Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या 
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती जर मसूर आमटी असेल तर
ती जर मसूर आमटी असेल तर त्याची रेसिपी द्या प्लीज. अगदी चमचमीत दिसते आहे.
ओके लंपन
ओके लंपन
हो अगदीच झणझणीत दिसत आहे तो रस्सा.. म्हणून वेज नॉनवेज कन्फ्यूज झालो
I really hope लम्पन ची पोस्ट
I really hope लम्पन ची पोस्ट उपहासात्मक आहे.
आणि ऋन्मेऽऽष ला कळली नाही. किन्वा तो तसे दाखवतो आहे.
छळ आहे हा धागा
छळ आहे हा धागा
लंपन
लंपन
अनघा लंपनची पोस्ट उपहासात्मकच आहे.
फोटू नीट आला नाही काय ..
तांबडा पांढरा सुक्क मटण भाकरी कोशिंबीर लिंबू आहे ते
मी सिरीअसली कन्फ्यूज झालो आहे
मी सिरीअसली कन्फ्यूज झालो आहे आता
नक्की वेज आहे की नॉनवेज?
आणि यात काय उपहासात्मक पोस्ट करायचे हे ही समजले नाही..
कारण , सहज कळतेय की, तांबडा
कारण , सहज कळतेय की, तांबडा पांढरा आहे म्हणुन. आणी ,आषाढात non-veg parties असतात, कारण श्रावण सुरु होणार असतो लवकरच.
हुश्श!!!
सहज कळतेय की, तांबडा पांढरा
सहज कळतेय की, तांबडा पांढरा आहे म्हणुन. >>> ओके, मला सहज कळले नाही तांबडा पांढरा. मी आयुष्यात तो एकदाच खाल्ला आहे.
आणी ,आषाढात non-veg parties असतात >>> हे सुद्धा मला माहीत नव्हते
आता अनघाचा कपालबडवती मोड ऑन
आता अनघाचा कपालबडवती मोड ऑन
@अनघा: त्याला कळत सगळं, येडा बनके खाता हैं पेढा
मला ती डिश सरळ सरळ तांबडा
मला ती डिश सरळ सरळ तांबडा पांढरा आणि सुकं मटन अशीच वाटली,पण लंपन ने इतक्या साळसूदपणे अनस फ़णस नि मसूर आमटी लिहिलं की मलाच परत वाटलं की मला जिथं तिथं बरं मटण दिसत
आता अनघाचा कपालबडवती मोड ऑन
आता अनघाचा कपालबडवती मोड ऑन Lol
@अनघा: त्याला कळत सगळं, येडा बनके खाता हैं पेढा

>> I know
सहज कळतेय की, तांबडा पांढरा आहे म्हणुन. >>> ओके, मला सहज कळले नाही तांबडा पांढरा. मी आयुष्यात तो एकदाच खाल्ला आहे.
>> मी अजून खाल्ला नाही कधीच. पण मला कळते
त्या डिशला पुन्हा पाहिले.
त्या डिशला पुन्हा पाहिले. तिथे कुठे सरळसरळ मटण दिसतेय?
बहुतेक तुम्ही देशावरचे असल्याने हे पटकन कळत असेल. मी कोकणातले असल्याने संभ्रमात पडलो.
त्यात आखाड आषाढ शब्द वाचून वारकरी आठवले. त्यामुळे नैवेद्याची वेज थाळीच असण्याची शक्यता जास्त वाटली.
फक्त त्या झणझणीत रश्याने तेवढे कन्फ्यूज केले. अन्यथा ९० % वेजच्याच बाजूने होतो मी
>> मी अजून खाल्ला नाही कधीच.
>> मी अजून खाल्ला नाही कधीच. पण मला कळते Happy >>>> यात तुमचे कौतुक आहे. पण हे सर्वांनाच का जमायला हवे
छे अजिबातच आग्रह नाही
छे अजिबातच आग्रह नाही सगळ्यान्ना कळावे असा.
हेमाशेपो. मला कन्टाळा पण येतो तेच ते दळण दळायचा
छे अजिबातच आग्रह नाही
बर्र मग ऋन्मेषला कळावे असा आग्रह का?
असो, मी काही वेळा मजा म्हणून
असो, मी काही वेळा मजा म्हणून येडा बनून पेडा खातो हे खरे आहे .. त्यामुळे तसा गैरसमज झालेल्यांचा यात दोष नाही..
पण यात काय तसली मजा नव्हती. मला खरेच ते कळले नव्हते ती वेज थाली होती का नॉनवेज थाली होती .. एका अर्थी बरेच झाले कोणीतरी उपहास शोधला त्या पोस्टमधील.. नाहीतर मी तिला आयुष्यभर वेज थाली समजूनच जगलो असतो
आखाड पार्टी काय असते?
आखाड पार्टी काय असते?
वेज आहे का ती थाली? काय मेनू आहे त्यात.. >>>
https://www.maayboli.com/node/50033 हा लेख लिहिणारे तुम्ही नाही का (सर) ?
श्रावण, गाटारी पाळणे ई ई माहित असणार्याला आखाड माहित नाही म्हणजे गंमतच बाई..
श्रावण, गाटारी पाळणे ई ई
श्रावण, गाटारी पाळणे ई ई माहित असणार्याला आखाड माहित नाही म्हणजे गंमतच बाई..
>>>>
या हिशोबाने गटारी माहीत असणार्याला बकरी ईदच्या कुर्बानीच्या सर्व प्रथापरंपराही माहीत असायला हव्यात.. पण तसे नसते ना..
जर आखाड देशावर होत असेल तर ते मला का माहीत असावे.
पण सिरीअसली? ईतका फेमस आयटम आहे का हा? लोकं शाहरूख खानला कोणी ओळखत नाही असे का रिअॅक्ट करत आहेत?
असो, पुढे जाऊया..
असो, पुढे जाऊया.. हा धागा तरी वादापासून दूर ठेऊया..
या अंडा ब्रेड पकोडा खायला
आखाड हा शब्द आम्ही तरी वापरत
आखाड हा शब्द आम्ही तरी वापरत नाही. आमच्याकडे “गटारी”.
उलट आजच मधुराच्या पेजवर आखाड थाळी का काय ते फीड मध्ये दिसले.
तर मी मनात म्हटले , किती अशुद्ध बोलतात ह्या बाई( ती अशुद्ध खुपच बोलते छाण, बणवूण पहा , खावूण वगैरे).
मला वाटले, आषाढी थाळी म्हणायच्याएवजी आखाड का म्हणतेय?
आणि टेकनिकली, आषाढ संपतो आणि श्रावण सुरु होतो, तेव्हा आषाड शब्दाचा घाटावर उच्चार आखाड करत असावेत.
<<आणि टेकनिकली, आषाढ संपतो
<<आणि टेकनिकली, आषाढ संपतो आणि श्रावण सुरु होतो, तेव्हा आषाड शब्दाचा घाटावर उच्चार आखाड करत असावेत.>>>
श्रावण संपायच्या आत 'आकाड' (आषाढ) तळायचा असतो (आम्ही घाटी). यामध्ये प्रामुख्याने गोड तळण कापण्या करतात. तिखट मध्ये चकल्या, कडबोळे करतात.
महाराष्ट्र बेंदूर सण आषाढात येतो. तेव्हापासून आकाड तळला जातो. बैलांच्या कानात गोड कडबोळी घालतात . ज्यांच्याकडे बैल नसतात ते छोटे मातीचे बैल आणून पूजतात. त्यांना नैवेद्य कडबोळी, पुरणाचा कडबू.
पुण्यात काही आकाड तळणे प्रकार पाहिला नाही. लहानपणी शेजारी घरोघरी 'आकाड' क्ंप्लसरि तळला जायचा. मस्त घमघमाट सुटायचे पावसाळ्यात.
आई अजून करते नैवद्या पुरत.
अनघा
अनघा
<<आषाड शब्दाचा घाटावर उच्चार
<<आषाड शब्दाचा घाटावर उच्चार आखाड करत असावेत.>>
यासाठी एवढा रिप्लाय. मराठी पटापट टाईप होत नसताना टायपले आहे.
'आखाड' नाही पण आकाड तळतात बाबा आमच्याकडे
Btw ethe kahi tari veglach
Btw ethe kahi tari veglach topic varun charcha challi ka... Mi veglach mudda mandla vatat
शितल छान माहिती.
शितल छान माहिती.
सारांश असा की,
आखाड - मांसाहारी थाली
आकाड - तळायचे शाकाहारी पदार्थ
आणि
आखाडा - मायबोलीवरील चर्चा
<<आखाडा - मायबोलीवरील चर्चा
<<आखाडा - मायबोलीवरील चर्चा
>> हे मात्र खरय. बाकी सगळा जाउ दे.
शीतल छान माहिती.
शीतल छान माहिती.

'आखाड तळणे' आमच्याकडेही मराठवाड्यात असते, पण मला भारत सोडून फार वर्ष झाली, त्यामुळे हे सगळे मागच्या जन्मातले वाटायला लागलेय आणि असं काही वाचलं की कनेक्ट झाल्यासारखं वाटतं.
______
आबा , मस्तच!
ऋ, छान !
लंपन
शिल्लक बिर्याणी आणि चहा...
शिल्लक बिर्याणी आणि चहा...
या..
(No subject)
काल कामानिमित्त इंदौरमध्ये
काल कामानिमित्त इंदौरमध्ये आल्यावर स्थानिक डीलरने खाऊ घातलेले चविष्ट दाल बाफले. सोबत माळवा पद्धतीची कढी अतिशय चविष्ट दाल, लाल लसुनी मसाल्यातील उकडलेला बटाटा भाजी, हिरवी चटणी पुदिना, लाल चटणी लसूण, सलाद, आणि चूरमा लाडू.
Pages