नवे भारतीय मंत्री मंडळ : कोण? का? कधी पर्यंत?!

Submitted by अश्विनीमामी on 7 July, 2021 - 05:34

आज भारताच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होतो आहे. २०१९ मध्ये कार्य भार संभाळ ल्यावर आज प्रथमच मंत्री मंडळात महत्वाचे बदल होत आहेत. काही मंत्री राजीनामा देउन पाय उतार झाले आहेत . काही नवे चेह रे आले आहेत. शपथ विधी आज सात तारखेला संध्याकाळी आहे.

लेबर मंत्री आरोग्य मंत्री ह्यांनी राजिनामे दिले आहेत.
https://www.ndtv.com/india-news/cabinet-reshuffle-santosh-gangwar-labour...

आपले सिंदिया राणे, देवेंद्र पण चर्चेत आहेत. गडकरी ह्याम्चे खाते राहणार का बदलणार?

त्या बद्दल पक्ष -निरपेक्ष चर्चा करण्या साठी धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केंद्रात आमिष दाखवण्यासारखा एखादा पक्ष उरलाय का? त्यांचे त्यांना लोक टिकवता आले तरी पुष्कळ झाले Proud

आणि राज्यात म्हणाल तर एक मुख्यमंत्रीपद सोडले तर अजुन कुठल्या शिवसेनेच्या मंत्र्याला मानाचे खाते मिळालेय?
शिवसेनेच्या दुप्पट बजेट कॉंग्रेसला आणि चौपट बजेट राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळालेय!!
आणि शिवसेनेच्या निष्ठावंतांच्या मागे चौकशांचा ससेमिरा!!

राजकारण/सत्ताकारण इतके सरळ असते तर मग अजुन काय पाहिजे होते Happy

पुर्वीच्या भाजपमधला एक चांगला गुण म्हणजे घराणेशाही इतर पक्षांपेक्षा कमी होती पण नवीन मालक आल्यापासून त्याने सारे बाहेरचे गबाळ गोळा करायला सुरुवात केली आणि एक जमेची बाजू कमी झाली.
बाकी आठवले साहेबांना दोष देऊ नका. ते अत्यंत सच्छिल गृहस्थ असून फक्त तळागाळातल्या वंचितांना न्याय देण्यासाठी ते तळ्यात-मळ्यात करत असतात. ते या पक्षीय भेदाच्या पलीकडे राजकीय तुर्यावस्थेला पोहोचलेले महामानव आहेत. वंचीतांची उन्नती एवढेच त्यांचे जीवनध्येय असून राजकारणातून समाजकारणाचा मापदंड त्यांनी देशात प्रस्थापित केला आहे.

>>बाकी आठवले साहेबांना दोष देऊ नका. <<

खरय! प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्याकडून काहितरी शिकले पाहिजेल Lol Lol

BJP च्या मनाला एक गोष्ट खूपच लागली आहे.
ती म्हणजे शाह पासून,मोदी साहेब,फडणवीस ह्यांना उल्लू बनवले गेले.
देशाच्या इतिहासात इतकी विनोदी घटना प्रथमच घडली.
राष्ट्रपती राजवट bjp नी काही तासात मागे घेतली.
फडणवीस मंडवल्या बांधून सकाळी पाच सहा वाजताच बोहल्यावर चढले आणि दोन तासात च बायको दुसऱ्या बरोबर पळून गेली.
मोठी फजिती झाली.
न्यूज पेपर वाल्यांना दिवसातून दोनदा आवृत्ती काढावी लागली.

बायको काय म्हणता... नवरा म्हणा. आवडीने केला नवरा अन तो गेला पळून अशी अवस्था झालेल्या बायकोगत फडणवीसाचे तोंड गोरेमोरे झाले होते Biggrin

Meme-maharashtra_1574763866

लय बोलके फोटो.
फडणवीस कावरे बावरे,कासावीस, काळे निळे एकसाथ झाले.

Biggrin Biggrin Biggrin Biggrin

पुढच्या निवडणूकीनंतर ते जेंव्हा सगळ्यांची ठासून येतील तेंव्हा इथल्या सगळ्या कावऱ्याबावऱ्या आयडींकडे बघायला मज्जा येईल Proud

रच्याकने धागालेखिकेला या वरच्या काही पोस्टवर काही आक्षेप दिसत नाही.... का हा वरचा वायफळपणा धाग्याच्या विषयाला धरुन आहे असे त्यांचे म्हणणे आहे?

जर आत्याबाईला मिशा आल्या तर तिला काका म्हणु बरं का..! तोपर्यंत मागून आणलेल्या पिठाची झोळी शिंक्यावर शाबुत ठेवा म्हणजे झालं.. नायतर लाथ बसून पिठात पांढरे व्हाल अन उपाशी रहाल.. Proud

राणे,कृपा शंकर,ह्यांना बरोबर घेवून महाराष्ट्र जिंकणार का?
पेट्रोल भाव शंभरी पार, डाळी,तेल सरळ १००% महाग,गॅस हजार rupya पर्यंत मोदी साहेब घेवून जाणारच,
इतके महान कर्तुत्व असलेले सरकार परत निवडून येईल.?

आत्तापण ठासलीच होती पण महाराष्ट्राला दगाफटका/फंदफितुरी नवीन नाही आणि तशी ती झाली नाहीतर ब्रिगेडी आत्त्याबाईला खरच मिशा आल्या असत्या Proud

ठासल्यामुळे दोन दोन वेळा प्रतिसाद देतंय Biggrin

बर असु दे... हा अमांचा धागा आहे. हे नाव जंतांच्या गुडबुकात असावे असं मला वाटतं. इथे तरी वळवळ करू नका.

इतके महान कर्तुत्व असलेले सरकार परत निवडून येईल.?>> नाही वाटत परत भाजप निवडून येईल. राकाँ+शिवसेना+काँ एकत्र असतील तर भाजपने सत्तेची स्वप्नं न बघितली तर बरे

नवे मंत्री
निशीत प्रामाणिक

व्यवसाय : ब्यांक रॉबरी , सराफा रॉबरी

मोदींचा आशीर्वाद मिळण्यापूर्वी ते 12 वि पास होते , मंत्री झाल्यावर ते कसलीशी डिग्री होल्डर झाले.

https://thewire.in/politics/nisith-pramaniks-educational-qualification-m...

म्हशीला शिंगे फुटतात.
पालीला शेपटी फुटते.
झुरळाला पंख फुटतात.

भाजप्याना डिग्र्या फुटतात.
Proud

He had mentioned 11 criminal cases against him in his 2019 affidavit and 13 cases in a 2021 affidavit, including charges of murder, dacoity, theft, and possession of explosives.

अशा टपोरी आणि माफिया लोकांना हाताशी धरून ठेवावे लागण्याएव्हढी दारुण परिस्थिती झालीय का भाजपची? इतकी असहायता की असल्या लोकांच्या ब्लॅक मेलला शरण जावं लागतंय?

खरोखर!
स्वच्छ चारित्र्याचा टेंभा मिरवणाऱ्या पक्षाची ही अवस्था!

आणि सर्वात वरताण म्हणजे नागपुरी रेशिमबागी सडकी विचारधारा. ह्या अशा कोलांटौड्या खाण्यात त्यांचा हात धरणारे कोणीच नाही. कशी का होईना पण आमचीच लाल.. आमची बघा, फुले वहा अशी मनोवृत्ती..!

हो ना!

Rofl

असला टपोरी माणूस केंद्रिय गृह खात्याचा राज्य मंत्री आहे !
एखाद्या साध्या सरकारी नोकरीसाठी सुद्धा पोलिस व्हेरिफिकेशन पास झाले नसते.

आता आयबी, सीबीआय , एनआयए वगैरे यांना रिपोर्ट करणार !
असली माणसे असल्यावर रामभक्त गोपाल, कोमल शर्मा, कपिर मिश्रा सारखे लोक बाहेर फिरणार व ८४ वर्षाचा म्हातारा जेलमध्ये तडफडून मरण पावणार यात नवल ते काय ?

बाकी काहीही असलं तरी अश्विनी वैष्णव ह्यांची केंद्रीय रेल्वे मंत्री आणि माहिती तंद्रज्ञान पदी निवड झालेली वाचून छान वाटले.
IIT कानपुर मधून M. Tech
नंतर IAS अधिकारी म्हणून कार्यरत.
मग wharton business school मधून MBA
मग बहुतेक स्टार्ट अप.
वाजपेयी च्या मंत्रीमंडळात मंत्री.
मग राज्यसभेवर आणि आत्ता रेल्वे मंत्र्यासारखं मह त्वपूर्ण खात.
ही सबंध कारकीर्द स्तिमीत करून सोडणारी आहे.
फक्त अश्या मंत्र्यांना निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे.
नाहीतर टॅलेंट वेस्ट जाते.

गृहमंत्री पदासाठी कोण पात्र आहे ?
गुन्हे नावावर असलेला भाजप चा राज्यमंत्री निशीत प्रामाणिक जितका निषेधार्ह आहे का त्याच्या पेक्षा मुफ्ती मोहम्मद सैद आहे हे ज्याने त्याने ठरवावे .
1989 मध्ये वी पी सिंग मंत्रिमंडळात भारताचा पहिला मुस्लिम गृहमंत्री होतो काय , झाल्या नंतर आठ दिवसात त्याच्या मुलीला धर्मांध मुस्लिम अतेरिक्यांकडुन पळवून नेले जाते काय , आणि तिच्या बदल्यात पाच अतेरिक्यांना सोडवले जाते काय सगळेच समजण्या पलीकडे होते .
पण त्या घटने नंतर काश्मीर मधील मुस्लिम अतेरिक्यांनी उचल खाल्ली आणि काश्मिरी पंडितांना अत्याचार करून काश्मीर बाहेर हाकलले ........

जे जनतेला पात्र वाटतायत त्यांना जनतेने सत्तेत बसवलय...... बाकी पक्षांध लोकांकडून हे असले वाद कायम घातले जातील..... द्वेषारोप केले जातील...... पण त्याला फारसा काही अर्थ नाही Wink

हं

त्याच व्हीपि सरकारात भाजपेही सामील होते.

काँग्रेसच्या काळातच , इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या , डॉ कलाम राष्ट्रपती होते , तेंव्हा बरं कधी असं झालं नव्हतं , इतरही अनेक मुस्लिम मंत्री होऊन गेलेत.

पंतप्रधान हिंदू , अख्खे मंत्रीमंडल हिंदू , त्यात भाजप सत्तेत पार्टनर , आणि दोषी कोण , एकटा गृहमंत्री , आणि तोही हिंदू असता तर मग नेहरू नैतर अब्दालीवर ढकलून देणार का ?

अख्ख मंत्रीमंडल हिंदू असून एक मुस्लिम मंत्री संभाळता येत नसेल तर खुर्च्या सोडा

थोडंसं अवांतर होईल पण लिहील्याशिवाय राहवत नाही.
रुबिया सईद साठी ५ अतिरेकी सोडल्याचं सांगितलं जातं. पण ते पाच प्रॉमिनंट अतिरेकी असं वाचा.
त्यानंतर गुलाम नबी आझाद आणि इतर काही नेत्यांचे नातेवाईकही सोयिस्कररित्या अश्या प्रकारे किडनॅप झाले होते. प्रत्यक्षात ४४ छोटेमोठे अतिरेकी सोडले गेले होते.

माहितीचा सोर्स : जम्मूतील ड्रायव्हर ज्याच्या श्रीनगर स्थित काश्मिरी पंडीत सासु-सासर्यांना त्या काळात श्रीनगर सोडणे भाग पडले होते.

तसंच रुबिया सईद स्वत: चालत जाऊन अतिरेक्यांच्या गाडीत बसल्याचीही वदंता अजूनही आहेच तिथे.

गुन्हे नावावर असलेला भाजप चा राज्यमंत्री निशीत प्रामाणिक जितका निषेधार्ह आहे का त्याच्या पेक्षा मुफ्ती मोहम्मद सैद आहे हे ज्याने त्याने ठरवावे .
ह्या न्यायाने मग आत्ताचे गृहमंत्री किती निषेधार्ह आहेत? तडीपार होते ना ते? कोणत्या गुन्ह्याखाली माहीत आहे का?
माठ अकार्यक्षम लोक मंत्री म्हणून चालतील पण मुस्लिम नको, असा सूर आहे का?

Pages