मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सोनाली बद्दल +१
कसले भारी वन लायनर्स असतात तिचे, आम्ही फेक लव्ह स्टोरी केली तर काय उसाचे भाव कमी होणारेत का ज्वालामुखी येणारे >> हा हा हा.. ती ज्या टोन आणि कोल्हापुरी ठसक्यात बोलते ना..ते ऐकुन मस्त वाटत.. त्या गोल गोल पाणी च्या टास्क मध्ये पण विकास आणि तिने बोलून मस्त एंटरटेन केलेल.. शेवटी उतरताना विकास तिला म्हणे चल ..एकत्रच उतरु.. तर सोनाली म्हणाली..कशाला..काय सत्यनारायणा ची पुजा हाय का.. Lol

ममा फारच जास्त हिंट देत आहेत A टीम ला..त्याना त्यांचा natural गेम खेळू दया ना.. असतील चिडके कुसके..तर असू दे ना.. त्या शिवाय दुसरी टीम उठुन दिसेल का.. सगळेच एकमेका साहाय्य करु च्या मोड मध्ये गेले तर ते बिग बॉस राहील का.. Lol

आज मीरा ची साडी छान होती..पण matching oxydised दागिने पोचले नाही वाटत तिचे.. काय मीस मैच घातले होते.. साडी चंदेरी काठाची दागिने सोनेरी

कालच्या भागात विकासला मांज्या जास्त काही बोलला नाही, सगळे विशाल आणि आदिशला टार्गेट करत होते आणि शेवटी विशाल मीनल सेफ होऊन त्याला atkt लागली तेव्हा तो थोडा अवस्थ वाटला. पुढच्या आठवड्यात ब तुकडीत उलथापालथ घडू शकते.

आज पण एकदम बॅलन्स्ड झाली चावडी, मांजरेकर मस्तं करतायेत हा सिझन !
त्या गायत्री आणि मीरा कोडग्या झालायेत , प्रत्येक चावडी वरची बोलणी खायची इतकी सवय झाली आहे त्यांना आता, काsssही फरक पडत नाही त्यांना म.मां च्या बोलण्याचा , हसत होत्या नुसत्या !
ममांनी स्नेहाच्या हसण्याची नक्कल आणि जय स्नेहाची लस्टस्टोरी फोडून मज्जा केली !
मूर्ख स्नेहालाही काही एक फरक पडलेला नाहीये , उलट लाजत होती , साइडकार बनण्यात खुष आहे ती !
’जय बिनडोक तिला एक्स्प्लेनेशन काय देत होता तर म्हणे टिम बी चे चौघे जीपमधे बसले असते तर त्यांनीही तुला उतरवल असतं, अर्रे.. ते स्नेहाचे मित्रं नाहीत आणि स्नेहाशी विशेष याराना नाही त्यांचा जय सारखा, ते उतरवणारच ना स्नेहाला, तुम्ही मित्रं बनून उतरवलं म्हणून प्रश्नं केला ममांनी.. बिनडोक स्नेहाला पटलं ते !
तृप्ती सेफ झाली बेष्ट झाले, सुरेखाला उडवलं पाहिजे आता पण बहुतेक दादुस जाईल !

अ तुकडी मांज्या आपली तासणार याच मेंटलीटीने बसलेले असतात. मिराला कल्पना आली होती म्हणून आदल्या रात्री रडत होती. मांज्याने ते बोलून पण दाखवलं उत्कर्ष जयला. ते खरच बोलत असतील 'आला हा'. मांज्या त्यांना ओरडतो त्यात पण त्यांना गर्व वाटतो.

<<डीजे मलाही सोनाली दिसण्यात एक नंबर वाटते.<<अगदी अगदी.. सावळी असली तरी शार्प फीचर्स आहेत तिचे.
स्नेहा किंवा सुरेखा जायला हवी! दादूस नको,
स्नेहा तस पाहिलं, तर गोड गोड दिसण्यापलीकडे काहीच कंटेंट देत नाही. कालचाही तिचा ड्रेस अन मेकप हॉरीबल.. केवढी ती डार्क लिपस्टिक! कसली येड्यासारखी लाजत होती जय वरून ममां बोलत होते तेव्हा!
<<त्या गायत्री आणि मीरा कोडग्या झालायेत , << जयही तसाच! अन विकास, मीनल फारच सिरीयसली घेतात ममांचे बोलणे.
गादा काय उत्साहाने हसत हसत उठली आदिशच्या चालण्याची नक्कल करायला! अन ममांनी नंतर फटकारले तेव्हा गप्प बसली! Biggrin

मेधावि, तिघे सेफ झाल्याचं कालचा भाग संपता संपता दाखवलं. कॉलेज थीमला धरून आठजणांचे रिपोर्ट कार्ड आले. त्यात तिघे पास, उरलेले एटीकेटी.

मिरा एकदम अजिजी केल्यासारखी बोलते वर ममानी काही म्हटल की नाहि सर ! म्हणते तिथल्या तिथे शब्द फिरवतात लाजही वाटत नाही तरी ममा चारचारदा सान्गतायत की मी बघुन मगच बोलतो तरी पालथे घडे तसेच!!! , गादा सगळ्यात निगरगट्ट आहे,
मला वाटत वोटिन्ग च रॅकिन्ग दाखवायला हव या सगळ्याना, उत्कर्षही हसत असतो ,जय नेहमिप्रमाणे मग्रुर चेहरा घेवुन बसतो शनिवारी कोडगे झालेत चौघ!
दादुस अगदी साधे आहेत बिचारे,ममानी कौतुक केल्यावर हळवे झाले होते.
स्न्हेहा-आविश्कार मठ्ठ आहेत अगदी, फक्त ओके सर्,हो सर!
सोनाली गोड दिसत होती पिन्क ड्रेस मधे, मिराही आज पहिल्यादा बरी दिसत होती.

.

आज मीरा ची साडी छान होती..पण matching oxydised दागिने पोचले नाही वाटत तिचे.. काय मीस मैच घातले होते.. साडी चंदेरी काठाची दागिने सोनेरी>>>exactly oxidized घालायला हवे होते...हे आपल्यासारख्या साध्या लोकांना कळतं...तर या celebrities ना कळत नाही का?

पब्लीक ने तर घोशाच लावलाय ए टीमच्या चौकडी ला बाहेर काढा म्हणून.पण मला स्वतःला ए टीम वालेच आवडतात कारण ते नेटाने अतिशय हिरीरीने टास्क खेळतात. जिंकू किंवा हरू त्यांना पर्वा नसते . अगदीं डोकं लावून जे जे त्यांना सुचत ते हिरीरीने खेळत असतात. त्याउलट बी टीम वाले रडे आहेत . त्यातल्या मिनल आणि सोनाली तर राड्याचां टास्क खेळण्यात क्वचित उतरतात. फक्त विकास विशाल आणि आता आदिष वर त्यांची सर्व मदार आहे. इकडे मिरा आणि गायत्री मात्र प्रत्येक टास्क मध्ये असतात. आणि मग इतके ए टीम वाले हिरीरीने/ ईर्षेने टास्क करतं असुनही दर वेळी चावडीवर त्यांना च ओरडा बसत असेल तर बिग बॉस ने त्यांना हटवून दाखवावे ना. आहे हिम्मत बिग बॉस मध्ये.? नाहीं करणार ते . कारण ए टीमला चावडीवर रागवण्याने त्यांना टिरपी मिळतो. maximam टीआरपी देणारी ए टीम च आहे. पब्लीक ला आवडतं नाही / बिग बॉस च्या मनासारखे खेळत नाहीत म्हणून ए टीम ला बाहेर काढले तर बिग बॉस ओरडणार कोणाला? म्हणून मला वाटतंय बीग बॉस ने ए टीम ला बाहेर काढायला पाहिजे. ए टीम ला बाहेर काढलं तर चावडी कशी रंगणार बघायचच आहे मला. सगळ्यांशी गुडी गुडी तू किती छान खेळतोय. तू किती मस्त बोलतोस/ विशाल तू किती अचूक वेळी रडतोस .छान हा. असाच खेळ किव्वा तू किती छान बोलतोस सगळ्यांशी असाच रहा अस गुडी गुडी बोलुन आणि बी टीम वाल्यांच कौतुक करुन चावडी रंगणार आहे का? बघायचंच आहे.मी तर म्हणेन ए टीम वाल्यांना शिव्या खाण्याचे एकस्ट्रा पैसे दिले पाहिजेत बिग बॉस ने. पराग सांगतोय दर आठवड्याला सगळ्यांना एक लाख मिळतातं म्हणजे मग ए टीम च्या चौकडी ला तर दोन लाख दीले पाहीजेत बिग बॉस ने शिव्या खाण्याचे

आणि शेवटच्या तिन मध्ये पब्लिक ला आवडणाऱ्या टीम मधले दोन मेंबर असतात आणि पब्लिक न आवडणाऱ्या टीम मधला एक असतो अणि पब्लिक ला आवडणाऱ्या टीम मधल्या एका ला जिंकवतात त्यामुळे विशाल जिंकायचे चांसेस जास्त आहेत कारण शेवटच्या तिन मध्ये विशाल विकास ( पब्लीक ला आवडणाऱ्या टीम मधले) आणि चौकडी मधला एक कोणी तरी ( पब्लीक ला नावडणाऱ्या टीम मधला एक सदस्य) अस असेल बहुदा

Team A खरंच छान खेळते...पण Sporting spirit,चुका केल्या तर acceptance या qualities नाहिये त्यांच्याकडे....फक्त आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा असा त्यांचा होरा असतो...आणि कोणी नाही मानले तर अत्यंत नीच पातळीवर उतरून त्या व्यक्तीला नामोहरम करण्याचा प्रयत्न करतात...अगदी घरातही सारखे खुन्नस घेऊन वावरतात..ते अज्जिबात आवडत नाही...आणि bigg boss मध्ये नुसते task चांगले खेळणे, जिंकणे महत्त्वाचे नसून task मनापासून खेळणे आणि प्रेक्षकांची मनं जिंकणे जास्त महत्त्वाचे आहे...बाकी team b ला अजून चांगलं खेळण्यासाठी ममांनी कान टोचायला हवेच... Happy

टीम एचा सगळ्यात महत्वाचा दोष मला असा वाटतो की ते त्यांची हळवी बाजू कधीच दाखवत नाहीत. दुसऱ्या टीममधल्या कुणासोबतही आजीबातच चांगले वागता कामा नये असा काहीसा त्यांचा विचार दिसतो. सतत कॉम्पिटिटिव्ह मोडमध्ये असले की लोकांना तेवढेच दिसते.

टीम एचा सगळ्यात महत्वाचा दोष मला असा वाटतो की ते त्यांची हळवी बाजू कधीच दाखवत नाहीत.>>>मला तर प्रश्न पडतो, त्यांना खरंच हळवी बाजू आहे का?? उदाहरण द्यायचे झाले तर कालच्या रावणाच्या task मध्ये त्या जयने खरंच बाण घुसवला...आदिशला लागलं तरी त्याने sorry पण म्हटलं नाही...मीरानेसुद्धा पूर्ण खुन्नस दाखवली...गायत्री तर overall धन्यच आहे...साध्या मजेच्या task मध्ये इतकं विचित्र वागणारे लोकं हळवी असतील...

मोक्षूला मम.

पब्लिक पहीला स्वभाव बघते आणि इतर हुशारीही. टास्क बद्दल इथेही बरेच जण ए टीम आवडत नसली तरी कौतुक करतात. मीरा मलाही आवडायची मधेच पण खरंच जय मीरा गायत्री स्नेहा आणि सुरेखा अतिशय निगेटिव्ह लोकं आहेत, दुसऱ्यांना तुच्छ समजतात (superiority complex अति आहे, त्यापुढे टास्क लोकं बघणार नाहीत आणि म मां नी सांगूनही त्यांना सुधारायचं नाहीये त्यांना मग लोकांनी त्यांना किंमत का द्यावी) . पण जयला ठेवतील पहिल्या तिघांत.

ए टीममधली स्नेहाही आवडत नाही, भयाण ड्रेस वाटला विकेंडचा मला. दादुस आणि तृप्ती फक्त आवडतात.

विशाल पहिला येईल (मोस्टली), जय तिघांत असेल तर मिनलला ठेवतील तिघांत, एक महिला ठेवतील मिनल योग्य आहे, नाहीतर विकास (महिला नसला तरी तिघांत येण्यासाठी जयपेक्षा योग्य वाटतो मला) . मला विशाल विकास मिनल पहिले तीन आवडतील.

कालचा भाग पण मस्त झाला. मांजरेकर भारी बोलतात. पण मीराला जरा जास्त झापले, त्यापेक्षा जय ला जरा झापले असते तर चालले असते. उलट बाकिच्यांनाच म्हणत होते, जय जास्त चिडतो तर तुम्ही त्याला आवरायचं ना. तुम्ही कसले मित्र.
ए ग्रुप जास्त स्ट्राँग खेळत आहे हे खरं आहे. त्यांची युनिटी जास्त आहे. स्मार्ट आयडिया पण काढतात. वर कुणीतरी म्हटलंय तसं ते सगळेच टास्क मधे भाग घेतात. बी ग्रुप च्या मीनल, सोनाली ने ते शिकावे जरा, बॅकसीट घ्यायला नकोय.
बहुतेक दादुस झाला वाटते एलिमिनेट.

आजच्या भागाची झलक पाहिली. नेहा शितोळे भयंकर दिसत होती. किती भडक मेकप आणि ड्रेस!
शिव चा पण तो सूट आवडला नाही.

आस्ताद काळे गेम संपून वर्षे झाल तरी मेघाशी भांडत होता एका कार्यक्रमात. Happy
त्यामुळे बिग बॉस ठरवून यांना वाईट दाखवत असेल असे नाही वाटत.
टास्क जिंकला नाही तरी चालेल, पब्लिक ची मने जिंकायची असतात. स्मिता गोंदकर ह्या बाबतीत एक नंबर होती. खलनायक टीममध्ये असूनही तिने तिची छबी कधीही खराब नाही होउन दिली.
त्रुप्तीला सेफ केले हे बरेच झाले. बी टीममध्ये वाढलेली गर्दी त्यांना मारक ठरु शकते. ए टीममध्ये फक्त चार लोक आहेत, बाकी सब वापरा आणि फेकून द्या.
ए टीम दर वेळी कॅप्टन निवडायच्या टास्क मध्ये माती खाते. पण नॉमिनेट नाही होत कधीही. हा ट्रेंड चालू राहिला तर पुढे काही आठवडे बी टीमचे बळी जाणार.

जयला फिनालेला आणायचय ना, त्याला नाही जास्तं ओरडले , उलट तुमच्यामुळे तो व्हिलन वाट्टोय म्हणाले मी-गा -उ त्रिकुटाला.
नक्की कोण गेलय आज? मी तर सुरेखा गेली वाचलं, लेट्स सी !
नेहा कधीही नाही आवडली मला, काय भयानक दिसत होती केस पर्म केल्यावर आणि इन जनरलच !

मी तर सुरेखा गेली वाचलं >>> हीच गेली असावी बहुतेक. एक प्रोमो आहे कोण जाणार त्याखाली लोकांनी सुरेखा गेली लिहिलं आहे.

नेहा कधीही नाही आवडली मला >>> सेम पिंच.

Pages