आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दरवर्षी मुंबई जिंकायला लागली तर बाकीच्या संघांचे मालक त्यांच्या खेळाडूंना शेतावर काम करायला पाठवतील ना. धोनी डोक्याला टॉवेल बांधून मशीनवर भारा झोडतोय, कोहली आणि राहुल त्याला खाली बसून एक एक पेंडा देताहेत. भारा संपत आल्यावर पंत बनियानवर एक एक भारा घेऊन येतोय. अनुष्का साक्षी सगळ्यांना दुपारी जेवण घेऊन येताहेत. पाणी संपल्यावर सिराज शामी बाजूच्या तळ्यावर जाऊन सगळ्यांना एक हंडाभर पाणी घेऊन येताहेत. कसं वाटतं हे. त्यामुळे सगळ्याच फायनल मुंबई जिंकायला नको.

आता ते आरआरने फिक्सिंग केले की खरंच बॅटिंग ढेपाळली ते ठरवायचे आहे फक्त. >> Happy चला एकदाचा फिक्सिंग वाल्यांनाच फिक्स केले मॅच ने
Wink

मुंबईला आता १७० धावांनी जिंकायचे आहे
आणि चेस आले तर चान्सच नाही

चौथी टीम कलकत्ताच आली जी डिजर्व्ह करत होती.

दिल्ली
चेन्नई
बेंगलोर
कलकत्ता

फायनल बहुधा दिल्ली चेन्नई जे स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच वाटत होते. धोनीचा अखेरचा आयपीएल सामना. माहीचे अखेरचे दर्शन. माहौल होणार आहे नुसता.....

चला एकदाचा फिक्सिंग वाल्यांनाच फिक्स केले मॅच ने
>>>
फिक्सिंग वाले कधीच फिक्स होत नाहीत. त्यांना जेव्हा जे करायचे असेल तेव्हा ते फिक्स करतातच. तुमच्या आमच्या भावनांचा विचार करत नाहीत Happy

आज आरआरचा कोलॅप्स बघून लोकांना आधीच्या सामन्यातील कुंथणे आता खरे वाटू लागलेय Happy
ते लोकं नेहमी ईतरांपेक्षा एक पाऊन पुढचा विचार करतात Happy

तूं मोबाईल फेकून मारलास तिला, केवळ तुझी पत्नी
' मुंबईबाहेर गेल्यावरच बरं वाटेल मला ', म्हणाली म्हणून
!!timeout2.JPG

' मुंबईबाहेर गेल्यावरच बरं वाटेल मला ',>> भाउ, आमच्या कडे माझ मलाच फार कंट्रोल ठेवाव लागत. आमच्या कडची इतर मंडळी धोनी आणि म्हणून चेन्नाइ सपोर्टर आहेत. आता दिल्लीचा झेंडा फिरवायला लागेल.

पण हे पा. हे सगळ ठरलेल असतय. आज कोणीही टॉस जिंको, मुंबईची पहिली बॅटींग. मग २०० + धावा =(क्ष). मग हैदराबाद क्ष -१७१.
याच्यात एकच प्रॉब्लेम आहे. हैदराबादचे बहूतेक खेळाडू चौफे (चौथी फेल) आहेत. पण चिंता नको त्यांना गणित शिकवण्याची मुकेशने शाखा वर जबाबदारी टाकलीय. पण त्याच तरी गणित पक्क आहे का?. नाहितर नेमके क्ष-१६९ करायचे.

संघांचे मालक, कर्णधार, खेळाडू,प्रशिक्षक, मेंटाॅर, सपोरटींग स्टाफ , टीव्ही चॅनेल, समालोचक, तज्ञ, बीसीसीआय......कुणीच ' मायनस ' होत नाहीं, निकाल कांहीही लागले तरीही. मग , इतके जण इतक्या मोठ्या प्रमाणात हमखास ' प्लस ' होत असतील, तर कुणीतरी तितक्याच प्रमाणात ' मायनस ' होतच असणार ना !!अर्थात, आपण !!!! देखते रहो आयपीएल , कुरकुर नको !!! Wink

विक्रमसिंह, आयपीएलमधील सेटींग वा फिक्सिंग मुंबईला जिंकवायला होत नाहीत Happy
माझ्या त्या दिवशीच्या या पोस्ट वाचा.
>>>>

छे बोकलत, हे गरजेचे नाहीये. दिल्ली चेन्नई फायनल सुद्धा टीआरपी खेचणार. मुंबईच हवी असे गरजेचे नाही. यंदा धोनीचा निरोप असल्याने चेन्नई अंतिम सामन्याला असेल तर तो सुद्धा एक वेगळाच भावनिक माहौल असेल.
मुंबई आणि कलकत्याच्या रनरेटमधील फरक कॅलक्युलेट केला. पुढची मॅच कलकत्ता जेमतेम लास्ट बॉलला जिंकली तरी रनरेटचा फरक एवढा आहे की सेम आजच्याच मॅचची पुनरावृत्ती मुंबईला पुन्हा करावी लागेल. पुन्हा असा ९ ओवर चेस कसे मॅनेज करतील. त्यामुळे कलकत्ता पुढचा सामना हरली तरच मुंबई गेममध्ये आहे.
आजच्या सामन्याने फक्त हवा केलीय बस्स..

>>>>>>

Happy

आज मुंबई पहिली फलंदाजी ३२५+ धावा फलकावर!

आणि हैद्राबाद १५० पर्यंत धावा करणार असे आयोजकांचे ठरलेले असावे असे वाटते,

म्हणजे सर्वच सामने भरगच्च टी आर पी वाले.

असा प्राथमिक अंदाज बोकलत यांच्या 'भविष्यवाणी कशी सांगावी' ह्या पुस्तकाच्या आधारे वर्तविण्यात येत आहे असे ऐकिवात आहे! Wink

धोनी त्याचा अखेरचा सामना चेन्नाइला २२ च्या आय्पीएल मधे खेळणार आहे.
>>>>

आमीन _/\_
फक्त त्याने फलंदाजीला येऊ नये. ती बघवत नाही. दिमाग मात्र आज पण आणि काल पण आणि उद्या पण.. जबर्रदस्त

बाकी या आयपीएलनंतर मेगा लिलाव आहे. धोनीला खेळायचे झाल्यास चेन्नईमे त्याला रिटेन करावे लागेल किंवा पुन्हा लिलावात घ्यावे लागेल.

इशान किशन जबरदस्त खेळतोय. गेल्या २ मॅचेस तो परत फॉर्ममधे येतोय ही भारतासाठी आनंदाची बाब आहे. मोक्याच्या वेळी खेळ उंचावणं ही मुंबईची खासियत आहे.

मोक्याच्या वेळी खेळ उंचावणं ही मुंबईची खासियत आहे.
+७८६..
आयपीएलची सुद्धा
ज्या मॅचला काही अर्थ नाही तिथेही रंगत तयार झाली. लोकं दिल्ली बेंगलोर सोडून हा कालपर्यण्त निरर्थक असलेला सामना बघू लागलेत.. Happy

होल्डरच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्या बाद झाला. याचे पापक्षालन म्हणून होल्डरने ५ वाईडचा बॉल टाकला. आणि पुढच्या बॉलला फिल्डरने बाऊंडरीला मिसफिल्ड करत चौकार दिला.
मुंबई ९ ओवर १२४-२

मॅचचे जे काही होवो ते होवो. ज्या संघाला १७१ धावांनी जिंकणे असा अशक्य चमत्कार करायचा आहे तो सामनाही लोकं बघू लागलेत. दिल्ली बेंगलोर कोणाला पडलीच नाही..

सुर्यकुमारला पहिल्याच बॉलला मिसफिल्ड करून बाऊंडरीला चौकार दिला आणि विश्वासही दिला.. आम्ही तुझ्या सोबत आहोत.. आज लढायचेय Lol

पोलार्डला अंपायरने बाद दिले. रिव्यू घेतला त्याने. तरी एलबी डब्ल्यू चा रिप्ले बघून परत गेलेला अर्धा रस्ता... पण बॉल ट्रॅकरमध्ये बॉल मिसिंग आणि परत फिरला.. एकेक धमाल नुसती Lol

>>ऋन्मेषचे हॅमरींग काम करतय असे दिसतय!! >> म्हतारी मेल्याचे का म्हणत होतो कळले ना स्वरुप

असूदे रे..... जास्त हवा देऊ नका!
Everyone has right to believe their beliefs

Everyone has right to believe their beliefs >> No objection to have their whatever corrupt views they have. Objection is to keep on spitting same in every post spoiling any meaningful discussions. It's not single post, every page is littered with such posts. आता इथेच बघ ना, किशन च्या अमेझिंग इनिंगवर काही छंगले वाचायला मिळेल म्हणून आलो तर .....

इशान किशन जबरदस्त खेळतोय. गेल्या २ मॅचेस तो परत फॉर्ममधे येतोय ही भारतासाठी आनंदाची बाब आहे. मोक्याच्या वेळी खेळ उंचावणं ही मुंबईची खासियत आहे. >> Lets hope he opens for India in World Cup. It will be worth the gamble. KL Rahul at 4 would yield high chances of high scores.

Pages