मांसाहाराचे संस्कार !

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 May, 2021 - 04:49

विषय तसा जुनाच आहे, अँगल मात्र नवा आहे.
एक किस्सा घडला गेल्या आठवड्यात, तो अनुभव चार लोकांशी शेअर करावासा वाटतोय.

मी स्वतः अट्टल मांसाहारी आहे. म्हणजे मांस बघून अगदी तुटून पडतो असे नाही. बेतानेच खातो. पण चांगलेचुंगले मिळाले तर रोज खाऊ शकतो. मांसाहाराबाबत सणवार पाळत नसल्याने वर्षाचे ३६५ दिवस खाऊ शकतो. लीपवर्ष असेल तर ३६६ दिवस खाऊ शकतो.

आपल्याकडे असे कुठल्याही दिवशी मांसमटण खाणारे लोकं तसे कमीच आढळतात. कारण का माहीत नाही पण आपण सणवाराच्या दिवशी, एखाद्या देवाच्या वारी, वा मंदीर, देवघर अश्या पवित्र स्थळी मांसाहाराला अपवित्र ठरवत वर्ज्य केले आहे. काही जण असे ठराविक वार पाळतात तर काही जण मांसाहाराला संपुर्णपणेच टाळतात.

अर्थात देवधर्माबाबत ज्याचे त्याचे विचार, सर्वांच्याच विचाराचा आदर करायला हवा.

जोपर्यंंत मी माझ्या घरात काय खातोय यात दुसरा कोणी हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत तो आपल्या घरात काय खातोय वा काय खात नाही याच्याशी माझेही काही घेणेदेणे नाही.

तसेच जोपर्यंत मी माझे अन्न खात असताना कोणी माझ्या तोंडावर त्या अन्नाला नावे ठेवत नसेल तर त्याचे त्या अन्नाबद्दल काय विचार आहेत याच्याशी मला काही घेणेदेणे नाही.

हेच कोणी हिणवल्यासारखे बोलून दाखवले तर ते खटकते.
पण ते बोलणारे जर एखादी सात वर्षांची मुलगी असेल तर मात्र हसावे की रडावे कळत नाही Happy

तर झाले असे, लेकीची एक मैत्रीण घरी आली होती. सोसायटीतलीच, तिच्याच वयाची. या वयाच्या जवळपास पंचवीस-तीस मित्रमैत्रीणी आहेत लेकीला. आलटून पालटून एका दोघांना पकडून घरात खेळायला घेऊन येतच राहते. नवीन मुलांशी गप्पा मारताना तितकाच आमचाही टाईमपास होतो. त्यांचा अभ्यास कम खेळ चालू होता. मी सुद्धा वर्क फ्रॉम होम करता करता त्यांच्यात सहभागी होत होतो. असे कोणी मित्रमैत्रीण आले की आधी आम्ही लेकीसोबत त्यांनाही बिस्कीट, चॉकलेट वगैरे देतो. आणि मग भाजी-चपाती, पुरी, पराठा असे काहीतरी जेवणाचे खाणार असेल तर ते ही विचारतो, जेणेकरून आपली पोरगीही चार घास जास्त खाईल. तर त्या दिवशी आमच्याकडे मासे होते Happy

जगातले सर्वात तीन सुंदर वास सांगायचे झाल्यास पहिला आईच्या पदराचा, दुसरा पहिल्या पावसानंतर ओल्या मातीचा, आणि तिसरा नव्याकोर्‍या पुस्तकांचा....
पण हेच जर खाद्यपदार्थांबाबत म्हणायचे झाले तर माझ्याबाबत तरी फिशफ्राय, फिशफ्राय आणि फक्त फिशफ्राय !!

म्हणजे मी पोटभर तुडुंब जेवलेलो का असेना, तव्यावर चरचर असा आवाज करत त्या तळलेल्या मच्छीचा वास नाकात शिरला तर पोटात खड्डा पडायलाच हवा.
म्हणजे ते पिक्चरमध्ये एखाद्या कॉमेडी सीनमध्ये तुम्ही पाहिले असेल की हिरो कुठूनतरी बाहेरून पार्टी करून येतो, पण हे बायकोला सांगायला विसरलेला असतो. तिने ईकडे स्वयंपाकाचा घाट घातला असतो. आणि मग तिचा ओरडा खायला लागू नये म्हणून तो भरल्या पोटी पुन्हा जेवतो.
विनोदाचा भाग सोडला तर हे तितकेसे सोपे नाही. पण मी मात्र प्रत्यक्षात असे कित्येकदा आवडीने केले आहे की बाहेरून चुकून खाऊन आलो आणि घरी आल्यावर कळले की आज जेवणात मस्त हलवा-सुरमई-रावस-पापलेट विथ कोलंबीचे सार आहे तर झोपायचा टाईम पुढे ढकलतो आणि पुन्हा दाबून जेवतो. अगदी आईने सांगावे लागते की जपून, आता पुरे, आणि शेवटी बायकोने हाताचा आधार देऊन ऊठवावे लागते ईतके तुडुंब जेवलेलो असतो.

हे सारे सांगायचा हेतू ईतकाच की मत्स्याहाराशी एक वेगळेच भावनिक नाते जुळले आहे. त्यात तो घरचा, आईचा हातचा असणे म्हणजे जगातले सर्वात मोठे सुख आहे. एरव्ही भाजी चपाती बाबत आनंदीआनंद असलेली माझी पोरेही या तळलेल्या माश्यांच्या वासाने टुण्णकन उडी मारून हातात ताटली घेऊन जेवणासाठी रांग लावतात. स्पेशली पोरगा. आणि या बाबतीत तो पक्का तुझ्यावर गेला आहे हे ऐकणेही एक दुसरे सुख असते.

तर बॅक टू किस्सा,
लेकीची मैत्रीण घरी आली. जेवणाची वेळ झाली. मासे तळायला तव्यावर आले. त्या वासाने घरात चैतन्याचे वातावरण पसरले. मुलं डोलायला लागली. तसे त्या मैत्रीणीलाही विचारले, काय ग्ग, फिश खातेस का तू? देऊ का थोडे चपातीसोबत...

तसे ती उडालीच. हा फिशचा वास आहे. सॉरी सॉरी काकी मला या वासानेच ऊलट्या होतात. मला कसेतरीच होतेय. मी जाते आता. नंतर खेळायला येते. आणि चक्क बघणार्‍यालाही कसेतरीच वाटावे अश्या पद्धतीने ती याक्क याक्क करत निघून गेली Happy

म्हणजे थोड्यावेळापूर्वी जेव्हा घरभर माश्यांचा घमघमाट सुटलेला तेव्हा तिच्या हे गावीही नव्हते, ज्याक्षणी तिला हे सांगण्यात आले तसे लगेच सायकोलॉजी आपले काम करून गेली आणि तिला मळमळू लागले, किंबहुना हा वास फिशचा आहे तर आता आपल्याला मळमळले पाहिजे असे अंतर्मनाने तिला सांगितले. कदाचित हे घरूनच तिच्या डोक्यात ठसवले गेले असावे की मासे हे याक्क असतात. त्याच्या वासानेही आपल्याला मळमळायला होते. म्हणून आपण ते खात नाही.
आपण शाकाहारी आहोत, मांसाहार करत नाही तर आपल्या मुलांनीही तो करू नये. घरी तर आपण करून देणारच नाहीत, तर बाहेरही त्यांनी करू नये म्हणून कदाचित हे मनात ठसवले गेले असावे.

अर्थात यातही काही गैर नव्हते. आपल्या मुलांनी आपल्यासारखे शाकाहारी व्हावे असे वाटणे आणि तसे प्रयत्न करणे हे स्वाभाविकच आहे.
पण आता माझ्यासमोर प्रश्न होता की ती मुलगी अशी रिअ‍ॅक्ट करून गेल्यावर मी माझ्या मुलांना तिचे वागणे कसे एक्स्प्लेन करू? कारण मलाही माझ्या मुलांवर मांसाहाराचे संस्कार करायचे होते. तिची एखादी मैत्रीण शुद्ध शाकाहारी आहे आणि मांसाहाराला याक्क करते या प्रभावाखाली उद्या तिने मांसाहाराचा त्याग केला तर ते मलाही नको होते.

ती गेल्यावर मी माझ्या मुलीकडे हलकेच पाहिले, ती कूल होती. तिने कानाजवळ गोलाकार बोट फिरवत मला ईशार्‍यानेच विचारले, ही वेडी आहे का?

मी तिला म्हटले, ईट्स ओके. काही लोकांना नाही आवडत मांसाहार. त्याचा वासही सहन होत नाही. उत्तम उदाहरण म्हणजे लेकीचेच आजोळ. माझ्या बायकोच्या घरचे सारेच शाकाहारी. लग्नाआधी बायको सुद्धा शाकाहारीच होती. पण त्यांनीच बायकोला सांगितले की लग्नानंतर तुला आवडले आणि जमले तर मांसाहार करायला सुरुवात कर. तिने केली आणि आता एक्स्पर्ट झाली. मुलांबाबतही ते आवर्जून सांगतात की आम्ही तर त्यांना आमच्याघरी देऊ शकत नाही, पण तुम्ही जरूर द्या. त्यामुळे लेकीला त्यांचेच उदाहरण देऊन समजावले की या जगात काही लोकं शाकाहारी असतात तर काही मांसाहारी. ज्याची त्याची आवड. यात कोणी चूक वा बरोबर नसते. कोणी योग्य वा अयोग्य नसते. जसे आपल्यातच एका घरातले सारे नॉनवेज खातात आणि एका घरातले वेजच खातात. पण दोन्हीकडची माणसे चांगलीच आहेत ना. तर यात भेद करण्यासारखे काही नसते. कोणाला पिंक कलर आवडतो, तर कोणाला ब्ल्यू कलर आवडतो, ईतके सिंपल आहे हे.

आता हे मुलीच्या मनावर कितपत ठसले याची कल्पना नाही. पण दुसर्‍या दिवशी विचार करून मुलगी मला म्हणाली, पप्पा नॉनवेज खाणारे फार लकी असतात.
मी विचारले, का?
तर म्हणाली, जे वेज खातात ते फक्त वेजच खातात, आणि जे नॉनवेज खातात ते वेज आणि नॉनवेज दोन्ही खाऊ शकतात Happy

म्हटले वाह, मांसाहाराचे संस्कार करायला यापेक्षा छान कारण असू नये Happy

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीज्ञासा
गूगल च्या नादाला न लागता आपल्या अवती भोवती परिसरात काय घडत त्याचे निरीक्षण केले तर खरी परिस्थिती समजते.
गूगल वर जे अहवाल किंवा माहिती असते ती सत्य च असते असे नाही.ठराविक हेतू नी प्रेरित होवून भडक माहिती प्रसारित केली जाते त्याचा रिॲलिटी शी काही संबंध नसतो.
पण नैसर्गिक पद्धती नीच शेती करावी ,शक्त्यतो रासायनिक खते,औषध वापरू नयेत.स्थानिक पातळीवर जे पिकते तेच आहारात असावे हे तुमचे मत अतिशय योग्य आहे.

गाई,म्हैस ह्यांचा आहार काय.
१), गवत
जे जी जामीन शेती करण्यास योग्य नसते अशा ठिकाणी नैसर्गिक रित्या येते.
माळरान,शेताचे बांध,डोंगर,पडीक जमीन.
इथे शेती केली जात नाही.
दुसरे खाद्य.

ज्वारी चे ज्वारी काढून काहीच कामाचे नसलेला बाकी भाग.
मका काढून बाकी काहीच कामाचा नसलेला भाग.
ऊस.
ऊस सोडून त्याची pachat.
इत्यादी.
पोषक आहार गाई आणि म्हैस ह्यांचा.
गहू दळून त्याचे पीठ काढल्या नंतर राहिलेला भुसा तो काही कामाचा नसतो.
भुईमूग पासून तेल काढल्या नंतर biproduct पेंड.
खास जनावर साठी फक्त हत्ती गवत घेतले जाते पण चार ऐकर जामीन असेल तर दहा गुंठे च जामीन त्या साठी वापरली जाते .
ते पण खूप कमी पशू पालक करतात.
६० ते ७०, टक्के शेत जामीन भारतात तर नाही वापरली जात हत्ती गवत पिकवण्यासाठी.
शेळ्या ,मेंढ्या, बकऱ्या ह्यांचे खाद्य काय.
झाडाची कोवळी पान.
बाभाळ किंवा बाकी रानटी झाड दोन वर्षातून एकदा खडसावी लागतात तेव्हाच त्यांची योग्य वाढ होते
तेच ह्यांचे खाद्य आहे.
कोवळे गवत जे ह्यांचे खाद्य .
ते पडीक जमिनी वर येते.
झाडांची फक्त पाने त्यांनी झाडाला काही च नुकसान होत नाही.
भुईमूग चा सुकलेला पाला हे त्यांचे खाद्य
ही रिॲलिटी आहे.
भारता मध्ये तरी खास जनावर पाळण्यासाठी शेत जमीन वापरली जात नाही.
Waste मटेरियल हेच त्यांचे खाद्य असते.
जे युरोपियन लोक बोंब मारत आहेत त्यांच्याच देशात सर्व चुकीची काम होतात.
पण विकावू रिपोर्ट च आधार घेवून गरीब देशांना त्रास दिला जातो.
त्या मधीलच ते आर्टिकल आहे ६०, तर ,७०, टक्के शेत जामीन जनावर जागवण्यासाठी वापरली जाते.

ठिक आहे तुम्हीं मुलीला समजावले पण तरी सुद्धा तुम्हाला मुलांवर मांसाहार चे संस्कार करायचे आहेत म्हणजे नक्की काय करायचे आहे हा प्रश्न अनुत्तरित च आहे. आत्ता ती लहान आहे. तिलाही मांसाहारी खाणे आवडते आहे . ती आवडीने खातेय. पण काही वर्षांनी तीला नॉन व्हेज खाणे सोडावेसे वाटले तरी तुम्ही तिच्यावर नाही तू खाल्लं च पाहिजे अशी जबरदस्ती करणार आहात का?

मलाही हे लॉजिकली पटतेय. म्हणजे जी जनावरे मारून खायची आहेत त्यांच्यासाठी शेतजमीन वाया घालवणे खरेच परवडेल का?

पण काही वर्षांनी तीला नॉन व्हेज खाणे सोडावेसे वाटले तरी तुम्ही तिच्यावर नाही तू खाल्लं च पाहिजे अशी जबरदस्ती करणार आहात का?
>>>>>>
केली तरी ती माझे ऐकणार नाही Happy कारण मीच तिला आतापासून आपले निर्णय आपण घ्यायला सक्षम बनवत आहे.
म्हणजे काय, तर ईथे माझा रुमाल. कदाचित हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. वेगळाच मांडेन.

मांसाहारापुरते सांगायचे झाल्यास माझ्या पोस्टचा मतितार्थ लक्षात घेतला तर हा प्रश्न उदभवतच नाही. शाकाहार असो मांसाहार, हि फक्त आपल्या आवडीनुसार निवडलेली आहारपद्धती आहे. जी ज्याला त्याला स्वतंत्रपणे निवडायचा अधिकार आहे. बहुधा आपली शीर्षकावरून गल्लत झाली आहे. मांसाहाराचे संस्कार असे शीर्षक त्या घटनेला अनुसरून असले तरी ते आहेत आहाराचे संस्कार. शाकाहार मांसाहार या आहारात भेदभाव न करण्याचे संस्कार, शाकाहारी मांसाहारी व्यक्तींमध्ये भेदभाव न करायचे संस्कार. आपल्या आसपासच्या लोकांच्या आहारपद्धतीला नावे न ठेवायचे संस्कार...

मोरोबा, मांस आणि धान्य यातून सारखीच पोषणमूल्यं मिळत नाहीत. त्यामुळे पोर्शन साईझ दहापट कमी होत नाही. सहज गुगल केल्यावर one portion of chicken = 100 gm raw chicken and one portion of rice is 60 to 90 grams of uncooked rice असं मिळालं.>>>
चिकन च्या एका पोर्शन मध्ये ३८ ग्रॅम प्रोटीन्स (प्रथिन) असतात तर राइस च्या एका पोर्शन मध्ये ४ ग्रॅम प्रोटीन्स असतात. साधारण पणें मानवाला रोज ३० ते ४० ग्रॅम प्रोटीन्स लागतात.

मांसाहार आणि शाकाहार हा वाद फक्त एका गोष्टी मुळे होतो ती म्हणजे शाकाहारी लोक मांसाहाराला आणि मांसाहारी लोकांना तुच्छ लेखतात.
ज्याला जे खायचे आहे ते खाऊ द्या की राव.

चिकन च्या एका पोर्शन मध्ये ३८ ग्रॅम प्रोटीन्स (प्रथिन) असतात तर राइस च्या एका पोर्शन मध्ये ४ ग्रॅम प्रोटीन्स असतात. साधारण पणें मानवाला रोज ३० ते ४० ग्रॅम प्रोटीन्स लागतात. >> धन्यवाद! हेच म्हणायचे आहे की दोन्ही पदार्थांमधून वेगवेगळी पोषणमूल्यं मिळतात. आता चिकनमध्ये चोथा (फायबर) आजिबात नसतो याउलट भातात तो असतो (कुठला भात आहे त्यावर प्रमाण बदलेल). आपल्याला सर्व पोषणमूल्यं असलेला आहार खायचा आहे. त्यामुळे हे गृहीतक चुकीचे आहे की मांसाहार केला तर कमी प्रमाणात अन्न पुरेल.

पण नुसता राइस खावून चालत नाही, नुसतं chicken खाल्ले तर सगळे पोषणमूल्ये मिळतात जसे की प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, vitamins. Rice मधून नाही.

नुसते चिकनही खाऊन चालणार नाही कारण त्यातून चोथा मिळत नाही. सर्व पोषणमूल्यं असलेला आहार खायचा असेल तर तो संतुलित हवा.
मोरोबा यांनी चिकन खाल्ले तर ते दसपट कमी लागेल असा विचार मांडला तो तितकासा योग्य नाही हे सांगायचे आहे.
इथे आपण हा मुद्दा घेत नाहीओत पण चिकन तयार करण्यासाठी लागणारे रिसोर्सेस हे तांदळापेक्षा कैक पटीने अधिक असतात.
मी मांसाहाराच्या विरोधात नाही पण आपल्या अन्नाच्या बाबतीत आपण जागरुक असावे असे वाटते.

एकतर मांसाहाराचे संस्कार करायचे आहेत म्हणजे काय करायचे आहे तेच समजलं नाही . मांसाहाराचे संस्कार का करायचे आहेत मुलांवर ? मुलांना ठरवू दे ना त्यांना काय खायच आहे आणि काय खायच नाही ते. लहान पणापासून ज्या घरात मांसाहार केला जातो त्या घरात मुलांना सवयच असते मांसाहार करण्याची . त्यात वेगळे असे संस्कार काय करायचे आहेत ? मुलीच्या ज्या मैत्रिणीच्या घरी फक्त शाकाहारच केला जातो तिची तशी प्रतिक्रिया होणं स्वाभाविक आहे . कारण त्यांच्या घरी मांसाहार केला जात नाही त्यात तुला तुझ्या मुलांना एक्प्लेनेशन देण्याची काय जरुरी? . त्यांच्या घरी नाही खात आपल्या घरी खातात बस . सिम्पल आहे . बर तुझ्या मुलीला खर तर काही सांगण्याचीही किंवा एक्प्लेनेशन देण्याचीही जरुरी पडली नाही . कारण ती गेल्या नंतर तर तुझ्या मुलीने " वेडी आहे का ती ? असे इशारे केलेच आहेत ना ? उलट तुला तुझ्या मुलीवर संस्कार करायला पाहिजेत . ती वेडी नाहीये त्यांच्या घरी नॉन व्हेज खात नाहीत पण आपल्या घरी खातात. आपल्या घरी बनवतात / खातात हे जेव्हा तिला समजलं तेव्हा तिला ते नाही आवडलं नाही. पण म्हणून ती वेडी नाहीये . अस खर तर तुला तुझ्या मुलीला सांगायला पाहिजे होत. हे संस्कार द्यायला पाहिजेत. मांसाहाराचे कसले संस्कार ?>>>>>>> सुजा, ++++++++१११११११११

माझ्याही घरचे लोक ( मी आणी सासुबाई सोडुन ) मांसाहारी आहेत. पण प्राधान्य शाकाहाराला जास्त. जे काही खाल त्याचा अतीरेक करु नका. अती तेथे माती. मग व्हेज असो वा नॉनव्हेज.

जे काही खाल त्याचा अतीरेक करु नका >>>
अगदी बरोबर. काही लोक शाकाहाराचा अतिरेक करतात, जसं की सगळं जेवण, लचं, डिनर शाकाहारी. त्यात निदान ३०-४० टक्के तरी मांसाहार असावा, नाही का?

चिकन तयार करण्यासाठी लागणारे रिसोर्सेस हे तांदळापेक्षा कैक पटीने अधिक असतात.
हे कसे काय? Put it in numbers. म्हणजे भात लागवडीचे क्षेत्र. कोंबडीच्या चाऱ्याचे क्षेत्र वगैरे.

धान्य उत्पादन,भाज्या उत्पादन करताना,जे raw material निर्माण होते तेच जनावरांचे खाद्य असते त्यांच्या साठी वेगळे पीक घेतले जात नाही(अपवाद वगळता), जिज्ञासा जी तर समजून घेत नाहीत .
त्यांचा गूगल नी असा समज करून दिला आहे की जनावर साठी काही तरी वेगळे खाद्य असते आणि त्या साठी खास शेत जामीन ,पाणी वापरले जाते.

झंपू दामले, लागवडीचे क्षेत्र वरती आलेच आहे.
वॉटर फूटप्रिंट विषयी इथे वाचता येईल (वाचायचा कंटाळा आला असेल तर liter per kilogram values for cereals and chicken meat are 1644 and 4325 liters, respectively).
https://waterfootprint.org/en/water-footprint/product-water-footprint/wa...
कार्बन फूटप्रिंट विषयी इथे वाचता येईल (वाचायचा कंटाळा आला असेल car miles equivalent values for rice and chicken are 6 and 16, respectively.)
https://www.greeneatz.com/foods-carbon-footprint.html

>>> सर्वात चांगला मार्ग अन्न उत्पादन de-industrialize, decentralize आणि less automize करणे हे आहे<<<
।यापेक्षा हास्यास्पद स्टेटमेंट कुठले असु शकते.
नेहमी एक बघितलेय, एखादा ग्रूप( जो ठरवतो की मी शाकाहार कसा पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य) असा एकच तीर पकडणार मग जो तो झोडायला लागतो मासांहाराविरुद्ध की बस...
मग नुसते, विगन वगैरेचे दाखले दिले जातात.
मूळात, वर वर साधी वाटणारी गोष्ट, दूध उत्पादन कसे चांगले असे कोणी लिहिले की, बस... समजून जायचे की, जैविक व रासायनिक साखळी समजावून सांगणे कठिण आहे अश्यांना.

असो.
मूळ विषयाकडे वळते,
काय खाणे व ऩ खाणे हा अन्नससंस्कार जे जन्मल्यापासूनच ( आईच्या दूधापासूनच) होतात त्यावरून व तसेच जीन्स सुद्धा भाग आहे.
मूलभूत जनुकं व स्विकारलेले ( झालेले संस्कार) वरून मूल जरी खात असले तरी, मानसिकतेचा भाग आहे. अनुकरणाचा भाग सुद्धा आहे.
उदाहरण आहे, माझ्या आईच्या घरी अगदी आजूबाजूला वा वाडीत( वस्तीत, नात्यात) कोणीही मासांहार करत नसत. पण आईला कमालीचं अंड्याच्या वासाने मळमळते( असं ती म्हणते).
मग कळले की , हे बहुधा बिंबवलेच गेले असावे असा भाग ज्यास्त वाटला जीन्सपेक्षा. कारण तिचे बाबाच नेहमी सांगत की, ते( बाबा त्यांच्या लग्नाच्या आधी मासांहरी होते पण अंड कधीच खायचे नाही) मुंबईत असताना , त्यांचे शेजारी अंडी खाणारे रोज आमलेट खात व तो वास येइ म्हणून मी जागा सोडली. बाबा मग पुर्ण शाकाहरी झाले आईच्या जन्माअधीच. हे बहुधा एकूनच आईने केले असावे कारण, तिच्या कळत्या वयापासून तिने अंड्याचा वास घेतला तरी कुठे व कधी?
तेच माझी मुलगी मटण व मासे आवडीने खायची. अचानक हॉस्टेलला गेल्यावर, तिच्या जैन मैत्रीणीचा ग्र्रूपचा परीणाम का त्यांना त्रास होइल विचाराने, मासांहार सोडून दिला. मी विचारले तर, तिने सांगितले जैन आहार मस्त वाटला मला. तसेही शाकाहारी लोकं एकत्र आले की( त्यात जैन) दुसर्याचा अन्नसवयीचा धिक्कार जरा ज्यास्तच करतात त्यामुळे, त्या दबावाखालीच सोडले असावे असे सिद्ध झाले.
मी काहीच आग्रह न करता , आधी मिळमिळीत ( जैन)स्वयंपाक केला व तिला वाढला. मग गपचुप एकदा मटण केले व बसले तिच्यासमोर तिला न वाढता व विचारता. हळूच तिने विचारले, मला देतेस का?
मग आधी एकदाच( आठवड्यातून) खाईन. अस्स करत , आता तीनदा खाते तिच्याच मर्जीने( तो ग्रूपही सुटला).

त्यामुळे, हा व्यक्ती व्यक्तीवर अवलंबूनच आहे. कधीही मांसाहार न केलेली माझी मैत्रीणीने एकदा अचानक बकाबका चिकन खायला लागलेली... मला ते पाहून कमाल वाटलेली. समोर तिचा वरण-भात असताना. कारण, ते रस्सवाल्रं चिकन पाहून, तिला खावेसे वाटले. उलट हे मला ज्यास्त अचंबित टाकते.

हेमंत, तुमचा फार मोठा गैरसमज आहे की गुरांना चारापाणी करायला काही विशेष रिसोर्सेस लागत नाहीत.
तुमच्यामते पन्नास वर्षांपूर्वी जी लोकसंख्या होती ती तेवढीच आहे का? जर लोकसंख्या वाढली तर त्याच बरोबरीने गुरांची संख्या देखील वाढली असणारच ना? ती वाढलेली गुरं आधी उपलब्ध असलेल्या जमिनीवरच चरताहेत का? नाही, त्यांच्यासाठी आपण जास्तीची जमीन चराऊ कुरणे म्हणून तयार केली? ही जास्तीची जमीन आकाशातून पडली नाही. या जमिनीवर आधी जंगलं होती, इतर प्राणी रहात होते ती तोडली, इतर प्राणी नष्ट केले आणि मग तिथे गुरांना चारायला गवत लावलं. यात पर्यावरणाचा ऱ्हास झाला नाही असं म्हणायचं का?आणि जमिनीवर काय फक्त माणसं आणि गुरंढोरंच राहतात का? बाकी प्राण्यांचे अधिवास देखील जपायला नकोत का?
गुरांना खायला प्यायला वावरायला भरपूर जमीन लागते. मी तरी अजून टोलेजंग इमारतींमध्ये गुरांना माणसांप्रमाणे फ्लॅटमध्ये राहताना पाहिलेले नाही. तुम्ही पाहिले असल्यास जरूर सांगा. गुरांना शेतातील उरलेल्या produce वर आधीही कोणी जगवत नव्हते आणि आताही कोणी जगवत नाहीत. तसे जगवायचे म्हटले तर आत्ता जे पशुधन आहे त्याच्या दहा टक्के पण गायीगुरं जगवता येणार नाहीत.

आणि जमिनीवर काय फक्त माणसं आणि गुरंढोरंच राहतात का? बाकी प्राण्यांचे अधिवास देखील जपायला नकोत का?
गुरांना खायला प्यायला वावरायला भरपूर जमीन लागते. मी तरी अजून टोलेजंग इमारतींमध्ये गुरांना माणसांप्रमाणे फ्लॅटमध्ये राहताना पाहिलेले नाही.

एकूणच इथले प्रतिसाद पाहता माझा असा समज झाला आहे की मनुष्य हा महानालायक माणूस आहे आणि त्याची ह्या ग्रहावर राहायची आजिबात लायकी नाही. तस्मात त्याने ताबडतोब हा ग्रह सोडून दुसरीकडे कुठेतरी वास्तव्य करावे. म्हणजे इथले राहिलेले पशू/पक्षी आणि एकूणच पर्यावरण गुण्या गिविंदाने राहतील.
मनुष्याने जाता जाता त्याची गुरं ढोरं पण घेऊन जावेत. नाहीतर माणूस गेला तरी ते इथेच दिसायचे फिरतानी.

झंपी, शाकाहाराचा कार्बन फूटप्रिंट कमी आहे हे जरी सत्य असलं तरी केवळ त्यापायी सर्वांनी शाकाहारी किंवा व्हिगन व्हावे असे मी कुठेही म्हटलेले नाही. If we are able to grow any food sustainably then it's good food. If we can cut down the long supply chains and grow food locally it'll be more sustainable. यालाच decentralize करणे म्हणतात. यात मला तरी काही हास्यास्पद वाटत नाही. हां हे करणे खूप कठीण आहे हे मला माहीत आहे. आणि एका दिवसात जादूची छडी फिरवल्याप्रमाणे हे बदल होणार नाहीत हेही मला मान्य आहे. पण आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं आणि प्रयत्न केले तर हे साध्य करणे अशक्य नाही असा माझा अजून तरी भाबडा आशावाद आहे.

झंपू दामले, माणसाने ठरवले तर पृथ्वीवरील सर्व जीवांबरोबर आनंदाने आणि गुण्यागोविंदाने राहू शकतो. आपण तसे वागले पाहिजे मात्र!

केली तरी ती माझे ऐकणार नाही कारण मीच तिला आतापासून आपले निर्णय आपण घ्यायला सक्षम बनवत आहे >> मग विषयच संपला ना. मुलं ( आपली मुलं ) जर का त्यांच्या विचार पद्धतीनुसार पुढच्या वयात मांसाहाराचा त्याग करणार असतील तर मी माझ्या मुलावर मांसाहाराचे संस्कार कसे करू? हा प्रश्नच निकालात निघतो . शीर्षक नक्कीच चुकीच आहे . हवं तर आहार पद्धतीचा संस्कार म्हणा ना . पण त्यात पण तुम्हाला मुलांनी कोणाच्याही प्रभावाखाली येऊन मांसाहाराचा त्याग करू नये असं वाटतंय, म्हणजे स्पेसिफिकली आयुष्यभर मुलांनी मांसाहारच करावा अशी तुमची इच्छा दिसते. हा काय प्रकार आहे ते समजलं नाही . दोन्ही आहाराचे फायदे तोटे आहेत. कुठलाही आहार दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ नाहीये . त्यामुळे स्पेसिफिकली तुम्हाला मांसाहाराचेच संस्कार ( ??? ) करायचे आहेत हे जरा अजब वाटत . असो . मला काय म्हणायचे आहे ते तुम्हालाच समजलं असेल

शीर्षक नक्कीच चुकीच आहे . हवं तर आहार पद्धतीचा संस्कार म्हणा ना . पण त्यात पण तुम्हाला मुलांनी कोणाच्याही प्रभावाखाली येऊन मांसाहाराचा त्याग करू नये असं वाटतंय, म्हणजे स्पेसिफिकली आयुष्यभर मुलांनी मांसाहारच करावा अशी तुमची इच्छा दिसते. हा काय प्रकार आहे ते समजलं नाही . दोन्ही आहाराचे फायदे तोटे आहेत. कुठलाही आहार दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ नाहीये . त्यामुळे स्पेसिफिकली तुम्हाला मांसाहाराचेच संस्कार ( ??? ) करायचे आहेत हे जरा अजब वाटत . असो . मला काय म्हणायचे आहे ते तुम्हालाच समजलं असेल
>>>>>
Submitted by सुजा on 4 June, 2021 - 11:32
+1

______________________________________________________
कारण मलाही माझ्या मुलांवर मांसाहाराचे संस्कार करायचे होते. तिची एखादी मैत्रीण शुद्ध शाकाहारी आहे आणि मांसाहाराला याक्क करते या प्रभावाखाली उद्या तिने मांसाहाराचा त्याग केला तर ते मलाही नको होते.
>>>>>>>>>>
तिने मांसाहाराचा त्याग केला तर तुम्हाला का नको आहे?

आपली आवड मुलांवर थोपवणे आणि संस्कार करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

अन्न वाया घालवू नये हे सांगणे म्हणजे संस्कार.

काय खावे काय खावू नये हे सांगणे म्हणजे संस्कार नाहीत.

मला वाटते की इतर कोणी (जे तज्ज्ञ नाहीत असे आणि त्यामुळेच पुरेसे कारण न देता) जर आपण खातो त्या अन्नाला याक् याक् करीत असतील तर त्यांनी तसे करणे चुकीचे आहे आणि त्यांच्या अशा वागण्यामुळे आपण आपला रोजचा आहार सोडून देण्याचे काहीच कारण नाही. आपण दुसऱ्याच्या आहाराला तसे म्हणू नये आणि त्या आहाराचा तिरस्कार अथवा मळमळल्यासारखे करणे मुद्दाम उघड दाखवू नये.
एखाद्याचा आहार मला उलटी येण्याजोगा वाटतो हे दाखवून देणे हा त्या माणसाला हीनत्व देण्याचा प्रकार असून त्याला तो अपमानास्पद आहे. आणि हे पालकांनी मुलांना सांगावे,
हाच संस्कार. बस्स. इतकेच.

@ सुजा, त्यामुळे स्पेसिफिकली तुम्हाला मांसाहाराचेच संस्कार ( ??? ) करायचे आहेत हे जरा अजब वाटत
>>>>>
तुम्ही शीर्षकावर अडकला आहात, धाग्याचा मतितार्थ लक्षात घ्या, मांसाहाराचे संस्कार म्हणतानाच ते आहाराचेच संस्कार आहेत हे मतितार्थ लक्षात घेतल्यावर समजेल.
आता तुम्ही म्हणाल की मग आहाराचे संस्कार का नाही दिले शीर्षक...? जरा विचार केलात तर याचेही उत्तर मिळेल. फोडले तर मजा गेली Happy

@ स्वप्निल,
तिने मांसाहाराचा त्याग केला तर तुम्हाला का नको आहे?
>>>>
अगेन यूह आर नॉट गेटींग मा पॉईंट.
तिच्या कोणी मैत्रीणीने याक्क याक्क केले म्हणून या कारणास्तव मन कलुषित होत तिने मांसाहार सोडलेला मला नकोय.

बाकी याचीच दुसरी बाजू म्हणजे शाकाहारी आईवडीलांना आपल्या मुलांनी मांसाहार केलेला नको असेल तर त्यांना तुम्ही त्याला काय सल्ला द्याल? ऐकण्यास ऊत्सुक Happy

@ हिरा,
एखाद्याचा आहार मला उलटी येण्याजोगा वाटतो हे दाखवून देणे हा त्या माणसाला हीनत्व देण्याचा प्रकार असून त्याला तो अपमानास्पद आहे. आणि हे पालकांनी मुलांना सांगावे. हाच संस्कार
बस्स. इतकेच.
>>>>
एक्झॅक्टली !!!

जोपर्यंंत मी माझ्या घरात काय खातोय यात दुसरा कोणी हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत तो आपल्या घरात काय खातोय वा काय खात नाही याच्याशी माझेही काही घेणेदेणे नाही. >+१
अर्थात देवधर्माबाबत ज्याचे त्याचे विचार, सर्वांच्याच विचाराचा आदर करायला हवा >+१
शाकाहार असो मांसाहार, हि फक्त आपल्या आवडीनुसार निवडलेली आहारपद्धती आहे. जी ज्याला त्याला स्वतंत्रपणे निवडायचा अधिकार आहे >+१
ज्याला जे खायचे आहे ते खाऊ द्या की राव. > +१
एखाद्याचा आहार मला उलटी येण्याजोगा वाटतो हे दाखवून देणे हा त्या माणसाला हीनत्व देण्याचा प्रकार असून त्याला तो अपमानास्पद आहे. आणि हे पालकांनी मुलांना सांगावे >+१

मांसाहार श्रेष्ठ आहे. मी नेहमी तसा झाडपाला खातो(शिजवून हं) पण ओकेजनली नरमांस भक्षण करत असतो. आमच्या कापालिक सम्प्रदायात वर्षातून ठराविक वेळी नरबळी देण्यात येतो तेव्हा आम्ही सर्वजण ते नरमांस प्रसाद म्हणून आवडीने भक्षण करतो. तंगडी कबाब, मेंदुवडे, जठरबिर्याणी हे प्रकार मला फार आवडतात. शिवाय वरती नेहमीचा पर्यावरण मुद्दा आलाच आहे तर दरवेळी जेव्हाजेव्हा एक माणुस आम्ही भुमातेवरून कमी करतो तेव्हातेव्हा त्याचा कार्बनफुटप्रिंट कायमचा सम्पुष्टात येतो. हळूहळू ही आहारपद्धती समाजमान्य पावल्यास पर्यावरण संवर्धनात वेगाने क्रांती होईल.

Pages