नवे भारतीय मंत्री मंडळ : कोण? का? कधी पर्यंत?!

Submitted by अश्विनीमामी on 7 July, 2021 - 05:34

आज भारताच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होतो आहे. २०१९ मध्ये कार्य भार संभाळ ल्यावर आज प्रथमच मंत्री मंडळात महत्वाचे बदल होत आहेत. काही मंत्री राजीनामा देउन पाय उतार झाले आहेत . काही नवे चेह रे आले आहेत. शपथ विधी आज सात तारखेला संध्याकाळी आहे.

लेबर मंत्री आरोग्य मंत्री ह्यांनी राजिनामे दिले आहेत.
https://www.ndtv.com/india-news/cabinet-reshuffle-santosh-gangwar-labour...

आपले सिंदिया राणे, देवेंद्र पण चर्चेत आहेत. गडकरी ह्याम्चे खाते राहणार का बदलणार?

त्या बद्दल पक्ष -निरपेक्ष चर्चा करण्या साठी धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जातीयवाद हा शब्द काहींचा खूप लाडका आहे.पण कोणत्या जाती अजुन जातीय वादाच्या शिकार आहेत हे मात्र कोणी सांगत नाही.
कोणत्या जाती अत्याचार करतात आणि कोणत्या जातीवर अत्याचार करतात हे नेहमीच गुलदस्त्यात ठेवले जाते.

काहीजणांना जातीयवादाच्या पांघरूणाखाली चोरून पुरणपोळी खाताना बोंबलून गुळवणी मागायची दुर्बुद्धी सुचते अन मग अनावधानाने का होईना ज्यात-त्यात आपल्या ज्ञाती शोधत बसण्याचं अविरत काम करत रहावं लागतं Biggrin

श्री राणे ह्यांना सूक्ष्म लहान व मध्यम उद्योगां चे मंत्रालय दिले गेले आहे. रोजगार उभे करण्याचे आव्हान आहे. केले तर बरेच काम अचीव्ह करू शकतात दोन तीन वर्शात. रोजगार ही कळीची समस्या आहे. आधीच लॉकडाउन मुळे उद्योग मंदीचा सामना करत आहेत.

धार्मिक ध्रुवीकर ण करणे ही काळाची गरज नाही आहे.

श्री रावसाहेब दानवे रेल्वे मंत्री झाले आहेत. राज्याने विनंती केल्यास लोकल त्वरित सुरू करण्यात येइल असे म्हटले आहेत.

रेल्वेमंत्र्यांनी शेतकर्‍यांचा शेतीमाल मोठ्या बाजारपेठेत स्वस्तात अन कमी वेळात पोहोच करण्यासाठी "शेतीमित्र दानवा एक्सप्रेस" सुरु करावी जेणेकरून महागाईने पिचलेल्या शेतकरी वर्गाचे अन शहरात रहाणर्‍या मध्यमवर्गाचे आशिर्वाद मिळतील.

ज्यो. शिन्दे ह्यांच्या कडे नागरी उ ड्डाण मंत्रा लय पदभार दिलेला आहे. त्यांच्या बाबांनी पण एकेकाळी हे खाते सांभाळले आहे. ( माधवरा व ओल्ड हार्ट थ्रॉब एकेकाळी पंतप्रधान होउ शकतील अशी दुसरी फळी त्याचे ते आघाडीचे नेते होते. पण अकाली मृत्यू झाला. )

म्हणजे आपले एअर्पोर्ट नामकर ण प्रश्न ह्यांच्या कडे आला?! काय करावे? उरण कर पेटिशन पाठवा.

DJ....... सर, 2+2=4 होत नसेलही राजकारणात. पण, सद्य स्थिती तीच आहे. विरोधी पक्षाचे अस्तित्व कुठे आहे? मागील दोन लोकसभा निवडणुकी प्रमाणे पुढे देखील जर विरोधी पक्ष जर असेच गलितप्राण झालेले असतील तर भाजपला पर्याय कसे उभे करणार?
शिवसेनेने भाजपची साथ सोडण्यामागे देखील सत्ता हेच कारण होते. मी ज्या उरणकर नावाने लिहितो आहे त्या उरण विधानसभा मतदारसंघात भाजपने आपला अपक्ष उमेदवार शिवसेनेविरोधात उभा केला आणि निवडून आणला. असे प्रकार राज्यात बऱ्याच ठिकाणी झालेले दिसतील. त्यामुळे राजकीय युती आघाडी हे फक्त तोंडी बोलायचे शब्द आहेत...!! जर इतकाच आघाडी धर्म, युती धर्म असता तर राष्ट्रवादी काँग्रेसला घेऊन अजित पवार एका रात्रीत भाजपा सोबत सत्तेत गेले नसते. जनता म्हणून आपण तमाशा बघायचा असतो. ज्याची सत्ता येईल तो राजा आणि त्याच न्यायाने हे मंत्रिमंडळ विस्तार घडते. ज्याची निवडून येण्याची क्षमता जास्त, इतर पक्षांना उपद्रव देण्याचे मूल्य जास्त त्यांची निवड सर्वप्रथम. बाकी, पक्ष निष्ठा वैगेरे ना काँग्रेस बघते, ना भाजपा बघते. अहमदनगरचे माजी खासदार कै. दिलीप गांधी यांना डावलून काँग्रेस मधून आलेल्या श्री. विखे यांना त्यांच्या जागी लोकसभेची उमेदवारी दिली जाते. तर चंद्रपूरमध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले श्री. बाळू धानोरकर काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बनतात...!!

म्हणुन पक्ष बदलू डोमकावळ्यांना या निवडणुकीत धडा शिकवण्याचे महान कार्य जनतेने करावे.. अशा लोकांना सतास्थानी बसऊन जनता मुर्ख बनत आहे. जो माणुस ४० वर्षं एका पक्षात होता, त्या पक्षाकडून नगरसेवक, महपौर, आमदार, मुख्यमंत्री झाला अन नंतर पक्षाध्यक्श केलं नाही म्हणुन राम राम करून काँग्रेस मधे गेला अन तिथे ६ वर्षं हुजरेगिरी केली तो माणुस आता स्वाभिमान विकुन भाजपात गेला अन तिथे केंद्रीय मंत्री झाला. अशा माणसाकडून जनतेने काय अपेक्षा करायची..? तो केवळ त्याने जन्माला घातलेले २ बुल्डॉग जनतेच्या उरावर बसवण्याचे काम करेल... त्या २ बुल्डॉग्सना नंतर ४ पिल्ले होऊन तिही जनतेच्या उरावर बसतील. म्हणून वेळीच सावध होऊन अशा बांडगुळांना घरी बसवण्याचे काम जनतेने केले पाहिजे असे मला वाटते भले मग पक्ष कोणताही असो.

जनता म्हणून आपण तमाशा बघायचा असतो. ज्याची सत्ता येईल तो राजा आणि त्याच न्यायाने हे मंत्रिमंडळ विस्तार घडते. ज्याची निवडून येण्याची क्षमता जास्त, इतर पक्षांना उपद्रव देण्याचे मूल्य जास्त त्यांची निवड सर्वप्रथम. बाकी, पक्ष निष्ठा वैगेरे ना काँग्रेस बघते, ना भाजपा बघते.>>बरोबर अनुमोदन.

उरण कर तुमची माहिती तुम्ही न्युज लाँड्री नावा ची साइट आहे तिथे पाठवू शकता. हा पूर्ण पणे सरकारी जाहिरात फ्री प्लॅट्फॉर्म आहे. व तुमची बाजू तिथे निदान दखल तरी घेतली जाइल. चर्चा होईल.

बरोबर आहे.
राणे ना का मंत्रिपद दिले असेल? फक्त शिवसेनेवर खालच्या पातळीवर आरोप करण्याचे बक्षीस म्हणून.
बाकी त्यांच्या कडून कोणतेच चांगले काम होण्याची बिलकुल शक्यता नाही.
कोकणच्या राजाला अजुन कोकणातील रस्ते नीट सुधारता आले नाहीत.
आणि कोकण विकास सोडून फक्त सेने ला शिव्या देणे हेच एकमेव काम ते नित्य नियमाने करत असतात.

निवडणुक विजयासाठी लागणारी "संसाधने" काँग्रेसकडे आहेत का? काँग्रेसचा अध्यक्ष कोण किंवा विरोधी पक्षाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? ह्या गोष्टी निवडणुकीला दोन महिने राहिले असताना करायच्या नसतात...!!

कुणी किती का नाकारेना , ही टिपिकल भाजपीय भाषा आहे ,
लोकशाहीत प्रत्येकाने आपापला खासदार निवडायचा असतो , मग ते मिळून त्यांचा नेता - पंतप्रधान ठरवतात , पंतप्रधानकीचा उमेदवार आधी जाहीर झालाच पाहिजे असा कायदा नाही. निवडणूक लढवायला त्या पक्षाला पक्षाध्यक्ष असला की झाले .

अकेला मोदी क्या करेगा ? मोदींचे सगळे मंत्री दर 2,4 वर्षांनी जातात .नवीन येतात.

इतिहासासोबत नागरीकशास्त्र ऑप्शन्ला टाकणार्‍या शाळा आणि त्यांचे विद्यार्थी यांबद्दल न बोललेलेच बरे.

निवडून येण्याची क्षमता जास्त.

ह्या वाक्याचा आताच अर्थ.
ज्यांच्या कडे काळा पैसा जास्त.
जो गुंडगिरी करण्यात तरबेज.
जीी व्यक्ती कायद्या ला फाट्यावर मारून फक्त गैर धंदे करतो.
अशा व्यक्ती च निवडून जास्त येतात.

Lol

ब्लॅककॅट सर, भाजपाई, भक्त, लिब्रांडू, गुलाम... आदी शब्द बोलल्याशिवाय चर्चा होऊच शकत नाही ना? तुमच्या बोलण्यावरून परिसरातील धनंजय नावाचे गृहस्थ आठवले... ते देखिल सेम असेच कोणताही इतिहास, वर्तमान जाणुन न घेता इतरांना भाजपाई वैगेरे बोलून मोकळे होतात...!!

आपल्यालाच राजकारण कळते, सत्ताकारण कळते असा आव आणून बोलणारे कित्येक आयडी निवडणुकांचा निकाल लागला की सुमडीत गायब होतात..... त्यामुळे पूर्ण बहुमताने सत्तेत असलेल्या पक्षाची उणीदुणी काढणारे पुढच्या निवडणुकांच्या निकालानंतरही असेच काही दिवसासाठी गायब होतील याची पूर्ण खात्री आहे..... तोवर मळमळ बाहेर पडू द्या! Proud

काँग्रेस राष्ट्रवादीने सहकारच्या नावाने लुटले म्हणत रडणार्या भाजपने केंद्रात सहकार मंत्रालय सुरू केले म्हणे

बाबो !!!! आता कसा करावा??
>>>अमा, मला आजिबात सवय नाही हो हे असे दुसर्‍यांनी लिहिलेल्या प्रतिक्रियेत ज्ञाती वगैरे शोधत बसण्याची अन त्यांच्या शारिरीक जडणघडणी शोधुन त्यावर स्वामित्त्व हक्क दाखविण्याची.<<< Lol Lol Lol

ह्यांनी तर गोल पोस्ट्च हलवला इथे! Lol Lol Lol Lol Lol Lol Lol Lol Lol

पूर्ण बहुमताने जि़ंकून काय दिवे लावलेत ? कारभाराचं काय? तिथे बहुमत नाही, डोकं आणि हृदय लागतं. पेट्रोल, बेटी बचाव ची आठवण करून दिली तर गायब झाले.
पूर्ण बहुमतासाठी दुसरीकडून नग उचलून आणले त्याचं सोयर ना सुतक.

आणि किती विधानसभा पूर्ण बहुमताने जिंकल्या?

पाच र < बारा मती>>>>> अहो धीर धरा. दुसर्‍याला खड्ड्यात त्यांनी बर्‍याच वेळा पाडलेय. म्हणून तर ईडीची सूचना यायच्या आधी पळत पळत आधी ईडीच्या हपिसात गेलते. उतावळ्या नवर्‍याने जर हातापाया पडले नसते, तर यांना कोणी विचारले असते ? आता पुरीचा नंबर लावायचा हाय ना ! धाकले पाती इचारतील नाय इचारतील. मागे फाटं फाटं गेलते, म्होरल्या येळेला बाराच्या ठोक्यालाच जाऊनश्यान बसतील अशी भिती हाये त्यांना.

बरं, शालिनी ताईंचा इंटर्व्ह्यु बघीतलात का?

उरणकर, छान लिहीताय तुम्ही. Happy

>>आणि किती विधानसभा पूर्ण बहुमताने जिंकल्या?<<

केंद्र सरकारचा धागा आहे.... त्यावर बोला!
उगीच स्वताला सोयीचे आहे म्हणून विधानसभा घूसडू नका.... उद्या म्हणाल विधानसभेत सर्वात मोठा पक्ष आहे पण आमच्या गावात कुणी विचारत नाही. Proud

Lol

Pages