मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सोनाली नेहेमीच किचनमधे वाद का घालत असते.

मीनल हवीच पहील्या तीनांत. बघितला नाही एपिसोड अजून पण इथे वाचून लिहीते.

हिरा भानगड काय आहे, मी दोन मिनिटांचे बघितलं तेव्हा उत्कर्षचा हात पकडला, धरला काही दिसलं नाही मला. तो टीम ए कडे तक्रार करत होता. तिथेही मीनलची हुशारी जाणवली. चपळता दिसली मला.

तो उत्कर्ष गायत्रीला मिरची धुरीवेळी काही बोलला नव्हता आणि टीम बीला मीठासाठी अडवलं, मग लोकं बोलणारचना आणि ते वाचून म मां ना सुनावायला लागलं. आता हिरा टास्कवेळी उत्कर्ष बरोबर असेल तर म मां टीम बी ला सुनावतील पण मी बघितलं त्यात तरी उत्कर्ष सांगत होता ते वाढवून असं वाटलं मला, म्हणून इथे विचारलं.

मीनल आवडते. शेवटच्या सेकंदापर्यंत झटते. टास्क मधे झोकून देते. तोंड वाजवायचं असतं तिथेही बरोब्बरन कंटाळता वाजवते.

एकच प्राॅब्लेम आहे बी टीमचा..कूटनीती वापरत नाहीत. त्यांनी मीराला अडकवायला हवे होते, पेनं लपवायला हवी होती, मीराचा भोपळा गायब करायला हवा होता. ते फक्त सरळ विचार करतात आणि A वाले कायम तिरका.

एकटा विशाल वेळेवर कूटनीती वापरतो. जसं त्यानं कुडचीचं तोंड निळं करून टाकलं, तोंडात पाणी भरून घेतलं होतं आणि आज दरवाजा पण तोडला. हा गेम समंजसपणाचा आणि खेळीमेळीचा नाहीच्चे. कुत्र्यासारखं भांडता यायला हवं. नियमांतल्या पळवाटा शोधून भराभ्भर डोकं चालवता यायला हवं. हाणामा-या जमायला हव्यात, थोबाड चालवता आलं पायजे, नाटकं जमायला हवीत, हुकमी रडायलाही जमायला हवं. तरच निभाव लागतो.

मीराचा भोपळा गायब करायला हवा होता. ......केला होता,गायब नाही,पण पळवला होता,पण मीराने लगेच संचालकाकडे तक्रार केली आणि त्यांनी लगेच ऑब्जेक्शन घेतल.मीराला अडवण्याचा पण ट्राय केलि ,परत तेच झाल.

तृप्ती ने गेल्या आठवड्यात कमावलेले सगळं आज गमावलं.
टीम ए च्या नादात बाई वहावत चालल्यात.

करेक्ट...विशाल nominate झालाय तर मिरा क्रूर हसते.... हिला काय माहित विशाल नॉमिनेशन या मध्ये आला तर तो सगळ्यांना खाईल.. ७०-७०% वोट एकटा खातो तो... आत्ता स्नेहा आणि गादा nominate झाल्या.. आता दात काढा म्हणावं..

मला कोण जिंकल याची पर्वा नाही,कोण कँप्टन झाल झाल याची पर्वा नाही.पण तुपारे,विशाल,स्नेहाला नॉमिनेट करून बिबॉसने पोटात गोळा आणला.तिघांना ऑलरेडी नॉमिनेट केल आहे,आता फक्त दोघांनाच करायच ठरवल असेल आणि त्यात आविष्कार नसेल तर.
कल्पनेनेच गोळा आला.परत हा सेफ.
आजचा टास्क पण रद्द
खरच यांना बैठे खेळ टास्क म्हणून द्या.
सागरगोटे नावाचा खेळ आठलतो का,फार कमी खेळला जातो,पण पेशन्स आणि फुल कॉनस्ट्रेशनचा खेळ आहे.तो द्या .पण लेडीज जास्त खेळतात तो.मीरा ला खेळताना बघायला आवडेल.

गायत्री -स्नेहाचे कसले गैर वर्तन आठवत नाहीये मला. काल तरी त्यांचं कसलेच वर्तन दिसले नाही खरं तर Happy अजून एपिसोड पाहिला नाहीये आजचा.
असो पण पुढच्या आठवड्यासाठी स्नेहा, विशाल आणि गायत्री आलेतच नॉमिनेशन मधे, मग समहाऊ जय पण नॉमिनेट होऊ देत हो बिबॉ साहेब Wink !! म्हणजे जय च्या फॅन्स ची मतं गायत्री किंवा स्नेहाला मिळणार नाहीत Happy

त्या सारंघे सारंघे विव्हळण्यासाठी, विचित्र तोंड करून सकाळी सकाळी इमॅजिनरी वाती वळण्यासाठी आणि मुख्य म्हणजे कसलेही योगदान न देता आयत्या पिठावर रेघोट्या मारण्यासाठी स्नेहाला हाकललं पाहिजे.

बाकी, उत्क्या नॉमिनेट होण्याची खुप डेस्परेटली वाट बघताहेत लोक. गायत्री, मीरा, उत्क्यावर लोक प्रचंड सटकून आहेत.
मधल्यामध्ये तो आळशी, गुड फॉर नथिंग अविष्कार सेफ होत राहणार आहे.

<<मीनल हवीच पहील्या तीनांत. >> अगदीच अंजूताई.
खरंच मीनल म्हणजे आपल्या स्मिताचे हुशार, चलाख व्हर्जन आहे हे माझे मत वरचेवर कन्फर्म होत चाललंय. ती पर्फेक्ट खेळते, वागते, बोलते. चौकडीला नडायला योग्य व्यक्ति आहे ती. विशालसुद्धा एवढा भारी नाही.

त्या दोघींनी काय गैर वर्तन केल ते दाखवल नाही...बिग बॉस म्हणे की तुमच्या शाब्दिक वर्तणूकीमुळे कोणाचा हात उठला असता.. असं काहिसं..स्नेहा तर येड्पट जय साठी भावनिक होऊन काही बाही बोलली असेल.. पण उत्कर्ष आणि जय एवढा रानटी खेळ खेळून पण सेफ??!!!

टास्क च्या दरम्यान मीरा आतून सांगायचा प्रयत्न करत होती उत्कर्ष ला की कुठे ठेवलाय भोपळा..तेव्हा मिनल ने तिला भारी आपल्या तावडीत घेतल... आज सगळाच राडा होता... Lol

खरंच मीनल म्हणजे आपल्या स्मिताचे हुशार, चलाख व्हर्जन आहे हे माझे मत वरचेवर कन्फर्म होत चाललंय. ती पर्फेक्ट खेळते, वागते, बोलते. चौकडीला नडायला योग्य व्यक्ति आहे ती. >>> अगदी अगदी पुंबा. स्मिता स्वयंपाक करण्यात हुशार होती, ही मात्र त्यात थोडी कमी दिसते, जास्त भांडीच घासत असते बहुतेक. स्मिता confused पण टास्क मध्ये सॉलिड. ही पोरगी खरोखर चलाख आहे. टास्क मध्ये पण भारी.

अविष्कार आधी स्नेहाला उडवलेलं पहायला मज्जा येईल पण बिबॉ दादुसनाच काढणार ! >>> होना. स्नेहा गेली तर मजा येईल.

बाकीचे नॉमिनेट कसे झाले.

अविष्कार आधी स्नेहाला उडवलेलं पहायला मज्जा येईल पण बिबॉ दादुसनाच काढणार ! >> दादुस या आठवड्यात आहेत नॉमिनेटेड. ते आताही जाऊ शकतात तसेही. विशाल, गायत्री स्नेहा पुढच्या आठवड्यात आहेत नॉमिनेटेड.

मला वाटलं या आठवड्यात नॉमिनिट आहेत. मीनलने मीराला खरंच चांगलं अडवलं. तृप्तीने काय सांगून टाकलं मध्येच की त्यांना माहित होतं दरवाजा बंद करणार आहेत ते आणि बाकीचे काय टाळ्या वाजवत होते. हेटाळणी करत होते का ते. तृप्ती काय बोलत होती खेळाडू म्हणून असं आणि संचालक म्हणून तसं, वेडीच वाटली तेव्हा ती Lol मीनलला मराठीत पटापट बोलता येत नाही पण मुलींमधला विशाल आहे ती. त्याच्यापेक्षाही एक पाऊल पुढे. सातत्य आहे तिच्या खेळण्यात, विशाल सारखी सटक नाही. गायत्रीचा आवाज ऐकला मी पण स्नेहा कधी ओरडत होती आणि त्या येडीच्या ओरडण्याने कोण मारामारी करणार आहे, सरळ सांगा ना बिबॉं ती बाहेर जायला पाहिजे म्हणून Wink तृप्ती परत कॅप्टन म्हणजे तुला नं मला, घाल कुत्र्याला तशी गत झाली असणार दोन्ही टीमची नाहीतर तृप्तीला कोण एवढे वोट देणार.
आदिश मला तरुणपणीचा प्रदीप वेलणकर वाटतो. दादूसचा वाढदिवस कधी आहे.

त्यापेक्षा टिम मिक्स का करत नाहित?
एवढ्याशा जागेत काहितरी कार्य देतात, काय करेल पब्लिक्,घालतय राडे,
टिम ए प्रचन्ड प्लॅनिन्गने खेळते, तस प्लॅनिन्ग करताना टीम बी दिसत नाही.
टाइम टेस्टेड गेम ठेवा, पझल सोडवा वैगरे टाइप..https://www.youtube.com/watch?v=7ku03C56vH4&t=121s&ab_channel=OnceUponAn... इथुन करावे टिमने कॉपी.

अडवायचे होते म्हणून विशालने मस्त अडवून ठेवले होते जयला.
तिकडे आदीश आणि उत्कर्ष झटापटीला यायला लागले म्हणून त्यांना एकमेकांपासून दूर व्हायला सांगितले तर मलापण पकडले म्हणून ओरडला … हाहा त्याला काहीच करता येत नव्हते.
उत्कर्ष एकदम आगलाव्या आहे. जेव्हाही दुसऱ्या गटातल्या सदस्याशी बोलत असतो तेव्हा कान भरत असतो.
प्रत्येक वेळी कार्य रद्द करतात त्यापेक्षा चिठ्ठ्या का नाही टाकत हे लोक! प्रत्येकाला समान संधी तरी मिळेल.
तसेही कॅप्टनचे कोणीही ऐकत नाही. कॅप्टनला फक्त नावाला अधिकार दिले आहेत. ड्युटी वाटताना आधीच सांगतात मला हे काम करायचे नाही, मला याच्याबरोबर काम करायचे नाही. वेळेवर काम करायला सांगितले तर सरळ नकार देतात. ॲार्डर द्यायची नाही असे सांगतात. कॅप्टनबद्दल अपमानास्पदही बोललं जातं. तसाही कॅप्टनचा काही उपयोग नाही या घराला. कॅप्टनसी म्हणजे फक्त वेगळी झोपायची खोली झाली आहेत.

टाइम टेस्टेड गेम ठेवा, पझल सोडवा >> छान आहेत ते गेम, पझल पण मग राडे कसे होणार? सप्ताहअंती ममां काय करणार? कोणाला झापणार?

मी ट्विटरवर बघितले तेव्हा फक्त विशाल नॉमिनेट होता. पब्लिक बिग बॉस ला प्रचंड शिव्या घालत होती त्याला का केले म्हणून? मिरा काहीतरी विकृत हसली म्हणून तिला पण बॅशिंग होत होत. गायत्री स्नेहा पब्लिक ला शांत करण्यासाठी असतील. कारण उत्क्या आणि जयला केले तर उत्क्या नक्की जाणार.

Pages