Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज

Submitted by BLACKCAT on 15 May, 2021 - 10:54

अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले.
14500 मे कॉल व पुट सेल केले
14500 जून कॉल व पुट बाय केले.

नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात.

चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो .

15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते .

अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
दिसे भासते ते ते सारे विश्व नाशवंत
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा

आता अजून 4,6 दिवसात प्रॉफिट 8 ते 10 हजार जाईल , ह्या सगळ्या झिजाझीजित निफ्टी 100 ते 120 पॉईंट आरामात मिळून जातात.

ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात

ऑप्शन बाय केले की तो कमी कमी होतो व झिजतो , ह्याला भस्मासुर राक्षस म्हणतात.

ऑप्शन शॉर्ट सेल केले की तो कमी न होता वाढत जातो व आपल्या अंगावर पडतो , ह्याला घटोत्कच राक्षस म्हणतात.

हेज केले की दोघे एकमेकांत भांडत बसतात. Proud आपण 15 दिवस गप्प बसून रहाणे.

1. पोझिशन महिन्याच्या सुरुवातीला घ्यावी, निफ्टी स्पॉटच्या जवळचे ऑप्शन निवडावेत.
2. करंट मंथ कॉल पुट सेल करणे
3. नेक्स्ट मंथ कॉल पुट बाय करणे
4. पोझिशन घेताना आधी बाय करणे , मग सेलच्या पोझिशन घेणे , चारही पोझिशन घेताना सुमारे एक लाख मार्जिन लागते.
5. पण नंतर पोझिशन हेज झाल्याने साधारण 60,000 इतकेच मार्जिन लागते व उर्वरित मार्जिन दुसऱ्या दिवशी मोकळे होते.
6. हळूहळू जवळचे ऑप्शन झिजतात व लांबचे जास्त झिजत नाहीत, पण ही झीज सुमारे 15 दिवसानंतर दिसू लागते. तोवर रोजचे प्रॉफिट लॉस बघत बसणे. ते फारसे नसते , +2500 ते -2500 वगैरे होत रहाते.
7. वीस ते पंचवीस तारखेत शक्यतो प्रॉफिट बुक करावे, निफ्टीचे 100 ते 150 पॉईंट आरामात मिळतात.
8. सगळ्या पोझिशन एकदम स्क्वेअर ऑफ कराव्यात. आधी सेल पोझिशन क्लिअर कराव्यात , मग बाय केलेल्या पोझिशन काढाव्यात. म्हणजे दंड लागत नाही. तसेही सगळे एकदम काढणारच असल्याने दंड बसणारच नाही.
9. असे स्टोकमध्येही करता येईल , मला sbi बरे वाटले , पण कधी केले नाही,
10. बँक निफ्टीतही करता येईल, पण मला अभ्यास नाही.
11. लोक असेच दोन विकली , दोन 15 दिवसवाले , अशाही जोड्या करून स्प्रेड करतात, पण ते फारच धावपळीचे होते.
12. थोडे प्रॉफिट मिळाले 2,4 हजार की पोझिशन मोडून नवीन निफ्टी लेव्हलची पोझिशन घेणे , असेही ट्रेडिंग 2,4 दा करता येईल. पण मी कधी केले नाही.
13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
14. यु ट्यूबवर ह्यावर भरपूर व्हिडीओ आहेत.
Screenshot_2021-05-14-20-14-11-444_com.android.chrome.png

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो बरोबर आहे, एकच नको करायला. एक स्ट्राइक प्राईझ वर शॉर्ट करायला पाहिजे बुल कॉल स्प्रेड करायचा म्हणजे. तेव्हा 19k दाखवतंय. पण मला विचारायचं आहे हे वर्क होतं का व्यवस्थित कारण बास्केट नाही घेतलं तर सेम स्ट्रॅटेजी दीड लाखात येते. आणि एकदा पोझिशन घेतली की एकच लेग ठेऊन पुढे जाता येतं की दोन्ही लेग एकदाच एक्झिट करायला लागतात?

तुमच्या मर्जीने तुम्ही एखादा लेग स्क्वेअर ऑफ करू शकता,

पण जर फक्त बाय पोझिशन ओपन असेल तर 'मार्जिन' शून्य लागेल,
कारण जी किंमत असेल ती देऊनच तुम्ही बाय केले असेल,

मार्जिन फक्त सेल पोझिशनला लागते , म्हणून फक्त सेल पोझिशन ओपन ठेवली तर साधारणपणे दीड लाख मार्जिन लागेल

जर बाय सेल दोन्ही पोझिशन घेऊन हेज केले असेल तर मग मार्जिन कमी लागते.

हव्या त्या बाय सेल पॉझिशन्स बरोबर टाका. तेव्हा व्यवस्थित मार्जिन दाखवते. बाय पोझिशन वर ठेवा, सेल खाली. त्यात जेवढी मार्जिन दाखवतील तेवढीच लागेल. बुल/बिअर कॉल स्प्रेडला जास्त मार्जिन लागत नाही

फक्त बाय पोझिशन ब्लॉक्ड रेंज मधली नसावी. असल्यास आधी सेल पोझीशन वर ठेवा आणि बाय पोझिशन खाली कारण आधी सेल केल्यावरच बाय करता येते ब्लॉक्ड रेंज मध्ये असली तर.
मग इनीशियल मार्जिन जास्त दाखवेल सव्वा लाखाच्या आसपास. तेवढी सुरवातीला लागेल. दोन्ही पोजिशन घेतल्या की फायनल मार्जिन दाखवतात तेवढी ठेऊन बाकीची लगेच मोकळी होते.

बँकनिफ्टीला +/- 200-300.
एक्सपायरीच्या दिवशी मात्र ब्लॉक रेंज मोकळी होते, त्याच दिवशी पोझिशन घेत असाल तर. तसेच इन्ट्राडे पोझिशन घेतली तरी कुठलीही घेता येते. (बाय इन्ट्राडे पोझिशन ओव्हरनाईटला नाही कन्व्हर्ट करता येत, सेल पोझिशन करता येते)

ती बघायला सोपा उपाय. एक हजार लांबचा कॉल / पुट वाचलिस्ट मध्ये घ्या आणि बाय वर क्लिक करा. ओव्हरनाईट. तिथे एरर मेसेज दाखवेल, त्यात खाली कुठली रेंज अलाउड आहे ते दिसेल.

केलाय काहीवेळा. इट्स अ गँबल. मोठी मूव्ह आली तर फायदा नाहीतर नुकसान जरी नुकसान मर्यादीत असले तरी. १२ नंतर टाइम व्हॅल्यू झपाट्याने उतरते.
मोठी मूव्ह अपेक्षित असेल तर लॉंग स्ट्रेडल घ्यावा.

आज काही ट्रेंड्स प्रोफाटेबल होते, पण ते शेवटी मिनिमम लॉस मध्ये गेले

ब्या नि शॉर्ट स्ट्रेडलदेखील 1000 रु लॉस दाखवत आहे , 11000 रु प्रॉफिट असताना काढायला हवे होते , पण अजून त्यात 500 पॉईंट टाइम व्हॅल्यू बाकी आहे, बघू उद्या पर्वा

मी केलेला 10.30 च्या आसपास पण 500 रुपये प्रॉफिट झाला तसा बाहेर पडलो लगेच. आता झोपेतून उठून बघतोय तर झोपच उडाली. ठेवला असता तर 10 हजार प्रॉफिट असता. जाऊ दे नेक्स्ट टाईम कधीतरी.

ठीक आहे
500 रु पण प्रॉफिट आले हे महत्वाचे

1. विकली कॅलेंडर स्प्रेड

2. विकली शॉर्ट स्ट्रेडल करून त्याच आठवड्याचे खालचे वरचे पुट कॉल बाय करणे

3. पुढच्या आठवड्याचे कॉल पुट विकून ह्या आठवड्याचे खालचे वरचे पुट कॉल बाय करणे

हे तिन्ही पर्याय सेमच प्रॉफिट लॉस पोटेन्शल देतात , मार्जिनदेखील सेम लागते , सुमारे 50000.
प्रॉफिट 100-150 पॉईंट्स
लॉस 100-150 पॉईंट्स

52 आठवड्यात प्रॉफिटवाले आठवडे किती आणि लॉसवाले किती असतील ?

( ब्या नि पॉईंट्स)

1. विकली कॅलेंडर स्प्रेड + हे तिन्ही पर्याय सेमच प्रॉफिट लॉस पोटेन्शल देतात , मार्जिनदेखील सेम लागते , सुमारे 50000.
=== >
०दा चा काही problem होतो , buy order execute होते , पण sell order नाही . फुल्ल मार्जिन लागते... १५००० ++

तुम्ही market / Limit order set करता ?

पण आधी बायच एक्झिक्युट व्हायला हवी, नंतर सेल. तरच फुल मार्जिन लागत नाही.
उलट आधी सेल एक्झिक्युट झाली तर फुल मार्जिन लागते.

लिमिट लावण्याचे खास कारण नसेल (उदा. अमुक ऑप्शन मला 100 च्या वर गेला तरच पोझिशन घ्यायचीय) तर मी तरी मार्केट ऑर्डर प्लेस करतो.

आज निफ्टी गॅप अप ओपन झाला त्यामुळे तो खाली येईल या आशेने PE बाय केला पण तो पुन्हा वर जायला लागला आणि ५०० चा लॉस बुक केला. नन्तर ११ च्या सुमारास परत PE बाय केला आणि घेतल्याच्या दुसऱ्या सेकंदात जी काय एस्सेल वर्ल्ड घसरगुंडी सुरु झाली ती विचारू नका. कालच्या सपोर्टजवळ आला आता तसं १६०० प्रॉफिट बुक करून एक्झिट घेतली.

पण आधी बायच एक्झिक्युट व्हायला हवी, नंतर सेल. तरच फुल मार्जिन लागत नाही. ==>

धन्यावाद .. समजले , fund होता पण Collateral जास्त अन cash कमी. बहुतेक (?)

आता घेतले

BANKNIFTY 23 rd SEP 37500 CE Sell @402.85
BANKNIFTY SEP 37500 CE buy @645

Submitted by सतीश on 17 September, 2021 - 12:43>>>> याचा पे ऑफ ग्राफ कसा येतो?

माझा एक प्रश्न आहे. वर जो पेऑफ ग्राफ दाखवलाय त्यात परफेक्ट एका स्ट्राईकला मार्केट एक्सपायर झालं तर मॅक्सिमम प्रॉफिट आहे. मग त्यापेक्षा तुम्ही आयर्न कंडोर स्ट्रॅटेजी का नाही वापरत. मार्जिन जास्त लागतं म्हणून का? की अजून काय कारण आहे?

आयर्न कंडोर == > बघायला पाहिजे....
स्ट्रॅटेजी trading is new for me. ह्या धाग्यावरुनच मी स्ट्रॅटेजी trading करू लागलो आहे...

BANKNIFTY 23 rd SEP 37500 CE Sell @402.85
BANKNIFTY SEP 37500 CE buy @645 === >

closed , at no loss or profit, as next week may be busy.

Pages