मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जय - पाय तोडीन, आडवा करीन ई ई... >>>>> अगदी अगदी..खूप मज घेऊन वावरतो तो.सोबतीला पिना माराय उत्कर्ष आहेच.सगळं बोलून झाल्यावर गॉसिपिंग नको म्हणतो,परवा पण तृप्तीताई कडून सगळं विचारून घेतल्यावर कोणाला सांगत जाऊ नका म्हणाला Wink
गायत्रीला काय सांगत बसला होता आदिश,ती त्यालाच उलट बोलली,
जयशी पंगा घेतल्यामुळे स्नेहाच्या ब्लॅक लिस्ट मध्ये जाईल अस दिसतय आदिश

जागून पहारा टास्क हुषारीने करायचा होता की. जय आधी बरोबर विचार करत होता. पण त्यासाठी पंगा घेऊन उपयोग नव्हता, कॅप्टन झोपल्यानंतर त्याच्यावरच पहारा द्यायचा आळिपाळीने आणि बाकिच्यांनी झोपायचे Happy
दादुस ने सहनशक्ती दाखवली पण त्याला फुटेज मिळण्यासारखे काही केले नाही. मीनल ची कटकट अनॉयिंग झाली काल. त्यापेक्षा हुषारी दाखवायला हवी होती.
बाकीचे सगळे उगीच शिंगरु मेले हेलपाट्यांनी टाइप फुकटच जागत बसले पण त्याचा काय फायदा?! ती सुरेखा पण कशाला त्या ग्रुप ए च्या मागे मागे करते. शून्य फायदा आहे तिला. झाला तर तोटाच होईल.
स्नेहा त्या आदिश ला सारखी खोदून खोदून विचारत होती असे का केले, यांनाच का सिलेक्ट केले वगैरे. आदिश अगदी सांगता सांगता राहिला की हे बिबॉ ने सांगून पाठवलेय Happy सारखे हो ना पण मला काही ऑप्शन नव्हता असे म्हणत होता. येतानाच आताच्या काड्या बिबॉ नेच करायला सांगून पाठवले असावे त्या आदिश ला. स्नेहाला आणि बाकीच्यांना पण तो संशय होताच.

दादूसना हॅटस ऑफ. यावेळी कॅप्टन करायला हवं त्यांना. जयची केवढी कुरकुर आणि अ‍ॅटीट्युड. त्याने दादुसना झोपायला आधी पाठवायला हवं होतं. स्वतः ला यंग, डायनॅमिक म्हणून घेतो, बसत होता आणि आदीश आधी नीट सांगत होता पण ह्याचा आवेश बघून भडकला. सुरेखाताई, गायत्री, मीरा अजून भडकवत होते. आदीश उगाच स्नेहा, गायत्रीला विचारतो. अरे तुला वागायचं तसं वागना, बरोबर का चुक हे त्यांच्याकडून कशाला. स्नेहाला छान गप्प केलं पण डायनिंग टेबलवर.

मीनलही आधी कुरकुर करत होती, पण नंतर पॉझिटीव्हली घेतलं तिने.

जय स्नेहा सीन्स पुढे ढकलते. ह्यावर्षी लवस्टोरी कुठलीच वर्कआऊट होईल असं वाटत नाही, एखाद्या वर्षी होते.

विकास सोनालीला छान समजावत होता. अविष्कार पण बरा वाटायला लागला. एकंदरीत विशाल विकास मीनल सोनाली अविष्कार ग्रुपच आवडतोय.

दादुसना झोपायला आधी पाठवायला हवं होतं. स्वतः ला यंग, डायनॅमिक म्हणून घेतो, बसत होता>>+१ उगाच अरेरावी करत होता. जयचे माकड व्हायला जास्त वेळ लागत नाही.
स्नेहा खरेच भयानक हसते.

हो भयंकर हसते ती स्नेहा. एकूणच सगळे फारच जय च्या अवती भोवती खेळातेय ती. ही स्ट्रॅटेजी असेल तर विल नॉट वर्क. खरंच इमोशनल अटेचमेन्ट वगैरे काही असेल तर तिच्यासारखी मूर्ख कोणी नाही.
मीरा आणि गायत्री, स्नेहाने घरात येण्याआधी जरा बेसिक मेकप चे धडे घ्यायचे की. लहान मुलींच्या गॅदरिंग मधल्याटाइप तोंडं रंगवतात त्या Lol कसेही लावलेले डार्क,लांब आय लायनर, विचित्र लिपस्टिक वगैरे. लावू नका त्यापेक्षा काहीच.
एका प्रोमो मधे गायत्री उत्कर्ष ला सांगतेय की आदिश २ आठवड्यापेक्षा जास्त टिकणार नाही. त्यांचा ग्रुप विकास ला म्हणतो की आदिश विशाल ला त्याच्याकडे ओढतोय तू आमच्यात ये Happy

बापाच्या वयाचा माणूस उभा असताना तरणाबांड जय झोपायला गेलाच कसा Wink सोनालीकडे किती नाईट ड्रेस आहेत.

मीरा आणि गायत्री, स्नेहाने घरात येण्याआधी जरा बेसिक मेकप चे धडे घ्यायचे की. लहान मुलींच्या गॅदरिंग मधल्याटाइप तोंडं रंगवतात त्या Lol कसेही लावलेले डार्क,लांब आय लायनर, विचित्र लिपस्टिक वगैरे. लावू नका त्यापेक्षा काहीच.
<<<
होना, मला मेघा, स्मिता आठवतात कायम !
ऑलवेज कॅमेरा रेडी मेकप, टास्क्स प्रमाणे कपडे , टास्क्स /किचन दोन्हीमधे कायम अ‍ॅक्टिव्ह आणि विकेंडला तर एक से एक ड्रेसेस !

<<स्वतः ला यंग, डायनॅमिक म्हणून घेतो, बसत होता>>
अगदी अगदी!!
जयची तडफड बघून मजा आली.
दादुसने टास्क, खेळ म्हणून मस्त मजेत घेतले. मीनलनेसुद्धा सुरूवातीच्या कुरकुरीनंतर छान स्पोर्टिंगली घेतले.
जयला ते जमले नाही. त्याचा मुळ स्वभावच आतातायी दिसतोय. संपत्ती, स्वरूप, शरीरयष्टी यामुळे सगळे मनासारखे होण्याची लागलेली सवय, सतत चापलूसांच्या घोळक्यात स्वस्तुती ऐकायची सवय यामुळे सारे जगच त्याच्याभोवती फिरते असे त्याला वाटत असावे. कदाचीत असे दोन तीन तडाखे बसले की तो वठणीवर येईल. मीरा, उत्क्या सध्या त्याला इगो मसाज देतायत, एकदा का त्यांनी ह्याला सोडलं की त्याची अवस्था बघण्यासारखी होईल.

जीपमधे कोणीही चढा , बिगबॉसला हवे ते लोक नॉमिनेशस्न मधे आले नाहीत तर बिबॉ स्वतःच काहीतरी कारण देऊन टास्क रद्द करतील Wink
ओटीटी सिझनला असच झालं होतं, जिला काढायचय ती जीप मधून हललीच नाही, टास्क रद्द केल मग बिबॉने, वेळकाढू पणा केला हे रिझन देऊन !

चौकडी ( जय, मीरा, गायत्री, उत्कर्ष) सेफ. आविष्कारला लॉटरी लागली. तोही अनपेक्षितपणे सेफ.

चौकडी ने आपल्याला कचऱ्यासारखं उचलून बाहेर टाकलंय हे स्नेहाला कळंलंय का?

चौकडी दादूस आणि सुरेखा समोर गाजर नाचवतात. दादूस दिसतात त्यापेक्षा हुशार असावा.

आदिश खूप बोलतो. कान किटले

संपत्ती, स्वरूप, शरीरयष्टी यामुळे सगळे मनासारखे होण्याची लागलेली सवय, सतत चापलूसांच्या घोळक्यात स्वस्तुती ऐकायची सवय यामुळे सारे जगच त्याच्याभोवती फिरते असे त्याला वाटत असावे. <<<< एकदम बरोबर, गायत्री पण अशीच वाटते, कसं बोलत होते आदिश बद्दल, स्वत: बद्दलच खूप सांगून गेले

सुरेखा जायला हवी या आठवड्यात. जे दादुसला समजलं ते तिला समजतच नव्हते. कोणीही जीप मध्ये चढले तरी ए टीम राहणार हे नक्की होते. सुरेखाने आधीही टास्क करायला जमणार नाही, किचन मध्ये काम करतो ते consider करा म्हणून सांगितले होते.
आदिष ने आधी उत्कर्ष ला पाठवून बरे केले. एकतर त्यांच्याच ग्रूप मधून एकाचा बळी जाणार त्यामुळे थोडी का होईना चिंगारी तर भडकणार. आणि नंतर बी टीम मधला एकतरी सेफ होणार. गुड प्लॅनिंग.
जय दिवसेंदिवस नावडता होत चालला आहे.
स्नेहाने वड्याचं तेल वांग्यावर काढलं Happy

स्नेहा आणि गायत्री येत्या काही दिवसात सवती सारख्या भांडतात की काय असे वाटून गेले.
टास्कमधे कोण सेफ होणार हे पहिल्या फेरीत स्पष्ट होते. फक्त मला वाटले की स्नेहा ऐवजी गायत्रीला काढतील.
स्नेहा जयला सोडेल असे नाही वाटत. ती लॉयल राहिल त्याला.
आतल्या लोकांनी अतिच चर्चा केली. नॉट वर्थ इट.

संपत्ती ठीकच आहे पण शरीर यष्टी थोडी आऊट ऑफ प्रपोशन आहे. मला ते विअर्ड डब्ल्यू डब्ल्यू एफ वाले पहिलवान आठवतात त्याला पाहिले की.
इमोशनल कोशंट तर अगदी च कमी.

दोन वि, मीनल, सोनाली यांना दोन दोन वोटस दिले. दादुसला एक दिलं त्याच्या टास्कसाठी. जास्त वोटस द्यायला कंटाळा येतो, नंतर नंतर देईन.

स्नेहा आणि गायत्री येत्या काही दिवसात सवती सारख्या भांडतात की काय असे वाटून गेले. >>>>>>>> त्याची सुरुवात दुसर्या आठवडयापासूनच झाली होती. दोघीन्च हसण भयन्कर आहे. बिच्चारा जय! हा हा हा

गायत्री पण अशीच वाटते, कसं बोलत होते आदिश बद्दल, >>>>>>>> अगदी अगदी आदिश च्या चालण्याची कॉपी केली हिने.

मीनल एकटी मस्त, जयला भाव देत नाही. >>>>>> कसल काय, पहारा देण्याच्या टास्क सम्पल्यानन्तर त्यान्च पॅचअप झालय ना.

जय कॉलेजमध्ये असताना बारीक होता?

आविष्कार मस्त हॅण्डसम दिसायचा कॉलेजच्या दिवसात. मीनल कॉलेजमध्ये दिसत होती अजूनही तश्शीच आहे. स्नेहाला आधी मी ओळखलच नाही.

आदिश सुरेखाताईन्शी काय बोलत होता? मध्येच कट केल.

सध्या आदिश चान्गला खेळतोय. टीम बी मध्ये जाव त्याने.

सोनाली डबल ढोलकीसारखी वागली. आधी जयबरोबर बॉण्डिन्ग, नन्तर स्नेहाबरोबर बोलत होती.

ह्यावेळी डबल एलिमिनेशन होईल अस वाटतय.

त्यान्च पॅचअप झालय ना. >>> ते तात्पुरते वाटलं मला म्हणजे समदु:खी टास्कसंदर्भात वगैरे. नंतर पण दिसलं का तसं.

<<<<आदिष ने आधी उत्कर्ष ला पाठवून बरे केले. एकतर त्यांच्याच ग्रूप मधून एकाचा बळी जाणार त्यामुळे थोडी का होईना चिंगारी तर भडकणार. आणि नंतर बी टीम मधला एकतरी सेफ होणार. >>>>>
हा निर्णय मला नीट समजला नाही
उत्कर्ष ऐवजी बी टीम मधला पाठवला असता तर पुढे बी टीम मधले २ सेफ झाले असते ना .....

आजचा एपिसोड फक्त जय आणि आदिश यांच्या भोवती फिरत होता, विशाल- विकास दोघांनाही फार फुटेज मिळालं नाही आज !
आदिश मस्तं अभ्यास करून आलाय , डोक्याने खेळतोय , त्याने डॉमिनेट केलं नव्याने एन्ट्री मारली असली तरी !
आज टिम ए ने टास्कमधे पूर्ण बाजी मारली , त्यासाठी त्यांना १०० मार्क्स पण आज जयकडे चान्स होता कुकि पॉइंट्स घ्यायचा, त्याला प्रचंड फॅन फॉलॉइंग आहे आणि फिनाले पर्यन्त जाण्याचा कॉन्फिडन्स नक्कीच असेल त्याला, जर आज त्यानी उतरून दादुसला चान्स दिला असता तर जनतेच्या नजरेत थोडा पॉझिटिव दिसला असता !
दुसरा गृप फार लांब उभा होता का आज टवाळक्या करत ? यांच्यापैकी कोणीच कसं नाही पोचलं पाच मधे ?

उत्कर्ष ऐवजी बी टीम मधला पाठवला असता तर पुढे बी टीम मधले २ सेफ झाले असते ना ...>> मग स्नेहा नसती उतरली ना.. जो नविन आला असता तोच उतरला असता परत.. पण विकास विशाल च्या टीम ने निराशा केली..एकाला सुद्धा bag घेता आली नाही.. कोणीच alert नव्हत.. त्या टेबल च्या आजू बाजूला असणं अपेक्षित होत पण बरेच जण बसून होते..या बाबतीत मीरा गायत्री खेळण्याच्या तयारीने उभ्या होत्या

स्नेहाने उतरावं म्हणूनच पाठवलं आदिशनी उत्कर्षला, त्याच्या एकट्यसाठीच स्नेहाला उतरवलं असतं त्यानी !
जयला इन्स्टिगेट करणे हेच त्याचं सध्याचं ध्येय आहे, स्नेहाशी कनेक्शन करायचा प्रयत्नं चालु केलाय त्यानी ऑलरेडी आणि जय खरच चिडचिड् करत होता त्याला स्नेहाशी बोलताना पाहून !

Pages