कुमारी मातृत्व आणि पुढील अवघड वाटा - कोणाशी तरी बोलायचंय

Submitted by शूजिता on 27 August, 2021 - 06:10

नमस्कार,
दीड महिन्यापुर्वी माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचा एक फोन आला आणि ती जी हुंदके देत देत मला सांगत होती ते ऐकून मी एकदम स्तंभित झाले. तिची मुलगी फक्त २० वर्षाची. आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला. दिसायला सावळी पण फारचं गोड कुणाच्याही नजरेत भरणारी. कमालीची शांत आणि अगदी निरागस वाटणारी. तिची आई म्हणजे माझी मैत्रिण तिला एकुलती एकचं कन्या. त्या मुलीला दिवस गेलेत आणि ती घरुन पळून गेली. साडेसहा महिन्याची गरोदर मुलगी आणि माझ्या मैत्रिणीच्या हे लक्षात आले नाही. मुलगी वाढत्या वयानुसार शारिरिक बदल तिच्यात होत आहेत असेचं तिला वाटले. त्यामुळे गरोदर पणात स्त्रिला जी गोलाई येते त्याकडे तिने कानाडोळा केले. कुठल्याचं आईला आपल्या अविवाहित मुलीच्या अंगावरचे वाढलेले मास पाहून असे वाटणार नाही की ती गरोदर आहे. तिथे माझी मैत्रिण फसली बिचारी.

पाच दिवसानंतर खूप प्रयत्नानंतर शेवटी पोलिस जागे झाले आणि त्यांनी मदत केली. मुलगी परत मिळाली. एका छोट्याशा झोपडीत एका मुलाबरोबर होती. तो तिचा प्रियकर. एकदम सडकछाप मवाली मुलगी. चवथा वर्ग नापास. वय २२ वर्ष. मुली पटवायला एक नंबर आणि लफडेखोर. ह्या मुलाच्या तावडीत इतक्या चांगल्या घरची मुलगी फसली. तिचे त्याच्यावर प्रेम जडले पण त्याने फक्त तिचे शारिरिक शोषण केले.

संसार तसाचं सोडून माझी मैत्रिण दुसर्‍या शहरात गेली. तिथे एक बी एच के शोधले. गर्भपात व्हावा म्हणून वणवण भटकली पण इतक्या उशिरा आता ते शक्यचं नव्हते. आता तिची मुलगी ९ व्या महिन्यात प्रदार्पण करेल. इतक्या शांत मुलीच्या मनात केवढे काय काय साचून होते हे ती आता व्यक्त करते आहे. मी आत्ता तिच्याकडे एक दोन दिवस राहायला आले आहे. तिला आधार मिळावा म्हणून आणि काही मदत करता यावी म्हणून.

मुलीला हे मुल दत्तक द्यायचे नाही. किंबहूना मुल जन्माला घालून आपले आईवडील नाईलाजाने आपले लग्न ह्या मुलीशी लावून देतील ही तिची योजना होती. पण तिला माहिती नाही हे प्रकरण किती दाहक आहे.

मी इथे येऊन विचारणा केली. जिथे तिची प्रसूती ठरली आहे त्या डॉक्टरांना आमची फारचं किव आली आणि त्यांनी हमी दिली की त्या एका एन. जी. ओ. कडून हे मुल दत्तक देण्याची सोय करतील आणि ह्यात जिचे मुल आहे तिची सही लागणार नाही. तसेही अशी मुले बेवारस सापडतात. कचर्‍यात, गटार्‍यात, नदीच्या वाहत्या पाण्यात, देवळात, अनाथालयाच्या दारात, कुण्याच्या ओट्यावर, कुणाच्या अंगणात!! कुंतीनेही कर्णाला वाहत्या पाण्यात सोडलं होतं. आपण तर साधी माणसे. ह्या भावना जाऊ देत.. पण मुल दत्तक दिल्यावर ही मुलगी किती आकांत मांडेल? ती जगू देईल का तिच्या पालकांना? तिचे पुढील शिक्षण पुर्ण करु शकेल का? परत तिचे लग्न होईल का? वय फक्त २० आहे मुलीचे तर अजून १० वर्ष वेळ आहे तिला तोवर ही घटना पुसली जाईल. तिचे भले होऊ शकेल. पण मुलीने परत असेचं थेर केलेते? परत ती तेथून पळून परत त्या मुलाकडे गेली तर? मुलगा लग्न करायला तयार आहे म्हणाला पण नक्कीचं लायक पात्र नाही. मग अशा मुलाशी लग्न करुन काय उपयोग. शिवाय, अशी हार पत्करुन आपण समाजाला काय शिकवण देत आहोत? जर आपण हे मुल तिला दिले आणि तिला त्या मुलाशी लग्न करु नाही दिले तर चालेल का? असे एक नाही अनेक विचार आम्हि दोघीनी बोलताना मांडले.

मी इथे फार लिहित वा वाचत नाही. पण अचानक मला मायबोली आठवली आणि वाटलं इथे आपण मत मांडून बघावे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अश्वीनी,
दत्तक हा विचार ह्यासाठी सुरु आहे की जर मुल आईसोबत राहिले तर आई मुलाशी अटॅच होईल. पण मुल जन्मल्यानंतर लगेच दत्तक दिले तर कदाचित काही महिने ती कांगावे करेन पण नंतर सर्व नीट होईल ही आस आहे. ज्या गायनॅक आहेत त्या ५५ वर्ष वयाच्या आहे. त्यांनी अशा खूप केसेस पाहिल्या आहेत. त्यांचा सल्ला हाच आहे की मुलीचे आयुष्य अजून बिघडेल जर ती हे मुल ठेवत असेल तर! मुल आपण ह्या जगात आणले. हेच खूप झाले. त्याच्या जिवाला ईजा पोहचली नाही. आणि त्याला चांगल्या घरी पोहचवू असेही त्या म्हणाल्यात. मी असे आईवडील शोधत आहे जे मला मुल दत्तक घ्यायला योग्य वाटतात. पण.. अजून कुठलाच निर्णय ठाम नाही. सर्व बाबींने विचार करुन मग निर्णय घेऊ. आता फक्त मार्ग शोधत आहोत. धन्यवाद ग!!!

हो खुप गंभीर प्रकरण आहे हे. कुठलाही निर्णय घेणे खुप कठिण आहे.
आई वडिलांची परिस्थिती तर इकडे आड तिकडे विहिर झाली असेल. मुलगी ही एकत नाही आणी दुसरी कडे तो मुलगा आणी कुटुंब ही चांगले नाही.

मी crime petrol मध्ये अशी प्रकरणे बघितली आहेत. तिही रियल लाइफ वरच असतात.

पण तू ज्या मुलीसोबत मेक आउट करतो त्यांचे चित्रण करण्यामागे त्याचा उद्देश मुलीला फसवण्याचा आहे.>> दॅट्स ऑल माय लॉर्ड....!!
हे जर पालकांना अन् पालकांच्या मैत्रीणीना पूर्णपणे उमगले आहे अन् तरीही चांगल्या घरची मुलगी ते अजूनही मान्य करत नाही तर "जा बाई... ज्यास शोधलेस त्याच्या घरी सुखी रहा" म्हणून आपले नित्य कर्म करत निर्मळ जीवन जगायचे. माठातली महामाठ मुलगी असती तरी तिला हे एवढं समजवल्यावर समजले असते.

शेवटचा पर्याय म्हणून एक करा. तिला या धाग्याची लिंक फॉरवर्ड करा. लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचून सुधारली तर सुधारली अन्यथा ती तिने शोधलेल्या मुलाशी अन् त्याच्या रहिवासाशी अगदी योग्य तऱ्हेने जुळवून घेण्याच्या योग्यतेची आहे हे समजून तिचा नाद सोडण्यात शहाणपणा आहे असे मला तरी वाटते..

च्रप्स +१
या वयात काहींचे हार्मोन्स गरजेपेक्षा जास्त उसळतात त्यात आम्हीबी होतो पण इतकी यंटम पोरगी पहिल्यांदाच ऐकण्यात येतेय. वायझेड विशेषण शब्दशः लागू होतेय. बाकी डिटेल्स वाचता आईवडिलांचे वाईट वाटते आहे. मुलीच्या आर्थिक-सामाजिक स्टेट्सची कल्पना नाही आली पण मम /मउम वर्गातील कितीही मुर्ख मुलगी वर वर्णन केलेल्या मुलाच्या नादात या लेव्हलला पागल होईल असे वाटत नाही अर्थात अपवाद असतातच. असल्या मुर्खांना त्यांच्या नशिबावर सोडून द्यावे.
बाकी, असली केस वाचून रोमातून बाहेर यावे लागले लगेच.

मूल दत्तक देऊन काय होणार ?

तिचे दुसरे लग्न होऊन दुसरे पोर होईल अशी अपेक्षा आहे का ?
>>>
नाही अशी काहीही अपेक्षा नाही. लग्न झाले म्हणजे गंगेत घोडे नाहले असे आईवडीलांना वाटत नाही. पण मुलीचा त्या मुलाशी संबंध राहू नये असे वाटते त्यांना. मुल जर मुलीने ठेवले तर सतत तिला वाटेल ह्याला बापही हवा. पण जर मुल तिने दत्तक दिले तर तिचे आयुष्या हातून मोकळे होईल. मुलगी घरची सुस्थित आहे. नातेवाईक बर्‍यापैकी संमजस आणि मदत करतात.

नातेवाईक बर्‍यापैकी संमजस आणि मदत करतात.>> नातेवाईक जर एवढे समंजस आहेत तर त्या चांगल्या घरच्या मुलीला समजावंण्याची मदत का करत नाहीत तिच्या घरातल्यांना..?

लगीन झाले म्हणजे घोड गंगेत न्हात नाही ? लगीन न करूनही ही मुलगी गंगामैयाच तर झाली आहे , टेम्पररी लगीन केले , मग नवरा ( शंतनू) व संसार सोडला, आता फक्त नदीत मूल फेकण्याचे कृत्य बाकी आहे, ते केले की मग मुलगी साक्षात गंगामैयाच तर आहे !!!

बरं झालं गंगेचा संदर्भ निघाला !

मग मागची पिढी म्हातारी होणार , हीपण नोकरी करून नुसता पैसा मिळवत बसणार व कधीतरी एकटी होणार , मग घरात काय मदर टेरेसा आश्रम किंवा प्राणिसंग्रहालय काढणार का ?

असे अन तसे भविष्यात दुसरे मूल होण्याची शक्यता 0 आहे , तर आहे तेच सांभाळावे ,
ऑफिशियल लगीन करून ऑफिशियली घटस्फोट घेतला तर व्यवस्थित सुटेल , मूलही पदरात पडेल ,

आजकाल कायद्याने अशा मुलांना पुरेशी आयडेंटिटी दिली आहे , त्यांना अनौरस , इललेजितिमेट वगैरे म्हणून त्रास देता येत नाही. किंबहुना कायदेशीर अबोर्शनच्या पलीकडे गेले आहे , म्हणजे कायद्यानेही त्याचे अस्तित्व आता मान्य केले आहे.

--
एक अशी केस आमच्याकडेही होती , मला आठवते , मुलगी अशीच पळून जाऊन प्रेग्नन्ट झाली व एच आय व्ही पॉझिटिव्ह पण झाली , मुलीच्या आईबापानि डिलिव्हरी करून मूल अनाथाश्रमात दिले , मुलगी आईवडिलांकडेच आहे व तिचे उपचार सुरू आहेत , हल्ली सगळेजण मास्क घालून येतात, त्यामुळे 4000 रुग्णांत आता ही नेमकी कोण हे मलाही आता लक्षात येणार नाही.

नातेवाईक बर्‍यापैकी संमजस आणि मदत करतात.>> नातेवाईक जर एवढे समंजस आहेत तर त्या चांगल्या घरच्या मुलीला समजावंण्याची मदत का करत नाहीत तिच्या घरातल्यांना..?>>
दरवेळी चांगल्या घरातील इतके हायलाईट का होते आहे तुझ्या पोष्टमधून? जर तुला इथे परिस्थिती समजत नसेल तर नको लिहू वा वाचूस पण दरवेळी चांगल्या घरातील चांगल्या घरातील लिहिणे बंद कर. घरात फक्त आई आणि वडील राहतात आणि दोघेही खूप खूप संमजस आणि सोशिक आहेत. त्यांना समजवून सांगण्याची तुला का गरज वाटते? त्यांच्या मुलीसाठी ते जे काही करत आहेत ते चांगलेचं करत आहे. इथे आम्ही मार्ग शोधत आहोत आणि तुला अघोरी आंनद लुटायची इच्छा होते आहे. तुला समजवून घ्यायची गरज दिसते आहे.

शुजिता,तुमच्या maitrinibabat खूप वाईट वाटते.कोणीही पालक असल्या मुलाशी,आपल्या मुलीचे लग्न लावून देणार नाही.भले आपली मुलगीही भिकार वागली तरीही.

शुजिता,तुमच्या maitrinibabat खूप वाईट वाटते.कोणीही पालक असल्या मुलाशी,आपल्या मुलीचे लग्न लावून देणार नाही.भले आपली मुलगीही भिकार वागली तरीही.>>
देवकी खरे आहे गं शक्य नाही अशा मुलाशी मुलीचे दोनाचे चार हात करुन देणे वा तिथे तिला पाठवणे. निदान आईवडीलांना तरी शक्य नाही होणार. आपण असे म्हणणे आणि आईवडील म्हणून विचार करणे ह्यात फरक आहे खूप. प्रचंड कालवाकालव होत आहे मनाची.

शूजिता मावशी, मी चांगल्या घरातील हे हायलाईट करण्यामागे हेच कारण आहे की प्रतिसाद लिहिताना ही प्री-कंडीशन मी विसरलेलो नाही. मुलीच्या घरी आई आणि वडील दोघेच आहेत अन् ते खूप खूप समंजस आणि सोशिक आहेत हे मला आत्ता कळले. तुमच्या लेखातून आणि खालील प्रतिक्रियेत तसा ओघावता उल्लेख आला असता तर मला ते कळले असते अन् मी तो मुद्दा विचारात घेतला असता.

असो. मला आनंद वगैरे आजिबात वाटत नाही या बद्दल. गैरसमज असेल तर काढून टाका. उलट तुम्ही अन् तुमच्या चांगल्या घरातील मैत्रीण अन् तिचा नवरा आता डोक्याला जास्त त्रास करून न घेता त्या मुलीला तिच्या मर्जीप्रमाणे जगू द्या असे वाटते. आई बापांनी हे असं खूप खूप समंजस आणि सोशिक असल की मग मुलं अशी आई बापंच्या डोक्यावर मिरे वाटतात.

राहून राहून मला या धाग्यावर रश्मी.वैनींची अनुपस्थिती फार खटकत होती.. एवढ्या हक्काने माबोवर माझ्यावर ओरडणाऱ्या फक्त त्याच आहेत म्हणून मला जरा शंका आली इतकंच.

BLACKCAT on 28 August, 2021 - 19:51 > +१
असे समंजस आईबाप मिळायला मोठे नशीब लागते हे त्या कर्मदरिद्री करंट्या कार्टीला काही वर्षांनी माज उतरल्यावर समजेल. तिच्या जागी मी असतो तर माझे, त्या मुलाचे, बाकी सहभागी लोकांचे काय केले असते घरच्यांनी याचा विचार करूनच भीतीची लहर उमटली.

परिस्थिती खरंच नाजूक आहे. She seems to be a girl with a plan (albeit a self-harming one). तिच्या plan मध्ये होणारे बाळ हे तिचे ट्रंप कार्ड आहे त्या मुलाशी लग्न व्हावे यासाठी. आत्ता जर तुम्ही दत्तक वगैरे च्या गोष्टी तिच्याशी बोलाल तर ती desperate होऊन काहीतरी चुकीचे आणि धोकादायक पाऊल उचलू शकते. त्यामुळे तिचे बाळंतपण सुखरूप पार पडेपर्यंत तिला हे सांगता येईल की बाळ सहा महिन्याचे झाले की तुमचे लग्न लावून देऊ. ती सहा महिने गरोदर आहे असे मानले तर तुम्हाला अजून नऊ महिने हाताशी राहतील. बाळंतपण होईपर्यंत कोरोनाच्या नावाखाली तिचे बाहेर पडणे कमीत कमी ठेवता येईल. समजा तो मुलगा आलाच भेटायला तर त्यांना घरात भेटू द्या.
घरात मौल्यवान वस्तू ठेऊ नका. तिच्या अकाउंटला पैसे, तिच्याकडे क्रेडिट/डेबीट कार्ड असे काही सध्या तरी नको. तुला जे काही हवे असेल ते आम्ही देऊ असा विश्वास द्या.
मुलीच्या आई वडीलांची priority त्या मुलापासून आपल्या मुलीला दूर ठेवणे ही दिसते आहे (जे योग्य आहे). पण त्यासाठी आज जरा तिच्या कलाने घेणे आवश्यक आहे.
ती जे काही मी कमावेन वगैरे कल्पनारंजन करते आहे ते प्रत्यक्षात निभावणे किती कठीण आहे याची जाणीव बाळ हातात आले की व्हायला लागेल. पुढच्या सहा सात महिन्यांत मुलाचेही खरे रूप तिच्या लक्षात येईल. मग बाळ दत्तक द्यायचे की नाही हे ठरवता येईल. Even if she decides to be a single parent, let that be her decision. ती शक्यता कमी आहे कारण तिचा मूळ इंटरेस्ट बाळात नसून त्या मुलात आहे.
मला तरी वाटते की आत्ता मुलीची आणि बाळाची तब्येत आणि सुरक्षा याला प्राधान्य देत काही काळ तरी तिच्या कलाने घ्या.
शूजिता, तुम्ही तुमच्या मैत्रीणीला या कठीण काळात मदत करता आहात यासाठी तुमचे कौतुक आहे! फार चांगले काम करत आहात तुम्ही.

जिज्ञासा, आता ती ८ महिन्याची गरोदर आहे. एक महिन्यांनी बाळ येणार आहे. ह्या गोष्टीला दीड महिना उलटून गेला. ह्या दीड महिन्यात नवीन राज्यात घर शोधणे, सामान हलवणे, स्थिरस्थावर होणे, डॉक्टर शोधणे ह्या गोष्टी केल्यात. आता थोडा निवांत वेळ आहे तर पुढील गोष्टीचा विचार सुरु आहे. परत जुन्या घरी जायचे नाही म्हणून सर्व घर खाली केले. भाडेकरुही ठेवणार नाहीत तिथे. लवकर विकून तिथले लागेबांंधे संपतील. किती मोठा निर्णय आणि इतक्या कमी वेळात किती मोठा बदल आयुष्यात!!!

त्या आई वडिलांसाठी जीव अगदी कळवळला. आपण पालक म्हणून कुठे कमी पडू नये यासाठी किती धडपडतो, आणि हे असे काही वाचले की वाटते - काय ही काही मुले, मुली असे वागतात?
ओळखीच्या कुटुंबात अशा केसेस पाहिल्या आहेत. दुर्दैवाने त्या कोणीच मुली सुखी झाल्या नाहीत.
दोन मधे तर वडिल प्राध्यापक होते. अक्षरशः वाताहत झाली त्या कुटुंबांची. एकामधे वडील नैराश्यात गेले आणि वारले. दुसर्‍या केस मध्ये मुलीने असेच हट्टाने झोपडपट्टीतील मुलाशी लग्न केले, 4-5 वर्षे खूप हाल सहन केले आणि नंतर आत्महत्या केली. ... तिला घरी आणण्यासाठी आई आणि वडीलांनी खूप प्रयत्न केले होते.

तुम्ही लिहिलेले खरे आहे असे मी मानते.
इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होते बिचार्‍या पालकांची.
समुपदेशनाबरोबर psychiatric doctors ची treatment उपयोगी पडेल का हे डाॅक्टर ना विचारून पहा.

बाकी इथले काही प्रतिसाद पाहून काही मानवी हक्क अधिकार वाल्यांना कसे दगडफेक / हल्ले करणार्याच लोकांचा कळवळा येतो ते जाणवले.

बाकी इथले काही प्रतिसाद पाहून काही मानवी हक्क अधिकार वाल्यांना कसे दगडफेक / हल्ले करणार्याच लोकांचा कळवळा येतो ते जाणवले.

>> धनवन्ती अगदी!! लोक किती आदर्श व्हा म्हणून सुचवतात पण समोरची व्यक्ती किती नालायक असते हे त्यांना कळत नाही. उपदेश करणे सोपे असते.

ओके, म्हणजे पुढचा एक महिना वरकरणी तिच्या कलाने घेत तिला आनंदी ठेवणे हे घरच्यांना करावे लागेल. बाळ सहा महिन्याचे झाले की तुझ्या सुखासाठी लग्न लावून देऊ हा युक्तिवाद तिला पटावा. Just buy yourself some time to keep her and the baby safe. तोपर्यंत तिच्या अपरोक्ष दत्तक देण्यातल्या कायदेशीर बाबी, तिचे चांगले समुपदेशन करणारे डॉक्टर शोधणे हे सर्व करता येईल. आपण हतबलतेतून काही तरी न करता एका प्लॅनने हे सर्व करत आहोत असे कळल्यावर आई वडीलांना देखील ते थोडे सोपे जाईल कदाचित. अशा approach ने गेल्यास ती मुलगी आई वडीलांना exploit करू शकणार नाही.
परीक्षाच आहे मात्र ही पालकांची! त्या मुलीला देव सद्बुद्धी देवो!

अगदी कठोर मनाचे आई बाबा असतिल तेच अशा मुलाशी मुली चे लग्न लावुन देतील.
मला तर मुली चे मन बदलवण्यासाठी प्रयत्न करावे असे वाटते.
आणी तिच्या संमतीनेच ते मुल योग्य ठिकानी दत्तक द्यावे.

दुसऱ्या राज्यात गेले , मग आता तो मुलगा कसा भेटायला येईल ?
>> तो भेटायला येऊ नये म्हणूनच तर तसे केले. नको आहे तो मुलगा परत तिच्या आणि त्यांच्या आयुष्यात. हा एकमेव उद्देश आहे. दुसर्‍या राज्यात यायला त्याच्याकडे पैसेही नसतील आणि असतील तरी तो खर्च करणार नाही. त्याला जे करायचे होते त्याने ते केले. एकदा मुलगी ह्यातून बाहेर पडली की त्याला धडा शिकवता येईल. पण सध्या आम्ही त्याचा विचार न करता बाळंतपण आणि बाळाची सुरक्षा आणि मुलीच्या आयुष्याला वेगळी दिशा देण्याच्या प्रयत्नात आहोत.

<<>एकामधे वडील नैराश्यात गेले आणि वारले. > Sad

नवीन Submitted by प्रणवंत on 28 August, 2021 ->>>
हो प्रणवंत. नैराश्याची treatment चालू होती त्याना.. पण उपयोग होण्याआधीच ते गेले.

नोकरी करून कमवेन म्हणते आहे ती मुलगी . नोकऱ्या काय रस्त्यावर पडल्या आहेत? कोणत्या स्वप्नरंजनात आहे देव जाणे ? प्लस धड शिक्षणही झालेलं नाही.

असो. लवकरात लवकर डोकं ठिकाणावर येऊन सुधारू देत ही अपेक्षा. इतक्या समजून घेण्याऱ्या आईवडिलांना किती त्रास देणारे ही मुलगी.

नवीन Submitted by प्रणवंत on 28 August, 2021 ->>>
हो प्रणवंत. नैराश्याची treatment चालू होती त्याना.. पण उपयोग होण्याआधीच ते गेले.

इथे आईवडील दोघेही खंबीर आहेत. मुलीसाठी जीव तुटतो त्यांचा पण त्यांची भावनिक क्षमता फार मोठी आहे. इतक्या कमी कालावधीत त्यांनी खूप गोष्टी केल्यात. दोघांचे कौतुक वाटते.

डीजे, आपल्याबद्दल इंटरनेट फोरम वर लिहिलं म्हणून मुलगी आणखी बिथरू शकते. तुम्ही तुमचं मत लिहिलं. त्यांनी वाचलं. आता पुन्हा पुन्हा तेच लिहिल्याने काय साध्य होणार?

मला जिज्ञासा यांचा सल्ला सगळ्यात चांगला वाटला. पण मूल जन्माला आल्यावर मुलीला त्या बाळाबद्दल काय वाटतं हेही पहावं. कदाचित तिला बाळाप्रती आपल्या जबाबदारीची जाणीव होईल. त्यासाठी पर्याय खुला ठेवता आल्यास बरे.

प्रकरण खूपच गुंतागुंतीचं आहे.

नोकरी करून कमवेन म्हणते आहे ती मुलगी . नोकऱ्या काय रस्त्यावर पडल्या आहेत? कोणत्या स्वप्नरंजनात आहे देव जाणे ? प्लस धड शिक्षणही झालेलं नाही.

असो. लवकरात लवकर डोकं ठिकाणावर येऊन सुधारू देत ही अपेक्षा. इतक्या समजून घेण्याऱ्या आईवडिलांना किती त्रास देणारे ही मुलगी.
>>>
जाई,
मी बोलले मुलीशी तर ती म्हणाली मावशी मी नवीन काहीतरी केले न घाबरता. माझ्यासारख्या अनेक मुली जीव देतात. बाळाला टाकून देतात. ते तरी निदान होणार नाही माझी केस बघून .शिवाय आईवडील मुलांना इतके धाकात ठेवतात ते किती अयोग्य आहे हे त्यांनाही कळेल. खरे तर ह्या मुलीला पुर्ण स्वातंत्र्य होते आणि एकुलती एक होती म्हणून काहीही कमी पडले नाही. तरी ही अशी बोलते !!!

शूजिता, तुझ्याशी बोलली ही जमेची बाजू. मुलाने वेश्येच्या घरी ठेवले त्यावर मुलीची प्रतिक्रिया काय होती? घर/एखादी खोली भाड्याने घेऊन तिथे ठेवली नाही, सिनेमातल्या सारखं देवळात लग्न केलं नाही याबद्दल तिला काय वाटतं?? तिने तो पाच दिवसाचा काळ खूप सहजपणे झटकून टाकलेला आहे. त्यातील अनुभव - त्याने तिला काय खाऊ-पिऊ घातले, काय प्लॅन्स झाले, कितीवेळा भेटला, किती चौकशी केली, त्याच्या घरचे कसे वागले इ इ डिटेल्स मध्ये कुणीतरी तिला जरा कुरेदायला हवे. तिची तिला जाणीव हवी की खूप अस्थिर व रिस्की परिस्थितीतून ती सुटलेली आहे. ती चूक का बरोबर हे ठरवण्यापेक्षा त्या अनुभवांतून तिला काय पुढचा मार्ग दिसला ते बघायला हवे..... आपण फसलो हे कबूल करण्यासाठी आवश्यक स्पेसच नाही असे नको....

मुल जन्माला घालून आपले आईवडील नाईलाजाने आपले लग्न ह्या मुलीलाशी लावून देतील ही तिची योजना होती.>>>
खरेच अशीच योजना होती का ? की बाळाला जन्म दिल्यामुळे तो मुलगा नाईलाजाने तिच्याशी लग्न करेल अशी योजना होती/आहे ?
ही दुसरी बाजूही असू शकते ना ?

Pages