Submitted by DJ....... on 20 January, 2022 - 22:43

२० डिसेंबर पासुन सोनी मराठीवर नुकतीच नवीन मालिका सुरू झाली. "तुमची मुलगी काय करते?" असं त्या मालिकेचं नाव. ही थरारक वाटावी अशी मालिका असावी असं प्रोमो वरून लक्षात आलंच होतं ते आता मालिका सुरू झाल्यापासुन जाणवत आहे. मधुरा वेलणकर ही या सिरियल मधील प्रमुख पात्र असावी असं सद्ध्या तरी वाटतंय. हरीश दुधाडे हा पोलिस इन्पेक्टरच्या भुमिकेत चांगला वाटतोय.
या मालिकेचे लेखक अन पटकथालेखक चिन्मय मांडलेकर आहे तर संवाद लेखन मुग्धा गोडबोले यांनी केलं आहे. विषेश म्हणजे मालिकेची निर्माती मनवा नाईक यांची आहे.
या मालिकेवरील चर्चेसाठी हा धागा..!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रसाद ला positive बनवलं आणि
प्रसाद ला positive बनवलं आणि मारलं.. आता काय ते quick silver challange आणि शाळकरी मुले ..त्याचा ड्रग शी संबंध असं सगळं चालू आहे . त्यात प्रसाद हॅकर च काम करून गेम च्या admin ला शोधायचा प्रयत्न करत होता.. हे भोसले ला माहित होत.. प्रसाद गेमर पर्यंत पोहोचायच्या आधी तोच पोचला आणि त्याने मारलं प्रसाद ला. Bdw तो गेमर चांगली acting करतोय..थोडा over आहे पण बराय... कीलवर ची तर भारी खेचतो.. किसने बनाया रे तुझे डॉन??
कोणतरी म्हणाले की चारु गाला
कोणतरी म्हणाले की चारु गाला किलवर नाहिये. खरा किलवर कोण आहे कळले का ?
अजून तरी त्यांचंच ठरलेलं दिसत
अजून तरी त्यांचंच ठरलेलं दिसत नाहीये कोण कील्वर ते.. मागे एका भागात प्रसाद त्या नताशा च्या बॉय फ्रेंड सोबत बोलताना दाखवला होता जेव्हा तो मुलगा गेम च्या नादात आत्महत्या करतो.. तोच सावनि साठी सायकॉलॉजीस्ट suggest करतो जी कीलवर साठी काम करत असते..हे सगळं विसरला का लेखक
मालिका समाप्तीच्या मार्गा वर
मालिका समाप्तीच्या मार्गा वर आहे वाटतं ... चार दिवसात किलवर ला पकडणार अस जाहिर करतात पोलीस.. 15 ऑगस्ट पासून जत्रा नऊ वाजता सुरू होतंय..
संपवली तर बरे होइल
संपवली तर बरे होइल
जत्रा 9 ते 10 असते.
जत्रा 9 ते 10 असते.
त्यामुळे सिरेल अजूनतरी संपत नाही
प्रसादला मारल.
साऊवर परत हल्ला
ताईला कील्वर म्हणून खोट उभ करणार.
यांना बहुतेक काही सुचल नाही की जुन्या लोकांना घेऊन येतात.
ठरलेलं दिसत नाहीये कोण कील्वर ते.. मागे एका भागात प्रसाद त्या नताशा च्या बॉय फ्रेंड सोबत बोलताना दाखवला होता जेव्हा तो मुलगा गेम च्या नादात आत्महत्या करतो.. तोच सावनि साठी सायकॉलॉजीस्ट suggest करतो जी कीलवर साठी काम करत असते..हे सगळं विसरला का लेखक.....
त्या विशला पण नक्की कील्वर कोण ते माहित नसत.आणि प्रसाद कील्वर गँगशी कनेक्ट आहे हेही माहित नसाव,म्हणून प्रसादला तो संपवतो अस वाटत.
पण अभयच कील्वर असावा,अस आता वाटत आहे.
या सिरियलचा टीआरपी माहित नाही,पण खूप आवडती आहे ही सिरियल.म्हणून माथी अजूनही मारत आहेत.
खूप दिवसांनी काल पुर्ण एपिसोड
खूप दिवसांनी काल पुर्ण एपिसोड बघितला. ही सिरीयल आता कॉमेडी होत चालली आहे. फार फनी वाटला कालचा भाग.
अभयच उरलाय आता किलवर दाखवायला किंवा तो माणूस ज्याने उदय समेळ या पत्रकाराची जागा भाड्याने घेतली.
भोसले एका गुन्हेगाराला पकडू
भोसले एका गुन्हेगाराला पकडू शकला नाही, अर्धा एपिसोड त्या दोघांच्या झटापटीत दाखवला, पाव एपिसोड जमदाडे नवऱ्याशी बोलण्यात गर्क आणि उरलेला पाव एपिसोड हिप्नोटाईज सावनी एकच सीन मायकेल लोबो बघण्यात गर्क होती.
त्या भोसलेला पायावर गोळी मारता आली नाही. त्या त्यांच्या बोसुंधरा पायी एक गुन्हेगार निसटला. जमदाडेचा नवरा पालघरला का गेला आणि सारखा सारखा उल्लेख का होता.
अॅक्चुअली धन्य आहे सिरीयल. मधे मधे स्कीप केली तरी फार काही बिघडत नाही.
कै च्या कै चालु आहे, अभय
कै च्या कै चालु आहे, अभय किल्वर डजन्ट मेक सेन्स, त्याला तर खोटी किल्वर ताई अरेस्ट झाली आहे हा प्लॅन सगळं माहितेय कि !
आता आमदार महाडिक नाहीतर मग जमदाडेचा न दाखवलेला नवराच राहिलाय
आमदार दाखवले तर काहीतरी
आमदार दाखवले तर काहीतरी सेन्सिबल तरी वाटेल. बाकी सगळे न पटण्यासारखेच आहेत.
भोसले एका गुन्हेगाराला पकडू
भोसले एका गुन्हेगाराला पकडू शकला नाही, अर्धा एपिसोड त्या दोघांच्या झटापटीत दाखवला, पाव एपिसोड जमदाडे नवऱ्याशी बोलण्यात गर्क आणि उरलेला पाव एपिसोड हिप्नोटाईज सावनी एकच सीन मायकेल लोबो बघण्यात गर्क होती>>>आज तो गुन्हेगार मेला..कीलावर ने ठार केलं...बर आता त्याची body पोलीस स्टेशन ला आलिये..भोसलेला त्याचा फोन सापडला आहे. पण तरी त्यांना तो unlock करण्या साठी technical team हवीय... त्याचा अंगठा , डोळे सगळं available असताना..आज काल फोन finger unlock होतात हे विसरले का.. आता चारू आपले contact वापरून फोन गायब करायचा प्रयत्न करणार..देवा वाचव finger lock वरून रुद्रम चा एपिसोड ठवला जेव्हा मुक्ता किरण करमरकरला मारून अंगठा वापरते फोन unlock करायला
भोसले gone case आहे, सारखा तर
भोसले gone case आहे, सारखा तर माती खात असतो.
अॅक्चुअली ही सिरीयलच गॉन केस आहे. मी मधे बघत नव्हते, परत का बघतेय काय माहीती. ती फायनली संपणार समजलं की शेवटचा एपिसोड बघायला हवा.
रुद्रमसारखी एखादीच सिरीयल न भुतो न भविष्यती होते बहुतेक.
दुरदर्शन काळातल्या काही चांगल्या असायच्या. ते चार दिवस वगैरे आठवतेय.
त्यांना एक्स्टेंशन मिळतय
त्यांना एक्स्टेंशन मिळतय वारंवार.कलाकारांची चंगळ आहे.स्टोरी गेली तेल लावत.
फोन मुळात लगेच अनलॉक करायला हवा होता.
चारुच्या म्हणण्यानुसार किल्वरचे पोलिसात कॉन्ट्ँक्ट्स आहेत,म्हणजे कोणीतरी त्याच लेव्हलचा माणूस किंवा अंडलवल्ड मधला डॉन असावा.
रुद्रम मध्ये सस्पेन्स किरण करमकर सुध्दा अनेक व्यवसायांपैकी हॉटेलचा मालकही होता.
तसच अभय ही बरेच उद्योगधंदे करून शेवटी हॉटेलव्यवसायात स्थिरावत आहे.
म्हणून राहून राहून त्याच्यावरच संशय जातो.
महाडिककडे पाहून तरच चारुन किल्वर योग्य वाटते.
काय दाखवणार आहेत,कधी संपवणार आहेत काय माहित.
मोठा कलाकारच मेन व्हिलन
मोठा कलाकारच मेन व्हिलन दाखवतात त्यानुसार इथे अभय दाखवतील. स्वतःच्या बायको मुलीचा, आई बाबांचा जीव धोक्यात घालणारा हा कुठला किलवर.
एनिवे आता खरंतर इंटरेस्ट संपला आहे, कोणीही दाखवा किलवर, काही फरक पडत नाही. ही सिरीयल काही खिळवून ठेऊ शकली नाही, हे नक्की.
रुद्रम मधला इन्स्पेक्टर अजुनही मनात आहे आणि इथले एकेक माठ पोलीस बघून तोच आठवत रहातो.
किरण किरमरकरची एंन्ट्री होत
किरण किरमरकरची एंन्ट्री होत आहे.प्रोमोत पाहिल.
म्हणजे बहुतेक पुन्हा मुलीला एक्स्टेंशन मिळाल.अजून 2/3 महिने सहज.
किरण किरमरकरची एंन्ट्री होत
किरण किरमरकरची एंन्ट्री होत आहे.>> किरण करमकर नाही आहे ..दुसराच आहे कोणी अभिनेता .. मला सुध्दा तोच वाटला आधी... म्हटलं काल इथे संदर्भ आला आणि आज लगेच मालिकेत
किती करमरकरसारखा दिसतो.पण
किती करमरकरसारखा दिसतो.पण म्हणजे सिरियल काही संपत नाही.
500 नक्की. पाणी घाला, आता
500 नक्की. पाणी घाला, आता भोसलेची लव्हस्टोरी बघा.
काल बघितलं नव्हतं. आज ती बोसुंधरा किती केअरलेस आहे ते समजलं, महत्वाचा फोन हरवला तिने. त्या भोसलेला शोभून दिसते, दोघे माती खाणारे.
मराठी बिबॉस 4च्या संभाव्य
मराठी बिबॉस 4च्या संभाव्य कंटेस्टंटच्या यादीत शर्वरी लोहोकरेच (चारू गाला) नाव आहे.
खरच येणार असेल तर एकतर तिला रिप्लेस करतील किंवा मारतील,कारण सिरियल संपण्याचे चान्सेस कमीच आहेत.
प्रत्येक सिझनच्या संभाव्य
प्रत्येक सिझनच्या संभाव्य सहभागींच्या यादीत शर्वरीचे नाव असतेच.
त्या मिरजकरांच्या शेजारी
त्या मिरजकरांच्या शेजारी रहायला आलेली वंदना किल्वरचा माणूस.काही सुचल नाही की मिरजकरांच्या ओळखीतल्यापैकी कुणाला तरी एकाला घ्यायच आणि दाखवायच कील्वरचि माणूस.
तरी बरं,भोसलेला कळल की मेलेल्या कील्वरच्या माणसाच्या फोनमध्ये निलंजनाचा नंबर आहे,म्हणजे आता मनवा मँडम रजा घेणार अस दिसतय..कारण भोसले निलांजनाला फॉलो करणार त्याआधीच ती मरणार.
काय नुसती कँरँक्टर्स वाढवत आहेत.
सोनी मराठी एवढ का मेहेरबान आहे मालिकेवर आणि भोसलेवर कळत नाही.
तो भोसले आणि जमदाडे बॉस माझी लाडाची मध्ये पण गेले होते.प्रोमोत पाहिल.
मी ईथे येऊन नेहमी आशेने वाचत
मी ईथे येऊन नेहमी आशेने वाचत असते की आता तरी संपली असे कोणीतरी लिहील… पण निराशेपे निराशा हात लग रही है मिलॅार्ड…
वंदना कोण. त्या उदय समेळ
वंदना कोण. त्या उदय समेळ पत्रकार फ्लॅट मध्ये रहायला आली ती का. ती असेल तर त्या फॅमिलीवर संशय आलेला, भोचकपणा करत होती ती.
मी आठवड्यातून एखादा एपी बघते. नकोच वाटतं बघणं.
त्या उदय समेळ पत्रकार फ्लॅट
त्या उदय समेळ पत्रकार फ्लॅट मध्ये रहायला आली ती का.....हो तीच वंदना.त्या निलांजनाला चाकूचा धाक दाखवून कील्वरचा निरोप द्यायला आली होती साऊबरोबर पेशंट बनून
थॅंक यु युपि. तिच्या
थॅंक यु युपि. तिच्या नवऱ्यालाच किलवर दाखवून टाका म्हणजे गंगेत घोडं न्हाईल एकदाचे, हाहाहा.
आज बघितला एपिसोड.
आज बघितला एपिसोड.
मिरजकरांकडे गणपतीबाप्पा लवकर आलेत. अभय श्रद्धा फार गोड दिसत होते एकत्र.
बाकी तेच तेच तेच. परत तो जेरम, परत पोलिस स्टेशनमधे आवाज चढवणारा शेरेकर, परत निलांजनाकडून फार माहीती न मिळवू शकलेला भोसले आणि परत तिच जमदाडे.
ह्याहून सर्वात बोअर ती बोसुंधरा आणि भोसले बाबा.
ती वंदना चेटकीणीसारखे तोंड का
ती वंदना चेटकीणीसारखे तोंड का करते.
अभिज्ञा भावेला डोळ्यासमोर
अभिज्ञा भावेला डोळ्यासमोर ठेवून अभिनय करत असेल बहुधा.
खूप दिवसांनी भाग पाहिले.
खूप दिवसांनी भाग पाहिले. सोमवारपासून पाऊण तासाचे भाग सचरू केले आहेत.महाथरार म्हणे.
डोंबलाचा महाथरार.
अरे कुठे नेऊन ठेवली आहे सिरियल?
आता काय तर राजेशवरच फोकस.त्या महाडीकला मारल,म्हणजे तो किल्वर नाही.
मग राजेश त्याच्या कामासाठी एकटाच त्याच्या संस्थेतर्फे रात्री महाडिकच्या बंगल्यात मागच्या दरवाज्याने गेला ,महाडिक गचकला,पण भोसलेला घटनास्थळी मर्डर वेपनसकट राजेश सापडला.सगळ फिल्मी.
ती साऊ आणि अक्षय तर स्वत:ला जेम्स बॉन्ड समजतात की काय? त्या मडिकच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला झाडावर स्पाय कँमेरा लावला आहे यांना,यांना कील्वरपर्यंत पोचायचय.
त्या बिनडोक सावनीला निलांजनाला नीप ओळखता आलेल नाही आणि चाललेय कील्वरला शोधायला.
या सगळ्यात एवढी हाय प्रोफाईल केस वेंगसरकरांनी भोसलेसारख्या फालतू इन्स्पेक्टरला सोपवली आहे.
आता या सगळ्यात ती चारू गाला,ताई,तो विश,तो कील्वर,निलांजना हे सगळे फेकले गेले कुठच्या कुठे.
एवढी रसातळाला गेलेली असून सुध्दा पाऊण तासाचे भाग दाखवत आहेत.
मिनिमम पाचशे भाग. शेवटचा
मिनिमम पाचशे भाग. शेवटचा बघुया.
ही सिरीयल भोसलेचीच आहे, बाकी कोणाची नाही. अशी ट्रीटमेंट त्याला मिळते.
रुद्रममधला इन्स्पेक्टर डोक्यातून आणि मनातून जाणार नाही माझ्या, एवढ्या उंचीला होती ती भुमिका. त्यासमोर भोसले तद्दन फालतू वाटतो. ती ताई बरोबर बोलते, काय करतोस तू, कसला इन्स्पेक्टर, सोड नोकरी, माझ्या गँगमधे ये.
बाकी भोसले श्रद्धावर ब्लेमिंग करतो ते योग्य होतं, तिच्यामुळेच चारु पळाली.
राजेशलाही काम मिळालं आता, भोसले फॅमिलीला जाम महत्व आता.
Pages