मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नेहा काय, सगळेजण टुकार होते मागच्या सिझन मध्ये. विद्याधर जोशी चांगले होते पण वय जास्त होते त्यामुळे टास्क मध्ये खेळू नाही शकले.
हा सिझन जास्त बरा झालाय.

विशाल आता चांगलं आर्टिक्युलेट करू लागलाय.
त्याने आदिश आणि सोनाली या दोघांची तक्रार केली. टीम ए ला तक्रार करायलाही मोजलं नाही.

सुरेखा आउट.
मांजरेकरांनी स्नेहा आणि सुरेखा दोघींना शेवटी ठेवलं निकाल सांगताना.

विशाल एकदम विनर सारखा खेळतोय , टिम ए जणु व्हिलन बनण्यासाठीच..
तरी म.मां खूप हिंट्स देतायेत टिम ए ला सुधारण्याच्या !

ओह सुरेखा गेली की. बरे झाले. तिला स्पेशल पावर मिळाली कॅप्टन कोण हे ठरवायची!! अन तिने तृप्तीचे नाव घेतले हे अजून एक आश्चर्य!

मात्र सगळी रडारड ही अत्यंत नाटकी वाटली, अन त्यात पण ती स्नेहा. बाप रे काय भयानक भीतीदायक रडली ती. ती पण बाहेर पडावी या आठवड्यात.

असे असेल तर हे चॅनेल वाले व्होटिंग फार मॅनुप्युलेट करत नसावेत.
त्रुप्तीला कॅप्टन सुरेखाने केले असेल तर, बाहेर पडले की माणूस फेअर होतो हाच निष्कर्ष निघतो. Happy

स्नेहा आता पूर्ण एकटी पडेल. तिला जय बद्दल अजूनही विश्वास वाटतोय.
काल फेक लव्ह स्टोरीची हिंट दिल्यावर ती लगेच जयशी बोलायला गेली तेव्हा त्याला अहोजाहो का करत होती?

तिने तृप्तीचे नाव घेतले का खरंच कॅप्टन म्हणून? फार नवल वाटले मला. तिच्या सोन्या जय चे , लाडक्या स्नेहाचे सोडून एकदम तृप्ती ?!
म्हणजे इन्डायरेक्टली मीरा अन गायत्रीला फटका बसला की. त्या तृप्तीविरुद्ध निषेध वगैरे करत होत्या.

हो जाता जाता चांगलं काम करून गेली सुरेखा...निदान तिच्या या निर्णयाचं तरी कौतुक होईल...सुरवातीचे 2आठवडे ती चांगलीच होती...टॉर्चर टास्क पासून खूपच बदलली...आणि चुकीचा ग्रुप निवडल्याने evict झाली...otherwise she was a strong player...पण मला जास्त हसू याचं आलं की चक्क आविष्कारच्या आधी सुरेखा गेली...तृप्ती, बाहेरचे येऊन बोलले तरी आपल्या निर्णयावर ठाम होती त्यामुळे अजूनच उठून दिसली...she is a nice soul..

माझ्या मते त्रुप्ती फेअर खेळत आहे,बाहेर लोकांनाही आवडू लागली आहे,पण ग्लॅमर क्षेत्राशी संबंधित नसल्याने वोटिंग मध्ये मागे पडते.अशीच छान खेळली आणि तिच्या नशिबाने बाहेरील जर असतील तर तिच्या विरोधकांनी जर काही काड्या केल्या नाहीत,तर खूप पुढे जाईल,अशा परिस्थितीत बिबॉस तिला नेणार पुढे.
ते आज समजल.स्नेहाला कँप्टन्सी न देता तिला कँप्टन्सी देऊन, या आठवड्यात नॉमिनेशनपासून सेफ केल.
आता तिने टास्क पण खेळायला सुरुवात करावी.पण टीम बी मधून खेळली तर संधी कमी मिळेल.
मग परत एकदा कदाचित बिबॉसच मदत करेल.आणि टास्क करायला भाग पाडेल.
पण नेहाला सुध्दा बोलायला घाबरली नाही,हे विशेष.
स्नेहाची मात्र फार पंचाईत होणार अस दिसत आहे.ना घर का ना घाट का ,अस होणार आहे.

टिम ए वाले रडत होते त्यावरुनच वाटल होत सुरेखा असतिल, तशाही त्या सारख म्हणत होत्या की मी राहिले नाही तरी तुम्ही छान खेळा,अस का म्हणत होत्या कोणास ठाउक , अस तर काहीही न करणारा अविष्कारही म्हणत नाही.

काय नाटकी रडत होते सगळे आणि स्नेहाचे रडणे तर सगळ्यात भयानक. मीराचे अश्रू दिसलेच नाहीत. सुरेखा दादूसच्या पाया का पडली, मोठी असेल ती त्याच्यापेक्षा. सुरेखा म्हणाली परिस्थित्या अशा निर्माण होतात Uhoh एकंदरीत उत्तम मराठी बोलणारं कुणीच नाही.

चावडी पहिला भाग शेवटचा गेम सोडून बघितला, भारी होता.

योग्य झापले म मांनी. फरक काही पडणार नाहीये. बाहेर काय लोकांचे मत आहे ते सांगायचा पुरेपूर प्रयत्न केला. स्नेहाला पण योग्य सुनावले. गायत्री मीरा मध्ये मीरापेक्षा गायत्रीला जास्त माज आहे अस जाणवले मात्र. मीरा थोडी नम्र तरी वागते म मां समोर, गायत्री नाही अजिबात, दिसायला पण मीरा उजवी दिसते. काही पंचेस म मां नी फार सुंदर टाकले.

शेवटी स्नेहाला मात्र का डोक्यावर चढवत होते, एवढी कुठे स्नेहा चांगली खेळते, कुठलेच गुण दिसले नाहीत तिच्यातले मलातरी. फक्त जयच्या मागे मागे करते.

पब्लीक ला आवडतं नाही / बिग बॉस च्या मनासारखे खेळत नाहीत म्हणून ए टीम ला बाहेर काढले तर बिग बॉस ओरडणार कोणाला?
<<<<
नाही , मला नाही वाटत ए टिम जावी म्हणून आणि ते बिगबॉसच्या मनासारखेच खेळतायेत, कोणी निगेटिव झाले नाही तर विनर पॉझिटिव कसा वाटेल ?
टॉप ९ मधे तरी राहु देत मीरा गायत्रीला ममांची बोलणी खायला Proud
जोक्स अपार्ट पण हिरो, हिरॉइन, जिवलग मित्र्/मैत्रीण जो नंतर शत्रु बनतो, साइड कॅरॅक्टर्स, प्रॉपर व्हिलन, कॉमेडियन, फादर फिगर सगळे लागतात शो चालवायला !
अविष्कार, दादुस, स्नेहा सारखे काहीच स्टँड नसणारे पब्लिक घालवा आधी !
जय तर असणारच आहे फिनाले पर्यन्त , मीराही असु शकते !

तस कॅप्टनसी टास्क मधे तृप्ती ताइनी टास्क पुर्ण रद्द करायची गरज नव्हती, बीबॉस ला सान्गता आले असते की टाय झालाय पुढचा निर्णय तुम्ही घ्या त्याने त्या बायस दिसल्या नसत्या, टिम ए स्वत: बायस्ड खेळते तेव्हा काही नाही पण एरवी कुणी जरा मनाविरुद्ध केले की झाल्या सुरु.
गायत्री मीरा मध्ये मीरापेक्षा गायत्रीला जास्त माज आहे अस जाणवले मात्र. >> अगदी अगदी!
जय, उत्कर्श्,मिरा आणि गादा ममाना शुन्य महत्व देतात.

कालचा रेड रोझ ब्लॅक रोझ टास्क बोअर झाला..... नेहा मागच्या सीझनमध्ये माझी आवडती स्पर्धक होती.... काल मात्र फार उग्र दिसत होती!
ट्रिप केली, लेक्चर्स केली, रोझ डे केला तेव्ह्ड्हे ते फिशपॉंड्स पण केले असते तर अजुन मज्जा आली असती..... या लोकांची क्रिएटिव्हिटी तरी कळली असती..... ते त्याच त्याच तक्रारींची पत्रे वाचण्यापेक्षा त्याला मजा आली असती!

ती नेहा काय बोलली की सुरेखाताईंचे पोस्टर क्लीन दिसत होते लगेच एपिसोडभर A टीमच्या लोकांनी तेच चऱ्हाट लावले..... पण तृप्ती त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या..... मांजरेकर म्हणतात टाय झाली तर अंताक्षरी घ्या.... पण असे केले असते तरी खेळणारे लोक ओरडलेच असते की अशी मनमानी कशीकाय करु शकतात म्हणून!

जय आणि गायत्री जरा टोन डाऊन झाल्यासारखे वाटले..... जय म्हणाला की तो ॲंगर वर काम करतोय म्हणून आणि सुधारणा दिसेल असे त्याने आश्वस्त पण केले.... गायत्री पण आदिश आणि गॅंगला आधी सॉरी म्हणाली आणि मग तक्रारी वाचल्या..... मीरा मात्र आदळआपट मोडमध्ये गेली आणि अजुनच वाईट दिसली!

विशालने सोनालीला रेड रोझ न देऊन तिचा अजुन एकदा जाहिर पचका केला!
पण अदरवाईज त्याने नेमके स्टॅंड घेत मोठी मजल मारलीय.

दादूस विकास आणि स्नेहाच्या आधी सेफ झाले तेंव्हाच कळले होते की आज सुरेखाताई इलिमिनेट होणार!
त्या स्नेहाला कॅप्टन करणार याची १००% खात्री असताना त्यांनी तृप्तीला कॅप्टन करुन गुगली टाकला!

पण आता बोअर व्हायला लागलेय..... खुप एकसुरी झालाय शो..... दोन्ही ग्रूपमध्ये जोपर्यंत जरा फाटाफूट होत नाही तोपर्यत आता तेच तेच बघायचा कंटाला येईल!

माझ्यादृष्टीने वीकेंड चावडीचा हायलाईट होते जेंव्हा मांजरेकर मीरा आणि गायत्रीला म्हणाले की तुम्ही जर तुम्ही काय करतात बघाल तर स्वताच स्वतला घराबाहेर काढाल..... याच्यापेक्षा मोठी हिंट असूच शकत नाही!
इतके होवूनही त्या दोघींनी आपल्या वागण्यात लक्षणीय बदल केला नाही तर मग अवघड आहे!

विकास काहीतर उलथापालथ करणार या आठवड्यात. आदिश आल्यावर शांत शांत होता आणि काल बिग बॉसने बॉटम 3मध्ये टाकून त्यात अजून भर घातली.

यावेळी गादा चक्क सॉरी म्हणाली ज्यांना ज्यांना डिवचले आहे त्यांना.. जयने ही चांगली सफाई दिली. सुधारत आहे तो स्वत:ला, असे वाटले. पण टास्क आला की परत ये रे माझ्या मागल्या. अन मीराबाई काही मागे हटायला तयार नव्हत्या.
गुबुगुबुला आदिश चे 'गुबुगुबु' शब्द फार लागले असे दिसले. अन ती म्हणते ते बोलायचा अधिकार फक्त बिबॉलाच आहे. Biggrin बाहेर येउन बघ म्हणावं, व्ह्युवर्स काय काय शिव्या घालत आहेत ते.

सुरेखाबाईनी जाता जाता चांगुलपणा दाखवला. पण तृप्तीताईने कॅप्टनपदाचा चान्स दिला नाही हे चांगलेच लागलेले दिसले.
या आठवड्यात अविष्कार जावा.. नंतर स्नेहा, अन मग दादुस! मग खरी लढत सुरु होईल.

आज पुन्हा एकदा तृप्तीताई रॉक्ड , त्या अनॉयिंग नेहाने प्रयत्नं केला त्यांना क्रिटिसाइझ करायचा , तो मुद्दा धरून इतरांनीही ट्राय मारला पण शेवटपर्यंत ठाम राहिली तृप्ती !
सध्या खर सांगायचं तर सगळ्या बायकांमधे मुद्दे मांडण्यात तृप्तीताईच नं.१ दिसतायेत , तक्रारीचे पत्रं पण सर्वात चांगलं तिनीच लिहिलं होतं .
गायत्रीने म.मां ची थोडी हिंट घेऊन चक्क २ वेळा सॉरी म्हंटली आज , आदिशही सॉरी म्हंटला.
मीराने मात्र अजुन जास्तं पंगा घेतला विशालशी , वॉर इज स्टिल ऑन !
बाकी शिव नेहा आणि त्यांचा टास्क महा बोरींग , काय त्या नेहाचा ड्रेस, बुट्स, हेअर अँड मेकप Uhoh
सुरेखा गेल्यावर स्नेहा काय खोटी रडली, अ‍ॅक्टिंग बोंब आहे असं दिसतय Proud
तृप्तीला कॅप्टन करायला बहुतेक बिबॉ टिमने सांगितल‘ अस्स्णार Happy

सुरेखा बोललीच होती की ती एका महिन्याचे च कपडे घेउन आलीये... काल तर ती फार काही मेक अप न करताच बसली होती.. साडी पण यथा तथाच..least interested

कालचा भाग फार बोर झाला. ते रावण प्रकार शनिवारी झाला तरी पुन्हा ते पत्र वाचन कशाला? तेच तेच झाले सगळेच.
शिव आणि नेहा टास्क पण अगदीच प्रेडिक्टेबल आणि बोरिंग. त्या दोघांचाही ना प्रेझेन्स ना संवाद काहीच इंटरेस्टिंग नव्हते.
बाकी गायत्री आणि जय ने हिंट घेतली असावी. दोघांनी डॅमेज कन्ट्रोल सुरु केले.
शेवटी स्नेहा आणि सुरेखाला ठेवले तेव्हाच कळले कोण जाणार. ते अनाउन्स झाल्यावर बहुतेक लोक कोर्‍या चेहर्‍याने ऐकत होते. मग नंतर सगळे सुमार अ‍ॅक्टर्स चे अ‍ॅक्टिंग पणाला लागले! स्नेहा तोंड लपवून वेड्यासारखे हुंदके देत होती. जय चा मनोज कुमार झाला पुन्हा Lol विकास ने टिश्यू चा आधार घेतला.
तृप्तीला कॅप्टन करायला बहुतेक बिबॉ टिमने सांगितल‘ अस्स्णार >>> हो हो Happy
आविष्कार काहीही कन्टेन्ट देत नाही काही दिसत पण नाही. कशाला त्याला सेव्ह करताहेत. आधी तो जायला हवा आता.

Pages