मांसाहाराचे संस्कार !

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 May, 2021 - 04:49

विषय तसा जुनाच आहे, अँगल मात्र नवा आहे.
एक किस्सा घडला गेल्या आठवड्यात, तो अनुभव चार लोकांशी शेअर करावासा वाटतोय.

मी स्वतः अट्टल मांसाहारी आहे. म्हणजे मांस बघून अगदी तुटून पडतो असे नाही. बेतानेच खातो. पण चांगलेचुंगले मिळाले तर रोज खाऊ शकतो. मांसाहाराबाबत सणवार पाळत नसल्याने वर्षाचे ३६५ दिवस खाऊ शकतो. लीपवर्ष असेल तर ३६६ दिवस खाऊ शकतो.

आपल्याकडे असे कुठल्याही दिवशी मांसमटण खाणारे लोकं तसे कमीच आढळतात. कारण का माहीत नाही पण आपण सणवाराच्या दिवशी, एखाद्या देवाच्या वारी, वा मंदीर, देवघर अश्या पवित्र स्थळी मांसाहाराला अपवित्र ठरवत वर्ज्य केले आहे. काही जण असे ठराविक वार पाळतात तर काही जण मांसाहाराला संपुर्णपणेच टाळतात.

अर्थात देवधर्माबाबत ज्याचे त्याचे विचार, सर्वांच्याच विचाराचा आदर करायला हवा.

जोपर्यंंत मी माझ्या घरात काय खातोय यात दुसरा कोणी हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत तो आपल्या घरात काय खातोय वा काय खात नाही याच्याशी माझेही काही घेणेदेणे नाही.

तसेच जोपर्यंत मी माझे अन्न खात असताना कोणी माझ्या तोंडावर त्या अन्नाला नावे ठेवत नसेल तर त्याचे त्या अन्नाबद्दल काय विचार आहेत याच्याशी मला काही घेणेदेणे नाही.

हेच कोणी हिणवल्यासारखे बोलून दाखवले तर ते खटकते.
पण ते बोलणारे जर एखादी सात वर्षांची मुलगी असेल तर मात्र हसावे की रडावे कळत नाही Happy

तर झाले असे, लेकीची एक मैत्रीण घरी आली होती. सोसायटीतलीच, तिच्याच वयाची. या वयाच्या जवळपास पंचवीस-तीस मित्रमैत्रीणी आहेत लेकीला. आलटून पालटून एका दोघांना पकडून घरात खेळायला घेऊन येतच राहते. नवीन मुलांशी गप्पा मारताना तितकाच आमचाही टाईमपास होतो. त्यांचा अभ्यास कम खेळ चालू होता. मी सुद्धा वर्क फ्रॉम होम करता करता त्यांच्यात सहभागी होत होतो. असे कोणी मित्रमैत्रीण आले की आधी आम्ही लेकीसोबत त्यांनाही बिस्कीट, चॉकलेट वगैरे देतो. आणि मग भाजी-चपाती, पुरी, पराठा असे काहीतरी जेवणाचे खाणार असेल तर ते ही विचारतो, जेणेकरून आपली पोरगीही चार घास जास्त खाईल. तर त्या दिवशी आमच्याकडे मासे होते Happy

जगातले सर्वात तीन सुंदर वास सांगायचे झाल्यास पहिला आईच्या पदराचा, दुसरा पहिल्या पावसानंतर ओल्या मातीचा, आणि तिसरा नव्याकोर्‍या पुस्तकांचा....
पण हेच जर खाद्यपदार्थांबाबत म्हणायचे झाले तर माझ्याबाबत तरी फिशफ्राय, फिशफ्राय आणि फक्त फिशफ्राय !!

म्हणजे मी पोटभर तुडुंब जेवलेलो का असेना, तव्यावर चरचर असा आवाज करत त्या तळलेल्या मच्छीचा वास नाकात शिरला तर पोटात खड्डा पडायलाच हवा.
म्हणजे ते पिक्चरमध्ये एखाद्या कॉमेडी सीनमध्ये तुम्ही पाहिले असेल की हिरो कुठूनतरी बाहेरून पार्टी करून येतो, पण हे बायकोला सांगायला विसरलेला असतो. तिने ईकडे स्वयंपाकाचा घाट घातला असतो. आणि मग तिचा ओरडा खायला लागू नये म्हणून तो भरल्या पोटी पुन्हा जेवतो.
विनोदाचा भाग सोडला तर हे तितकेसे सोपे नाही. पण मी मात्र प्रत्यक्षात असे कित्येकदा आवडीने केले आहे की बाहेरून चुकून खाऊन आलो आणि घरी आल्यावर कळले की आज जेवणात मस्त हलवा-सुरमई-रावस-पापलेट विथ कोलंबीचे सार आहे तर झोपायचा टाईम पुढे ढकलतो आणि पुन्हा दाबून जेवतो. अगदी आईने सांगावे लागते की जपून, आता पुरे, आणि शेवटी बायकोने हाताचा आधार देऊन ऊठवावे लागते ईतके तुडुंब जेवलेलो असतो.

हे सारे सांगायचा हेतू ईतकाच की मत्स्याहाराशी एक वेगळेच भावनिक नाते जुळले आहे. त्यात तो घरचा, आईचा हातचा असणे म्हणजे जगातले सर्वात मोठे सुख आहे. एरव्ही भाजी चपाती बाबत आनंदीआनंद असलेली माझी पोरेही या तळलेल्या माश्यांच्या वासाने टुण्णकन उडी मारून हातात ताटली घेऊन जेवणासाठी रांग लावतात. स्पेशली पोरगा. आणि या बाबतीत तो पक्का तुझ्यावर गेला आहे हे ऐकणेही एक दुसरे सुख असते.

तर बॅक टू किस्सा,
लेकीची मैत्रीण घरी आली. जेवणाची वेळ झाली. मासे तळायला तव्यावर आले. त्या वासाने घरात चैतन्याचे वातावरण पसरले. मुलं डोलायला लागली. तसे त्या मैत्रीणीलाही विचारले, काय ग्ग, फिश खातेस का तू? देऊ का थोडे चपातीसोबत...

तसे ती उडालीच. हा फिशचा वास आहे. सॉरी सॉरी काकी मला या वासानेच ऊलट्या होतात. मला कसेतरीच होतेय. मी जाते आता. नंतर खेळायला येते. आणि चक्क बघणार्‍यालाही कसेतरीच वाटावे अश्या पद्धतीने ती याक्क याक्क करत निघून गेली Happy

म्हणजे थोड्यावेळापूर्वी जेव्हा घरभर माश्यांचा घमघमाट सुटलेला तेव्हा तिच्या हे गावीही नव्हते, ज्याक्षणी तिला हे सांगण्यात आले तसे लगेच सायकोलॉजी आपले काम करून गेली आणि तिला मळमळू लागले, किंबहुना हा वास फिशचा आहे तर आता आपल्याला मळमळले पाहिजे असे अंतर्मनाने तिला सांगितले. कदाचित हे घरूनच तिच्या डोक्यात ठसवले गेले असावे की मासे हे याक्क असतात. त्याच्या वासानेही आपल्याला मळमळायला होते. म्हणून आपण ते खात नाही.
आपण शाकाहारी आहोत, मांसाहार करत नाही तर आपल्या मुलांनीही तो करू नये. घरी तर आपण करून देणारच नाहीत, तर बाहेरही त्यांनी करू नये म्हणून कदाचित हे मनात ठसवले गेले असावे.

अर्थात यातही काही गैर नव्हते. आपल्या मुलांनी आपल्यासारखे शाकाहारी व्हावे असे वाटणे आणि तसे प्रयत्न करणे हे स्वाभाविकच आहे.
पण आता माझ्यासमोर प्रश्न होता की ती मुलगी अशी रिअ‍ॅक्ट करून गेल्यावर मी माझ्या मुलांना तिचे वागणे कसे एक्स्प्लेन करू? कारण मलाही माझ्या मुलांवर मांसाहाराचे संस्कार करायचे होते. तिची एखादी मैत्रीण शुद्ध शाकाहारी आहे आणि मांसाहाराला याक्क करते या प्रभावाखाली उद्या तिने मांसाहाराचा त्याग केला तर ते मलाही नको होते.

ती गेल्यावर मी माझ्या मुलीकडे हलकेच पाहिले, ती कूल होती. तिने कानाजवळ गोलाकार बोट फिरवत मला ईशार्‍यानेच विचारले, ही वेडी आहे का?

मी तिला म्हटले, ईट्स ओके. काही लोकांना नाही आवडत मांसाहार. त्याचा वासही सहन होत नाही. उत्तम उदाहरण म्हणजे लेकीचेच आजोळ. माझ्या बायकोच्या घरचे सारेच शाकाहारी. लग्नाआधी बायको सुद्धा शाकाहारीच होती. पण त्यांनीच बायकोला सांगितले की लग्नानंतर तुला आवडले आणि जमले तर मांसाहार करायला सुरुवात कर. तिने केली आणि आता एक्स्पर्ट झाली. मुलांबाबतही ते आवर्जून सांगतात की आम्ही तर त्यांना आमच्याघरी देऊ शकत नाही, पण तुम्ही जरूर द्या. त्यामुळे लेकीला त्यांचेच उदाहरण देऊन समजावले की या जगात काही लोकं शाकाहारी असतात तर काही मांसाहारी. ज्याची त्याची आवड. यात कोणी चूक वा बरोबर नसते. कोणी योग्य वा अयोग्य नसते. जसे आपल्यातच एका घरातले सारे नॉनवेज खातात आणि एका घरातले वेजच खातात. पण दोन्हीकडची माणसे चांगलीच आहेत ना. तर यात भेद करण्यासारखे काही नसते. कोणाला पिंक कलर आवडतो, तर कोणाला ब्ल्यू कलर आवडतो, ईतके सिंपल आहे हे.

आता हे मुलीच्या मनावर कितपत ठसले याची कल्पना नाही. पण दुसर्‍या दिवशी विचार करून मुलगी मला म्हणाली, पप्पा नॉनवेज खाणारे फार लकी असतात.
मी विचारले, का?
तर म्हणाली, जे वेज खातात ते फक्त वेजच खातात, आणि जे नॉनवेज खातात ते वेज आणि नॉनवेज दोन्ही खाऊ शकतात Happy

म्हटले वाह, मांसाहाराचे संस्कार करायला यापेक्षा छान कारण असू नये Happy

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यामुळे कश्याचेच जनरलायझेशन नाही करता येणार. केसवाईज ते समजून ऊमजून घ्यायला हवे.

अरे वाह म्हणजे आता समजून उमजून कुटुंबागणिक एक धागा !
की व्यक्ती गणिक!

शाकाहारी अथवा मांसाहारी बनणे हे इंजिनीअरिंग च्या उदाहरणासारखेच आहे. जोपर्यंत एखादी व्यक्ती भूतलावरचा एकूण एक प्राणी मारून पृथ्वी अप्राणी करत नाही तोपर्यंत मला कोणाच्या मांसाहारी असण्यावर आक्षेप नाही

पण मी समोरचा मांसाहार करताना माझ्या डोळ्यांनी पाहू शकत नाही त्यामुळे मी नवऱ्याला सुद्धा माझ्या समोर खाऊ नकोस असं सांगते. माझा मुलगा चिकनला व्याक म्हणाला तरी आम्हाला फरक पडत नाही आणि वाव म्हणाला तरी पडत नाही . पण कोणी उगाच आम्हाला आमचे संस्कार त्यातून दाखवायला आलं तर आम्ही तिघंही मिळून त्याच्यासमोर व्याक व्याक करू आणि मुलालाही शिकवू की तो काका आला की नाक धरून छि चिकन म्हण रे.

असं बोलतोय जसं तुझ्यासमोर कोणी झुरळ वा गांडूळ उचलून खात असेल तरी तू वाह वाह, मला पण ऑफर करा की असं च म्हणणारेस

@ हेमंत
कट्टर शाकाहारी असलेल्या घरात कट्टर मांसाहार करणारी मुल असतात.
>>>>
मांसाहार करणारया कुटुंबातही शाकाहारी असतात.
मला कौतुक आहे त्या आईवडीलांचे जे मुलांना आहार स्वातंत्र्य देतात Happy

.

आई वडील शिकवतात तेच मुल शिकतात हे पहिले डोक्यातून काढून टाका.
>>>>>>
हो समाजही शिकवतो, पण म्हणून आईवडीलांना आपली मते लादण्यात काही गैर नाही हे लॉजिक अनाकलनीय आहे Happy

मांसाहारी संस्कारात, शाकाहार हा जास्त सस्टेनेबल, कार्बन फुटप्रिंट कमी असलेला आहे. मांसाहार हा ग्लोबल वॉर्मिग जास्त वाढवतो हे शिकवता का त्यात सोयीस्कर पळवाटा काढून बोलणे टाळता?
>>>>

मला स्वत:ला याबद्दल फारसे माहीत नाही. एखादा धागा काढून यावर सविस्तर माहिती दिलीत. लोकांच्या चर्चेत ती मान्य झाली तर जरूर सांगू हे मुलांना.
तुर्तास मुलीला ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण, वीज बचत, झाडे लावणे, अन्नाची नासाडी करू नये, आपल्याला जे मिळालेय त्याचा माज करू नये हे रस्त्यावर राहणारी कमनशिबी मुले दाखवून समजावणे हे सारे करतो. काही गोष्टी तिला समजतात, काही पटतात, काही आचरणात आणते तर काही नाही जमत आणायला... शेवटी प्रत्येकाचा एक स्वभाव, एक आवड असतेच.

अरे वाह म्हणजे आता समजून उमजून कुटुंबागणिक एक धागा !
की व्यक्ती गणिक!
>>>>

अहो हर्पेन काय असे प्रतिसाद देत आहात आज..
केसगणिक म्हणजे कुठला विषय आहे त्यानुसार....

माझा मुलगा चिकनला व्याक म्हणाला तरी आम्हाला फरक पडत नाही आणि वाव म्हणाला तरी पडत नाही .
>>>>

मी लहानपणी नावडत्या भाज्यांना व्याक करायचो. पाठीत धपाटा पडायचा. अर्थात कारण ते घरच्यांचेही अन्न होते म्हणून हे असेल. एखाद्या शाकाहारी कुटुंबात मुलांनी चिकनला व्याक करण्यात त्यांना वावगे वाटत नसावे. स्वाभाविक आहे हे. पण तुला माझा मुद्दा समजला नाही.

मुलांनी चिकनला स्वताहून व्याक करणे आणि त्यांना चिकन हे व्याक व्याक असते हे सांगणे यात फरक आहे. असे सांगताना आपण कोणाच्या अन्नाचा अपमान करत आहोत वगैरे हे आलेच. पण ते ठिक आहे. कोणी मांसाहाराला अन्नच समजत नसेल तर ईटस ओके. पण त्यासोबत आपण मांसाहार करणारयांचा एक समूह बनवून तो हलका असतो असे मुलांना सांगण्यासारखे झाले हे. हा एक आहारावरून केलेला भेद झाला. जातीयवादासारखेच आहे हे.
जर आपण मांसाहार करत नसू आणि मुलांनी मांसाहार करू नये असे वाटत असेल तर त्यांना त्यामागची आपली कारणे, आपला दृष्टीकोण त्यांना पटवून सांगावा. एवढे सिंपल आहे हे.

मी आजपर्यंत जे जे प्राणी खाल्लेत ते सगळे माझ्या स्वप्नात येतात आणि आम्हाला का खाल्लंस विचारतात. बोकड, कोंबडी, सुरमई हे सगळ्यात पुढे असतात. त्यांच्या हातात धारधार सुरे असतात. सुरमई हवेत उडत असते. त्यांना सगळ्यांना माझ्याकडे येताना पाहून मी पण जोशात येतो आणि तलवार घेऊन त्यांना परत एकदा कापायला सुरवात करतो पण ते संख्येने खूपच जास्त असतात त्यामुळे मी पळत सुटतो. त्या सगळ्या प्राण्यांची फौज माझा पाठलाग करते. सगळ्यात जोरात बोकड पळत असतो. त्याच्या हातात धारधार सुरा असतो आणि बोलतो पळून पळून किती पळशील. तुला पकडून तुझे छोटे छोटे तुकडे करणार आणि त्याची रेसिपी मायबोलीवर टाकणार. कोंबडी बोलते तुझे लॉलीपॉप करणार, सुरमई बोलते तुझ्या बोट्या करणार अर्ध्या तळणार आणि अर्ध्या फ्राय करणार. अजून कोणी काय काय बोलत असत ते ऐकून मी जोरात पळतो. कोणीतरी मला पकडतं तेव्हा मला जाग येते. डोळे उघडतो तर मी घरापासून तीन चार किलोमीटर लांब आलेला असतो. म्हणजे मी खरोखरच पळत असतो. मला पळताना पाहून घरचे, शेजारी मला पकडायला धावतात आणि तीन चार किलोमीटर धावल्यावर मी त्यांना भेटतो. आणि मग आम्ही सगळे चालत घरी येतो. मधेच सरबत, नारळ पाणी पितो.

ऋनमेश.
वर कोणी तरी लिहल आहे त्या नुसार.
तुम्ही पक्के मांसाहारी आहात पण तुमच्या समोर कोण गांडूळ किंवा झुरळ किंवा उंदीर खात असेल तर तुम्ही ते आवडीने बघाल का.
किळस न व्यक्त करता.
ह्याच्या पुढे जावून असे विचारेन तुम्ही ते उंदीर,झुरळ,गांडूळ चे पदार्थ प्रसन्न चित्ता नी मिटक्या मारत खाल का?
ह्याचे उत्तर नाही असेल तर का नाही खाणार.
तुम्ही मांसाहारी आहात ना.

@ हेमंत,
तुम्ही पक्के मांसाहारी आहात पण तुमच्या समोर कोण गांडूळ किंवा झुरळ किंवा उंदीर खात असेल तर तुम्ही ते आवडीने बघाल का.
>>>
आवडीने बघायचा हट्ट का?
नुसते बघितले तर नाही का चालणार?
किंवा ते न बघवल्यास याक्क वॅक्क न करता शांतपणे तिथून निघून गेलेले नाही चालणार का?
अपेक्षा ईतकीच आहे Happy
..

ह्याच्या पुढे जावून असे विचारेन तुम्ही ते उंदीर,झुरळ,गांडूळ चे पदार्थ प्रसन्न चित्ता नी मिटक्या मारत खाल का?
ह्याचे उत्तर नाही असेल तर का नाही खाणार.
तुम्ही मांसाहारी आहात ना.
>>>>
पुन्हा तोच प्रश्न, मी मांसाहारी आहे, मटण खातो, पण वजरी नाही खात. मत्साहारी आहे, मासे खातो, खेकडे खातो, पण बोंबील नाही खात. शिंपले नाही खात.
मांसाहारी आहे तर हे काहीही खातात वा खाऊ शकतात असा हा गैरसमज एक फार आढळतो. तसे मांसाहारी लोकांच्या ठायी भूतदया नसते हा असाच अजून एक दुसरा गैरसमज. याला कारण म्हणजे मांसाहाराचे योग्य संस्कार होत नाहीत.

असो, तरी तुमच्या प्रश्नावरून एक गंमत आठवली.
घरात जेव्हा एखादा किडा उडत येतो तेव्हा मी तो कागदात धरतो आणि टाकायच्या आधी खाल्याची अ‍ॅक्टींग करतो. मुले ई ई करतात. मग त्यांना सांगतो की जगात किटक खाणारे लोकं सुद्धा आहेत. पण ती लोकं घाण आहेत म्हणून काहीही खातात असे बिलकुल सांगत नाही. एखाद्या सापाला ऊंदीर गिळताना पाहिला तर आपल्याला शिसारी येत नाही कारण ते मनाने अ‍ॅक्सेप्ट केले आहे की सापाचे ते खाद्य आहे. आपल्यासारख्याच माणसाने ऊंदीर गिळताना बघून शिसारी येऊ शकते कारण ते मनाने अ‍ॅक्सेप्ट केले नाहीये. पण ज्या प्रदेशात हे घडते तिथल्या कोणाला ती येऊ नये, भले मग एखादा न खाणारा का असेना, त्याच्या आसपास बघण्यात आल्याने त्याच्या मनाने ते अ‍ॅक्सेप्ट केले असेल.

आता ऊंदीर गिळणारी माणसे आपल्या आसपास नाहीयेत. जर कधीतरी अचानक बघणे झाले तर किळस वाटू शकते. पण मांसाहार करणारी लाखो जनता आसपास आहेच ना. मग मनाला ते अ‍ॅक्सेप्ट का करता येऊ नये? कारण मांसाहाराचे चुकीचे संस्कार..

हे आठवले, आणि दुनिया गोल आहे आणि मधोमध एक होल आहे याची प्रचिती आली Happy
बदला>>>

इतके छान लिहिता तुम्ही. मग आजकाल काही सकस का लिहित नाही?. (कुठे गेला तो अभिषेक तुमचा????)

धागा काढून मान्य झाली असल्या काही तरी अटी घालणार आणि मुलांना मांसाहाराने कार्बन फूट प्रिंट वाढते हे सांगणार नाही याची कल्पना होती. पण ती fact आहे.
फक्त अमेरिका दरवर्षी ३२ मिलियन गायी गुरे ( दररोज सुमारे १ लाख), ९ बिलियन कोंबड्या (रोज अडीच कोटी), २४१ मिलियन टर्की (रोज ६.५ लाख), १२१ मिलियन डुक्करे ( रोज ३.३ लाख), २.२ मिलियन बकऱ्या (६००० रोज) इतकी कत्तल करते. हा डेटा २०१७ चा आहे आणि अजून १९४ देश बाकी आहेत.
दररोज इतकी कत्तल तर पशुधन किती असेल, आणि दूध देणाऱ्या गायी तर अजून मोजल्याच नाहीयेत. त्यांना जगवायाला लागणारा चारा पाणी .... असो. संस्कार करायचे तर अंध नको ही सक्ती अर्थातच नाही.
आता आमचा मांसाहार म्हणजे फक्त मासे अशी सोयीस्कर व्याख्या करून, अमेरिका शमेरिका ठीक आहे आपल्या देशाचं काय... असं म्हणुन कोंबड्यांच्या खुराड्यात जायला रस्ता मोकळा आहे.

मुलांना मांसाहाराने कार्बन फूट प्रिंट वाढते हे सांगणार नाही याची कल्पना होती.
>>>>
का नाही सांगणार, तुम्ही माहीती द्या. जरूर सांगतो. मला खरेच कल्पना नाहीये मांसाहार आणि कार्बन फूट प्रिंट वगैरेची. मायबोलीवर या संदर्भात स्वतंत्र धागा असेल, चर्चा झाली असेल तर प्लीज लिंक द्या. नसेल तर धागा काढूया.
मुलांना एसीचे दुष्परीणामही सांगितले आहेतच. गाडीचे पेट्रोल जाळले जाते, त्याने प्रदूषण होते, त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट कसे बेस्ट आहे हे सुद्धा सांगितले आहे. फटाक्यांचे प्रदूषण सांगितले आहे. घरातली वीज कमी जाळली जाणे नुसते पैश्याच्याच नाही तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही कसे गरजेचे आहे हे सांगितले आहे. मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परीणाम सांगितले आहेत. मुळात आपली सारीच लाईफस्टाईल पर्यावरणाला मारक आहे. हे सारेच बंद करा असे मुलांना सांगितले तर ते घर सोडून पळून जातील. पण तरीही जी गोष्ट जितकी कंट्रोल करता येईल तितकी कंट्रोल करावी हे नेहमीच मुलांना सांगत आलोय.

आता आमचा मांसाहार म्हणजे फक्त मासे अशी सोयीस्कर व्याख्या करून>>>> हे असे का म्हणालात ते सुद्धा सांगा. म्हणजे मत्स्याहाराने कार्बन फूटप्रिंट जास्त वाढत नाही असे आहे का ते सांगा. तसेही आम्ही मासेप्रेमीच आहोत. प्रामुख्याने मासेच जास्त खातो. किंबहुना मुले तर अजून फक्त मासेच खातात. त्यामुळे हल्ली घरी मासेच बनतात. ते प्रमाण मग आणखी वाढवून चिकनमटण प्रमाण अगदीच नगण्य करून कार्बनफूटप्रिंट कमी करायला मदत होत असेल तर ते ही शक्य आहे.

धन्यवाद.
तुम्ही पटेल त्या ठिकाणाहून माहिती गोळा करून मुलांना सांगा. त्यांना जाणीव असलेली पुरे आहे. म्हणजे मांसाहार बंद करा असं अजिबात नाही. जे आहे ते असं आहे. प्रदूषण आहे म्हणून वाहने बंद करत नाही. आणि हो, माशांचं फुटप्रिंट कमी असतं.

झुरळ ,गांडूळ ह्यांचे कार्बन फूट प्रिंट खूपच कमी असते त्या मुळे त्यांना आहारात अग्रक्रम द्यायला सुद्धा सांगितले पाहिजे.
ऋनमेश. ह्या कामी जनजागृती करा .गांडूळ,झुरळ खाणाऱ्या लोकांची संख्या वाढवून पर्यावरण ला हातभार लावा.
कार्बन फूट प्रिंट वाढत म्हणून कोणी मांस खाणे सोडणार नाही.
पर्याय शोधला जाईल.
कृत्रिम मांस ची जाहिरात करण्यासाठी हाच पॉइंट वापरला जातो.
पण नशीब फुटके आहे त्या कृत्रिम मांस वाल्याचे .
कारण कृत्रिम मांस निर्मितीत नैसर्गीक मांस निर्मिती पेक्षा जास्त प्रदूषण होते असे निष्कर्ष आहेत.
भारताचा विचार केला तर गाई ,म्हैसी साठी वेगळे जमीन वापरली जात नाही. ऊस,ज्वारी,मका,भुईमूग ह्यांचाचा खाद्य म्हणून वापर होतो.
प्राणी धन कमी झाले की जमीन मोकळी होईल असे इथे पण लिहणारे आहेत त्यांचा स्वतःचा भारता विषयी काहीच अभ्यास नसणार.
किंवा गोरे म्हणतात म्हणून त्यांच्या हा मध्ये हा मिळवायची गुलामगिरी रकतात पूर्ण भिनलेली असणार.
तज्ञानी काही ही म्हणू ध्या सत्य आहे की असत्या आहे. ह्याचा विचार स्वतःच्या बुध्दी नी केला पाहिजे.
स्वतःला विकून घेतलेले संशोधक,तज्ञ ह्यांची बिलकुल कमी नाही आता

एकतर मांसाहाराचे संस्कार करायचे आहेत म्हणजे काय करायचे आहे तेच समजलं नाही . मांसाहाराचे संस्कार का करायचे आहेत मुलांवर ? मुलांना ठरवू दे ना त्यांना काय खायच आहे आणि काय खायच नाही ते. लहान पणापासून ज्या घरात मांसाहार केला जातो त्या घरात मुलांना सवयच असते मांसाहार करण्याची . त्यात वेगळे असे संस्कार काय करायचे आहेत ? मुलीच्या ज्या मैत्रिणीच्या घरी फक्त शाकाहारच केला जातो तिची तशी प्रतिक्रिया होणं स्वाभाविक आहे . कारण त्यांच्या घरी मांसाहार केला जात नाही त्यात तुला तुझ्या मुलांना एक्प्लेनेशन देण्याची काय जरुरी? . त्यांच्या घरी नाही खात आपल्या घरी खातात बस . सिम्पल आहे . बर तुझ्या मुलीला खर तर काही सांगण्याचीही किंवा एक्प्लेनेशन देण्याचीही जरुरी पडली नाही . कारण ती गेल्या नंतर तर तुझ्या मुलीने " वेडी आहे का ती ? असे इशारे केलेच आहेत ना ? उलट तुला तुझ्या मुलीवर संस्कार करायला पाहिजेत . ती वेडी नाहीये त्यांच्या घरी नॉन व्हेज खात नाहीत पण आपल्या घरी खातात. आपल्या घरी बनवतात / खातात हे जेव्हा तिला समजलं तेव्हा तिला ते नाही आवडलं नाही. पण म्हणून ती वेडी नाहीये . अस खर तर तुला तुझ्या मुलीला सांगायला पाहिजे होत. हे संस्कार द्यायला पाहिजेत. मांसाहाराचे कसले संस्कार ?

अनिल अवचटांच्या पुस्तकात वाचलेला एक प्रसंग आठवतो . पुस्तक वाचून पण बरीच वर्ष झाली आहेत पण हा एक प्रसंग ठळकपणे आठवतोय . ते मला वाटत नॉन व्हेज खाणारे आहेत . पण एकदा त्यांची मुलगी मुक्ता का यशोदा ( नक्की आठवत नाही ) लहान असताना तिने रस्त्यावर कोंबड्याना घेऊन जाणारी गाडी बघितली . त्यात कोंबड्या कलकलाट होत्या तिने बाबाना विचारल" या कोंबड्याना कुठे घेऊन जात आहेत? . तेव्हा अवचट यांनी सांगितलं . मारायला . मारायला म्हणजे ? कापायला . मग तिचे प्रश्न सुरु झाले . म्हणजे आता या ज्या कोंबड्या मस्त चिवचिवत आहेत . त्यांना कापणार ? वडिलांच उत्तर हो . पण का ? त्यांना "मारून" माणसं खातात म्हणून वडिलांचं उत्तर . त्यावर त्यांची मुलगी जोरजोरात रडायला लागली. नाही मारायच आपण कोंबड्याना मारून नाही खायचं . तेव्हा ती खूप लहान होती . तिच एवढ खूप सार हमसून हमसून रडणं बघून अवचट विचारात पडले . अरे आपण वागतोय हे बरोबर आहे का ?

ऋन्मेष,तळलेले बोंबिल आणि तिसऱ्याचे दबदबीत फार सुरेख लागते.
तळलेले बोंबिल हॉटेलमध्ये ट्राय न करता घरी केलेले खा.

भारताचा विचार केला तर गाई ,म्हैसी साठी वेगळे जमीन वापरली जात नाही. >> घराच्या गच्चीवर बांधता का गायी म्हशी?

अमितव, +१
मूळ प्रश्न कोणता आहार योग्य असा आहे. आणि त्याचं उत्तर ज्या आहारातून उत्तम पोषण होते आणि जो चांगल्या शाश्वत प्रकारे तयार होतो असा आहार.
आता असा आहार सगळीकडे आणि सर्वांसाठी सारखा असणार नाही. तो वयानुसार, भौगोलिक प्रदेशानुसार, ऋतूनुसार बदलत राहणार. यात आजच्या काळात अजून एक मुद्दा जोडला जातो तो म्हणजे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा. यात माझ्यामते प्रत्यक्ष आहारापेक्षा त्याच्या निर्मितीसाठी वापरली जाणारी पद्धत हिचा मोठा वाटा आहे. आज आपली शेती, दूध उत्पादन, इतर प्राणी पालन, मत्स्यव्यवसाय या साऱ्या गोष्टी industrial scale वर होत आहेत. त्यामुळे हा विचार करणे भाग आहे की मग त्यातल्यात्यात काय बरे?
माशांचा कार्बन फूटप्रिंट कमी असला तरी समुद्रात सध्या चालणारी मासेमारीची पद्धत अत्यंत विघातक आहे. मोठमोठय़ा ट्रॉलर्सने समुद्राचा तळ खरवडून काढत मासे गोळा केले जातात. त्यात अनेक समुद्री जीव हकनाक बळी पडतात. तिथल्या परिसंस्थेची वाट लागते. शिवाय समुद्रातली सर्व घातक रसायनं माशांमध्ये आलेली असतातच.
गोड्या पाण्यातील मत्स्यशेती, दूध व्यवसाय, आणि इतर पशूपालन व्यवसाय (पोल्ट्री, शेळ्या) यात आजकाल अनेक औषधे आणि हॉर्मोन्सचा सर्रास वापर केला जातो. ही सर्व रसायने त्या प्राण्याला खाल्ल्याने आपल्या शरीरात जातात. हे आपण रसायने फवारलेल्या भाज्या किंवा फळे खातो तेव्हा देखील होतेच. पण मांसाहारी आणि दुग्धाहारी लोक हे अन्न साखळीमध्ये एक पायरी पुढे असतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात जाणारे प्रदूषकांचे प्रमाण दहा पटीने जास्त असू शकते. याला biomagnification असे म्हणतात.
त्यामुळे आपण जो आहार घेतो आहोत तो जर पर्यावरणाला घातक असेल तर तो आपल्याला देखील घातकच असेल असे म्हणता येईल. उदाहरणार्थ, एखाद्याने आपल्या घराच्या आवारात देशी कोंबड्या पाळल्या आणि त्यापासून अंडी वा चिकन खाल्ले किंवा शेततळ्यांमध्ये किंवा भातखाचरांमध्ये तयार झालेले देशी जातींचे मासे वा खेकडे खाल्ले तर ते घातक नाही. पण व्हिगन आहारासाठी म्हणून चिले देशांतल्या किंवा कॅलिफोर्नियामधल्या पाण्याचा अति उपसा करून आणि तिथून हजारो मैलांचा कॉल्ड स्टोअरेज मधला प्रवास करून आलेले अव्हकॅडो हे पर्यावरणाला घातकच आहे - कितीही शाकाहारी अथवा व्हिगन असले तरी. याच जोडीला मग ब्राझिलमध्ये उगवलेला मका किंवा सोयाबीन खायला घालून वाढवलेल्या गायीचे अथवा डुकराचे मांस देखील घातकच. ते जरा जास्तच घातक कारण आपण थेट मका किंवा सोयाबीन न खाता मांस खातो म्हणजे फूडचेनमध्ये एक पायरी जास्त पुढे जातो त्यामुळे कार्बन फूटप्रिंट जास्त वाढतो.
आता याचं एक उत्तर मांसाहार कमी करणं हे आहे पण ते सर्वात चांगलं उत्तर नाही. सर्वात चांगला मार्ग अन्न उत्पादन de-industrialize, decentralize आणि less automize करणे हे आहे.

@ सुजा,

तुमची पोस्ट ज्यात तुम्ही लिहिलेय की मी असे करायला हवे होते.
<<<<<<<
उलट तुला तुझ्या मुलीवर संस्कार करायला पाहिजेत . ती वेडी नाहीये त्यांच्या घरी नॉन व्हेज खात नाहीत पण आपल्या घरी खातात. आपल्या घरी बनवतात / खातात हे जेव्हा तिला समजलं तेव्हा तिला ते नाही आवडलं नाही. पण म्हणून ती वेडी नाहीये . अस खर तर तुला तुझ्या मुलीला सांगायला पाहिजे होत. हे संस्कार द्यायला पाहिजेत.
>>>>>>>

आणि खालचा लेखातील ऊतारा जो मी मुलीला समजावले,
>>>>>>>
मी तिला म्हटले, ईट्स ओके. काही लोकांना नाही आवडत मांसाहार. त्याचा वासही सहन होत नाही. उत्तम उदाहरण म्हणजे लेकीचेच आजोळ. माझ्या बायकोच्या घरचे सारेच शाकाहारी. लग्नाआधी बायको सुद्धा शाकाहारीच होती. पण त्यांनीच बायकोला सांगितले की लग्नानंतर तुला आवडले आणि जमले तर मांसाहार करायला सुरुवात कर. तिने केली आणि आता एक्स्पर्ट झाली. मुलांबाबतही ते आवर्जून सांगतात की आम्ही तर त्यांना आमच्याघरी देऊ शकत नाही, पण तुम्ही जरूर द्या. त्यामुळे लेकीला त्यांचेच उदाहरण देऊन समजावले की या जगात काही लोकं शाकाहारी असतात तर काही मांसाहारी. ज्याची त्याची आवड. यात कोणी चूक वा बरोबर नसते. कोणी योग्य वा अयोग्य नसते. जसे आपल्यातच एका घरातले सारे नॉनवेज खातात आणि एका घरातले वेजच खातात. पण दोन्हीकडची माणसे चांगलीच आहेत ना. तर यात भेद करण्यासारखे काही नसते. कोणाला पिंक कलर आवडतो, तर कोणाला ब्ल्यू कलर आवडतो, ईतके सिंपल आहे हे.
>>>>>>>>

दोन्ही एकच आहे ना? काही चुकीचे समजावले का मी तिला?
बोल्ड केलेय ते वेगळ्या पोस्ट एकात एक होऊ नये म्हणून सुटसुटीतपणासाठी, काही जाब विचारल्यासारखा टोन नाहीये त्यात Happy
अजून चांगल्या प्रकारे हे समजावता येत असेल तर त्या सल्यांचे स्वागतच आहे Happy

राहिला प्रश्न माझ्या मुलीच्या रिअ‍ॅक्शनचा, तर तो यासाठीच होता की ती जे मासे खाणार आहे त्याला तिची मैत्रीण काहीतरी घाण पदार्थ असल्यासारखे याक्क याक्क करून गेली तर तिचे मन त्या खाद्यपदार्थाबाबत कलुषित तर होणार नाही ना असे पटकन मनात आले. मी दुनिया बघितली आहे, तिच्यासाठी ती रिअ‍ॅक्शन पहिला अनुभव होता.

@ जिज्ञासा, छान पोस्ट. ईतर अवांतर प्रतिसादात वाहून न जाता जास्तीत जास्त लोकांनी वाचावी.

@ हेमंत, कृत्रिम मांस, याबद्दल मला काही माहीत नव्हते. कधी ऐकलेही असेल तर सिरीअसली घेतले नसेल.

@ देवकी, घरचे खातात आवडीने, पण मला नाही आवडत. तिसर्‍या नावालाच खातो, आणि बोंबील अगदीच कडक फ्राय केले असतील तर थोडेसे. पण सुके बोंबील मात्र जीव की प्रांण. थोडक्यात मला बुळबुळीतपणा जास्त आवडत नाही. हेच वांगे आणि भेंड्याच्या भाजीलाही लागू Happy

सर्वात चांगला मार्ग अन्न उत्पादन de-industrialize, decentralize आणि less automize करणे हे आहे. >> ही गोष्ट आपल्या पूर्णपणे हातात नाही. पण एक ग्राहक म्हणून आपण जागरुक राहिलो तरी काही बदल आपण निश्चित घडवून आणू शकतो. मांसाहार, दुग्धजन्य पदार्थ कमी करणं, स्थानिक उत्पादकांकडून खरेदी करणं, ऋतूनुसार आहार ठेवणं. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ कमी खाणं. यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या आरोग्यासाठी देखील चांगल्याच आहेत. So it's a win win.

मांसाहारी आणि दुग्धाहारी लोक हे अन्न साखळीमध्ये एक पायरी पुढे असतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात जाणारे प्रदूषकांचे प्रमाण दहा पटीने जास्त असू शकते. याला biomagnification असे म्हणतात.>>>पण पोषणमूल्यांचे प्रमाण देखिल दहा पटीने जास्त असत नाही का? उदा. दहा किलो भाज्या खाऊन जेवढी प्रथिने मिळतील ती एक किलो मांस खाऊन मिळतात. सेम थिंग गोज अबाउट मिल्क.
पर्यावरणाचा र्हास होण्यात सर्वात मोठा वाटा शेतीचा आहे. जेव्हा शंभर एकर जंगल तोडून तिथे शेती केली जाते तेव्हा तेवढ्या परिसरातलं सर्व जैववैविध्य नष्ट होतं. शेतीपूर्वी मानव हंटर-गॅदरर जीवनशैलीने अत्यंत सस्टेनेबल पद्धतीने रहात होता. शेतीमुळे मोठ्या पॉप्युलेशनला शाकाहारी होणं शक्य झालं आणि या शाकाहारानेच पर्यावरणाचा घात केला.
पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर आपण ताबडतोब शेतीसारखी विध्वंसक प्रॅक्टिस बंद करून जास्तीत जास्त फळे, कंद आणि प्राणी (उदा. खार, ससा, साळींदर, उंदिर, डुक्कर, कावळे, कबूतर इ.) चा समावेश आहारात केला पाहिजे, जे आदिवासी हजारो वर्षे सस्टेनेबली करत आहेत. आहे तयारी?

सर्वात चांगला मार्ग अन्न उत्पादन de-industrialize, decentralize आणि less automize करणे हे आहे.>>>
ख्या: ख्या: ख्या: अन्न उत्पादन डि-इंडस्ट्रियलाईझ करून साडेसात अब्ज लोकांचे पोट रोज दोनदा भरून दाखवा. दिल को बहलाने के लिये खयाल अच्छा है.

मोरोबा, मांस आणि धान्य यातून सारखीच पोषणमूल्यं मिळत नाहीत. त्यामुळे पोर्शन साईझ दहापट कमी होत नाही. सहज गुगल केल्यावर one portion of chicken = 100 gm raw chicken and one portion of rice is 60 to 90 grams of uncooked rice असं मिळालं.
Biomagnificatiom is not only about the concentration of a single chemical, it's also about the kinds of chemicals that accumulate over time.
बरोबर आहे. शेती अर्थात monoculture मुळे जैवविविधता कमी होती. त्याचसाठी industrial level वर शेती नको असं म्हटलं आहे. Agroforestry, permaculture अशा पद्धतीने शेती अधिक शाश्वत आहे आणि अधिक पोषणमूल्यं देणारी देखिल. शेती per say विघातक नसून industrial agriculture पद्धतीने शेती विघातक आहे.
आजही जगात जवळपास 70 ते 76 टक्के शेती ही मांसाहारी लोकांना लागणारे मांस आणि दूध निर्माण करणाऱ्या पशूंना खाद्य मिळावे यासाठी केली जाते. तेव्हा शाकाहाराने पर्यावरणाचा घात केला नाहीये.
तुमची शेवटची कल्पना इतकी हास्यास्पद आहे की मला काय लिहू ते कळत नाहीये! What's the logic in throwing away the grains and animals that have been domesticated for over 10 thousand years and to start eating the wild life instead?
जर शेती आणि इतर व्यवसायांचं विकेंद्रीकरण झालं तर साडेसात अब्ज लोकांना पोटभर अन्न नक्कीच मिळेल. त्याची काळजी करू नका!

जवळपास 70 ते 76 टक्के शेती ही मांसाहारी लोकांना लागणारे मांस आणि दूध निर्माण करणाऱ्या पशूंना खाद्य मिळावे यासाठी केली जाते
हे साफ खोटे विधान आहे अन्न उत्पादन करताना जे biproduct तयार होतात त्याचाच वापर प्राण्यांच्या खाद्य साठी केला जातो.
६० ते ७० टक्के शेती प्राणी सांभाळण्यासाठी केली जाते हे खूपच भडक वाक्य आहे रिॲलिटी शी त्याचा काडी च संबंध नाही.

हेमंत, या लिंकवर जाऊन तुम्ही वाचू शकता.
Link: https://ourworldindata.org/global-land-for-agriculture
There is also a highly unequal distribution of land use between livestock and crops for human consumption. If we combine pastures used for grazing with land used to grow crops for animal feed, livestock accounts for 77% of global farming land. While livestock takes up most of the world’s agricultural land it only produces 18% of the world’s calories and 37% of total protein.

Pages