नवे भारतीय मंत्री मंडळ : कोण? का? कधी पर्यंत?!

Submitted by अश्विनीमामी on 7 July, 2021 - 05:34

आज भारताच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होतो आहे. २०१९ मध्ये कार्य भार संभाळ ल्यावर आज प्रथमच मंत्री मंडळात महत्वाचे बदल होत आहेत. काही मंत्री राजीनामा देउन पाय उतार झाले आहेत . काही नवे चेह रे आले आहेत. शपथ विधी आज सात तारखेला संध्याकाळी आहे.

लेबर मंत्री आरोग्य मंत्री ह्यांनी राजिनामे दिले आहेत.
https://www.ndtv.com/india-news/cabinet-reshuffle-santosh-gangwar-labour...

आपले सिंदिया राणे, देवेंद्र पण चर्चेत आहेत. गडकरी ह्याम्चे खाते राहणार का बदलणार?

त्या बद्दल पक्ष -निरपेक्ष चर्चा करण्या साठी धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Biggrin Rofl

देशाच्या आरोग्यमंत्र्याला इंग्रजी यावे ही अपेक्षा खरंच अवास्तव वाटते का तुम्हाला?
नवीन Submitted by व्यत्यय on 8 July, 2021 - 09:17
>>
देशाच्या आरोग्यमंत्र्याला २१ व्या शतकात, "आरोग्य" या विषयातले "चांगले" ज्ञान असावे. त्याचा इंग्रजी "उत्तम" येण्याशी संबंध नाही.

जगात सर्वात तरूण आणि वास्तविक जीवनात सर्वात जास्त उपयोगात असणारी इंग्रजी नाही आली तरी चालेल परंतू काही ठरावीक लोकांच्या पोटापाण्याची सोय व्हावी म्हणुन मृतभाषा येणे अनिवार्य आहे असं त्या काही लोकांना वाटू शकते Biggrin
नवीन Submitted by DJ....... on 8 July, 2021 - 09:22
>>
I think we should prefer a government with good governance, policies and humanitarian attitude instead of preferring fluency in foreign language.

< good governance, policies and humanitarian >
याची अपेक्षा मोदी सरकारकडून?
इव्हेंट मॅनेजमेंट आणि पब्लिसिटी स्टंट्स करायला सांगा.

Biggrin

इंग्रजी यावे ही अपेक्षा खरंच अवास्तव वाटते का तुम्हाला? >> हो. पण ती व्यक्ती हुशार असावी आणि ही वरच्यासारखी लक्तरे टांगू नयेत हे ही वाटते. जी भाषा येते त्यात लिहावे आणि हॅण्डल चालवायला पगारी माणसे नेमावी.
रिकामा घडा आक्षेप घ्या की. भाषेची अपेक्षा नको.

पण ती व्यक्ती हुशार असावी आणि ही वरच्यासारखी लक्तरे टांगू नयेत हे ही वाटते. जी भाषा येते त्यात लिहावे आणि हॅण्डल चालवायला पगारी माणसे नेमावी.
रिकामा घडा आक्षेप घ्या की. भाषेची अपेक्षा नको.
नवीन Submitted by अमितव on 8 July, 2021 - 09:47
>>
Exactly!
+११११११

अनुराग ठाकुरचं ट्वीटर हँडल सीएन एन १८ च्या एक पत्रकार चालवतात असं पकडलं गेलंय..

मोदी परदेश दौर्‍यावर जायचे तेव्हा त्या त्या देशांच्या भाषेत ट्वीट करायचे याचं कोण कौतुक व्हायचं!
ऑस्ट्रेलियन संसदेत त्यांनी केलेल्या इंग्रजी भाषणाचं कौतुक इथे मायबोलीवर वाचलंय.

सुरुवातीला मोदी इंग्रजी भाषणाची (टेलिप्रॉम्प्टरवरून वाचण्याची ) चांगली तयारी करायचे. आता त्यांना केशवेशभूषा यांतून भाषणाच्या तयारीसाठी वेळ मिळत नाही.

रिकामा घडा कशाला.. इथे भरलेले घडेच कुचकामी ठरत आहेत.
हर्षवर्धन डॉक्टर आहेत. पण आख्या करोना काळात मटार सोलण्याचं प्रात्यक्षिक दिलं आणि कोरोनीलची जाहिरात.
कोरोनासारख्या आपत्तीत आरोग्यमंत्री ट्विटरवर बिझी . तस्मात इंग्रजी घ्या किंवा ज्ञान घ्या , इथे पालथे घडेच आहेत .

Mr Mandaviya studied veterinary science at the Gujarat Agricultural University and later completed a masters in political science.

He began as a member of the Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) and rose through the ranks in the BJP. At 28, Mr Mandaviya became the youngest MLA in 2002.
Without comments

काळानुसार कवालिफिकेशन बदलत रहातील ना ?
पूर्वीच्या राजाला घोडा येणे व तलवार येणे ही अर्हता होती

आता इंग्रजी व मातृभाषा आली तर चांगलेच आहे.

स्वतःच्या देशी ज्ञानावर इतका भरोसा आहे मग ते फ्रान्सवरून राफेल का आणले ? ब्रह्मअस्त्राचा फॉर्म्युला गाईने खाल्ला का ?

राफेल धाकल्या अंबानीच्या पोटापाण्यासाठी आणलं. तो जिथे हात लावायचा तिथे माती करायचा.

आपल्याकडे कपिल पाटील नावाचे दोन नेते आहेत का? एक कपिल २०१४ मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले. दुसरे राष्ट्रसेवा दलाचे पदाधिकारी आहेत का? की ते तेच आहेत?

ब्रह्मअस्त्राचा फॉर्म्युला गाईने खाल्ला का ?>> Rofl Rofl Rofl

राफेल धाकल्या अंबानीच्या पोटापाण्यासाठी आणलं. तो जिथे हात लावायचा तिथे माती करायचा.>> Proud Proud Proud

ब्लॅककॅट सर, आपणास आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राजकारणाचे ज्ञान आहे. परंतु, स्थानिक घडामोडी काय घडत असतात हे तुम्ही मान्य करत नाही आणि हीच गोष्ट शिवसेना नेतृत्वासोबत देखील घडत आहे. आजूबाजूचे सल्लागार सर्वत्र फिल गुडची स्थिती आहे असे दाखवत आहेत. भाजपाचा उदो उदो करून किंवा इतर कोणत्याही पक्षाचा तिरस्कार करायला मी काही कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा कार्यकर्ता नाही. शिवसेनेसारखा पक्ष टिकला पाहिजे ही माझी देखील भावना आहे. पण, परिस्थिती तशी नाही. नंतर निवडणुक प्रचारावेळी हल्ला झाला...हल्ला झाला असे बोलून काहीही होणार नाही. जशी भाजपा प्रत्येकवेळी निवडणुकीचा विचार ठेऊनच समोर येत राहते तशीच गोष्ट अन्य पक्षांनी करणे देखील गरज आहे. आम्ही भाजपपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्नात त्या राजकीय पक्षांना फटका बसतोय. राहता राहीला प्रश्न कोणत्याही दंगलींचा तर त्या दंगलीचे परिणाम त्या-त्या निवडणूकीपुरते टिकून राहतात. आगामी काळातील विधानसभा निवडणूका बघता जर सर्व पक्ष स्वतंत्र लढले तर लाखोंच्या मताधिक्याने निवडून येणे ही गोष्ट कमी होणार आहे. जे काही मताधिक्य आहे ते हजार-दहा हजार. जर मोदी जातीय समीकरणे बघून खांदे पालट करू शकतात तर हीच गोष्ट शिवसेनेला देखील लागू होते. निवडणुकीतील पराभवानंतर चिंतन शिबिरे ठेऊन काय फायदा होतो? त्याअगोदरच चिंतन करणे योग्य नव्हे? एक प्रश्न तुम्हाला देखील आज जर लोकसभेची निवडणूक लागली तर काँग्रेस निवडणुकीसाठी कितपत सामोरी जाऊ शकेल? निवडणुक विजयासाठी लागणारी "संसाधने" काँग्रेसकडे आहेत का? काँग्रेसचा अध्यक्ष कोण किंवा विरोधी पक्षाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? ह्या गोष्टी निवडणुकीला दोन महिने राहिले असताना करायच्या नसतात...!! तृणमूल काँग्रेस आणि डीएमके हे दोन पक्ष सोडता कोणता पक्ष सद्यस्थितीत लोकसभा निवडणुकीत भाजपा विरुद्ध तग धरू शकतो?

भरत सर, विशिष्ट समाजाचा नेता झाला म्हणून त्या समाजाचे भले होत नसावे. परंतु, निवडणूकीत निवडून येण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या असतात आणि भाजपचे महाराष्ट्राच्या दृष्टीने बोलायचे झाले तर हीच रणनीती दिसते आहे. यापूर्वी जंबो कॅबिनेटला विरोध करणारे आता जंबो कॅबिनेटकडेच वळले. स्थापनेपासूनचे निष्ठावंत वैगेरे ह्या संकल्पना बाजूला सारून सद्य स्थितीत पक्षाला फायदा कसा होईल हीच समीकरणे जोर धरत आहेत.

श्री. नारायण राणे- (शिवसेना विरोध, कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भाग तसेच मुंबई मधील काही भाग. शिवसेना आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये)

डॉ भारती पवार- दिंडोरी मतदारसंघ (ST राखीव मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये)

श्री. कपिल पाटील- भिवंडी मतदारसंघ (आगरी समाज, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये)

डॉ. भागवत कराड- (वंजारा समाज)

डॉ. भागवत कराड यांच्या नियुक्ती मधून हे स्पष्ट होत आहे की, सदर मंत्री निवडीवर श्री. देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा देखील आहे. मुंडेना मागील काही काळापासून शह देण्याची जी सुरूवात झालेली आहे ती अजूनही संपलेली नाही. त्यामूळे आगामी काळात महाराष्ट्रातील भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून श्री. देवेंद्र फडणवीस हेच दिसून येतील. श्री. रावसाहेब दानवे यांना दिल्लीमध्येच मंत्रीपदी ठेवण्याचा निर्णय देखील याचाच एक भाग असू शकतो.

ओहो. चार पैकी तीन नवे मंत्री आयात केलेले आहेत होय! जावडेकर , मुंडे , पाटील सतरंज्या उचलायला.

भाजपचं सग़ळं राजकारण फक्त सत्ताकारण आहे.

नाराय ण राणे खरंच पॉवरफुल आहेत. त्यामुळे ते राज्यसभेतून आलेत.

उरणकर साहेब तुम्ही फार छान लिहिता. मी तुमचे लेख अन प्रतिक्रिया आवर्जून वाचतो. तुम्ही म्हणता ते लोकसभेच्या निवडणुकीची तयारी अन पंतप्रधानपदाचा उमेदवार हे २+२=४ अशा गणिती भाषेत बरोबर वटते परम्तु राजकारणात असे नसते नाहीतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मु.मं. पदाचा उमेदवार "मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन..." असं उच्चारवात बेंबीच्या देठापासून ते शेंडीच्या टोकापर्यंत भकत असूनही निकालानंतर चित्र पालटले अन कुणाच्या ध्यानी-मनी नसतानाही उठा मु.मं. झाले हा अगदी अलिकडचा राजकीय इतिहास आहे हे अव्हेरून चालणार नाही.

बेंबीच्या देठापासून ते शेंडीच्या टोकापर्यंत भकत असूनही निकालानंतर चित्र पालटले अन कुणाच्या ध्यानी-मनी नसतानाही उठा मु.मं. झाले हा अगदी अलिकडचा राजकीय इतिहास आहे हे अव्हेरून चालणार नाही.>>>>>> सतत तुम्ही ब्राह्मणांविरुद्ध जातियवादी लिहीत असता आणी परत वर मान करुन सांगता की मी फक्त अनाजीच्या विचार सरणीच्या लोकांना विरोध करतो. ही दुट्टप्पी गिरी काय दर्शवते ?

फडणवीस बोलुन पण गेले असतील, तरीही करोनापासुन सर्व काळात ते फिल्डवर होते. तुमचा घरकोंबडा रडीचा डाव खेळुन मुख्यमंत्री झाला हे महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला माहीत आहे. फडणवीसांना तोंड देता येत नाही म्हणून काकाने आणी मामुने दोनच दिवसाचे अधीवेशन ठेवले ना? इतर ठिकाणी हजारो लोक गोळा करतो आणी अधीवेशनासाठी याला करोना आठवतो. कितीही थोबाडावर आपटले तरी फडणवीस आणी बाकी शेलार सारख्या लोकांना तोंड देता येत नाही म्हणून रडीचा डाव खेळणे बरे जमते.

अनाजीच्या पणतुंना जो रडीचा डाव वाटतो त्याला इतिहासात गनिमी कावा असं म्हणतात. गनिमाच्या चाली गनिमावरच उलटवून त्याचा खातमा करण्यासाठी राजकारण करावे लागते जे इतरांच्या हिमतीवर, शौर्यावर, मेहनतीवर, पैशांवर्, अन्नावर, पीठावर पिढ्यानपिढ्या जगत भरगच्च ढेरीत खोल रुतलेली बेंबी अन डोक्यावर शेंडी आहे म्हणुन जमतही नाही अन करताही येत नाही.

बाकी ते हे.. बेंबीच्या देठापासून ते शेंडीच्या टोकापर्यंत रग लावून भकणे यावर एका ठरावीक ज्ञातीचा स्वामित्त्व हक्क आहे हे आज नव्यानेच समजले..!!

Rashmi and dj please control and have separate bb for your fight. Keep the discussion to ministerial counsil here. This repetition is sickening.

अमा, मला आजिबात सवय नाही हो हे असे दुसर्‍यांनी लिहिलेल्या प्रतिक्रियेत ज्ञाती वगैरे शोधत बसण्याची अन त्यांच्या शारिरीक जडणघडणी शोधुन त्यावर स्वामित्त्व हक्क दाखविण्याची. माझ्या मनात असं काहीही नसताना कोणी येऊन तुम्ही असं असं एका ठराविक ज्ञातीला उद्देशून लिहिता असं म्हटल्यामुळे मी ती उत्तरादाखल प्रतिक्रिया दिली. तुम्ही माझ्या या धाग्यावरील प्रतिक्रिया वाचल्या तर त्या धाग्याच्या विषयाला अनुसरून आहेत हे तुमच्या लक्षात येईल. शिवाय मी कोणाही व्यक्तीचे नाव घेतलेले नाही.

बाकी साप साप म्हणुन भुई धोपटण्यात पटाईत असलेल्यांच्या हाती यातून काहीही लागणार नाही.

<तुमचा घरकोंबडा रडीचा डाव खेळुन मुख्यमंत्री झाला >

लोकसभेचे निकाल आल्यापासून ठाकरे ५०-५० सांगत होते . फडणवीसांच्या उपस्थितीत व्यासपीठावरून बोलले आहेत. शिवसेनेचे नेते पुढला मुख्यमंत्री सेनेचा असे सांगत होते. त्यावर तेव्हा फडणवीस किंवा भाजपनेते काहीच बोलले नाहीत. आणि विधानसभेचे निकाल आल्यावर म्हणाले असं काही ठरलंच नव्हतं.
मग रडीचा डाव कोण खेळलं? सेनेचा दावा मान्य नव्हता तर एकत्र निवडणुका लढवायच्या नव्हत्या.

भाजपचा आपल्या तोडफोडीच्या क्षमतेवर विश्वास होता. तो त्यांच्या घशात गेला.

फडणवीस करोनाच्या काळात फील्डवर ? राजभवनात असतील.

करोनाच्या काळात फील्डवर ? राजभवनात असतील.>> Biggrin

फडणवीस करोनाच्या काळात फील्डवर ? राजभवनात असतील.>>>>> तुम्ही डोळे झाकुन बसता म्हणून बाकीचे पण झाकतील असे नाही.

ओके मामी, पण प्रत्येक ठिकाणी जातियवाद आणुन खालच्या पातळीवर लिहीले जात असेल तर त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर मिळणार.

Pages