मांसाहाराचे संस्कार !

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 May, 2021 - 04:49

विषय तसा जुनाच आहे, अँगल मात्र नवा आहे.
एक किस्सा घडला गेल्या आठवड्यात, तो अनुभव चार लोकांशी शेअर करावासा वाटतोय.

मी स्वतः अट्टल मांसाहारी आहे. म्हणजे मांस बघून अगदी तुटून पडतो असे नाही. बेतानेच खातो. पण चांगलेचुंगले मिळाले तर रोज खाऊ शकतो. मांसाहाराबाबत सणवार पाळत नसल्याने वर्षाचे ३६५ दिवस खाऊ शकतो. लीपवर्ष असेल तर ३६६ दिवस खाऊ शकतो.

आपल्याकडे असे कुठल्याही दिवशी मांसमटण खाणारे लोकं तसे कमीच आढळतात. कारण का माहीत नाही पण आपण सणवाराच्या दिवशी, एखाद्या देवाच्या वारी, वा मंदीर, देवघर अश्या पवित्र स्थळी मांसाहाराला अपवित्र ठरवत वर्ज्य केले आहे. काही जण असे ठराविक वार पाळतात तर काही जण मांसाहाराला संपुर्णपणेच टाळतात.

अर्थात देवधर्माबाबत ज्याचे त्याचे विचार, सर्वांच्याच विचाराचा आदर करायला हवा.

जोपर्यंंत मी माझ्या घरात काय खातोय यात दुसरा कोणी हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत तो आपल्या घरात काय खातोय वा काय खात नाही याच्याशी माझेही काही घेणेदेणे नाही.

तसेच जोपर्यंत मी माझे अन्न खात असताना कोणी माझ्या तोंडावर त्या अन्नाला नावे ठेवत नसेल तर त्याचे त्या अन्नाबद्दल काय विचार आहेत याच्याशी मला काही घेणेदेणे नाही.

हेच कोणी हिणवल्यासारखे बोलून दाखवले तर ते खटकते.
पण ते बोलणारे जर एखादी सात वर्षांची मुलगी असेल तर मात्र हसावे की रडावे कळत नाही Happy

तर झाले असे, लेकीची एक मैत्रीण घरी आली होती. सोसायटीतलीच, तिच्याच वयाची. या वयाच्या जवळपास पंचवीस-तीस मित्रमैत्रीणी आहेत लेकीला. आलटून पालटून एका दोघांना पकडून घरात खेळायला घेऊन येतच राहते. नवीन मुलांशी गप्पा मारताना तितकाच आमचाही टाईमपास होतो. त्यांचा अभ्यास कम खेळ चालू होता. मी सुद्धा वर्क फ्रॉम होम करता करता त्यांच्यात सहभागी होत होतो. असे कोणी मित्रमैत्रीण आले की आधी आम्ही लेकीसोबत त्यांनाही बिस्कीट, चॉकलेट वगैरे देतो. आणि मग भाजी-चपाती, पुरी, पराठा असे काहीतरी जेवणाचे खाणार असेल तर ते ही विचारतो, जेणेकरून आपली पोरगीही चार घास जास्त खाईल. तर त्या दिवशी आमच्याकडे मासे होते Happy

जगातले सर्वात तीन सुंदर वास सांगायचे झाल्यास पहिला आईच्या पदराचा, दुसरा पहिल्या पावसानंतर ओल्या मातीचा, आणि तिसरा नव्याकोर्‍या पुस्तकांचा....
पण हेच जर खाद्यपदार्थांबाबत म्हणायचे झाले तर माझ्याबाबत तरी फिशफ्राय, फिशफ्राय आणि फक्त फिशफ्राय !!

म्हणजे मी पोटभर तुडुंब जेवलेलो का असेना, तव्यावर चरचर असा आवाज करत त्या तळलेल्या मच्छीचा वास नाकात शिरला तर पोटात खड्डा पडायलाच हवा.
म्हणजे ते पिक्चरमध्ये एखाद्या कॉमेडी सीनमध्ये तुम्ही पाहिले असेल की हिरो कुठूनतरी बाहेरून पार्टी करून येतो, पण हे बायकोला सांगायला विसरलेला असतो. तिने ईकडे स्वयंपाकाचा घाट घातला असतो. आणि मग तिचा ओरडा खायला लागू नये म्हणून तो भरल्या पोटी पुन्हा जेवतो.
विनोदाचा भाग सोडला तर हे तितकेसे सोपे नाही. पण मी मात्र प्रत्यक्षात असे कित्येकदा आवडीने केले आहे की बाहेरून चुकून खाऊन आलो आणि घरी आल्यावर कळले की आज जेवणात मस्त हलवा-सुरमई-रावस-पापलेट विथ कोलंबीचे सार आहे तर झोपायचा टाईम पुढे ढकलतो आणि पुन्हा दाबून जेवतो. अगदी आईने सांगावे लागते की जपून, आता पुरे, आणि शेवटी बायकोने हाताचा आधार देऊन ऊठवावे लागते ईतके तुडुंब जेवलेलो असतो.

हे सारे सांगायचा हेतू ईतकाच की मत्स्याहाराशी एक वेगळेच भावनिक नाते जुळले आहे. त्यात तो घरचा, आईचा हातचा असणे म्हणजे जगातले सर्वात मोठे सुख आहे. एरव्ही भाजी चपाती बाबत आनंदीआनंद असलेली माझी पोरेही या तळलेल्या माश्यांच्या वासाने टुण्णकन उडी मारून हातात ताटली घेऊन जेवणासाठी रांग लावतात. स्पेशली पोरगा. आणि या बाबतीत तो पक्का तुझ्यावर गेला आहे हे ऐकणेही एक दुसरे सुख असते.

तर बॅक टू किस्सा,
लेकीची मैत्रीण घरी आली. जेवणाची वेळ झाली. मासे तळायला तव्यावर आले. त्या वासाने घरात चैतन्याचे वातावरण पसरले. मुलं डोलायला लागली. तसे त्या मैत्रीणीलाही विचारले, काय ग्ग, फिश खातेस का तू? देऊ का थोडे चपातीसोबत...

तसे ती उडालीच. हा फिशचा वास आहे. सॉरी सॉरी काकी मला या वासानेच ऊलट्या होतात. मला कसेतरीच होतेय. मी जाते आता. नंतर खेळायला येते. आणि चक्क बघणार्‍यालाही कसेतरीच वाटावे अश्या पद्धतीने ती याक्क याक्क करत निघून गेली Happy

म्हणजे थोड्यावेळापूर्वी जेव्हा घरभर माश्यांचा घमघमाट सुटलेला तेव्हा तिच्या हे गावीही नव्हते, ज्याक्षणी तिला हे सांगण्यात आले तसे लगेच सायकोलॉजी आपले काम करून गेली आणि तिला मळमळू लागले, किंबहुना हा वास फिशचा आहे तर आता आपल्याला मळमळले पाहिजे असे अंतर्मनाने तिला सांगितले. कदाचित हे घरूनच तिच्या डोक्यात ठसवले गेले असावे की मासे हे याक्क असतात. त्याच्या वासानेही आपल्याला मळमळायला होते. म्हणून आपण ते खात नाही.
आपण शाकाहारी आहोत, मांसाहार करत नाही तर आपल्या मुलांनीही तो करू नये. घरी तर आपण करून देणारच नाहीत, तर बाहेरही त्यांनी करू नये म्हणून कदाचित हे मनात ठसवले गेले असावे.

अर्थात यातही काही गैर नव्हते. आपल्या मुलांनी आपल्यासारखे शाकाहारी व्हावे असे वाटणे आणि तसे प्रयत्न करणे हे स्वाभाविकच आहे.
पण आता माझ्यासमोर प्रश्न होता की ती मुलगी अशी रिअ‍ॅक्ट करून गेल्यावर मी माझ्या मुलांना तिचे वागणे कसे एक्स्प्लेन करू? कारण मलाही माझ्या मुलांवर मांसाहाराचे संस्कार करायचे होते. तिची एखादी मैत्रीण शुद्ध शाकाहारी आहे आणि मांसाहाराला याक्क करते या प्रभावाखाली उद्या तिने मांसाहाराचा त्याग केला तर ते मलाही नको होते.

ती गेल्यावर मी माझ्या मुलीकडे हलकेच पाहिले, ती कूल होती. तिने कानाजवळ गोलाकार बोट फिरवत मला ईशार्‍यानेच विचारले, ही वेडी आहे का?

मी तिला म्हटले, ईट्स ओके. काही लोकांना नाही आवडत मांसाहार. त्याचा वासही सहन होत नाही. उत्तम उदाहरण म्हणजे लेकीचेच आजोळ. माझ्या बायकोच्या घरचे सारेच शाकाहारी. लग्नाआधी बायको सुद्धा शाकाहारीच होती. पण त्यांनीच बायकोला सांगितले की लग्नानंतर तुला आवडले आणि जमले तर मांसाहार करायला सुरुवात कर. तिने केली आणि आता एक्स्पर्ट झाली. मुलांबाबतही ते आवर्जून सांगतात की आम्ही तर त्यांना आमच्याघरी देऊ शकत नाही, पण तुम्ही जरूर द्या. त्यामुळे लेकीला त्यांचेच उदाहरण देऊन समजावले की या जगात काही लोकं शाकाहारी असतात तर काही मांसाहारी. ज्याची त्याची आवड. यात कोणी चूक वा बरोबर नसते. कोणी योग्य वा अयोग्य नसते. जसे आपल्यातच एका घरातले सारे नॉनवेज खातात आणि एका घरातले वेजच खातात. पण दोन्हीकडची माणसे चांगलीच आहेत ना. तर यात भेद करण्यासारखे काही नसते. कोणाला पिंक कलर आवडतो, तर कोणाला ब्ल्यू कलर आवडतो, ईतके सिंपल आहे हे.

आता हे मुलीच्या मनावर कितपत ठसले याची कल्पना नाही. पण दुसर्‍या दिवशी विचार करून मुलगी मला म्हणाली, पप्पा नॉनवेज खाणारे फार लकी असतात.
मी विचारले, का?
तर म्हणाली, जे वेज खातात ते फक्त वेजच खातात, आणि जे नॉनवेज खातात ते वेज आणि नॉनवेज दोन्ही खाऊ शकतात Happy

म्हटले वाह, मांसाहाराचे संस्कार करायला यापेक्षा छान कारण असू नये Happy

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी गर्लफ्रेण्ड पेटामधे आहे. ती म्हणते प्राणीजन्य दूध हा मांसाहार आहे. त्यामुळे बिल गेट्सच्या सोयादूधाच्या कंपनीचे दूध घ्या असे ती म्हणते.
(यावर एक धागा होऊ शकतो याची कल्पना आहे. पण बोटाला खरकटं लागलेलं असल्याने सध्या इतकंच).

त्या मुलीचं काहीच चुकलं नाही. तिला वासाचा त्रास आधीपासूनच होत होता, पण भिडस्तपणा, लहान वयानुसार असलेला बुजरेपणा / मॅनर्सची जाण याखातर ती काही बोलत नव्हती. जेव्हा हा वास माशांचा आहे हे तिला कळलं तेव्हा तिला बोलून दाखवण्याइतकं बळ आलं.
चूक घरच्यांचीच आहे. बर्‍याच लोकांना माशाच्या वासाचा त्रास होतो हे लक्षात घेता 'आम्ही आता मासे तळणार आहोत. तुला चालत नसेल तर तू घरी जा' असं आधीच पोलाईटली सांगायला हवं होतं.

वाघ,सिंह,कोल्हा,लांडगा हे असे मांसाहारी प्राणी आहेत त्यांना दुसरा पर्याय नाही.
गाई,बैल,हरीण ,सासा असे जे त्रून भक्षी प्राणी आहेत त्यांना दुसरा पर्याय नाही.
माणसाला फळ,भाज्या,कड धान्य असा पर्याय आहे तरी तो मांस खातो.
कच्चे मांस कोणतेच हत्यार न वापरता माणूस दाताने तोडू शकणार नाही.आणि कोणतीच प्रक्रिया नाही केली तरी चावू पण शकणार नाही.
कोणताच मोठा प्राणी माणूस दाताने कातडी वेगळी करून त्याचे भक्षण करू शकणार नाही.
मांस हा त्याचा आहार असूच शकत नाही.
मांस खाण्यासाठी त्याला अवजार,हत्यार ह्याची गरज लागतेच त्याच्या बिना तो ते भक्षण करूच शकत नाही.
माणसाचे दात आणि जबडा इतका strong नाही की तो प्राणी फाडून खावू शकतो.

मांस खाण्यासाठी त्याला अवजार,हत्यार ह्याची गरज लागतेच त्याच्या बिना तो ते भक्षण करूच शकत नाही.>> डोकं, अंगठा असलेले दोन हात मिळालेत ना माणसाला. त्याच्या मदतीने तो अन्नपदार्थांवर मग ते मांस असो की धान्य
प्रक्रीया करुन खायला शिकला उत्क्रांतीच्या विविध टप्प्यात.
गहु, बाजरी तसेच खाणारे अजुन बघण्यात नाही आले.

कच्चे मांस माणूस खात असेल तर खूपच मजबुरी मुळे त्या काळी सुद्धा खात असेल.
फळ मिळाली नाहीत तर एक पर्याय म्हणून च खात असेल.जेव्हा आगी चा शोध लागला त्या नंतर तो आवडीने खायला लागला असेल.
एक वेळ ज्वारी,बाजरी,काच्ची खावू शकतो काही च वाटणार नाही पण कच्चे मांस कोणी खावू शकेल असे वाटत नाही.
मनोरुग्ण असेल तरच तो ते काम करेल.
ती चव माणसाला बिलकुल पसंत नाही.
बाकी सर्व भाज्या,कड धान्य ,फळ, कच्ची खाण्यात काहीच अडचण येणार नाही आणि चव पण आवडेल.

हरबरा,शेंगदाणा, ओले वाटाणे, ओली चवळी, ओले उडीद, मूग, मका,अगदी jकाकडी, गाजर,ratale, विविध फळ कोणतीच प्रक्रिया न करता माणूस खावू शकतो.
पण मांस , मच्ची चा कोणताच प्रकार कोणतीच प्रक्रिया न करता माणूस भक्षण करू शकत नाही.
आतडी बाहेर निघे पर्यंत उलट्या करेल
त्या मुळे माणूस मांसाहारी आहे हे चुकीचं वाटत.
खूप मोठी लोकसंख्या मांस भक्षी असल्या मुळे वाद नको आणि समाजात फूट पडू नये म्हणून ते स्वीकारले जात नाही.

ती चव माणसाला बिलकुल पसंत नाही " असे जनरलायझेशन योग्य नाही. कित्येक देशांत कच्चे मांस विशेषत: माशाचे, सर्रास खाल्ले जाते. जपानमध्ये सुशी हा कच्चा माशाचा तुकडा अतिशय लोकप्रिय आहे. आपल्याकडेही शिंपल्यातला जीव कच्चा खातात.

शिंप्यातला जीव कच्चा खातात.
असे खाना रे अतिशय दुर्मिळ आणि अपवाद आहेत.
त्या पेक्षा एकच प्रकार माणूस कच्चा खातो ते म्हणजे मध माशी च्या अळ्या हे एकमेव उदाहरण असेल.

कच्चे मासे सोया सॉस, वसाबी मध्ये डुबवुन/ भातात गुंडाळुन फारच आवडतात. कधीही खाऊ शकतो, आणि पोट भरलं तरी मन भरत नाही.
(जवळ जवळ) कच्चं लाल भडक रक्त असलेलं गायची मांस खाणारी बरीच लोकं माहित आहेत. इतकं रेअर मला झेपलं नाही, पण फार चवीने खातात लोक.

एक वेळ ज्वारी,बाजरी,काच्ची खावू शकतो काही च वाटणार नाही
सर्व भाज्या,कड धान्य ,फळ, कच्ची खाण्यात काहीच अडचण येणार नाही आणि चव पण आवडेल.
>>>>

हे सगळे जर तर आहे.
मला काहीही प्रक्रिया न करता निसर्गातून जसे मिळतेय तसे खाणारे दाखवा आपल्या आसपासचे.
थोडक्यात शाकाहारातही माणसाने आपली सोयच बघितली आहे . मग मांसाहारात बघितली तर काय झाले.
आणि या दोन्ही आहारांना प्रक्रिया करून खायची सवय झाल्याने आता आपल्याला हे दोन्ही प्रकार कच्चे खाणे अवघड वाटत आहेत.
जर माणूस हा ईतर जनावरांसारखाच राहिला असता तर दोन्ही प्रकार कच्चेच खाणारा मिश्राहारी झालाच असता. जसे कावळा, कुत्रा, मांजर वगैरे..

एक प्रश्न पडलाय - गाय बैल हत्ती म्हशी बकर्‍या वगैरे या शाकाहारी प्राण्यांना शिजवून मासे खाऊ घातले तर ते खातात का?

जनावरे सहसा चुकीचा आहार घेत नाहीत .
लाजाळू ची वनस्पती पोटात गेली की नशा येते जनावरे त्याला तोंड लावत नाहीत.तंबाखू आरोग्यास हानिकारक आहे जनावरे ती खात नाहीत.
माणूसच एक बिनडोक प्राणी आहे त्याला आहारात काय असावे आणि काय नसावे हे समजत नाही.

बाकी मांसाहार विषयी कोणताच आक्षेप नाही .
जे मान्य आहे त्या प्राण्यांचे मांस,मासे मी पण योग्य ती क्रिया प्रक्रिया करून खातो.
पण ते अनैसर्गिक आहे उगाच ते कसे नैसर्गिक आहे असा युक्तिवाद करण्यात काही अर्थ नाही.

जे मान्य आहे त्या प्राण्यांचे मांस,मासे मी पण योग्य ती क्रिया प्रक्रिया करून खातो.
>>कोणते प्राणी मान्य लिस्ट मध्ये आहेत?

गाईला नॉन व्हेज देतात डेअरी वाले..
Submitted by च्रप्स on 1 June, 2021 - 23:03
>>>>
का? आणि गाय खाते? खाऊ पचवू शकते?
मला सिरीअसली याबद्दल काही माहीत नाही..

जे मान्य आहे त्या प्राण्यांचे मांस,मासे मी पण योग्य ती क्रिया प्रक्रिया करून खातो.
पण ते अनैसर्गिक आहे
>>>>>

जे मान्य आहे त्या प्राण्याचे म्हणजे? कोण देते हि मान्यता?

अनैसर्गिक काय आहे? मांस खाणे कि शिजवून खाणे?

मुळात अनैसर्गिक म्हणजे काय? जगात किती टक्के लोकं मांसाहार करतात? किंवा भारतात किती टक्के लोकं मांसाहार करतात? गूगल काय सांगते? जर हा आकडा फार मोठा असेला तर बहुतांश मनुष्य जमातच एखादी अनैसर्गिक गोष्ट कशी करू शकते? नैसर्गिक अनैसर्गिक याची व्याख्या आणि निकष गंडताहेत याचा अर्थ

जे मान्य आहे त्या प्राण्यांचे मांस,मासे मी पण योग्य ती क्रिया प्रक्रिया करून खातो.
पण ते अनैसर्गिक आहे
>>>>>
जे मान्य आहे त्या प्राण्याचे म्हणजे? कोण देते हि मान्यता? >> त्यांचा मुद्दा समजुन घ्या. तुम्ही सगळंच विचारत आहात त्यांना. नंतर रेसीपीपण मागाल त्यांच्याकडे.

मान्यता?

अनैसर्गिक काय आहे? मांस खाणे कि शिजवून खाणे?
माणसाने कोणत्या ही स्वरूपात मांस खाणे हे अनैसर्गिक आहे..कोणत्या ही प्राण्याचे.
माकड आपले पूर्वज आहे असे डार्विन म्हणतो ती माकड कुठे मांसाहारी आहेत.
चांगले सुळे दात आणि मजबूत जबडा असून सुद्धा.

पूर्ण मानव जमात अनेक गोष्टी अनिसर्गिक रित्या करते.
ते कोणतेच प्राणी करत नाहीत.
दूध कोणतेच प्राणी काही वया नंतर पित नाहीत माणूस पितो.
Reproduction साठी सर्व प्राणी सेक्स करतात .
माणूस मज्जा येते म्हणून करतो.
असे करणारा माणूस हा एकमेव प्राणी असेल.

असे करणारा माणूस हा एकमेव प्राणी असेल.
ह्या न्यायाने अन्न शिजवून खाणं पण अनैसर्गिकच की. कोणता प्राणी अन्न शिजवतो सांगा बरं. कधी बघितलंय का की ऑक्टोपस चुलीवर मासा शिजवून खातोय असं?? पाण्यात चूल पण नाही पेटणार.

माणूस मज्जा येते म्हणून करतो.असे करणारा माणूस हा एकमेव प्राणी असेल .
डॉल्फिन, ऑक्टोपस

जनावरे सहसा चुकीचा आहार घेत नाहीत .
मोहाची फुले खाऊन माकडे झाडावरून खाली पडतात.

गाईला नॉन व्हेज देतात डेअरी वाले..
तेवढंच फक्त गाई खात असेल. बाकी इतर सगळं शाकाहारी ३३ कोटी देव फस्त करत असतील. हलकेच घ्या.

हा ऊण्दीर खाणारा गोरिल्ला खरा आहे का फोटोशॉप?

बाकी वर कोणीतरी डार्विन म्हणाले की आपले पूर्वज माकड होते.
सर्वांचे नव्हते. आमचे पुर्वज तरी माणसंच होती Happy

जोक्स द अपार्ट, उत्क्रांतीचा पुर्ण अभ्यास केला तर लक्षात येईल त्या आधीपासून आपण मासा कासव डुक्कर वगैरे असे बरेच काही होतो. जर मासे खाणे अनैसर्गिक असते तर समुद्रकिनारी माणसांची वस्तीच नसती. माणसांनी सागरी मार्गाने लांबचे प्रवास कधी केलेच नसते. जिथे टोकाच्या प्रतिकूल हवामानामुळे फारसे काही पिकत नाही वा शेती करू शकत नाही तिथे मनुष्य तगलाच नसता. निसर्ग स्वत:च आपला रस्ता शोधतो. आणि त्याने शोधलेल्या रस्त्याला अनैसर्गिक म्हणने अतार्किक आहे.

अच्छा... हा तर मग गेमच झाला
ज्या लोकांचे पूर्वज माकड आहेत त्यांनी किटक मच्छर मासे ऊंदीर खायचे सोडून काय हे शिजवलेल्या भाज्या खाणे सुरू केले आहे. फारच अनैसर्गिक झाली आहे हि पिढी Happy

मिश्र आहारी प्राणी म्हणजे सर्वात चालू जमात आहे .
ह्यांना मांसाहार मध्ये पण वाटा पाहिजे आणि शाकाहारी आहारात पण वाटा पाहिजे .
सर्व ठिकाणी ह्यां ना हिस्सा पाहिजेच.
माती, दगड खाणारे प्राणी असते तर तिथे पण ह्यांनी हिस्सा सांगितला असता.

Pages