चूकीची उत्तरे द्या

Submitted by म्हाळसा on 17 February, 2021 - 16:37

तो, ‘दृश्यावरून गाणं ओळखा’ असा धागा आहे बघा.. ज्यात आपल्याला दृश्य बघून अचूक गाणं ओळखायचं असतं.. अगदी तसंच..पण इथे दृश्य बघून सगळ्यांना चित्रपटाचं नाव सांगायचं आहे.. तेही फक्त आणि फक्त चूकीचच.. म्हणजे, त्या दृश्याला शोभेल असं, पण भलत्याच चित्रपटाचं नाव द्यायचं आहे..
हो हो..अगदी बिनधास्त चूकीची उत्तरं द्यायची .. कोणीही मार्क्स कापणार नाहीत..
बरं..त्याच बरोबर एखाद्या दृश्यासाठी किती चूकीची उत्तरे द्यायची ह्यावर बंधनं नाहीत.. त्यामुळे हवी तितकी पण दृश्याला साजेशी अशी नावं सुसाट लिहीत सुटा.. त्यात अजून जर चार चांद लावायचे असतील तर चित्रपटाच्या नावासोबत एखादा डायलॅाग चिकटवलात तहीही चालेल..

तो गुरू, हो जाओ शुरू..

पहिलं दृश्य,
A23A151C-9A61-4E1F-ADA4-4A0C27B33122.jpeg

सुरूवात माझ्यापासून करते -
How to train a dragon

“हम तो मासूम पंछी है डाल के, पंछी..आसमान मे उडनेवाले मासूम पंछी”

चला चला.. पटापट तुमचेही चाराणे येऊद्यात

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>>>#कितीफेकतोसरेपोरा !!!
अस्मिता, मामी व सी धन्य धन्य कॉमेंटस टाकत असतात Happy हहपुवा होते नुसती.

>>>>>#कितीफेकतोसरेपोरा !!! >> Lol

एक म्हणते "आपला", दुसरी म्हणते फेकता है साला, नि तिसरी म्हणते पन्नाशी आली... मला ऑप्शन No desvies la mirada , Quedate cerca de mi एवढंच उरलं का.....

देवा!!!! Lol :आपणहिलाओळखतनायबाहुली:

Pages