मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ते नवरात्रातील कलर coordination कसं काय follow करत आहेत? बिग बॉस सांगतात की काय आजचा रंग पांढरा असं

omg जय दुधाणेला बाहेर काढला. कॅप्टनशिप टास्कमध्ये विकाससोबत धक्काबुक्की केली. >> हे कुठे पाहिलं ? >> पोस्ट कोणी टाकली आहे ते बघा..बोकलत साहेबांनी... जे असे किस्से कहाण्या बनवण्यात अग्रेसर असतात Lol

omg जय दुधाणेला बाहेर काढला. कॅप्टनशिप टास्कमध्ये विकाससोबत धक्काबुक्की केली. >>
बिबॉस स्वप्नातसुध्दा असा विचार करणार नाही.आधीच ते कलर्स मराठी गटांगळ्या खात आहे.या शोला प्रचंड टीआरपी आहे,त्यामुळे हे चँनेल निदान पाहिल तरी जात आहे,कंटेंट देणार्या लोकांना काढून बिबॉस स्वत:च्याच पायावर कुर्हाड नक्कीच मारणार नाही.

आज आदिशने शेवटी मस्त उचकवल तृप्तीताईन्ना. उत्कर्षच खर रुप बाहेर आल.,>>>> अगदी खरं आहे मस्त भडकवले आदिश तृप्तीला ... लेक्चर पण मस्त घेतलं त्याने..।छान एंटरटेन केलं ....जय खूप स्ट्रॉंग असल्यासारखं दाखवतो पण आदिश आल्यापासून चांगलाच घाबरला आहे तो.आदिशच्या क्लासमध्ये त्याचं तोंड पाहण्यासारखं होतं...। स्नेहाला गोल्डन स्टार चा आमिष दाखवून मस्त झुलवलं आदिशने...

जय स्प्लित्सवीला जिंकला आहे पण तो शो पब्लिक वोट चा नसतो त्यामुळे त्याला किती पब्लिक सपोर्ट आहे हे कोणालाच माहीत नाही...
कदाचित काहीच सपोर्ट नसेल...

माजे रानी, माजे मोगा, तुजे दोल्यांत सोधता ठाव
माजे राजा, माजे मोगा, तुजे नावाक जोडता नाव
फुलाफुलाक पुशीत आयलो, तुजे माजे प्रीतीचो गाव

हे काय मराठी गाणे आहे काय?
मराठी गाणे म्हण म्हंटल्यावर इतकी अनेको मराठी गाणी सोडून हे कोकणी गाणे का निवडावेसे वाटावे?

मराठी गाणे म्हण म्हंटल्यावर इतकी अनेको मराठी गाणी सोडून हे कोकणी गाणे का निवडावेसे वाटावे?>>>> कोकणी भाषेत एक जादू आहे. कोकणी माणसासारखी कोकणी भाषा पण गोड आहे. त्यामुळे ती हे गाणं बोलली.

दादुस पर एक पोस्ट तो बनता है Happy
फार निरागस बोलून जातो कधी कधी अन ऐकून जाम हसायला येतं! जसं परवा पहारा टास्क मधे "बिग बॉस साहेबांनी सांगितलंय ना उभं रहायचं मग विषय संपला " Happy तसा तो दिसतो तितका मठ्ठ नसावा. परवा जीप च्या टास्क मधे त्याच्या लक्षात आला होता गेम, आता काय होणार वगैरे पण त्याने जे म्हटले "काय तिथे नुस्ते कु* टेकावायचा अन यायचं परत, काय फरक पडणार आहे" हे ऐकून हहपुवा झाली Lol काल पण इतके लोक त्याला इन्फ्लुएन्स करायला बघत होते. हा आप्ला सगळ्यांशी हसून हो हो करत होता. एकदा फ्रस्ट्रेट होऊन म्हटला पण मला पण माझ्या मतानी ठरवू द्या. मग म्हटला "तसं नाही पण स्नेहा पण रडायला लागली ना" Lol मजेशीर प्राणी आहे एकूण Happy

आविष्कार मात्र आळशी आणि मठ्ठ पण वाटतो. कालच्या भागात विकास ला म्हणत होता, "मला सांगत जा रे, ते बॅग घ्याचं मला सांगितलं असतं तर उचलली असती मी. आता यापुढे ना टास्क मधे एखाद्या नोकरासारखं मला सांगत जा तू हे हे कर अन मी ते ते करीन, पण ते विचार वगैरे करायला सांगू नका म्हणे Uhoh
आदिश छा गया है या वीक मधे Happy मला त्याचं लेक्चर एकदम एन्टरटेनिंग वाटलं. गुदगुल्या फार फनी Happy बाकी सगळे बोर. स्टार कोण कोणाला देणार ते ठरल्यासारखे आहे. खरं तर यात दादुस आणि सुरेखा ला आपली पावर दाखवायला चान्स होता. त्यांची दोन मतं निकाल फिरवू शकली असती.
आता पुन्हा कॅप्टन्सी टास्क मधे राडा दिसतोय.अर्थात तो होऊ द्यायचा का नाही हे बिबॉ च्या हातात आहे. अन त्या सुरेखा ला जाऊ द्या ब्वा आता घरी एकदाचे !
मीरा - गायत्री एकमेकीत प्लान करत होत्या की आपण एकमेकीना सपोर्ट करू वगैरे त्या वेळी गायत्री लिटरली जे मीरा बोलेल त्या प्रत्येक वाक्याचा शेवटचा पार्ट रिपीट करून तेच बोलत होती Happy पुन्हा बुगुबुगु मोड मधे गेली ती. उत्कर्ष काहीही बोलला तरी हलकट वाटतो. जय ला जेव्हा काहीही स्ट्रेस येतो तेव्हा तो एकदम खुप जास्त बडबड करतो आणि वेड्यासारखा हसतो.

दादुस पर एक पोस्ट तो बनता है Happy >>>
मागे पण मिसिंग card मध्ये टाकल्यावर
Mm- आता इथून पुढे......( दिसायचं आहे)
दादुस् - नाही दिसणार Lol

मीनलने BB कॅन्टीन मध्ये फ्रेश आहे का विचारून बिग बॉसची अब्रूच काढली की Lol
Dr. डोळामारे , आज याचा बुरखा फाटला. आज सगळी त्याच्यावर अविश्वास दाखवत होती.

तसं नाही पण स्नेहा पण रडायला लागली ना" Lol मजेशीर प्राणी आहे एकूण Happy
<<<
हाहाहा , यस्स दादुस इज फन अँड सो जेन्युइन !
बाकी दादुस तृप्ती कुडची यांच्याकडे अगदी फ्लोरिडा पेन्सिल्वेनिया, नॉर्थ कॅरोलायना स्विंग स्टेट्स सारखे निकाल फिरवायची पॉवर आहे Biggrin
त्यांनी अजुन थोडा अ‍ॅटिट्युड द्यायला हरकत नाही !

जय स्प्लित्सवीला जिंकला आहे पण तो शो पब्लिक वोट चा नसतो .. खरेच की काय? नो वंडर तो इतका घाबरून आहे नॉमिनेशनला.
सुरेखाला अजूनही वाटते आहे की स्नेहा तिला मदत करेल : D
विकास आणि दादूस दोघेही पोकर फेस ठेवून समोरच्या व्यक्तीचे ऐकतात. पण त्याचा परिणाम मात्र वेगवेगळा दिसतो Happy

Lol मराठी पिक्चर मुख्यमंत्री गणप्या गावडे मध्ये भरत जाधव जसा मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसतो तसा दादूस पण कॅप्टनशीपसाठी अडून बसायला पाहिजे.

ज्यांच्याकडे वुट आहे त्यांनी हिन्दी बिबॉ चा कालचा एपिसोड ‘उसाच्या गुर्हाळाचा टास्क‘ नक्की बघा, हहपुवा झाली !
काही लोक ज्या प्रकारे दणादणा रस काढायचे मशिन चालवत होते, बिबॉ घाबरले कि उसा ऐवजी स्वतःच्या हाताचा रस काढतात कि काय, काही एकमेकांचे उस पळवण्यात बिझी,काही तयार झालेला रस चोरून नेत होते, काही सांडत होते, काही सांडलेल्या रसावरून घसरून पडत होते, काही उसाचं रक्षण करत होते, काही रसात पाणी घालून डायल्युट करून लेव्हल वाढवायचस प्लॅन करत होते आणि अर्थातच दणादण धक्काबुक्की आणि लिट्रली एकमेकांवर उड्या Biggrin
बिबॉ बिचारे वॉर्निंग देऊन देऊन थकले, नंतर कोणी त्यांच्या अनाउन्सम्नेट ऐकेनासे झाले.. ‘जज ऑर्डर ऑर्डर करता रहेगा और तू पिटता रहेगा‘ डॉयलॉग आठवला Rofl
हिन्दी बिबॉ मधला विशाल पण जाम भारी आहे , आधी शमिता शेट्टीला ‘आक्का’ मानलं आणि मग मामू बनवल टास्क मधे Happy

काल त्या गुबुगुबू ने विशालला भांडी घासायला लावून केलेली कुरकूर तिची मानसिकता दाखवते. आज तृप्ती ताईनेच मीराची शाळा घेतली.
सीजनच्या सुरुवातीला सोमिवर तृप्तीचा प्रचंड trolling होत होत.तिला तृप्ती दादा नावानेच सगळे बोलायचे.पण इथ राहून जिंकले तिने. आता तिला तृप्ती ताईच म्हणतात. तिची इमेज खूपच सुधारली आणि जरी विंनिंग मटेरीयल नसली तरी बाहेर hater नसलेली ती एकमेव असावी तिकडे.

कॅप्टनपदासाठी स्नेहा, सुरेखा, विशाल मध्ये लढत कशी काय झाली. मला वाटलं वॉचमनगिरी करणारे तीन उमेदवार कॅप्टनपदासाठी असतील. तो टास्क असाच होता की काय.

सोनालीचे लेक्चर फनी होते. ती छान दिसत होती साडीत.

आज गायत्रीने नक्की काय घातल होत? वर हाय हिल्स सॅण्डल्स घातले ते वेगळे. पडली!

स्केचपेन्स चोरल्यावर मीरा गायत्री 'आम्ही त्या गावचेच नाही' दाखवत होते टीम बी समोर. शिक्षकान्नी बोर्डावर लिहावे हे कुठे बसते बिबॉच्या नियमात?

कॅप्टनपदासाठी स्नेहा, सुरेखा, विशाल मध्ये लढत कशी काय झाली. >>>>>>>> तेच तर. नॉमिनेटेड झालेल्यान्ना कॅप्टनपदासाठी कसे काय दावे दार असू शकतात?

गायत्रीने बिबॉचा आणि चुगली करण्यार्या फॅन्सचा अपमान केला. ' १० वेळा केलेली एक चुगली खरी नसते' म्हणे. विशालने मस्त सुनावल तिला.

आदिश चान्गला खेळतोय, नो डाउट! पण त्याने सुरेखाताई विरोधात पर्सनल बोलायला नको होत. हे उद्या दाखवणार.

उद्या दोन तासाचा भयानक राडा आहे. सगळे एकमेकान्वर तुटून पडतायत.

आज तृप्ती टोटली रॉक्ड , काय सॉलिड टेकोव्हर केलं तिनी मीराचं लेक्चर Biggrin
मला तृप्तीचा सेन्स ऑफ ह्युमर, स्पष्ट मत मांडणे, क्लिअर अँड लाउड व्हॉइस फार आवडतो .
बिबॉच्या एका तरी सिझनला तृप्ती सारखी नॉन ग्लॅमरस फिल्ड मधली विनर झाली पाहिजे !
मीरा लिटरली चडफडत होती तृप्ती आणि विशालमुळे , तिनी काय ती साडी नेसली होती आणि ऑफ शोल्डर टॉप घातला होता, बिन ब्लाउजची वाटत होती, कोणीतरी प्लिज चुगली करा कि सगळ्यांना ड्रेसिंग सेन्सचे धडे घ्यायची गरज आहे !
मीराची काय ती भाषा, मुलं ‘मासूम’ होऊन जातात ???
ती तर मराठी मिडियम मधे शिकली आहे सांगत होती ना? कन्नड वगैरे आहे का ती?
त्या स्नेहाला मेकपचेही धडे द्द्या, चेहरा म्हणजे लिटरली फरमेन्टेशन झालेला मोठ्ठा मैद्याचा गोळा आणि त्यावर पोपटाच्या चोची सारखी लाल लिपस्टिक Uhoh
आज विकास काय ए गृपमधे जात होता ? आदिश आल्याने इन्सिक्युअर झालाय कि मुद्दाम तिथले लोक काय बोलतात पहायला हेरगिरी करायला जात होता ?
गायत्री येडी हिल्स घालून चालता येत नाही, पडली आज Proud
ते स्नेहा- जय प्रकरण फारच क्रिन्ज कन्टेन्ट होत चाल्लय Uhoh

मासूम - तिला मायूस म्हणायचं होतं Lol
जयला टीचर केलं असतं तर त्याच्या वरच्या मजल्यावर काय आहे ते कळलं असतं.
सुरेखाच्या क्लासच्या वेळी ती स्वतः: आणि मीरा दोघी आउट ऑफ असाइन्ड रोल गेल्या.
शेवटी आदिशची कूल इमेज तुटली

या आठवड्यात तृप्ती आणि दादूस दोघे नीट चमकू लागले

.

कधी कधी स्नेहा अशी भासते.

FBf9PVCVgAotVW-_0.jpegFBf9PVCVgAotVW-.jpeg

तिचं ते शारिंगे बॅन केलं पाहिजे
काल खूपच कचकच बडबड होती.
स्नेहाला गाडीतून उतरवल्याची भरपाई म्हणून कॅप्टनसी नॉमिनेशन का?

मी तृप्तीला एक वोट दिलं, कुडचीला काढा bb.

स्नेहाला काय तिथल्या सर्वांची votes मिळत असणार आणि bb काही काढणार नाहीत तिला, बघवत नाही, एकंदरीत ए टीम बघवत नाही, दादूस आणि तृप्ती सोडून.

मी बिगबॉसचे युट्यूबवरचे केवळ फुटेजच बघतो, आणि धाग्यावर चालू असलेल्या चर्चेमुळे अद्ययावत माहिती भेटते. तथापि माझ्या मनातील तृप्ती देसाईंची प्रतीमा पूर्णपणे बदलली आहे.

Pages