मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काल ब तुकडीने पुन्हा हिंसा केली. विकास तर खुनशी वाटत होता. मीनल मिराचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करत होती. विशालने जेल तोडली त्यामुळे त्याला नॉमीनेट केलं हे बरं झालं. स्पोर्टिंग स्पिरीट नसल्यासारखे खेळतात ब तुकडीवाले. अ तुकडीला हरवणे जवळपास अशक्य आहे त्यांच्यासाठी. मग हताश होऊन रडीचा डाव खेळतात. सगळे टास्क अगदीच वन साईडेड होतात. कंटाळा आला या ब तुकडीचा. बिग बॉसने याना बाहेर काढून जिद्दीने टास्क खेळणारे खेळाडू आणावेत.

तृप्ती ने नक्की काय केले? ट्विटर पब्लिक त्यांना पण खूप बॅशिंग करत होते.>>>> त्या अ तुकडीकडून खेळल्या. मागच्या वेळी पोस्टर बरोबर दिसत नाही म्हणून टास्क रद्द केला हे बरोबर आहे सांगणारे काल विशालने जेल तोडली ते पण बरोबर केलं असं तृप्ती ताई बोलतील या आशेवर होते. पण तृप्तीताई त्याविरुद्ध बोलल्या. त्यात भर म्हणून विशालला बिग बॉसने नॉमिनेट करून अजून त्यांच्या जखमेवर मीठ चोळलं त्यामुळे ते अजूनच पिसळले .

टीम ए ने विकासला बाहेरच पडू द्यायचं नाही असं ठरवलं होतं. त्याला सगळ्यांत मागे ठेवलं. बझर वाजल्यार दार किंचित उघडून जय आणि उत्कर्ष बाहेर आले आणि बाहेरून कडी लावली.
हे असं होणार हे तृप्तीला माहीत होतं. तिने त्याला objection घेतण्याचा प्रयत्न केला होता. पण टीम ए ने तिला गुंडाळलं.

विकासने टीम ए चा प्लान आधीच ओळखला होता.
--
जयने सोनालीच्या मनात विकासबद्दल संशय निर्माण केलाय.
स्ट्रॉंग प्लेयर्स ( विकास, विशाल इ.) लवकर एलिमिनेट व्हावे म्हणून आदिशने त्यांना सेव्ह न करता आविष्कारला सेव्ह केलं.‌
टीम बीचंं काही खरं नाही. तरी काल चांगली फाइट दिली. मीनल ने मीराचं तोंड बंद केलं होतं बहुतेक.
पुढच्या आठवड्याच्या शेवटी स्नेहा एलिमिनेट झाली तर सोनाली तिची जागा घेईल बहुतेक जयच्या मागे जाण्याबाबत.

ठीकच आहे.. ह्या निमित्ताने स्नेहा बाहेर जाणार असेल तर मस्त होईल. मला आविष्कार ची पत्रिका बघायची आहे . सगळे ग्रह तारे त्याला फेवरेबल असणार. त्यामुळे त्याने एखाद्या हॉलिवूड सिनेमा साठी ट्राय केले तरी नक्की मिळेल Happy
पण हे लोक खरे खरे नॉमिनेट झाले का? की उगीच बिग बॉस नाटक करत आहे?

गेल्या सीझनमध्ये शिवला असं नॉमिनेट केलं होतं. मांजरेकर त्याला वळू म्हणायचे तसं जयला अजून एखादं नाव कसं ठेवलं नाही?

पुढच्या आठवड्याच्या शेवटी स्नेहा एलिमिनेट झाली तर सोनाली तिची जागा घेईल बहुतेक जयच्या मागे जाण्याबाबत.: हो ट्विटरवर एका युजरने लिहिले होते ती त्याला बातम्या देते.
असे झाले तर बरे आहे, खूप मोठी टीम लायेबिलीटी असते. विशाल विकास मिनलला स्पेस मिळेल.

सोनाली नटून सजून येते तेव्हा खूपच छान दिसते पण एरवी खूपच साधारण.

तुसतीच तोंडची वाफ. ती पण कचरा टास्क, भोपळा टास्कमधे नव्हतीच. एकटी मीनल काय काय करणार. सोनानं तिच्या वाटचं सगळं घरकाम करायला हवं.

अविष्कारला एव्हाना पाच लाख मिळाले असतील. निघ म्हणावं आता.

काल विकास इतका तुटूनबचलत होता की काहीतरी होईल आता त्याला असं वाटलं.

मी जर त्यांच्या घरात गेले तर मीराचे सगळे कपडे लूज करून येईन. बस म्हणाव मग. ती मला जयचं लेडी व्हर्जन वाटतं.

एकंदरीत काय,ती टीम ए आधीच शिव्या खात होती.आता तर बघायलाच नको.
पण काल त्रुप्तीच्या बिनसंचालनामुळे टास्क झाला नाही.
काल मात्र टीण ए पूर्णपणे रडीचा डाव खेळली.
म्हातारीने म्हातारीला अडवायचच नव्हत,प्राण्यांनी अडवायच होत.
यावरूनच जेव्हा मीराचा भोपळा आदिश मिनल तिला देत नव्हते आणि नंतर मीराला मिनलने अडवल तेव्हा रड्या मीराने संचालकाकडे तक्रार केली होती आणि देसाईंनी मिनलला थांबवल होत.
काल विकासचा मुद्दा बरोबर होता,गेम सुरु तर होऊ देत मग अडवा,अस त्याच म्हणण होत.दादूसने त्याला जेलमध्ये धरून ठेवल होत,आणि कडी लावण ही युक्ती नव्हतीच,हे म्हणजे विकासला घाबरत असावेत ,म्हणून रडले.
मिनलने पण मीराला बरोबर थांबवल,आत राहून बाहेरच्यांना काहीही सांगायच नव्हत,ही सांगत होती.
अगदीच रडी खेळली काल टीम ए.एवढ काय घाबरतात टीम बी ला.
बाहेर काय चालू आहे ते कळल असाव.
पण मला वाटत की त्रुप्तीची वाढती लोकप्रियता पाहून तिला बाहेर काढण्यासाठीचा हा डाव तर नाही ना बिबॉसचा.कारण फोटो लावण्याच्या टास्कनंतर देसाई मँडम छा गयी थी.आणि आज जिथे बघाव तिथे तिला शिव्या पडत आहेत.
पब्लिक स्नेहा आणि तुपारेला काढण्यासाठी टपून बसले आहेत,पण मला नाही वाटत.बिबॉस होऊन देईल. एकतर आविष्कारला नॉमिनेशन मध्ये आणेल किंवा वोटिंग लाईन्स बंद ठेवेल
त्या सारंगीकडून त्यांना कुठला कंटेट मिळतो देव जाणे यांना.
तुपारेला सरळसरळ वापरून घेत आहे बिबॉस.गरज संपल्यावर काढेल.
टॉर्चर टास्कमधून विशाल विकासला आणि कालच्या टास्कमधून मिनलला फ्रंटवर आणून ठेवल आणि टीम ए ला खणखी खलनायक आणि त्रुप्तीचा तर चक्क पत्तिच कट केला बिबॉसने.
इणि प्रेक्षक म्हणत आहेत बिबॉस टीम ए च्या बाजूने आहेत.
काहीही हां
एका दगडात कितीतरी पक्षी नाही प्राणी मारले बिबॉसने.
विनर ज्या टीममध्ये असतो त्यांची साथ बिबॉस कधीच सोडत नाही.
इन शॉर्ट,बिबॉस फिर खेल गये.
हा सिझन बिबॉसच खेळणार बहुतेक.

काय तो राडा आज, पण विशाल छा गया.. जयला हलताही आलं नाही त्यानी लॉक केल्यावर Proud
तृप्ती विकेंडला खाणार बोलणी .. हेही टास्क रद्द !
उद्या बघु कोण होतय कॅप्टन !
मला वाटतय पुढच्या आठवड्यात टिम ए ला वाचवतील , दिवाळीच्या आधीचा आठवडा आहे, कॅन्सलच करतील !

जर एकही नो elimination विक झाला नाही तर या नंतर लोकं दादूस स्नेहा आविष्कार तृप्ती गायत्री असे बाहेर पडावे.. अर्थात बिग बॉसने यांना वाचवायचं ठरवलं तर सांगता येत नाही

जयला हलताही आलं नाही त्यानी लॉक केल्यावर>>> हलायला गेला असता तर लोकांनी परत नावं ठेवली असती रानटी खेळतो, ताकद वापरतो वैगरे वैगरे. जय तिथे सगळ्यात जास्त ताकद असेलेला प्रतिस्पर्धी आहे. मी अतरंगी डिमांड मध्ये जय आणि विशालचा पंजा फाईट टास्कची मागणी केले.

जय तिथे सगळ्यात जास्त ताकद असेलेला प्रतिस्पर्धी आहे : हो. कालच्या टास्क मध्ये फक्त उंची चा वापर करून तो सहज जिंकू शकला असता. बी टीम निष्प्रभ झाली असती. पण आदीशबरोबर भांडण करून त्याने स्वत: टास्क बी टीमला बहाल केला. विकासला अडकवून विशालला हिरो व्हायची संधी दिली. दैव देते आणि कर्म नेते ते ह्यालाच म्हणत असावेत.

हलायला गेला असता तर लोकांनी परत नावं ठेवली असती रानटी खेळतो, ताकद वापरतो वैगरे वैगरे.
<<<
ताकद कुठून वापरणार्, जमलच नाही त्याला यातलं काही करायला Biggrin
बाकी ताकदवान आहे, एक्स्पिरियन्स्ड आहे यात दुमत नाही, पण कालच्या टास्कमधे त्याला जमलं नाही !

त्याने ताकद लावली असती तर तो सहज सुटू शकला असता पण मग रड्या विशालने रडायला सुरवात केली असती . तसंही त्याला कारणच लागतं रडायला. पहिल्या बिग बॉस मध्ये सुशांत शेलार होता त्याची नेक्स्ट व्हर्जन आहे विशाल. काही झालं की रडायचं Lol आणि मग मांज्या आहेच शनिवारी जयला धारेवर धरायला.

बाकी ताकदवान आहे, एक्स्पिरियन्स्ड आहे यात दुमत नाही, पण कालच्या टास्कमधे त्याला जमलं नाही ! : त्या ची ताकदच त्याच्या साठी मारक ठरतिये. डोके पण फक्त पोरी फितवण्यासाठी वापरतोय. त्याही स्नेहा सारख्या डंब.
पहिले २ आठवडे कुठलेही आव्हान समोर नसताना, स्वकर्तृत्वावर त्याने हेटाळणी कमावली.

बोकलत
जर तर ला काय अर्थय , उलट जय रडायला आला होता !
जय या सिझनला जास्त वेळा रडलाय , मोजा प्रत्येल एलिमिनेशन्ची रडारडी आणि मीरा पाठीवर बसल्यावर रडारड Biggrin
त्याचा पूर्ण मनोज कुमार झालाय !

मीरा पाठीवर बसली म्हणून तो रडला न्हवता. तुम्ही तो भाग नीट पाहिला नाही बहुतेक Lol आणि राहिलं एलिमिनेशन तर त्यावेळी प्रत्येक जण रडत असतो. विशाल कधीही कारण नसताना कुठेही काहीही बरळत रडत असतो Rofl परवा एक क्लिप पाहिली त्यात तर तो चक्क कोणत्यातरी मुलीची आठवण येते म्हणून ओक्साबोक्शी रडत होता.

डोके पण फक्त पोरी फितवण्यासाठी वापरतोय. >>> वापरू दे की. शंभर दिवसांनंतर कुठे इस्रोच्या रॉकेटची टेस्टिंग होणार आहे बिग बॉसच्या घरात? तसंही त्यांचे गेम प्लॅन आणि कमिटमेंट ब तुकडीपेक्षा नेहमीच सरस असते.

तृप्ती ताईला टीम A चे लोक संचालक म्हणून काय बोला, हे बोला असं सांगायचे आणि नंतर तृप्ती as a खेळाडू आणि संचालक करत बसली, मध्येच आविष्कार आळस झटकून बिग बॉस ला सांगायला आला तिच्या मागे.
विशाल nominate झाल्यावर मीरा, आणि स्नेहा गायत्री nominate झाल्यावर मीरा Lol
दादुस झाले कॅप्टन बहुतेक.

टास्क रद्द झाल्याची आणि तुपारे,स्नेहा नॉमिनेशन ची घोषणा ऐकुन मीरा चा चेहेरा बघण्यासारखा झाला होता.
मीरा ला कॉपी करुन पहिला नंबर मिळाला पण परीक्षा च रद्द केली बिबॉ ने ... :-):-):-)
मीनल मीरा ला का आडवत होती नक्की ते कळलच नाही मला. मीरा जय ला काय सांगणार होती ?
खरतर काल जय आणि उत्क्या कडी लावुन बसले होते तेव्हा थोडावेळ विशाल आणि आदीश ने बघत बसायला हवे होते कारण टीम बी ने भोपळे अशा जागी ठेवले होते की एकटा उत्क्या काहीच करु शकला नसता आणि जय ला मदतीला जावेच लागले असते. त्यावेळी संधी मिळाली की पटकन कडी काढुन विकास ला मोकळं करणं सहज शक्य होतं. विकास ला आत अडकवायचा प्रयत्न होणार याचा अंदाज तसाही आधी आलाच होता ना...पण त्याक्षणी हे सगळं सुचत पण नसणार म्हणा.
गेल्या आठवड्यातला तृप्ती चा संचालक म्हणुन प्रामाणिकपणा सुरेखा कॅप्टन होउ नये यासाठीच होता बहुतेक... आता सुरेखा गेली ..आता परत टीम ए च्या मागे ते सांगतिल तसं वागत आहेत बाई...
सोशल मिडीयावर विशाल, विकास , मीनल एकदम हिरो झाले आहेत या आठवड्यात. .....
बाकी या सिझन चे लोक खरच महान आहेत...कोणतेच टास्क होउ देत नाहीत.....असे लोक कधीच पाहिले नसतील बीबॉ टीम ने पण... Wink

आत्ता नॉमिनेट केलं असलं तरी स्नेहा, गायत्रीला काहीही करुन बिग बॉस काहीतरी संधी देतील.

आदीश सर्वात शेवटी आहे वोटींगमधे. त्याने अविष्कारला का सेव्ह केलं, पब्लिक म्हणून देत नाहीये वोटस. अर्थात दादुस आणि त्याच्यात वोटींग डिफरन्स कमी आहे. पहीला विकास, दुसरी मीनल आहे. तिथेही वोटींग डीफरन्स कमी आहे. आदिशला लगेच सिरीयल पण मिळणार नाही, गुम है मधे दुसरा आला त्याच्या जागी कालच.

सोनाली दिसते फार सुंदर, किस्सेही फार छान सांगते पण एरवी काही छाप पडत नाही तिची. जाऊदे तिला जय मागे, पब्लिक बाहेर काढेल कसं, कळणार नाही तिला.

वीणा शिवच्या मागे वाटायची लोकाना पण तिचा स्वत:चा गेम, टास्क मध्ये झोकून देणं नक्कीच होतं आणि शिव साठी जाम लकी होती, पहिल्याच आठवड्यात तिच्यामुळे शिव कॅप्टन झाला. नेहा हरली होती. सोनालीचे तसं नाही, फरपट करून घेईल आणि जय तिला शिवसारखा बाहेर लोकप्रिय वाटत असेल तर तो तसा नाहीये.

असो प्रत्येक सीझनला मला स्मिता, शिव वीणा आठवणारच. त्यांनी मनात स्थान निर्माण केलं आहे आणि त्यात भर विशाल, विकास, मीनल ची पडेल बहुतेक पुढच्या वर्षी.

बाकी या सिझन चे लोक खरच महान आहेत...कोणतेच टास्क होउ देत नाहीत.....असे लोक कधीच पाहिले नसतील बीबॉ टीम ने पण... >>> हाहाहा. पुढच्या वर्षी बिग बॉस क्लॉज टाकेल कॉन्ट्रॅक्टमधे टास्क पुर्ण करायला हवा.

मीरा ला कॉपी करुन पहिला नंबर मिळाला पण परीक्षा च रद्द केली बिबॉ ने ... >>> सहीच.

>>वापरू दे की. शंभर दिवसांनंतर कुठे इस्रोच्या रॉकेटची टेस्टिंग होणार आहे बिग बॉसच्या घरात?
हा डायलॉग सोनालीच्या टोनमध्ये इमॅजिन करुन बघा!

>>तसंही त्यांचे गेम प्लॅन आणि कमिटमेंट ब तुकडीपेक्षा नेहमीच सरस असते.
व्वा व्वा.... अ तुकडीच्या फॅन्सनी असाच जोर पकडला पाहिजेल त्याशिवाय बी टीमच्या बाजूने भांडणाऱ्यांना मज्जा येणार नाही!
सगळेच विमीवि करायला लागले तर मग काय मज्जा Wink
कोण आहे रे तिकडे? कोणी आहे का जयचा फॅन?
राहूनराहून पहील्या सीझनमधल्या मेघाहेटर्सची आठवण येतेय Wink

हा डायलॉग सोनालीच्या टोनमध्ये इमॅजिन करुन बघा! >> हा हा हा..मी पहिले करुन.....सोनाली ला बिबॉ च्या घरात काही मिळो न मिळो पण बाहेर आली की एखादा ठसकेदार रोल नक्कीच मिळणार आहे एवढं नक्की.....

विकासने दरवाजा धरला होता तरीही जय, उत्कर्षने तो जोरात हिसका देऊन बंद केला. तेव्हा विकासने दरवाजा सोडला नसता तर त्याची चारही बोटे कामातून गेली असती.
आणि जय ला मदतीला जावेच लागले असते. त्यावेळी संधी मिळाली की पटकन कडी काढुन विकास ला मोकळं करणं सहज शक्य होतं. >>> दादूसने त्याला पकडून ठेवले होते आणि गादा-स्नेहाही होत्याच कि आत.

Pages