खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेजवान (उच्चार बरोबरे का?) राईस विथ चीली चिकन.
Screenshot_20220823-092932_Gallery.jpg

सगळे फोटो कातील. म्हणूनच या गल्लीत येणे टाळते शक्यतो. लैच जळवता राव. वर कोणीतरी आलिया ची बीट रूट सलाड च्या रेसिपी चा उल्लेख केला. कोणी सांगेल का ती?

>>>>>म्हाळसा एक वेगळा धागा काढता का... डब्या चा...
म्हाळसा-अस्मिता युतीचा विजय असो.
आमची मागणी एकच - वेगळा धागा - वेगळा धागा!!!

हल्ला बोल Proud
* कोशिंबीर
Screenshot_20220823-085438_Gallery.jpg*
शाही पनीर
Screenshot_20220823-085426_Gallery.jpg*

फरसबी
Screenshot_20220823-085405_Gallery.jpg*

लसणाचे वरण
Screenshot_20220823-085351_Gallery.jpg*
पास्ता
Screenshot_20220823-085331_Gallery.jpg*

गाजराची कोशिंबीर
Screenshot_20220823-085319_Gallery.jpg*

टमाट्याचे वरण
Screenshot_20220823-085254_Gallery.jpg*
वांग्याची भाजी
Screenshot_20220823-085244_Gallery.jpg*

भेंडीची भाजीScreenshot_20220823-085159_Gallery.jpg*
डबा
Screenshot_20220823-085224_Gallery.jpg*

*

आप्पे
Screenshot_20220823-085107_Gallery.jpg

*रॅप आणि पनीर पुदीना राईस
Screenshot_20220823-085017_Gallery.jpg*

आप्पेScreenshot_20220823-085132_Gallery.jpg
*दोडक्याची भाजी
Screenshot_20220823-085001_Gallery.jpg
पनीर घोटाला (जास्त उकळल्या गेल्याने पनीरचे फॅट वेगळे झाले व तवंग आला.)
Screenshot_20220823-085051_Gallery.jpg
ब्रॉकोली चेडर चीज सूप (रेडी टू ईट)
Screenshot_20220823-085037_Gallery.jpg
पास्ता
Screenshot_20220823-085147_Gallery_0.jpg

गोपाळकाला : द बिगिनिंग
आज थोडे करुन बघितले.

शनिवारी हॉस्पिटलमध्ये मोठ्या पातेल्यात गोपाळकाला : द कन्ल्युजन

अस्मिता... एकदम भारी सगळेच पदार्थ. आप्पे दिसतातच कुरकुरीत. कसले आहेत? आणि एवढी छान दिसणारी फरसबी आजच बघतेय. रेसिपी प्लिज.
म्हाळसा, खरंच मनावर घ्या डब्बा रेसिपीज धाग्याचं. निदान फोटोज् तरी एकत्र अडकवा एका धाग्यावर. आयडियाज मिळतील त्यातून पण.

झकासराव Lol
चिन्मयी Happy
रव्याचे मसाला आप्पे आहेत. #Hebbar's
फरसबी दाण्याचा कूट, तिखट, मीठ, गोडा मसाला, गूळ घालून परतली आहे.
सर्वांचे आभार. Happy
गोपाळकाला छानंय.

आप्पे जबरदस्त दिसताएत.
हो, सुट्टी आहे शाळेला म्हणून डब्यालाही सुट्टी. मी आले कॅलिफोर्निया फिरायला.. अजून आठवडाभर तरी किचनमधे एंट्री नाही

काल इथे क्रिस्पि टॅकोज खाल्ले
C0538593-2818-4948-9342-A2627A699E72.jpeg

काल ऑगस्ट २३ म्हणे वर्ल्ड वडापाव डे होता, त्यानिमित्त सगळ्यांना वडापाव दिनाच्या बिलेटेड हार्दिक शुभेच्छा, एक्स्ट्रा मिर्ची सहित.

images (22)_0.jpegimages (21)_0.jpeg

म्हाळसा,अस्मिता यांच्या पोस्ट्स म्हणजे काय पदार्थ, काय प्रेझेंटेशन, काय फोटोग्राफी अशा असतात. angelsss यांचा गुलाबजामचा फोटो क्लासच आलाय. बाकीचे माबोकरही त्यात आपली तोंपासु अशी भर घालत असतात.

म्हणून या धाग्यावर आलं की मला भयंकर न्यूनगंड येतो. (एखाद्यासमोर आपण अगदी हॅ आहोत असं वाटतं तोच)

तरीही, "म्हणोनी काय कवणें चालूची नये?" या उक्ती प्रमाणे आजच्या नाष्ट्याचा हा फोटो. 🙂
.

*जागतिक वडापाव दिनानिमित्त !!*
२३ ऑगस्ट २०२२
मी मुंबईचा वडापाव
असा मी मुंबईचा वडापाव
जगात झालंय माझं नाव

खाऊ लागलो भाव
कारण वाढू लागला माझा भाव
आज मी झालो ५६ वर्षाचा
अजूनही मी लज्जतदार+ चविष्ट माझं नाव
असा मी मुंबईचा वडापाव
जगात झालंय माझं नाव

लुसलुशीत पाव
लाल- हिरवी- पिवळी- गोड चटणी
आणि तरीही सोबतीला मिरची
आणि मी कुरकुरीत तळलेला वडा
मी म्हणजे मुंबईकरांचा विक पॉइंट वडा
अस्सल देशी फास्ट फूडचा ताव
असा मी मुंबईचा....

जन्म माझा १९६६ सालचा
दादर स्टेशन बाहेर गाडीवरचा
जन्मदाते श्री अशोक वैद्यांच्या हातचा
आणि माझे नामांतर झाले बटाटावडा पाव
तेव्हा मी मिळे १० पैशाला,
आणि आता तर १०- ५०-८०/- रुपयांचा अधिक भाव
असा मी मुंबईचा.....

दादर- परळ- गिरगावाची शान
वरळीचा तर मी अभिमान
रोजंदारीचा नी पोटाचा मला बहुमान
मला रेल्वे स्थानक- एस टी डेपो- बस आगारात मान
कमी वेळात सर्वांना सापडे मी वडापाव
असा मी मुंबईचा.....

आहे मी गरिब- श्रीमंतांचा लाडका
महिला पुरुष वयांत भेदभावाचा ना तडका
पोटाची खळगी भरायला नसे कोणी कडका
नाष्टात- जेवनात, जिथं कमी तिथं मी भडका
कमी पैशात पोटभरणारा मी वडापाव
असा मी मुंबईचा.....

किर्ती काॅलेज बाहेर बेसनाच्या चुरासह वडापाव
ठाण्याच्या कुंजविहारचा जम्बो वडापाव
ठाण्याच्या दुसरा ठिकाणचा गजानन वडापाव
कल्याणचा वंझे कुटुंबाचा खिडकी वडापाव
वरळीच्या मांजरेकर चा वडापाव
असा आहे नावलौकिक मी शिववडा पाव
असा मी मुंबईचा.....

परदेशात ही मी फिरु लागलो
बर्गरला मी टक्कर देऊ लागलो
चीज- नाचो- शेजवान- मेयोनिज-
जम्बोकिंग अशा नावांत मी दिसू लागलो
असा मी आहे ब्रॅण्डेड वडापाव
असा मी मुंबईचा.....

अमेरिकेच्या 'हॅरिस सोलोमन' तिशीच्या विद्यार्थ्याने
माझ्या *वडापाव* या विषयावर पी. एच. डी. केली
मुंबईच्या रिझवी काॅलेजचे '२ माजी विद्यार्थ्यांने'
लंडनमध्ये श्री कृष्ण वडापाव नावाचे हाॅटेल काढले
त्यांनी दर वर्षाला ४ कोटींहून अधिक कमाई केली
इंटरनेटवर माझे स्टाॅल- हाॅटेलचे पत्ता दिसे
सर्व क्षेत्रात पसंतीस दिसे मी वडापाव
असा मी मुंबईचा.....

कोरोनात केला मला तडीपार‌
सर्वांचीच झाली उपासमार
आली आठवण सर्वांना माझी फार
आणि आता लाॅकडाऊन उघडल्यावर आनंदीत झाले सर्व वार
मी पुन्हा आदराने वावरु लागलो, मारा आता ताव
असा मी मुंबईचा......

सर्व धर्म एकच वडापाव !

आपल्या सर्व भारतीयांना आणि, परदेशातील खवय्यांना भारतामुळे जागतिक ५६ वा वडापाव दिनाच्या हार्दिक हार्दिक खमंग शुभेच्छाऽऽऽ !!

~@ शब्दश्री विलास देवळेकर

अग अस्मिता काय हे. एक फोटो आवडला म्हणत स्क्रोल करावं तर दुसरा अजुन भारी. आम्हाला पचवायला तरी वेळ दे..
गुलाब जाम मस्त..

दोडक्याची भाजी मस्त !!
मला कधीच योग्य तेवढीच शिजवता येत नाही , कधी कमी तर कधी जास्त शिजते ..

चार ओले खजूर एकदा रिन्स करून , एक खाऊन तीन १२+ तास बुडतील इतक्या कमीत कमी पाण्यात भिजत ठेवावे.
मग नारळाचे ताजे दूध बनवून घ्यावे.
रात्री झोपण्यापूर्वी पूर्वी (किंवा खायच्या दोन तास आधी)
मऊ झालेल्या खजुराच्या बिया काढून, अर्धा खाऊन, अडीच खजूर त्या भिजत ठेवलेल्या पाण्यासकट आणि अर्धा कप नारळाचे दूध मिक्सीत घेऊन दोन दा घुर्र करून ते एका बाउल मध्ये घ्यावे. त्यात 3 tsp चिया सीड्स आणि 8 - 10 काळया मनुका घालून नीट कालवून फ्रिज मध्ये ठेवावे.

सकाळी / तासा भराने गट्टम करावे.

जास्त भानगडी नको असतील तर तयार नारळाचे दूध, त्यात साखर/मॅपल सिरप आणि चिया मनुका असेही करता येईल.

फ्रिज मध्ये ठेवणे ऑप्शनल आहे, बाहेरही ठेवता येते थंड नको असेल तर.

हेच नेहमीचे दूध/दही/मिष्टी दोई वापरूनही करतो.

Pages