आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजची मॅच पण मस्त झाली. चेन्नई ने फास आवळले होते, पण दिल्ली जबर जिगरीने खेळले. मिडल ऑर्डर चा कमकुवतपणा चेन्नई ला भोवला. दिल्लीने हेटमयरला खाली ठेवून (अश्विन ला पुढे पाठवून) त्यांची बॅटींग डेप्थ वाढवली. शेवटी गौथमने सोडलेला कॅच महत्वाचा ठरला.

तसं असेल तर धवन देखील जिद्दीने आपला क्लेम लावण्याच्या प्रयत्नात आहेच. >>>> राहुल आणि शर्माला बसवत नाही. धवनचे अवघड आहे. कारण त्याला घ्यायचे असते तर गेले दोन वर्षे त्याने जे केले तेच पुरेसे होते. तरी राखीव ओपनर हवा झाल्यास अय्यर, गायकवाड यांचाही विचार होऊ शकतोच. टांगती तलवार तर सुर्या आणि ईशान किशन यांच्या डोक्यावर आहे कारण ते बिलकुल लयीत दिसत नाहीयेत. आणि दोघांनाही घेतले तर एकाला अकरात खेळवावेही लागेल.

"धमाल असते आयपीएल" - जरा बाकीच्या क्रिकेटच्या मॅचेस (आंतरराष्ट्रीय, लीग्ज, डोमेस्टीक) आणि इतर खेळही बघत चला.

"धवनचे अवघड आहे. कारण त्याला घ्यायचे असते तर गेले दोन वर्षे त्याने जे केले तेच पुरेसे होते." - मलाही असंच वाटतं. टी-२०मधे वेळ झाली तर कोहलीसुद्धा ओपन करू शकतो. गेला बाजार इशान किशन चा सुद्धा पर्याय आहे. तसंही कुणी इंज्युअर्ड झालं नाही तर निवडलेल्या संघात फारसा बदल संभवत नाही.

*शेवटी गौथमने सोडलेला कॅच महत्वाचा ठरला.* इतका खालीं असलेला -बसून घ्यावा लागणारा- झेल जुन्या सुरक्षित पद्धतिने कां घेतला जात नाहीं, तें कळत नाहीं!
*धवनचे अवघड आहे. * एकदम मान्य. पण तो जिद्दीने व आशेने प्रयत्न करतोय हें जाणवतं, इतकंच.

"झेल जुन्या सुरक्षित पद्धतिने कां घेतला जात नाहीं, तें कळत नाहीं!" - ट्रेनिंग!! रिव्हर्स कप पद्धतीनं कॅचेस घेण्याचं ट्रेनिंग (दिव्यांमुळे, बहुदा) इतकं दिलं जातं की ती प्रतिक्षिप्त क्रिया होते आताशा. परवा डि-कॉक ने घेतलेला कॅच पाहिलात का? बेसबॉल पद्धतीनं घेतला. डायव्हिंग कॅच घेतानासुद्धा रिव्हर्स कप होता. डे अँड नाईट क्रिकेट ऑस्ट्रेलियात सुरू झाल्यामुळे हे रिव्हर्स कप कॅचेस आधी ऑस्ट्रेलियन प्लेयर्स (प्रामुख्यानं) घ्यायचे, पण आता सगळे तसेच घेतात.

रिव्हर्स कप पद्धतीनं कॅचेस घेण्याचं ट्रेनिंग (दिव्यांमुळे, बहुदा) इतकं दिलं जातं की ती प्रतिक्षिप्त क्रिया होते आताशा. > दिव्यांमूळेच. माझा वैयक्तिक अनुभव उंच कॅचेस घेणे सोपे पडते नि अधिक रीलायेबल वाटते. परत जर वारा असेल तर अ‍ॅडजस्ट्मेंट करायलाही सोपे होते.

तसंही कुणी इंज्युअर्ड झालं नाही तर निवडलेल्या संघात फारसा बदल संभवत नाही. >> एक हर्शद पटेल वगळता मलाही तसेच वाटते. इथेच मॅचेस असल्यामूले नि हर्शद पटेल भयंकर उपयुक्त ठरतोय इथे हे बघून त्याला खेळवावे असे वाटते.

होय, ऑसीजनी फार पूर्वीपासून ही रिव्हर्स कप पद्धत आणली पण विशेषत: 'लो कॅचेस'साठी ती ढळढळीत चुकीची आहे हेही खरं.

"पण विशेषत: 'लो कॅचेस'साठी ती ढळढळीत चुकीची आहे हेही खरं." - सहमत! बरोबर आहे. पण एकदा ती प्रतिक्षिप्त क्रिया झाल्यावर फारश्या जाणीवपूर्वक तो निर्णय होत नसावा. त्या गौथमच्या कॅचबद्दल बोलायचं तर बहूतेक त्याने बॉल हवेत उडाल्यावर रिव्हर्स कप अ‍ॅक्शन केली, बॉल त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत 'डीप' होत गेला आणि तो त्याच पोझिशनमधे गुढघ्यामधे खाली वाकत स्वतःला अ‍ॅडजस्ट करत गेला.

फेफजी, मीं क्लब क्रिकेट खेळत असे ( कृपया हंसू नका ! ) त्याला दशकं लोटलीं. पण तेव्हा एक नवीन फॅड म्हणून आम्ही देखिल ही रिव्हर्स कप पद्धत वापरून बघितली होती. मलां ती कधीच आवडली नाही. अर्थात, आऊटफिल्डमधे नसले तरीही स्लिपमधे छातीच्या वर आलेले झेल reflexesमुळे पूर्वीही रिव्हर्स कप पद्धत वापरूनच पकडले जात असत.
हें आपलं सहज विषय आला म्हणून.

*कारण वर्ल्ड चॅम्पियन कांगारू ती पद्धत वापरायचे.* नशीब, त्यांचं आगाऊपणाचं फॅड नाहीं आलं आपल्याकडे ( अर्थात, मीं फक्त इथेच अधूनमधून बघतो जरा वापरून तें ) !!! Wink

आजची विकेट टू-पेस्ड वाटतीय अजून तरी. जैस्वाल ची विकेट प्रॉपर फास्ट बॉल वर गेलीय पण लुइस खाली राहिलेल्या बॉलवर एलबीडब्ल्यू झाला. सॅमसन आऊट झाला तो बॉलसुद्धा थोडा स्लो बॅटवर आला. दोन्ही टीम्स च्या बॅट्समेनना बराच पेशन्स ठेवून खेळावं लागणार आहे.

दोन्ही टीम्स च्या बॅट्समेनना बराच पेशन्स ठेवून खेळावं लागणार आहे. >> लफडे असे आहे की मुंबै ला रन रेट वाढवायचा असेल तर धूमधडाक्याशिवाय सुरूवात नाही. किशन त्यासाठीच ओपन करणार असेल असे वाटते.

राजस्थान १०० च्या पलिकडे सुद्धा जाईल असं वाटत नाहीये. त्यामुळे मुंबई ला रन रेट वाढवायला आता फुल्ल स्कोप आहे. पण खरं तर ह्या सगळ्यांमधे केकेआर च जास्त डिझर्व्हिंग आहेत.

दहा ओव्हर्स मधे टारगेट चेस करणे जरुरी आहे नि बॉल हार्ड असताना बॅटवर येण्याचे चान्सेस अधिक आहेत , किशान चा रोल हाणामारी हा आहे हे माहित असताना संपूर्ण ओव्हर मेडन जाऊ देणे हा जबरदस्त डावपेचाचा भाग असावा. बॉलिंग टीम ला एव्हढे बेसावध करायचे नि नंतर कोथळाच काढायचा बस्स ....

हेटमाय - ब्राव्हो बद्दल वर पोस्ट लिहिणार्‍यांनी थोडासा CPL ह्या प्रकाराचा अभ्यास करावा अशी नम्र विनंती.

दहा ओव्हर्स मधे टारगेट चेस करणे जरुरी आहे नि >>>> ८ ओवर २ बॉल मध्ये झाले ओ Lol अजून किती कोथळा काढावा माणसाने

मुळात ते सुद्धा कधी पिक्चरमध्ये आले तर करो या मरो सामन्यात राजस्थान काहीच प्रतिकार न करता ९० वर थांबली Lol

आणि राजस्थान पण किती ढोंगीपणा करत होती. बॅट जरा ऊचलली तर एज वगैरे लागून रन्स मिळतील म्हणून टेस्ट मॅच स्टाईल बॅटींग. बॉल पिचच्याही बाहेर जाणार नाही याची काळजी घेत खेळत होते Lol आई ग्ग अगदी शून्य बॅट स्विंग.. अगदी फ्री हिट मिळाल्यावर सुद्धा हीच काळजी घेतली Lol
आणि हेच राजस्थान गेल्या मॅचला चेन्नईला तुडवत होते Lol

अर्थात त्यांच्या बॉलर्सनीही काही कमी मेहनत नाही घेतली. लेग स्टंपवर बॉलिंग टाकली. डीप पॉईंट, डीप कवरचा एरीया मोकळा सोडून ऑफ स्टंप बाहेर बॉल टाकले. फ्री हिट बहाल करत सिक्स दिले. ईशान किशनला फॉर्मला आणला. सुर्यालाही मदत करत होते. त्याने आपल्या कर्माने धावा लुटण्याची संधी घालवली. रोहीत शर्माची तर संजूने छान पद्धतशीर स्टंपिंग सोडली. आणि मग शेवटी टिपिकल स्लॉगमध्ये बॉलिंग टाकून झटपट सामना संपवायला मदत केली Lol आई ग्ग.. ब्यूटी ऑफ आय पी एल.. Lol बेहद्द खुश केले आज या लोकांनी Happy

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 October, 2021 - 22:33>>> +11111 मला वाटतंय मुंबई हा पण कप जिंकणार. पुढच्या सामन्यात kkr अशीच हारणार. मुक्याकडे खूप पैसे आहेत.

८ ओवर २ बॉल मध्ये झाले ओ Lol अजून किती कोथळा काढावा माणसाने >> तू रोहित ची मुलाखत ऐकली का नंतर ? तो त्याबदल नक्कीच खूश नव्हता. मेडन ओव्हर हा शुद्ध जुगार होता. दोन रन रेट्स मधला फरक बघ - जेव्ह्ढय लवकर करणे जरुरी होते त्यासाठी मेडन ओव्हर झेपत नाही.

+11111 मला वाटतंय मुंबई हा पण कप जिंकणार. >>> छे बोकलत, हे गरजेचे नाहीये. दिल्ली चेन्नई फायनल सुद्धा टीआरपी खेचणार. मुंबईच हवी असे गरजेचे नाही. यंदा धोनीचा निरोप असल्याने चेन्नई अंतिम सामन्याला असेल तर तो सुद्धा एक वेगळाच भावनिक माहौल असेल.
पण तुर्तास लीग सामन्यांचा विचार करता अखेरच्या दिवशी मुंबईचा सामना आहे. तो टीआरपीच्या दृष्टीने निरर्थक न होणे गरजेचे होते. मुंबईचे स्पर्धेत टिकून राहणे गरजेचे होते आणि त्यासाठी आज मुंबईचा नुसता विजय नाही तर मोठा विजय, नव्हे नव्हे कायच्या काय मोठ्ठा विजय गरजेचा होता आणि तो आला Happy

असामी, पुर्ण सामना सेट झाल्याप्रमाने झाला आणि तुम्ही एक मेडन ओवर घेऊन बसलात
त्यातही त्याचा रोहीतने मुद्दाम उल्लेख केला असेल तर मग ती मुद्दाम काढली आहे आणि बोलून दाखवली आहे Lol
राजस्थान बॉलिंग कशीही करत होती पण ग्राऊंड फिल्डींग जीव तोडून हे सुद्धा याचसाठी Happy
शेवटी काय तर राजस्थान ४२-१ वरून फक्त ९० धावा आणि मुंबई ८ ओवर २ बॉलमध्ये चेस Happy

सर, पण प्रत्येक काम अगदीं नेमक ठरवल्यानुसारच व्हायला आपण काय आयपीएल आहोत का ?20190103_072130_0 (1).jpg

पण तुर्तास लीग सामन्यांचा विचार करता अखेरच्या दिवशी मुंबईचा सामना आहे. तो टीआरपीच्या दृष्टीने निरर्थक न होणे गरजेचे होते. मुंबईचे स्पर्धेत टिकून राहणे गरजेचे होते आणि त्यासाठी आज मुंबईचा नुसता विजय नाही तर मोठा विजय, नव्हे नव्हे कायच्या काय मोठ्ठा विजय गरजेचा होता आणि तो आला Happy

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 5 October, 2021 - 23:00
>>>>>>>>+१
टीआरपी साठी कायपण.
सुरुवातीला , शनिवार रविवार आणि शेवटी मुंबई, चेन्नई बंगलोर यांचे सामने होणे टीआरपी साठी गरजेचे आहे.

मुंबई आणि कलकत्याच्या रनरेटमधील फरक कॅलक्युलेट केला. पुढची मॅच कलकत्ता जेमतेम लास्ट बॉलला जिंकली तरी रनरेटचा फरक एवढा आहे की सेम आजच्याच मॅचची पुनरावृत्ती मुंबईला पुन्हा करावी लागेल. पुन्हा असा ९ ओवर चेस कसे मॅनेज करतील. त्यामुळे कलकत्ता पुढचा सामना हरली तरच मुंबई गेममध्ये आहे.
आजच्या सामन्याने फक्त हवा केलीय बस्स..

KKR च टेन्शन घेऊ नका रे KKR च्या मालकाचं पोरग आपल्या ताब्यात आहे
- अशी एक पोस्ट फिरतेय Proud

असामी, पुर्ण सामना सेट झाल्याप्रमाने झाला आणि तुम्ही एक मेडन ओवर घेऊन बसलात >> तुला वाटते मॅच सेट आहे. मला वाटत नाही. तुझ्या गल्लीबोळातल्या पुराव्यांवर माझा विश्वास नाही. - मला वाटते हे शंभर वेळा बोलून झालय. तू जिथून येतो आहेस त्याबद्दलच्या मुद्द्यांबद्दल मला अजिबात इंटरेस्ट नाही.

*मॅच सेट आहे. मला वाटत नाही* - असामीजी, मीं देखील शक्यतो अशा शंका दूर लोटत असतो. पण ते करणं आतां आयपीएलमधे अधिकाधिक कठीण होतंय, हें मान्य करतो.
Too blatant to ignore !

>>पण ते करणं आतां आयपीएलमधे अधिकाधिक कठीण होतंय, हें मान्य करतो.

ऋन्मेषचे हॅमरींग काम करतय असे दिसतय!! Wink

कालच्या मॅचमध्ये मलातरी काही अनपेक्षित वाटले नाही..... एक दोन चमकदार विजयांनी चाहत्यांना आशा लावून ठेवणे आणि मोक्याच्या क्षणी अवसानघातकीपणा करणे हे राजस्थानचे व्यवच्छेदक लक्षण बनलेय आणि स्लो स्टार्ट करुन नंतर मुसंडी मारण्याचा मुंबईचा स्थायीभाव पण काही नवीन नाहिये.
कोलकाताने मात्र अनपेक्षित मेकओव्हर केलाय...... They deserve to be in playoffs.

* स्लो स्टार्ट करुन नंतर मुसंडी मारण्याचा मुंबईचा स्थायीभाव* - अहो, हें पालुपद तर मींच इथे गुणगुणतोय. तरी पण मला शंका यावी, हें महत्वाचं.
* ऋन्मेषचे हॅमरींग काम करतय असे दिसतय!! * - जें दिसतंय, तें सर्वच मीं उघड्या डोळ्यांनी पहातो. जें मीं म्हणतो, फक्त तेवढंच पहाणं मला जमत नाहीं, इतकंच. Wink

Pages