्या सान्गण्यावरुन स्वतःच्या नावावर करुन घेते मग चतुराइने सन्जना अन्याच्या अर्धा हिस्सा आणी कान्चनचा अर्धा हिस्सा स्वतःच्या नावावर करुन पुर्ण कॅडबरी स्वतःच्या नावावर करते, सॉरी ते चुकुन कॅडबरी लिहल पण ती सगळी प्रोसेस कॅडबरी चॉकोलेटचे तुकडे करुन वाटावाटी करावी इतकीच बाळबोध दाखवलीये.
अन्याचा भाऊ तेथे असताना त्याची "ना हरकत" सही वगैरेचा पत्ता नाही.>>> आप्पानी त्याला आणी विशाखाला आधिच म्हणे त्याचा वाटा दिला आहे त्यामुळे त्याचा यावर काही हक्क नाही वैगरे

सॉरी ते चुकुन कॅडबरी लिहल पण ती सगळी प्रोसेस कॅडबरी चॉकोलेटचे तुकडे करुन वाटावाटी करावी इतकीच बाळबोध दाखवलीये. >>> Lol

हो अप्पांनी अरूकरता काढून ठेवलेली कॅडबरी पुन्हा कांचनने स्वतः खाउन टाकण्यासारखेच आहे. एकदा घर अरूच्या नावावर केले की मूळ मालक अप्पा म्हणून त्यांची बायको परस्पर एक सही करून ते तिच्या नव्या सुनेला देउ शकायला ही प्रोसेस कॅडबरी देण्याइतकीच सोपी दिसते Happy त्यात कांचनच्या नावावर यातले काहीच नाही. मग तिच्या सहीने नक्की काय फरक पडणार.

इथे अर्धे घर म्हणजे जॉइण्ट ओनर धरले, तरी अरूच्या सहीशिवाय यातले काहीच होणार नाही.

सॉरी ते चुकुन कॅडबरी लिहल पण ती सगळी प्रोसेस कॅडबरी चॉकोलेटचे तुकडे करुन वाटावाटी करावी इतकीच बाळबोध दाखवलीये.>>> Lol

हाहा, त्या घरातल्या प्रत्येकाचं फक्त त्या घरावरच मनापासून प्रेम आहे, म्हणून नाईलाजाने का होईना, एकमेकांची तोंडे बघून सगळे गुण्या गोविंदाने राहतात. त्याच संदर्भातला शेखरचा एका एपिसोड मधील डायलॉगने मजा आणली होती,,,, 'देव बाप्पा म्हणेल अरेच्चा, हा तर स्वर्ग, मीपण इथेच राहतो. ' असा काहीसा होता.
शेखर माझा फेवरेट आयटम आहे इथला Wink

शेखर माझा फेवरेट आयटम आहे इथला >>> अगदी अगदी ! तो एकटाच नॉर्मल जगात वावरत असतो बाकी सगळेच आशुने वर्णन केलेल्या डेलि सोप विश्वातले वाटतात, आशुची अ‍ॅक्टिन्ग दिवसे दिवस बाळबोध वळणावरुन रिव्हर्स ट्रेक पकडत बालिश आणि अजुन बालिश होत चाललिये.

शुभ प्रभातः
अजुन वाढदिवसाची तयारीच चालू आहे अर्धा एपिसोड पंधरा मिनिटे हेच चालू आहे. इशा चे तोंड स्टेपल केले पाहिजे. अनघा फुगे फुगवत आहे.
यश पिपा णी वाजवत अजून इरिटेट करत आहे. कारण आजीला हे सगळे आवडते. अनघाची चार समजुत दार एक्स्प्रेशनस आहेत. गौरीची तीन आहेत प्लस एक रड के तोंड. अरु व गौरी केक करत आहेत. मग आई वाढदिवस कसा करत असे त्याच्या सुरेख आठवणी येतात. इशा आपण कसे वागायचो ते आठवून रडायला येते मागे पिया नो व आई च्या आठवणींचा कोरस व एक कंप्लीट ब्लँक स्पॉट आहे. मग सर्व पात्रे ठरवुन एक एक रिअ‍ॅक्षन देतात. अभी आई ने केलेल्या आयत्या वे ळच्या बटाटे वड्यांच्या आठवणी काढतो. चिप्स गुलाब जाम व बटाटे व डे. आई किती निगुतीने करायची ते सर्वांच्या एकदम लक्षात येते व सर्व अंतर्मुख होतात. अप्पा पण दोन आई ला पण आनंदी असायचा हक्क आहे हे वळ से देतात. आई क्राफ्ट रिटर्न गिफ्ट करायची ते आठवतात. अनघा लगेच ताई ताई तिला बरे वाटेल म्हणते तिला हे सांग.

ताई तुला मिस करते. कंप्लीट मुलांची गोड धावपळ बडबड चालू आहे. हे प्रेक्षकातील आया आजांना आव्डत असावे असा लेखिकेचा होरा असावा.
आनंदी संगीताचा रेकोर्डेड पीस. सुखाचे चम चमते चांदणे.

कट टू आशू. आई संवाद. वर्शा एकदम बरी होउन घरी जाणार लगेच आशू हॉस्पिटलात जाणार होता. मग अरू रोज डबे देत आहे त्याचे भर भरून कौतूक. ती कशी ग्रेट आहे वेगळी आहे. एकदम स्कूल कधी सुरू होईल वगैरे चर्चा चालू आहे. आशू आई बरोबर बाहेर जेवायला जायचा प्लान बनवतो. हा फार प्रेमळ आहे. आईच सर्वसव असलेला हा घोड मुलगा आहे. नित्या आलेला आहे. त्याने काही कामाचे आणले आहे. मोस्ट ओबिडिअंट सर्वंट. आता जर पेपर हपिसात आहेत व आशू जाणारच आहे अकाउंत डिपा त्याला तिथेच चेक देउ शकत नाही का!! नित्याने घरी कशाला आणायचे. उगीच ड्रामा व आशूला स्पून फीडिन्ग. डिपेंडंट बनवून ठेवले आहे.
परत अरूचे कौतूक वर्शा कशी आहे जिगर कसा आहे. खूपच मायेने चौकशी करते. अरुंधतीच करेक्ट आहे आशू साठी हे सत्य बोलून दाखवतो हे तोंडदेखले त्याला जेवायला चल म्हणतात. आई व मुलगा पाच मिनितॅ अरु चे साधे पणा तील सौंदर्य् ह्यावर पी एच डी करतील असे संवा द ह लिहीत आहेत.

आता घरी कांचीची एंट्री होते. डिप्रेशन मध्ये जास्त खाल्ल्याने वजन वाढले आहे ते दिसते आहे. सहा महिने उपाशी राहिले तर हिचे पाय दुखणे कमी होईल. केव्ढी गब्दुल दिसते. व चेहर्‍यावर एकदम लाजरे साजरे भाव. साडी जरा बेकार वाटली मला तर. आई व गौरी केक घेउन येतात. व दंगा चालू आहे. अप्पा आईला बघून परत चक्क गप्प होतात. होल्ड इट ओल्ड बॉई. पब्लिक आजी आबांना पिक्चर ला पाठवणार आहे केक औक्षण झाल्यावर.

विशाखा केदार पण येतात. माफीनाम्याचा सोहळा गहिवरुन येणे सर्व यथासांग.

आता के क औक्षण मध्ये उद्यचा भाग होईल. एक आठवडा फक्त कांची चा बर्थडे. लेखि केला प्लॉट कसा न्यायचा पुढे हे समजले नाही की काहीतरी सेलिब्रेशन टाकतात मध्येच.
सेलिब्रेशन चालू आअहे. इथे भाग संपतो.

प्रो मो मध्ये अनदर संजना व अरु संवाद. टी आर पी ह्या मुळेच खेचता येतो त्यामुळे हे अधून मधून असतेच. दोघी तितक्याच डंब असल्याने चलतंय.

इथे अर्धे घर म्हणजे जॉइण्ट ओनर धरले, तरी अरूच्या सहीशिवाय यातले काहीच होणार नाही.....
फा... Happy .. म्हणजे अर्थात.... आहेच सगळे बाळबोध..!
पण मागे एकदा संजना व आजीने अरुची सही घेतलेली दाखवली होती...गौरीच्या घराखाली..!! तुझा तो भाग मिसला असेल कदाचित...!!
Lol ... त्याने अर्थात फारच सगळे लीगल झाले असे काहीच नाही!!!!... सगळा नुसता लेखिकेच्या मनाप्रमाणे वाहणारा प्रवाह!!

वर्षांचं आजारपण जेलमध्ये जावं लागलेल्या पोलिटिशियन्सना येणाऱ्या आजारपणापेक्षा फास्ट होतं.
व्हेंटिलेटर काढला आणि बाई घरी जायला निघाली.

आता जर पेपर हपिसात आहेत व आशू जाणारच आहे अकाउंत डिपा त्याला तिथेच चेक देउ शकत नाही का!! नित्याने घरी कशाला आणायचे. >>> त्याला हे माहित आहे कि अरूकडे काही अडचण आली कि लगेच हा कार्यालया ऐवजी तिच्याकडे जाईल.

एकंदरीत आजच्या भागात अन्या आणि संजना यांचा समावेश नाही म्हणून मजा नाही.बाकी अरु आणि बावळट आशु यांच्यामुळे संवाद आणि मालिका नुसती गुळगुळीत आणि मुळमळीत होत. शेखर येतो अधे मध्ये फोडणी द्यायला.
@अश्विनीमावशी : तुमचे रोजचे विश्लेषण मालिका बघायला प्रवृत्त करत.

शेवटी मचूळ गोडपणा खूप झाल्याने तुपारे सारखा कहानी मे ट्विस्ट आणावा (कहानी की माँग वगैरे नव्हे. तसे काही करण्याची व यांनी ते केलेले पाहण्याची आपली डेअरिंग नाही). म्हणजे अरूच कारस्थानी असून हे घर हडप करण्याचा तिचा प्लॅन होता, आणि अर्धे घर तिने ऑलरेडी घेतले होते आता गाणी बिणी गाउन उरलेले घेणार. असलेच काहीतरी लॉजिक असते यांचे.

कांचन वय ६८. अगदी अठराव्या वर्षीच लग्न लावलं?

आशुतोष हा नितीनची पहिली की दुसरी बायको असा काहीतरी डायलॉग ऐकला.
त्याने त्याचे आयुष्य मला वाहिले म्हटलं तिथेच कळायला हवं होतं.

तर शुभ प्रभात हॅपी वीकांतः आज आम्ही लेकीच्या एसी बेड रूम मधून आराम करत पोहे खात रिपोर्ट करत आहोत की सावळा गोंधळ तसाच चालू आहे.

केदार ची अन्या माफी मागतो चक्क. : तू अरुला वाइट चुकी चे आरोप करून बाहेर काढलेस हे चुक ले असे केदार सांगतो तेव्हा अन्या कबुली देतो की माझी मते वेग ळी असतात व मी चुकलो त्यामुळेच मलाही एक धडा मिळाला आहे. माझीही फसवणूक झालेली आहे. व संजना कडे बघतो.
ती जरा चपापते. विशाखा सर्व परत छान होईल म्हनते व कांचीच्या औ क्षणा चा सीन. कांची आप्पु ला साडी कशी आहे असे लाडिक पणॅ विचारते. पण त्यातही आजी अरुची माफी मागते . अरु सर्वांची मने संभाळते सर्वांना एकत्र ठेवायचा प्रयत्न करते पण मी कशी तुझ्याशी वाइट वागले. अरु मोठ्या मनाने कांची चे सर्व अपराध पोटात घेउन तिची समजूत घालते व औक्षण करते. हे बघून संजना उखडते व दाराशी जाउन थांबते.

तिथे गौरीला फटा फट आजी कशी डबल ढोलकी आहे. वगैरे मनातील विचार बोलुन दाखव्ते. गौरी अमेरिकेतून भारतात आल्याने तिला येथीक कुटुंब संस्थेचे महत्व समजलेले आहे. हे प्रेक्षकांवर ठसवायचे असल्याने गौरी तिची समजूत घालते. हेच तर एक त्र कुटुंब. भांडतात पण परत एकत्र होतात. हे गौरी तोंड वाकडे तिकडे करत सांगते. सर्व बायकांच्यावर हेअर एक्स्टेंशन चा खर्च केला आहे प्रोडुसरने. उघडा डोळे बघा
नीट.

कांचन मुद्दाम करते आहे. अरूची माफी मागितली आहे. मलातरकैकळतच नाही. गौरी च्या एकत्र कुटु भा षणाला खंग्री मॅनने एकदम बासरी व पियानो व एकदम कोरस असे प्लेसंट संगीत दिले आहे. संजना एकटी पड लेली आहे. तू त्यांना प्रेम दे ते ही तुला भर भरून प्रेम देतील. आप्प्पू संजनाला बोलवतो. आजी लगेच बोलून दाखवते तुला बोलवले नाही तर तू मला हाकलशील. कर बाई औक्षण. कांचन भांडायला निघाली आहे. दोन दिवस समजुत खिचडी खाउन तिला पोट बिघडले असेल.

संजना पण ओवाळ ते. तेव्हा अगदी मटका ठेका व संतूर वगिअरे. खंग्री ला भारतीय संस्कृ ती शब्दा चा क्यु बरु बर कळतो.

मग महत्प्रयासा ने गप्प बसवलेली तरूण पल टण ओर्डा आर्डा करत विश करते व पाया पडते. मग विशाखा केदार साडी कुर्ता कांचाप्पा ला गिफ्ट करतात. मग केक कापणे. इस्टर नंतर चा उरलेला बेकरीतला केक स्वस्तात आण ला असेल असे दिसते पिंक व्हाइट आयसिन्ग आहे.

अन्या अरू ला धन्यवाद देतो ती पण कांचाप्पाला सुखात ठेव अशी विनंती करते. हे लाडाची सवत बघते. व तिचा कोळसा झाला आहे.
मग फॅमिली फोटो. अन्या अरू ला बोलवतो पण संजनाला नाही. ( आप मतलबी की सुधारलेला सुधाकर!!) नुसता आप्पा संजनाला पन फोटोत घेतो अविशेजारी. गाडीच्या मागे स्टेपनी.

कांचाप्पा पिक्चर ला गेल्याने बाहेर टेबल टाकून केदार विशाखा अरू बोलत आहेत. संजनाय्चा घर बळकावण्यावर. संजना ऐकून परत
थयथयाट करत आहेत. लैच पाताळ यंत्री आहे संजना असे विस्खाखा म्हणते आपण फाइट करू पण घर तिच्या नावावर होउ द्यायचे नाही.
तो थय थ्याट चालू झाला आहे. केदार तिला सामोरा जाउन तुसडे बोलत तिची अक्कल काढत आहे.
अरु समजवायला जाते तर संजना तिला गप्प करते व परत अन्यावर डोरे घालू नकोस म्हणते.

खंग्री म्यान फॉर्मात आला आहे. क्रायसिस संगीत चालू झालेआहे. संजना हात धरून तिला नाटकी पद्धतीने बेडरूम मध्ये नेते. व ही आता माझी जागा आहे हे सांगते. गुळगुळीत झालेला भावनिक पॉइन्ट. पण अरु ला पूर्वीच्या सर्व वाइट आठवणी येतात पाच मिनिटे फ्लॅश बॅक आहे अन्याच्या शिव्या खातानाचा. ती एक क्षण व्हल्नरेबल होते पण सावरून मी माझ्या फॅमिलीसाठी घरा साठी लढणार आहे असे ठासून सांगते प्रोमो मध्ये.

खरे तर हीच बेडरूम हाच म्यान पण माझ्या आठवणी किती सुरेख आहेत व माझे कर्तू त्व बाहेर तीन मोठ्या मुलांच्या रुपाने दिसते आहे. तू ह्या बेडरूम मधील तुझे कर्तुत्व आठव व तो म्यान तुझ्याशी कसा वागतो ते लक्षात आण असे सांगता येइल अरूला. पण लेखिकेला श्रम घ्यायचे नाही आहेत.

संजना कटु बोलायची टोमणे बाँब टाकायची परिसीमा करत आहे. शी इज सो इन्सेक्युअर.

आई अप्पा मुले ह्यांच्या साठी अरू लढणार आहे.

अमा.. Happy

कांची काय, आप्पू काय.. कांचाप्पा काय.....! हसून हसून मुरकुंडी वळली.... Lol Lol

काल अनुपमाचा एपी बघितला त्यात अनु च्या लग्नाची तयारी चालली आहे। सासरे बुआ म्यानिक्युअर करून देतात आणि रात्री अनुची सुनबाई तिला अनुज बरोबर बाहेर पाठवते तेही एक च्या आत घरी परत येण्याच्या बोलीवर (डोळे गरागरा फिरणारी बाहुली ). अनुज काळ्या शर्टमध्ये इतका चिकना दिसत होता .

शुभ रविवारः आज अगदी देवगड हापुस नीट कापून चमच्याने खायला घ्यावा तसा सवती सवती संघर्ष त्यांच्या कार्य स्थळीच मांडला आहे. चांगले लेखन व अ‍ॅक्टिन्ग. दोन्ही बाजूने. जरूर बघा. खंग्री मॅन ने पण संघर्षासाठी उपयुक्त असे फोड णी पीसेस शोधून शोधुन आणून टाक्ले आहेत जागो जागी. पूर्वी जेव्हा लफ्डे अ‍ॅक्चुअली घडत होते व रोजच काय नाकाय ठिणगी पडायची तेव्हा ते पीसेस वापरले आहेत आज तुंब्यातुन काढून टाकले आहेत परत.

काल लैच उकाड्याने झोप बरोबर झाली नाही. कुत्रे पण डुलक्या घेते आहे तेव्ढ्यात वृत्तांत लिहून घेते. मग मला हनुमान चालिसा म्हणायचा आहे.

तर दोघी बेडरुमात आहेत. सं अ वर अनेक आरोप करत. मी व अनिरुद्ध घराचे व कुटुंबाचे पालक आहोत. तो कित्येक वर्शे मला सोडू शकलेलानाही. मी इथे हक्काने उभी आहे. अरू ला कमी लेखते. तेव्हा अरू भ्रमात होती. ते चुकीचे होते तसे काहीच नव्हते कोणी तुला मिस करत नाहीये.
जागी हो अरो. सत्य बघ तू इथे कोणीच नाही मी मालकीण आहे. उगीच इंग्रजी झाड ते.

अरु निघते म्हण्ते तर लगेच आशू वाट बघत आहे का असे खडूस पणे विचारते. अरु चा संयम रिमार्केबल आहे.

पंच न मिळाल्या मुळे संजना चा मूड जातो.
अरू तिला तुझे फ्युचर भयानक आहे जेल मध्ये जाशील व मुलगा पण काय तुझी ओळख करेल तू इथे का येतेस घरच्यासारखी का वागतेस
अरु तिला म्हण्ते मग तू कर कायते
संजना: मी बघेत्न कायते.
अरु: मग बघ की ह्याला काही पावित्र्य नाही हे सर्व धोक्याने मिळवलेले आहे. रिअ‍ॅलिटी हीच की बेडरुमच्या बाहेर तुला काही किंमत नाही. तू घराला पण मुकशील कायमची. आपन खूप मोठी चूक केली आहे हे तुला माहेत आहे. ही लगेच नाझी पणे चुकीचे खापर अरूव रच फोडते.
मला सिकुरीटी हवी होती. मला कायद्याची भीती दाखवू नकोस. तुला कळत नाही किंवा तू डोळॅ झाक करत आहेस. ह्या लेव्हल ला बरेच वेळ कलगी तुरा सवाल जवाब चालतात.

मग एकदम ढांग ढांग डफ ली संगीत आहे. अरु बेडरूमला मंदीर समजायची. शुद्ध प्रेमाची जागा. पण ही लाभत नाही असे दिसते. हा संवाद छान लिहिला आहे हो.

इथे पण तू एकटीच आहेस.

संजना आता रडकुंडीला आली आहे अन्या सोडून जाईल अशी तिची भीती बाहेर आली आहे.
निखील काय समजेल. हे अन ते चालू आहे. मला कोणी अडकवु शकत नाही.

मी मुलांच्या कांचाप्पाच्या हक्कासा ठी लढेन.
संजना मला कोणाची पर्वा नाही हे बोलते.
कुटुंबाची ताकद अरु ने आपल्याकडे जपली आहे व सं एकटी पडली आहे.

पेपर परत कर नाहीतर कोर्टात भेटूच म्हणते. संजनाचा चेहरा एकदम गोल्डन डक मिळालेल्या विराट कोहली सारखा झालेला आहे. फुस्स.

खाली येउन ती अन्याला चार शब्द समजुतीचे सांगते. तिच्यावर प्रेम करा . केदार विशाखाला सोडायला सांगते.

नेक्स्ट डे चहा बनवून पीत आहे. व यश चा शर्ट शिवायचा आहे. तो घेउन बसली आहे. चार बर्नरची शेगडी एकटीला!! दूध बाहेरच!!
ही घरात पण गाउन ड्रेस शर्ट शॉर्ट घालत नाही का!! किती ते सुसंस्कार तर बेल वाजते व पुराना आशिक हजर आहे. एकच चौकडीचा सूट घालून. तोरसेकर वन एं ड ओन्ली काही बोलायला मुद्दा नसले तर नाम भक्ती करतात तसे हा अरु अरु करत असतो.
नीलेश मोहरी ने एक गाणे अरू साठी फिट केले आहे. त्या चे सिटिन्ग आहे एक दोन दिवसात.

नेक्स्ट डे सुईत धागा ओवायची किडी काँपिटिशन आहे.
इकडे अन्या दिल्लीस चालला आहे सूट घालून संजना अंगारा लावायला जाते तर अन्या नाही म्हणतो.

हे प्रोमो मध्ये.

तर आता आम्ही वॉकीज व कामाला जातो. लैच उकाडा आहे बाई.

शुभ प्रभातः

आज पहिले इशा न किशन चा विचित्र पद्धतीने झालेला कॅच आउट बघितला

आज संजनाच्या सुरेख चेहर्‍याने सुरुवात आहे त्या आधी अन्या आप्ले आपण सामान पॅकिन्ग करुन सकाळी दिल्लीला निघाला आहे. संजना लगेच गळ्यात पडते व माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे वगैरे चालू होते. पण अन्या शांत आहे व पर्तिसाद देत नाही. तो संजना ला घटस्फोट देणार अहे असे सांगतो बाई लगेच रडु लागतात. व अजूनच गळ्यात पडतात. हे पब्लिक कश्यावरुनही भांडते. संजना कल्पने पेक्षाही स्वार्थि निघाली म्हणतो अन्या.

मग तो निघतो व ही खाली पडून विचार करु लागते. धांय धांय रो रही है रानी.

इकडे आशू अरु ह्यांचा विप्रलब्ध कि काय तो श्रुंगार चालू आहे. सुईत धागा ओवणे मग मी कसा सेल्फ सफिशि अंट आहे. आईने कसे मला लहान पणी सर्व शिकीवले ह्याव अन त्याव व त्याचा अमेरिकेत उपयोग झाला. माझे डेली रुटीन मी एकट्याने पार पाडूशकतो म्हणतो प्रेमीलेकरु.
मग नित्याला कश्याला वेठ बिगार बांधले आहे.

मग ते सुईत दोरा ओवायची स्पर्धा करतात. त्या मागे. लहान मुले नर्सरीत खेळत असतात तसे क्युट मजेशीर संगीत दिले आहे. किती निश्पाप निरागस ते प्रेम व मैत्री व श्रुंगार. अरु हरते मग आशूचा चश्मा घालून सुईत दोरा ओवते. ( काय कसले हे प्रतीक मेरा तो दिमागही उलटाही चलता है.!!) मग तोबिनाचस्म्याचा पारोसा प्रेमी भयानक पद्धतीने हसतो व अरु चा चस्मा घालून पेपर वाचताना फोटो घेतो. धन्य तो चश्मा असे भाव आशूच्या काळ्या सावळ्या निरागस चेहर्‍यावर आहेत.

अरु ला आपल्याला चश्मा घ्यायला लागेल हे कळते ते ही कोणी बाप्याने सुचव ल्याने. किती गोड. आशू बहुतेक तिला चश्मा गिफ्ट करेल. मयेकर चस्मेवाल्यांची जाहिरात होईल. मी आत्ताच करून घेतले.

मोहरी कडे गाणे ट्रायल साठी जायचे अरु ला टेन्शन आले आहे तुम्ही पण या म्हणते नर्सरी लेव्हल स्वतंत्र स्त्री पण प्रेमी तिला तुझीतू जा म्हणतो.

इकडे अजून दिल्लीला जाणेच चालू आहे. फ्लाइट पोहोचली पण असेल. तर प्रत्येक जण स्वतंत्र पणे विश कर तो. इशा बापाला घट् ट मिठी मारून यु आर माय हिरो म्हण ते. संजना आवरून ड्रेस बदलून वेणी घालून आलेली आहे. आजी अंगारा लावायला सांगते तर संजना पुढे पुढे
करते पण अन्या नको म्हणतो. व इशाला लावायला सांगतो. अंगारा लावणे होते. तो परेन्त शेखर भावोजी आले आहेत.

हे आता निखिलची कस्टडी पण संजनाकडून पूर्ण पणे काढून घेणार आहेत. अन्या न भांडता त्याला आजी शेजारी बसवतो व नीट ऐकून घेतो.
संजना वैतागते व तू का माझ्या सासरच्या माझ्या माणसांना सतावत आहेस असे करवादते. हे कोणी सिरीअसली घेत नाही शेखर खिल्लीच उडवतो. तुला जेल मध्येच टाकीन म्हणतो.

प्रोमो मध्ये अन्या बहुतेक परत आला आहे. अरु बॅग खांद्याला लावून कुठेतरी उभी आहे व संजना घराचे पेपार कांची ला परत करत आहे.

नीलेश दोन दिवसांत तुला गाणे ऐकवेल म्हटल्यावर तेच अपेक्षित "अरे बापरे, आता काय करायचं ? माझं कसं होणार ?" हे एक्स्प्रेशन्स आले.

तो नुसतं गाणं ऐकवणार आहे. म्हणायला किंवा तुला चाल लावायला सांगत नाहीए.

हल्ली संजनाचीच दया येते मला. या असल्या जत्रेत रहायचं म्हणजे घर नावावर हवंच. कोणीही कधीही पलटी मारू शकतो. कांचन नाही का स्वत: वाटेल ते बोलली आप्पा आणि अरूला आणि तोंडावर पडल्यावर सगळं खापर संजना च्या डोक्यावर फोडलं.
तिकडे ते अनुपमा अती झालंय. काय ती तिची भडक ओवरएक्टिंग, काय ते लग्न-लग्न-लग्न. रणबीर आलियाच्या लग्नाची पण एवढी हवा केली नाही त्यांनी.

मग तोबिनाचस्म्याचा पारोसा प्रेमी भयानक पद्धतीने हसतो ..
अमा Lol
हॉरिबल आहे तो आशुतोष !
अजिबातच अमेरिकेहून वगैरे आल्याचं वाटत नाही....!!
अनु पमा मध खरंच अती लग्न लग्न कताहेत...तेच ते अनुज चे प्रेम, अनुपमा ची भडक गुलाबी शबनम कुठल्याही साडीवर, कधीच मागे न घेतेलेली वेणी........... व्ही ऊर्फ वनराज चा रागाने उडालेला भडका...

आशुतोष किती पाठ केल्या सारखे म्हणतो संवाद , आणि संपलं एकदाच म्हणून श्वास सोडतो झालं की ते ही दिसतं चेहऱ्यावर .

Pages