Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज

Submitted by BLACKCAT on 15 May, 2021 - 10:54

अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले.
14500 मे कॉल व पुट सेल केले
14500 जून कॉल व पुट बाय केले.

नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात.

चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो .

15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते .

अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
दिसे भासते ते ते सारे विश्व नाशवंत
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा

आता अजून 4,6 दिवसात प्रॉफिट 8 ते 10 हजार जाईल , ह्या सगळ्या झिजाझीजित निफ्टी 100 ते 120 पॉईंट आरामात मिळून जातात.

ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात

ऑप्शन बाय केले की तो कमी कमी होतो व झिजतो , ह्याला भस्मासुर राक्षस म्हणतात.

ऑप्शन शॉर्ट सेल केले की तो कमी न होता वाढत जातो व आपल्या अंगावर पडतो , ह्याला घटोत्कच राक्षस म्हणतात.

हेज केले की दोघे एकमेकांत भांडत बसतात. Proud आपण 15 दिवस गप्प बसून रहाणे.

1. पोझिशन महिन्याच्या सुरुवातीला घ्यावी, निफ्टी स्पॉटच्या जवळचे ऑप्शन निवडावेत.
2. करंट मंथ कॉल पुट सेल करणे
3. नेक्स्ट मंथ कॉल पुट बाय करणे
4. पोझिशन घेताना आधी बाय करणे , मग सेलच्या पोझिशन घेणे , चारही पोझिशन घेताना सुमारे एक लाख मार्जिन लागते.
5. पण नंतर पोझिशन हेज झाल्याने साधारण 60,000 इतकेच मार्जिन लागते व उर्वरित मार्जिन दुसऱ्या दिवशी मोकळे होते.
6. हळूहळू जवळचे ऑप्शन झिजतात व लांबचे जास्त झिजत नाहीत, पण ही झीज सुमारे 15 दिवसानंतर दिसू लागते. तोवर रोजचे प्रॉफिट लॉस बघत बसणे. ते फारसे नसते , +2500 ते -2500 वगैरे होत रहाते.
7. वीस ते पंचवीस तारखेत शक्यतो प्रॉफिट बुक करावे, निफ्टीचे 100 ते 150 पॉईंट आरामात मिळतात.
8. सगळ्या पोझिशन एकदम स्क्वेअर ऑफ कराव्यात. आधी सेल पोझिशन क्लिअर कराव्यात , मग बाय केलेल्या पोझिशन काढाव्यात. म्हणजे दंड लागत नाही. तसेही सगळे एकदम काढणारच असल्याने दंड बसणारच नाही.
9. असे स्टोकमध्येही करता येईल , मला sbi बरे वाटले , पण कधी केले नाही,
10. बँक निफ्टीतही करता येईल, पण मला अभ्यास नाही.
11. लोक असेच दोन विकली , दोन 15 दिवसवाले , अशाही जोड्या करून स्प्रेड करतात, पण ते फारच धावपळीचे होते.
12. थोडे प्रॉफिट मिळाले 2,4 हजार की पोझिशन मोडून नवीन निफ्टी लेव्हलची पोझिशन घेणे , असेही ट्रेडिंग 2,4 दा करता येईल. पण मी कधी केले नाही.
13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
14. यु ट्यूबवर ह्यावर भरपूर व्हिडीओ आहेत.
Screenshot_2021-05-14-20-14-11-444_com.android.chrome.png

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चार लेग

800 रु प्रॉफिट आले

पण इतके आवडले नाही

SAS open झाले
ग्राफ झिरोदावरून ढापले आहे

बाकी ठीकठाक आहे

ब्रोकरेज कमी येते का बघू

Screenshot_2021-08-10-17-20-42-995_in.alpha_.sasonline.png

अभि आयपीव्ही बाकी है

मुंडीसमोर पॅन कार्ड आधार कार्ड धरून व कागदावर सही खरडून व्हिडीओ काढायचा आहे

SAS online सुरू झाले

Alfa म्हणून एक एप आहे
आणि एक वेब व्हर्जन आहे

वेब व्हरजन झिरोदाची कॉपी आहे

Screenshot_2021-08-10-19-20-17-260_com.android.chrome.png

SAS online सुरू झाले ==>
मलाही indiainfoline चे खाते उघडावे असे वाटत आहे ... त्यांचा R&D, F&O data, Stock Ideas and Recommendations , section वर उपयोगी माहीती दिसत आहे....

https://www.indiainfoline.com/markets/derivatives/futures

indiainfoline चे ब्रोकरजही 0दा सारखे आहे , पण "किती ट्रेडींग खाती ? " हा विचार येतो , Tax return file करतानाही सर्व हिशोब द्यावा लागतो...

0दा , Upstox वर अनेकदा rate " वेळेत " update नाही होत, अस अनेकदा अनुभवल , technical issue तर अपेक्षित
ठेवलेच होते .

icici neo ब्रोकरेज कमी बाकी काही विशेष सुधारणा नाही....

Option trading एक सेल व एक बाय ने हेज केल्यावर ,
जर सेल position profit मध्ये असेल तर ती काढावी अन अन बाय ठेवावी का ? ( बाय position काही दिवसांनी profit मध्ये जाईल असे वाटत असल्यास )

---> option sell position - block margin हे टाळन्याकरिता...

Screenshot_2021-08-12-17-20-45-344_com.android.chrome.png

Required margin
Final margin

म्हणजे नेमके काय ?

आधी शॉर्ट एन्ट्री घेत असल्याने त्यासाठी तेवढी मार्जिन लागते, ती Required margin.
मग हेज पोझिशन घेतल्यावर मार्जिन मोकळी होऊन जी शेवटी लागेल ती Final Margin.

याच बास्केट मध्ये लॉंग पोझिशन्स वर करा. मग दोन्ही जवळपास सारख्याच दिसतील. (फक्त क्रेडिट होणाऱ्या अमाउंटचा फरक असेल.)
पण झिरोदात अर्थात शॉर्ट पोझिशनच्या आधी दूरची लॉंग पोझिशन ठेवली तर ती execute होणार नाही.
तेव्हा वर एक शॉर्ट पोझिशन, त्याखाली लॉंग, परत शॉर्ट परत लॉंग असे केल्यास Required margin कमी दाखवेल.

तसे केले, पण तरीही मार्जिन required 67000 दाखवत आहे.

Screenshot_2021-08-12-17-45-25-939_com.android.chrome.png

इतर ब्रोकरमध्ये केले तर आधी दोन बाय करून मग सेल पोझिशन केले तर मार्जिन इतकेच लागेल का ?

हेज पोझिशनचा प्रीमियम 1 रु आहे की 100 रु , आणि तो कुठल्या एक्सपायरीचा आहे , ह्यावर मार्जिन कमी जास्त ठरते का ?

आता हेज करतानाचे ऑप्शन डबल क्वांटीटीत आहेत, पण किंमत चार आणे , आठ आणे इतकीच आहे.

Screenshot_2021-08-12-18-12-54-282_com.android.chrome.png

Expiry ला ITM ऑप्शन डिलिव्हरी होऊन सेटल होतो म्हणे

स्टॉक मध्ये डिलिव्हरी होईल

निफ्टी तर शेअर नाही , मग त्यात डिलिव्हरी कशी होईल ?

आज झिरोदावर आणि एकसिसवर मार्जिनला काहीतरी झाले
बाय आधी करूनही सेल झाले नाही

झिरोदाची बास्केट ऑर्डर मार्जिन कमी असेल तर अर्धवट एक्झिक्युट होते , ते जास्ती डेंजरस आहे, हमखास फटका बसतो

ब्या नि गेल्या आठवड्यात atm call put विकले आहेत, मार्जिन दीड लाख , एक आठवड्यात 4000 रु नफ्यात आले.
Screenshot_2021-09-07-13-47-41-034_com.axis_.login_.png

हे ऑप्शन एक तारखेला दोन्ही मिळून 1500 प्लस प्रीमियममध्ये असतात , एक आठवड्यात 100,200 तरी झिजतातच

वरच्या साठी १ आठवड्यात स्पॉट कितीने मूव्ह झाला एन्ट्री घेतल्या पासुन?

आता जास्त लक्ष देता येत नाहीय ट्रेडिंग वेळेला.
मी सप्टेंबर चे बँकनिफ्टी 38000 कॉल्स विकून ऑगस्ट 38500 ने हेज केले होते. ऑगस्ट एन्डला आता ऑगस्ट हेज काढून सप्टेंबरचे हेज घ्यायचे. म्हणुन मी ऑगस्टचे चारही हेज square ऑफ केले. तर माखे मार्जिन खूप वाढले. चारही शॉर्ट पोसिशन्स नेकेड. ४ लाखच्या वर मार्जिन. माझ्या खात्यात होते 2.7 लाख. १.३ लाख मायनस.
आता सप्टेंबरचे हेज आधी घेतले असते तर, ते घेऊन ऑगस्ट काढले असते. मार्जिनचा प्रश्नच आला नसता.
पण झिरोदा तसे करू देत नाही. म्हणुन दोन कॉल्स शॉर्ट पोजीशन्स squreoff केल्या. तेव्हा मार्जिन प्लस झाले. मग सप्टेंबर चे दोन हेज घेतले.
अशारितीने एक महिना थांबून दोन लॉट्स 600 रुपयात स्क्वेअर ऑफ करावे लागले. बाकी दोन लॉट्स सुरू आहेत.

मग राहिलेल्या कॅपिटलचे दर सोमवारी अडीच नंतर बँकनिफ्टी कॉल्स विकले. सगळं चांगलं चाललं होतं. पण 2 Sep. 36800 CE पाच लॉट्स विकले असताना मिटिंग सुरू असताना ट्रिगर मेसेज आला बँक निफ्टी > 36800.
अन त्या दिवशी कामंही बरीच होती वेळ मिळणार नव्हता.
मिटिंग संपल्यावर पाहिले तर बँकनिफ्टी 36900 च्या वर गेलेला. परत कस्टमर कडे जायचे होते. मग सरळ squre ऑफ करून टाकले 17 हजार लॉस.
आणि दुसऱ्या दिवशी निफ्टी क्लोज झाला 36834. आदल्या दिवशी लॉस बुक केला नसता तर लॉस 17 हजार ऎवजी 1200 झाला असता. पण ते त्यावेळचं नियमा प्रमाणे डिसीजन होतं.
लगेच 35900 च पुट्स विकले. त्याचे 3400 मिळाले.
उद्याच्या एक्सपायरीला फार नाही, 1800 निघतील. आता झिरोदात दोनच लॉट्स पोझिशन घेता येत आहे (दोन सप्टेंबर एन्डचे ऑलरेडी आहेत) आणि शेअरखान मध्ये एक घेता येते. सप्टेंबर एन्ड पर्यन्त लॉस भरून निघेल.
निफ्टी कडे बघायला हवे आता, वेळ मिळाला की.

आज पोर्टफोलिओ हेज केला. फक्त 4.२ लाखांचा आहे.
हेज साठी NIFTY Sep Fut विकले आणि 16800 CE विकत घेतला. मॅक्स लॉस 3,500. जर मार्केट खाली नाही गेले, वर गेले तर हा लॉस. खाली गेले की मिळणारे प्रॉफिट पोर्टफोलिओच्या लॉसच्या आसपास असेल.

मी atm विकले आहेत

म्हणजे स्पॉट 36500 च्या आसपास होता
आजही त्याच्या आसपास आहे,
मध्ये एकदा 500 खाली गेला होता

आज मज्जा
ब्या नि 36800 च्या वर एक दोनदा गेले पण टिकले नाही

मग 36700 च्या खालीच गेले , म्हणून 36700 चे कॉल सेल केले , 99.00 रु , दोन लॉट, 5 रु ला बाय केले
4800 रु नफा.

पूर्वीचे शॉर्ट स्ट्रेडलही 6000 रु नफ्यात आले आहे, ते अजून तसेच ठेवले आहे.

IMG_20210909_152345.jpg

विकली डबल स्प्रेड 2 lot केले असते तरी इतकेच प्रॉफिट आले असते, पण 36800 ला टिकले नाही , हा क्लयु जरा स्ट्रॉंग वाटला , एक्सपायरीच्या दुसऱ्या दिवशी सणाची सुट्टी असेल तर मार्केट फार वाढत नाही कारण लोकांना सणाला पैसा हवा असतो, म्हणून वोल्युमही कमी असतो.

निफटीला वोल्युम नसतो, पण प्रत्येक सेकटरचे एकेक मेजर शेअरचे वोल्युम बघून अंदाज घेता येईल का ? सगळे 50 वोल्युम चेक करत बसणे अवघड आहे

निफटीला वोल्युम नसतो, पण प्रत्येक सेकटरचे एकेक मेजर शेअरचे वोल्युम बघून अंदाज घेता येईल का ?

>>>>>>
हो नक्कीच अंदाज घेता येईल.

इथे Sector wise stocks volume पाहता येईल.
https://www.moneycontrol.com/markets/indian-indices/?ind_id=19&classic=true

इथून सेक्टर निवडावा लागेल:-

Screenshot_2021-09-09-16-54-02-328_com.android.chrome.png

म्हणून 36700 चे कॉल सेल केले >> हे फार अग्रेसिव्ह ट्रेंडिंग झाले. अचानक मोठा फटका बसू शकतो.

Nifty sectors ला ही लाईव्ह volume दिसत नाही.

स्वप्निल ती लिंक लाईव्ह volume दाखवते का?

हो, 36800 कॉल सेल करणार होतो, पण तसेही 36800 च्या खाली येऊन 36650 झाले होते , म्हणून 36700 कॉल शॉर्ट केले, ते तसेही तेंव्हा 100 रु होते , म्हणजे 36800 च्या वर गेले तरच लॉस होणार होता

आजचा वोल्युम वाढलाय का हे बघायला असे करतात

कालचा वोल्युम घ्या
6 ने भागा , कारण मार्केट 6 तास चालते

एव्हरेज एका तासाचा वोल्युम येईल

आता आजचा 1 तासचा वोल्युम त्याच्यापेक्षा जास्त असेल तर आजचा वोल्युम वाढण्याची शक्यता जास्त असते

स्वप्निल ती लिंक लाईव्ह volume दाखवते का?

Submitted by मानव पृथ्वीकर on 9 September, 2021 - 17:02

>>>>>>>
हो ,फक्त थोडासा Delay असेल.

स्ट्रॅडल 11000 प्रॉफिटमध्ये गेले होते, पण ब्या निफ्टी अचानक वाढल्याने शॉर्ट कॉलचे प्रॉफिट कमी झाले व आता 9000 नेट प्रॉफिट आहे.

उद्या गुरुवार , बघू काय करायचे

मी आता बास्केट ऑर्डर ऍड करून बघितली जिथे दीड लाख लागतात तिथे अडीच हजार मार्जिन लागतंय. सेम स्ट्राइक कॉल बाय सेल करून. एव्हडं कमी मार्जिन कसं काय की मी चुकतोय ऍड करण्यात.

Pages