आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे हे हे हे ...... हे हे. चला कुत्रा फिरव्नॅ भांडी धुणी स्वय, पाक हपीस. कुत्रा साइड हून चावतंउ

अमा . Biggrin
धुवट जोडपे....!!! वहाणे चे मनोगत Happy

खरंच...आशु च्या तोंडी तुम्हा बायकांना ..तुम्हा बायकांना अजिबात शोभत नाही...... Happy त्या ऐवजी...आपण बायकांना.. आपण बायकांना असे म्हटले तर शोभेल इतका तो बायलट वागतो!! भिजकट प्रेमी :-).. अमा, आशुसाठी प्रत्येक वेळी नवं विशेषण सापडतं तुम्हाला.....

मस्त...!! Lol

काल अरुंधतीने इतकी ओव्हर अ‍ॅक्टिंग केली. मला वाटलं कांचनबाई गेल्या की काय! >+१ हो हो . मला पण वाटल की आजी वारल्या की काय. पण नाही !

नित्या नेहमी एकाच पिवळ्या शर्टात असतो...
आणि सुलेखा बाईंना दवाखान्यात ठेवून आशु अरु ला परत पाठवलं...कुणी करेल का असं?
Normally आशु नेच थांबायला हवं होतं ना... नित्या सोबत? काही...

Normally आशु नेच थांबायला हवं होतं ना... नित्या सोबत? काही...>> हो आई व अरूला पाठ्वायला हवे होते. ती आजी काय धावपळ करेल आयत्यावेळी. पन आशू गाने म्हणत बसला असता. त्याचे पोरपण जपण्ञा साठी नित्याला डबल एडल्ट लेव्हलला काम करावे लागते आहे. असतात असे लोक

खंग्री मॅन सर्व विसरुन स्वतः च हे हे हे करत गायला लागलेला आहे. >>> हाहाहा
अरु लगेच शान पट्टी माझा मुलगा डॉकटर आहे. तुम्ही चिड्चीड नका करू वगैरे समजूत घालते. >>> पण तो कोणत्यातरी गायनॅक डॅाक्टरकडे काम करतोना. कॅन्सर पेशंट तो का बघेल? त्याआधी अशूच्या मित्राची बायको आहे हे कळल्यावर तर बघायलाही नाही जायचा.

शुभ प्रभात
आजचा भाग एकदम टीपी फिलर एपिसोड आहे. कायतर कांचन चा हे पी बड्डे!!

पण सुरुवातीस अरु बेडरु म मधून बाहेर येते तेच एक उसासा टाकत. फर्स्ट उसासा ऑफ द डे!!! मग चहा करताना तिला आशूची प्रेम्म्मळ आठवण येते. चहा होईतो एक्स सासवेचा फोन येतो व ती पाच मिनिटे एकटी असल्याने अटेन्शन डेफिसिट झाले आहे ते फील करत आहे. आशू कडून ऐकलेली पट टी अरू ऐकवते व सासूला आराम करा औशधे घ्या सांगते. कांचन तरुणी नवर्‍याच्या आठवणी काढून रडत आहे.
त्यावर अरु डिनाय करा वाइट अ‍ॅठवनॅ असा सल्ला देते. कां ला सेलिब्रेशन ची इच्छा नाही. म्हणॅ

अरु हपिसातुन काम झाले की जाणार आहे व यश ला सूच ना देते तयारीच्या. सुखी हस्रे नाचरे संगीत आहे.

नेस्ट डे. कांचन एक पाच दहा मिनिटे देवाला मागणे घालत आहे. ते ऐकून देव पण थकून जाईल. व ओके ओके बघतो काय जमते ते. एव्ढे करून तुझाच आधार म्हणते. मागे वळते तर सर्व तरूण पार्टी फुले देउन विश करतात. इशाचे ओरडा आरडा व आजूडी चालूच आहे. आता आजी डोळ्यात पाणॅअ‍ॅ आणून भजी वडे करा वांगी भात करा खीर करा सूचना देते. अनघा पण काम सोडून आज फुल डॅ घरी आहे. अप्पा ने विश केले नाही म्हणून कांचन रुसली आहे इशा साधारण दोन वर्शाच्या लाडावलेल्या मुलीसारखी वागत आहे व जोरदार प्लानिन्ग चालू आहे. भारतीय संगीत वाला मधूनच बासरीचे करूण स्वर टाकत आहे.

अरू फोन करून विश करते व काम झाले की येइल म्हणे

इकडे आशू विचित्र रंगाचे जॅकेट घालून( अमेरिकेतले लोक असे ड्रेसिन्ग करतात असा व्हिडीओ स्टायलिस्ट ने बघितला असेल - जीन्स वर डर्टी यलो ऑकर जॅकेट व्हाइट टीशर्ट - गर्ली टीशर्ट बरं खिसे कॉलर वा ला जेंट्स शर्ट नव्हे. हा वर्क डे वेअर!!) हा चहा पिउन जाणार आहे. आई बाहेरुन येउन पटकन पोहे करणार म्हणे. ही हास्पिटलात कॉफी घेउन गेली होती. वर्शा बरी आहे. व्हेंटिलेटर काढला आहे. उत्साही प्रेमी लगेच अरु ला फोन करून भेटायला जातो. चहा पण विसरतो. आई जोडप्याला डबा पाठवेल म्हणे. चहा पन विसरतो. मीटिन्ग म्हणे. आई सुखद हसते
संगीत पण सुचां आहे. ( आता सुभाश घई येणार ये तो होगा जी म्हणत!!)

कट टू विचित्र जोडपे: अन्या संजना अन्या काम करत आहे. संजना काही हवे असले की दोन दा प्लीज म्हणते. अन्या तिला बिनधास्त सोडून जा म्हणतो. संजनाचे मोठे तेच ते स्वगत आहे. मला फिट व्हायचे आहे. ह्याव अन त्याव तर अन्या निघून जातो. हिला दु:ख होते. अन्या एकदम तिला प्लास्टिक बॅग सारखे फेकुन द्यायच्या लेव्हलला आला आहे.

आता नेहमीचा मुले सेलिब्रेशन प्लान करतात हा विनोदी सीन आहे. आजूडी फेम इशा व वाकड तोंडी गौरी ह्या पावशेर फटाकड्या व यश प्लस अभी अनघा आजीला साडी आणू हे अन ते बहुतेक रात्री नाच गाणी. इशा ला लो पिच माहीत नाही. कायम करवादत असते. आजी अप्पाना फिल्म बघायला पाठवायचा एक प्लान येतो. केजीएफ चालेल जोडप्याला. अनघा साडी मला पण घे म्हणते आजीबरोबरीने. आमरस पुरे बटाटा भाजी, काकडीची कोशिंबीर. अनघा करणार आहे इशा गौरी एग लेस केक करतील. अवि ने भाजी आणली आहे त व आंबे.
संजना मिक्स व्हायचा प्रयत्न करते. अवी काहीतरी टोचून बोलतो. ती प्रत्यु त्तर द्यायचा विचार करते पण गप्प बस्ते. अन्या पण आईचा बड्डे विसरला आहे. सेल्फ सेंटर्ड मॅन अ‍ॅज युजवल.

प्रोमो मध्ये चक्क आशू आरू कॅफे मध्ये काहीतरी ज्युस सँडविच खायच्या प्लानत आहेत. आफटर नून डेट अंटा. पण तिला पूर्वी फॅमिलीने
आपल्याला कसे कचर्‍यात टाकलेले आहे तेच आठवते. ही हिच्या मानाने नटली आहे. कानातले नवे दिसतात व जरा भडक साडी आहे. अल्बम ची रॉयल्टी मिळाली वाट्ते!!! व्याख्या विख्ह्ही वुख्हू.

नेक्स्ट भागात फक्त आणी फक्त कांचन चा बड्डे. सासूसून मिलन. व सर्व जण आजी भोवती फेरे धरून नाचणार. आजीप्रेमाचा भोंगा जोरात आहे.
अरु प्रेमाचा सावकाश वाजत आहे.

आशुतोषने २५ वर्षांपूर्वी सांगितलं असतं तर ; तुला काही झालं तर माझं कसं होईल ? ही वाक्य पेरण्यासाठी नितीनच्या बायकोला दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवलं. व्हेंटिलेटर म्हणजे गंमत वाटली?

आशुतोषने २५ वर्षांपूर्वी सांगितलं असतं तर ; तुला काही झालं तर माझं कसं होईल ? ही वाक्य पेरण्यासाठी नितीनच्या बायकोला दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवलं. > Biggrin

फर्स्ट उसासा ऑफ द डे!!! >>>
केजीएफ चालेल जोडप्याला >>> Lol

केजीएफ बघून अप्पा अन्याला "If you are bad, I am your dad" नक्की म्हणतील Happy त्यातलाच एक संवाद आहे.

मी अजून मागेच आहे. त्या नितीनच्या लाइफ प्रायॉरिटीज अजब आहेत. एका बाजूला भरपूर टेस्ट करून सुद्धा डायॉग्नॉसिस होत नसलेली बायको, तेथे दिमतीला फक्त बायकोची आई. तर तिकडे हा अजून घरी जायला तयार नसलेला पण सुनेच्या घरी आरामात असलेला कोणाचा कोण अप्प्या. तेथे दोन्ही घरी भरपूर लोक मनधरणी करायला आहेत. तरी हा बेगानी शादीमे तेथेच.

याच्या बायकोच्या डायॉग्नॉसिस चा अजून पत्ता नाही आणि सर्वात भारी ट्रीटमेण्ट करायला केळकर निघाले आहेत. केळकरही दिवसभराची अळंटळं व जनरल गप्पा वगैरे झाल्यावर दिवसाच्या शेवटी याच्या बायकोची चौकशी करत आहे.

यातली सगळी मंडळी आणि त्यातही पुरूष मंडळी इतकी पॅसिव्ह कशी. अन्या घरी आल्यावर सुद्धा दुसर्‍या दिवशी सकाळी "मी जाऊ का? अप्पा माझ्याशी बोलतील का" विचारात आहे. तर त्याचा भाऊ त्याचे काहीतरी बाहेर काम आहे म्हणून मग लगे हाथो अप्पांना भेटायला जाणार आहे. घरातील २-३ स्त्रियांना/मुलींना हजर प्रसंगाबाबत कॅमेर्‍यावर प्रतिक्रिया देणे हे एकच काम आहे.

प्रत्यक्षात घरात माणसे कोठेही बसलेली असोत, कोठेही बघत असोत. दारापाशी काही हालचाल झाली तर लोकांचा एक अ‍ॅण्टेना तेथे कायम लक्ष ठेवून असतो. यांच्या दारातून कोणी आले, तर हे लोक जोपर्यंत मान वळवून तिकडे पाहात नाहीत तोपर्यंत यांना पत्ता नसतो.

अप्पा अरूंधतीला केळकर तुझी वाट पाहात आहेत सांगतात व अरूंधती तिकडे बघते तेव्हा बॅकग्राउण्डला "जिंदगी हर कदम एक नयी जंग है" चे म्युझिक वाजवले आहे.

फा !smiley36.gif

नितीनने त्याचे आयुष्य मला वाहून घेतले आहे - आशुतोष.
या वाक्यासाठी संवाद लेखिकेला ज्ञानपीठ देण्यात यावं.

आज सहा तास व्हेंटिलेटर लावावा लागला नाही. - व्हेंटिलेटर असा सारखा सारखा लावता आणि काढता येतो?
नितीनच्या बायकोची बातमी कळल्यावर आशुतोष आधी ती अरुंधतीला सांगतो आणि हॉस्पिटलात ती येणार का ते विचारतो. यातला त ओंकार गोवर्धनचा अभिनय असा की गावात एक प्रदर्शन भरलंय ते पाहायला येतेस का? मरणाच्या दारातून एक व्यक्ती प रत येतेय असं त्यात कुठेही जाणवत नाही. ओंकार गोवर्धनला अभि नयाचे उणे गुण.
आयडियली आशुतोषने नितीनला रिलीव्ह करायला काही वेळ हॉस्पिटलमध्ये थांबायला हवं. पण तो कांचनचंच एक व्हर्शन आहे.
आशुतोष स्क्रीनवर आला की तो दिसणार नाही, त्याचे संवाद ऐकू येणार नाहीत, असं तंत्रज्ञान हवं वाटायला लागण्या इतका तो डोक्यात जातो.
तरी माझा टीव्ही पाहताना दुसरा काही उद्योग चालू असतो.

काहीही विशेष प्रसंग असला की सगळेच ओव्हर अ‍ॅक्टिंगचं दुकान उघडतात.

अरुंधती कांचनला - आपण स्त्रिया आपल्याकडे लक्ष देत नाही. प्रकृतीची काळजी घेत नाही. - कांचन स्वतःकडे लक्ष देणं आणि इतरांचं लक्ष कायम आपल्यावर ठेवणं आणि तब्येतीच्या कुरबुरी सांगणं यापलीकडे दुसरं का ही ही करत नाही.

<तेथे दोन्ही घरी भरपूर लोक मनधरणी करायला आहेत. तरी हा बेगानी शादीमे तेथेच.>
तो आशुतोषचा गार्डियन एंजल आहे. आशुतोषला एकटं सोडू नका असं त्याच्या लहानपणी कोण्या बाबाने सांगितलं असेल, म्हणून हा. आशुतोष अमेरिकेत असतानाही फोनवरून त्याच्यासोबत असे.

आशुतोष अद्याप कार ड्राइव्ह करताना दिसलेला नाही. ड्रायव्हर म्हणून नितीन असतो किंवा अरुंधती सोबत असेल तर कार आपणच चालत असते.

कुत्रा+घरकाम+पिक्चर( मॅट्रिक्स रिसरेक्षन युट्युब वर घेतला आहे भाड्याने सो तो बघायचा आहे दोन दिवसात) + गेम इवेंट तो ही वर्किन वीक मध्ये.
कुत्रा फिरवून येते व अपडेट लिहिते. माझे सिंगल लाइफ किती वेगळे आहे. अर्थात मी काही चाळीशीतली पुरंध्री नव्हे. मै तो नन्नासा छोटा सा बाच्चा हू.

तर मंडळी, आज कांची चा वाढदिव्स.

अन्या विश करायला खाली येतो पाठोपाठ लाडाची चं द्रकळा पण येते. अन्या आईला विश करायचे आहे पण विसरलो म्हणातो व बाहेर जाउन येतो म्हणतो. पाठी संजना पण जायला निघते तिला घरातली टीम विचारते की तू आहेस ना घरी काम करायचे आहे वगैरे. मग तिच्यावर कुचकट भाश्य होते. अभी तिला काम चुकार म्हणतो. ( स्वतः ला अजुन आई नाहीतर बायको लागते.... धुवायला!!!) एक डबा बनवता येत नाही.

मग इशा परत डेकोरेशन ची कटकट करते अनघा विमल किचन मध्ये प्लस आमरस कोणीतरी करायला घ्या म्हणते. ( पण कोणीच उठत नाही.)

कट टू आशू अरु लव्ह डेट ओव्हर कॉफी. इथे अरू मी कशी साधी हॉटेलात कधी गेलेली नाही. नवरा मुले कसे हिला काय कळते. अन्या म्हणतो तू कुठे पैसे देणार तू घे हवे ते मग ती पॅन केक म्हण जे मिश्र कडधान्याचे थालीपीठच ना मी घरी करते की एवढे पैसे कशाला खर्च करायचे म्हणते व फॅमिली तिला तु क देते. इशा व अभी तिला काय चायनीज काँटिनेंटल कळणार तू दाल खिचडी घे म्हणतात. हा एव्ढा सर्व फ्लॅश बॅक आहे. अन्या तूला कळ त नाही मेनु इंग्रजीत आहे. म्हणून मी तुला नेत नाही. तेव्ढ्यात मी सेंडविच बनवले असते.

इथे मागे एच डी एफ सी एटिएम सारखे पण ते नव्हे असे सतारीचे पीसेस आहेत. विशूध्द प्रेम असल्याने इतकेच. प्रेमी लगेच तिला ऑर्डर द्यायची संधी देतो. क्किइत्ती गोड आहे. नाहीतर अन्या( कमीना वुमनाइझर एम सी पी) ही पाणी महाग भाजी महाग करते. वेटर बिचारा उभा आहे

मग ती मेनू कार्ड मध्ये राइट ला बघून वाचून मँगो मिल्क शेक मागवते. विदाउट क्रीम. लघळ प्रेमी लगेच हेल्दी चॉइस म्हणतो. व तेच मागव्तो. इन्हे नई सुधरेगा. ( मला तो फ्रेंड्स मध्ये चँडलर एकदा बायकी होतो व लॉबस्टर मागवा डेटवर असा सल्ला मुलींना देतो तो सीन आठवला उगीचच)
हे हॉस्पिटल व्हिजिट व मीटिन्ग च्या मध्ये ब्रेक घेत आहेत. मग फुल जेवायला नको का?! काहीच खात नाहीत. बरोबर हपिसात म्हाता री ने घरगुती डबा पाठिवला आहे तो खायचा असेल मग रूम मध्ये.

आशू फुल टू अमेरिकन साइकिआट्रिस्त मोड मध्ये जाउन अरू ला लो सेल्फ एस्टीम असल्याने बहुदा सेल्फ लव्ह ची माहिती देतो. ( ही आज लेखि केने गुगल केलेली असेल नक्की.) हे गुळगुळीत मडके समोर बसल्याने( नवे कानातले व फॅन्सी साडी ती ही हॉस्पिटल मध्ये जाताना!!
त्या मडक्याला पटते सगळे व ऑर्डर देउन यस आय डिड इट म्हणते. मडक्यावर सुरकुत्या पडायला सुरुवात झालेली आहे.
आशू आई अप्पा चौकशी करतो.

अन्या संजना बुके व वेगळे फूल प्रत्येकी घेउन कांचीला विश करतात. नमस्कार पन करतात. अन्या विशाखा व पतीला बोलवायचे म्हणतो संजना नको म्हणते. कांची त्यातही खडूस पणा करत आहे. अप्पा कुठे आहेत विचार तो अन्या पन अप्पा गायब आहेत.
आपली माणसे बरोबर असावीत असे तिला वाटत आहे. एक टुन टुन पीस आहे.

परत लव्हरस कार मध्ये संवाद. अरु तुम्ही येता का विचारते पण तो नाही म्हणतो. ह्यांना अप्पा दिसतात त्यांना घेउन ही मीटिन्ग सोडून लगेच घरी निघून येते. अरु फारच अप्पा अप्पा अप्पा अप्पा चला ऐका करत आहे. अप्पा अप्पा आईचा वाढदिवस आहे. शी इज इन ऑर्डरीं ग मोड मध्ये.
ड्रायवर ला पण टेचात सूचना देत आहे. आशू पायशी घडी घालुन बसायच्या मोड मध्येच आहे. ही लगेच अप्पा अप्पा आधीचे विसरा. माझ्यासाठी कांचीला परत पदरात घ्या. सांगते.

कट टू घर. संध्याकाळा चॅ प्लानिन्ग आहे. आजीच्या हस्ते झाड लावायचे फाइनली ठरते आहे. अप बीट म्युझिक.

अप्पा आले नहीत म्हणून आजी टेन्शन मध्ये आहे. तेव्ढ्यात अप्पा व अरु येतात. अरु ने अप्पाना आजी साठी कांचीवरम साडी घ्यायला लावली आहे. ते रुसलेलेच आहेत. पण आनंदी संगीताचा पीस लावल्याने त्यांचा नाइलाज होतो. व अरु मागून बंदुक धरून अप्पाला बायकोवर प्रेम व्यकत करायला मजबूर करते. ओरड त आहे. बाकी कुठल्याही सणा पेक्षा आपल्याकडे आई अप्पांचे वा ढदिवस महत्वाचे आहे. असे अरू जाहीर करते. आज जरा टिपेचा स्वर लागला आहे.
आता एकदम बासरी, मटक ठेका. जुने मुरलेले लोणचे आपलं प्रेम भांडणा आडून डोकावते आहे. पण त्याआधी सु अरूने एक नमस्कार कांचीला ठोकला आहे च. ( शॉट्स प्लीज.) मग गजरा घेतात हातात व म्हातारी पाठ करुन उभी राहते. डोळे मिचकावते. ( अब इन्हे क्या करता क्याकी बोलके मेरेकु लगा!!!) पण तो फक्त खोट्या गंगावनी अंबाड्यात गजरा माळ तो. एक दम खंग्री मॅन अप बीट संगीत मारतो आहे. मिच्चीफस कुठला. लाई दिवसांनी आले भाउ. ऐका च हे संगीत. विमलः अप्पानु आजी वाट बघतंत !!( कश्याची!!! गेट अ रूम गाईज!! म्हातारा सकाळी व्हायाग्रा आणायला गेलाहोता कि कॉय व्ह्याख्या विक्ख्ही वुख्हु!!!)
मग एक हसरा फोटो होतो व ओरडा आरडा सर्व लोक खरेच गाणॅ म्हणत कांची अप्पा भोव ती सर्कल करत फेरी मारतात. हॅपी प्रसंग. व तसेच संतुरी मुझीक आहे. मला वाटले परत सुखाचे चांदणे सुरू होते कि कॉय. संजना एकटीच बाजूस उभी राहते. इथे भाग संपला

प्रोमो मध्ये परत संजना घर म्म्म्म्म्म्झे आहे तू किचन मधून चल ह ट. करते. व आशूचे एक मेटा वाक्य आहे

>>>माझ्यासाठी कांचीला परत पदरात घ्या.
>>>लघळ प्रेमी लगेच हेल्दी चॉइस म्हणतो. व तेच मागव्तो. इन्हे नई सुधरेगा.
>>>ही पाणी महाग भाजी महाग करते. वेटर बिचारा उभा आहे
>>>इथे मागे एच डी एफ सी एटिएम सारखे पण ते नव्हे असे सतारीचे पीसेस आहेत.
Biggrin

व्हायाग्रा Rofl
अमा धमाल फटकेबाजी केली आहे तुम्ही.

शुभ प्रभातः

आज सुरुवातीलाच भांडान. ते ही स्वयंपाक घरातले. बेस्ट टी आर पी खेचिन्ग सीन. अनघाला खास स्वयंपाकाचे दडपण येते. विमलला पुर्‍यांची कणीक व पोळ्यांची कणीक कशी भिजवायची त्यातला फरक वैनीनेच समजावुन द्यायाला लागतो. अरु तिचा मेड इन १८५७ फोन फ्रिज वर ठेवुन ( सवई प्रमाणे हो.) लगेच पदर खोचुन सूचना द्यायला लागते. पण मध्येच थबकते . संजनाने दिलेली हे म्म्म्म्म्माझे घर वॉर्निन्ग आठवते व ती मागे सरकते. माणशी एक बटाटा घ्यावा उकडलेल्या बटाटा भाजीस हे सासू सुनेस सांगते. अनघा विमल तिला धीर देतात पण ती मागे सरकते. हे संजना बाहेरुन ऐकते व तुझे तुलाच समजले हे बरे झाले. म्हणून परत हे मा घ आ. कि मा. हे रोज रोज तेच. तुझा हक्क नाही. पाव्ण्या सारखी आली आहेस function at() { [native code] } दोन तासात जा. विमल भांडायला निघते. पण अनघा अरु तिला मागे सारतात. भांडण पेटणारच असते अजून. हे मालवणी कालवण रट रटत आहे. घर घरावर हक्क. तुमच्या सारख्या मिडल क्लास बायका. ह्याव अन त्याव चालू आहे. अन्या पण कढईत उडी घेतो. संजना तिला हाकलते. अन्या लगेच मला हे जम णार नाही मी आई पोरे दुसरीकडे जातो व तू घरात राह एकटीच. !!!! एक क्षण मोहाचा तो आवरला अस्ता तर ही वेळ आली नसती ओ महाराजा.

अरु भांडण आवरु न बाहेर निघते. संजनाला घरात कोणीच सपोर्ट देत नाही आहे. मुलांची गडबड चालू आहे. खंग्री मॅन मॅजिक मशरूम खाउन आल्याने एकदम मेरी गो राउंड चालु असल्या सारखे संगीत मारत आहे. जनरल कल्ला चालू आहे. अरु पण मुलांना काही सूचना करते संध्याकाळ च्या कार्यकरमाच्या. आई - अरु लाडीक संवाद चालू आहे. विशाखा केदार ची वाट पाहात आहे कांची.

आरू ला आशूचा फोन येतो. तेच भाड्याचे जाकीट. आशूचे तिचे सेल्फ लव्ह. तू ग्रेट आहेस तू अमेझिन्ग आहेस तिला सांगणे. तुमचे घर म्हणजे सोप ऑपेरा आहे अन्या संजना टॉक्सिक आहेत तू तिथे जाउ नकोस. हाउ मेटा. ह्या वाक्या बद्दल त्याला थोबाडले पाहिजे- उकडलेल्या कॉलि फ्लॉवरने. एकदम शोभेल. किची किची बोलत आहेत दोघे. हा इन्वॉल्व्ह झाला आहे म्हणे तिच्या लाइफ च्या स्टोरीत.

फोन ठेवु न परत प्लानिन्ग चालू आहे. अन्या पण जॉइन होतो. आजी अप्पा मागून बघत आहेत. संजना मागून एकट्याने बघत आहे. अन्या व अरु हसत खेळत आहेत ते तिला बघवत नाही.

आता ही आश्रमाचे काम सोडून फुल टाइम सुखाचे चांदणे मध्ये काम करते का!! कारण रोजचे सिक रुटीन हा भाग हिला नाही. अप्रेझल वगैरे तर दुरची बात.

मग मुलांच्या रूम मध्ये डिस्कशन फिरसे वोइच. चालू आहे अरु सरबत घेउन येते. जुन्या काळ च्या सुखी आठव णी येतात व गेला तो काळ ह्याला खंग्री मॅन ने बासरेची करुण धून व मग वेस्टर्न संगीत दिले आहे. जाताना बाहेरुन अन्या संजना भांडण ऐकू येते. तिला प्लानिन्ग मध्ये घेतले म्हणून ती भांडत आहे. अन्या ओरडत आहे.

प्रोमो मध्ये सर्व केक कापत कांची ला विश करत आहेत. अन्या अरू हसत बोलत आहेत. अन्या तिला फोटोत बोलवतो. ते बघुन संजनाचा तिळ पापड होतो. केदार विशाखा अजून तरी आलेले नाहीत.

एका वाढदिवसावर एक आठवडा खेचला ह्यांनी. आपण बघणारे इडिअट आहोत. व्याख्या विख्ह्ही वुखू.

पण आनंदी संगीताचा पीस लावल्याने त्यांचा नाइलाज होतो. व अरु मागून बंदुक धरून अप्पाला बायकोवर प्रेम व्यकत करायला मजबूर करते >>> Lol धमाल पॅरा आहे अमा. हैदराबादी कॉमेण्ट्समुळेही मजा आली.

पुरंध्री म्हंटल्यावर एकदम शाळेतच पाठवले तुम्ही! "...मलये भिल्लपुरंध्री चंदनतरूकाष्ठमिंधनंकुरूते" वगैरे Happy

काहीही विशेष प्रसंग असला की सगळेच ओव्हर अ‍ॅक्टिंगचं दुकान उघडतात. >>> Lol हे ही भारी. त्या नितीनच्या बायकोच्या हॉस्पिटलमधे असण्याबद्दल स्क्रिप्ट मधे नंतर भर घातली आहे का अशी शंका येते. तो कोणाला सिरीयसनेस नाही हे ही खरे आहे. मी पाहतोय त्या भागात तो आशू तिला सांगतो की नितीनची बायको हॉस्पिटलमधे आहे, तर ही विचारतही नाही की काय झाले आहे.

कोणाला सिरीयसनेस नाही हे ही खरे आहे.>>>हो. नितीन पण सिरीयस वाटत नव्हता. अख्खा दिवस अल्बमच्या इव्हेंट मधे घालवून अशूला घरी सोडतो, तिकडे बऱ्याच गप्पा मारतो मग विषय निघाल्यावर सांगतो कि बायको दवाखान्यात आहे. तिला काय झाले याचे निदान होत नाही. नंतर देशमूखांच्या सगळ्या गोंधळात त्याची हजेरी आहेच. तोपर्यंत लेखकाने तिला कॅन्सर पेशंट करून व्हेंटीलेटर पर्यंत नेऊन आणले.

एक क्षण मोहाचा तो आवरला अस्ता तर ही वेळ आली नसती ओ महाराजा. >>>यासाठी जबाबदार सु. अरुच आहे. अन्या मस्त संजनाला कल्टी देऊन लग्नाच्या दिवशी पळून गेला होता पण या मॅडमनी जबरदस्ती बोलावून , संजनाकडून कानाखाली खायला लावून लग्नाला उभा केलं.

सुअरुच्या जिवनात सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे कान्चन, काल तिला विचारत होती " आइ तुम्ही खुश आहात ना?" , त्या ढालगज बाइने आता ४-५ दिवसापुर्वी नवर्‍याचा भरपुर पाणउतारा करुन घराबाहे काढल, त्याबद्दल अरुला शिव्याशाप दिले.
हिला स्वतःला काडिचा स्वाभिमान नाही वर तो म्हातारा जरा राहिला असता घराबाहेर तर जिरली असती की कान्चनची पण ते नाही मी गुन्डाळते तसा तुम्हीही गुन्डाळा तुमचा स्वाभिमान आणी जा परत त्या कान्चनच्या पुढ्यात.

Pages