काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीतील महानाट्य !

Submitted by वटवृक्ष on 26 August, 2020 - 10:39

आणखी सहा महिने सोनिया गांधी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी राहतील आणि त्या काळात नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल , असा तात्पुरता उपाय काँग्रेस च्या बैठकीत ठरविण्यात आला .
काँग्रेस पक्षात गेले कित्येक वर्ष अध्यक्षपद निवड हा विषय एकाद्या जखमे प्रमाणे ठसठसत आहे , काँग्रेसच्या तब्बल २३ नेत्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारे पत्र अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिले आणि ते योग्य वेळी प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवले देखील . किंबहुना, हे पत्र पक्षात आवश्यक ते बदल घडवण्यासाठी लिहिले गेले होते पण राहुल गांधी यांनी ते पत्र नाट्य विवस्थित न हाताळल्या मुळे त्यांचे वर्तन पुन्हा एकदा हास्यास्पद सिद्ध झाले . काँग्रेसमध्ये नरेंद्र मोदी यांच्या झंझावतापुढे उभे राहण्याची ताकद उरलेली नसून त्यामुळे पक्षाचा सामान्य कार्यकर्ता नाउमेद झाला आहे. हेच शब्दिक वास्तव त्या पत्रातून समोर मांडले गेले होते.
काँग्रेस पक्ष एखाद्या खासगी कंपनी प्रमाणे गांधी कुटुंबीय चालवत असल्यामुळे शरद पवार , ममता व इतर जनतेची नस ओळखलेले नेते बाहेर पाडून त्या त्या राज्यात काँग्रेसलाच आव्हान निर्माण करत असताना नवीन फूट मात्र कालच्या नाट्यात काँग्रेस ने प्रयत्न पूर्वक टळली .

प्रकृती अस्वास्थ्यते मुळे सोनिया गांधी ना सर्वोच्च नेतेपदी राहणे अवघड असताना पर्यायी अध्यक्ष कोण हा प्रश्न अनुत्तरित च राहिला .

राहुल गांधी हे मोदींच्या आव्हानापुढे खुजे आहेत , फक्त हिच काँग्रेस ची समस्या नाही तर इतके मोठे आव्हान पेलण्यासाठी जनतेमध्ये जाऊन नागरिकांना संघटित करून त्यांचे नेतृत्व करण्याची धमक राहुल यांनी दाखवलेली नाही. त्यामुळे राहुल हे केवळ ट्वीटरवरूनच संघर्ष करत असल्याचा आरोप पक्षांतर्गत होत आहे .
काश्मीरचे मुख्यमंत्रिपद भूषवणारे व कायम राज्यसभेची जागा पदरात पाडून घेणारे गुलामनबी आझाद , आणि जनतेशी संपर्क नसलेले कपिल सिब्बल यांनी ट्विटर वर राहुल गांधी बद्दल राग व्यक्त केला. महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण , मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा या तीन नेत्यांच्या देखील सह्या होत्या .

हा ऐतिहासिक पक्ष पुन्हा उभा करायचा असल्यास या पत्राच्या निमित्ताने एकंदरच काँग्रेसच्या कार्यपद्धतीबाबत जर गांधी कुटुंबासहित सर्व काँग्रेसजनांनी मिळून गांभीर्याने विचार केला तरच यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे. अन्यथा, राहुल गांधी झिंदाबाद, सोनिया गांधी आगे बढो, प्रियांका गांधी, आँधी है, अशा घोषणा देत जातिवंत हुजरे टपून आहेतच !

तुम्हाला काय वाटतं ? येवू द्या रोख ठोक मते .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काँग्रेसची हेडलाईन मॅनेजमेंट असावी.
सगळं ठरवून मुद्दाम केलेलं असावं असा माझा अंदाज. मिडियावाले कव्हरेज देतात. मग सुशांत सिंग, बॉलिवूड ड्रग scandal वगैरे बातम्या त्यात मागे पडल्या आणि काँग्रेसला हेडलाईन्स भेटल्या.nicely managed.

समजा धरून चालू की आताच्या या अश्या वागण्याने काँग्रेस संपणारच आहे. पार नष्ट होऊन जाणार आहे. कागदाच्या चिटकुराएवढी पण ती शिल्लक राहणार नाहीये. तर मग अश्या पार्टीची काळजी का करावी? तिच्यावर तासनतास का बोलावं? वितंडवाद का घालावेत? संपणारेय ना ती? मग कशाला उगाच समाप्त होऊ घातलेल्या गोष्टीची चर्चा करावी?

काँग्रेस संपली तर देशाचं भलं होणार आहे ना? मग रोजच्यारोज चर्चा करून तिचं आयुष्य का वाढवता? काँग्रेस संपली म्हणून राजकिय पर्याय संपणार आहेत का? इतके सतराशे साठ पक्ष आहेत. त्यातला कोणीही एक काँग्रेसची जागा घेईलच ना? मग कशाला काँग्रेसच्या बैठकात काय झालं आणि काय व्हायला पाहिजे ह्याबद्दल मतं मांडता?

बरं. ही मतं मांडणारी मंडळी काँग्रेसची मतदार आहेत का? नाहीत! काँग्रेसने ह्यांना आम्हांला मार्गदर्शन करा म्हणून आऊटसोर्स केलंय का? नाही! काँग्रेसवर टीका करायची संधी मिळाली की आर्किमिडीजला बाथटबमध्ये शोध लागल्यावर जसा तो धावत सुटला तसे हे धावत सुटतात! तरीही ह्यांना काँग्रेसचं कसं होणार ह्याची काळजी आहे!!

बघून घेईल काँग्रेस स्वतःच काय करायचं ते! तितकी ती समर्थ आहे!! या पक्षातली ही अशी भांडणं अनंतकाळापासून सुरू आहेत आणि अनंतकाळ सुरू राहणार आहेत!! बरं, आज भांडलो तर उद्या मॉर्निंग वॉकला जायची भीती वाटावी असं काही तिथे घडत नाही! त्यामुळे भांडणाना तोटा नाही!!

तेव्हा त्या काँग्रेसबद्दल बोलणं सोडा. तुम्हांला देश वाचवायचा असेल, लोकशाही वाचवायची असेल तर ती काँग्रेसशिवाय वाचवता येऊ शकते हे दाखवून द्या!!
-अमेय तिरोडकर (व्हॉटसअप वरून साभार)

https://www.maayboli.com/node/68841
Happy
कमाल आहे !
तुमच्या " प्रियांका गांधी उगवता तारा " व्यक्ती पूजक धाग्यावर तास न तास गप्पा चालतात आणि
काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक च्या तमाशा बद्दल मात्र दुटप्पी भूमिका ?
आणि प्रियांका गांधी ला सरचिटणीस पदी नेमणूक करून काँग्रेस ची किती मते वाढली हा पण संशोधनाचा विषय आहे .

प्रियांका गांधींचा धागा आमच्या पेक्षा कॉग्रेसची काळजी करणार्‍यांनी हीट केला यातच सर्व काही आले ते समजुन घ्या Bw

सनव नुसत्या प्रसिद्धीसाठी कुणी घरची भांडणं चव्हाट्यावर मांडत नाही, तेसुद्धा गांधींवर आडून आडून हल्ले करून प्रसिद्धी मिळवायची हिम्मत कांग्रेसजन मुळीच दाखवणार नाहीत. कांग्रेसी दरबारातले हुजरे फक्त मुजरेच झोडतात, तलवारी उपसायची कामं गांधीनी करावी असा आजवरचा नियम आहे.

यावेळी बाकी हुजऱ्यांनी आवाज चढवायचं कारण इतकच, की त्यांना आता आपण लवकरच आऊटडेटेड होऊ अशी भीती वाटतेय. तशी ती आधीच वाटत असावी, पण सिंदिया , पायलट प्रकरणानंतर पाणी गळ्याशी येतंय याची जाणीव आत्ता झाली असणार.

असो. ही आता रोजची नाटकं झालीत , यावेळी किमान लोकलाजेस्तव तरी गांधी बाजूला होतील अशी अपेक्षा असावी पण हुजऱ्यांचा तिथेही अपेक्षाभंग झाला.
दरवेळी तोच तंबाकू तोच चुना, आन कालचा गोंधळ आज पुन्हा.

भारतात कधी काय आणि कोण हिट होईल हे सांगता येत नाही... शहाण्या डोक्याचं उतरवून येड्या डोक्याचं कसं उचलून घेतल हे आपण २०१४ ला पहीलेलच आहे.. २०१९ ला सुद्धा रिपीट झालं... आता हाता तोंडाची गाठ पडण्याचे वांदे झाले की परत पारडे फिरेल Wink

रावणाचा प्राण त्याच्या बेंबीत होता . त्याला बाण मारल्यावर तो मेला.

राम मंदिर ही भाजपाची बेंबी आहे , एकदा निकाल लागला की मग हेही रावणासारखे खाली पडणार आहेत.

नेहरूंनी नक्की काय योगदान दिले स्वतंत्र लढ्यात हे मला अजुन पर्यंत समजले नाही.
ज्यांनी खरोखर आंदोलनात भाग घेतला ते लाला लजपतराय,सुभशचंद्र बोस,टिळक,सावरकर,मौलाना आझाद आणि अशी किती तरी लोक ह्या सर्वांच्या वंश ज्या ना स्वतत्न भारतातील राजकीय जीवनात काहीच स्थान दिले गेले नाही.
आणि नको तेच राजकीय फायदा घेताना दिसले.
देश ची प्रशासन व्यवस्था कशी असावी हे ब्रिटिश लोकांनीच ठरवून दिले.
विभाजन ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणात च झाले.
लोकशाही पद्धत ब्रिटिश लोकांनीच चालू केली भारतात.
रेल्वे पासून सर्व ब्रिटिश लोकांनी चालू करून दिले .
नेहरू आणि काँग्रेस नी नक्की काय केले ह्या देशासाठी.

ते निवडणुकीला उभे राहिले नाहीत.

स्थान द्यायचे म्हणजे घरात जाऊन भारतरत्न द्यायचे का जनतेने ?

नेहरूंचे योगदान 0 आहे , मग मोदी जे विकत आहेत , ते आकाशातून पडले की काय ?

जे मोदी विकत असा तुम्ही आरोप करीत आहात त्या संस्था ब्रिटिश कालीन आहेत.
रेल्वे ब्रिटिश कालीन
जे पण काही सरकारी उद्योग होते ते सर्व ब्रिटिश लोकांनी स्थापित केले होते.
काँग्रेस नी काही नवीन निर्माण केले नाही.
फक्त नाव बदलली.

फक्त भारतातच खासगीकरण आहे का ?
इस्रो सोडली तर सगळ्या संस्था सरकारी कंपन्या म्हणजे पांढरा हत्ती जोपासण्याचा प्रकार आहे .
केंद्रीय कर्मचारी म्हणजे ऐतखाऊ हेच समीकरण बनलेले . अकाऊंटीबिलिटी हा प्रकार कशाशी खातात हेच त्यांना माहीत नाही असल्या कंपन्या ना पोसायचेच का ?
प्रायव्हेट सेक्टर मध्ये तिघांचा वर्कलोड एका माणसावर असतो तर सरकारी कंपन्यांत या उलटे असतं .
शिवाय वरून पाठवलेला एक रुपया पैकी फक्त पाच पैसे गरिबापर्यंत पोहचण्याचे कारण असल्याचं शुक्राचार्य संस्था -
इति राजीव गांधी .
विसरलात काय ?
जेंव्हा बी एस एन ल सामान्य ग्राहकांना नडवित होती तेंव्हा बी एस एन एल साठी हुंदके कढणाऱ्यांचा जन्म झालेला नसेल म्हणून ते सरकारी कंपन्या विक्रीस काढल्यात म्हणून रडत आहेत .

बरं, आज भांडलो तर उद्या मॉर्निंग वॉकला जायची भीती वाटावी असं काही तिथे घडत नाही!>> हे आवडलं आपल्याला.

नेहरूंनी केलंय ना काम !!!
बाबासाहेब आंबेडकर , लाल बहादूर शास्त्री , आणि सुभाष चंद्र बोस या महान नेत्यांना राजकारण खेळून राजकीय सारीपाट वरून दूर केले.

बरं, आज भांडलो तर उद्या मॉर्निंग वॉकला जायची भीती वाटावी असं काही तिथे घडत नाही!
>>
नक्कीच. १९८४ च्या दंगलीत मारले गेलेले शीख याची साक्ष देतील .

काँग्रेसचे नेतृत्व राहुलजींनीच करावे - एकदम साध्या माणसाच्या मनातलं बोललात. ते आले की एंटरटेनमेंट ग्यारंटीड , अगदी बिग बॉस च्या तोडीस तोड.

त्यांनी बिग बॉसच्या थाटात तुघलकी हुकूम सोडावे, आपण फक्त घरातल्या माणसांची ससेहोलपट बघून मजा बघत बसायची. हळूहळू एकेक करत सगळ्या तगड्या स्पर्धकाला बाहेरचा रस्ता दाखवायचा अन शेवटी हो नाही करता करता आपल्याच आईला किंवा बहिणीला विजेते घोषित करायचं , हाय काय नाय काय.

प्रश्न पक्षाबाहेरचे कसे पावरफुल आहेत हा नसून गांधी घराण्याचा मुठीतला पक्ष त्यांच्या कुटुंबातील कुणाकडे राहिला पाहिजे हा आहे. त्या तिघांपैकी कोण एवढाच वाद आहे.

महत्वाचे म्हणजे राहुल गांधी ना माहीत आहे त्यांची पक्ष चालविण्याची ताकत नाही , म्हणून ते अध्यक्ष पद घ्यायला तयार नाही हे सर्वांनी गेल्या वर्षीच बघितले !
गेल्या वर्षी महिनाभर रुसून बसले होते , मला अध्यक्ष करू नका म्हणून !
बरं सोनिया गांधींनी या आजारपणात अजुन किती दिवस पक्षाचा भार उचलायचा म्हणून त्या २३ नेत्यांनी नेतृत्व बदला साठी पत्र लिहून पाठवले , तर युवराज ने त्यांची भाजप एजेंट म्हणून इज्जत काढली !
गमंत म्हणजे काँग्रेस मध्ये इतके एजेंट असल्याची भाजपला ला देखील कल्पना नव्हती Happy
हा युवराज पण कधी कधी स्वतःचेच कपडे टरा टर फाडत असतो Happy
पूर्वी म मो सरकार ने गुन्हेगार नेत्यांना निवडणूक बंदीचा आध्यादेश काढला , खर म्हणजे म मो चा उद्देश चांगला होता पण या लहरी युवराज ने सगळ्या मीडिया समोर तो आदेश फाडून वर " ये मै नहीं मानता " अशी मर्दुमकी करून पुन्हा कपडे फाडून घेतले .
स्वाभिमानी असते तर म मो ने त्याच वेळी राजीनामा द्यायला हवा होता , पण पंतप्रधान पदी बसवून त्यांच्यावर केलेले उपकार मुळे गांधी परिवार ची इज्जत वाचली .
एक तर काँग्रेस मध्ये अंतर्गत चर्चा हा प्रकारचं उरलेला नाही आणि पक्ष नेतृत्व बदलण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांना काँग्रेसी मतदारांच्या नजरेत " भाजप एजेंट " बनवून टाकायचे .

नक्कीच. १९८४ च्या दंगलीत मारले गेलेले शीख याची साक्ष देतील .

Proud

गेल्या पंजाब राज्य निवडणुकीत पंजाबी जनतेने भाजपाला लाथ घालून हाकलून काँग्रेसचे सरकार आणले आहे , सन 2019 ,
आणि हे अजून 1984 मध्ये बसलेत, भाजपाला तर विरोधी पक्ष म्हणूनही नाकारले , विरोधी पक्ष आप आहे

नेताजी , टिळक , शास्त्रीच कशाला तानाजी मालुसरे पासून कितीतरी पुण्यात्म्यांचे वारस जिवन्त आहेत , भाजपाने त्यांना तिकिटे द्यावीत

गेल्या पंजाब राज्य निवडणुकीत पंजाबी जनतेने भाजपाला लाथ घालून हाकलून काँग्रेसचे सरकार आणले आहे >>>>>
जरा अभ्यास वाढवा !
कॅप्टन अमिरिंदर सिंह यांनी गांधी कुटुंबाला खास करून युवराज ला प्रचार करण्यासाठी पंजाब मध्ये पाऊल ठेवू दिले नाही आणि एक हाती किल्ला लढविला म्हणून तेथे काँग्रेस आली ......

एक हाती लढो नैतर दोन हाती , काँग्रेसचे सरकार पंजाबात आहे

अमितशाला ऑपरेशन लोचट करायलाही चान्स नाही दिला

पंजाब सिंध गुजरात मराठा .....

म्हणून पंजाबने आधी पंजा मारला

२०१४ च्या अनुभवा नंतर २०१९ च्या निवडणुकीत युवराज च्या सभांना काँग्रेस
चे उमेदवार घाबरत होते मजा त्या वेळी आली !

आणि युवराज म्हणायचे नरेंद्र मोदी मुझसे डरते है Happy

शेवटी स्वतःच घाबरून वायनाड मधून उमेदवारी दाखल केली !
कहर तर तेंव्हा झाला जेंव्हा धार्मिक पार्श्वभूमी किंवा हिंदू धर्माबद्दल कुठलीही आपुलकी नसताना अचानक जानवे घालून मंदिरांना भेटी द्यायला सुर वात केल्या नंतर आपले ढोंग उघडकीस येत आहे याबद्दल ना युवराज ना समजत होत ना , त्यांना कोणी इतर जाणकार नेते सांगत होते .

गणपतीच्या टायमात कशाला काढलात हा धागा. गणपती गेल्यावर बसलो असतो सगळे.>>>
हम राजनीतीमे जलने वालों को
त्यौहार कहा, आराम कहा?

शिवाय सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात राजकीय जनजागृतीसाठीच झाली, तो वारसा चालवायला नको?

का , वायनाड पाकिस्तानात आहे का ?

मोदींनी देखील घाबरून वाराणसीत फॉर्म भरला का ?

आणि त्यांना हिंदू धर्मात यायचे होते तर तुम्ही घ्यायचे होते .

मोदींनी तर बहादूर शहा जफर मोगल ह्यांच्या थडग्याचे दर्शन घेतले होते,

तुम्ही भाजपात माणसे घेता सगळी सेवा करायला आलीत का ? मुळात कोणताही मूळ त्या धर्मातला माणूस त्या त्या देवस्थानात जातो ते परमार्थ मागायला का ? मग राहुल हिंदू देवळात जाऊन पंतप्रधानकी मागत असेल तर हिंदूंच्या पोटात का दुखावे ? तुम्ही सगळे कुठे मोक्ष मागायला देवळात जाता ?

गीतेत भक्तांचे 4 प्रकार दिले आहेत , अर्थी , याचक , जिज्ञासू आणि मुमुक्षु

कुणी 2 रु ची अपेक्षा घेऊन देवळात गेला तरी देवाला तोही प्रियच,

तुमच्या ह्या असल्या उपेक्षेमुळेच तुम्ही 70 % उरला आहात आणि तुमचे लोक मोघल 2 रु देतात , लेपरसी झाली तरी मदर तेरेसा जवळ करते , बुद्ध सगळ्यांना सारखे मानतो , इ कारणे पाहून निघून गेले आहेत आणि अजून काही लोक निधर्मी बनले आहेत

माणूस येतानाच तूम्हि हसणार , मग रोटीबेटी कधी करणार ?

Pages