ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही? - दूध का दूध, पानी का पानी, असे एक संशोधन

Submitted by AstrologyYesOrNo on 26 December, 2021 - 05:45

ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही? - दूध का दूध, पानी का पानी, असे एक संशोधन
डॉ. नागेश राजोपाध्ये
—------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मायबोलीवर ज्योतिष विषयावर अनेक लेख आणि प्रतिसाद वाचले. TV वर पण अनेक परिसंवाद ऐकले. वाद घालून डेड एन्ड आल्यावर सगळे शेवटी हेच म्हणताना दिसतात कि ज्योतिषावर संशोधन व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच तुमच्या मनाचे पूर्ण समाधान होईल असे आणि आम्ही स्वतः केलेले असे असे हे संशोधन आपल्या समोर ठेवत आहे. अतिशय शास्त्रोक्त, हजारो पत्रिका घेऊन कॉम्प्युटरच्या साहाय्याने केलेले हे परीक्षण वैदिक ज्योतिष शास्त्राच्या इतिहासात पहिलेच असेल. अगदी ज्याला आपण दूध का दूध पानी का पानी म्हणतो असे! वास्तविक पहाता हे संशोधन कोणीतरी या पूर्वीच करायला पाहिजे होते. आणि कोणीतरी कशाला ज्योतिषांनीच हे संशोधन खरेतर करायला हवे होते कारण ते या विद्येचा व्यावसायिक वापर करत आले आहेत त्यामुळे ती त्यांची प्राथमिक जबाबदारी होती. पण असो,आपण सरळ मुद्द्यावर येऊया.

मी तुम्हाला आम्ही केलेला प्रयोग थोडक्यात सांगतो - सर्व प्रथम पत्रिकांचे दोन मोठे संच (groups) केले कीजे एकमेकाच्या अगदी विरुद्ध गुणधर्माचे आहेत. म्हणजे 338 पत्रिका मतिमंद विरुद्ध 338 पत्रिका हुशार लोकांच्या या दोन्ही संचाना ज्योतिष शास्त्रात बुद्धीचे अशुभ फळ मिळण्यासाठी असलेले नियम लावले आणि ते दोन्हीकडे किती लागू पडले याची तुलना केली. अर्थातच ज्योतिष विद्या खरी असेल तर ते नियम मतिमंद पत्रिकांना जास्तीत जास्त लागू पडताना दिसतील आणि त्याउलट हुशार लोकांच्या पत्रिकांना फारसे लागू पडणार नाही. असे झाले तर ते शास्त्र आहे असे मान्य केले पाहिजे नाहीतर नाही. बघा इतका सोपा हा प्रयोग आहे.

आता इथून पुढे जायच्या अगोदर मी तुम्हाला एक इशारा देतो - जर असे कुठले एक कारण असेल कि ज्यामुळे सर्व सामान्य माणसे ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही या प्रश्नापासून दूर राहिली असतील तर ते म्हणजे आपला (म्हणजे आपल्या सर्वांचाच) मानसिक आळशी पणा. जरा शास्त्रीय concept समोर आली कि ‘कशाला डोक्याला ताण द्यायचा’ असे म्हणून आपण आपली विचार प्रणाली switch off करतो. या एकाच कारणाने सर्वसामान्य माणूस या विषयातले सत्य शोधू शकलेला नाही आणि आयुष्यभर त्याची किंमत पण मोजत आला आहे. पण आपण आज इथे असं नको करायला. हा विषय सोप्यातला सोपा करून सांगायची जबाबदारी माझी, पण त्याच बरोबर त्यासाठी थोडा तल्लख विचार करायची जबाबदारी तुमची. आणि तुम्ही ते केले तर पुढच्या 5 मिनिटांमध्ये हा विषय तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी कायमचाच मिटवून टाकाल आणि लग्न, करिअर, business असे महत्वाचे निर्णय घेताना मनाचा गोंधळ उडणार नाही.

आपण इथे जे करत आहोत त्याला एम्पिरिकल टेस्टिंग (Empirical Testing) म्हणतात. कुठल्याही शास्त्राला ‘शास्त्र’ म्हणून सिद्ध होण्यासाठी ही परीक्षा पास करावी लागते. परदेशामध्ये पाश्चिमात्य ज्योतिष शास्त्राची अशी चाचणी अनेक वेळा घेतली गेली (आणि ते कधीच पास होऊ शकले नाही). आपल्याकडे मात्र वैदिक ज्योतिष शास्त्राची अशी चाचणी घेण्यासंदर्भात कुठल्याच स्तरावर कसलीही चर्चा नाही (मौनम सर्वार्थ साधनम) आणि म्हणूनच आम्ही हा प्रयोग करणे महत्त्वाचे मानले.

आपल्या suspense स्टोरीचा भाग १ (episode 1) म्हणजे आपण ज्योतिषातले प्रत्येक महत्वाचे तत्व किंवा नियम घेणार आणि त्याला तपासून बघणार. तुम्ही ज्योतिषाकडे कधी गेला असाल तर ते पत्रिकेकडे बघत त्यांच्या एका विशिष्ट भाषेत स्वतःशी कम आपल्याशी संवाद करतात बघा! उदाहरणार्थ 'अमुक अमुक ग्रह नीचेचा आहे आणि शिवाय तो शनीच्या युतीत आहे. इतका बिघडल्यावर बरोबर आहे ..त्रास होणारच...' हे जे ग्रहाचे ‘निचेचे असून शनि बरोबर (किंवा पापग्रहा बरोबर) युतीमध्ये असण्याने’ बिघडणे आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या ग्रहाच्या कारकत्वा संबंधात अशुभ फळ मिळणे आहे - ते झाले ज्योतिष शास्त्राचे तत्व. हे अगदी fundamental तत्व आहे म्हणजे प्रत्येक ज्योतिषी ते वापरणारच. आता मतिमंद विरुद्ध हुशार लोकांच्या पत्रिकांचा प्रयोगात जर हे तत्व चेक करायचे असेल तर कुठल्या ग्रहासाठी चेक करायचे हे जर मला तुम्हाला समजावून सांगायचे असते तर परत ‘ कारक ग्रह’ वगैरे शास्त्रीय आणि ज्योतिषीय भाषा वापरावी लागली असती पण सुदैवाने आपल्याकडे कॉम्पुटरजी असल्याने आपण त्याला सांगितले कि बाबा सगळ्या ग्रहांसाठीच चेक कर. कारण बुध, चंद्र बुद्धीचे कारक म्हणून आपण त्यांच्यासाठी चेक करायचो आणि मग कोणीतरी येऊन म्हणणार अहो गुरु पण बुद्धिसाठी महत्वाचा असतो तो तुम्ही टेस्ट केला नाही. आपल्याला कुठलीही शंका ठेवायची नाहीये म्हणून आपण सगळेच ग्रह टेस्ट केले.

आता परीक्षेचा निकाल काय लागला ते बघू - जर हे तत्व खरे असेल तर असे योग आपल्याला मतिमंद पत्रिकांमध्ये जास्तीत जास्त मिळायला पाहिजे होते. पण प्रत्यक्षात दोन्ही संचांमध्ये आम्हाला ते सारख्याच प्रमाणात सापडले. म्हणजे बघा, ज्या ग्रहाच्या नीच असण्याची आणि शनी किंवा मंगळाबरोबर असण्याची आपल्याला भीती वाटत होती ते योग हुशार लोकांच्या पत्रिकेत पण तेवढीच सापडतात जेवढी मतिमंद लोकांच्या. मग हे कसले आले तत्व? नाही पण असे विधान करायची आपण इतकी घाई करायला नको, अजून प्रयोग करू आणि मग म्हणू. आणि ज्योतिषा विषयी पण काही बोलायला नको कारण अजून बाकीची तत्वे टेस्ट करायची बाकी आहेत. आणि ती आम्ही केली. ग्रहाच्या संदर्भात त्याच्या बिघडण्याची जेवढी महत्वाची तत्वे आहेत ती आम्ही सगळी one by one टेस्ट केली ( संदर्भ ३,४,५). म्हणजे ग्रहाचे क्रूर नक्षत्रात असणे (अजून एक डरावना योग) , ग्रह नीच राशीत आणि शिवाय ६,८,१२ व्या स्थानात अशी अनेक तत्वे लावून तुलना केली. आम्हाला यातील एकही तत्व लागू पडण्यात दोन्ही संचात कुठलाही फरक दिसला नाही. जी तत्वे ग्रहांची असतात तीच भावेशांच्या बाबतीत असतात आणि ती आम्ही (परत शंका नको म्हणून) बाराच्या बारा भावेशांना लावून टेस्ट केली. त्यातही कुठलाही फरक दिसला नाही. आणि शेवटी यांची काही तत्वे पत्रिकेतील स्थाना बाबतीत असतात. ती अर्थातच वेगळी असतात जसे कि स्थानात पाप ग्रह असणे, स्थानावर पाप ग्रहाची दृष्टी असणे वगैरे. त्यातही आम्हाला बारापैकी कुठल्याही स्थानात कुठलाही फरक अढळ नाही.

वर सांगितलेली तत्वे अशुभ फळासाठी होती. तशीच ज्योतिषात शुभ फळ मिळण्यासाठी पण प्रमुख तत्वे असतात आणि ती हुशार लोकांच्या पत्रिकेत जास्त आढळायला पाहिजे होती ती पण दोन्ही संचात ग्रह, भावेश आणि स्थानांसाठी सारखीच सापडली. हे एक प्रकारचे Verification होते आणि त्याने आमचे निष्कर्ष जास्तच दृढ झाले कि हि तत्वे वैध नाहीत.

इथे आपल्या सस्पेन्स स्टोरीचा भाग १ समाप्त होत आहे पण जाता जाता मी एक डायलॉग मारणार आहे - सोच लो ठाकूर - हीच ती तत्वे जी लावून तुमची आमची पत्रिका बघितली जाते.

आता सस्पेन्स स्टोरीचा भाग २ - मी पण अनेक वर्षे ज्योतिषी होतो त्यामुळे मला हे माहिती आहे कि अशुभ भाकीत करण्यापूर्वी आपण one by one अशुभ फळ देणारी सगळी तत्वे लावतो आणि त्याचा एकत्रित विचार करून भविष्य सांगतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर सगळे कुयोग मिळून एकूण किती रहाडा घालतात (किती नेगेटिव्हिटी तयार करतात) त्या basis वर भविष्य सांगितले जाते. आपल्या कडे कॉम्पुटरजी असल्याने त्याचे हि सिम्युलेशन केले आणि त्याला सांगितले दोन्ही संचांची तुलना करून सांग. तर दोन्ही कडे सारखीच नेगेटिव्हिटी मिळाली. Verification साठी वर केल्याप्रमाणे शुभ तत्वांची पण तपासणी केली ती हि सारखीच. आता बोला?

म्हणजे सगळी तत्वे एक एक करून तपासली तर ती सिद्ध होत नाहीत, एकत्र लावून बघितली तरी हि होत नाहीत मग त्यांना काय अर्थ आहे? पुढे जाण्या अगोदर आपला डायलॉग परत मारतो - सोच लो ठाकूर - हीच ती तत्वे जी लावून तुमची आमची पत्रिका बघितली जाते.

इथे आम्ही जे सांगतोय ते एकूण प्रयोगाच्या फक्त २५% आहे प्रत्यक्षात खूप काही गोष्टी केल्या. भाकीत सांगताना हमखास वापरली जाणारी अनेक मूलभूत तत्वे, वेगवेगळे ६८ शुभ अशुभतेचे मापदंड, केंद्रातील शुभ ग्रह / पापग्रह, क्रूर नक्षत्रातील ग्रह, मग काय योगकारक ग्रहांची स्थिती वगैरे जेवढे तपासता येईल ते सर्व. सगळंच इथे सांगायला बसलो तर तुम्ही कंटाळून जाल म्हणून सिम्पल सिम्पल आणि वर वर सांगतोय. या प्रयोगाची खासियत म्हणजे आपण ३३८ अधिक ३३८ अशा सगळ्या मिळून ६००+ पत्रिका घेतल्या होत्या की जे संख्याशास्त्राच्या दृष्टीने अनिर्वाय (mandatory) आहे. आत्तापर्यंत या प्रमाणात ज्योतिषशास्त्राचे परीक्षण झालेले आमच्या बघण्यात तरी नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या या चाचण्यांचे निकाल व अनुमान यापूर्वी आपल्यासमोर आलेले नाही. हा प्रयोग कोणीही करू शकतो आणि तो ज्योतिषांनी जरूर करावा.

आता तुम्ही म्हणाल की एक प्रयोग करून एवढे मोठे हजारो वर्षे चालत आलेले शास्त्र खोटे कसे ठरवता? म्हणूनच आम्ही अनेक प्रयोग केले. अविवाहित (350 पत्रिका) विरुद्ध दीर्घकाळ लग्न टिकलेले (350 पत्रिका) यातही आम्हाला हेच रिझल्ट मिळाले. त्यानंतर साठ वर्षांच्या आत कर्करोग झालेले (254 पत्रिका) विरुद्ध कर्करोग कधीही न झालेले (498 पत्रिका), घटस्फोटित (३५० पत्रिका) विरुद्ध दीर्घ विवाहित (३५० पत्रिका), सेलेब्रिटी विरुद्ध सर्वसाधारण लोक असे अनेक प्रयोग केले. आणि त्या सर्व प्रयोगात तीच तत्वे तपासली (आठवा नाहीतर डायलॉग मारावा लागेल). पण त्या सर्व प्रयोगात वर सांगितलेलेच रिझल्ट मिळाले. म्हणूनच आम्ही ठाम पणे सांगू शकतो की या शास्त्रात, त्यांच्या तत्वात, नियमात काहीही तथ्य नाही. हे सर्व माझ्या दहा वर्षांच्या संशोधनाचे सार आहे.

जाते जाते last time - सोच लो ठाकूर, हि तीच तत्वे आहेत जी वापरून तुमची आमची पत्रिका बघितली जाते ...... मग आता तुम्हीच ठरवा, पत्रिका बघून लग्न करायचे का नाही, करिअर कुठल्या विभागात करायचे ते ज्योतिषाला विचारायचे का आपले आपण ठरवायचे. नातेसंबंधीचे निर्णय घेताना second opinion ज्योतिषाकडे जाऊन घ्यायचे का counselor कडे जाऊन घ्यायचे तेही ठरवा. शुभेच्छा !
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Latest Update - येणाऱ्या प्रतिसादांवरून समजते कि या विषयावर अजून बरेच लिहायला पाहिजे होते. शास्त्रीय कल्पना या plane लिखाणापेक्षा audio - visual ने जास्त चांगल्या समजतात म्हणून अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील youtube video जरूर बघा.
Title - Astrology Yes Or No (Marathi) ज्योतिषशास्त्र खरे आहे का नाही?
https://youtu.be/RBKuOeOF79w
संदर्भा खाली ज्योतिष समर्थकांचे ‘अपेक्षित (नेगेटिव्ह) प्रतिसाद आणि त्यावर माझा खुलासा’ हे हि दिलेले आहे त्यात बऱ्याचशा शंकांचे निरसन होईल.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आभार -
श्री. प्रकाश घाटपांडे यांचा या संशोधनामधील एका महत्वाच्या प्रयोगात म्हणजे ‘मतिमंद विरुद्ध हुशार लोकांच्या पत्रिकांचा तुलनात्मक अभ्यास’ या प्रयोगात प्रत्यक्ष सहभाग होता. त्यांच्या योगदानाशिवाय हा प्रयोग पूर्ण होऊ शकला नसता.
—--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखकाची ओळख -डॉ. नागेश राजोपाध्ये हे गेले 20 वर्षे ज्योतिषविद्येचा अभ्यास करत आहेत. (सुरवातीला एक ज्योतिषी म्हणून आणि नंतर एक टीकाकार म्हणून). त्यांनी पुणे विद्यापीठातून पदार्थविज्ञान विषयात Ph.D. केली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळाची सुरवात ISRO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून केली परंतु नंतर बहुतेक सर्व वेळ IT क्षेत्रात व्यतीत केल्यानंतर ते Accenture मधून Associate Director म्हणून निवृत्त झाले. सध्या आपला सर्व वेळ ते ज्योतिषविद्येच्या empirical परीक्षणाला आणि संशोधनाला देत आहेत.
संपर्क - astrobasedresearch@gmail.com
—-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ -
१. वरील संशोधनाविषयी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना सांगायचे असेल तर खालील Youtube विडिओ ची लिंक फॉरवर्ड करा.
Astrology Yes Or No (Marathi) ज्योतिषशास्त्र खरे आहे का नाही?

https://youtu.be/RBKuOeOF79w

हिंदी व्हिडिओ लिंक - https://youtu.be/5iVmPUo42aE

२. या संशोधनाचे अधिक तपशील म्हणजे - कुठले नियम तपासले, डेटा कसा घेतला, कुठून घेतला, संख्याशास्त्रीय चाचण्या (statistical tests) कशा केल्या वगैरे तपशील बघायचा असल्यास www.astrologyyesorno.com ला भेट द्या. त्यातील मराठी वेबसाईटवर ‘संशोधन’ या वेब पेज वर सर्व तपशील दिला आहे. किंवा प्रकाशित पेपर बघू शकता

३. An article in The Skeptic, UK, June 2021 by Dr. Nagesh Rajopadhye
When put to the test, the predictive powers of Indian astrology simply don’t hold up
Link - https://www.skeptic.org.uk/2021/06/when-put-to-the-test-the-predictive-p...

४. Empirical testing of few fundamental principles of Vedic astrology through comparative analysis of astrological charts of cancer diseased persons versus persons who never had it
International Journal of Applied Research - 2021; 7(5): 74-85
Link - DOI - https://doi.org/10.22271/allresearch.2021.v7.i5b.8548

५. Comparison of Vedic astrology birth charts of celebrities with ordinary people: An empirical study, International Journal of Jyotish Research, 2021; 6(1): 104-116
(Volume 6, Issue 1, Part B, pages 104-116)
DOI : https://doi.org/10.22271/24564427.2021.v6.i1b.114

६. ज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य
आजचा सुधारक, ऑगस्ट, 2021 चळवळ, परीक्षण, विज्ञान, विवेक विचार, शिक्षण, श्रद्धा-अंधश्रद्धा - डॉ. नागेश राजोपाध्ये
https://www.sudharak.in/2021/08/7477/

७. जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कोणाला पत्रिका न बघता लग्न करण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी खरोखर मदत पाहिजे असेल तर लिहा – astrologyyesorno@gmail.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अपेक्षित प्रतिसाद आणि खुलासा
या विषयावर मी अनेक webinars दिले आहेत, सोशल मीडिया (Quora, reddit, FB etc) वर पण लिहिले आहे. त्या अनुभवावरून ज्योतिष समर्थकां कडून खालील प्रतिसाद येतो असा हमखास अनुभव आहे. सर्व सामान्य वाचक त्याने confuse होऊ नये म्हणून अपेक्षित प्रतिसाद आणि त्यावरील माझा खुलासा खालील प्रमाणे आहे
—---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिक्रिया - हे एवढेच परीक्षण पुरेसे आहे का ? याशिवाय अजून परीक्षण करायला पाहिजे अशी आमच्या कडे तत्वे आहेत.
खुलासा - ज्योतिषविद्येमधील जी प्रमुख तत्वे आम्ही वैध नाहीत हे सिद्ध करून दाखवले आहे, ती इतकी fundamental आहेत कि ती वापरल्याशिवाय कुठलेही भविष्य सांगितले जाऊच शकत नाही. ज्योतिषाच्या कुठल्याही पुस्तकात ती दिलेली असतात आणि त्यांना कुठलाही ज्योतिषी अमान्य करणार नाही. त्यामुळे आजच्या मितीला जे ज्योतिष त्या तत्वांच्या आधारे सांगितले जाते ते तरी निश्चितच अर्थहीन आहे हे सरळसरळ दिसत आहे. ज्योतिषाच्या परीक्षणाचा मुख्य problem म्हणजे प्रत्येकाचे वेगळे नियम आहेत. उदा घटस्फोट घेतला तर एक standard document असे मिळणार नाही कि जे पत्रिकेतील exactly कुठल्या योगांमुळे घटस्फोट होतो याच्या नियमांची यादी देईल. अशी सर्वमान्य यादी असती तर परीक्षण करणे सोपे आहे. पण तशी नसल्यामुळे जगातील लाखो ज्योतिषांच्या लाखो याद्या अवैध सिद्ध करणे हे केवळ अशक्य आहे. त्यापेक्षा मी लेखात म्हणाल्या प्रमाणे खरेतर ज्योतिषांनीच पुढाकार घेऊन असे परीक्षण करायला पाहिजे आहे कारण त्यांच्या भविष्यावर लोक जीवनातील महत्वाचे निर्णय घेत असतात. त्यामुळे कोणाला कुठले नियम वैध आहेत वाटत असेल तर त्याने ते तसे ६००+ पत्रिका घेऊन सिद्ध करून दाखवावे. किंवा असा शास्त्रीय प्रयोग अगोदर झाला असेल तर त्याचा संदर्भ द्यावा. माझ्या बघण्यात जे ज्योतिषाच्या बाजूने संशोधन आले ते फार तर फार १०० पत्रिकांचा आधार घेऊन आणि ते सुद्धा selective data घेऊन केलेले दिसले कि जे अर्थातच शास्त्रीय नाही.
—------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिसाद - ज्योतिष हि प्रोबॅबिलिटी आहे, तुम्ही ती वस्तुनिष्ठ समजून objectively टेस्ट करू शकत नाही.

खुलासा - Creating confusion is one the best defense या उक्ती प्रमाणे probability हा शब्द वापरून ज्योतिषाचे समर्थन होताना हल्ली दिसते जे अर्थहीन आहे. खरेतर Empirical testing मध्ये जे test होते ती probability च टेस्ट होते. त्यामुळेच मतिमंद असण्याचे नियम हुशार लोकांच्या पत्रिकेत आढळले तर केवळ त्याच एका गोष्टीला दाखवून आपण कधीच म्हणत नाही कि ते नियम अवैध आहे. ते काही % विरुद्ध संचात आढळणे ठीक आहे (इथे probability येते कि जी आपण मान्य करतो) पण आपली अपेक्षा हि आहे कि दिलेला नियम मतिमंदसाठी असेल तर तो मतिमंद लोकांच्या पत्रिकांमध्ये हुशार लोकांच्या पत्रिकांपेक्षा सिग्निफिकन्टली जास्त % ने लागू पडला पाहिजे. म्हणजेच त्याची मतिमंद लोकांच्या पत्रिकांमध्ये आढळून यायची probability हि significantly जास्त असली पाहिजे. ते तसे आहे का नाही हे आपण test करतो. ह्याचा अर्थच असा आहे कि आपण probability च टेस्ट करत आहोत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिसाद - ज्योतिषांना हे कधीच पटणार नाही, आपल्या कडच्या लोकांनाही हे पटणार नाही, मग या सगळ्या संशोधनाचा काय उपयोग?

खुलासा - माझ्या मते समाजात ४०-५० % अशी लोक आहेत जे ज्योतिष किंवा त्यांचे कट्टर समर्थक या वर्गात मोडतात. त्यांना आपण सोडून देऊ. त्यांच्या साठी मी हे संशोधन केलेले नाही कारण मी आकाश पातळ एक केले तरी त्यांना हे पटणार नाही याची मला कल्पना आहे. या उपर १० ते १५ % अशी लोक आहेत जे कधीही ज्योतिषावर विश्वास ठेवणार नाहीत. यांना पटवून द्यायचा प्रश्नच येत नाही. उरली ३५-४० % लोक जे confused आहेत. जे आज घाबरून ज्योतिषाच्या मागे जातात, विषाची परीक्षा नको म्हणून ज्योतिषाचे ऐकून काही थोडेफार पाळतात, पण एका बाजूला त्यांना खरेतर ते पटत नसते आणि त्यांना आपले स्वतःचे असे मत अजून बनवायचे आहे. माझे संशोधन हे ह्या लोकांसाठी आहे. लक्षात ठेवा आजची तरुण पिढी हि बरीसचशी या वर्गात मोडते.

यावर पण मी थोडे अजून संशोधन केले. ज्यांचे वय ३०+ आहे त्यांना पटवून देणे कठीणच असते. वेळ वाचवण्यासाठी आजकाल मी तिथे जास्त convince करत बसत नाही. पण त्याउलट जे तरुण आहेत (३० minus) त्यांना पटवून देण्याच्या बाबतीत माझा success rate हा ६०-७०% आहे. त्यांचे विचार by default legacy च्या विरुद्ध असतात. ते खूप technology च्या आधारे विचार करतात, शास्त्रीय कल्पना लवकर समजतात आणि आपले मत बदलायला तयार असतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे. हि खूपच दिलासा देणारी बाब आहे कारण हीच पिढी आपले भवितव्य आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिसाद - अमुक ज्योतिषाने आम्हाला / आमच्या नातेवाईकांना सांगितलेले भविष्य बरोबर ठरलेले आहे, कित्येकांनी website वर लिहूं ठेवललेल खरे झाले आहे मग तुम्ही ज्योतिषशास्त्र खरे नाही असे कसे म्हणता

खुलासा - माझा मुद्दा इथे हाच असेल कि शास्त्रीय परीक्षणाशिवाय आपण एक दोन अनुभवांना किंवा घटनांना त्या विद्येचे proof मानू शकत नाही. मी स्वतः संशोधन करण्या पूर्वी काही महिने असे संशोधन कोणी केले आहे का याचा शोध घेत होतो. मला तरी ज्याला आपण ‘शास्त्रोक्त’ म्हणू असे ज्योतिष विद्येच्या बाजूने असलेले संशोधन किंवा परीक्षण सापडले नाही. जे संशोधन म्हणून प्रसिद्ध झाले आहे त्या खरे तर case studies आहेत. म्हणजे एखादा योग कॅन्सरला कारणीभूत होतो असे कोणाला सिद्ध करायचे असेल तर तो तसा योग असलेल्या ४०-५० पत्रिका घेऊन ते दाखवणार कि बघा असे योग आहेत. हे शास्त्रीय परीक्षण होत नाही. त्यासाठी पत्रिकांचे कॅन्सर असलेले आणि कॅन्सर नसलेले असे दोन गट तयार केले पाहिजे, डेटा प्रत्येक संचात ३००+ घेतला पाहिजे, तुम्ही सांगत असंणारे cancer असण्याचे नियम कॅन्सर नसणाऱ्यांच्या पत्रिकेत कसे नाहीयेत किंवा त्या दोन संचात कसा लक्षणीय फरक आहे हे दाखवले पाहिजे, त्यासाठी स्टॅटिस्टिकसची सिग्निफिकन्स टेस्ट केली पाहिजे आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत कि ज्या केल्याशिवाय आपण त्याला मान्यता देऊ शकत नाही. या मितीला तरी ज्योतिष सिद्ध होईल असे ‘शास्त्रीय’ परीक्षण माझ्या बघण्यात नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

AstrologyYesOrNo , तुमचा आय डी बदलुन छोटा ठेवा हो. आणी तुम्हाला खरच अभ्यास करायचा असेल यावर तर MNC यांच्या फेसबुक / ब्लॉग वर जावा. MNC म्हणजे मिलींद चितांबर.

Lol
म्हणजे इथे लिहिलंय तो अभ्यास खोटा खोटा केलाय का?

@अमित, सुदैवाने आपले ध्येय एकच आहे - समाजाला ज्योतिषाच्या अनिष्ट परिणामां पासून वाचवणे, फक्त मार्ग वेगळे आहेत. माझा approach हा लोकांना हे संशोधन दाखवून पहिली हि जाणीव करून द्यायची आहे कि हे खरे नाही आणि मग त्यांना त्यांच्या प्रॉब्लेम सोडवण्यासाठी वाट दाखवायची. तुम्हाला वाटते त्यांना ज्योतिष हे खरे नाही हे दाखवायची काही जरुरी नाही कारण त्यासाठी ऑलरेडी बऱ्याच websites आणि blogs आहेत. पण त्यांच्या सांगण्यामध्ये आणि या संशोधनात फरक आहे जो तुम्ही समजून घ्या. आतापर्यंत ज्योतिष खरे नाही यासाठी तुमच्या वेबसाइट्स, newpapers आणि ब्लॉग्स वरची अर्ग्युमेंट्स काय आहेत तर; ग्रहांचा माणसाच्या जीवनावर कसा परिणाम होत नाही, ज्योतिषाचा कार्यकारण भाव अजून कोणीही सांगितलं नाही वगैरे. पण या अर्ग्युमेंट्स च्या बाबतीत आपला ज्योतिष वर्ग समाजाला confuse करण्यात यशस्वी झालेला आहे म्हणून तर सर्व सामान्य माणूस हि arguments ऐकून पण ज्योतिषावर विश्वास ठेवतो. सर्व सामान्यांना अगदी पटकन आणि हमखास पटेल असे convincing अर्ग्युमेण्ट आजतागायत missing आहे आणि तेच मी संशोधना द्वारे तयार केले आहे असे मला वाटते. म्हणजे content तरी तयार केले आहे आता packaging वर काम करत आहे. अशा प्रकारचे आणि या scale वर असलेले इम्पिरिकेल संशोधन हे इतिहासात प्रथम आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आता मी packaging बाकी आहे असे का म्हणतो तर - जरी हे इतके unique आणि प्रथमच असले तरी ते सगळ्यांनाच पटकन समजायला तसे अवघड आहे. ज्योतिष समर्थकांचे तर सोडूनच द्या, त्यांनी open mind ने हे बघितल्याशिवाय त्यांना हे पटणार नाही पण सर्व सामान्यलोक पण हे खूप शास्त्रोक्त असे असल्याने सहज समजू शकणार नाही याची मला कल्पना आहे आणि म्हणून याला सोप्यात सोपे करणे (packagin) चालू आहे. यावर काम करताना वर उत्तरात लिहिल्या प्रमाणे मी काही सर्वे केला, अनुभवही घेतले आणि त्यानुसार असे लक्षात आले कि ३०+ वय असणाऱ्यांची मत बदलणे इतके सहज शक्य नाही. ( यश मिळण्याची शक्यता फक्त ५-१० % आहे) त्याउलट तरुण वर्गाला (१५ - २५ वर्षे ) convince करण्यात यश मिळण्याची शक्यता ६०-६५ % इतकी जास्त आहे. त्यांना हे शास्त्रोक्त असले तरी मी काय म्हणतो आहे ते पटकन उमजते आणि ते लगेच accept करतात. वेळेचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा म्हणून त्यांच्यावर फोकस केला आहे आणि म्हणून सोशल मीडिया वर यावे लागले. माझ्या हयातीत मी या वर्गापर्यंत जास्तीत जास्त पोहोचू शकलो तरी माझ्या संशोधनाचे चीज झाले असे मला वाटेल. बाकीच्यांची मने वळवण्यासाठी दुसरे उपाय लागतील जसे कि double blind टेस्ट करणे वगैरे आणि त्यावर काम चालू आहे.
आता मुद्दा मानस शास्त्रीय उपायांचा. मनुष्य पॅनिक मध्ये असेल, द्विधा मनस्थितीत असेल किंवा घरातल्यांच्या दबावाला बळी जात असेल - अशा परिस्थितीत त्याला / घरच्यांना ज्योतिष मार्गावरून दूर करणे मला महत्वाचे वाटते कारण नाहीतर तो अशास्त्रीय अशा भाकिताला महत्व देऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ शकतो. इथे माझ्या फ्री consulting चा option website वर मी यासाठीच ठेवला आहे. आणि असे अनेक sessions मी केलेले आहेत. लोकांना ते पटते. असे counselling करणे हा मानस शास्त्रीय उपायच नाही का? या counselling मध्ये त्याला ज्योतिष पासून दूर करून योग्य अशा counsellor च्या ताब्यात देण्यावरच भर असतो. पुढचे detailed counselling मी करू शकत नाही कारण तेवढी bandwidth माझ्या कडे नाही. मुख्य प्रश्न decision making process चा असतो. तिथे लोकांना मार्गदर्शन हवे आहे हे मलाही समजतेय आणि त्यासाठी काही करण्यासाठी लागणारे फंडस् मी मिळवायच्या प्रयत्नात आहे. तुमचे समाधान झाले असेल अशी अशा करतो.

@जिज्ञासा. तुमचा प्रयोग उलट्या प्रकारे करून बघता येईल का?...... double blind टेस्ट … मला या प्रयोगाचे निष्कर्ष जाणून घेण्यात रस असेल. >>>>>>
ज्योतिष हे व्यक्तिनिष्ठ शास्त्र आहे असे मी तरी कुठल्याही पुस्तकात वाचले नाही. विज्ञान आणि शास्त्र याचा तुमचा खुलासा मला तरी पटलेला नाही. ज्या कुठल्या पद्धतीने असणाऱ्या नियमांचा वापर करायचा आहे तो या शास्त्राला standardize करता आला पाहिजे आणि तो सिद्ध करता आला पाहिजे. आपली मते जुळत नसतील तर आपण तो मुद्दा सोडून देऊ.
तुम्ही double blind टेस्टविषयी उत्सुक आहात जी कि समजायला सोपी आणि अतिशय पॉवरफुल अशी परीक्षण पद्धती आहे. मी स्वतः पण अशा टेस्टचा खूप फॅन आहे आणि प्रकाशजी नि स्वतः अशी टेस्ट (मतिमंद विरुद्ध हुशार) २००८ मध्ये conduct केल्याने माझी त्यांच्या बरोबर याविषयी बरीच चर्चा चालते. अशा टेस्ट मध्ये दोन विरुद्ध गटात कुठलाही ओव्हरलॅप नसणे फार जरुरी असते. तुम्ही सांगितलेल्या case पेक्षा ज्याच्यात कुठलीही संदिग्धता नसेल अशा केसेस आम्ही शोधून ठेवल्या आहेत पण तो टेस्ट चा प्रमुख भाग नाहीये. मुख्य समस्या आहे अशी टेस्ट कोण रन करणार ? तुम्ही आम्ही तशी रन करून चालणार नाही तर ती एका मोठ्या, सर्वांना मान्यं असलेल्या संस्थेकडून रन व्हायला पाहिजे तरच त्याचे results सर्वांना मान्य होतील. अशा टेस्ट ला प्रसिद्धी देऊन जास्तीक जास्त ज्योतिषी यात भाग घेतील हे बघणे हे हि इतके सोपे नाही. त्याला फंडस् पण लागतील. अशी संस्था तुम्ही शोधून त्यांना तयार केल्यास लॉजिस्टिकस सपोर्ट आम्ही निश्चित देऊ शकतो.

म्हणजे इथे लिहिलंय तो अभ्यास खोटा खोटा केलाय का?>>>>> अभ्यास खोटा केलाय असे नाही म्हणत तर ज्योतिष् शास्त्राचे खूप कंगोरे असल्याने एका ज्योतिष्याशीच त्याची चर्चा फलद्रुप ठरु शकेल. ज्यांचा यावर अभ्यास नाही किंवा विश्वास नाही त्यांच्याशी चर्चा करुन काय होणार?

मला भविष्याचा खूप अनूभव आलाय. मी ज्यांच्या ज्यांच्याकडे गेले त्यातल्या ४ जणांनी मला पर्फेक्ट भविष्य सांगीतले, धोक्याची सुचना इनडायरेक्टली दिली होती. पण मी लक्ष दिले नाही, ती घटना घडुन गेली. गेला तो वाईट काळ. पण मनात आले की ती घटना जर घडणारच होती तर भविष्य काय नी सायन्स काय, मला सारखेच.

जिद्दु, मला माहीत नाही त्यांचे कामाचे स्वरुप. मी एकदा मेल पाठवली होती. पण त्यांच्याकडे वेळ नव्हता, बघतो म्हणाले होते.

समाजाच्या हितासाठी वगैरे वगैरे कशाला करायचे म्हणे

काहीतरी 10,20 रु फी घेऊन मोकळे व्हायचे,

मुळात तुमच्या कुंडलीत उत्तम ज्योतिषी , सायंटिस्ट व्हायचा योग आहे का हे तुमच्याच मशीनमध्ये कुंडली घालून बघा आधी

( आमचा एक मित्र सोनोग्राफी ट्रेनिंग पूर्ण करून पेढ्याचा डबा , मिठाई घेऊन हॉस्पिटलात आला होता. ट्रेनिंग हॉस्पिटल नेच स्पॉन्सर केले होते. सहज म्हटले कुणीतरी , तुझ्याच पोटाची कर आधी

त्याने स्वतच्याच पोटावरुन प्रोब फिरवून सोनोग्राफी केली तर जोरदार फॅटी लिव्हर निघाले , मिठाई बंद ! Proud एकही पेढा खाल्ला नाही !

त्याच आठवड्यात क्रिस सिनेमा थेटरात रिलीज झाला होता, नसरुद्दीन शहा स्वतःचेच भविष्य बघतो आणि नरड्यात काच घुसल्याचे दिसते

योगायोग )

@नवीन निश्चेट तुमची comment - मूर्खपणा आहे. ज्यांना एखादी शाखा शास्त्र आहे हे सिद्ध करायचे असते त्यांनी डेटा, प्रयोग करून ते सिद्ध करायचे असते. >>>> तुमच्या मताशी १०० % सहमत. पण आज तागायत त्यांनी का सिद्ध करून दाखवले नाही आणि समाज म्हणून आपण त्यांना कुठे अडवले आहे. ८० % marriages पत्रिका बघून होतात. पण म्हणून आपण समाज म्हणून, राज्यकर्ते म्हणून कधीतरी अशा सिस्टमचा हजार पत्रिका घेऊन टेस्ट result मागितला आहे का? हे वर्षानुवर्षे चालले आहे, आणि त्यामुळे समाजाचे नुकसान होते आहे हे नुसतेच बघत बसायचे का? म्हणून ते जर सिद्ध करत नसतील तर आपल्याला ते कसे वैध नाही हे सिद्ध करावे लागते. जगभर हे अशाच प्रकारे झाले आहे आणि मग दबाव बनून त्याचे प्रस्थ कमी झाले आहे.
@नवीन निश्चेट. ज्यांना हे शास्त्र नाही हे माहिती आहे त्यांनी प्रयोग करून हे शास्त्र नाही म्हटल्याने ज्योतिषी मान्य करणार आहेत का ? बावळटपणा आहे. वेळ वाया गेला तो वेगळाच.
>>>>> खरेतर तुमच्या भाषेचा वापर असा आहे कि मी हे उत्तर लिहावे का नाही हा विचार करत होतो पण तरीपण इतरांसाठी सांगतो. वर अमित ला दिलेल्या उत्तरात याचे उत्तर लिहिले आहे ते जरूर वाचा. समाजात १०% ज्योतिषावर आजिबात विश्वास नसलेली आहेत आणि ५० % ठाम विश्वास असलेली त्यात ज्योतिषीपण येतात. उरलेली ४०% लोक आहेत जी confused आहेत आणि त्यात आपली तरुण पिढी पण येति जी आपले मत अजून बनवत आहे. तीच पिढी आपल्या पुढच्या पिढ्यांची मते बनवणार आहे. माझे संशोधन हे या तरुण पिढीसाठी, या ४० % लोकांसाठी आहे जे confused आहेत. हे पण कित्येक कोटी लोक आहेत. माझे संशोधन हे ज्योतिषी लोकांसाठी नाहीये त्यामुळे त्यांनी तो मान्य किंवा अमान्य करायचा प्रश्न येत नाही. हे तुम्हाला आवर्जून सांगावे लागेल.

Astrology yes or no, तुम्ही प्रयोग करत आहात म्हणून तुम्हाला सुचवलं. मला स्वतःला या अशा प्रयोगांमधून काही निष्पन्न होईल असे वाटत नाही.
जेव्हा रिस्क फार मोठी असते तेव्हा लोकांना निर्णय घेताना काही तरी external आधार हवा असतो तो ज्योतिषी देतात. सल्ला देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोन्ही व्यक्तींना माहिती असतं की liability ही नेहमीच सल्ला घेणाऱ्याची असते. तेव्हा ज्योतिष शास्त्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध करता येत नाही याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही जे counseling करता ते मात्र कौतुकास्पद आहे. Many people need a sounding board while making a decision and seems you provide it for free.

शास्त्र (logy) आणि विज्ञान (science) यात फरक आहे. मी आधीच्या एका धाग्यावर लिहीलंय या बद्दल. सापडली तर ती पोस्ट इथे डकवेन.

@रश्मी - मला श्री. चिताम्बर माहिती आहेत. माझ्या एका वेबिनार मध्ये ते होते. मला त्यांचे आणि त्यांना माझे काम माहिती आहे. सूचनेबद्दल धन्यवाद.

ओके

तुमच्या त्या 2008 च्या प्रयोगाची चर्चा इथे झाली आहे

फार मोठा धागा होता तो
सापडेना

धन्यवाद नागेश. तुमच्या पुढाकाराने चालू केलेल्या कामामुळे जास्तित जास्त लोकांचे आणि दीर्घकाळाकरिता/ कायमचे मत परिवर्तन होवो.
तुमच्या चिकाटी बद्दल कौतुक आणि मनापासून शुभेच्छा! Happy

असं नसतं हो.
ज्योतिषशास्त्र अत्यंत complicated आहे. त्याचं अशा पद्धतीने simplification करून टेस्ट करता येत नाही.
काहीतरी ढोबळ रुल(थम्बरल्स) घ्यायचे आणि ते प्रत्येक पत्रिकेला लावायचे इतकं सिम्पल असतं तर धडाधड त्याची सॉफ्टवेअर आणि ऍप निघाली असती आणि आपण सर्वांनीच फोनवर चार क्लिक करून आपलं फ्युचर आयुष्य जाणून घेतलं असतं. असं इतकं सोपं नाही ते.
त्यात हजारो छोट्या गोष्टी बघाव्या लागतात. एकेका गोष्टीमुळे पूर्ण पत्रिकाच फिरते. शिवाय पत्रिकेत एखादी गोष्ट इंडिकेट होत असली तरी प्रत्यक्षात होईलच असं नाही. थोडा मानवी कर्म, संचित यामुळेही परिणाम बदलू शकतो. त्यामुळे तशी साधना, तपश्चर्या असलेल्या एखाद्या विद्वानाला ते जमतं. Software तेच रिझल्ट देऊ शकेल इतक्या लेव्हलला AI अजून पोचलं नाही.
अनेक जबरदस्त अचूक प्रेडिक्शन्स बघितली आहेत. म्हणजे त्यात जनरल काहीतरी थातुरमातुर सांगितलं असं नव्हतं. खूप precise आणि/किंवा बऱ्यापैकी unlikely घटना सांगितलेल्या होत्या. हे कसं सांगता येतं?

<<मी हे समाज कार्य म्हणून करत आहे आणि यात अर्थार्जन हा कधीही भाग नव्हता, आजही नाहीये.
मी जेव्हा ज्योतिषी होतो ती १२ वर्ष पूर्वीची गोष्ट आहे आणि तेव्हा website वगैरे नव्हती. तेव्हाहि एक रुपयाही मी कधीही कोणाकडून घेतला नाही. गेले दहा वर्षे मी या project वर काम करतोय आणि त्या साठी लागणारे software स्वतःच्या पैशाने develop केले आहे. या कामासाठी दोन वर्षे लवकर निवृत्त झालो एवढे मला त्याचे महत्व वाटते. बाकी कोणी विश्वास ठेवो न ठेवो अशा संशोधनाची अत्यंत जरूर आहे असे माझे मत आहे. त्या मागची भूमिका कदाचित इथे तुम्हाला एक लेख वाचून होणार नाही. प्रत्यक्ष संवाद करायचा असल्यास मी कधीही तयार आहे. आता सुद्धा निवृत्त झाल्यावर आपल्या संशोधनाचा समाजाला उपयोग व्हावा या हेतूने फ्री consultations, webinars वगैरे चालवले आहे. तेव्हा youtube, blog हे सर्व जरी मी करीत असलो तरी पैशाचा व्यवहार आणि अपेक्षा शून्य आहे आणि तो तसाच राहील.>>

------ तुमचा लेख आणि प्रतिसादांना दिलेली उत्तरे सुस्पष्ट आहेत. अर्थाजन हा उद्देश नाही आणि निव्वळ समाजकार्य म्हणून काम करत आहात हे कौतुकास्पद वाटते. एखादा विषय / विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसंगी नोकरीलाही रामराम ठोकला यातून तुम्ही किती (विषय लोकांपर्यंत नेण्यासाठी) गंभिर आहात हे दिसते.
कार्यासाठी शुभेच्छा.

पैसे घेणारेही समाज सेवाच करत असतात.
ही 'सेवा' समाजाला द्यायची असल्यास त्याचा प्रोफेशनल टॅक्स , जीएसटी इ तसेच कँज्युमर प्रोटेक्शन, डेटा कॉन्फिडेनशालिटी ऍक्ट इ लाही सामोरे जावे लागणार

मंडळी. या ज्योतिषजगतात थोडी फार प्राथमिक माहिती असली कि कुणीही स्वत:ला ज्योतिषी म्हणवून घेउ शकतो. त्यासाठी कुठल्या पदवी सर्टिफिकिट प्रमाणपत्राची गरज नसते. इथे असंख्य स्वयंघोषित ज्योतिषी आहेत. समजा त्याने दोन रुपये नाममात्र मूल्य घेतलेतरी त्याला व्यावसायिक ज्योतिषी असा शिक्का मारता येतो. त्यावर स्वतंत्र लिहिले आहे. पहातो.

यावर लिहाव की नाही हाच प्रश्न पडला आहे! नास्तिक असतात ते माहित आहे, पण ते देखिल सायन्स च्या नावा आड दोनतिनशे कुंडलीच्या अभ्यासवरून निष्कर्ष काढतात की ज्योतिषशास्त्र "थोतांड " आहे, आम्ही म्हणतो, शास्त्र जाणणारा अज्ञानी असू शकतो, शात्र नाही! असो!
यावर मी पूर्वीही खूप चर्चा केली आहे, पण ज्यांना ऐकायचचच नसेल, त्यांना समजावित बसण्यात अर्थ नसतो.
तरीही एक उदाहरण देतो , २०११ मधील सत्य घटना आहे, व त्यावेळचा माझा ज्योतिषी रूपातील फोटो फेसबुकवर माझ्या अकाऊंटवर आहे!
तर घडले असे की , मी ज्योतिष्याचा "वेष" (?) म्हणजे फेटा, धोतर उपरणे वगैरे घालून आमच्या कंपनीच्या ९०० लोकांच्या ट्रेनिंग शिबिरात संध्याकाळी अवतरीत झालो, असंख्य लोकांनी हात दाखविले वगैरे!
पण शेवटी, या ९०० लोकांना address करणारा mentor व कंपनीचे top १०/१२ वरिष्ठ अधिकारी, ज्यांनी मला कुतुहलाने वा करमणूकी करता त्यांचे टेबल वर बोलाविले, तेव्हा मी fraction of second madhye सांगितले की या टेबल वर बसलेल्या प्रत्येक व्यक्तिच्या हातांच्या रेषात खूप फरक असेल, पण एक रेषा इथे common आहे, ती म्हणजे मूळ मणिबंधातून निघणारी व मधल्या बोटाकडे जाणारी रेषा, मी त्या सगळ्यांना हात पुढे धरून तपासायला सांगितले, सगळ्यांच्या हातावर ती रेषा ठळक स्पष्ट होती! अन त्यामुळेच ते त्या टेबलवर एकत्र होते, बाकी प्रत्येकाचे अन्य भविष्य/ प्राक्तन, जसे की आरोग्य/अक्कल/बदमाशी/ वैवाहिक सुख/ इत्यादी वेगवेगळे होते! मी त्यांना ते देखिल on the spot explain केले होते! त्यावर त्यांनीही कसलीही objection /नासहमती दर्शवली, नाही मला नोकरीवरून काढले!
उगाच दोनतिनशे कुंडली घेऊन काहीतरी अभ्यास केल्याचे दाखवित असले दावे करणे हे फक्त नास्तिक / डावे कम्युनिस्ट / अधर्मी / अंधश्रद्धानिर्मुलनवादी किंवा ब्राह्मण/हिंदूद्वेष्टेच करू शकतात, करीत राहिले आहेत.
मी माझ्या विधानांशी ठाम आहे, मात्र तुमच्या कुणाशी वादविवाद करण्यास उपलब्ध असू शकणार नाहीये!, तेव्हा
तुमचे चालू द्या !

>>>>> पण एक रेषा इथे common आहे, ती म्हणजे मूळ मणिबंधातून निघणारी व मधल्या बोटाकडे जाणारी रेषा, मी त्या सगळ्यांना हात पुढे धरून तपासायला सांगितले, सगळ्यांच्या हातावर ती रेषा ठळक स्पष्ट होती! अन त्यामुळेच ते त्या टेबलवर एकत्र होते, <<<<<
अशी रेषा एखाद्या नामचिन गुन्डाच्या हातावर देखिल असू शकतो, जो स्वतःच्या कर्तबगारीच्या जोरावर "गुंड" बनला आहे! Lol पण हाच तपशील न समजण्यामध्ये गलती झाली तर ती शास्त्रात नव्हे, ज्योतिष वर्तविणार्या मध्ये असू शकते! जे मी देखिल मान्य करतो.
तुम्ही २०० मिलिटरी, २०० पोलिस व ४०० नामचिन गुंडांच्या कुंडल्या / हातच्या रेषा तपासुन निष्कर्ष काढू शकाल का? मला जमले नाहीये, कारण, कोणत्याही सिनियर मिलिटरी/पोलिस वा नामचिन गुंडाशी माझा परिचय झाला नाहीये/ त्यांचे तपशील मला अभ्यासण्यास मिळणे अशक्य आहे!

<<<नास्तिक / डावे कम्युनिस्ट / अधर्मी / अंधश्रद्धानिर्मुलनवादी किंवा ब्राह्मण/हिंदूद्वेष्टेच करू शकतात >>> हे विधान ज्योतिष्य शास्त्राधारीत आहे किंवा कसे? यांच्या पत्रिकेत अथवा हस्तरेषेत एखादा समान दुवा असतो का?

>>>>> तुमची नोकरी रेषा बळकट असणार :))
नाही, ती देखिल कायम कमकुवतच होती , कुंडलीत रवी पंचमात नीचेचा! हा त्याचा अर्थ होता

>>>>>> यांच्या पत्रिकेत अथवा हस्तरेषेत एखादा समान दुवा असतो का? >>>>>
हो असतो, बिघडलेल्या "गुरू ग्रहाचा" उल्लेख स्पष्ट दिसतो, गुरू बलिष्ठ असतो जो "विशिष्त" आदर्शवादामाघे धावण्याची शक्ती देतो, पण तो आदर्शवाद "बाकी जगाला" त्रासदायक असतो अन तिथे मंगळ/राहू/शनि इत्यादीक ग्रहांचे परीणाम / अस्तित्व तपासायला लागते! कुंडलीत किंवा हातावर! या तिनही ग्रह/बिंदूंचे तपासण्यामागची तत्वे भिन्न आहेत

>>>> >>>>>> यांच्या पत्रिकेत अथवा हस्तरेषेत एखादा समान दुवा असतो का? >>>>>
माफ करा, पण जेव्हडे नेते लोक भाषण ठोकतात, तेव्हा ते हात वर करूनही बोलतात , तर तेव्हा माझ्या त्यांच्या हातावर बारकाईने लक्ष असते, वेळेस गुगल करून फोटो देखिल अभ्यासले आहेत! पण त्यावर मी एक अक्षरही बोलणार नाही !
"इदं अथर्वशिर्षं न अशिष्यायन देवं" याचप्रमाणे, याबाबत माझ्या अभ्यास मी इथे खुलेपणे मांडणार नाही, कोणताही कायदा माझ्यावर तशी सक्ती करू शकत नाही!

वाकड्या आपण स्वत:ला हस्तसामुद्रिक वा ज्योतिषी समजता का? आपण कुंडली व हस्तरेषा असे दोन्ही मुद्दे मांडलेत म्हणून विचारतो

>>>>> वाकड्या म्हणजे लिंबुटिंबु वाटतं. <<<<<
हो, पण म्हणूनच, माझी limbutimbu ही आयडी अत्यंत अन्यायाने उडवली गेली त्या निषेधार्थ मी २०१७ पासून इकडे फिरकत नाही Angry
क्वचित येतो, पण या साईटच्या चालकांना माझे इथे येणे नको असेल तर ही आयडी देखिल त्यांनी "बाद" करावी

Pages