मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

त्या सुरेखाला घरी पाठवून द्यायला हवं आता. घरी जाऊन खा काय चपात्या खायच्या त्या. फार कोत्या मनोवृत्तीची आहे ती.गायत्री अन मीराही तसल्याच. अत्यन्त क्षुद्र विचार दाखवतात कायम. गायत्रीचे निदान काही फॅन्स असावेत तुपारे मुळे पण ती मीरा नॉमिनेशन मधे आली की थेट बाहेर जाईल. अर्थात त्या आधी दादुस , सुरेखा अन आविष्कार चा नंबर लागणार. तृप्ती टिकायला हवी थोडे दिवस तरी. मजा आणतेय ती Happy लोक पण तसे थोडे टरकून असतात तिला, फार तोंडी लागत नाहीत तिच्या.
आविष्कार वेगळ्याच लेवल चा आळशी माणूस काल इतक्या दंग्यात पण कुठे दिसला नाही. दादुस चा निरागसपणा दिसत होता Happy छान खेळा हं आता वगैरे! तृप्ती ने मात्र कोणालाही जुमानले नाही! सगळी ए टीम आरडाओरडा करत असली तरी तिचा आवाज त्यांच्या वर! Happy पण बहुतेक त्यावरुन तिला आज ऐकावे लागणार.
विशाल ची पोस्टर वर रंग फासायची आयडिया मस्त कामाला आली. पण त्या आधी पोस्टर लावताना त्यांच्या टीम चा स्पीड आणि एफिशियन्सी सुरेखा आणि स्नेहा च्या ग्रुप पेक्षा बरीच कमी वाटली. विशाल ने का नंतर त्याच्या ग्रुप शी वाद घातला कळले नाही. काहीच कारण नव्हतं. पण अ‍ॅज युज्वल गरबाच्या पासेस च्या निर्णयात नक्कीच प्रेक्षकांची वाहवा मिळणार त्याला. व्हेरी स्मार्ट! स्नेहा अन सुरेखा तेव्हा ए ग्रुप मुळे इन्फ्लुएन्स कशा झाल्या नाहीत याचे आश्चर्यच वाटले मला!

मला वाटतं या वेळेस दादुसला काढतील बहुतेक... कारण विनाकारण भांडण करण्यासाठी सुरेखा आणि त्या जय सोबत फालतूपणा करण्यासाठी त्यांना ठेवतील बिग बॉस ....दादुस task व्यतिरिक्त काही , जास्त कन्टेन्ट देत नाहीये त्यामुळे बहुतेक त्यांना काढेल... असं वाटतंय...

बर करतो आम्ही fake लव्हस्टोरी, तुमच्या बापच काय जातं? उसाला भाव कमी आला? त्सुनामी यायचं थांबला? ज्वालामुखी फुटायचा थांबला??
इति: सोनाली Lol

आळशी असण्याचे पण फायदे असतात हे आविष्कार ने दाखवून दिलयं.
तो ऐकदम निवांत राहतो आहे .
त्यामुळे आलेल्या दिवसा पासून त्याचे ऐकाशी पण पंगा घेतला नाही किंवा भांडण तक्रार केली नाही.
उगीच लोड घेऊन मर्खाशी भांडणात फुकट energy वाया घालण्यापेक्षा निवांत झोप काढणे केव्हाही ऊत्तम हे तत्व तो ईमान ईतबारे पाळत आलायं.
शनिवारी रविवारी sorry sir मी आता गेम मधे दिसेल म्हणा पुढचे पाच दिवस निवांत.
मग सळेजण प्रत्येक वेळी त्याला सगळ्यात विक स्पर्धक म्हणणार ते पण हसत मान्य करत मी ते positively घेईन म्हणायचं इथं पण अमान्य करुन फालतू वादात energy वाया घालवायची नाही हे आविष्कार ने पक्क केलय.
ऐवढं शांत राहायच कि कोणता स्पर्धेक जवळपास पण फिरकणार नाही.
Allow केलं असतं तर आविष्कार खाऊन पिऊन दिवसभर पाठदुखेपर्यत झोपला असता याची मला खात्रीय पण मधे मधे टास्क असल्याने खेळावं लागतं.
याच्या बरोबर राहून आपल्याला काही फायदा नाही हे प्रत्येकाला तिथं वाटतं .
जे जे होईल ते ते पहावे या प्रमाणे आविष्कार ची वाटचाल चालूयं.
कशाप्रकारे का होईणा तो वाचत आलायं असाच जर तो पुढे गेला तर बिग बॉस शो साठी तो ऐक आर्श्चय असेल.
बरं त्यासाठी पण तो स्वतः काही करत नाही मुळात काहीही करून मला जिंकायचंच आहे असं वाटणं त्याच्या आसपास पण फिरकत नाही.
उगीच कशाला लोड घ्यायला दूनियेला आग लागली तरी मरूदे आपण मस्त दूर्लक्ष करायचं हे जमलं पाहिजे.
आळशी पणाचा विजय असो.
आयुष्यात स्वतःच्या ego बद्दल ऐवढं निर्विकार होता आलं पाहिजे. -- Atul deshpande

img_3_1634389708139.jpgimg_3_1634389708139.jpg

बर करतो आम्ही fake लव्हस्टोरी, तुमच्या बापच काय जातं?>>>> हेच जय स्नेहाच्या बाबतीत पण लागू होतं. पण कसं आहे ना आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचा तो काळ्या.

हो सोनाली मस्त बोलते कधी कधी रंगात आली की. तिच्यामधे खूप पोटेन्शियल वाटतं मला, पण का कुणास ठाऊक तेवढी पुढे येऊन खेळत नाही ती. ती आणि मीनल ने वेळेत कन्ट्रोल घेतला पाहिजे. त्या आदिश ला उगीच जास्त इम्पॉर्टन्स देऊ नये ग्रुप मधे. जय- गायत्रीला उचकवण्यापुरता ठीक आहे.

आविश्कार ची पोस्ट +१ , मी २च विकडे एपिसोड बघितले त्यात तो एकदाही दिसला नाही.
गरबा नाइट मधे सोनाली-मिनल फुल ऑन एन्जोय करत होत्या, विशालने गरबा नाइट चे पासेस सगळे मुलिना देवुन परत पॉइन्ट स्कोअर केले गुड डिसिजन्,गादा तिथेही स्नेहाला सान्गत होती की बहुमताने आहे निर्णय तिला फक्त तिची टीम आणी विशाल हवा होता वाटत.
बाकी मिरा,गायत्री,जय सगळे पालथे घडे आहेत्,गेले तोन आठवडे आपल्याला प्रत्येक विकेन्डला ममा झाप झाप झापतात तरी काही फरक पडत नाही तेवढ्या पुरत सॉरी की येरे माझ्या मागल्या...
आधी त्रुप्ती मला यात सगळ्यात ऑड वाटत होत्या पण आता त्याना गेम समजला आहे वाटत बाकी कुणी दबाब आणला म्हणून त्या दबल्या अस होइल अस वाटत नाहि.

तृप्ती देसाईंनी प्रत्यक्ष आयुष्यात यापेक्षा जास्त तीव्र हल्ले सहन केलेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हे काहीच नाही.

तृप्ती देसाई कल छा गई ...क्रेडिट goes to आदिश. त्याने परवा डोळे उघडायला लावले देसाई मॅडमला... उत्कर्ष च्या पण लक्षात आलं आदिशने भडकावल ते...आदिश instigate करताना पुरून उरतो A team ला...पण तो team A च्या members सारखाच आहे...कोणी काहीही बोलले तर अजिबातच सहन करु शकत नाही...
बाकी सुरेखा बाईंच चपाती प्रकरण काही संपतच नाहिये...सोफ्यावर आरामात बसून काम करणार्‍यांना का डिवचत बसली होती?बाकी तृप्तीने त्यांना शांतपणे मस्त उत्तरं दिली आणि positive दिसल्या....सुरेखा अँड गँग as usual negative Happy
विशालला सोनाली आवडते पण तिच्या कडून green signal मिळत नाहिये त्यामुळे चिडचिड करतोय बहुतेक Lol

सोनाली बद्दल +१
कसले भारी वन लायनर्स असतात तिचे, आम्ही फेक लव्ह स्टोरी केली तर काय उसाचे भाव कमी होणारेत का ज्वालामुखी येणारे Biggrin
मला दिसायला सुद्धा सगळ्या मुलींमधे तीच आवडते, किती शार्प फिचर्स आणि ठसकेबाज आहे !
काल खरच टिम बी एक एक पोस्टरला ग्लु लावत वेळ काढत होती, अख्या भिंतीला का नाही लावला Uhoh , मीनल हवी होती विकास ऐवजी त्या टास्क मधे , ती सर्वात स्ट्राँग आहे मुलींमधे !
मेघानेही कुठेतरी सोशल मिडियावर पोस्ट केलं होते कि मुलींमधे एकट्या मीनलला आणि काही प्रमाणात तृप्तीला गेम समजलाय, बाकी मुली किलोकिलोने माती खातायेत Proud

मीरा किती विचित्र बोलते ... सतत शब्दावर जोर देत बोलत असते .. इरिटेट होते ऐकताना
उघडा वाघाड जय आता बघवत नाहीये ... बस्स आता शरीर प्रदर्शन
पहिल्यांदा २-४ दिवस जय चा प्रेझेन्स आवडला होता पण आता अगदी बघवत नाहीये
ह्या उलट तृप्ती ताई .. पहिले काही दिवस आवडल्या नव्हत्या पण आता छान वाटतात
ड्रेसिंग सेन्स मात्र कोणालाच नाही...... मीरा चे बॉडी हगिंग ड्रेस अत्यंत घाण दिसतात . त्याचे दुसरे टोक म्हणजे स्नेहाचे पायघोळ झगे ... ९० च्या बॉलिवूड हिरोईनी कशा कोणताही प्रसंग असो तेच चकचकीत ड्रेस घालायच्या तसेच स्नेहा कोणताही प्रसंग असो पायघोळ झगे घालूनच असते
गायत्री कशीही बसत असते . कशीही उभी असते .. काल पोस्टरच्या टास्क चे ठरवताना साडी नेसली होती आणि तिच्या मागून कॅमेरा होता तर काय विचित्रपणे कमरेवर हात ठेवून उभी होती

जय स्नेहाला सारखा समजावतो की मीरा आणि गायत्रीने तिलाच गाडीतून खाली उतरवले असते आणि ते त्या मठ्ठ स्नेहाला पटतं पण...अरे त्याला विचारायचे ना तू का नाही उतरलास म्हणून ...स्वतःला strong म्हणतो ना तो...पण नाही प्रेमात आंधळी झालीये ना ती....आज ममांनी सांगितल्यावर तरी तिचे डोळे उघडायला पाहिजे होते...पण नाही..पुन्हा जय सोबत गुलुगुलु..... सुरेखा बरोबर बोलली तिला जेव्हा कळेल तेव्हा खूप वेळ झालेला असेल... बाकी हसते पण काय भयाण ती बापरे... दिसायला सुंदर आहे पण हसणं भयंकर आहे...

काल पोस्टरच्या टास्क चे ठरवताना साडी नेसली होती आणि तिच्या मागून कॅमेरा होता तर काय विचित्रपणे कमरेवर हात ठेवून उभी होती>>> हो ,हे मी पण नोटीस केलं आणि ती साडी अशी का नेसली होती ?साडी लहान होती बहुतेक... Lol आणि गायत्रीला साडी लहान झाली म्हणजे ती नक्की साडी होती की ओढणी? Proud

सुरेखा बरोबर बोलली तिला जेव्हा कळेल तेव्हा खूप वेळ झालेला असेल..>>> ती कल जयला पण तिच्या पूर्व आयुष्याबद्दल सांगत होती.

>>विशालला सोनाली आवडते पण तिच्या कडून green signal मिळत नाहिये त्यामुळे चिडचिड करतोय बहुतेक Lol

मला तर उलटे वाटतेय.... सोनालीने ट्राय मारला पण हा गडी सौदर्या सौदर्या करत बसलाय..... त्यामुळे तिने नाद सोडून दिलाय बहुतेक!!

विकास आणि सोनालीसाठी हा वेकअप कॉल असेल का? विकास पुढच्या आठवड्यात विशालच्या सावलीतून बाहेर येऊन खेळला तर आश्चर्य नाही वाटणार!

ती कल जयला पण तिच्या पूर्व आयुष्याबद्दल सांगत होती.>>> पर्सनल गोष्टींबद्दल जाऊ द्या, पण जय वर टास्क मध्येही ती ज्या प्रकारे अंधविश्वास ठेवते किंवा त्याची ज्या पद्धतीने वकिली करते स्वतः चा स्टैंड घेत नाही ते फार चुकीचं आहे...

सोनालीने ट्राय मारला पण हा गडी सौदर्या सौदर्या करत बसलाय..... त्यामुळे तिने नाद सोडून दिलाय बहुतेक!!>>> आणि मला वाटतंय की सोनाली सिग्नल देत नाहीये म्हणून तिला जळवण्यासाठी त्याने सौंदर्या नावाचं काल्पनिक पात्र उभं केलं आहे... Lol

बाकी विशाल बोलतो मस्त... रावणाच्या टास्क मध्ये एकाच व्यक्तीला उभा करायचा असल्याने सुरेखा ताईंना उभे केल्यानंतर ही मीराला भारी taunting केली त्याने...मीराचं तोंड पाहण्यासारख झालं होतं... एकाच दगडात दोन पक्षी मारले विशालने....

काल तृप्तीने स्नेहाचे एक पोस्टर आणि सुरेखाचे एक असे सांगितले ना, मग कोणी कॅप्टन का नाही झाले ते सांगा ना कुणीतरी.
रात्री अकराला परत दाखवतात म्हणून मी त्या भरवशावर साडे नवाला बघितलं नाही तर नेमकं अकराला लावलंच नाही आज. असे काय दगा देतात कलर्सवाले. रावण भाग बघितला. उत्कर्षला बुद्धी वापरायचा सल्ला किती लोकांनी दिला Lol विशालने मस्त अनुल्लेखाने मारलं मीराला.

काल तृप्तीने स्नेहाचे एक पोस्टर आणि सुरेखाचे एक असे सांगितले ना, मग कोणी कॅप्टन का नाही झाले ते सांगा ना कुणीतरी.>>> दोघींमधे टाय झाला म्हणून कार्य अनिर्णित करून कोणालाच कॅप्टन केले नाही.

कॅप्टन कशासाठी असतो… आपल्या जवळच्या लोकांना सोपी कामे वाटायला असे म्हणणारी मीरा आदीशने ड्युटी दिल्यावर एव्हढी काय चिडते.
जेव्हा तोंड उघडते तेव्हा दुसऱ्यांना नावेच ठेवते ती आणि गादा सुद्धा… बरोबर बोलले ममां. स्नेहा टाळूला जीभ लावून हसते तेही Lol

जेव्हा विकास उत्कर्षला म्हणाला की तू समजावलं असतं मीरा गायत्री ला ड्युटीच वाटताना तर त्या दोघींनी ऐकलं असतं, तेव्हा त्या दोघी मान हलवुन नाही म्हणत होत्या, काहीच वाटत नाही कोणाबद्दल

अरे वा तृप्तीताई सेफ झालया ही एक नंबर न्युज, धन्यवाद भरत. विशाल मीनलचं टेन्शन नव्हतं मलाही.

डीजे मलाही सोनाली दिसण्यात एक नंबर वाटते.

Pages