Submitted by अश्विनीमामी on 7 July, 2021 - 05:34
आज भारताच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होतो आहे. २०१९ मध्ये कार्य भार संभाळ ल्यावर आज प्रथमच मंत्री मंडळात महत्वाचे बदल होत आहेत. काही मंत्री राजीनामा देउन पाय उतार झाले आहेत . काही नवे चेह रे आले आहेत. शपथ विधी आज सात तारखेला संध्याकाळी आहे.
लेबर मंत्री आरोग्य मंत्री ह्यांनी राजिनामे दिले आहेत.
https://www.ndtv.com/india-news/cabinet-reshuffle-santosh-gangwar-labour...
आपले सिंदिया राणे, देवेंद्र पण चर्चेत आहेत. गडकरी ह्याम्चे खाते राहणार का बदलणार?
त्या बद्दल पक्ष -निरपेक्ष चर्चा करण्या साठी धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राणे, खासकरून त्यांच्या
राणे, खासकरून त्यांच्या पुत्रद्वयांच्या पद्धतीच्या राजकारणाची कधीच फॅन नव्हते.
पण राण्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या छोटेखानी कारकिर्दीत पहिल्यांदा कोकणातल्या वाड्यावस्त्यांवर (फक्त सिंधूदू्र्ग नव्हे) रस्ते पोहोचले आणि त्यांचा दर्जा रिझनेबल होता. मी याचे श्रेय नक्कीच त्यांना देईन.
रावणाचा प्राण त्याच्या बेंबीत
रावणाचा प्राण त्याच्या बेंबीत होता . त्याला बाण मारल्यावर तो मेला.
राम मंदिर ही भाजपाची बेंबी आहे , एकदा निकाल लागला की मग हेही रावणासारखे खाली पडणार आहेत.
-----
26.08.2020 ची कमेंट आहे
https://www.maayboli.com/node/76279
बरं !
बरं !
राणे यांचा पिंड हा एका
राणे यांचा पिंड हा एका कार्यकर्त्याचा आहे; मुरब्बी राजकारण्याचा नाहि. इतकि वर्षं राजकारणात राहुनहि त्यांच्यातला कार्यकर्ताच दिसुन येतो. भाजपातल्या नेतेमंडळींची पण तिच परिस्थिती आहे. कार्यकर्ते आहेत, पण सगळे राजकिय डावपेचात सपशेल तोंडघशी पडतात. निष्ठावंत कार्यकर्ते (एबीविपि, आरएसएस इ.) असल्याने नेतेपदाच्या बोहोल्यावर चढवलं जातं. परंतु आढ्यातंच नाहि, तर पोहोर्यात कुठुन येणार या उक्तिनुसार पुढे मर्यादा उघड्या पडतात. यात प्रामुख्याने जावडेकर, ईराणी, फडणवीस काहि अंशी मोदि-शहा सुद्धा आले. सुदैवाने एखादाच पर्रिकर, गडकरी निघतो पण त्यांनाहि इनर सर्कल मधे घेतलं जात नाहि. असो.
आता हे नविन आरोग्यमंत्री, ज्यांना आपण काय लिहितो याचं तारतम्य देखील नाहि, काय दिवे लावतात ते पाहुया...
राणे, खासकरून त्यांच्या
राणे, खासकरून त्यांच्या पुत्रद्वयांच्या पद्धतीच्या राजकारणाची कधीच फॅन नव्हते.
पण राण्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या छोटेखानी कारकिर्दीत पहिल्यांदा कोकणातल्या वाड्यावस्त्यांवर (फक्त सिंधूदू्र्ग नव्हे) रस्ते पोहोचले आणि त्यांचा दर्जा रिझनेबल होता. मी याचे श्रेय नक्कीच त्यांना >>>>>>>>>>
नाही तर आता बघा !
100 कोटींचा हफ्ता कसा येईल याचीच चिंता .
शेवटच्या क्षणापर्यंत वझे ला वाचवण्याचा आटापिटा चाललेला . तो पर्यंत हजारो कोविड पेशंट मेले तरी चालतील .
वझे विरोधात इतके पुरावे सापडून देखील हा बाबा वझे ला वाचविण्याचा प्रयत्न करीत होता ,याची चीड येते ....
जावडेकर आणि रवीशंकर प्रसाद तर
जावडेकर आणि रवीशंकर प्रसाद तर मोदी कोर कमिटी मधले ना? नक्की असं काय घोडं मारलं दोघांनी?
खुडुक कोंबड्यांना कोण ठेवेल
खुडुक कोंबड्यांना कोण ठेवेल का खुराड्यात
विज्ञान तंत्रज्ञान खाते
विज्ञान तंत्रज्ञान खाते साहेबांनी स्वतःकडे ठेवले.
मलापण कुठल्या तरी मेडिकल कॉलेजचा डीन करा
व्हेटर्नरी डॉक्टर ला
व्हेटर्नरी डॉक्टर ला आरोग्यमंत्री बनवलाय साहेबांनी... तुम्हाला व्हेटर्नरी कॉलेजचा चा डीन बनवतील
>>यात प्रामुख्याने जावडेकर,
>>यात प्रामुख्याने जावडेकर, ईराणी, फडणवीस काहि अंशी मोदि-शहा सुद्धा आले.<<
जावडेकर, इराणी ठीक आहे पण पुढच्या तीन नावांबाबत ते राजकारणात मुरब्बी नाहियेत असे म्हणणे म्हणजे जरा अतिच झाले असे वाटत नाही का?
माझे मन आमच्या देवगड
माझे मन आमच्या देवगड तालुक्यात डांबरी रस्ते झाले तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, बाकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले किंवा इतर ठिकाणचे खरंच माहिती नाही मला. राणेंनी केलं असेल तर नक्कीच क्रेडिट द्यायला हवं.
माझं सासरचे गाव अगदी खेडेगाव आहे, अर्ध्या डोंगरात आहे, वाडी वस्तीच जास्त आहे, तिथे लाल मातीचे रस्ते होते, डांबरीकरण युती काळात जोशी मुख्यमंत्री असताना झालं.
जावडेकरासाठी हे कारण नसावे ,
जावडेकरासाठी हे कारण नसावे , पण !!!!!!
साबा नक्वी चे वडील कोविड ग्रस्त असताना जावडेकरांनी ऑक्सिजन सिलेंडर ची घरपोच सेवा दिली होती , लुटन्स आहे म्हणून स्पेशल वागणूक देणं चुकीचेच होते .
त्या वेळी केजरीवाल गॅंग मात्र साठेबाजी करून सामान्य लोकांना दाही दिशा भटकायला लावत होती .
जावडेकराना उगाच काढलं,
जावडेकराना उगाच काढलं, प्रीतम मुंडेना पण काहीतरी खाते द्यायला हवं होतं असं वाटतं.
पर्रीकर, सुषमा स्वराज पंतप्रधान होण्यासाठी योग्य होते. गडकरी झाले तर आनंद होईल. मोदीजींनंतर (अजून एक टर्म मोदीच असतील) गडकरीजी व्हायला हवेत, व्हिजन उत्तम, दिलखुलास व्यक्तिमत्व. त्यांना व्हायला देतील असं वाटत नाही मात्र.
मोदीजींनंतर (अजून एक टर्म
मोदीजींनंतर (अजून एक टर्म मोदीच असतील) >>>
आता श्री. मोदीजी चिकटलेत भारतीय लोकशाही ला, अगदी जळू सारखे, आता तेच असतील पंतप्रधान भारतीय लोकशाहीच्या शेवट पर्यंत.
पुढचा पंतप्रधान मी होणार.
पुढचा पंतप्रधान मी होणार. मराठीच्या पेपरात कोणताही निबंध आला तरी मी "मी मुख्यमंत्री झालो तर" हाच निबंध लिहायचो. सुरवातीला बाई ओरडायच्या नंतर नंतर कंटाळून बाईंनी मला शाळेचा आरोग्यमंत्री बनवला. तेव्हापासून मला जीवनाचे सार उमजले की समोरच्याला इरिटेट केल्यावर पण आपल्याला पाहिजे ते थोड्याफार प्रमाणात मिळू शकतं.
बॅरिस्टर अंतुल्यांच्या काळात
बॅरिस्टर अंतुल्यांच्या काळात रायगड जिल्हा अगदी चकाचक झाला होता. रस्ते खड्डे विरहित झाले होते. नवीनही बांधले गेले होते.
काँग्रेस (भ्रष्ट,) चा
काँग्रेस (भ्रष्ट,) चा कार्यकाळ मध्ये सामान्य लोकांची अवस्था आणि मोदी च्या काळात असणारी सामान्य लोकांची अवस्था एकसारखी आहे काही फरक नाही.
काँग्रेस च्या काळात जितके फायदे उद्योगपती ना मिळत होते देशाची संपत्ती लुटून तेवढेच लाभ उद्योग पती ना मोदी राज्यात पण मिळत आहे.
सरकार कोणतेही ही असू उद्योगपती,लुटारू,गुंड,ह्यांच्या वर सरकार च वरद हस्त असतो.
आणि मूर्ख सामान्य लोक हा पक्ष चांगला आणि हा पक्ष वाईट ह्याची वांझोटी चर्चा करण्यात व्यस्त असतात
भारतात ना काँग्रेस मूर्ख आहे ना BJP.
ह्या देशातील सर्वात मूर्ख घटक हा भारताची सामान्य जनता आहे.
आज न्यूज चॅनेल ओझरते ऐकले
आज न्यूज चॅनेल ओझरते ऐकले तेंव्हा एकंदर मंत्रीमंडळ विस्ताराबद्दल "सोशल इंजिनीअरिंगला प्राधान्य" आणि "एक दोन अपवाद वगळता घराणेशाहीला थारा दिला नाही" असा एकंदर सूर दिसला!
दोन्ही सुर फालतू आहेत.
दोन्ही सुर फालतू आहेत.
मोदी , शाह ह्यांनी निरंकुश सत्तेवर वर्चस्व निर्माण केले आहे.मंत्री हे फक्त परंपरा आहे म्हणून आहेत.
एका पण मंत्र्याची स्वतःची बुद्धिमत्ता नाही.
बैल आहेत मोदी , शाह सांगतील तेच ते करणार.
जसे इंदिरा जी च्या काळात अवस्था होती मंत्री मंडळ फक्त दाखवण्यासाठी पण सर्व मंत्री इंदिरा जी चे गुलाम होते
स्वतःचे अस्तित्व असणारे किती नेते महाराष्ट्रात आहेत.ज्यांना कोणत्याच पक्षाची गरज नाही .
स्वतः स्वतःच्या कर्तुत्व वर निवडून येवू शकतात.
मोजकेच एक दोन असतील.
देशात त्या पेक्षा गंभीर अवस्था आहे.
देश संकट मे है.
देश संकट मे है.
श्री. राजीव चंद्रशेखर
एका पण मंत्र्याची स्वतःची बुद्धिमत्ता नाही.>>>>
श्री. राजीव चंद्रशेखर (विद्यमान राज्यसभेचे खासदार) एमआयटीचे एक प्रतिष्ठित माजी विद्यार्थी (ई ऍण्ड ई) यांनी केंद्रीय सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्य - इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून शपथ घेतली.
एमआयटी मधून पदवी घेतल्यानंतर श्री चंद्रशेखर यांनी आयआयटी, शिकागो येथील संगणक विज्ञान विषयात एमएस केले.
ते इंटेल येथील टीमचे वरिष्ठ डिझाइन अभियंता होते ज्या टिमनी 32 बिट 80486 मायक्रोप्रोसेसर आणि सीपीयू आर्किटेक्ट डिझाइन आणि लाँच केले. पेंटियम संघातील सीपीयू आर्किटेक्ट ते पेंटियम मायक्रोप्रोसेसरच्या आर्किटेक्चरची रचना करणार्या संघाचे सदस्य होते.
1994-2005 दरम्यान त्यांनी बीपीएल समूहाचे नेतृत्व केले.
उद्या शिवसेना ला शह म्हणून
उद्या शिवसेना ला शह म्हणून राणे ना पंतप्रधान केले तरी आश्चर्य वाटायला नको...
ट्विट्स महान आहेत त्या
ट्विट्स महान आहेत त्या
पुलंचे ऑफिस ऑफ द डॉक्टर्/फॅमिली ऑफ माय डॉक्टर आठवले
त्यांच्याकडून यांनी इंग्लिश शिकलेले दिसते.
https://www.youtube.com/watch?v=O8ZISzlU4NU&t=1220s
पंतप्रधान पद?
पंतप्रधान पद?
मोदी जी आहेत तो पर्यंत च राणे सारख्या अनंत नेत्यांना किंमत आहे.
स्वतःचे काहीच कर्तुत्व नसल्या मुळे विविध पक्षांच्या दारा समोर उभे राहण्याचे उद्योग त्या मुळे तर करावे लागतात.
प्रताप सिंह नारंगी ह्या
प्रताप सिंह नारंगी ह्या सामान्य मनुष्यास मोदींनी मंत्री बनवले म्हणून मीडिया नाचत होती. ह्यांनी काय काम केले , ते त्यांनाच ठाऊक , पण आज हे मंत्रीमंडळात नाहीत.
आज मोदींनी केलेले मंत्री हे काँग्रेस व राष्ट्रवादीतून आलेले आहेत, हेच मोदी व भक्त ओरडत असतात , काँग्रेस रावा हे भ्रष्ट पक्ष आहेत म्हणून.
राणे - काँग्रेस/ सेना
भारती पवार , कपिल पाटील - राष्ट्रवादी
अन्जू : रत्नागिरी जिल्ह्यात,
अन्जू : रत्नागिरी जिल्ह्यात, जवळच्या पोलादपूरमधे वगैरे आणि सिंधूदुर्गातल्या मालवण, गोवा बॉर्डरवरच्या गावात तरी राणेंच्या काळात रस्ते झाले.
अर्थात कोकण त्यावेळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. त्यामुळे ओव्हरऑल शिवसेनेने त्याकाळी कोकणाकडे लक्ष दिले असेल.
ब्लॅककॅट : प्रताप सारंगीसारख्या सामान्य कार्यकर्त्याला मंत्री केले तर त्याचे कौतुक केलेच पाहिजे. पण त्यानंतर मंत्रीपदाचे इव्हॅलुएशन करू नये काय? उत्तम कार्यकर्ता उत्तम मंत्री ठरेलच याची खात्री असते की काय?
बाकी इतर पक्षातून आलेल्यांना मंत्रीपद देऊन मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न आहे यात शंका नाही.
सरकार कोणालाही मंत्री
सरकार कोणालाही मंत्री/मुख्यमंत्री/पंतप्रधान करू शकते यात वाद नाही कारण भारतीय लोकशाहीने दिलेले ते वरदान आहे. हे वरदान मान्य करून निवडाणुकीच्या आधी पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असं विचारणं हे आपण ज्या शाळेत शिकलो तिथे इतिहासा सोबत नागरीकशास्त्रही ऑप्शनला टाकले होते हेच दर्शवून देते.
त्यामुळे कोरोनाचे किटाळ धुण्यासाठी हा मंत्रीमंडळ बदल आहे हे मानुन पुढच्या ३ वर्षांत भारत महागाईच्या, अनारोग्याच्या,भुकबळीच्या, धर्मांधतेच्या किती गर्तेत ढकलला जातो हेच पहाणे आपल्या हाती आहे.
>>बाकी इतर पक्षातून
>>बाकी इतर पक्षातून आलेल्यांना मंत्रीपद देऊन मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न आहे यात शंका नाही.<<
"भाजपामध्ये बाहेरुन आलेल्यांना सडवत नाहीत.... त्यांना अगदी मंत्री वगैरे पण बनवतात" असा मेसेज देवून कुंपणावर असलेल्यांना आकृष्ठ करण्याचाही प्रयन्त दिसतोय
सत्ताकारण 
कुपणावर असणारे कोणत्या ही
कुपणावर असणारे कोणत्या ही पक्षात गेले तरी ते कुपनावर च असतात.त्यांचा काही भरवसा नसतो.कोणी आमिष दाखवले की चालले तिकडे.
निष्टवंत लोकांना योग्य मान दिला पाहिजे.
रामदास आठवले काँग्रेस सरकार मध्ये पण मंत्री होते.
Bjp सरकार मध्ये पण मंत्री आहे.
उद्या काँग्रेस चे सरकार आले की चालले रामदास आठवले तिकडे.
मंत्री मंडळात एक जागा फुकट वाया जाते.
कुपणावर असणारे कोणत्या ही
कुपणावर असणारे कोणत्या ही पक्षात गेले तरी ते कुपनावर च असतात.त्यांचा काही भरवसा नसतो.कोणी आमिष दाखवले की चालले तिकडे.
>>>> १००००%
Pages