प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

>>>>>>>>सामो, नाही नाही मी करत नाही. पण मला आवडतात ऑक्सिडाइज्ड आणि एका भारतवारीत एका स्ट्रीट व्हेन्डरकडे हा खजिना सापडल्यावर मॅड झाले होते! Happy

हाहाहा!!! मला ना एखादा कुयर्‍याकुयर्‍यांचा मस्त ओल्ड फॅशन्ड चोकर हवाय. पण हे कुयर्‍यांचं डिझाईन भारतवारीतही मिळालं नाही Sad

धनुडी स्टारफिश काय गोड आहेत. सायो संपर्क करते. लावण्या लक्ष्मी सुंदर. देवरुप मोर मस्त आणि ती हिरवी फुले तर फारच गोड.

मला ना एखादा कुयर्‍याकुयर्‍यांचा मस्त ओल्ड फॅशन्ड चोकर हवाय. पण हे कुयर्‍यांचं डिझाईन भारतवारीतही मिळालं नाही>>> हो ते खूप सुंदर दिसते. मम्मी कडे आहे तसा ,

हा माझा आवडत्या पैकी एक
IMG_20210914_225131.jpg

सामो, हा मला दादर स्टेशनबाहेर फक्त १०० रुपयाला मिळाला. पारंपरिक कोयरी हारांचे डिझाईन थोडे वेगळे असते. जमल्यास नंतर त्याचा फोटो टाकते

IMG_20190118_082656~2.jpg

1 ल्या गोरेगाव लोकल मध्ये एक माणूस यायचा त्याच्याकडे कानातले गळ्यातले काय कलेक्शन होतं. त्याचा फोटो

सगळे अलंकार अप्रतिम...!
@ धनुडी - कानातल्यांचा फोटो पाहून उचलून घ्यावे वाटतात..!

धनुडी, खुप छान!
खुप मिस करतेय ट्रेन प्रवास, कानातले, गळ्यातले ट्रेनमध्ये जसे मिळते तसे बाहेर मिळत नाही, ती बातच वेगळी असते, एकवेगळीच फिलींग Proud पण हे आता जाणवतेय तेव्हा काहीच वाटायचे नाही.

खूप मस्त कानातले आहेत धनुडी... मला फक्त कानातले घालायलाच आवडतात नो नेकपिसेस ... तो माणूस मला भेटुदे प्लिज

देवरूप आता नाही येत तो माणूस ट्रेनमध्ये.. अपंग होता तो माणूस .. क्लिप्स .. कानातले सगळे आणायचा .. क्वालिटी पण चांगली असायची.. मी हि बरेच कानातले घेतले होते त्याच्याकडून.. अजून आहेत माझ्याकडे..
मी हि नेकपीसेस नाही वापरत.. एक छोटे मंगळसूत्र आहे तेच घालते.. ( म्हणजे रोज बदलावे लागत नाही )

हो ना vb, Happy ट्रेन च्या प्रवासाची बातच वेगळी. त्या कानातलंवाल्याची आम्ही वाट बघायचो, तशी तो ही आमची वाट बघायचा प्लॅटफॉर्म वर. मुस्लीम माणूस होता आता नाव आठवत नाही. श्रवु तुला आठवतो का तो? त्याच्याकडेच कानातले महाग असायचे. 150-300-400 असे पण खुप छान छान.
मला वाटलंच श्रवूला आठवेल. देवरुप कुठे राहाता?

ही आमच्या आईची बसरा मोत्याची नथ अलीकडे चापाची करून घेतली.
अनमोल नथ

IMG_2018-12-04_14-02-11.JPG

Btw ही हायपर लिंक देणं माझ्यासाठी फार learning होतं कालपासून झगडत होते पण अखेर साधलं:)

Thanku अग ती लिंक देणं काही केल्या जमत नव्हतं , लिंक देण्यासाठीच नथ दाखवायची होती म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. भरपूर प्रयत्न करावा लागला पण आलं बाई ..आता वाटतय किती सोपं आहे. Happy

Pages