Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या 
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चिन्मयीजी, रेसिपी टाकली आहे
चिन्मयीजी, रेसिपी टाकली आहे पाककृती अंतर्गत (हायला भारी वाटलं रिक्षा फिरवून आज)
हाफ फ्राय अंडे, लसुनी दही बेडवर ठेऊन चिली पार्सले ऑइल अन अलेप्पो बटर ड्रीझल केले आहे त्यावर,
सिलबीर म्हणजे हँगओव्हर वर परफेक्ट टर्किश इलाज म्हणवतो, रेसिपी पण टाकली आहेच.
या लेडीजबायांना या धाग्यावर
या लेडीजबायांना या धाग्यावर बॅन करण्यात यावे.
उगा आपलं काय्काय बनवु बनवु टाकत र्हात्यात इठं.
Wow काय एकेक पदार्थ!
Wow काय एकेक पदार्थ!
आज सकाळी नास्ता आलू पराठा
आज सकाळी नास्ता आलू पराठा बरोबर हिरवी मिरचीची चटणी.

@अस्मिता, @म्हाळसाः बायांनो
@अस्मिता, @म्हाळसाः बायांनो कॉम्प्लेक्स देताय तुम्ही
म्हाळसा तु युएस मधे आहेस ना?
म्हाळसा तु युएस मधे आहेस ना? सुट्ट्यामधे कसले डब्बे? समर कॅम्पचे का?
मी राहते तीथे year round शाळा
मी राहते तीथे year round शाळा आहेत.. माझी मुलगी ज्या ट्रॅकला आहे तो दोन आठवड्यापूर्वीच सुरू झाला
अस्मिता, प्लीज
अस्मिता, प्लीज
१.पिटा रॅप(ब्लॅक बिन्सची उसळ आणि स्क्रॅम्बल्ड एग्ज घालून)
२.बो टाय पास्ता
३.व्हाइट सॉस पास्ता
४.ओटस खिचडी
ह्याची कृती देता येईल का गं?त्धन्यावाद
आज रात्री थालीपीठ बरोबर घरचा
आज रात्री थालीपीठ बरोबर घरचा लोण्याचा गोळा.

हे थालीपीठ दुसऱ्या दिवशी दही आणि शेंगाचटणी बरोबर फार मस्त लागते.
काल मी घरी केलेला चॉकलेट केक
काल मी घरी केलेला चॉकलेट केक. बेसिक व्हर्जन. म्हणजे केकच्या, मधे रिकामा गोल असलेल्या भांड्यात मिश्रण घालून वाळूवर भाजणे इतकं बेसिक. आमची धाव इतकीच. जेम्सचं डेकोरेशन मुलीने केलंय. चवीला छान झालाय.
छान दिसतोय केक
छान दिसतोय केक
आकार मस्त आहे डोनटसारखा.
आकार मस्त आहे डोनटसारखा.
मुलीला डेकोरेशन करायची हौस असेल तर पुढच्यावेळी क्रीमचा कोनही देता येईल मेहंदीसारखा. डिजाईन काढायला..
एक नंबर दिसतोय केक...
एक नंबर दिसतोय केक...
पराठा व थालिपीठ मस्तच दिसतेय.
पराठा व थालिपीठ मस्तच दिसतेय.
केक पर्फेक्ट जमलाय प्रज्ञा.
मधे रिकामा गोल असलेल्या
मधे रिकामा गोल असलेल्या भांड्यात मिश्रण घालून वाळूवर भाजणे इतकं बेसिक>>> वॅाव, केक मस्तच.. मला फक्त असाच केक आवडतो.. वाळूवर भाजल्याने जी चव येते ती अवन मधल्या केकला मूळीच येत नाही
अस्मिता, प्लीज
अस्मिता, प्लीज
१.पिटा रॅप(ब्लॅक बिन्सची उसळ आणि स्क्रॅम्बल्ड एग्ज घालून)
२.बो टाय पास्ता
३.व्हाइट सॉस पास्ता
४.ओटस खिचडी
ह्याची कृती देता येईल का गं?त्धन्यावाद
>>>>>>
वृषाली
१.पिटा रॅप(ब्लॅक बिन्सची उसळ आणि स्क्रॅम्बल्ड एग्ज घालून)
विकतचे पिटा (मिशन टॉर्टियाज बहुतेक) , रात्रभर भिजवून थोडे मीठ घालून कुकरमधे उकडलेले काळे बीन्स, त्यात लसूण , कांदे, टमाटे ,कोथिंबीर, तिखट , मीठ घालून कमीतकमी पाणी ठेवून केलेली उसळ, टॉर्टिया तव्यावर भाजून मगं ही उसळ आणि स्क्रँबल्ड एग्ज, चीज, बारीक चिरलेला कांदा व हवे असलेले सॉसेस घालून बंद करून ग्रील केले व थोडे बटर लावलेले.
२,३ दोन्ही पास्ते
एकाच कृतीने केलेत. आधी बटर वर लसूण किसून परतला व त्यात काळी मिरपूड , बारीक चिरलेला पालक आणि हर्ब्ज घातले व परतले, नंतर अर्धी वाटी क्रीम व उकडलेला पास्ता घातला व उकळू दिले व नंतर मॉझ्झोरेला चीज घातले. लागेल तसं (स्टार्चचे) पास्ता उकडलेले पाणी घातले व अजून शिजू दिले. हे पाणी मी वापरतेच.
४ओट्स खिचडी
थोड्या तेलाची फोडणी करून , बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, गाजर, फरसबी, मटार, कोथिंबीर व शेंगदाणे मीठ घालून स्टील कट ओटस, गरम मसाला व पाणी घालून चांगले शिजवले. लिंबू पिळून खाल्ले. मुलांनी बाहेर किंवा नॉनव्हेज खाल्ले की मी हे करून खाते.
अस्मिता या रेसिपीज वेगळा धागा
अस्मिता या रेसिपीज वेगळा धागा प्रत्येकी, अशा सेपरेट लिही. शोधताना सोपं होईल.
(आणि मग थोडे दिवस फोटो-मौन पाळ. इतके छळकुटे फोटो टाकले नाहीस तरी चालतील. :पळा:)
अस्मिता, थँक्यू व्हेरी मच :)
अस्मिता, थँक्यू व्हेरी मच :).माझा व्हाईट सॉस पास्ता कधीही मस्स्स्स्स्स्तं होत नाही :(,म्हणून सोपी असली तरी कृती विचारली
या शनिवारी शाळेच्या मित्रांचा
या शनिवारी रविवारी शाळेच्या मित्रांची गेटटूगेदर पिकनिक झाली त्यासाठी बायकोने बनवून दिलेला केक.
आणि त्यासोबत दुसरा मग घरी पोरांना खाण्यासाठी बनवला.
.
(No subject)
मस्तय बिर्याणी...
मस्तय बिर्याणी...
बिर्याणी… आहाहा!
बिर्याणी… आहाहा!
बिर्याणी सुपर्ब दिसते आहे.
बिर्याणी सुपर्ब दिसते आहे.
केक भारीच. अस्मिता स्टुडंट
केक भारीच. अस्मिताला स्टुडंट पाहिजे का?
बिर्याणी मस्त !
बिर्याणी मस्त !
गेल्या दहा दिवसात, वीस जेवणात मी बहुधा एकदाच वेज खाल्ले असावे. तरीही ताटावर येऊन बसावेसे वाटतेय
सस्मित
सध्या आमच्याकडे लहान पोरांच्या ट्यूशन सुरू केल्या आहेत. तिथे ॲडमिशन हवे असेल तर बोल
आजचा आखाड पार्टीचा बेत
आजचा आखाड पार्टीचा बेत
रस्सा एकदम चमचमित दिसतोय
रस्सा एकदम चमचमित दिसतोय
मला रस्सा झणझणीत दिसतोय..
मला रस्सा झणझणीत दिसतोय..
केक भारी वरचे..
आलूपराठा,थालीपीठ मस्त!!
आखाड पार्टी काय असते?
आखाड पार्टी काय असते?
वेज आहे का ती थाली? काय मेनू आहे त्यात..
हो व्हेजच तर दिसत आहे, आखाड
हो व्हेजच तर दिसत आहे, आखाड थाळी म्हणजे भाकरी, काकडी कोशिंबीर, अणसा फणसाची भाजी, वाटीत दिसत आहे ते पंचामृत , आणि ताटलीत लाल दिसत आहे तशी मसूर डाळीची आमटी, कोणी मसूर करतात, कोणी मूग. पण ही मसूर वाटत आहे. आसा सांगेलच, देशावर आषाढ त्रयोदशीला करतात ही थाळी, जी आज आहे.
Pages