Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!
सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!
मराठी बिग बॉस
आज ७.३० वा.
सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आविष्कार म्हणजे देव तारी
आविष्कार म्हणजे देव तारी त्याला कोण मारी असे झालय.
किंवा मग असेल माझा हरी तर देइल खाटल्यावरी 
किवा ठेवावे अनते तैसिचे
किवा ठेवावे अनते तैसिचे राहावे चित्ती असु द्यावे समाधान
परत सेफ झाला असेल तर नशिब जोरदार आहे.
लाईव बघणार्या लोकांनी सांगितल
लाईव बघणार्या लोकांनी सांगितल की विकास,मीनल, आदिश आणि दादुस नोमिनेट झाले आहेत.. आविष्कार या आठवड्यात पण सेफ
<<<
अरे काय हे, टिम बी कायम कशी नॉमिनेशसन्स मधे , टास्क्स करतायेत कि मजा करतायेत ..वर अविष्कार सेफ
मला वाटतं दिवाळीच्या वेळी टिम ए चे सगळे मेंबर्स मुद्दाम आणतील नॉमिनेशन्स मधे आणि एखादा एलिमिनेशन ड्रामा सुद्धा करतील , मग सांगतील नो एलिमिनेशन !
टास्क्स नीट खेळता येत नाहीत
टास्क्स नीट खेळता येत नाहीत त्यांना
आपल्या टीममधलेच दोघे बाहेर
आपल्या टीममधलेच दोघे बाहेर काढले गेले हे लक्षात येऊन टीम ए वाले जरा हललेत. आपलं वागणं सुधारूया असा विचार करताहेत.
शिवाय त्यांच्यातला एकमेकांबद्दलचा अविश्वास दिसू लागलाय.
पहिल्या आठवड्यापासून ममांनी ए
पहिल्या आठवड्यापासून ममांनी ए टीम ला नाव ठेवायला सूरवात केली आहे गायत्रीला ला बुगुबुगु/ मीराला काय स्वताला बिग बॉस समजते काय?/ जय तुझा अँगर सांभाळ आणि उत्कर्ष ला डबल ढोलकी . हे सगळं पहिल्या आठवड्यात च .झाल तेव्हा पासुन ए टीम वाले पब्लिक च्या डोक्यात निगेटिव्ह होत गेले ते निगेटिव्ह च होत गेले. आणि बी टीम वाले पहिल्या दोन आठवड्यात गप्प काही कंटेंट न देणारे/ जपुन जपुन खेळणारे म्हणून ते सतत पब्लिक ला आवडतं च गेले . मागच्या कॉमेंट मधे मी लिहिलेल आहे त्याप्रमाणे फर्स्ट इंप्रेशन हे लास्ट इंप्रेशन असतं. आता लोक ए टीम ला शिव्या घालणार म्हणजे घालणारच कितीही चांगल वागोत. शेवटी ममांच्या बोलण्या नुसार बिग बोस ची एडिटिंग टीम ठरवते कोणाला काळ्यात रंगवायचं आणि कोणाला पांढऱ्या त . काय दाखवायचं आणि काय नाही. तसही एलिमिनेशन आणि विनर त्यांचा तेच ठरवतात. व्होटिंग चा नुसता तमाशाच् असतो
आजीचा आवाज नयना आपटेंनी दिलाय
आजीचा आवाज नयना आपटेंनी दिलाय.
म मां च्या बोलण्यावर प्रेक्षकांची मतं ठरली? आम्ही म्हणतोय म मां इथलं वाचून बोलताहेत.
म मां च्या बोलण्यावर
म मां च्या बोलण्यावर प्रेक्षकांची मतं ठरली? आम्ही म्हणतोय म मां इथलं वाचून बोलताहेत.
<<<<
एग्झॅक्ट्ली, इनफॅक्ट ते स्वतःच म्हणतायेत कि प्रेक्षक सोशल मिडियावर तुमच्या बद्दल असे रिअॅक्ट होताहेत , मी प्रेक्षकांचा आवाज आहे !
हा पहिलाच सिझन आहे जिथे म.मा अजुन तरी अनबायस्ड आहेत !
प्रेक्षकांच मत मांजरेकरांनुसार ठरत असत तर मेघा जिंकली नसती, सर्वात जास्तं बॅशिंग तिला केलं, खोटे हेट्रेड फोन कॉल्स मेघाला आले होते !
फस्ट इंप्रेशन लास्ट वगैरे अज्जिबात नसतं, तसं ज्यांना वाटत त्यांनी हा शो आधी पाहिलाच नाहीये किंवा समजलाच नाहीये !
सई-पुष्कर जे प्रेक्षकांना आधी खूप आवडायचे ते रेशम गँग पेक्षा मोठे व्हिलन झाले नंतर , स्मिता निगेटिव गँग मधे सुरवातीला निगेटिव वाटली नंतर ती मेघाची सर्वात टफ काँपिटिटर म्हणून प्रेक्षकांना आवडली, पुष्कि नक्की खोटा रनर अप होता, खरी रनरप स्मिताच होती !
इथे जय ला स्प्लिट्सविला मधे बघून त्याच्यासाठी शो पहाणार्यांना तो इथे पाहून आवडेनासा झाला.
टिम ए आवडणारे त्यांचेच मित्र मैत्रीणी, नातेवाइक ,पेड पी.आर. किंवा शो न पहाताच मत देणारे आहेत
ममा त्यांना जे सेलेक्टिव
ममा त्यांना जे सेलेक्टिव प्रसंग दाखवले जातात त्यावर बोलतात.त्यामध्ये सुध्दा त्यांना लिहून दिलेलं असत.चोवीस तासाच्या चित्रीकरणात ल सिलेक्टीव्य प्रसंग त्यात सुद्धा ठरलेल्या व्यक्ती ना काळ्यात आणि ठरलेल्या व्याकिंना पांढऱ्या त दाखवणारे च प्रसंग ( चित्रीकरण) निवडण यात एडिटिंग वाल्याची कमाल च आहे. अस्ताद काळे प्रमाणे पराग पण हेच बोलला आरे सगळे काय सतत भांडत नसतात. गोडी गोडी त पण असतात पण ते प्रसंग एका तासात दाखवत च नाहीत त्यामुळे एकाची एक फिक्स प्रतिमा होऊन बसते ती पुसली जाण कठीण होऊन बसतं
आदिशला काय गरज होती
आदिशला काय गरज होती अविष्कारला सेफ करायची?
व्यवस्थित आम्ही पाहिलेला आहे
व्यवस्थित आम्ही पाहिलेला आहे शो फर्स्ट इम्प्रेशन हेच लास्ट इम्प्रेशन असतं. हाहा हा
व्यवस्थित आम्ही पाहिलेला आहे
व्यवस्थित आम्ही पाहिलेला आहे शो फर्स्ट इम्प्रेशन हेच लास्ट इम्प्रेशन असतं. हाहा हा
व्यवस्थित आम्ही पाहिलेला आहे
व्यवस्थित आम्ही पाहिलेला आहे शो फर्स्ट इम्प्रेशन हेच लास्ट इम्प्रेशन असतं. हाहा हा
अरे किती वेळा एकच कॉमेंट?
अरे किती वेळा एकच कॉमेंट? काही तरी बिनसलं हाहा हा
१ शेवटी ममांच्या बोलण्या
१ शेवटी ममांच्या बोलण्या नुसार बिग बोस ची एडिटिंग टीम ठरवते कोणाला काळ्यात रंगवायचं आणि कोणाला पांढऱ्या त . काय दाखवायचं आणि काय नाही
२ ममा त्यांना जे सेलेक्टिव प्रसंग दाखवले जातात त्यावर बोलतात.त्यामध्ये सुध्दा त्यांना लिहून दिलेलं असत.चोवीस तासाच्या चित्रीकरणात ल सिलेक्टीव्य प्रसंग त्यात सुद्धा ठरलेल्या व्यक्ती ना काळ्यात आणि ठरलेल्या व्याकिंना पांढऱ्या त दाखवणारे च प्रसंग ( चित्रीकरण) निवडण यात एडिटिंग वाल्याची कमाल च आहे.
नो कमेंट्स
टिम ए आवडणारे त्यांचेच मित्र
टिम ए आवडणारे त्यांचेच मित्र मैत्रीणी, नातेवाइक ,पेड पी.आर. किंवा शो न पहाताच मत देणारे आहेत)) आम्ही कोणाचे ना नातेवाईक ना मिञ मैत्रिणी न पेड पी. आर . देता का आम्हाला पैसे? करतो बी टीम या रड्या टीमची तारीफ. व्यवस्थित शो बघतो आम्ही आणि मतं बनवतो
एखादा एलिमिनेशन ड्रामा सुद्धा
एखादा एलिमिनेशन ड्रामा सुद्धा करतील >> कदाचित सिक्रेट रूम प्रकार पण करू शकतात यावेळी (असे उगीच वाटते आहे मला). आणि उत्कर्ष पर्फेक्ट कँडिडेट आहे त्याकरता.
>>फस्ट इंप्रेशन लास्ट वगैरे
>>फस्ट इंप्रेशन लास्ट वगैरे अज्जिबात नसतं
अगदी खरय!! मत बदलतात
बाकी बिग बॉसची टीम शो मॅन्युपलेट करते..... सिलेक्टेड गोष्टी दाखवते याबद्दल अज्जिबात दुमत नाही!
आजच सहज म्हणून २४ तास लाईव्ह बघत होतो..... सगळे एकत्र बसून आपापल्या आयुष्याचा प्रवास सांगत होते.... मीनलचा आणि गायत्रीचा प्रवास ऐकायला मिळाला!
गायत्री ला लोक कितीही ट्रोल करत असले तरी या फील्डमध्ये येण्यासाठी तिने केलेली मेहनत, सुरुवातीचा स्ट्रगल कुठेही कमी नाहिये.... खुप चांगली आणि एकदम नॉर्मल बोलत होती ती!
अर्थात हे दाखवतील असे वाटत नाही!!
त्यामुळे आपण एपिसोडमध्ये बघतो ती त्यांच्या व्यक्तिमत्वाची एकच बाजू आहे ही जाणीव ठेऊन बघितले की कुणाविषयीही टोकाचा संताप किंवा कुणाच्या आकंठ प्रेमात बुडून जायला होत नाही
स्क्रिप्टेड असत सगळ।,असच वाटत
स्क्रिप्टेड असत सगळ।,असच वाटत आहे आता.मागच्या वेळी 13 मधून 8 नॉमिनेटेड. आणि आज 11मधून फक्त 4 नॉमिनेटेड. त्यातही 3 स्ट्रॉंग आणि एक विक.
टीम ए ला मुद्दाम आणल जात नसाव कारण बिबॉसला माहित आहे,प्रचंड हेट्रेड आहे,जर बी मधल्या विशाल विकास मीनल बरोबर आली तर जय वाचेल पण पहिली गायत्री मग कदाचित उत्कर्ष बाहेर जाईल.लोक वाटच बघत आहेत.
पण बिबॉसला कंटेट हवा आहे, त्यामुळे निगेटिव्हिटी लागणारच.
म्हणून इतक्यात नाही आणणार त्यांना .
हे स्पर्धक सुध्दा काही भोळेसांब नसतात.
आम्ही देतो कंटेंट, होतो निगेटिव्ह, पैसे जास्त द्या,असेही कॉन्ट्रँक्ट होत असतील.
आविष्कार तर माझ्यामते 5 किंवा 6 आठवड्यांच सेटिंग करून आला आहे,ते झाल की जाईल बाहेर.
बिबॉसला म्हण ,स्क्रिप्ट लिहा ,पण लोकांना कळून देऊ नका की तुम्ही लिहित आहात.तेवढ भान ठेवा।
आम्ही पण बिबॉस कोळून प्यायलोय.
अस्ताद काळे आणि पराग हे
अस्ताद काळे आणि पराग
हे दोन्ही लोक फार रीलायबल नाहीत. रेशम टिपणीस मग बरी... बाहेर आल्यावर मोठ्या मनाने मान्य केले की बाहेरून बघताना आम्ही खरेच वाईट दिसत होतो. आम्हाला वाईट दाखवले असे ती कधीही नाही म्हणाली.
मराठी बिग बॉस मध्ये मराठी प्रेक्षकांना काय आवडते हे अभ्यास करून जे जातील ते हिट होणार. उगाच हिंदीची भ्रष्ट नक्कल करून काही उपयोग नाही. अती अभ्यास पण गोत्यात आणु शकतो कारण तुम्ही ठरवल्याप्रमाणे समोरचा रीऍक्ट नाही झाला तर तुम्ही गोंधळून जाणार. आणि तुमचे कृत्रिम वागणे प्रेक्षक नाकारतात.
अनसीन अनकट मध्ये आस्ताद पण
अनसीन अनकट मध्ये आस्ताद पण कधी कधी छान वाटायचा. तोच एक मराठी चांगले बोलायचा. पण ओव्हरऑल खेळ त्याला नाही कळला.
मला अजूनही आशा आहे मिरा तृप्ती सारखे एकटे खेळायला सुरुवात करून पुन्हा ट्रॅक वर येइल.
विकेंड दूसरा दिवस बघितला नाही
विकेंड दूसरा दिवस बघितला नाही अजून पण नेहा आधीही आवडत नव्हतीच आणि प्रोमोत ती एवढी वाईट दिसत होती की बास रे बास.
रेवा यांची अविष्कार कमेंट भारी आहे.
सुरेखाने पहिल्या पाचात गायत्रीचे नाव घेतलं नाही. मीराचे कौतुक केलं आहे, ती असेल म्हणाली आणि विशाल, विकास, मिनल यांची नावं घेऊन जय किंवा उत्कर्ष दोघांपैकी एक असेल म्हणाली आहे. चला टीम ए मधल्या एकीनेच विशाल, विकास, मिनल चे नाव घेतलं.
विशाल ,विकास ,मीनल , जय आणि
विशाल ,विकास ,मीनल , जय आणि मीरा हे मलाही टॉप ५ मधे ठेवतील असं वाटतय .
गेले दोन्ही सिझन टॉप ६ ठेवले होते फिनालेला आणि सहावा कँडिडेट वाइल्ड कार्ड होता दोन्ही सिझनला, पहिल्यात शर्मिष्ठा आणि दुसर्या सिझनला आरोह वेलणकर! यावेळी आदिश चांगला खेळला तर तोही असु शकतो सहावा पण आत्ताच नॉमिनेट झालाय तर काही सांगता येत नाही, दादुस राहिल आणि तो जाईल गायत्रीने सांगितल्या प्रमाणे २ आठवड्यात
म.मां बाकी बरोबर बोलले , जय, विशाल आणि विकास इंडिव्हिज्युअल खेळतायेत, बाकी फॉलोअर्स आहेत !
मीरा स्वत:ला चांगलं सुचत असते
मीरा स्वत:ला चांगलं सुचत असते गेम मध्ये असं सुरेखाताई म्हणाल्या. तसेही मीराला सर्वांत जास्त बोलतात म मां त्यामुळे ती असेल शेवटी.
विशाल ,विकास ,मीनल , जय आणि मीरा हे मलाही टॉप ५ मधे ठेवतील असं वाटतय . >>> मलाही हे पाच आवडतील शेवटी. शेवटी जयचा पचका झालेला बघायला जास्त आवडेल.
पहिल्या आठवड्यापासून ममांनी ए
पहिल्या आठवड्यापासून ममांनी ए टीम ला नाव ठेवायला सूरवात केली आहे गायत्रीला ला बुगुबुगु/ मीराला काय स्वताला बिग बॉस समजते काय?/ जय तुझा अँगर सांभाळ आणि उत्कर्ष ला डबल ढोलकी . हे सगळं पहिल्या आठवड्यात च .झाल तेव्हा पासुन ए टीम वाले पब्लिक च्या डोक्यात निगेटिव्ह होत गेले ते निगेटिव्ह च होत गेले. >>> विकेंड उशीरा असतो ना, पाच सहा दिवस झाल्यावर त्यामुळे म मां नी आधी नावं नाही ठेवली. सोशल मिडीयावर आधी टीम ए चं वागणं बघून लोकं लिहीत होती, उलट म मां नी ते सर्व वाचून किंवा बिग बॉस टीमने वाचून नंतर विकेंडला म मांनी सांगितलं.
मी आत्ता ह्यावेळेच्या विकेंड दुसरा भाग बघायला सुरुवात केली पण शिव नेहा पार्ट मला बोअर वाटला. त्यामुळे मी एकदम शेवट बघितला. निदान शेवटी तरी सुरेखाताईंनी तृप्तीताईंना निवडून योग्य गोष्ट केली.
विकासला शेवटी तिघांत ठेवलं तरी त्याने घाबरु नये, एकतर तो दोन नं वर होता ( अर्थात हे त्याला माहिती नाही म्हणा ) आणि दुसरी गोष्ट म्हणजे कलर्सचा माणूस आहे, चांगलं स्वत:च्या डोक्याने खेळतोय हे म मां नी पण सांगितलं. उगाच फिजिकल अटॅक वगैरे केला नाही किंवा काही नियम मोडले नाहीत तर तो आरामात फायनलला असेल हे त्यालाही माहिती असणार, निर्धास्त होऊन टीम बी मध्येच खेळावे त्याने.
आविष्कार तर माझ्यामते 5 किंवा
आविष्कार तर माझ्यामते 5 किंवा 6 आठवड्यांच सेटिंग करून आला आहे,ते झाल की जाईल बाहेर.>>मलाही असेच वाटते.
एक तरी असा असतोच जो काही न करता आरामात खाणे-पिणे, खेळ बघणे आणि त्यावर वाटले तर टिपणी करत ४-५ आठवडे घालवतो. पहिल्या सिजनला उषा नाडकर्णी, दुसऱ्या सुरेखा पुणेकर आणि आता अविष्कार.
यावेळी मी मीनल, विकास, आदीशला
यावेळी मी मीनल, विकास, आदीशला voting करेन, दादूस गेले तरी चालतील.
आदिश ने आविश्कारला सेव्ह केल
आदिश ने आविश्कारला सेव्ह केल ते कुणालाच अपेक्षित नव्हत स्वत: आविश्कारलाही नाही " अचानक धनलाभ योग"
आदिशला माहितीये विकास-विशाल-मिनल-सोना त्याचा नबर थेट पाचवा आहे ग्रुप मधे त्यामुळे त्याला विकास नाहितर विशालला एकाला अनसेफ करायचेच असणार.
आदिश अन्सेफ झाला तरी त्याला इतक्यात नाहि काढणार बीबॉस
मिनलने विशालला सेव्ह केल तेव्हा विकासचा चेहरा पडला होता वर आदिश जाउन त्याचे कान भरतोय .अरे !तुला चान्स आहे होता तर करायचे की तु सेव्ह विकासला .
जय कसला फ्लर्ट आहे , एकिकडे स्नेहाला पटवतो मधेच सोनाशी गोड गोड बोलतो, जय मधे एकदम तरुणपणीचा अजिक्य देवचा भास होतो स्पेशली हसताना.
स्नेहा त्याला अहो जाहो का म्हणते???
बाकी आजही टिम ए अगदी टपुन बसली होती हिरा उचलायला ,त्याच्यात विनिन्ग स्पिरिट जबरदस्त आहे पण नाहि ते राडे करुन किलोकिलोने माती खातात.
विकासने एक मुद्दा मान्डला जो सलमानही बर्याच वेळा स्पर्धकाना सागायचा " गेम फक्त ३ महिन्याचा आहे नतर बाहेर यायचच न्डस्ट्रित काम करायच"
विकास मागेपण सेम सोनालीला
विकास मागेपण सेम सोनालीला सांगत होता, समजावत होता, ती जरा down होती तेव्हा.
मी नेहा शिव भाग स्कीप केला. त्यामुळे नक्की काय ते मला माहिती नाही पण तृप्तीताईना नेहा बोलल्याने ती सो मि वर परत शिव्या खातेय. बऱ्याच जणांनी टीका केलीय. तिला उत्तर द्यायला लागलं त्यावर. तिचा वावर, एकंदरीत अवतार यावेळीही निगेटिव्ह होता म्हणजे.
हो, सलमान खान प्रतीकच्या
हो, सलमान खान प्रतीकच्या तोडफोडीवर हेच म्हंटला कि तुला राग आल्यावर असा रिअॅक्ट होत असशील, यु विल नेव्हर ग्रो इन करिअर, फार तर अजुन एखादा रिअॅलिटी शो मिळेल पण अॅक्चुअल टि.व्ही. शोज मधे काम कोणी देणार नाही डिस्ट्रक्टिव माणसाला.
तिथल्या फेक लव्ह स्टोरीवर पण एकदमच कॉन्झर्वेटिव अॅटिट्युड दिला सलमान खाननी, तुम्ही दोघं जे काही चाळे करत आहात, जर शो मधून बाहेर गेल्यावर एकत्र राहिला नाहीत, काही वर्षांनी दोघांचेही लाइफ पार्टनर्स वेगळे असतील तर त्यांना / त्यांच्या फॅमिलीजना हे बघताना काय वाटेल विचार करून मगच जे करताय ते करा कारण इथे तुम्ही कुठल कॅरॅक्टर प्ले करत नाही आहात, स्वतःला रिप्रेझेन्ट करताय !
Pages