प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

वॉव! मृणालीचा खजिना बाहेर आला.मलातो पहिला सेट आवडला.
श्रवु, काशीतळी मस्त आहे.मुख्य म्हणजे नाजूक आहे.हर्पेन, वाळे मस्त आहेत.

मस्त फोटो सगळे
माझ्याकडे मोठं collection आहे imitation jewellary चं
फोटो नाहीत
काढते सवडीने
हा धागा नेहमीच वर राहणार ह्याची खात्री Happy

<<< माझ्याकडे मोठं collection आहे imitation jewellary चं
फोटो नाहीत>>> +११११

माझ्याकडे पण खूप आहेत, लकिली कोव्हीडमुळे ब्रेक लागला आहे नवीन खरेदीला थोडासा.

IMG_20210914_225204.jpg

सगळ्यांचे किती मस्त मस्त अलंकार!
हर्पेन ते चांदीचे तर एकदम खासच! ठसठशीत वाटत आहेत एकदम!

हलव्याचे दागिने मी केलेले या वर्षी... ग्राह्य धरले जातील का इथे? एका स्पर्धेसाठी पाठवले होते. मास्क हा ही एक दागिनाच धरला आहे. Happy

IMG_6925.JPG

नेमके काय होतंय सस्मित?
ऐप वापरताय कि साईट?
फोटो साईज जास्त आहे का?
आता आम्हाला पण उत्सुकता आहे फोटोज पाहायची.
तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करूचयात आता.

ऐपमधून करत असाल तर इन्सर्ट बटन येत नाही.. सेम प्रॉब्लेम मलाही सुरुवातीला आला होता.
साईटवरून करून पाहा.

IMG_20210916_185143.JPG
माझा पण झब्बू

हे एक भन्नाट दागिने मला एका हुषार, खमक्या व स्त्रीमुक्तीवादामध्ये स्वतःची खास मते असणार्‍या मैत्रिणीने मेलमधुन पाठवुन दिलेले. एक तर सरप्राईझ गिफ्ट त्यातून अगदी अनवट प्रकार. माझे लाडके दागिने आहेत हे. कानातले म्हणजे मेंदूतील न्युरॉन्स आहेत तर गळ्यातले ते ऑक्सिटोसिन मेंदूतील हायपोथॅलॅमस ग्रंथीत निर्माण होणारे, संप्रेरक आहे. सोशल बाँडिंगमध्ये हे हार्मॉन मदत करते.

मुलीने ढापायचा क्षीण प्रयत्न केलेला. पण माझे लाडके असल्याने मी काही ताकास तूर लागू दिली नाही.

https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLWLzsseF28H6xCHYQpklvA-MibYLBIgp8PcchEDxhPHunqQxHWa_QivMf8dLsaqTsmg7STJODCo2-6ShezapiI_3Z2xRfqFw5YL0eHFD94XOwxuNEY2hu2y86Ett40u72gtZnVKph0vucJ0Y9pfYLHKhA=w661-h881-no?authuser=0

काय एकेक दागिने मस्त.
मृ कानातले भारीच आहेत.
सामो किती हटके आहे डिझाइन. असं सरप्राईज गिफ्ट मिळणं म्हणजे! लकी आहेस.

Pages