आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल राहुल बाद असताना रोहित ने आणि पंड्या ने औदार्य दाखवून परत एक चान्स दिला. पण खरच ह्याची गरज होती का? खेळाडू मध्ये आल्यामुळे तो धावबाद झाला नव्हता तर त्याचाच टीम च्या खेळाडूने बॉल मारल्यामुळे बाद झाला होता. माझ्यामते ह्याची काहीही गरज नव्हती. आणि मुख्य म्हणजे एकदा खेळाडू बाद झाला तर विरोधी टीम च्या कॅप्टन ला असा अधिकार आहे का?

मुख्य म्हणजे एकदा खेळाडू बाद झाला तर विरोधी टीम च्या कॅप्टन ला असा अधिकार आहे का?
>>>>
जर रन आऊटसाठी आधी अपील करणे गरजेचे आहे तर येस्स. अपील न करण्याचा अधिकार आहे.

गरज नव्हती असे मलाही तेव्हा वाटले. पण घडले उत्स्फुर्तपणे फार विचार न करता. आणि आता तो विडिओ व्हॉटसपवर फिरतोय. सामनाही जिंकला मनेही जिंकली.

पण खरच ह्याची गरज होती का?>>> हो होती. आता आयपीएलवर लक्ष केंद्रित न करता वर्ल्ड कपवर लक्ष द्यायला पाहिजे. भारतीय खेळाडूंना जास्तीत जास्त बॅटिंग बॉलिंग अनुभव मिळाला पाहिजे. या कारणामुळे त्याविरोधात अपील नाही केली.

अजून एक असू शकते.
आजचा सामना आपलाच आहे हे मुंबईला आधीच माहीत असावे त्यामुळे उत्स्फुर्तपणे हे औदार्य दाखवले गेले असावे.
शमीचे थर्डमॅनचा फिल्डर आत घेऊन पांड्याला सातत्याने शॉर्ट बॉल टाकणे हे अनाकलनीय होते.
त्यात शेवटची कॅच सोडून बॉल सरळ सीमापार जाऊ दिला.
आधीही बहुधा पांड्याची कॅच सोडलेली.
बहुधा त्यालाही बॅटींग प्रॅक्टीस आणि आत्मविश्वास देत असावेत Happy

*मुख्य म्हणजे एकदा खेळाडू बाद झाला तर विरोधी टीम च्या कॅप्टन ला असा अधिकार आहे का?* -
-अधिकार/नियम आहे का निश्चित माहित नाहीं पण सोबर्सने झेलबाद दिलेल्या आपल्या फलंदाजाला (बहुतेक, बुधी कुंदरन, यष्टीरक्षक व सलामीचा फलंदाज) अर्ध्या वाटेवरून परत बोलावलयाचं व आपल्या विश्वनाथनेही तसं केल्याचं नक्की आठवतंय.

*मुख्य म्हणजे एकदा खेळाडू बाद झाला तर विरोधी टीम च्या कॅप्टन ला असा अधिकार आहे का?* ->> अपिल मागे घेण्याचा अधिकार आहे एखाद्या वेळेस कर्णधाराला अस वाटल की अपिल चुकिचे होते तर अंपायरने बाद दिल्यावरही अपिल मागे घेता येते.
पण एकदा वेस्ट इंडिज मधे असा प्रसंग घडला होता. त्यांच्या प्लेयरला (बहुतेक कालिचरण) आउट दिल गेल होत. तो नियमाप्रमाणे आउट होता. पण नैतिक दृष्ट्या अपिल करण योग्य नव्हत (नक्की काय झाल होत मला आठवत नाही). मग त्यानंतर मॅच दंगली मुळे थांबली. दुसर्‍या दिवशी ऑपोसिट टीमने अपिल मागे घेतल. तो प्लेयर परत खेळायला आला व खेळ पुढे चालू झाला.
माझ बरोबर आहे रेफरन्स सापडला
https://en.wikipedia.org/wiki/Alvin_Kallicharran
One of his most noted international innings, a knock of 158 against England, was shrouded in controversy when he was run out by Tony Greig on the final ball of the second day. After the ball had been defended and Kallicharran had started to walk off, Grieg threw down the stumps at the non-striker's end, running him out. After negotiations off the pitch, England withdrew their appeal, allowing Kallicharran to continue the next morning.[3]

कालिचरणला वाटल वेळ संपली म्हणून तो चालू लागला. पण बॉल इन प्ले होता. आणि ग्रेगने त्याला रन आउट केले.

वरील प्रसंगाचे इथे खूप छान वर्णन केले आहे. आवर्जून वाचा.
https://www.espncricinfo.com/story/it-ain-t-over-until-it-s-over-144678

त्यातल मला हे फार महत्वाचे वाटले
What could have been a crisis was resolved by some sensible diplomacy and sound common sense. What is remarkable is that nobody came out of the whole episode badly, not even Greig. Some critics moaned that the reversal of the decision had been a result of mob rule, and fear that the crowds the next day - and throughout the series - might turn ugly. But with hindsight, reinstating Kallicharran was right given the circumstances. Sometimes it is all about the interpretation of the laws rather than the letter of them.

मुख्य मुद्दा बाद दिलेल्या फलंदाजाला कर्णधार परत बोलावूं शकतो का, हा आहे. मला वाटतं, कर्णधार परत बोलावतो याचाच अर्थ त्याने अपील मागे घेतलं आहे व त्यामुळे अंपायरचा निर्णय आपोआपच रद्द झाला आहे, असं गृहीत धरलं.जात असावं.

कोहली प्रकरणात रहाणे पुजाराचे नाव आता समोर येत आहे
>>>>>

‘या’ वरिष्ठ खेळाडूने BCCI कडे विराटच्या Attitude बद्दल केलेली तक्रार

भारताचा पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेवर ड्रेसिंग रुममध्ये जाऊन आराडाओरड केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामुळे संघामध्ये फूट पडली आणि यातूनच मोठा वाद निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. पुजाराला कामगिरीमध्ये सातत्य राखण्यात अपयश येत होतं. तर भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असणाऱ्या राहणेलाही चांगली कामगिरी करता आली नाही. या प्रसंगानंतर पुजारा आणि रहाणेने जय शाह यांना फोन करुन घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर बीसीसीआयने याप्रकरणात लक्ष घातलं आणि संघातील इतर खेळाडूंकडून याबद्दल माहिती मावगली. न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार टी २० विश्वचषकानंतर बीसीसीआय कोहलीकडे एकदिवसीय क्रिकेटचं कर्धणारपद ठेवायचं की नाही याबद्दलही महत्वाचा निर्णय घेऊ शकतं असं सांगण्यात येत आहे.

*२० विश्वचषकानंतर बीसीसीआय कोहलीकडे एकदिवसीय क्रिकेटचं कर्धणारपद ठेवायचं की नाही याबद्दलही... *-
जर सिनीयर खेळाडूंना आरडाओरडा करून संघात फूट पाडलयाने कोहली हा कर्णधार म्हणून अयोग्य ठरत असेल, तर तो सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधे कर्णधार म्हणून अयोग्य ठरणं तर्कशुद्ध होतं. कर्णधार म्हणून कोहली टी20, एकदिवसीय व कसोटी सामन्यांत संघ सहकार्यांशी वेगवेगळ्या प्रकारे वागतो, असं आहे का? *आराडाओरड केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.*, त्याच सूत्रांनी ह्याचं पण उत्तर द्यावं.
तात्पर्य : कोणत्या सूत्रावर किती विश्वास ठेवायचा हें प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार ठरवावे. Wink

पुढे कसोटीचेही जाऊ शकते. वा तिथे रिझल्ट चांगले येत असतील तर कदाचित ते सध्या राहूही शकते. मला जे चित्र दिसतेय ते साधारण असे आहे की विराट कोहलीवर अंकुश ठेवला जातोय. तू एकटाच बॉस नाहीयेस ते आम्ही आहोत हे त्याला दाखवून दिले जातेय. २०१९ च्या वनडे वर्ल्डकपनंतर ज्या धोनीला बोर्डातर्फे कोणी विचारतही नव्हते आणि अखेर त्याला वर्षभराने वाट बघून कंटाळून कसलाही निरोपाचा सामना न मिळता निरोप घ्यावा लागला, त्याला अचानक २०-२० वर्ल्डकपचा चा मेंटर म्हणून कोहलीच्या डोक्यावर आणून बसवणे तेव्हाच मी म्हटलेले की यामागे काहीतरी गेम आहे, येणारा काळच सांगेल. वारे नक्कीच वेगळ्या दिशेने वाहू लागलेत.

जर भारताने T20 world cup जिंकला तर वारे परत कोहली च्या बाजूने वाहायला सुरवात होईल.

मग काही जण सुखासुखी तसे होऊ देणार नाहीत. झाले तरी कोहलीला श्रेय सहजासहजी घेऊ देणार नाहीत. याचा फटका विश्वचषकाला बसणार याचीच भिती आहे
आश्विनला घेतला, अक्षरला घेतला. पण २०-२० स्पेशालिस्ट कोहलीचा लाडका चहलही ऐनवेळी विश्चचषकाच्या बाहेर झाला आहे. त्याजागी रोहीत शर्माच्या मुंबई ईंडियन्समधील राहुल चहर आहे. नव्हे तब्बल सहा मुंबई ईंडियन्स संघात आहेत.

युझी चहल - राहुल चहर
शार्दुल ठाकूर - हार्दिक पांड्या
संजू सॅमसन - ईशान किशन
श्रेयस अय्यर - सुर्या (याचे तर विराटभाऊंशी वाकडेही आहे म्हणतात)

थोडक्यात सगळीकडे रोहीत शर्माच्या मुंबईकरांचीच वर्णी लागली आहे.

https://mahasports.in/sunil-gawasakar-says-about-t20-captaincy-and-vice-...

रोहितने यावर्षीच टी२० विश्वचषकात करावे नेतृत्व, तर ‘या’ खेळाडूंचा उपकर्णधारासाठी व्हावा विचार, गावसकरांचे मत

ते पुढे म्हणाले, ‘त्यानंतर, मी उपकर्णधारपदासाठी केएल राहुलकडे पाहत आहे. मी रिषभ पंतच्या नावाचाही विचार करेन. कारण तो ज्या प्रकारे स्टार खेळाडूंनी भरलेल्या दिल्ली (दिल्ली कॅपिटल्स) संघाचे नेतृत्व करत आहे, ते खरोखर प्रभावी आहे. एन्रिच नॉर्किए  आणि कागिसो रबाडा सारख्या खेळाडूंचा चांगल्या प्रकारे वापर करून तो टी२० प्रकारामध्ये गोलंदाजी बदलत आहे. हे खरोखर एक हुशार कर्णधार असल्याचे द्योतक आहे. आपल्याला नेहमीच एक कर्णधार हवा असतो जो परिस्थिती समजू शकतो आणि त्यावर त्वरित काम करू शकतो. तर, राहुल आणि पंत हे दोन खेळाडू मी भविष्यात उपकर्णधार म्हणून पाहतो.’

सोशल मीडियावर बोलत आहेत की कोहलीने ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांसमोर रहाणे आणि पुजाराला एकमेकांचे कान पकडून उठाबशा काढायला लावल्या त्यामुळे त्यांनी bcci कडे तक्रार केली.

गावसकरने असल्या पुड्या सोडत बसणयाऐवजी खेळाडूना , विशेषतः नवोदित, त्याच्या बहुमोल सल्ल्याचा लाभ कसा देतां येईल याचा विचार केला तर तें भारतीय क्रिकेटसाठी कित्येक पटींनी अधिक शुभकारक ठरेल, असं मनात आलं

त्याला विचारले, ऑफिशिअली नेमणूक केली आणि त्याचा योग्य मोबदला दिला तर करायला हरकत नाही.

गावसकरने असल्या पुड्या सोडत बसणयाऐवजी >> गावस्कर चे खरे वक्तव्य असे होते भाऊ. लॉजीकल होते तो म्हणाला ते.

Gavaskar also said that since Kohli will step down as the T20 captain after the upcoming World Cup in the UAE, Rohit Sharma is the ideal candidate to lead the team in the T20 World Cup next year.

"I think Rohit Sharma for the next two World Cups because they are back-to-back, one starting in a month and another exactly a year from now. So clearly, yes, you don't want to change too many captains at this particular stage. Rohit Sharma would definitely be my choice for the captaincy of the Indian team for both these T20 World Cups. And then, I'm looking at KL Rahul as the vice-captain," said Gavaskar on Star Sports show Cricket Connected.

कसोटीतल्या खेळाडूंनी तक्रार केली म्हणून T20 आणि ODI चे कर्णधारपद काढून घ्यायचे लॉजिक काय म्हणे? >> Happy

*लॉजीकल होते तो म्हणाला ते.* तो ह्या विषयावर ( कुणाला घ्यावा, कुणाला कर्णधार/ उपकर्णधार करावा इ.) नेहमी नांव घेवून बोलतो, हेंच मला इलाॅजिकल वाटतं.

मी काही मनाचे नाही लिहिलेय ओ. जसे तुन्ही ईंग्लिश न्यूज कॉपी पेस्ट केली तसे मी मराठी बातमी कॉपीपेस्ट केली.

बाकी आपल्याकडे दोन फॉर्मेटला दोन वेगळे कर्णधार ठेवायची पद्धत नाहीये. २०-२० एकवेळ ठिक आहे पण कसोटी वा वनडे दोन्ही पैकी एकातून कोहलीचे कर्णधारपद गेले की दुसरीतूनही गेले समजा.

नेहमी नांव घेवून बोलतो, हेंच मला इलाॅजिकल वाटतं. >> आता असं बघा भाऊ , गावसकर ला क्रिकेट मधले आपल्यापेक्षा अधिक कळते (किमान मी आणि तुम्ही असे नक्की मानतो). इथे लोक ज्यांना त्याच्यापेक्षाही कमी कळते असे लोक 'अमक्याने कसे फिक्स केले, तमक्याने कसा त्याची तक्रार के,ली, ह्याचे इवस आता भरलेच ' असे छातीठोकपणे सांगत असतात तर गावस्कर ने नाव घेऊन लिहिले तर ते कशाला इलाॅजिकल वाटून घेता आहात Happy

असामी Rofl

मलाही घे रे बाबा त्या ‘गावसकरला आपल्यापेक्षा क्रिकेटमधलं जास्त कळतं’ असं मानणार्यांच्या यादीत. Happy

गावस्करला कुठे काय कळतंय क्रिकेटमधलं? त्याच्याकडे दुर्लक्ष करा. त्याकाळी जास्त लोक क्रिकेट खेळायचे नाहीत. मोजके लोक खेळायचे. त्यामुळे नाईलाजाने गावस्करला टीममध्ये घेतला. आता पण तो मार्गदर्शन न करता काड्या टाकणे आणि याच्या त्याच्या पर्सनल लाईफवर टोमणे मारण्याची कामं करतो. जर खरोखरच त्याला नॉलेज असतं तर त्याने तरुणांना मार्गदर्शन केलं असतं.

*छातीठोकपणे सांगत असतात तर गावस्कर ने नाव घेऊन लिहिले तर ते कशाला इलाॅजिकल वाटून घेता आहात *- गावसकर सांगतो म्हणूनच इलाॅजिकल वाटतं. मीं म्हटलं तर काडीचाही फरक पडत नाहीं पण त्याने म्हटलं तर निवड पद्धत, खेळाडूंची मानसिकता इ.वर परिणाम होतो. ऐखादे वेळ अगदींच चुकीचा निरणय असेल, तर गावसकरने त्यावर मतभेद व्यक्त करणं औचित्यपूर्ण आहे पण काॅमेंटरी बाॅकस व मुलाखतीतून सतत निवडीबाबत मतभेद असला तरी तो जाहीरपणे व्यक्त करत रहाणं मला खटकतं. उदा. गेल्या ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरूं होतां होतां त्याने ' मयांक अगरवाल हा शुभमन गिलपेक्षा अधिक योग्य ओपनर आहे ' असं जाहीरपणे म्हणणं हें स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयार असलेल्या दोन नवोदित खेळाडूंत भेदभाव व इतर खेळाडूंचा , निवड समितीचा बुद्धीभेद केल्यासारखं नाहीं होत ?
इथल्या कुणापेक्षाही गावसकरबद्दलचा फलंदाज म्हणूनचा माझा आतयतिक आदर व प्रेम तसूभरही कमी नाहीं . तरीही मला हें बरीच वर्षं खटकत होतं, म्हणून नाईलाजाने सांगावंसं वाटलं.

गावस्कर बरोबर बोलत असतीलही. पण ही वेळ चुकली. वर्ल्ड कप आता आलाच आहे १५ दिवसांवर. कोहली कॅप्टन आहे. विषय संपला. त्यांनी आत्ता कॅप्टन बदला म्हणणे चूक.

हा रवी बिश्नोई या सीजनला चांगली बॉलिंग टाकतोय. आधीही तो मला ईंटरेस्टींग वाटायचा. पण आता कंट्रोल वाढला आहे त्याचा. अशीच सुधारणा राहिली तर हा भारतीय संघात दिसू शकतो नक्कीच.

Pages