प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

थॅंक्यु सगळ्यांना. मी आर्या, हलव्याचे दागिने छान दिसताएत.

केया डॉटपेंटींगचे दागिने म्हणजे काय? ते पेंट केलय? खरे मोतीच वाटताएत गं. छान च

ममो नथ अगदी देखणी आहे.

म मो नथ बघितल्यावर पटकन एकदम शालीन अशी .. ( अत्र्यांच्या काळातली आई .. आजी.. समोर आली ) मी सौथ इंडियन असल्यामुळे.. हे फक्त पुस्तकातच किंवा मूव्हीमध्येच बघितलंय..

धनुडी मी बोरिवलीलाच राहते..पण मी दहा वर्षात दहा वेळाच लोकल प्रवास केला असेल....पण आपली दागिन्यांची choice मात्र same आहे.

देवरूप तुमच्या बोरिवलीला पण मस्त मस्त कानातले मिळतात.. कपडेही तिथेच घायचे आणि कानातले.. क्लिप्स.. स्टेशन रोड लाच आहेत..

श्रवु Lol
मधेमधे इतर फोटो आले कि टाकता येतील मला.

मस्तच मृ . मला झुमके आवडत नाही पण गळ्यातलं आवडलं
ममोताई , नथ छानच . मला खूप आवडतात नथी , चमकी . कधीतरी मी फंकी लूक साठी ती यु पीन सारखी खड्याची नथनी घालते .
माझे टोचलेले नाक बुजले आहे त्यामुळे मी लग्नात चापाची नथ घातलेली . नाजुकशी , छ्होटीशी आईने गावावरून मागवलेली .
माझ्या चुलत दीराच्या लग्नात , करवलीला नथ घालायची होती पण सगळ्यांकडे मोठ्या नथी म्हणून ती तयार नव्हती .
अनायसे माझ्याकडे ही होतीच . ति नाजुकशी नथ करवलीला ईतकी सुन्दर शोभून दिसली आणि आवडली की लगेच ४ महिन्यात तिच्या लग्नासाठी , तिच्या आईने त्याच मापाने , साधारण तशीच बनवून घेतली . खूप खूष झाली ती पण आणि मी पण .

मृ चा खजिना बाहेर आला.. मस्त मस्त कानातले आहेत.. कोणीतरी टेम्पल ज्वेलरी पण टाका.. मस्त असते..
आहे माझ्याकडे पण फोटो मेल होत नाहीत माझे.. मी मोबाईलवरून नाही करू शकत..

माझी जेठानी बीझनेस करते,साऊथ स्टाईल ज्वेलरी, साड्या वगैरे.. आहेत बरेच फोटो दागिन्यांचे.टाकते एकेक.
टेम्पल ज्वेलरी म्हणजे?

मृ मस्त झुमके, हर्पेन चांदीचे वाळे सुरेख. किती छान चमकताएत.
मुंबईत लगेच काळी पडते चांदी. श्रवू छान आहे माळ/ मंगळसूत्र

Chandi Dagine 1.JPG

ही वाकी आहे ना?

नीट लक्ष दिले तर शेजारी तराजू आणि पितळी वजनमापे आहेत. चांदीच्या दागिन्यांची अशी तोलून विक्री म्हणजे किती भारी ना !

Pages