आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"आमच्याईथे एकेकाळी लोकं अझरुद्दीनची सुद्धा अशीच वकीली करायचे" - घ्या! कुणीतरी म्हटलंच आहे, जे ऋन्मेष च्या आयुष्यात आहे, ते जगात आहे, जे ऋन्मेष च्या आयुष्यात नाही, ते जगात नाही. Happy .... नसेल म्हटलं तर असल्या अर्थाचं एखादं संस्कृत सुभाषित पाडून घ्यावं अशी आमची सुचना आहे. सरकारी अधिकारी इकडे लक्ष देतील का? Happy

गुरूदेव, स्वतःकडे ठोस पुरावा नसताना एखादं बेधडक विधान करायचं आणि एखाद्या यःकश्चिद मर्त्य मानवानं नम्रपणे त्यातला फोलपणा दाखवून द्यायचं धाडस दाखवलंच तर त्याच्यावरच हल्ला चढवून त्याला बचावात्मक पवित्रा घ्यायला लावायचं कसब आत्मसात करण्यासाठी केवळ आपलं शब्दामृत पुरेसं आहे की आणखीन काही व्रत करावं लागेल, ह्याचं एकदा मार्गदर्शन घडलं तर आम्ही कृतक्रूत्य होऊ. Happy

आणि ईंटरनॅशन २०-२० मी बघतो. ईतर २०-२० लीग मात्र आयपीएल वगळता दुसरे बघत नाही.. ईंटरनॅशनलमध्ये मला आयपीएलसारखे ट्विस्ट अँड चमत्कार आढळत नाही फारसे कधी. ती आयपीएलचीच स्पेशालिटी आहे >> थोडे दिवस मायबोलीवर बागडणे कमी कर नि तो वेळ इतर २०-२० लीग बघण्यात घालव. (घरचे कंप्लेंट्स करणार नाहीत) अर्धवट माहितीवर "लोकांचा ईंटरेस्ट खेचायला लवकरात लवकर एखादा क्लोज फिनिश, सुपरओवर वगैरे मॅनेज करावी लागणार" अशी खेळाडूंच्या कॅरॅक्टर वर ठपके ठेवायला लागणार नाहीत.

पंजाबने दाखवलेलं औदार्य बाकी कुणी दाखवणार नाही. > हे एकदम पटले. कुंबळे चा चेहरा बघण्यासारखा होता. त्यागी ला बूस्ट मिळेल ह्या ओव्हरमूळे. अर्शदीप इंप्रेसीव्ह आहे राव, त्याला नीट ग्रूम केला पाहिजे. सॅमसन ने अपेक्षेप्रमाणे च खेळ केला.

तो वेळ इतर २०-२० लीग बघ.
>>>

मी भारतीय नसतो तर आयपीएलसुद्धा बघितले नसते Happy
ईंटरनॅशनल २०-२० मला आयपीएलच्या तुलनेत विश्वासार्ह वाटते ते बघतो.

"ईंटरनॅशनल २०-२० मला आयपीएलच्या तुलनेत विश्वासार्ह वाटते ते बघतो."
+
"आमच्याईथे एकेकाळी लोकं अझरुद्दीनची सुद्धा अशीच वकीली करायचे"

अझहरुद्दीन इंटरनॅशनलच खेळायचा ना. नाही, ते विश्वासार्हतेविषयी काही तरी ऐकलं म्हणून विचारलं. Proud असं पाहिजे. दोन वाक्याची टोटल नाही लागली तरी चालेल. वर्तमानात जगण्याचं इतकं मोठं उदाहरण मी मी म्हणणार्या संतांमधे सुद्धा विरळाच.

"र्शदीप इंप्रेसीव्ह आहे राव, त्याला नीट ग्रूम केला पाहिजे." - सहमत!! मस्त आहे तो. त्याची व्हेरिएशन्स आणि कंट्रोल दोन्ही मस्त आहेत.

आजचा निकाल अगदीच अपेक्षित..... दोन्हीही संघांचे परफॉर्मन्स त्यांच्या गुणतालिकेतल्या स्थानाला साजेसेच!!

दिल्ली सहज जिंकले. अय्यर ची बॅटींग बघून मस्त वाटलं. कुठेही रस्टी वाटला नाही. स्टॉयनिस ची इंज्युरी दिल्लीपेक्षा ऑस्ट्रेलियाची काळजी वाढवणारी आहे. हैद्राबाद ला बर्याच गोष्टींची काळजी भेडसावत असणार आहे. रशीद चं अस्त्र चाललं नाही, पण तो एखादा ऑफ दिवस असू शकतो. वॉर्नर किती दिवस आऊट ऑफ फॉर्म असणार आहे कुणास ठाऊक! मिडल ऑर्डर प्रचंड भुसभुशीत आहे आणि बेअरस्टॉ नाही हे हैद्राबादासाठी फारसं आश्वासक नाही.

अझहरुद्दीन इंटरनॅशनलच खेळायचा ना. नाही, ते विश्वासार्हतेविषयी काही तरी ऐकलं म्हणून विचारलं. Proud
>>>>

एक्झॅक्टली !
तीच विश्वासार्हता
कायम राहावी म्हणून अझरुद्दीनवर जडेजावर आजन्म बंदी घालण्यात आली. क्रोनिएचीही कारकिर्द संपुष्टात आली.

आज चुम्माने चुम्मा कप्तानी केली. आणि चुम्मा फिनिश केला.
आश्विनला मात्र घाबरून बॉलिंग टाकताना बघणे त्रासदायक आहे. असेच करणार असेल तर वर्ल्डकपला त्याला घेणे अनाकलनीय आहे.

आणि हो, आयपीएलमध्ये केवळ क्लोज एनकाऊंटर होत नाहीत. तर पॉईंट ऑफ नो रिटर्नला सामना गेला आहे असे वाटते तिथून ते फिरतात. हि ब्युटी ऑफ आयपीएल आहे Happy

मी पण काल मुद्दाम हायलाईटस पाहिले.
समजा अस धरल की पंजाबला मॅच हरायची होती. परवा शेवटच्या षटकात दोन आउट झाले. दोघेही विकेट कीपरकडे कॅच देउन. एक तर वाइड बॉलला. त्या दोघांनीही किती रिस्क घेतली होती. स्वतःच्या अ‍ॅबिलिटी वर किती तो विश्वास. बॉल सरळ सोडून मॅच हरता आली असती, पण ते नाही, ठरवून नीक लावायची, इतकी बारीक कि रिव्हू घ्यावा लागावा पूरनच्या विकेटला. दुसरा तर वाईड बॉल होता. मॅच हरायची असे ठरलेले असताना सुद्धा बॅट फिरवायची म्हणजे काय. कतरी लागून फोर गेली असती म्हणजे. रात्री हॉटेल मधे मुडदाच पडला असता. पण ते दोघेही बिनधास्त बॅटी फिरवत होते. हॅटस ऑफ टू देयर कतरी स्कील. नेवर सीन सच अ जीवावर उदार होउन केलेली, मायक्रो प्रीसीजन , डेलिबरेट कतरी बॅटींग. आणि अश्या पद्धतीने मॅच हरायची अशी स्कीम करणार्‍याच्या बुद्धीची कमाल.

पण माझ्याकडे ते स्कील नाही. मी लटकणार नाही. मी कतरी लावणार नाही.

असो. दिल्ली टीम खूपच आत्मविश्वासाने खेळतीय. श्रेयस अय्यर त्याला मधे झालेल्या दुखापतीमुळे आता कर्णधार पदाच्या शर्यतीतून मागे पडतोय की काय?.
पंतच चांगल चाललय.

>>तीच विश्वासार्हता कायम राहावी म्हणून अझरुद्दीनवर जडेजावर
अरे मग श्रीसंत कसा बॅन झाला? अंकीत चव्हाण कसा बॅन झाला?

>>श्रेयस अय्यर त्याला मधे झालेल्या दुखापतीमुळे आता कर्णधार पदाच्या शर्यतीतून मागे पडतोय की काय?.
मला वाटलेले की श्रेयस अय्यर चांगला करत होता कप्तानी त्यामुळे तो परत संघात आल्यावर त्याच्याकडे परत देतील पण पंतही चांगला करतोय त्यामुळे दिल्लीसाठी अवघड झाला असावा हा निर्णय!!

"एक्झॅक्टली !" - नका, नका मालक, असं करू नका. असं 'एक्झॅक्टली' वगैरे म्हणून उगा आमची AM wavelength, तुमच्या FM wavelength शी जुळत असल्याचा खोटा आभास आमच्या मनात निर्माण करू नका. कुठे तुमच्या indigenous लॉजिक चा ताज महाल, आणि कुठे आम्ही इकडे तिकडे वाचून, गोळा करून आणलेल्या पुराव्यांच्या विटा!

"ईंटरनॅशनल २०-२० मला आयपीएलच्या तुलनेत विश्वासार्ह वाटते" - यह आपका बडप्पन हैं मालिक| नाहीतर आयपीएल ही ICC recognized (एकमेव?) लीग आहे ही बाब आपल्या सुक्ष्म निरीक्षणातून सुटली नसेलच. नुसती मॅच ची जाहिरात पाहून आपल्या चाणाक्ष नजरेला हे जाणवलं असेलच.

मुंबईची सुरवात बघून 180 सहज करतील असं वाटलं होतं. नाहीं झालं तसं. रोहितची फलंदाजी हा आनंददायक अनुभव, नेहमीच.
प्रसिद्धने 2 चांगल्या विकेट घेतल्या. पोलार्डने त्याला षटकार मारला , नंतरच्या चेंडूला आंतील कडा लागून बाद होण्याऐवजी त्याला चौकार मिळाला. मला खूप आवडलं तें हें कीं प्रसिद्ध दोन्ही चेंडूवर तोंड वाकडं न करतां गोड हंसला ! असं खास टेंपरॅमेंट कायम ठेवलन ( व 'नो बाॅल' व 'वाईड' वर नियंत्रण ठेवलन ) , तर तो खूप प्रगती लवकर करेल असं वाटतं.

मुंबई बहुतेक हा ह्या आयपीएलचा उत्तरार्ध आहे हें विसरून नेहमीसारखी सुरवातीचे सामने हरतेय, असं तर नाहीं ना ! Wink

>>नेहमीसारखी सुरवातीचे सामने हरतेय

हाहाहा..... भारीच भाऊ!!
प्रसिध मला पण आवडतो...... भारताची पेस बॉलिंग बेंच स्ट्रेंथ खुप सॉलिड आहे!

"मुंबईची सुरवात बघून 180 सहज करतील असं वाटलं होतं. नाहीं झालं तसं" - हो ना.. आज मुंबई मोठा स्कोअर करेल असं वाटत होतं. रोहित आणि डि-कॉक ने जबरदस्त सुरूवात केली होती. पण नंतर केकेआर ने चांगली बॉलिंग केली. गेल्या दोन मॅचेस मधे केकेआरकडून व्यंकटेश अय्यर फारच मस्त खेळतोय. त्याच्या बॅटींगमधे सॉलिड कॉन्फिडन्स आहे. जैस्वाल, पडिक्कल च्या बरोबरीनं आणखीन एक आकर्षक लेफ्टी ओपनर बघायला मस्त वाटतंय.

समजा अस धरल की पंजाबला मॅच हरायची होती. >>> मुळात असे गृहीत धरले हेच चुकीचे होते. त्याऐवजी जर सामना रोचक करणे हा हेतू होता असे गृहीत धरलेत तर शेवटच्या चेंडूला पंजाब सामना जिंकली असती तरी सामना रोचकच झाला असता ना..

मुंबई बहुतेक हा ह्या आयपीएलचा उत्तरार्ध आहे हें विसरून नेहमीसारखी सुरवातीचे सामने हरतेय, असं तर नाहीं ना >> फिक्स हो भाऊ. आधी हरायचे नि मग जिंकायचे. आज पण बघा ना, रोहित कसा बाद झाला. पहिल्या दहा षटकांमधे ८० नि नंतर फक्त ७५. बोल्ट ने कसे पहिल्याच ओव्हरमधे सैरावैरा बॉल्स टाकले. बुमरा ने कसे फोर मारून दिले. सगळेच फिक्स हो ! हाय काय नि नाय काय !

गेल्या दोन मॅचेस मधे केकेआरकडून व्यंकटेश अय्यर फारच मस्त खेळतोय. त्याच्या बॅटींगमधे सॉलिड कॉन्फिडन्स आहे >> हो काँफिडंट वाटतो एकदम

मुळात असे गृहीत धरले हेच चुकीचे होते. त्याऐवजी जर सामना रोचक करणे हा हेतू होता असे गृहीत धरलेत तर शेवटच्या चेंडूला पंजाब सामना जिंकली असती तरी सामना रोचकच झाला असता ना.. >> :हताशः

मुंबई बहुतेक हा ह्या आयपीएलचा उत्तरार्ध आहे हें विसरून नेहमीसारखी सुरवातीचे सामने हरतेय, असं तर नाहीं ना >> फिक्स हो भाऊ. आधी हरायचे नि मग जिंकायचे. आज पण बघा ना, रोहित कसा बाद झाला. पहिल्या दहा षटकांमधे ८० नि नंतर फक्त ७५. बोल्ट ने कसे पहिल्याच ओव्हरमधे सैरावैरा बॉल्स टाकले. बुमरा ने कसे फोर मारून दिले. सगळेच फिक्स हो ! हाय काय नि नाय काय !

गेल्या दोन मॅचेस मधे केकेआरकडून व्यंकटेश अय्यर फारच मस्त खेळतोय. त्याच्या बॅटींगमधे सॉलिड कॉन्फिडन्स आहे >> हो काँफिडंट वाटतो एकदम

मुळात असे गृहीत धरले हेच चुकीचे होते. त्याऐवजी जर सामना रोचक करणे हा हेतू होता असे गृहीत धरलेत तर शेवटच्या चेंडूला पंजाब सामना जिंकली असती तरी सामना रोचकच झाला असता ना.. >> :हताशः काय आनंद मिळतो लोकांना ह्यातून देव जाणे !

काय आनंद मिळतो लोकांना ह्यातून देव जाणे !
>>>>>
सेम Happy
जे समाधान काही लोकांना भाबडेपणे जगून मिळते Happy

सध्या भारतीय संघात कर्णधारपदाला घेऊनही सारे काही आलबेल नाहीये आणि राजकारण शिजतेय.
काही लोकांना मात्र सारे काही सुरळीत आहे असेच समजून चालायचे असेल तर त्यांच्या तसे समजण्याला माझा आक्षेप नाही.
पण जर कोणी त्या शिजणार्‍या राजकारणावर काही चर्चा केली तर त्यालाच मुर्खात काढणे हे मनोरंजक आहे Happy

जरा मायबोलीबाहेरही जग आहे ते बघा. आयपीएलमधील सावळ्यागोंधळाबद्दल कित्येक लोकांना शंका आहे. ती घेणारा मी या ग्रहावर काही एकटाच नाहीये. पण कोणाचे मायबोली हेच जग असेल तर माझी हरकत नाही. खुश राहा या जगात. फक्त समोरच्यालाही या जगापुरतेच बांधून घे स्वतःला अशी सक्ती नको Happy

व्यंकटेश अय्यर फारच मस्त खेळतोय. >> खरच. एकदम सहज खेळतो. हा कुठुन आला एकदम.
मला स्वतःलाच टेस्टच्या मोड मधून बाहेर यायला वेळ लागतोय. प्लेयर्सच काय होत असेल. Happy अजून लाइव बघायचा मूडच येत नाहीये.

गल्लीपासून दिल्ली पर्यंत, ब्रेबॉर्न पासून लॉर्डस पर्यंत, इन्डोअर पासून आउटडोअर पर्यंत थोडक्यात अथ पासून इथि पर्यंत राजकारण चालणारच. खेळताना एकत्र या आणि जनतेचे कल्याण करा म्हणजे झाल. Happy

*थोडक्यात अथ पासून इथि पर्यंत राजकारण चालणारच. * खरंय. पण प्रत्येकाने खेळाच्या प्रत्येक टप्प्यावर राजकारण कुठे व कसं चाललंय व खरा खेळ कोण व कसा करतंय यावर स्वत:च्याच सोयीनुसार अर्थ लादायचा का, हा खरा मुद्दा आहे . आपल्या आवडीचा खेळाडू असेल , तर त्याने ' अफलातून खेळी करून सामना खेचून आणला ' म्हणायचं व इतरांच्या बाबतीत, ' हें ठरलेलंच होतं !' म्हणायचं, हें राजकारण चर्चेतही सर्रास चालताना दिसतच ना ! म्हणूनच , राजकारण चालतं याची जाणीव असूनही माझ्यासारखे
' भाबडे' फक्त सतत तो गाॅगल लावूनच सामने पहात नसावेत; दुर्दैवाने , त्यांच्या समोर दुसरा पर्याय फक्त 'सामने न पहाणं 'हाच असतो !

इथे कुणाचीही मते इतक्या सहजी बदलणार नाहीत..... ज्याने त्याने याबाबतीतल्या आपापल्या श्रद्धा अंधश्रद्धा आपापल्या जवळ ठेवून फक्त खेळावर भाष्य केले तर उगाच हे विषय ताणले जाणार नाहीत..... नाहीतर या वादाला अंत नाही!

अय्यर आणि त्रिपाठी मस्तच खेळले काल..... KKR एकदम आक्रमक मोडमध्ये आहे या वेळेला!!

इथे कुणाचीही मते इतक्या सहजी बदलणार नाहीत..... ज्याने त्याने याबाबतीतल्या आपापल्या श्रद्धा अंधश्रद्धा आपापल्या जवळ ठेवून फक्त खेळावर भाष्य केले तर उगाच हे विषय ताणले जाणार नाहीत..... नाहीतर या वादाला अंत नाही! <<<< १००

* फक्त खेळावर भाष्य केले तर उगाच हे विषय ताणले जाणार नाहीत....*. +1 Wink
माझे एक जाणकार क्रिडा समीक्षक मित्र आहेत. ते गंमतीने नेहमी म्हणतांत, जुजबी माहितीच्या आधारे तासन तास तज्ञ असल्याचा आव आणून ज्यावर बोलतां येतं, असा एकमेव खेळ म्हणजे क्रिकेट !!! ( अर्थात, ते मलाच उद्देशूनच हें म्हणत असावेत, असंही मनात येवून जातंच ) Wink

आई म्हणते, ' क्रिकेटर नको, क्रिकेट तज्ञच बघ ! आयुष्यभर बाहेर लोकांना बोअर करण्यातच तो बिझी राहील . त्यामुळे,घरांत तरी तुला कटकट नाहीं होणार ! '
20181230_225041_0.jpg

भाऊ - व्यंगचित्र मस्त!

स्वरूप - सहमत!! हा प्रयत्न सगळ्यांनी केला आहे. मागे तू 'पालथ्या घड्यावरच्या पाण्याविषयी' म्हणाला होतास तेव्हाही हे जमवायचा प्रयत्न केला होता. पण दर वेळी रावासाहेबांच्या कलेक्टरासारखं 'काड्या सारण्याने' विषय भरकटत रहातो. वर भाऊ म्हणाले तसं आपला तो बाब्या आणि दुसर्याचं ते कार्टं हा न्याय जोपर्यंत चालू रहाणार तोपर्यंत ह्या प्रकाराला अंत नाहीये.

आजची मॅच सँडस्टॉर्ममुळे सुरू झालेली नाहीये. शारजा आणि सँडस्टॉर्म म्हटलं की एकंच गोष्ट (https://www.youtube.com/watch?v=aMubYAbRbgc&t=5s) आठवते.

"जरा मायबोलीबाहेरही जग आहे ते बघा" - अब रुलायेगा क्या पगले! Happy

पाहिलंत... माझ्यासारख्या नतद्रष्ट माबोकरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा दृष्टांत आहे. एकीकडे 'मायबोली ला मी माझं घरंच समजतो', 'घरी जसा सोफ्यावर पहुडतओ / लोळतो / बागडतो, तसंच इथे बागडतो', 'मी बाकी काहीही वाचत नाही, इथेच धागे काढून प्रश्नांची उत्तरं मिळवतो' असं म्हणून मायबोली ला आयुष्यात .... नाही नाही जीवनात, (सर्वसामान्य जगतात ते आयुष्य, असामान्यांचं असतं ते जीवन!) स्वतःच्या घराचं, ज्ञानाच्या स्रोताचं स्थान देणार्यानेच अत्यंत निरलसपणे इतरांना बाहेरचं जग पहाण्याचा मार्ग दाखवून त्यांचा भाबडेपणा दूर करण्याचा प्रयत्न करणे हे भारतीय अध्यात्माच्या उच्चतम निष्काम कर्मयोगाचंच मूर्तिमंत उदाहरण आहे. Happy

Guys..... Choose ur battles Wink

कोहली चांगला खेळतोय एकदम..... RCB ची चांगली सुरुवात!!

"RCB ची चांगली सुरुवात!!" - हो ना. पण आता गडगडतायेत की काय असं वाटतंय. They have to finish strong! तर मॅच चुरशीची होईल.

Pages